इंदिराबाई
Published on 26/09/2017 - 14:54
प्रकाशित
मुखपृष्ठ
इंदिराबाई
काँग्रेस पक्षातली सचोटी नेहरु आणि लालबहादूर शास्त्री यांच्यापर्यंत टिकून होती. इंदिरा गांधींच्या काळात त्याला ओहोटी लागली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर सुरू झाला. इंदिराबाईंनी पक्षातल्याही अनेक जणांचा राजकीय खातमा केला. पक्षाने ठरवलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हरवून आपला उमेदवार निवडून आणण्याची कामगिरीही बाईंनी करून दाखवली. नेहरु हे विद्वान पंडीत होते. त्यांना पक्षात आणि पक्षाबाहेरही एक सन्मान आणि आदर होता. इंदिराबाई मात्र वडिल असेपर्यंत त्यांच्या छायेतच वावरल्या. नेहरुंनंतर पक्षाने त्यांना वारस म्हणून निवडले नाही. तोवर पक्षात लोकशाही टिकून होती. निवड झाली ती शास्त्रीजींची. शास्त्रीजींनंतर मात्र इंदिराजींना संधी मिळाली. पण वडिलांना मानणारे अनेक जण या कन्येला मानत नसत. तुलना होत असे. तिथेच ठिणगी पडली. नेहरुंची कन्या या पलिकडे आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरु झाली. त्यामधे वडिलांना मानणार्या अनेकांना बाईंनी नामोहरम केले. आपल्या स्वतःच्या कर्तुत्त्वावर मोठे झालेले लोक बाईंना डाचत असत. प्रत्येक राज्यात त्यांनी नैसर्गिकपणे मोठे झालेल्या, स्वतःच्या पायावर उभे असणार्या लोकांना त्यांनी संपविले. त्या त्या ठिकाणी नंबर दोनच्या नेत्यांना ताकद देऊन पूर्वीचे नेते खच्ची होतील याची काळजी घेतली. त्यात त्यांचा इगो सुखावला पण पक्ष मात्र खच्ची झाला. महाराष्ट्रातलं एक उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण हे नं १ चे नेते. त्यांच्याविरोधात वसंतदादा पाटील यांना त्यांनी ताकद दिली. अर्थात पुढे यशवंतरावांनी वसंतदादांचे सरकार पाडून शरद पवारांना मुख्यमंत्री करून तो हिशोब पूर्ण करून घेतला. (हे लेखन कुणी कॉपी करायचा प्रयत्न करू नये हे मिसळीच्या वाचकांसाठीच आहे) सांगायचा मुद्दा राज्याराज्यात मूळ काँग्रेसी नेतृत्त्व विरुद्ध इंदिरानिष्ठ असा संघर्ष सुरु झाला. देश चालवण्यासाठी साधन म्हणून सत्ता हे जाऊन सत्ता हेच साध्य बनल्याने सत्ता हस्तगत करण्यातच सगळी शक्ती खर्च होवू लागली. इंदिराजींच्या काळात देशात गुन्हेगारी खूप वाढली. मुंबईमधे स्मगलिंग वाढले. हाजी मस्तान, दाऊद अशी नावे तेव्हाच जोर धरु लागली. त्या काळातल्या अमिताभच्या सिनेमातही याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. ते सिनेमे स्मगलिंग, काळा बाजार, खोट्या नोटा, साठेबाजी यावरच आधारीत आहेत. बाईंच्या काळात याच गोष्टी देशात वाढत गेल्या. इंदिराजींच्या आधीची पिढी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली, त्यांनी देशाला लोकशाही दिली. बाईंनी मात्र देशावर आणिबाणी लादून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला. युद्ध वगैरे असेल तर देशात आणिबाणी आणावी लागते. पण इंदिराबाईंनी तशा कुठल्याही कारणाने आणिबाणी न आणता केवळ आपली स्वतःची लोकसभा सीट गमावल्यामुळे आणिबाणी आणली. संपूर्ण देश इंग्रज गेल्यावर २५ वर्षात तुरुंग करून टाकला. तब्बल दीड वर्ष या देशाने आणिबाणी पाहीली. अटलबिहारींसारखी माणसे नेहरुंपासून संसदेत होती. वेळप्रसंगी ते नेहरुंच्या धोरणांवर टिकाही करीत. पण नेहरुंच्या काळात एक खुलेपणा टिकून होता. पक्षापक्षांमधेही सौहार्द होता. बाईंच्या काळात सुद्धा अटलजी देशहिताच्या बाबत खटकणार्या गोष्टींवर लोकसभेत खरमरीत टिका करीत. इंदिराबाईंना ही टिका सहन होत नसे. अनेकदा अटलजी लोकसभेत बोलत असताना इंदिराजी स्वतः अगदी असंबद्ध कमेंट पास करून अटलजींची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करीत असत. एकूण काय तर अटलजी आणि इतर अनेक नेते इंदिराजींच्या धोरणावर टिका करीत. आणिबाणीच्या निमित्ताने बाईंना या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची संधी मिळाली. औषधोपचाराविना यातल्या अनेकांचे हाल झाले. काही जणांचे तुरुंगातच मृत्यूही झाले. घरातला कर्ता मनुष्य तुरुंगात गेल्यामुळे अनेक कुटूंबे रस्त्यावर आली. हे झाले केवळ एका व्यक्तिच्या स्वार्थापोटी. आणिबाणी ही आपल्या पक्षाची चूक होती हे पुढे सोनिया गांधीनीही जाहीरपणे मान्य केलेले आहे. इतरत्र शिस्तीचा बडगा उगारणार्या बाईंनी स्वतःच्या संजय गांधी नावाच्या पुत्राला मात्र मोकाट सोडले होते. याने देशात आणि राजधानीत अक्षरशः नंगानाच घातला. संजय गांधी कुणाही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचा अवमान करीत. ashu J बाई सत्तेचा वापर कशाही प्रकारे करू शकतात, वैयक्तिक स्वार्थासाठी देशालाही वेठीस धरू शकतात. हे पाहील्यावर भल्याभल्यांची गाळण उडाली. त्यांच्या काळात ललित नारायण मिश्रा या केंद्रीय रेल्वे मंत्र्याची हत्या झाली. तिचा तपास लावणे आजही कुणाला सोयीचे वाटत नाही. बाईंना विरोध केला तर आपली धडगत नाही हे लक्षात घेऊन अनेकांनी त्यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले. इंदिरानिष्ठ वसंतदादांना बाजूला सारून यशवंतरावांनी आणलेले शरद पवारांचे पुलोद सरकार बाईंनी निर्दयीपणे बरखास्त करून फेकून दिले. महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रपती राजवट आणली. विरोध मोडून काढण्यासाठी आपले स्थान टिकवण्यासाठी बाई आणिबाणीपासून ते राष्ट्रपती राजवटीपर्यंतचे मार्ग अगदी सहजपणे वापरताना दिसत. विरोधाचे झाडच काय पण रोपटेही दिसता कामा नये. हा बाईंचा अट्टाहास होता. मुंबईमधे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणी स्थिर होवू लागला तर न जाणो उद्या आपल्याला आव्हान निर्माण करेल की काय या शक्यतेने बाई भयग्रस्त असत. पण यामुळे पक्षात स्वाभिमानी लोकांपेक्षा तोंडपुज्या लोकांची फौज उभी राहीली. विरोधकही दहशतीखाली राहू लागले. बाईंना विरोध न करता त्यांच्याशी किंवा काँग्रेसशी जमवून घेत आपल्या पदरात काहीतरी पाडून घेणार्या समाजवादकांची परंपरा तेव्हापासून सुरु झाली. आपण काँग्रेसच्या आणिबाणीला विरोध केला असा दावा करणारे काही समाजवादक आज त्याच आणिबाणी लादणार्या काँग्रेसचे प्रवक्ते बनलेले दिसतात. त्यामुळे १९८४ मधे दिल्लीत जी दंगल झाली आणि त्यात एका समाजावर या पक्ष कार्यकर्त्यांनी भीषण हल्ले केले. आपल्या विरोधात जाणारी गोष्ट दयामाया न दाखवता चिरडायची असते हे संस्कार पक्षाच्या कार्यकर्त्यांना इंदिराजींच्या काळातच मिळालेले होते. पुढे राजीव गांधी प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले. विरोधकांची संख्या अत्यंत कमी होती. त्यांचा आवाज तो कितीसा असणार पण लोकसभेमधला विरोधक बोलू लागला की राजीव गांधींची शाऊटींग ब्रिगेड सभागृहात प्रचंड आवाज करून विरोधकांचा आवाज दडपून टाकत असे. म्हणजे इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीच्या रस्त्यावर हिंसा, लोकसभेत विरोधी आवाज दडपून लोकशाहीची हिंसा सुरुच होती. राजीव गांधीना मिळालेले प्रचंड बहुमत त्यांना सांभाळता आले नाही, पुढील लोकसभा निवडणूकीत काँग्रेस विरोधी पक्षात गेली. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र अशा तीनच राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आपण सत्तेत नाही, अशावेळी हे तीन मुख्यमंत्री आपल्याला वरचढ तर होणार नाहीत ना ? या भीतीने इंदिरापुत्र राजीव गांधींना ग्रासले. त्यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश इथले मुख्यमंत्री कोणतेही कारण नसताना पदावरून काढून टाकले आणि नवे बसवले. म्हणजे देशातून काँग्रेस सत्तेबाहेर गेलेलीच आहे ती राज्यातून गेली तरी चालेल पण माझे स्थान पक्षात टिकले पाहीजे, हा इंदिरापुत्र राजीव गांधी यांचा अट्टाहास होता. पण हे सगळे संस्कार पक्ष कार्यकर्त्यांना, राजीव गांधींना इंदिराकाळातच मिळालेले होते हे निश्चित. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना गारद करणार्या इंदिराबाईंनी देशाच्या शत्रूकडे पुरेसे लक्ष दिले नाही. बांगलादेशातून निर्वासित येण्यास त्यांच्याच काळात सुरुवात झाली, खलिस्तानचा प्रश्न पेटला, तमिळ टायगर्सदेखील उग्र बनले. इंदिराबाई देशाच्या शत्रूंना नीटपणे हाताळू शकल्या नाहीत. बहुधा देश आणिबाणीत लोटण्याचे अधिकार त्यांच्याकडे असले तरी देशाबाहेरचे प्रश्न सोडवण्यासाठी अख्खे जग आणिबाणीत लोटण्याचे अधिकार त्यांच्याकडे नसावेत म्हणून त्या कमी पडल्या असाव्यात. त्यामुळे अनुशासन पर्वातून त्या जगाला शिस्त लावू शकल्या नाहीत. इंदिराजींच्या काळात देशात काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडल्या. पण विरोधकांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही थराला जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे या गोष्टी कायम झाकोळूनच गेल्या. इंदिराबाईंची कारकीर्द अशा अनेक गूढ गोष्टींनी भरलेली आहे . . . - आशु
याद्या
10311
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
मस्त धागा
(No subject)
In reply to मस्त धागा by कपिलमुनी
बाईंनी लादलेली आणीबाणी हा
परखड विवेचन केले आहे. परंतु
इंदिराबाईच कारणीभुत
In reply to परखड विवेचन केले आहे. परंतु by एस
...
In reply to इंदिराबाईच कारणीभुत by रमेश आठवले
हम्म
परखड लेख
छान लेख. WhatsApp वर शेअर
मला नै वाटत कुणी या लेखा
संपादक एक विनंती
च्यामारी, पॉपकॉर्न खाण्यात
In reply to संपादक एक विनंती by आशु जोग
एका राजकीय व्यक्तीविषयी विरोध
In reply to संपादक एक विनंती by आशु जोग
विरोधी प्रतिसाद वेगळा. कदाचित
In reply to एका राजकीय व्यक्तीविषयी विरोध by थॉर माणूस
कोणती उपचर्चा मनोरंजक पातळिला
In reply to विरोधी प्रतिसाद वेगळा. कदाचित by arunjoshi123
?samp
In reply to संपादक एक विनंती by आशु जोग
लेखाचे टायटल इंदिराबाई ऐवजी
In reply to ?samp by राही
विरोध सन्मानानं घेणं,
In reply to लेखाचे टायटल इंदिराबाई ऐवजी by arunjoshi123
आताशा:
In reply to विरोध सन्मानानं घेणं, by पगला गजोधर
एजन्सी म्हणजे?
In reply to आताशा: by arunjoshi123
अभ्या , थॉर माणूस , राही +१
In reply to संपादक एक विनंती by आशु जोग
...
In reply to संपादक एक विनंती by आशु जोग
संपादकांना या गोष्टींबद्दल
In reply to ... by आशु जोग
माझ्या व्यक्तिगत निरिक्षणात
In reply to ... by आशु जोग
लेख आवडला. व्यक्तीपूजा वाईटच.
इंदिराबाई जे करून गेल्या त्याला आता काय करणार?
+१
In reply to इंदिराबाई जे करून गेल्या त्याला आता काय करणार? by जेम्स वांड
पिळा पाटील
In reply to +१ by विशुमित
पॉपकॉर्नच्या कमेंटमध्ये एवढा
अशा मोठ्या राजकारणी /
जे इथे अत्यंत रुळले आहेत
In reply to अशा मोठ्या राजकारणी / by कंजूस
+ म्हणणं कसं मांडलं आहे यालाच
In reply to जे इथे अत्यंत रुळले आहेत by arunjoshi123
नविनच माहीती मिळाली.
चला आता गाडी पुढे घ्या.
माझ्या मते लेख बराच एकांगी
वाकड पूल ट्राफिक जाम
In reply to माझ्या मते लेख बराच एकांगी by गम्मत-जम्मत
Okay. माहिती बद्दल धन्यवाद! :
In reply to वाकड पूल ट्राफिक जाम by जेम्स वांड
कांहीही असो. इंदिराजींचं
पूर्ण सहमती
In reply to कांहीही असो. इंदिराजींचं by अमरेंद्र बाहुबली
. . .
In reply to कांहीही असो. इंदिराजींचं by अमरेंद्र बाहुबली
इंदिराजींचं देशप्रेम
In reply to कांहीही असो. इंदिराजींचं by अमरेंद्र बाहुबली
तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले
In reply to इंदिराजींचं देशप्रेम by arunjoshi123
तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले
In reply to तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले by अमरेंद्र बाहुबली
तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले मुद्दे दोन्हीही पटण्यासारखे नाही. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय त्या वेळची परिस्थिती पाहुन घेतले होते. त्या वेळी ते निर्णय बरोबर होते.नाही. इंदिरा गांधींचे अनेक निर्णय चुकले/चुकीचे होते. मूळ घटनेत नसलेले समाजवाद व धर्मनिरपेक्ष असले बोगस शब्द घटनेत घुसडणे, आणिबाणी, विरोधकांना तुरूंगात डांबणे, संजय गांधीला पुढे आणणे, लिट्टेला पाठिंबा देणे, भिंद्रनवालेला पाठिंबा देणे, इस्लामिक देशांच्या परीषदेला निमंत्रण नसताना व भारत मुस्लिम देश नसतानाही प्रतिनिधी पाठविणे, १९७१ मध्ये पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करलेली असताना व पाकिस्तानचे ९०,००० सैनिक भारताच्या कैदेत असताना पाकिस्तानने १९४८ मध्ये बळकावलेला भारताचा प्रदेश न सोडविणे, काश्मिर प्रश्न न सोडविणे, १९७८ मध्ये इंडिअन एअरलाईन्सचे विमान पळविणार्या काँग्रेसच्या पांडे बंधूंना मंत्रीपद देणे, नगरवाला प्रकरणात ६० लाख रूपये गडप करणे . . . अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडल्या होत्या.तुम्ही लेखात अटलबिहारींचा उल्लेख केलाय. मानलं खूप मोठे कवी होते, व्यक्तिमत्व चांगल होतं म्हणून ती व्यक्ती हुशार, कार्यक्षम ठरत नाही. लोकं सरकार निर्णय घेण्यासाठी निवडुन देतात 5 वर्ष पुर्ण करण्यासाठी नाही.वाजपेयी हुशार, कार्यक्षम नव्हते का?त्यांच्या काळात संसदेवर हल्ला झाला. विचार करा इंदिरा गांधीच्या काळात झाला असता तर काय हाल झाले असते पाकिस्तानचे?हे वाजपेयींनी केलं तेच इंदिरा गांधींनी केलं असतं.मोदक साहेबांचा कंदहार वरचा लेख वाचला. विमान भारतातल्या भारतात 4 वेळा फिरलं पण अटलजींना थांगपत्ता नाही. व्वा! इंदिरा गांधीचा एकही निर्णय फसलेला दिसत नाही. जे त्यांनी ठरवलं ते केलं अगदी अमेरीकेच्या नाकावर टिच्चुन. आजकालचे नेते मुस्लिम वोटींग कमी होईल म्हणून रोहींग्यांना पाठींबा द्यायला मागेपुढे पाहत नाही.भारतात ४ वेळा फिरलं???? अटलजींना थांगपत्ता नाही?????? या प्रकरणाची तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही. मिपावर कंदाहार प्रकरणावर २-३ लेख आहेत. ते शोधून वाचा. योग्य अशी भरपूर माहिती मिळेल.लोकांनाही मोदींमध्ये त्यांचीच छबी दिसली म्हणून कधी नव्हे ते भाजपा एकहाती निवडुण आली. जी राममंदीराच्या लाटेतही आली नव्हती.नाही बुवा. आम्हाला तर मोदींमध्ये मोदींचीच छबी दिसली. मुळात मोदींना मते देणार्यापैकी बहुतेकांचा जन्म इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झाला आहे. त्यांना कोण इंदिरा गांधी, काय इंदिरा गांधी याविषयी फारशी माहिती नाही. त्यांना माहित आहेत ते मनमोहन सिंह, सोनिया गांधी, राहुल, कलमाडी, सिब्बल, चिदंबरम् इ. कॉंग्रेसी नेते आणि अडवाणी, मोदी, मुलायम, लालू, सुषमा स्वराज, ममता, केजरीवाल इ. इतर पक्षातील नेते. या सर्वांच्या तुलनेत त्यांना मोदी खूपच उजवे दिसले. म्हणून तर त्यांनी मोदींना बहुमत दिले.. . .
In reply to तुमचा लेख आणि वर उल्लेखिलेले by श्रीगुरुजी
गांधी खानदानात नि:संशय सज्जन
In reply to कांहीही असो. इंदिराजींचं by अमरेंद्र बाहुबली
७. अघोरी मेजॉरिटीचा काहिही
In reply to गांधी खानदानात नि:संशय सज्जन by arunjoshi123
लेख आवडला