[शतशब्दकथा स्पर्धा] समरांगण
तोफेच्या प्रचंड आवाजाने आसमंतात एक प्रकारची भयानकता पसरली....... पाठोपाठ बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांनी युद्धाची जणू घोषणाच केली........ वातावरणात भयानकता जाणवत होती....... धरणी जणू रक्त प्यायला आतुर झाली होती..... सगळी कडे रक्ताचा सडा...... अशातच एक सैनिक एकदम आवेशात गोळ्यांची बरसात करत पुढे जात होता.... त्याच्या कित्येक गोळ्या शत्रूच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.... अचानक एक गोळी त्याच्या छातीत लागली.... तो कोसळला... त्याही परिस्थितीत त्याच्यातला सैनिक त्याला स्वस्त बसू देत नव्हता..... कर्तव्य त्याला मरू देत नव्हतं..... बंदुकीचा आधार घेऊन तो उठला...