मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा एक प्रयत्न - ओरिगामियुक्त गणपती सजावट

शान्तिप्रिय · · मिपा कलादालन
बरेच दिवसांपासुन ओरिगामीचा वापर करुन काहितरी क्रिएटिव करायचे मनात होते. यंदा हा योग आला . ओरिगामी मॉड्युलर क्युब वापरुन ही गणेश सजावट केली आहे. सुमारे २७० क्राफ्ट पेपर वापरुन ४५ क्युब तयार करुन त्यांची मांडणी करुन ही सजावट केली आहे. इतर साहित्य कार्डबोर्ड पेपर आणि चिकटपट्टी . हि सजावट दोन महिन्यांपासुन चालू होती. रोज १ ते २ क्युब करुन नंतर ही मांडणी केली. सजावट करतानाचा प्रत्येक क्षण खुपच आनंददायी होता. ओरिगामी मोड्युलर ठोकळा करणे अतिशय सोपे असुन एक ठोकळ्याला किंवा घनाला ६ चौरस आकाराचे कागद लागतात. one two thru

वाचने 2510 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अभ्या.. Fri, 08/25/2017 - 17:46
मस्त जमलेत कलर ठोकळे. पेशन्सचे काम आहे. . . . तेवढे ते ओरीगामीयुक्त असले शब्द नको हो, इलायचीयुक्त श्रीखंडाची आठवण येते.

एस Sat, 08/26/2017 - 18:04
छान झाली आहे सजावट. चिकाटी हवी इतके क्यूब बनवायचे म्हणजे. गणपतीचा फोटो चिकटवला आहे, मूर्ती नाहीये ही बाब विशेष उल्लेखनीय वाटली. खूप सुंदर. :-)