यथा शास्त्रप्रमाणेनं...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 10:06 pm

सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)

संस्कृतीधर्मसमाजविचारअनुभवमत

सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 7:16 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

प्रवासक्रीडाविचारअनुभव

माझे रिकामे उद्योग!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in मिपा कलादालन
2 May 2016 - 4:50 pm

लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही.

पांडुरंग/पौंड्रक,आणि विट्ठल??

खालीमुंडी पाताळधुंडी's picture
खालीमुंडी पाताळधुंडी in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 4:19 pm

जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला.
लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय,
http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms

लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय.

धर्मसंदर्भ

एक संघ मैदानातला - भाग ४

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 3:32 pm

एवढे दिवस आमच्यातल्या वीक पाँइण्टचा आप्पांनी अभ्यास करून प्रत्येकाला वेगवेगळे व्यायामप्रकार सांगितले. जेणेकरून शारीरिक क्षमतेत आम्ही कुठे कमी पडायला नको. प्रत्येकाच्या खुबींचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून ते व्यायाम सांगितले कारण त्यांना काहीच्या पोटऱ्याचे स्नायू जास्त ताकदवान हवे होते तर काहींचे मांड्यांचे स्नायू..

समाजविरंगुळा

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 11:25 am

गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री. बिंदुमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके (कार्यकर्त्यांचे बाबूजी), पत्रकार पां.

हे ठिकाणधोरणप्रकटनविचारअनुभवमत

पोश्टरबॉइज -२

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 12:47 am

जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्‍या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्‍याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला.
"हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे. आता निग"

नाट्यअनुभव

बेधुंद ( भाग ८ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 8:36 pm

अक्षाला काही सुचत नव्हतं ! दिवसभर फक्त शिवेका अन अमित चा विचार मनाला चटका लावत होते . एके रात्री नित्या च्या मोबाईल वर अमित चा फोन आला . अजूनही त्याने नित्याला काहीही सांगितलं नव्हतं . नित्या अक्षा च्या रूम वर आला .
'अक्षा , तुझ्यासाठी फोन आला होता रे, त्याला मी ५ मिनिटाने फोन करायला सांगितला आहे , राहू दे मोबाईल तुझ्याकडे' - नित्या मोबाईल अक्षाच्या बेड वर ठेवत बोलला .
कुणाचा फोन ? अक्षाने विचारले .
' मला नाही माहित , नाव नाही सांगितले त्याने '
'बर '

कथाविरंगुळा