Skip to main content

भासं~फुलं!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 04/10/2017 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा... ;) ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात शब्दातून क्रीडेत क्रीडेतून शब्दात व्यासातून आसात आसातून व्यासात शब्दांच्या मनोय्रात मनोय्रांच्या शब्दात अर्थ नाही आशयात आशय नाही अर्थात रिकाम्या कुंथनात कुंथनातून रिकाम्यात.. शब्दकृतींच्या प्र-हारात भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;) कवी- अपना

पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही

लेखक दमामि यांनी गुरुवार, 28/09/2017 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय? पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय "मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन्  युक्तीचे सहा धडे कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले चहा पाजवा पुणेकरांना  सौराअभ्याने चिडविले दूध कुणाचे ,कपिलेचे की...?  कळ काढिती मुनीवर्य धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहा

(महाग्रु)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/09/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

(ही पहा पाडली गजल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 16/05/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो!

एक 'मळमळ-झल'

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 21/03/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री डब्यात आलेले छोले खाऊन सोडलेली ही 'मळमळझल' पेश-ए-खिदमत आहे. उथळ जळाची खळखळ अटळ वळूची मळमळ कशास या वेटोळ्या कशास रे ही वळवळ सुरी असे ही बोथड उगाच का ही चळचळ? जखम दिसावी गहिरी खरी असावी कळकळ झुळूक वाहत नसली तरी असावी सळसळ इनो जरासा घ्यावा रुकेल तुमची जळजळ भरून येती डोळे प्रवाह वाहे भळभळ कळी कळे का कोणा? करा कशाला खळखळ? कुटाळ टाळा 'स्वामी' विटाळ आहे चळवळ - स्वामी संकेतानंद

(मुलिंनी धरु नये अबोला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 25/12/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

(कोरडी भाकर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 23/11/2016 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 17/11/2016 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु