Skip to main content

क्रूड ऑईल...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/10/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त!

"हाय"कू

लेखक नाखु यांनी बुधवार, 07/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही.

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:11 या दिवशी प्रकाशित केले.

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

एक होती रातराणी

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच असं झालं kvitaa लिहली आणि नावच सुचतं नव्हतं. मग तरी घाई घाईत तशीच चिकटवली. काही वेळाने बघितलं तर वेल्लाभट म्हणाले पहिल्याच कडव्यात यमक चुकलंय. अर्रर झालं एकदम! तस आम्ही निमित्त शोधतचं असतो हवापालट करून यायच! आता ही आयती संधी का सोडा म्हणून आम्ही सध्या "ताण" मुक्त होण्यासाठी "एक ब्रेक घेतलाच पाहिजे" या निष्कर्षाप्रत पोचलो आहे. तर ही जिलबी वाचून कुणालाही ताण आल्यास तुम्हीही घ्या एक ब्रेक. काय म्हणता पाल्हाळ वाचूनचं आला ताण. बर सॉरी बरं का. तरी आई सांगत असते माणसाने कसं नेमकं बोलावं. कधी जमेल काय माहिती!

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 22/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेर्ना रस्सा तिखट पुरी सपाट तरी न माझे भरले ताट... जिलबीमागून भजी वाढली बासुंदीचा भलता थाट.. वरणभाताच्या शिखरांमध्ये तुपाचा हा अवघड घाट.. जरा किनारा दिसला पानी मठ्ठ्याची मग आली लाट... आयुष्याच्या पंगतीस मी .. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 10/09/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा!

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 07/09/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......

(चरस गांजा अता मिळाल्या)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला* करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला --(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद *गवत*= ग्रास

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...