गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला
न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने
त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष
जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस
अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो
पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो.
ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो
पण
हलले "दु"कान
हलले "दु"कान
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!! सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर ! द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी ! जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण ! दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...
पेरणा
वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...
निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा
सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा..
टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे
जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा..
दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...
मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे
ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे...
हम्माऽऽऽ ...
हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही
पेरणा आणि प्रेरणा
जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती
पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही
....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही
....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही
मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही
दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही
....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई
.......
बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही
तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची
जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही
....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई
.......
तीर्थ
तीर्थ कुठले ? इथे कसे?
कुणी आणले?
काय तो आस्तिक!
कोण त्याचा देव?
काssssही विचारु नका.
तीर्थ घ्या.
ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे.
वाद नको. विचार नको.
गंगा काय न् नर्मदा काय....
याच समुद्रात मिसळतात!
बसा निवांत.
तीर्थ घ्या.
बाहेर दंगा आहे फार.
जरा मनातच लोळा.
आकांत नका मांडू
एकांताचा.
तीर्थच ठेवा ना उशाला!
रात्र टाका पायथ्याला.
तीर्थ घ्या.
तीर् घ्या.....
<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...
आमचाही पाउस.....
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
मिपासार
(मिपावर)
जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)
जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)
जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )
तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?
तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?
तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?
तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….
मिसळपाव