Skip to main content

रोज किती पाणी प्यावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

आनंदयात्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 22/03/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरल्या साऱ्या चिंता खंती उरल्या नुसत्या खाली भिंती नाही कुणाचे उगा लोढणे दुसर्‍या साठी उगा कुढणे संपून गेले वसंत वैभव भोगत आहे शिशीराचे यौवन फणसा सारखे पिकले गरे आपण बरे,आपले काम बरे पांघरून भूत भूतकाळाचे वेध लागले भविष्याचे खेद ना खंत या भूताचा विचार आता फक्त स्वताचा आनंदयात्री या जगातील वाट चालतो अनंताची ठेऊन दृष्टी अदृष्यातील वाट पाहतो गंतव्याची

पुरूष एक वाल्या कोळी.

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 13/12/2021 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

नंस न ओढताही आठवत काहीबाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/08/2020 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

आयुष्याच्या वाटेवर..

लेखक मन्या ऽ यांनी रविवार, 14/06/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटेवर.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात काही विस्मृतीत जातात ; तर काही मनात घर करतात.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. मनात घर करणारे खोलवर रुजतात; त्यांची साथ हवीहवीशी वाटत असताना मात्र साथ सोडुनिया जातात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यांच्या परतण्याची वाट पाहत असताना डोळेही पाणावतात. त्यांच्याही मनात तेच असतं ; सांगताना मात्र कचरतात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यातले काहीजणच मात्र मैत्रीला जागतात.. -दिप्ती भगत (२१जून,२०१९)