इंदिराबाई
काँग्रेस पक्षातली सचोटी नेहरु आणि लालबहादूर शास्त्री यांच्यापर्यंत टिकून होती. इंदिरा गांधींच्या काळात त्याला ओहोटी लागली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर सुरू झाला. इंदिराबाईंनी पक्षातल्याही अनेक जणांचा राजकीय खातमा केला. पक्षाने ठरवलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हरवून आपला उमेदवार निवडून आणण्याची कामगिरीही बाईंनी करून दाखवली.
नेहरु हे विद्वान पंडीत होते. त्यांना पक्षात आणि पक्षाबाहेरही एक सन्मान आणि आदर होता. इंदिराबाई मात्र वडिल असेपर्यंत त्यांच्या छायेतच वावरल्या. नेहरुंनंतर पक्षाने त्यांना वारस म्हणून निवडले नाही. तोवर पक्षात लोकशाही टिकून होती. निवड झाली ती शास्त्रीजींची. शास्त्रीजींनंतर मात्र इंदिराजींना संधी मिळाली. पण वडिलांना मानणारे अनेक जण या कन्येला मानत नसत. तुलना होत असे. तिथेच ठिणगी पडली. नेहरुंची कन्या या पलिकडे आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरु झाली. त्यामधे वडिलांना मानणार्या अनेकांना बाईंनी नामोहरम केले.
आपल्या स्वतःच्या कर्तुत्त्वावर मोठे झालेले लोक बाईंना डाचत असत. प्रत्येक राज्यात त्यांनी नैसर्गिकपणे मोठे झालेल्या, स्वतःच्या पायावर उभे असणार्या लोकांना त्यांनी संपविले. त्या त्या ठिकाणी नंबर दोनच्या नेत्यांना ताकद देऊन पूर्वीचे नेते खच्ची होतील याची काळजी घेतली. त्यात त्यांचा इगो सुखावला पण पक्ष मात्र खच्ची झाला. महाराष्ट्रातलं एक उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण हे नं १ चे नेते. त्यांच्याविरोधात वसंतदादा पाटील यांना त्यांनी ताकद दिली. अर्थात पुढे यशवंतरावांनी वसंतदादांचे सरकार पाडून शरद पवारांना मुख्यमंत्री करून तो हिशोब पूर्ण करून घेतला.
(हे लेखन कुणी कॉपी करायचा प्रयत्न करू नये हे मिसळीच्या वाचकांसाठीच आहे)
सांगायचा मुद्दा राज्याराज्यात मूळ काँग्रेसी नेतृत्त्व विरुद्ध इंदिरानिष्ठ असा संघर्ष सुरु झाला. देश चालवण्यासाठी साधन म्हणून सत्ता हे जाऊन सत्ता हेच साध्य बनल्याने सत्ता हस्तगत करण्यातच सगळी शक्ती खर्च होवू लागली.
इंदिराजींच्या काळात देशात गुन्हेगारी खूप वाढली. मुंबईमधे स्मगलिंग वाढले. हाजी मस्तान, दाऊद अशी नावे तेव्हाच जोर धरु लागली. त्या काळातल्या अमिताभच्या सिनेमातही याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. ते सिनेमे स्मगलिंग, काळा बाजार, खोट्या नोटा, साठेबाजी यावरच आधारीत आहेत.
बाईंच्या काळात याच गोष्टी देशात वाढत गेल्या.
इंदिराजींच्या आधीची पिढी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली, त्यांनी देशाला लोकशाही दिली. बाईंनी मात्र देशावर आणिबाणी लादून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला. युद्ध वगैरे असेल तर देशात आणिबाणी आणावी लागते. पण इंदिराबाईंनी तशा कुठल्याही कारणाने आणिबाणी न आणता केवळ आपली स्वतःची लोकसभा सीट गमावल्यामुळे आणिबाणी आणली. संपूर्ण देश इंग्रज गेल्यावर २५ वर्षात तुरुंग करून टाकला. तब्बल दीड वर्ष या देशाने आणिबाणी पाहीली. अटलबिहारींसारखी माणसे नेहरुंपासून संसदेत होती. वेळप्रसंगी ते नेहरुंच्या धोरणांवर टिकाही करीत. पण नेहरुंच्या काळात एक खुलेपणा टिकून होता. पक्षापक्षांमधेही सौहार्द होता. बाईंच्या काळात सुद्धा अटलजी देशहिताच्या बाबत खटकणार्या गोष्टींवर लोकसभेत खरमरीत टिका करीत. इंदिराबाईंना ही टिका सहन होत नसे. अनेकदा अटलजी लोकसभेत बोलत असताना इंदिराजी स्वतः अगदी असंबद्ध कमेंट पास करून अटलजींची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करीत असत.
एकूण काय तर अटलजी आणि इतर अनेक नेते इंदिराजींच्या धोरणावर टिका करीत.
आणिबाणीच्या निमित्ताने बाईंना या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची संधी मिळाली. औषधोपचाराविना यातल्या अनेकांचे हाल झाले. काही जणांचे तुरुंगातच मृत्यूही झाले. घरातला कर्ता मनुष्य तुरुंगात गेल्यामुळे अनेक कुटूंबे रस्त्यावर आली. हे झाले केवळ एका व्यक्तिच्या स्वार्थापोटी.
आणिबाणी ही आपल्या पक्षाची चूक होती हे पुढे सोनिया गांधीनीही जाहीरपणे मान्य केलेले आहे.
इतरत्र शिस्तीचा बडगा उगारणार्या बाईंनी स्वतःच्या संजय गांधी नावाच्या पुत्राला मात्र मोकाट सोडले होते. याने देशात आणि राजधानीत अक्षरशः नंगानाच घातला. संजय गांधी कुणाही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचा अवमान करीत.
ashu J
बाई सत्तेचा वापर कशाही प्रकारे करू शकतात, वैयक्तिक स्वार्थासाठी देशालाही वेठीस धरू शकतात. हे पाहील्यावर भल्याभल्यांची गाळण उडाली. त्यांच्या काळात ललित नारायण मिश्रा या केंद्रीय रेल्वे मंत्र्याची हत्या झाली. तिचा तपास लावणे आजही कुणाला सोयीचे वाटत नाही. बाईंना विरोध केला तर आपली धडगत नाही हे लक्षात घेऊन अनेकांनी त्यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले.
इंदिरानिष्ठ वसंतदादांना बाजूला सारून यशवंतरावांनी आणलेले शरद पवारांचे पुलोद सरकार बाईंनी निर्दयीपणे बरखास्त करून फेकून दिले. महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रपती राजवट आणली. विरोध मोडून काढण्यासाठी आपले स्थान टिकवण्यासाठी बाई आणिबाणीपासून ते राष्ट्रपती राजवटीपर्यंतचे मार्ग अगदी सहजपणे वापरताना दिसत. विरोधाचे झाडच काय पण रोपटेही दिसता कामा नये.
हा बाईंचा अट्टाहास होता. मुंबईमधे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणी स्थिर होवू लागला तर न जाणो उद्या आपल्याला आव्हान निर्माण करेल की काय या शक्यतेने बाई भयग्रस्त असत. पण यामुळे पक्षात स्वाभिमानी लोकांपेक्षा तोंडपुज्या लोकांची फौज उभी राहीली.
विरोधकही दहशतीखाली राहू लागले. बाईंना विरोध न करता त्यांच्याशी किंवा काँग्रेसशी जमवून घेत आपल्या पदरात काहीतरी पाडून घेणार्या समाजवादकांची परंपरा तेव्हापासून सुरु झाली. आपण काँग्रेसच्या आणिबाणीला विरोध केला असा दावा करणारे काही समाजवादक आज त्याच आणिबाणी लादणार्या काँग्रेसचे प्रवक्ते बनलेले दिसतात.
त्यामुळे १९८४ मधे दिल्लीत जी दंगल झाली आणि त्यात एका समाजावर या पक्ष कार्यकर्त्यांनी भीषण हल्ले केले. आपल्या विरोधात जाणारी गोष्ट दयामाया न दाखवता चिरडायची असते हे संस्कार पक्षाच्या कार्यकर्त्यांना इंदिराजींच्या काळातच मिळालेले होते.
पुढे राजीव गांधी प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले. विरोधकांची संख्या अत्यंत कमी होती. त्यांचा आवाज तो कितीसा असणार पण लोकसभेमधला विरोधक बोलू लागला की राजीव गांधींची शाऊटींग ब्रिगेड सभागृहात प्रचंड आवाज करून विरोधकांचा आवाज दडपून टाकत असे. म्हणजे इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीच्या रस्त्यावर हिंसा, लोकसभेत विरोधी आवाज दडपून लोकशाहीची हिंसा सुरुच होती.
राजीव गांधीना मिळालेले प्रचंड बहुमत त्यांना सांभाळता आले नाही, पुढील लोकसभा निवडणूकीत काँग्रेस विरोधी पक्षात गेली. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र अशा तीनच राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आपण सत्तेत नाही, अशावेळी हे तीन मुख्यमंत्री आपल्याला वरचढ तर होणार नाहीत ना ?
या भीतीने इंदिरापुत्र राजीव गांधींना ग्रासले. त्यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश इथले मुख्यमंत्री कोणतेही कारण नसताना पदावरून काढून टाकले आणि नवे बसवले. म्हणजे देशातून काँग्रेस सत्तेबाहेर गेलेलीच आहे ती राज्यातून गेली तरी चालेल पण माझे स्थान पक्षात टिकले पाहीजे, हा इंदिरापुत्र राजीव गांधी यांचा अट्टाहास होता.
पण हे सगळे संस्कार पक्ष कार्यकर्त्यांना, राजीव गांधींना इंदिराकाळातच मिळालेले होते हे निश्चित.
पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना गारद करणार्या इंदिराबाईंनी देशाच्या शत्रूकडे पुरेसे लक्ष दिले नाही. बांगलादेशातून निर्वासित येण्यास त्यांच्याच काळात सुरुवात झाली, खलिस्तानचा प्रश्न पेटला, तमिळ टायगर्सदेखील उग्र बनले. इंदिराबाई देशाच्या शत्रूंना नीटपणे हाताळू शकल्या नाहीत. बहुधा देश आणिबाणीत लोटण्याचे अधिकार त्यांच्याकडे असले तरी देशाबाहेरचे प्रश्न सोडवण्यासाठी अख्खे जग आणिबाणीत लोटण्याचे अधिकार त्यांच्याकडे नसावेत म्हणून त्या कमी पडल्या असाव्यात. त्यामुळे अनुशासन पर्वातून त्या जगाला शिस्त लावू शकल्या नाहीत.
इंदिराजींच्या काळात देशात काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडल्या. पण विरोधकांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही थराला जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे या गोष्टी कायम झाकोळूनच गेल्या.
इंदिराबाईंची कारकीर्द अशा अनेक गूढ गोष्टींनी भरलेली आहे . . .
- आशु
ashutoshjog@yahoo.com
प्रतिक्रिया
26 Sep 2017 - 4:34 pm | कपिलमुनी
विषय भारी आहे , पैली जागा पकडून बसलोय
27 Sep 2017 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा
26 Sep 2017 - 4:37 pm | पगला गजोधर
बाईंनी लादलेली आणीबाणी हा आधुनिक भारतातील लोकशाहीवरचा बट्टा व भारतातील असहिष्णूपणाचा प्रवेश आहे.
26 Sep 2017 - 4:49 pm | एस
परखड विवेचन केले आहे. परंतु आपल्याला सोयीस्कर नसलेल्या विचारसरणीचे राज्य सरकार बरखास्त करण्याची सुरुवात पं. नेहरूंनी केरळमधील कम्युनिस्ट सरकार बरखास्त करून केली होतीच.
26 Sep 2017 - 10:15 pm | रमेश आठवले
केरळमधील पहिले डावे सरकार बरखास्त जरी नेहरू सरकारच्या काळात १९५९ मधे झाले असले तरी त्या मागची प्रेरणाशक्ती इंदिराबाईच होत्या. त्या त्या वेळी काँग्रेस च्या अध्यक्ष होत्या. त्यांनी केरळातील सरकार विरुद्ध मोठी चळवळ उभारली आणि पक्षाध्यक्ष या नात्याने केंद्र सरकार जवळ केरळ मधील कम्म्युनिस्ट सरकार बरखास्त करण्याचा आग्रह धरला.
27 Sep 2017 - 9:53 pm | आशु जोग
ओके
26 Sep 2017 - 5:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान लेख रे आशू.
ती गुन्हेगारी सभ्य,सोवळे म्हणवून घेत सत्ता राबवणार्या भाजपाच्या राज्यात आजही आहेच. दाउदची मालमत्ता अजूनही मुंबईत आहेच. काळा पैसा, गुन्हेगारी,खंडणी हेही आहेच. होय ना?
'त्यांनी देश खराब केला.. आम्ही आता बघा काय करून दाखवतो' म्हणत भाजपावाले सत्तेवर आले ना?
26 Sep 2017 - 5:23 pm | पाटीलभाऊ
आता मस्त प्रतिक्रिया वाचण्यास मिळतील.
26 Sep 2017 - 9:04 pm | मार्मिक गोडसे
छान लेख. WhatsApp वर शेअर केला तर चालेल का?
26 Sep 2017 - 10:06 pm | सोमनाथ खांदवे
मला नै वाटत कुणी या लेखा च्या इरुधात लीविल .
26 Sep 2017 - 10:25 pm | आशु जोग
संपादक एक विनंती
कपिलमुनी या आयडीने पहील्या नंबरात येऊन माझ्या या धाग्यावर घाण करून ठेवलेली आहे.
कृपया त्यांच्या कमेंटचा विषयाशी काय संबंध आहे हे स्पष्ट व्हावे अन्यथा पॉपकॉर्न खाऊन माझ्या धाग्यासमोर कपिलमुनी या आयडीने करून ठेवलेली घाण साफ तरी करावी.
पॉपकॉर्न खाऊन आपल्या घरात घाण केली तर माझे काहीच म्हणणे नव्हते
पण
आमच्या धाग्यावर कुणी अशी घाण करावी यासाठी आम्ही लिहीत नाही आणि आपणही अशांसाठी संस्थळ चालवत नाही.
चेष्टा करावी असे माझ्या धाग्यात किंवा विषयात काय आहे हे संपादकांनी मला सांगावे
या गोष्टी पुन्हा पुन्हा होताना दिसतात आणि संचालक दुर्लक्ष करतात
की त्यांची मूकसंमती असते ?
26 Sep 2017 - 11:05 pm | अभ्या..
च्यामारी, पॉपकॉर्न खाण्यात एवढे राग येण्यासारखे काय आहे? इंदीराबाईंनी लावली इमर्जन्सी त्याला झाली की ४०-४२ वर्षे. त्याच्यावर तुम्ही करायलात.
थेटरात पिक्चर लागला की आम्ही पॉपकार्ण खाऊ नायतर वडापाव खाऊ.
.
.
ज्याला आला राग त्याला चावला वाघ.
27 Sep 2017 - 5:05 am | थॉर माणूस
एका राजकीय व्यक्तीविषयी विरोध दाबणारे व्यक्तिमत्व असे ठसविणारा लेख लिहील्यावर आलेली एक प्रतिक्रीया विरोधात तर राहूचद्या पण फक्त आपल्याला अपेक्षीत अशी नाही म्हणून आपण हा जो प्रतिसाद लिहीला आहे तो बघता मलासुद्धा पॉपकॉर्न घेऊन बसावे असे वाटू लागले आहे. :)
27 Sep 2017 - 11:30 am | arunjoshi123
विरोधी प्रतिसाद वेगळा. कदाचित चालला असता.
======================================
परस्परविरोधी दोन्ही मते मांडणारे दोघे मूर्ख असा एक अर्थ (तोच एक नव्हे) असल्या प्रतिसादांचा होतो. नेमका तोच अर्थ घेऊन पैकी कोणाने तक्रार केल्यास ती ग्राह्य मानाबी.
=======================
शिवाय विषय गंभिर आहे नि आपली मतं मांडावीत असं बहुसंख्य लोकांना न वाटता टाईमपाशा लोकांचे मनोरंजन आहे तेव्हा न मांडलेले बरे असे वाटणार. हे संस्थळाचे, इथल्या गंभीर लेखकांचे, वाचकांचे नुकसान आहे.
====================================
कोणती उपचर्चा मनोरंजक पातळिला गेली असती तर कदाचित प्रतिसाद योग्य होता. पण अगदी पहिलाच प्रतिसाद, काही मत न मांडता असला टाकणे मंजे लेखकाचा आणि गंभीर वाचकांचा अवमान आहे.
=======================================
कुठंतरी चुकुन माकून झालं तर ठिक, पण संस्थळाची ही प्रवृत्ती बनत आहे.
27 Sep 2017 - 1:56 pm | मराठी_माणूस
अतिशय समर्पक.
27 Sep 2017 - 10:03 am | राही
कुठल्याही लेखनाच्या संपादनाची वेळ येऊ नये असेच मला वाटत असते. पण संपादनाची चाळणी लावायचीच झाली तर वरील आपला प्रतिसादच टोकाचा असहिष्णु म्हणून संपादनयोग्य ठरू शकेल.
मूळ लेखही पराकोटीचा एकांगी आणि हेत्वारोप करणारा आहे. आताशी द्वेषपूर्ण राजकीय धाग्यांपासून लांब राहायचे ठरवले असल्याने आमचा पास आणि आमच्याकडेही मक्याच्या लाह्या.
27 Sep 2017 - 11:40 am | arunjoshi123
लेखाचे टायटल इंदिराबाई ऐवजी "इंदिराबाईंची विरोधक निती" असे ठेवले आणि तेवढ्याच विषयाचा अभ्यास केला तर त्यांनी विरोधकांवर प्रेम, उपकार,, न्यायपूर्ण वर्तन, इ इ केल्याचे आपण काय दाखले द्याल?
==========================================
विरोध सन्मानानं घेणं, विरोधकांचं ऐकणं, त्यांच्या भूमिकेला अजून एक लोकशाहीय भूमिका मानणं, निर्णयांत सहभागी करणं, काय अजेंडा कॉमन आहे ते सांगणं, स्थानिक पातळिंवर सत्ता सुखैनैव करू देणं, त्यांचा खातमा न करणं, एजंन्सीचा वापर त्यांच्याविरोधात न करणं, त्यांना संपवण्यासाठी देशाशी क्वाझी-गद्दारी न करणं इ इ गोष्टि मानून इंदीराबाईंचा काळ कितपत लोकशाहीय मानता येईल?
27 Sep 2017 - 11:45 am | पगला गजोधर
त्यांना त्याकाळी विरोध करणाऱ्या मंडळीतील, काही मंडळींना मात्र, आताशा बाईंची भूमिका पटतेय असें दिसतंय ....
27 Sep 2017 - 12:53 pm | arunjoshi123
आताशा:
भू अधिग्रहण कायदा. मोदिंनी विरोधकांसमोरे गुडघे टेकले.
सरकारला न सुचलेला न्यूट्रल सुझाव विरोधकांनी केला व सरकारने तो धुडकावला हे आठवत नाही.
काँग्रसप्रमाणे भाजप काँग्रेसचं सत्ता करणं तत्त्वतः चूक असं मानत नाही. काँग्रेसमुक्त भारत ही केवळ एक राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. तात्विक विरोध नाही.
डोकलाम, पोल रिफॉर्म्स, महिला आरक्षण. कम्युनिस्ट देखिल संतुष्ट आहेत.
हे होत नाहीय.
दिल्ली, केरळ आणि बंगाल मधे बाई (बीजेपीत) असत्या तर राश्ट्रपती शासन असते.
उत्तराखंड आणि अरुणाचल मधे पक्षीय लूडबूड झाली हे मान्य.
शामा प्रसाद, दिन दयाल, शास्त्री असली उदाहरणं नाहीत.
युपीए च्या काळात गद्दारी साठीच एजन्सी वापरल्या गेल्या असं माझं प्राथमिक मत आहे. मग आता अर्थातच ते जुने सत्ताधारी गद्दार शोधणे एजन्सीचं नवं काम आहे.
राजमान्य पक्षाशि युती करून सत्तेत राहणं काश्मिर मधे त्यांना अनिर्बंध सत्ता करू देण्यापेक्षा बरं असा भाजपचा अधिकृत मतप्रवाह मला योग्य वाटतो.
========================================================
अवांतर (पॉपकॉर्नची मोठी मूठ घ्या) -
"हे मुस्लिम विरोधी आहेत, यांना सगळ्या मुसलमानांना मारून टाकायचं आहे, स्वातंत्र्य मिळवताना हे लोक झोपले होते, जे जागे होते ते इंग्रजांच्या तोफांत गोळे भरत होते, १९४७ मधे यांनी देशाची फाळणी केली, नंतर हिंदू आणि मुस्लिम दोघेही मरावेत म्हणून दंगली लावून दिल्या, नंतर यांनी भारतरत्न महात्मा गांधीस मारून टाकले, लोकांनी यांना कधीही भाव दिला नाही, सरकारांनी केलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीचं यांनी नेहमी वाहातवाटोळं केलं, नेहमी दंगल करत राहिले, देशाच्या महान संस्कृतीचे प्रतिक असलेल्या मशिदी पाडल्या, सरकारला कधी सुखानं मुसलमानांचे प्रेमानं गालगुच्चे घेऊ दिले नाहीत, २००२ मधे सरकारी पोलिस, मंत्री, मुखमंत्रि, अधिकारी आणि फक्त हिंदूंनी मिळून, काँग्रेसचे करोडो समर्थक जेलमधे टाकून, हिटलरला लाजवील असे गुन्हे केले, यांना समान नागरी कायदा इ इ थोतांड रचून हळूहळू मुसलमानांना देशातून बेदखल करायचं आहे, यांना हिंदू नावाच्या कोणत्यातरी मागास, त्याज्य आदिम, घॄणास्पद, अघोरी आणि असहिष्णू संकल्पनेबद्दल अतीव पुळका आहे, यांना पाकिस्तानवर अणुबाँब टाकायचे आहेत आणि नेपाल, भूतान, श्रिलंका, म्यानमार, मालदीव, तिबेत, बांग्लादेश, अफगाणिस्तान तिथल्या लिकांना संपवून बळकावायच्चा आहे, हिंदू नावाच्या संकल्पनेपेक्षा घाण अशा ब्राह्मण नावाच्या संकल्पनेला पडद्याआडून पुढे लोटायचं आहे, आणि यांना या पायरीनंतर वहाबी, तालिबान आणि आयसिस बरे वाटतील अशा वेद, पुराण, स्मृती इ इ वादी विचारांचे सरकार आणायचे आहे, नि यात अजून यांच्या मागच्या पिढ्यांची पापे धरली नाहीत."
या देशात
१. असं वास्तविक मत असणारे,
२. बुद्धिभ्रम झाल्याने असं मत पसरवणारे
३. कोणत्या लाभासाठी असं मत पसरवणारे
चिकार आहेत.
====================================================
संघप्ररिण भाजप सरकार हे हरामखोरच असतं याचा ते सत्तेत येण्यापूर्विपासूनच इतका प्रचंड आरडाओरडा होता कि हे सरकार नक्की कसं आहे मे २०१४ पासून पुढे थंड डोक्यानं पाहता येत नाही. हे एक जस्ट अनादर सरकार आहे. आणि पार्श्वभूमी वा अपेक्षांच्या तुलनेत हे सरकार वाईट नाही, किमान त्याचे इरादे तरी वाईट नाहीत. कोणत्याही लोकशाहीत सरकार विरोधकांना जसे वागवते तसेच, पक्षी जास्त चांगलेच हे वागवत आहे. आणि काहीतरी एक करा, सरकारचे मनसुबेच (देशासाठी , लोकशाहीसाठी, विरोधकांसाठी, व्यवस्थांसाठी इ) धोकादायक वाटत असतील तर नोटबंदी आणि जीएसटी यांचा तांत्रिक विरोध करू नकात. कारण या तांत्रिक विरोधांचा विरोध करताना आपण सरकारला एक नॉर्मल सरकार मानता हे एक गृहितक आहे. सरकाराला व्यवस्था बुडवायच्या आहेत म्हणून आणि सरकारच्या चूका झाल्या आहेत म्हणून केलेल्या विरोधांत फरक आहे. आपला प्रतिसाद पहिल्या सदरात मोडतो.
27 Sep 2017 - 1:12 pm | जेम्स वांड
कुठल्या कुठल्या एजन्सी अन कश्या कश्या वापरल्या गेल्या (तुमच्या मतानुसार) हे समजून घेणे आवडेल.
27 Sep 2017 - 11:03 am | माहितगार
धागा लेखकास अवांतर चर्चा नको असतील तेव्हा माझ्या धाग्यांप्रमाणे धागा लेखाच्या शेवटी अवांतर टाळण्याचे सुस्पष्ट आवाहन करणे श्रेयस्कर असावे. काही जणांनी पॉपकॉर्न खाण्या इतपत लेख वाचला आहे, पण इंदीराजींबद्दल खूप वाचून झाले आहे त्यामुळे पॉपकॉर्न खाण्यास मिळाले तरी विषयाबद्दल काही नवे आल्या शिवाय चर्चेत रस फारसा रस तुर्तास नाही. एवंच पास.
28 Sep 2017 - 6:21 pm | आशु जोग
संपादकांना या गोष्टींबद्दल आक्षेप नसावा
की
मूकसंमती असावी
28 Sep 2017 - 6:36 pm | अभ्या..
ते विचार करत असावेत बहुधा. मिसळपाववरील आणिबाणीवर असाच लेख तुम्ही दुसरीकडे पाडला तर कसे करावे याचा. ;)
28 Sep 2017 - 6:50 pm | arunjoshi123
माझ्या व्यक्तिगत निरिक्षणात मिपा धरून अगदी प्रत्येक मराठी संस्थळावर संपादक लोक आपलं काम जनरली व्यवस्थित करतात. त्यांची त्यांच्याच संस्थळावरचं वातावरण एक्स वा वाय प्रकारे गढूळ व्हावं अशी अजिबात इच्छा नसते. त्यांच्या मर्यादा असतील, पण उद्देश सहसा शक्य तितके चांगले ठेवले आहेत.
त्यांचेसाठी हे मायनर मॅटर असावे. यू टू लिव इट.
27 Sep 2017 - 1:25 am | खाबुडकांदा
लेख आवडला. व्यक्तीपूजा वाईटच. गुणांपेक्षा अवगुणच अधिक होते पण आताच्या पिढीला हा क्रूर इतिहास माहित नाही.
खुप वाईट वाण लागले देशाला जेव्हा १९८० मध्ये परत त्यांचे सरकार आले. आम्ही काहीही कसेही वागलो तरी पुन्हा सत्तेवर येणारच असा गर्व तेव्हापासूनच झाला. तो अजूनही तसाच आहे.
अजूनही मोदी अयशस्वी होण्याचा अवकाश कि आम्ही आहोतच तयार काही परफॉर्मंस न करताच आयती सत्ता मिळवू ही मानसिकता आहे आणि मला तशी सार्थ भिती वाटते.
27 Sep 2017 - 12:10 pm | जेम्स वांड
सबब आपला पाठिंबा पॉपकॉर्नला
27 Sep 2017 - 12:13 pm | विशुमित
+१
थोडे लिंबू पिळायचे का?
चव येईल.
27 Sep 2017 - 5:03 pm | जेम्स वांड
होऊ दे खर्च रान हाय घरचं.!
27 Sep 2017 - 12:17 pm | पुंबा
पॉपकॉर्नच्या कमेंटमध्ये एवढा त्रागा करण्यासारखं काय आहे हे कळलं नाही.
बाकी तुमचा लेख उत्तम आहे.
27 Sep 2017 - 12:18 pm | कंजूस
अशा मोठ्या राजकारणी / सत्तेतील लोकांच्या धोरणांवर चर्चा करावीच. कुणाला चांगले मुद्दे माहित नसतात त्यांनी पापकानपुडाघेऊन दंगल बघायला झाडावर बसणे पसंत केले असेल तर? संयमाने घेतल्यास झाडावरचे खाली उतरून ( पापकानचा शेवटचे टणक लाह्या संपल्यावर) चर्चेत भाग घेतील.
27 Sep 2017 - 1:15 pm | arunjoshi123
जे इथे अत्यंत रुळले आहेत त्यांना अजिबात कल्पना नाही कि सर्वसामान्य माणसाला आइसब्रेकिंग करून मिसळपाववर लिहायला चालू करायला किती धारिष्ट्य लागतं. माझ्या अनेक मित्रांना जे विविध विषयांचे तज्ञ आहेत त्यांना मी इथे वर्षातून एक प्रतिसाद किमान लिहायला सांगतो. त्यांचेशी संबंधित लिंका पाठवतो. पण इथल्या माहौलने ते बर्यापैकी बुजतात असं माझं निरीक्षण आहे. अगोदरच घट्ट असलेल्या समूहात ते आपली मतं मांडू शकत नाहीत. सगळा समाज काय "गोंधळात सहभागी होऊ शकणारा" असतो काय? अत्यंत इगो असणारे, अप्रेशिएशन हवे वाटणारे, बुजरे, रागीट, चूका खपवून घ्या म्हणणारे, इ इ प्रकारचे लोकही कामाचे असतात. अशा प्रवॄत्ती संस्थळावर येताना दिसत नाहीत. संस्थळ हे ओपन, वाढतं आणि सर्व गुण दर्शक असावं.
==================
शिवाय ज्ञान आणि लेखनकौशल्य वा आपले म्हणणे उत्तम प्रकारे कम्यूनिकेट करायची हातोटी या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणणं कसं मांडलं आहे यालाच टाळ्या पडत गेल्या तर काय म्हटलं आहे हे मागे राहातं आणि उत्तम भूमिका माहित असलेले लोक सहभाग घेत नाहीत.
===================================
इथे लेखकाला पहिला प्रतिसाद आवडलेला नाही. तेव्हा अधिकतर लोकांनी लेखकाच्या बाजूनं बोलणं अधिक सयुक्तिक वाटतं. असं केल्यानं कपिलमुनींच्या कोणत्या स्वातंत्र्यावर कायमची गदा थोडीच येणार आहे?
27 Sep 2017 - 2:46 pm | विशुमित
+ म्हणणं कसं मांडलं आहे यालाच टाळ्या पडत गेल्या तर काय म्हटलं आहे हे मागे राहातं आणि उत्तम भूमिका माहित असलेले लोक सहभाग घेत नाहीत.
+१
या न्यायाने मुनींच्या बाजूने हे जास्त ग्राह्य धरले जायला पाहिजे मग.
27 Sep 2017 - 12:27 pm | जागु
नविनच माहीती मिळाली.
27 Sep 2017 - 3:01 pm | कंजूस
चला आता गाडी पुढे घ्या.
लोकांचा खोळांबा होतोय.
कामाची खोटि होते.
धर हँडल मार पॅडल.
बास्स करा की.
फुडं काय झालं?
भssऊ कय झालं?
~~~••~~
बँकांचं राष्ट्रियीकरण करण्याने त्यांचे नफातोटा गणित कायमचंच गंडलं का? आताच्या कोणत्या धोरणाशी त्याची तुलना करता येईल?
27 Sep 2017 - 5:26 pm | गम्मत-जम्मत
माझ्या मते लेख बराच एकांगी आहे. तरीही तुमची कळकळ समजु शकते. उदाहरणार्थ राजीव गांधी नी असं कोणतं ग्रेट कार्य केलेल की जिथे लाखो लोक काम करतात त्या आय टी पार्क ला त्यांचं नाव द्याव!
27 Sep 2017 - 6:04 pm | जेम्स वांड
आंदोलनासोबतच हे नामांतरण आंदोलन चालवायला हवं होतं मग आयटी पार्क मधल्या त्रस्त लोकांनी
ऐकीव माहिती नुसार, राजीव गांधींनी सी-डॉट (सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर टेलीमॅटीक्स), टेलीफोन एक्सचेंजेसचं आधुनिकीकरण, सॅम पित्रोडा ह्यांच्या मदतीने केलं होतं असं ऐकिवात होतं. खरं खोटं देव जाणे!
27 Sep 2017 - 6:41 pm | गम्मत-जम्मत
Okay. माहिती बद्दल धन्यवाद! :) नामांतर आधी हिंजेवाडी ते हिंजवडी.. हे हे हे
27 Sep 2017 - 10:56 pm | अमरेंद्र बाहुबली
कांहीही असो. इंदिराजींचं देशप्रेम निर्विवाद होतं. मी स्वत: काँग्रेस विरोधक आहे. पण इंदिरा गांधींचा मी वैयक्तिकरीत्या पंखा आहे. मागे सिक्कीम वरचा लेख वाचला तेव्हा तर त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत झाला. त्या बाईंचे खरच देशावर उपकार आहेत. ईतकी कामं त्या स्त्रीने केली आहेत.प्रत्येक नेत्याला पक्ष वगळता वैयक्तिक तराजुत मोजलं तर इंदिरा गांधी श्रेष्ठ ठरतात. देशाला आणखी एक नेता इंदिराजीं सारखा मिळो. ( मोदींकडून अपेक्षा आहे.)
बाकी अटलबिहारी वाजपेयींनी राममंदीराच्या मुद्द्यावर निवडणुक जिंकुन राममंदीर का नाही बनवले? हा बाबरी विध्वंस काळात जन्मलेल्या मला पडलेला प्रश्न आहे.
28 Sep 2017 - 1:23 am | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली, तुमच्या या संदेशास माझी पूर्ण सहमती आहे. सालं आंतरराष्ट्रीय राजकारण करायचं झालं तर इंदिराबाईंसारखं पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
28 Sep 2017 - 4:05 pm | आशु जोग
धाग्यामधील शेवटचा परिच्छेद वाचा
28 Sep 2017 - 6:07 pm | arunjoshi123
तुम्ही काय सागरिका घोषचं पुस्तक गिळलं की काय?
१. बांग्लादेश बनला नसता तर आज भारताने पाकला मुठित ठेवले असते. आणि काश्मिर एक बदला म्हणून आज पेटला आहे तितका पेटला नसता. पूर्वपाकिस्तानच्या ९५% भारतसीमेचा आणि तुटलेल्या दोन भागांचा वापर नेहरूंनी करणे तर संभवच नव्हे पण शास्त्रींनीही केला नाही. बांग्लादेशी बनून घुसणं आणि अतिरेकी कारवाया करणं सोपं झालं. पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर यांची डेमोग्राफी बिघडावणं सोपं झालं. अधिकृतरित्या मित्र आणि सेक्यूलर असलेला मात्र खूप रॅडीकलाइज झालेली किटकीट पाकिस्तानपेक्षा वाईट आहे. हे लोकांना प. बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांत अतिरेकी कारवायांना मोमेंटम येईल तेव्हा कळेल. काश्मिर देखिल पेटायला १९८४ उजाडलं. लोक हेच विसरलेत कि तो एकेकाळचा पाकिस्तान आहे. आज जरी तिथे भारतप्रेमी सरकार असले तरी अधे मधे भारतद्वेष्टे सरकार येते.
२. "सुसंस्कृत" बांग्लादेशचे देखिल आज भारताशी असलेले रेसिड्यूअल शत्रूत्व बाईंनी ५००० वॉर गुन्हेगार फुक्कट सोडून दिले म्हणून आहे.
३. १९७१ नंतर तिथल्या हिंदूंना वा रंगीत लोकांना सुरक्षित ठेवायचे वचन भारताने घेतले नाही. १९७५ मधे हिंदू १५% होते, आता ९% आहेत. (अर्थातच त्यांना इस्लाम फार महान वाटला असेल असं सेक्यूलर म्हणणार.). हा फक्त "स्लो पाकिस्तान" आहे. सुदैवाने तिथे खूप मोठी खरी सेक्यूलर लॉबी आहे.
४. १९६६ मधे बाईंनी मिझोरामवर विमानातून बाँबवर्षाव केला. अर्थातच मिझोंच्या जीवांची ती किती किंमत?
https://scroll.in/article/804555/50-years-ago-today-indira-gandhi-got-th...
५. बाईंच्या सुपुत्राने हेरून मुस्लिमांची नसबंदी केली.
http://indiatoday.intoday.in/story/rukhsana-sultana-the-chief-glamour-gi...
६. देशप्रेमी बाईंनी खलिस्तानचा प्रश्न पंजाबमधे फक्त सत्ता प्राप्त करण्यासाठी शून्यातून निर्माण केला. त्यात स्वतः बळी गेल्या. अनेक शीखांची कत्तल झाली. सुवर्णमंदिर प्रकार नीट हाताळयची मानसिकता नव्हती.
७. नेहरूंची काँग्रेस आणि बाईंची काँग्रेस तीच का असा एक प्रश्न आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज नेहरूंचीच काँग्रेस असती तर तिथे वेगवेगळ्या खानादानातले नेते उच्चपदी पाहायला मिळाले असते. हा प्रकार सर्वतः बाईंनी केला. त्यामानाने राजीव, राहुल, सोनिया इनोसेंट आहेत.
८. सोशलीझमच्या प्रेमापायी व्यापक प्रमाणात खाजगी बँकिंग क्षेत्र नष्ट केलं.
९. आसाराम नाही म्हणणार पण अगदी रामदेव सारखा बाबा उत्तराखंडातच बरा. पण हे बाबा लोक अक्षरशः रोज घरी आणि सरकारी निर्णय घेत.
१०. आणिबाणी. ती ही व्यक्तिगत लाभासाठी.
११. (हा लेख पुन्हा वाचावा) पक्षात आणि पक्षाबाहेर विरोधकांशी कसं वागावं याचं कल्चर होतं भारतात. काँग्रेसचे नेते जनसंघाच्याही, इ उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च (स्वतःच्या विरोधात) देत. ते हिन पातळिला आणण्यात बाई अग्रगण्य आहेत.
===============================================
इंदिरा गांधिंपेक्षा सक्षम आणि देशप्रेमी असे ढिगानं नेते तेव्हा काँग्रेसमधे होते, आजही आहेत. त्या पक्षात, वा त्यांच्या वेळोवेळी सुधारलेल्या विचारधारेत अशी कोणती फंडामेंटल खोट नाही. पण नेहरू, इंदिरा यांच्या बाबतीत आपलं तत्त्वज्ञान हेच खरं हा अतिरेकी विचार आणि व्यक्तिगत स्वार्थ हे नेहमीच देशप्रेमाच्या अगोदर येत. हे लोक इतके आंधळे होते कि त्यांना देशप्रेम काँप्रो होत आहे कि नाही हे देखिल कळत नसे.
=====================================================================
१९७७ मधे इंदिराबाईंनी आणिबाणी मागे घेतली. वास्तविक घेतली नसती तर फरक पडला नसता (त्यांच्या सत्तेला). पण त्या तितक्याही गयागुजर्या नव्हत्या. पण यानं एक सिद्ध झालं. आपल्या व्यवस्थेत याला उत्तर नाही हे सिद्ध झालं.
========================================================================================
यात मी अफवांचा अंतर्भाव केलेला नाही. पण तरी कानों सुनी एक बात इथे उल्लेखणं आवश्यक आहे. मणिपूरमधे विभाजनवादी, अतिरेकी मादक पदार्थांचे सेवन करणारांस आपल्या गँग मधे घेत नसत. तेव्हा तिथल्या अपक्ष लोकांचे म्हणणे आहे कि (इंदिरा प्रणित, प्रेरित) भारत सरकारने चक्क अंमली पदार्थ प्रमोट केले सामान्य तरुणांमधे. आज मणिपूर जगातल्या दरडोई सर्वोच्च अंमली पदर्थ सेवन करणार्या जागांत येते. इथल्या आज्यांची पिढी बाईंच्या नावाने बोटे मोडतात. याचं परिमार्जन म्हणून १९९१ पासून त्याला चक्क ड्राय स्टेट केलं. पण ड्रग मिनेस तसाच आहे. (टेक ऑल धिस विथ पिंच ऑफ सॉल्ट. हे माध्यमांत नाहि.).
=============================
आज लोकांना "भक्तांनी" देशद्रोही म्हटलेलं चालत नाही, लेकिन एक जमाना था जब "सरकार" आपको देशद्रोही बतलाकर आपके उपर बम फेकती थी या ड्रग्ज देती थी. चालायचंच.
28 Sep 2017 - 7:43 pm | अमरेंद्र बाहुबली
तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले मुद्दे दोन्हीही पटण्यासारखे नाही. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय त्या वेळची परिस्थिती पाहुन घेतले होते. त्या वेळी ते निर्णय बरोबर होते. नंतरच्या आपल्या उहापोहाला काहीच अर्थ नाही.
अजुन एक गोष्ट व्यक्तिमत्व आणी निर्णय क्षमता, धडाडी ह्यांचा काहीही संबंध नाही. इंदिरा गांधींच व्यक्तिमत्व तुम्ही म्हणता त्या प्रमाणे वाईट होतं मान्य. विरोधकांना तुरुंगात डांबले वैगेरे पण त्यांनी घेतलेले निर्णय धडाडीचे होते. असे निर्णय घ्यायला, आंतरराष्ट्रीय राजकारण करायला "पाँवर" लागते जी इंदिराजीं कडे होती.
तुम्ही लेखात अटलबिहारींचा उल्लेख केलाय. मानलं खूप मोठे कवी होते, व्यक्तिमत्व चांगल होतं म्हणून ती व्यक्ती हुशार, कार्यक्षम ठरत नाही. लोकं सरकार निर्णय घेण्यासाठी निवडुन देतात 5 वर्ष पुर्ण करण्यासाठी नाही. त्यांच्या काळात संसदेवर हल्ला झाला. विचार करा इंदिरा गांधीच्या काळात झाला असता तर काय हाल झाले असते पाकिस्तानचे? मोदक साहेबांचा कंदहार वरचा लेख वाचला. विमान भारतातल्या भारतात 4 वेळा फिरलं पण अटलजींना थांगपत्ता नाही. व्वा! इंदिरा गांधीचा एकही निर्णय फसलेला दिसत नाही. जे त्यांनी ठरवलं ते केलं अगदी अमेरीकेच्या नाकावर टिच्चुन. आजकालचे नेते मुस्लिम वोटींग कमी होईल म्हणून रोहींग्यांना पाठींबा द्यायला मागेपुढे पाहत नाही.
त्यांनी आणीबाणी लादली तर हातातल्या ताकदीचा देशहीतासाठी वापर ही करून दाखवला.
इतक्या मोठ्या नेत्यावर तुम्ही फारचं क्षुल्लक कारणावरून टिका केलीय.
देशाला अजुन एक इंदिरा भेटो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आणी मी कुठलंही पुस्तकं वाचलेलं नाही. लहानपणी आजीचा हात धरून पोलींग बुथ वर जायचो. आजी फक्त पंजा पाहुन मत द्यायची. सर्वांनी नाही सांगितलं तरी. कारण एकच " इंदीरामाय". काँग्रेसला विचार न करता जे लोकं मत द्यायचे ते फक्त इंदिरा गांधीं मुळे. देशाच्या कान्या कोपर्यात इंदिरा गांधीची लोकप्रियता आहे. ती त्यांच्या कर्तृत्वामुळे. आणी तुम्ही म्हणताय सक्षम विरोधी पक्ष.
आजकाल सगळ्यांना दिसतंय फक्त विरोधासाठी विरोध करणारे, निर्णय देशहीताचा आहे की नाही हे न पाहता मतांच्या राजकारणासाठी विरोध करणारे विरोधी पक्ष ( कोणत्याही पक्षाचे असो.) मतांच राजकारण पाहुन निर्णय घेणारे सत्ताधारी. काय चाटयचं का त्या लोकशाहीला? ( आजचं बंगाल बघा.) ह्या सर्वांपलीकडे जाऊन निर्णय घेतले ते इंदिरा गांधींनी. लोकांनाही मोदींमध्ये त्यांचीच छबी दिसली म्हणून कधी नव्हे ते भाजपा एकहाती निवडुण आली. जी राममंदीराच्या लाटेतही आली नव्हती.
आणी तुमचा शेवटचा परिच्छेद चुकलाय. "इंदिरा गांधीच्या कर्तृत्वामुळे त्यांच वाईट काम झाकलं गेलं" असं हवं होतं.
29 Sep 2017 - 2:18 pm | श्रीगुरुजी
तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले मुद्दे दोन्हीही पटण्यासारखे नाही. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय त्या वेळची परिस्थिती पाहुन घेतले होते. त्या वेळी ते निर्णय बरोबर होते.
नाही. इंदिरा गांधींचे अनेक निर्णय चुकले/चुकीचे होते. मूळ घटनेत नसलेले समाजवाद व धर्मनिरपेक्ष असले बोगस शब्द घटनेत घुसडणे, आणिबाणी, विरोधकांना तुरूंगात डांबणे, संजय गांधीला पुढे आणणे, लिट्टेला पाठिंबा देणे, भिंद्रनवालेला पाठिंबा देणे, इस्लामिक देशांच्या परीषदेला निमंत्रण नसताना व भारत मुस्लिम देश नसतानाही प्रतिनिधी पाठविणे, १९७१ मध्ये पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करलेली असताना व पाकिस्तानचे ९०,००० सैनिक भारताच्या कैदेत असताना पाकिस्तानने १९४८ मध्ये बळकावलेला भारताचा प्रदेश न सोडविणे, काश्मिर प्रश्न न सोडविणे, १९७८ मध्ये इंडिअन एअरलाईन्सचे विमान पळविणार्या काँग्रेसच्या पांडे बंधूंना मंत्रीपद देणे, नगरवाला प्रकरणात ६० लाख रूपये गडप करणे . . . अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडल्या होत्या.
तुम्ही लेखात अटलबिहारींचा उल्लेख केलाय. मानलं खूप मोठे कवी होते, व्यक्तिमत्व चांगल होतं म्हणून ती व्यक्ती हुशार, कार्यक्षम ठरत नाही. लोकं सरकार निर्णय घेण्यासाठी निवडुन देतात 5 वर्ष पुर्ण करण्यासाठी नाही.
वाजपेयी हुशार, कार्यक्षम नव्हते का?
त्यांच्या काळात संसदेवर हल्ला झाला. विचार करा इंदिरा गांधीच्या काळात झाला असता तर काय हाल झाले असते पाकिस्तानचे?
हे वाजपेयींनी केलं तेच इंदिरा गांधींनी केलं असतं.
मोदक साहेबांचा कंदहार वरचा लेख वाचला. विमान भारतातल्या भारतात 4 वेळा फिरलं पण अटलजींना थांगपत्ता नाही. व्वा! इंदिरा गांधीचा एकही निर्णय फसलेला दिसत नाही. जे त्यांनी ठरवलं ते केलं अगदी अमेरीकेच्या नाकावर टिच्चुन. आजकालचे नेते मुस्लिम वोटींग कमी होईल म्हणून रोहींग्यांना पाठींबा द्यायला मागेपुढे पाहत नाही.
भारतात ४ वेळा फिरलं???? अटलजींना थांगपत्ता नाही??????
या प्रकरणाची तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही. मिपावर कंदाहार प्रकरणावर २-३ लेख आहेत. ते शोधून वाचा. योग्य अशी भरपूर माहिती मिळेल.
लोकांनाही मोदींमध्ये त्यांचीच छबी दिसली म्हणून कधी नव्हे ते भाजपा एकहाती निवडुण आली. जी राममंदीराच्या लाटेतही आली नव्हती.
नाही बुवा. आम्हाला तर मोदींमध्ये मोदींचीच छबी दिसली. मुळात मोदींना मते देणार्यापैकी बहुतेकांचा जन्म इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झाला आहे. त्यांना कोण इंदिरा गांधी, काय इंदिरा गांधी याविषयी फारशी माहिती नाही. त्यांना माहित आहेत ते मनमोहन सिंह, सोनिया गांधी, राहुल, कलमाडी, सिब्बल, चिदंबरम् इ. कॉंग्रेसी नेते आणि अडवाणी, मोदी, मुलायम, लालू, सुषमा स्वराज, ममता, केजरीवाल इ. इतर पक्षातील नेते. या सर्वांच्या तुलनेत त्यांना मोदी खूपच उजवे दिसले. म्हणून तर त्यांनी मोदींना बहुमत दिले.
29 Sep 2017 - 7:16 pm | आशु जोग
श्रीगुरुजी
सर्व मुद्यांशी सहमत. देशात इंदिराजींच्याच काळात जातीयवाद वाढला किंवा सुरु झाला असे म्हणता येइल का ?
28 Sep 2017 - 6:31 pm | arunjoshi123
गांधी खानदानात नि:संशय सज्जन राजीव गांधी होते असे ठामपणे म्हणता येईल.
१.बोफोर्समधे त्यांना मॅनिप्यूलेट केलं गेलं. अगदी त्यांच्या विरोधकांना २००२ मधे केस मधे थेट त्यांचे नाव सुरुवातीपासून घ्यावे असे वाटले नाही.
२. इंदिराच्या हत्येवेळी बडा पेड गिरता है तो धरती हिलती है... इ इ म्हणणं मोदींच्या गोध्रा होगा तो अहमदाबाद होगा म्हणण्याइतकंच राजकीयदृश्ट्या अपरिपक्व होतं.
३. शाहबानो त्यांची चूक होती. राम मंदिराचे कुलुप खोलणे ही चुक दुरुस्ती नव्हे तर अजून एक चूक होती. अर्थात ते सच्चे सेक्यूलर असावेत.
४. ते सोशलिस्ट होते, पण बाकीच्यांचं किमान सन्मानानं ऐकून घेत.
५. नीच दर्जाचं राजकारण करत नसत. सत्तेचा फार हव्यास नव्हता.
६. विरोधकांना सन्मान देत.
७. अघोरी मेजॉरिटीचा काहिही दुरुपयोग केला नाही.
८. बांग्लादेशप्रमाणेच श्रीलंकेचा निर्णय पक्षाच्या एकूण तत्त्वद्नानाप्रमाणे होता. आतून त्यांना मार्गदर्शन योग्य मिळाले नाही.
=====================
अजून एक राजीव झाले नि मजबूत विरोधी पक्ष झाला तर देशाचं भलं होइल.
28 Sep 2017 - 7:08 pm | प्रसाद_१९८२
७. अघोरी मेजॉरिटीचा काहिही दुरुपयोग केला नाही.
<<
मग शहाबानो केस मध्ये सर्वौच्च न्यायालयाचा निर्णय, राजीव गांधींनी कसा काय फिरवला ?
28 Sep 2017 - 7:01 pm | पैसा
पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि जर असे झाले असते तर याला इतिहासात जागा नसते.