तोफेच्या प्रचंड आवाजाने आसमंतात एक प्रकारची भयानकता पसरली....... पाठोपाठ बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांनी युद्धाची जणू घोषणाच केली........ वातावरणात भयानकता जाणवत होती....... धरणी जणू रक्त प्यायला आतुर झाली होती..... सगळी कडे रक्ताचा सडा...... अशातच एक सैनिक एकदम आवेशात गोळ्यांची बरसात करत पुढे जात होता.... त्याच्या कित्येक गोळ्या शत्रूच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.... अचानक एक गोळी त्याच्या छातीत लागली.... तो कोसळला... त्याही परिस्थितीत त्याच्यातला सैनिक त्याला स्वस्त बसू देत नव्हता..... कर्तव्य त्याला मरू देत नव्हतं..... बंदुकीचा आधार घेऊन तो उठला... शत्रूचा ठाव घेण्यासाठी त्याने बंदूक पुढे केली आणी.......त्याच्या समोर तश्याच अवस्थेतला एक शत्रू सैनिक उभा होता..... त्याच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी.......तोही कायमचा......
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 12:14 pm | पगला गजोधर
अस काय करताय ??
6 Aug 2015 - 12:41 pm | मी-सौरभ
@सा सं मं : ह्या पूर्णविरामांचा हिशेब कसा ठेवणार??
6 Aug 2015 - 12:42 pm | तुडतुडी
पगला गजोधर भारी प्रतिसाद ;-)
7 Aug 2015 - 1:51 pm | जगप्रवासी
कथा जितकी गंभीर तितकाच प्रतिसाद विनोदी. गजोधर भाऊ ह घ्या
10 Aug 2015 - 5:48 pm | चिगो
ह्या चुकीसाठी आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, ह्याची कारणे दाखवा..
10 Aug 2015 - 10:15 pm | जडभरत
हं, सगळा लेख व्यवस्थित लिहिलाय. मग हीच चूक का?
चिगोभौ चूक भारी पकडलीत!!!
11 Aug 2015 - 10:26 am | जडभरत
कथेच्या आशयासाठी +१
11 Aug 2015 - 10:17 am | मुक्त विहारि
+१