Skip to main content

गहू - नाचणी बिस्कीट अका मातृत्व कुकीज ..

लेखक स्मिता चौगुले यांनी शुक्रवार, 12/08/2016 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्व कुकीज ( नाव साभार आत्याबाई रेवतीताई .. :-) ) Smita साहीत्य - १. गव्हाचे पीठ १ मध्यम वाटी २. नाचणी सत्व १ मध्यम वाटी ३. बटर/ तूप - १०० ग्रॅम ४. पिठीसाखर १ मध्यम वाटी किंवा आवडीनुसार कमीजास्त ५. बेकिंग पावडर १ टीस्पून ६. हवे असेल तर एखादे इसेन्स - मी वेलची पावडर टाकली ७. दूध सजावटीसाठी - ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी कृती - १) गव्हाचे पीठ+नाचणी सत्व+ बेकिंग पावडर नीट चाळून घ्या. २) त्यात बटर/तूप टाकून मळा . एक रवाळ मिश्रण तयार झाले पाहिजे ३) मग त्यात पिठीसाखर मिक्स करा. इसेन्स,ड्रायफ्रूट पावडर घालणार असाल तर ते ही घालून आणि मिक्स करा ४) आता थोडे थोडे दूध घालून मळून घ्या. ५ )पूर्ण मळलेला गोळा प्लास्टिक पेपरमध्ये / एखाद्या बंद डब्यात ठेवून १५-२० मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ६) नंतर मळलेला गोळा बाहेर काढून थोड्या कोरडया पिठावर /तुपावर लाटायला घ्या आणि दुसरीकडे ओव्हन १८० डिग्री सेन्ट ला १५-२० मी प्रिहिट करुन घ्या ७) लाटलेल्या पोळीचे कुकी कटर / बाटलीच्या झाकणाने बिस्कीट कापून घ्या, ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी लावून सजवा. ८) बटर पेपर किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून १८० ला १५-२० मी / रंग बदले पर्यंत बेक करा

वाचने 24761
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

लैच भारी, आवडले बिस्किट्स. -दिलीप बिरुटे

फोटो कुठायंत? पाककृती उत्तम. अजूनही उत्तमोत्तम पाककृती येऊंद्यात

In reply to by किसन शिंदे

आता नाय दिसत.... :( -दिलीप बिरुटे

मस्त पाकृ . फोटो दिसत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पिराकाकू , आपण फोटो दुवा आपल्या प्रतिसादात व्यवस्थित टाकल्यामुळे. मूळ धाग्यात फोटो अपड़ेवता आला. धन्स....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिरातै यांची इस्ट कोस्ट साहित्य संपादक पदासाठी जोरदार तयारी चालु आहे. ह. घ्या.

In reply to by राघवेंद्र

मी सध्या किती प्रचंड रिकामटेकडी आहे ह्याची ती झलक आहे! पण तशीच काही रिक्रुटमेंट असेल तर कळवा, आम्ही अप्लाय करु! @बिरुटे काका, एनीटाईम!