बरेच दिवसांपासुन ओरिगामीचा वापर करुन काहितरी क्रिएटिव करायचे मनात होते. यंदा हा योग आला . ओरिगामी मॉड्युलर क्युब वापरुन ही
गणेश सजावट केली आहे. सुमारे २७० क्राफ्ट पेपर वापरुन ४५ क्युब तयार करुन त्यांची मांडणी करुन ही सजावट केली आहे.
इतर साहित्य कार्डबोर्ड पेपर आणि चिकटपट्टी . हि सजावट दोन महिन्यांपासुन चालू होती. रोज १ ते २ क्युब करुन नंतर ही मांडणी केली.
सजावट करतानाचा प्रत्येक क्षण खुपच आनंददायी होता.
ओरिगामी मोड्युलर ठोकळा करणे अतिशय सोपे असुन एक ठोकळ्याला किंवा घनाला ६ चौरस आकाराचे कागद लागतात.
प्रतिक्रिया
25 Aug 2017 - 3:37 pm | यश राज
सुन्दर ...
25 Aug 2017 - 4:36 pm | संग्राम
छान !
25 Aug 2017 - 4:38 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद
25 Aug 2017 - 4:38 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद
25 Aug 2017 - 5:46 pm | अभ्या..
मस्त जमलेत कलर ठोकळे. पेशन्सचे काम आहे.
.
.
.
तेवढे ते ओरीगामीयुक्त असले शब्द नको हो, इलायचीयुक्त श्रीखंडाची आठवण येते.
26 Aug 2017 - 4:54 pm | उल्तानं
फोटू नी दिख रे
26 Aug 2017 - 5:16 pm | मदनबाण
कुछ भी दिखरेला नय रे भाव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राँझा राँझा करदी वे मैं आपे राँझा होई, राँझा राँझा सद्दो नी मेनू हीर नु आखो कोई... :- Raavan
26 Aug 2017 - 5:57 pm | पैसा
फटु दिसेनात
26 Aug 2017 - 6:04 pm | एस
छान झाली आहे सजावट. चिकाटी हवी इतके क्यूब बनवायचे म्हणजे. गणपतीचा फोटो चिकटवला आहे, मूर्ती नाहीये ही बाब विशेष उल्लेखनीय वाटली. खूप सुंदर. :-)
26 Aug 2017 - 7:45 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद सर्वाना
फोटो काही जणा ना
का दिसत नाहीत याची दखल घेऊन
फिक्स करण्या चा प्रयास
करीत आहे
26 Aug 2017 - 8:44 pm | प्रचेतस
गणेशा झालाय.
26 Aug 2017 - 8:52 pm | बाजीप्रभू
आवडली कला तुमची...
27 Aug 2017 - 11:00 am | अनन्न्या
खूप वेळ गेला असेल ना?
27 Aug 2017 - 2:28 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद अनन्या
एकन्दर वेळ 10 ते 12 तास लागला
परंतु रोज 15 मिनट असे 45 दिवस काम केल्यामुळे
फार किचकट वाटले नाहीं
27 Aug 2017 - 5:38 pm | इशा१२३
सुरेख!चिकाटीचे काम _/\_
27 Aug 2017 - 5:38 pm | इशा१२३
सुरेख!चिकाटीचे काम _/\_
28 Aug 2017 - 11:26 am | जागु
छान