अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
7 May 2018 - 1:14 pm

मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि

स्वतःच्या बुडाचीच आग होईल

अस्साच जळत राहिलास तर

जाताना पाणी पण महाग होईल

काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो

दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो

वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे

नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे

हताश होऊ नको इतक्यात

कि पाठीला बाक येईल

कवन जरा नीट कर

नाहीतर प्रतिभेला डाग येईल

विझलेयत निखारे कधीच ,

लाव्हाहि निद्रिस्त तो

नको फुंकर मारू आता

जळून सारे राख होईल

मारू नको टिचकी कधी

इशाराही नको मजला

मी सुखात या जागी

जरी असे मी एकला

आशा करतो काव्यदेवते

आता तरी त्याला जाग येईल

मित्रा हे नाही समजलं जर तुला

तर पुढे दुर्दैव तुझा भाग होईल

दुर्दैव तुझा भाग होईल...........

-}--> " खिलजी " उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर -}-->

अविश्वसनीयरौद्ररसव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 2:38 pm | श्वेता२४

बाकी तुमचे काव्य आम्हास आवडते. लिहीत राहा

टवाळ कार्टा's picture

7 May 2018 - 2:57 pm | टवाळ कार्टा

"अस्सच चरत राहिलास तर , जाताना कागद पण महाग होईल" असे "शी"घ्र काव्य होउ शकेल यावर ;)

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 3:02 pm | जेम्स वांड

हाग्रही प्रतिपादनआवडले

खिलजि's picture

7 May 2018 - 4:22 pm | खिलजि

कधी कधी वाईट वाटतं

जणू अश्रूही स्वस्त होतात

पण दुर्लक्ष करता तिथे

दिवस कसे मस्त जातात

मला माहित आहे मी

प्रतिभेशी घटस्फोट घेतला आहे

उरावर नाचू नका माझ्या

मी माझाच कडेलोट केला आहे

तो छिन्नविछिन्न देह आणि त्याचे झालेले तुकडे अजूनही

तिथेच असतील विखुरलेले

नका जुळवू परत त्यांना आता

ते निखारे कधीच आहेत विझलेले

चित्कार उठतो मनात नेहेमी

तेव्हा दग्धभू धोरण स्वीकारतो

मीच स्वतःला तेव्हा एक " भ्याड पळपुटा" समजतो

तो का येतो ( प्रतिसाद ) कुणाचा ?

कुठून येतो ते देव जाणे

मी मात्र तीळतीळ तुटतो

करतो नको ती जहाल कवने

मला तुलाही दुखवायचं नाही आहे

कारण तुझ्यात ती मूर्तिमंत प्रतिभा आहे

मी एक सामान्य कल्पना धारक

बोल फक्त एकदा , फक्त एकदा " तुझी मैत्री मान्य आहे "

सोड ते पाश त्या जुन्या आठवणी

इथे कुणीच अजरामर नसतो

ना असतात कुणाच्या विखारी वाणी

चल दोघेही पुन्हा मित्र होऊ , करू धमाल गाणी

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अनन्त्_यात्री's picture

7 May 2018 - 4:32 pm | अनन्त्_यात्री

आवडलं.

धन्यवाद साहेब .. मैत्री करून तर बघा एकदा . मज्जा येईल . आजपासून आपण मित्र आहोत तर मग ..

सिद्धेश्वर

धन्यवाद सर्व वाचकांचे आणि ???

सिद्धेश्वर

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 5:53 pm | अक्षय कापडी

पाडली वाटत एक नविन कविता आवडली कस म्हणू

खिलजि's picture

7 May 2018 - 6:26 pm | खिलजि

स्वागत आहे मित्रा इथे ... कसं काय चाललंय , बरं हाय ना . काय

सिद्धेश्वर