Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 219781
प्रतिक्रिया 460

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्यापुढे हॉलोविनला हा लाल भोपळा भुताचे तोंड म्हनून वापरायचा नाही असा आदेश काढण्यास हरकत नाही. . अखिल हम्रिका, युरोप बिरोप टणाटणी मंडळ.

In reply to by साहना

@आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. ››› त्यांना ते समजलेलं आहे. किंबहुना माहितंही असतं असलं सगळं अश्यांना. पण मी वरती म्हटल्याप्रमाणे त्यांनी जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलेलं आहे. किंवा स्वखुषिनी अंधत्व पत्करलेलं आहे. त्यामुळे ते टनाटनीपणा करणार. सगळं सर्व बाजुनी नाकारत रहाणार. म्हणूनच मी म्हटलं वरती. चालू द्या (आत्मकुंथक)टनाटनीपणा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ऐकीव समजूतीमागची माहिती देता येत नसल्याने आता प्रत्येक प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे. असो. हे अपेक्षितच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

@ऐकीव समजूतीमागची माहिती ››› य्ये ब्बात! उद्या एखाद्या क्रिकेटरलाही तुम्ही सांगाल की "बॅटच्या जड वजनाचा स्ट्रोक बसण्याशी घनिष्ट संबंध असतो. " ही तुझी स्वानुभवाने आलेली माहीतीही ऐकीव आहे. टनाटनीपणा तो हाच्च!

In reply to by साहना

आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. त्यांचे विधान कदाचित खोटे असेल पण आपला नक्की तर्क काय आहे हे समजत नाही. कोहळा म्हणजे माणूस असे आत्मबंद ह्यांना वाटून घरी कोहळा आणला असता त्याला खुर्चीवर बसवून ते चहा पाणी विचारतील असे वाटत नाही.
कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे. सर्वात आधी घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले. त्याचा आधार विचारल्यावर एक विकिपिडियाची लिंक दिली त्यात काहीही स्पष्टीकरण नव्हते व नारळाचे इतर उपयोगच दिले होते.
प्रतीकात्मक नरबळी साठी कोहळा फोडताना मी स्वतःच्या नजरेने पहिले आहे. पूजा वेताळ सारख्या जुन्या देवाची होती.
एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?

In reply to by श्रीगुरुजी

घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले.
मी नरबळी म्हटल नाही. नीट कॉमेट वाचा.http://misalpav.com/comment/881819#comment-881819

In reply to by श्रीगुरुजी

मला शास्त्रार्थ वगैरे काही माहित नाही किंवा मी धर्मशास्त्र वाचलेलेही नाही परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी हे अतिशयोक्त आहे असे वाटते. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी नवी मोटार किंवा मोटार सायकल विकत घेतली तेंव्हा त्याच्या समोर नारळ फोडला असेल. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नरबळी दिला जातो हे कोणत्याच संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात शक्य नाही. मोठे धरण किंवा पूल बांधताना नरबळी द्यावा असे म्हणणारे मांत्रिक ऐकिवात आहेत. प्रत्यक्ष आजच्या काळात भारतात असे शक्य नाही. बाकी जारण मारण प्रक्रिया सारख्या थोतांडाबद्दल काय बोलावे.

In reply to by सुबोध खरे

परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी हे अतिशयोक्त आहे असे वाटते.
ही अतिशयोक्तीच आहे. नारळ म्हणजे माणसाचे मस्तक व नारळाची शेंडी म्हणजे मस्तकावरील शेंडी आणि नारळ फोडणे म्हणजे नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप अशा कहाण्या काहीजणांकडून ऐकल्या आहेत. त्यांनाही यामागचे लॉजिक माहित नव्हते. त्यांनीही अशाच कोणाकडून तरी हे ऐकले होते आणि या ऐकीव माहितीवर विचार न करता ते विश्वास ठेवत होते. जर नारळाची शेंडी म्हणजे माणसाची शेंडी मानली तर याचा अर्थ भूतकाळात शेंडीवाली माणसे म्हणजे ब्राह्मण बळी दिले जात होते असा अर्थ निघू शकतो. परंतु बळी महारांचा दिला जात असे असेही दावे वाचले आहेत. संत श्रीचोखामेळा यांना बळी दिले गेले असेही दावे वाचले आहेत. हे दोन्ही दावे एकत्र केले तर महार शेंडी ठेवत असत किंवा ब्राह्मणांना बळी दिले जात असे हे दोन वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील. नारळ फोडण्याआधी नारळाला मध्यभागी गोलाकार पाणी लावले जाते. ते का लावले जाते याविषयीही कोणालाच माहिती नाही. याचाही संबंध कदाचित बळीशी जोडला जाईल. लिंबू उभे कापणे असेच अशुभ समजले जाते. एकंदरीत सगळाच गोंधळ आहे व अनेक ऐकीव गोष्टी पसरल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

हे बघा क्सले क्सली यज्ञ अन बळी देत होते त्याची सविस्तर माहिती: http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-04-39/2012-10-01-06-… ह्यात उल्लेख आहे बळी साठी ब्राह्म्ण वगैरे आणण्याचा अन इतरही. आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीत त्याला सोडुन दिले, पण इतर ठिकाणी देतही असतील!
सौरपुराण.- अध्याय १६ यांत अश्वमेध, राजसूय, गोमेध, नरमेध, वाजपेय, पौडरीक या यज्ञांचा नामोल्लेख

In reply to by श्रीगुरुजी

साहेब, एकेकाळीच्या नर्/पशु बळींच्या प्रथा जैन बौद्ध काळात शाकाहारात रुपांतरित झाल्या यावर आक्षेप आहे की इतके दिवस पूजेमध्ये, वास्तुशांतीत वगैरे जे नारळ फोडले त्यांना अचानक कोणी ब्रम्हहत्या म्हणू लागले म्हणून मनाला त्रास होतो आहे ? आत्मबंध यांनी पुरावे दिल्यानंतर सुद्धा मान्य का करत नाही ?

In reply to by अप्पा जोगळेकर

एकेकाळीच्या नर्/पशु बळींच्या प्रथा जैन बौद्ध काळात शाकाहारात रुपांतरित झाल्या यावर आक्षेप आहे की इतके दिवस पूजेमध्ये, वास्तुशांतीत वगैरे जे नारळ फोडले त्यांना अचानक कोणी ब्रम्हहत्या म्हणू लागले म्हणून मनाला त्रास होतो आहे ? आत्मबंध यांनी पुरावे दिल्यानंतर सुद्धा मान्य का करत नाही ?
नर/पशु बळींच्या प्रथा शाकाहारात रूपांतरीत झाल्या असतील तर ती अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. मी शाकाहाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे व कोणत्याही प्रकारच्या हत्यांना माझा पूर्ण विरोध आहे. नारळ फोडणे या प्रकाराला ब्रह्महत्या म्हणल्याने मनाला त्रासबिस होत नसून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर व्हावा अशी इच्छा आहे. मूळ प्रतिसाद नारळ फोडणे म्हणजे बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप आहे अशी काहीजणांची असलेली गैरसमजूत यावर होता. नारळ फोडण्याला बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे या भ्रामक समजूतीच्या पुष्ट्यर्थ अजूनपर्यंत कोणीच पुरावे दिलेले नाहीत. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही फक्त ऐकीव माहिती असल्याचे सांगितले आहे.

In reply to by सुबोध खरे

नारळ स्वस्त! पण पुण्य तेवढच! पुण्य लाभाव म्हणुन आता जिकंड तिकंड देत असतील नारळ बळी! आता कुशावर्तावर स्नान केल्यावर सप्तगंगांच स्नान केल्याच पुण्य लाभत तर ह्याचही तसलंच लॉजीक असेल.

In reply to by साहना

थोडेसे अवांतर - माहीते असावी म्हणून विचारतो. गावी काही घरांत आडाला कोहळा बांधून ठेवलेले पाहीले आहे. ते का करतात ?

In reply to by खटपट्या

आजच्या भाषेत सांगायचं तर तो निगेटिव्ह पॉवर्स स्वत:कडे खेचून घेतो .. म्हणून तो दर्शनी लावावा.. इसं आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आजच्या भाषेत सांगायचं तर तो निगेटिव्ह पॉवर्स स्वत:कडे खेचून घेतो .. म्हणून तो दर्शनी लावावा.. इसं आहे.
हहपुवा

In reply to by श्रीगुरुजी

वर सांगितलेला अर्थ ही एक प्रचलीत धर्म श्रद्धा आहे. माझं मत किंवा विचार नव्हे. अर्थात तुम्ही आत्मकुंथक पणे ते जणू काही मीच आत्म मतीनी बोल्लोय असं समजून हसून घेणार.. . आणी स्वत:चा क्षणीक /लाक्षणीक विजय झाल्याचा उन्माद बालीशपणे मनात घोळवणार .. हे उघड आहे. तेंव्हा चालू द्या स्वार्थक आत्मरंजन!

In reply to by अत्रुप्त आत्मा

या भोपळ्याची पॉवर विधानावरून तुम्हाला नाही हसलो हो. त्या मूळच्या विनोदी विधानाला हसलो. तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका. तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की.

In reply to by श्रीगुरुजी

@तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका.››› कशाला धरू मी चांदणे मनी? तू तर मुळचाच चंद्र टनाटनी! @ तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की. ››› ते तुमचं तुम्ही पाहिजे तेव्हढं स्वार्थक आत्मकुंथन करू शकता. त्यानी फरक असा काहीही पडत नाही. पण तुमच्यावर हसण्या इतकीही कारणं उपलब्ध नाहित, कारण~ हास्यापद व्हायलाही काही लायकता लागते. तुमची तीही नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते राहू दे. तुम्हाला स्वतःला हे निगेटिव्ह पाॅवर वगैरे पटतं का?माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

मनाचेच खेळ सगळे. पण त्याच्या इनपुटची भेळ आपण जो पर्यंत बाधीत व्यक्तीच्या मनातून काढायचे उपाय योजत नाही.. किंवा किमान तशी इच्छा व्यक्तवत नाही.. तोपर्यंत त्याची निंदा करू नये.

In reply to by अत्रुप्त आत्मा

दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?

In reply to by बोका-ए-आझम

@का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत? ››› ते कोणती व्यक्ती काय हेतूनं शब्द रचना वापरेल? त्यावरून कळणार. त्यामुळे अत्ता कसं सांगता येईल? भाषा समजावणुकीचा सूर घेऊन असली तर ऐकणाराही ऐकतो.. असंच काहिसं अपेक्षित आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?

In reply to by बोका-ए-आझम

माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत. अहो, त्यांच्या धंद्यावरच पाय कशाला आणताय ? तस तर हे वास्तुशांत वगैरे बी मनाचा खेळच की. बिअरच्या झाकणाचा ट्टॉक असा आवाज झाला तरीही वातावरण प्रसन्न वगैरे होतच की. तरीसुद्धा वास्तुशांतीच दुकान चालायच ते चालतच ना.

In reply to by अप्पा जोगळेकर

ती दारुची दुकानं वास्तू फेंगशुई किंवा वास्तू शांत शिवायच जोरदार चालताना दिसतातच की

In reply to by अत्रुप्त आत्मा

हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

@हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.››› तन्निमित्तानी तुमचीही लायकी त्यापलीकडे नाही.. हे ही सिद्ध करून दिलत टुम्ही आपोआप! =)) हो की नाही? टन्ना टन्नी? हास्यास्पदच आणी हास्यास्पदही (मी वापरलेला शब्द) या दोन शब्दातला फरक कुणालाही कळेल.. फक्त तो कपटी टनाटनी श्रीखुर्जी नसला पाहिजे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पुन्हा एकदा हसायला आलं. तुमचे सगळेच प्रतिसाद हास्यास्पद आहेत. विशेषतः दर २-३ वाक्यांमागे टणटण, टनाटन असलं काही तरी वाचून, पूजा करताना दर २-३ मिनिटांनी पुरोहित यजमानांना पळीभर पाणी सोडा किंवा आचमन करा असे सांगतात, त्याची आठवण झाली. पूर्वी लक्ष्मी रस्त्यावर एक माणूस एका हातात एक फलक उंच धरून दुसर्‍या हातात उदबत्त्यांचे पुडे धरून उदबत्त्या विकायचा. त्याच्या हातातल्या फलकावर टनाटन अगरबत्ती असं लिहिलेलं होतं. तुमच्या प्रत्येक प्रतिसादातील प्रत्येक २-३ वाक्यांमागे जो टणटणाट असतो ते वाचून त्या उदबत्तीविक्याची आठवण झाली.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सगळेच मुद्दे संपलेले दिसतात. आता फक्त कुंथन आणि टणटणाटच शिल्लक आहे. हे अपेक्षितच होतं. चालू द्यात. आम्ही एंजॉय करीत आहोत. यापुढे पूजेत लक्ष्मी रस्त्यावर मिळणारी टनाटन अगरबत्ती वापरत जा.

In reply to by श्रीगुरुजी

कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन! कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते. त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

In reply to by श्रीगुरुजी

> कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे. > कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली कर्मकांडांत हे सहभागी होतात त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने, देवालयांत प्रथांचा इतिहास त्यांच्या मागच्या कथा इत्यादी लिहिलेले असते. ज्या प्रथेत मी सहभागी होते तिथे बांध बांधण्यासाठी कधी कधी नरबळी दिले जायचे आणि त्यांच्या नावाने उत्सव केला जायचा. आज फक्त खरे मानवी रक्त सांडले जाते, कोहळा फोडला जातो. ह्यापेक्षा आणखीन काय आधार आपणास अपेक्षित आहे हे मी समजू शकत नाही. > एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का? हा विषय समजणे आपणास जड का जात आहे हे मी अजून पर्यंत समजले नाही. कुठे तरी एका प्रथेत कोहळा नरबळीच्या स्वरूपांत फोडला जातो म्हणून माझी वडे करण्यासाठी कोहळा फोडते तेंव्हा नरबळी च्या भावनेनें फोडत असेल असे आपणाला म्हणायचे आहे काय ? विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून आम्ही वाटतो तर कधी आपट्याची फांदी पेरली तर दररोज सोने मिळावे ह्या भावनेने आम्ही ती पेरली आहे असे समजावे का ? मारणाऱ्या माणसाच्या दोनदांत गंगाजल घालतात म्हणून गंगाजल पिणारा प्रत्येक माणूस स्वतःचे मरण अपेक्षित करतो असे समजायचे का ? नारळ लोक खाण्यासाठी फोडत असतील आणि काही ठिकाणी इतर कुठल्या तरी प्रतीकात्मक दृष्टीतून फोडत असतील दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा काहीही संबंध नाही. हा तर्क म्हणजे तर्कशास्त्रांतील Implication हा तर्क आहे. बाबू मुतला तर अंगण ओले होते, पण अंगण ओले आहे ह्याचा अर्थ बाबू मुतलाच असावा असे नाही पाऊस सुद्धा पडला असेल कदाचित (हि आमच्या गणित सरांची भाषा आहे). बहुतेक मानवांना हा तर्क स्वतःहून समजतो. आपण फक्त वाद घालावा ह्या हेतूने घालत आहात असे वाटते.

In reply to by साहना

कर्मकांडांत हे सहभागी होतात त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने, देवालयांत प्रथांचा इतिहास त्यांच्या मागच्या कथा इत्यादी लिहिलेले असते. ज्या प्रथेत मी सहभागी होते तिथे बांध बांधण्यासाठी कधी कधी नरबळी दिले जायचे आणि त्यांच्या नावाने उत्सव केला जायचा. आज फक्त खरे मानवी रक्त सांडले जाते, कोहळा फोडला जातो. ह्यापेक्षा आणखीन काय आधार आपणास अपेक्षित आहे हे मी समजू शकत नाही.
तुम्ही इथे लिहिलेल्या ४-५ ओळी हाच आधार का?
नारळ लोक खाण्यासाठी फोडत असतील आणि काही ठिकाणी इतर कुठल्या तरी प्रतीकात्मक दृष्टीतून फोडत असतील दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा काहीही संबंध नाही.
या दोन्ही गोष्टी एकच आहेत. नारळ फक्त खाण्यासाठीच फोडला जातो. त्याला बळी/नरबळीचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे मूर्खपणा आहे.
हा तर्क म्हणजे तर्कशास्त्रांतील Implication हा तर्क आहे. बाबू मुतला तर अंगण ओले होते, पण अंगण ओले आहे ह्याचा अर्थ बाबू मुतलाच असावा असे नाही पाऊस सुद्धा पडला असेल कदाचित (हि आमच्या गणित सरांची भाषा आहे). बहुतेक मानवांना हा तर्क स्वतःहून समजतो.
या गणितात मूळ सिद्धांत व त्याचा कॉन्व्हर्स असे म्हणतात. याचा इथे काय संबंध आहे? काही वेळा दोन्ही सिद्ध करता येतात तर काही वेळा फक्त मूळ सिद्धांतच सिद्ध करता येतो, पण कॉन्व्हर्स सिद्ध न होणारी एक किंवा अनेक काऊंटर उदाहरणे देता येतात.

सतिश गावडे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
त्यांचे हे गैरव्यवहार जगासमोर आणण्याच्या दिशेने कारवाई का केली नाही कुणी?
हिंदू जनजागृती समितीने तक्रार दाखल केली आहे. मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना. या प्रकरणाचा स्रोत म्हणून एक ३९ पानांची ५१ एमबीची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financia… तिच्यातल्या सोळाव्या पानाचं पटचित्रं : http://oi67.tinypic.com/21bq13k.jpg २.
एका अतिशय हास्यास्पद विचारसरणी असलेल्या संस्थेने आपल्या ब्लॉगवर चार शब्द खरडण्यापलीकडे काहीच कसे झाले नाही यावर?
सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय? ३.
.... विवेकवादाच्या चळवळीतील एका दिवंगत सच्च्या कार्यकर्त्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार हा प्रकार चांगला नव्हे.
शिंतोडे? काहीही हं सगा! मी तर पार चिखलराड्यात घुसळतोय दाभोलकरांना! बरं ते जाऊदे. दिवंगत दाभोलकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. असं वाटणं चुकीचं नाही. आता असं बघा की, आज चालू घडीला डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या आरोपाखाली अटक करून चुकीची औषधं देऊन ठार मारण्यात येतंय. तुम्हाला जसं दाभोलकरांविषयी वाटतं अगदी तस्संच आम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी वाटतं. डॉक्टर तावड्यांचा जीव जाऊ नये म्हणून दाभोलकरांचा फ्रॉड उघडा पाडला तर त्यात गैर ते काय? डॉक्टर तावड्यांना केलेली मारहाण कोणत्या कायद्याखाली समर्थनीय आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना.
=))
सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय?
विचारसरणी हास्यास्पद असली तरी कृती तशी नाही म्हणून. डॉ. तावडेंबद्दल काही विशेष माहिती नाही.

In reply to by गामा पैलवान

वरील कागदपत्रे घाईत वाचली. हे कार्य जबर आहे. खूप शुभेच्छा. असे कार्य हिंदू हितरक्षक म्हणणाऱ्या सर्वच `संघ`टनांनी केले पाहिजे. ह्याच प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन जर आणि कोणी केले असते तर एव्हाना सरकार हात धुवून मागे लागले असते.

In reply to by गामा पैलवान

जाताजाता कोल्हापूरच्या देवळातील जमीनीचा घोटाळा देखील याच विधिज्ञ परिषदेने बाहेर काढला असे ऐकून आहे. आणि वीरेंद्रसिंह तावडेच्या विरोधात साक्ष देणारे काही हिंदुत्ववादी या घोटाळ्याचे लाभार्थी आहेत असेही ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे.

In reply to by आनन्दा

आनन्दा, तुमची माहिती बरोबर आहे. संजय साडविलकर याने अंबाबाईच्या देवस्थानाची चांदी चोरली. हा चांदीचोर आता तावड्यांच्या विरुद्ध प्रमुख साक्षीदार आहे. सौ चूहे खाके बिल्ली चली हाज. आ.न., -गा.पै.

बळी देणे हा प्रकार 'तांत्रिक' पुजांमधून आला आहे, कालांतराने तो अहिंसक होत गेला आहे. जिवंत प्राण्याऐवजी प्रतिकात्मक वस्तू वापरल्या जातात, एखाद्या क्षेत्राबद्दल आपण अनभिज्ञ असलो म्हणजे तसे काही नसतेच हा अनाठायी आत्मविश्वास योग्य नाही.

In reply to by संदीप डांगे

मी नारळ फोडण्यामागे जी समजूत आहे त्याबद्दलच माहिती विचारत आहे. माहिती विचारणे हा गुन्हा नसावा. जोपर्यंत विश्वासार्ह माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यामागची समजूत चुकीची आहे असे समजण्यात चूक नसावी.

In reply to by संदीप डांगे

हे सर्व तर्क झाले, पुरावा कुठेय ? उदा. मधले बोट दाखवणे याचा प्रतीकात्मक अर्थ काय ? तो तसा वापरण्यास सुरुवात कधी झाली, कोणी केली ? पहा : http://english.stackexchange.com/questions/64916/whats-the-origin-of-fl… काही विश्वासार्ह पुरावा आहे का? कायपण माहित नाही इतिहास ह्या वल्लीना (प्रक्षिप्त म्हणे) आणि धार्मिक कार्य या अ.आ. ना (प्रतीकात्मक म्हणे) आणि काहीतरी तर्क लावताहेत. :P

In reply to by sagarpdy

गुरुजी आणि सागर, 'विश्वासार्ह पुरावा' ह्याचा तुमच्यालेखी काय अर्थ आहे तेवढा कळवा. म्हणजे त्यात बसणारं काही आहे काय हे बघून सांगता येईल. 'आज'च्या काळात ज्याही पुजा आपण करतो त्यांचे सर्वांचे 'मूळ अर्थ' पूजा करणार्‍याला माहित नसतात, अनेक विधी तर तशी परिस्थिती उपलब्ध होत नसल्याने टाळले गेले आणि आता लुप्त झाले आहेत. किंवा, तुम्हाला नसेल मानायचे की नारळ फोडण्यामागे नरबळी आहे तर तेही तुम्ही मानू शकता, कोणतीही मनाई नाही. आपल्यापैकी कोणीही भूतकाळात टाइममशीन घेऊन जाऊन तपासू शकत नाही. तेव्हा खरंच या विषयावर वाद तरी किती घालावा हा प्रश्न पडलाय. पण आपण 'आज' जी करतोय ती विधी आधी 'हिंसक व चीड आणणारी' होती हा 'आज' झालेला उलगडा त्रास देणारा असेल तर तुम्ही ह्याचा पाठपुरावा करणे योग्यच आहे. डॉक्टरसाहेब,
आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी नवी मोटार किंवा मोटार सायकल विकत घेतली तेंव्हा त्याच्या समोर नारळ फोडला असेल. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नरबळी दिला जातो हे कोणत्याच संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात शक्य नाही.
>> असे आपल्याला (तुम्हा-आम्हाला) वाटते कारण आपले संस्कार तसे आहेत. अन्यथा जगात अनेक ठिकाणी अनेक अघोरी प्रथा परंपरा असतात ज्या कल्पनेतही आपण आणू शकत नाही. आत्ता ताबडतोब आठवणारी एक प्रथा आहे, सौम्यच आहे तशी, भारतातल्याच एका जमातीतः तिकडे आलेल्या पाहुण्याला दारू देणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले जाते. जन्म असो वा मरण कोणत्याही प्रसंगी दारू पाहिजेच. अगदी माणूस मेल्यावर त्याच्या अंतिम कार्याची सोय लावण्याआधी दारूची सोय लावायला घरचा माणूस बाहेर पडतो. आलेले लोक आधी मनसोक्त दारू ढोसतात, मग मढ्याकडे बघितले जाते. नवी मोटार, किंवा काही घेतल्यावर आपण 'आज' ज्या भावनेनी नारळ फोडतो ती भावना 'नरबळी देणे' ही नाही. पण नारळ फोडणे ही जुन्या काळातल्या नरबळी-पशुबळीची प्रतिकात्मक क्रिया आहे. ह्याचा अर्थ आपण नविन वस्तूच्या स्वागतासाठी आपल्याला ही कृती करावीशी वाटते, त्यामागे 'कुणाचा जीव घेणे' हा हिंस्र विचार नसतो, किंवा त्याकाळात नरबळी देण्यामागे फक्त 'कुणाचा जीव घ्यावा, घेता यावा' म्हणून पूजा-विधी करत नव्हते. पिढ्यांपिढ्यांमागे सामाजिक कृतींचे बदल होतात हे तरी मान्य आहे की नाही? प्रत्येक विधीचे शास्त्रिय अर्थ प्रत्येकालाच ठावूक असलेच पाहिजेत असेही होत नाही.
मोठे धरण किंवा पूल बांधताना नरबळी द्यावा असे म्हणणारे मांत्रिक ऐकिवात आहेत. प्रत्यक्ष आजच्या काळात भारतात असे शक्य नाही. बाकी जारण मारण प्रक्रिया सारख्या थोतांडाबद्दल काय बोलावे.
'बळी देणे' हि संकल्पनाच मुळात तांत्रिक जगतातली आहे. कायद्याने असे करणे, उघड उघड करणे शक्य नाही म्हणून होतच नाही असे मानणे योग्य नव्हे. नरबळी दिल्याच्या अनेक घटना स्थानिक वृत्तपत्रांतून नित्य येत असतात. अर्थात त्यातून देणार्‍यास फायदा झाला की तुरुंग झाला हा वेगळा विषय. मंत्र-तंत्र-सिद्धी हा एक वेगळा विषय आहे. अंनिसच्या धाग्यावर 'योग्य' चर्चा सुरु होईल अशाने... त्यामुळे थांबतो. =))

In reply to by संदीप डांगे

आपण म्हणता ते तर्कशुद्ध आहे. परंतु पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा विचार मनात नक्की येईल. तसाही मी फारसा धार्मिक नाहीच. पूजाविधी कर्म कांड इ. काहीच करत नाही. त्यामुळे फार काही अडणार नाही.

In reply to by सुबोध खरे

पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा विचार मनात नक्की येईल
खरं आहे डॉक्टरसाहेब, त्यामुळेच हे वाचणार्‍या अनेकांना त्रासदायक वाटलं असेलच. पण मी त्यांना म्हणेन, तुमची स्वत्:ची भावना महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा, क्रियेमागे काय प्राचिन अर्थ आहे तो जौद्या उडत. मी कर्मकांड-पुजाविधींपासून दूर जाण्याला हेच 'मागचं खोदकाम' कारणीभूत आहे, ज्या कोण्या प्रतिकांची आपण मनोभावे पूजा करतो, त्यांना पवित्र मानतो ती प्रतिके आपल्या मनातल्या प्रतिमांशी सुसंगत नाहीत ही माहिती आतून हलवणारी असते. किंवा आपल्या मिश्र संस्कृतीमुळे दुसर्‍या लोकांच्या देवांना, चालिरितींना, मान्यतांना आपण आपल्या देवघरात, कर्मकांडांत 'काहीही ठोस कारण' नसतांना स्थान दिले हे भावनाही विचलित करुन जाते. आणि कधीकधी त्या देवांची सत्य किंवा प्राचिन प्रतिमा ही आपल्या भावनांशी विसंगत ठरते तेव्हाही सॉल्लिड धक्का बसतो.

In reply to by संदीप डांगे

बऱ्याच वेळेस पूजा करताना त्यांचा अर्थ समजून घेतला तेंव्हा त्यात रुढीशिवाय फार काही आढळले नाही त्यामुळे मी रोज पूजा करीत नाही किंवा कोणतेही कर्मकांड करीत नाही. देवाला नमस्कार करतो तो केवळ एक जगनियंत्याचे प्रतीक म्हणून. मग देव कोणताही असो. आजतागायत शिरडीलाच काय ( जेथे लष्करी ओळख पत्र दाखवले असता थेट प्रवेश होता) सिद्धिविनायकालाही गेलो नाही. कोणत्याही देवळाच्याच काय हॉटेलच्याही रांगेत उभे राहणे पटत नाही. स्वतःपुरती तत्वे पाळतो आहे. दुसर्यांनी पाळावी असा आग्रहही नाही म्हणून कदाचित आनंदी आहे.

In reply to by सुबोध खरे

हा ultimate फालतूपणा आहे असं स्पष्ट मत आहे. नवस बोलणे हा दुसरा, देवाच्या दर्शनासाठी रांग लावून उभं राहणे हा तिसरा आणि अमुकतमुक पदार्थ या देवाला वर्ज्य हा चौथा.

In reply to by सुबोध खरे

अश्वमेध यज्ञामागे असच विचित्र काहीतरी आहे. पहिल्यांदा कळालं तेव्हा एकदम घृणा आलेली.

सतिश गावडे, तुम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी फारशी माहिती नाही. तर तेच सूत्र पकडून थोडी माहिती देईन म्हणतो. काही प्रश्न पडलेत म्हणून हा खटाटोप करतोय. पोलीस डॉक्टर तावड्यांचा अमानुष छळ करताहेत. त्यांना रात्रभर मारहाण करून दुसरे दिवशी सहदिवाणी न्यायालयासमोर उभं केलं. पायावर बुटाचा वळ स्पष्ट उमटलेला दिसंत असतांनाही न्यायाधीशांनी परत पोलीस कोठडीच मंजूर केली. डॉक्टर तावड्यांना रक्तदाबाचा त्रास असतांना व ते निर्दोष असतांना ही मारहाण कशासाठी? आज तावडे जात्यात आहेत आणि तुम्ही आम्ही सुपात आहोत. उद्या कशावरून आपण जात्यात भरडले जाणार नाही? यानंतर गेल्याच आठवड्यात डॉक्टर तावड्यांना चुकीची औषधे देऊन जीवे मारायचा प्रयत्नही झाला. हा काय प्रकार चाललाय? शेवटी तावड्यांनी जिवाचं भय आहे म्हणून स्वतंत्र कोठडी मिळावी म्हणून अर्ज केला. मारहाण सहन करीत डॉक्टर तावडे कोठडीत शांतपणे नामजप करीत बसले होते. तर त्यांच्या हातातून जपमाळही काढून घेतली. कित्ती शूरवीर आहेत नाही ते पोलीस! आता जर कोण्या गणेशोत्सव कार्यकर्त्याला वाटलं की पोलिसास खाडीत बुडवून ठार मारावं, तर दोष कुणाचा असेल बरं? डॉक्टर तावड्यांना न्यायालयात आणतांना अनेक पत्रकार खुलेआम त्यांच्या जवळ येत होते. हा सुरक्षाभंग आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अपमानदेखील आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवण्याइतके पोलीस का माजले आहेत? साध्वी आणि प्रसाद पुरोहितांच्या वेळेस जर चाप लावला असता तर ही हिम्मत झाली असती का पोलिसांची? गेले तीन वर्षं कुठलाही पुरावा गोळा करू न शकलेले पोलीस निरपराध्यांवर अत्याचार का करताहेत? दाभोलकरांच्या मृत्यूचा हा गैरफायदा घेतला जातोय ना? गावडे साहेब, दाभोलकरांना विवेकवादी म्हणता तुम्ही, बरोबर? मग त्यांच्या मृत्यूचं निमित्त करून कसलाही संबंध नसलेल्या निरपराध्याचा अमानुष छळ होतांना तथाकथित विवेकवाद्यांचा विवेक कुठे शेण खायला गेलेला असतो? सनातन संस्थेसाठी नव्हे तर दाभोलकरांची मृत्यूपश्चात विटंबना होऊ नये म्हणून तरी आवाज उठवणार का तुम्ही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ह्यांत खूपसे तथ्य आहे असे मला वाटते. कुठल्याही तथाकथित विवेकवाद्याने खरे तर ह्या विषयावर तावडे ह्यांची बाजू घ्यायला हवी होती. संपूर्ण प्रकरणाकडे पहिले असता पोलीस लोक सामान्य आणि पापभिरू लोकांना जास्त दंडेली दाखवत आहेत असे वाटते. साध्वी प्राची काहीही आरोप नसताना उगाच जेल मध्ये आहे. आसाराम बापूवर "बलात्काराचा आरोप" असे म्हटले जाते पण प्रत्यक्षांत आरोप थोडे वेगळे आहेत. आसाराम बापुना दोषी मानले तरी ५ वर्षांची सजा होईल आणि त्यांनी आधीच ३ वर्षे जेल मध्ये व्यतीत केली आहेत. तावडे ह्यांच्या विरदोहांत नक्की काय पुरावे आहेत हे अजून पोलिसांनी स्पष्ट केले नाही उलट ज्या दिवशी दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवसापासून सनातनवर आरोप सुरु झाले होते.

दोन नवीन म्हणी मिपा वाचकचरणी अर्पण.
"कोहळा देऊन कोथळा काढणे" "बळी तो बळी वर कान पिळी"
संकलक नाखु (वाचकांची) पत्रेवाला

तुमचे वरचे प्रतिसाद वाचले.मला एक शंका आहे. एवढं जर असेल तर आपल्याकडे पूजेत सरळसरळ मांस का वापरत नाहीत? अमुकतमुक पदार्थ मांसाचं प्रतीक हा फालतूपणा कशासाठी? माझ्यासारख्या कट्टर मांसाहारी लोकांची घरी पूजा वगैरे असेल त्यावेळी प्रचंड अडचण होते. ते तरी दूर होईल जर सरळसरळ मांस वापरायला सुरुवात केली तर. कृपया अज्ञान दूर करावे.