पेठा

गणपा's picture
गणपा in पाककृती
1 Jan 2013 - 2:38 pm

समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवं वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा !!!

साहित्य :


१/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर.

कृती :


कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.

चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे.
कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी.

दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.


एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे.
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.

एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.

मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.
एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे. (झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) )
पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे.

दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........
हे असं.


(ऐसी अक्षरे दिवाळी अंकात पुर्वप्रकशित)

प्रतिक्रिया

पेठा असा बनवतात होय.. माहितच नव्हतं..

बोला गणपा गुरु की जय...

- पिंगू

शुचि's picture

17 Jan 2013 - 2:06 am | शुचि

असेच म्हणते.
मस्त लागतो पेठा. आग्र्याचा प्रसिद्ध आहे.

पियुशा's picture

1 Jan 2013 - 2:50 pm | पियुशा

लै झ्याक !

रुमानी's picture

1 Jan 2013 - 3:01 pm | रुमानी

मस्त .......!

चित्रगुप्त's picture

1 Jan 2013 - 3:04 pm | चित्रगुप्त

पेठा कसा बनवतात, हे प्रथमच कळले, धन्यवाद.
याप्रकारे बनवलेला पेठा हे पेठ्याचे मूळ स्वरूप असावेसे दिसते. आग्रा वगैरेला अनेक प्रकारचे पेठे मिळतात, त्यांचे आकारही विविध असतात, आणि ते अगदी नेमक्या आकारचे, गुळगुळीत असतात. ते कसे बनवतात? तसेच अंगूरी पेठा कसा बनवतात?

मदनबाण's picture

1 Jan 2013 - 3:06 pm | मदनबाण

वा ! :)
सर्व मिपाकरांना नविन वर्षाच्या ग्वाड ग्वाड शुभेच्छ्या ! :)
राजकीय ठोंब्यांना राष्ट्रहिताचे / जनहिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी होउ दे... अशी या नविन वर्षी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो.

ज्योति प्रकाश's picture

1 Jan 2013 - 3:19 pm | ज्योति प्रकाश

आवडीचा प्रकार. नक्की करून बघेन.

मृत्युन्जय's picture

1 Jan 2013 - 3:24 pm | मृत्युन्जय

आता थोडे फ्लेवर्ड पेठेही बनव रे

अनुप कुलकर्णी's picture

1 Jan 2013 - 3:30 pm | अनुप कुलकर्णी

पेठ्याचं आणि आमचं फार कधी जमलं नाही... पण ८ तासांच्या मेहनतीसाठी तुम्हाला सलाम

तुरटीमुळे नक्की काय होते ते समजलं नाही...

आहा! पेठा म्हणजे अगदी जीव की प्राण!

बाहेर मिळणारा पेठा पांढराशुभ्र असतो, त्यात काही वेगळं घालतात का?

आणि असंच 'पानपेठा' प्रकाराचीही रेसिपी द्याल कय?

प्रेक्शक's picture

1 Jan 2013 - 3:43 pm | प्रेक्शक

आभारी आहोत.तुमच्या मुलेच मि पा वर आलो.
बाकी मी फक्त प्रेक्शक. बायको प्रयत्न करते पन फोतोतल्या सारखे नाही येत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2013 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा

गंपादादा की जय हो.........! http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink012.gif

बापरे... पेठा हा आवडता पदार्थ असला तरी तो बनवताना ईतकी मेहनत घ्यावी लागते हे माहिती नव्हतं.

आणि बनवण्यासाठी लागणारे जिन्नस तर हटकेच आहे. कोहळा, तुरटी, खायचा चुना...

नाना चेंगट's picture

1 Jan 2013 - 4:45 pm | नाना चेंगट

ही कृती वैदिक आहे का? अंडी घालून करता येईल का?

विजुभाऊ's picture

14 Jan 2013 - 12:20 pm | विजुभाऊ

ही कृती वैदिक आहे का? अंडी घालून करता येईल का?

ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झाला आहे त्यावर अवलंबून आहे

निवेदिता-ताई's picture

1 Jan 2013 - 4:51 pm | निवेदिता-ताई

झक्कास........ :)

अनन्न्या's picture

1 Jan 2013 - 5:26 pm | अनन्न्या

झक्कास झाली नवीन वर्षाची सुरूवात!!

अत्रन्गि पाउस's picture

1 Jan 2013 - 7:01 pm | अत्रन्गि पाउस

पेठ्यात कोहळ्याचा किस लागतो असे मला वाटायचे...पण असो हे झकास दिसतंय म्हणजे तसेच चवीला तसेच असणार...

लीलाधर's picture

1 Jan 2013 - 7:06 pm | लीलाधर

नव वर्षाच्या पेठामय शुभेच्छा गंपा भौ व समस्त मिपाकरांना आवडेश हो पेठा :)

प्रचेतस's picture

1 Jan 2013 - 7:28 pm | प्रचेतस

मस्त.
वरकरणी सोपी तरी जाम मेहनतीची आणि लैच हटके पाकृ आहे.

रेवती's picture

1 Jan 2013 - 7:33 pm | रेवती

छान. पेठा आवडला.

पैसा's picture

1 Jan 2013 - 8:20 pm | पैसा

कुरियर कर.

मिठाईच्या दुकानातला ख्रिश्चन नववधूसारखा पाढरी जाळीदार ओढणी घेऊन बसलेला तो फिकट हिरवा क्यूट क्यूब असा बनवतात होय...!

रामदास's picture

1 Jan 2013 - 9:33 pm | रामदास

आजपासून आग्रा तुझ्या नावावर केलंय .

कौशी's picture

1 Jan 2013 - 11:24 pm | कौशी

पेठा आवडला.

सानिकास्वप्निल's picture

2 Jan 2013 - 5:58 am | सानिकास्वप्निल

__/\__

यु आर ग्रेट!!

पेठा तर छानच दिसत आहे पण तुमच्या मेहनतीला विशेष सलाम :)

सविता००१'s picture

2 Jan 2013 - 12:27 pm | सविता००१

गणपाभौ, तुस्सी ग्रेट हो!!!!!!

स्पा's picture

2 Jan 2013 - 12:56 pm | स्पा

यम्मी ...

भारी दिसतोय.

पण हा पेठा एवढा गोड असतो कि एकाच्या वर खाववत नाही :(

धनुअमिता's picture

2 Jan 2013 - 1:33 pm | धनुअमिता

पेठा म्हणजे माझा अगदी जीव की प्राण.

खुप दिवसांपासुन याची पाककृती शोधत होते.

सूड's picture

2 Jan 2013 - 1:40 pm | सूड

__/\__

"पेठा करण्याचे कसब असण्यापेक्षा गणपाची मैतरकी अधिक गोडीची" असंच खरंतर पुलंना म्हणायचं होतं बरं का! अप्रतिम पाकृ, गणपाजी, तुम्हाला मानलं बुवा! पेठा माझ्या फेव लिस्ट मध्ये आहेच.

अवांतर: याच रीतीने भोपळ्याचा वगैरे पेठा करता येईल का?

स्मिता.'s picture

2 Jan 2013 - 4:54 pm | स्मिता.

पेठा अतिशय आवडतो पण त्याची कृती एवढी टाईम कन्झ्युमिंग असेल असं वाटलं नव्हतं. तेवढा संयम बाळगणार्‍या गणपाभाऊंना दंडवत!

खरं तर पेठा अजिबात आवडत नाही. पण गणपानं केलेली पाककृती म्हटल्यावर न राहवून इथे आले. जबरी आहे बाबा कृती. इतका खटाटोप.. मान गये उस्ताद !!

चित्रा's picture

4 Jan 2013 - 12:46 am | चित्रा

असेच म्हणते.

दिपक.कुवेत's picture

2 Jan 2013 - 6:27 pm | दिपक.कुवेत

पण खटाटोप फार असल्या कारणाने भारतवारित विकतचा खाईन. गणपाभाऊंच्या ईच्छाशक्ति आणि संयमाला दंडवत...लगे रहो

सलाम गणपाभौंच्या पेठ्याला आणि गणपाभौंनाही!!!!

वरती चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे अंगूरी पेठा कसा बनवतात हे जाणण्याची इच्छा मलादेखील आहे. आग्र्याला गेलो असताना तिथला प्रसिद्ध ब्रँड "पंछी पेठा" चा अंगुरी फ्लेवर आणला होता. लै म्हंजे लै भारी होता. पिवळसर, पाकाने माखलेला आणि केशराच्या अवलेपनाने प्रचंड टेम्प्टिंग दिसत होता.

एकदम वेगळी पाकृ... एकदा करुन बघीतले पाहिजे... आता त्या साठी आधी कोहळा शोधायला लागेल, आणि तो इथे मिळणे महामुश्कील..

वा पेठा हा माझा एक आवडता पदार्थ आहे. एवढी मेहनत घ्यावी लागते हे माहीत नव्हत. खुप छान. आता करुन पाहीन एकदा. आमच्या इथे दत्त जयंतीला जत्रा असते. तेंव्हा मी त्या जत्रेतून नेहमी हा पेठा घेते.

niranjan's picture

17 Jan 2013 - 12:34 pm | niranjan

..

समंजस's picture

23 Jan 2013 - 6:28 pm | समंजस

अतिशय आवडणारी मिठाई (माफक प्रमाणात गोड असल्यास).
तयार करण्या मागे मेहनत खुप असल्यामुळे विकत घेणेच पसंत करतो :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 May 2015 - 9:05 am | कैलासवासी सोन्याबापु

ह्याच ऍशगॉर्ड ची पेठया सारखी अजुन एक ज़रा जास्त पाकात न्हालेली मिठाई असते नाव तिचे केसर गंडेरी!!अप्रतिम असते