पंख पसरून उडणारी डुकरे

रानरेडा's picture
रानरेडा in जे न देखे रवी...
4 Sep 2017 - 11:09 pm

पंख पसरून उडणारी डुकरे

तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे

- कवी उडता डुक्कर उर्फ रानरेडा उर्फ कुत्तो मे कामिना
(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

विडंबनगझलभाषाउखाणे

प्रतिक्रिया

अजया's picture

5 Sep 2017 - 10:25 am | अजया

बाबौ !!
एकपण प्रतिसाद नाही. मिपाकरांनो उडणार्या डुकराचे पंख कापता का असे? दुष्ट कुठले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2017 - 11:10 am | ज्ञानोबाचे पैजार

उडणार्‍या डुकराचे पंख कापायची हिम्मत कोणत्या मिपाकरात नाही.
उडणार्‍या डुकराचे पंख कापणे म्हणजे "माध्यान्नीच्या सुर्यावर थुंकण्यारारखे आहे"
पंख कापल्यावर डुक्कर आपल्याच अंगावर पडण्याची जास्त शक्यता आहे.
कोणताही सुज्ञ मिपाकर हा धोका पत्करणार नाही.
रच्याकने:- उडणारे डुक्कर ही कल्पना भयानक आवडली आहे.
पैजारबुवा,

रानरेडा's picture

5 Sep 2017 - 2:52 pm | रानरेडा

मेंदुला दुखापत हा सरळ सरळ गुगल अनुवाद होता
हि कविता मात्र पिंक फ्लॉइड च्या Animals अल्बम च्या Pigs on the Wing १ या गाण्याचा केलेला अनुवाद आहे
मूळ ओली अशा

Pigs on the Wing (Part One) (Waters) 1:24

If you didn't care what happened to me,
And I didn't care for you,
We would zig zag our way through the boredom and pain
Occasionally glancing up through the rain.
Wondering which of the buggars to blame
And watching for pigs on the wing.

उडणारे डुक्कर हे पिंक फ्लॉइड बँड एकाद्या लोगो किंवा मोटिफ सारखा वापरतो . त्यांच्या अनेक कॉन्सर्ट मध्ये डुकराच्या सारखा फुगा फुगवून उडवले जाते . त्याच्या रॉजर वॉटर्स या मेंबर ची २००७ साली मुंबईतील कॉन्सर्ट ला मी गेलो होतो , त्यात डुक्कर उडवल्यावर सर्व जण आनंदाने किकालात होते.
https://youtu.be/Lv3hTMR5GmQ

अजया's picture

5 Sep 2017 - 3:12 pm | अजया

=))))))

पैसा's picture

5 Sep 2017 - 12:31 pm | पैसा

मिपावर स्वागत

चांदणे संदीप's picture

5 Sep 2017 - 12:47 pm | चांदणे संदीप

प्रचोरीत म्हंजे काय वो??

Sandy

नवीन पध्दतीच्या कचोर्‍या असतात. त्या पध्दतीने कविता पाडतात.
सारण बाहेरुन लावतात मग आत तेल घालून आतल्या आतच तळतात.

जव्हेरगंज's picture

5 Sep 2017 - 1:39 pm | जव्हेरगंज

=)))))

किंवा विशेष प्रशिक्षण घेऊन केलेल्या चोरीला प्रचोरी म्हणतात बहुधा.
शिक्षित प्रशिक्षित, शाळा प्रशाला तसेच प्रचोरीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2017 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

हे समजले की प्रचेतस चा अर्थ पण लगेच समजेल असे वाटते
पैजारबुवा,

रानरेडा's picture

5 Sep 2017 - 2:37 pm | रानरेडा

प्रचोरीत म्हंजे - चोरलेले
कोठल्याही गोष्टीत प्र लावला कि भारदस्त वाटते
म्हणजे , प्रणाली , प्रक्षिप्त , प्रावधान , प्रतोद , प्रावधान , प्रणव ,प्रतिबंधित vagaire

सस्नेह's picture

5 Sep 2017 - 5:04 pm | सस्नेह

बाबौ !
काय ते शब्दप्रभुत्व ! __/\__