मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
4 Sep 2011 - 12:17 pm
गाभा: 


.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......

प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?

घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.

घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.

घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.

"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?

प्रतिक्रिया

लेख व सगळे प्रतिसाद वाचले. interesting तसंच अनाकलनिय वाटतंय हे सगळं.
कोणी 'ship of theseus' तसंच 'I Origins' हे movies पाहिलेत का? अवयवदान केल्यानंतर ज्याला ते अवयव मिळालेत त्याला गेलेल्या व्यक्तिचे काही आठवत असेल का? I Origins मधे दाखवलंय तसं डोळे transplant केल्यानंतर ते डोळे ज्या मुलीला मिळाले तिला ते डोळे जिचे होते, तिने जे पाहिलं होतं तेही आठवत असतं. तसंच जर brain transplant केलं तर ज्याला मेंदू सकट त्या माणसाच्या आठवणीही transplant होतात का?

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 5:11 pm | इरसाल कार्टं

लेख आणि प्रतिसाद वाचून काही कळेना झालंय. पण माझया आजी आणि आजोबा, या दोघांच्या मृत्यूच्या वेळी मी उपस्थित होतो. मला आहि जाणवले नाही.

तसच अत्रे यान्च्या बाबत हि कळाल. ते गेल्यानन्तर त्यान्च्या बन्ग्ल्यात ते नोकराला हाका मारत असत अस ऐकिवात आहे.

पुण्याच्या वाड्यात,'काका मला वाचवा ' असे ऐकू येते म्हणे असे लहानपणी ऐकले होते. आता मात्र या बाबतीत काही माहीत नाही.

Vasant Chavan's picture

11 Feb 2017 - 12:44 pm | Vasant Chavan

माझे वडील पण जाण्याअगोदर सतत माझे नाव घेउन विचारत होते कि ़किती वाजले.दिवसभर असेच बोलत होते आणि सन्ध्याकळि गेले.ते.पण मला अजुन कलले नाही कि ते असे वगत होते

या विषयावर संजय क्षीरसागर यांचे विचार ऐकायला आवडतील..

संजय क्षीरसागर's picture

11 Feb 2017 - 8:24 pm | संजय क्षीरसागर

मृत्यू हा फार सुरेख विषय आहे. सार्थक जगण्याचा तो क्लायमॅक्स पॉइंट आहे. झोपेवर प्रयोग करुन जाणीव नेणीवेत नेता आली (म्हणजे शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय), तर मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो. त्याला सजग मृत्यू म्हटलंय आणि मग मृत्यू एक अवर्णनीय आनंद सोहळा होतो.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥

या श्लोकाचा खरा अर्थ तो आहे. पण इथे अध्यात्मिक लेखन करणार नाही असं ठरवल्यामुळे यापेक्षा सविस्तर लिहीत नाही.

दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण
समास सहावा : भ्रमनिरूपण || १०.६ ||
॥श्रीराम॥ उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला
वेव्हार | परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१||
होतें वर्ततें आणी जातें | याचा समंध नाहीं तेथें |
आद्य मध्य अवसाने तें | संचलेंचि आहे ||२||
परब्रह्म असतचि असे | मध्येंचि हा भ्रम भासे |
भासे परंतु अवघा नासे | काळांतरी ||३||
उत्पत्तीस्थितीसंव्हारत | मधेंही अखंड होत
जात | पुढें सेवटीं कल्पांत | सकळांस आहे ||४||
यामधें ज्यास विवेक आहे | तो आधींच जाण-
ताहे | सारासार विचारें पाहे | म्हणोनियां ||५||
बहुत भ्रमिष्ट मिळाले | त्यांत उमजल्याचें
काय चाले | सृष्टीमधें उमजले | ऐसें थोडे ||६||
त्या उमजल्यांचे लक्षण | कांहीं करूं
निरूपण | भ्रमाहून विलक्षण | माहापुरुष ||७||
भ्रम हा नसेल जयासी | मनीं वोळखावे तयासी |
ऐक आतां भ्रमासीं | निरोपिजेल ||८||
येक परब्रह्म संचलें | कदापी नाहीं विकारले |
त्यावेगळें भासलें | तें भ्रमरूप ||९||
जयासी बोलिला कल्पांत | त्रिगुण आणी
पंचभूत | हें अवघेंचि समस्त | भ्रमरूप ||१०||
मी तूं हा भ्रम | उपासनाही भ्रम |
ईश्वरभाव हाही भ्रम | निश्चयेंसीं ||११||

३७] भ्रमेणाहं भ्रमेण त्वं | भ्रमेणोपासका जनाः |
भ्रमेणेश्वरभावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ||१||

याकारणें सृष्टि भासत | परंतु भ्रमचि हा समस्त |
यामध्यें जे विचारवंत | तेचि धन्य ||१२||
आतां भ्रमाचा विचारु | अत्यंतचि प्रांजळ
करूं | दृष्टांतद्वारे विवरूं | श्रोतयांसी ||१३||
भ्रमण करितां दुरीं देसीं | दिशाभूलि आपणासी |
कां वोळखी मोडे जीवलगांसी | या नांव भ्रम ||१४||
कां उन्मत्त द्रव्य सेविलें | तेणें अनेक भासों लागलें |
नाना वेथां कां झडपिलें | भूतें तो भ्रम ||१५||
दशावतारीं वाटती नारी | कां ते मांडली बाजीगरी |
उगाच संदेह अंतरीं | या नांव भ्रम ||१६||
ठेविला ठाव तो विसरला | कां मार्गीं जातां मार्ग
चुकला | पट्टणामधें भांबावला | या नांव भ्रम ||१७||
वस्तु आपणापासीं असतां | गेली म्हणोनि होये
दुचिता | आपलें आपण विसरतां | या नांव भ्रम ||१८||
कांही पदार्थ विसरोन गेला | कां जें सिकला तें विसरला |
स्वप्नदुःखें घाबिरा जाला | या नांव भ्रम ||१९||

दुश्चिन्हें अथवा अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे
मन | वचके पदार्थ देखोन | या नांव भ्रम ||२०||
वृक्ष काष्ठ देखिलें | मनांत वाटें भूत आलें |
कांहींच नस्तां हडबडिलें | या नांव भ्रम ||२१||

काच देखोन उदकांत पडे | कां सभा देखोन दर्पणीं
पवाडे | द्वार चुकोन भलतीकडें जाणें | या नांव भ्रम ||२२||
येक अस्तां येक वाटे | येक सांगतां येक निवटे |
येक दिसतां येक उठे | या नांव भ्रम ||२३||
आतां जें जें देइजेतें | तें तें पुढें पाविजेतें |
मेलें माणुस भोजना येतें | या नांव भ्रम ||२४||

ये जन्मींचें पुढिले जन्मीं | कांहीं येक पावेन मी |
प्रीती गुंतली मनुष्याचे नामीं | या नांव भ्रम ||२५||
मेलें मनुष्य स्वप्नीं आलें | तेणें कांहीं मागितलें |
मनीं अखंड बैसलें | या नांव भ्रम ||२६||

अवघें मिथ्या म्हणौन बोले | आणी सामर्थ्यावरी मन
चाले | ज्ञाते वैभवें दपटले | या नांव भ्रम ||२७||
कर्मठपणें ज्ञान विटे | कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे |
कोणीयेक सीमा फिटे | या नांव भ्रम ||२८||
देहाभिमान कर्माभिमान | जात्याभिमान कुळाभिमान |
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान | या नांव भ्रम ||२९||
कैसा न्याय तो न कळे | केला अन्याय तो नाडळे |
उगाच अभिमान खवळे | या नांव भ्रम ||३०||
मागील कांही आठवेना | पुढील विचार सुचेना |
अखंड आरूढ अनुमाना | या नांव भ्रम || ३१||
प्रचीतिविण औषध घेणे | प्रचित नस्तां पथ्य करणे |
प्रचीतिविण ज्ञान सांगणें | या नांव भ्रम ||३२||
फळश्रुतीवीण प्रयोग | ज्ञानेंवीण नुस्ता योग |
उगाच शरीरें भोगिजे भोग | या नांव भ्रम ||३३||
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं | आणी वाचून जाते सटी |
ऐशा प्रकारीच्या गोष्टी | या नांव भ्रम ||३४||
उदंड भ्रम विस्तारला | अज्ञानजनीं पैसावला |
अल्प संकेतें बोलिला | कळावयाकारणें ||३५||
भ्रमरूप विश्व स्वभावें | तेथें काय म्हणोन सांगावें |
निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें | भ्रमरूप ||३६||
ज्ञात्यास नाहीं संसार | ऐसें बोलती अपार |
गत ज्ञात्याचे चमत्कार | या नांव भ्रम ||३७||
येथें आशंका उठिली | ज्ञात्याची समाधी पूजिली |
तेथें कांहीं प्रचित आली | किंवा नाहीं ||३८||
तैसेचि अवतारी संपले | त्यांचेंही सामर्थ्य उदंड
चाले | तरी ते काये गुंतले | वासना धरूनी ||३९||
ऐसी आशंका उद्भवली | समर्थें पाहिजे निरसिली |
इतुकेन हे समाप्त जाली | कथा भ्रमाची ||४०||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भ्रमनिरुपणनाम समास सहावा ||१०.६||

नाडी ग्रंथ भविष्य विषयावर वरील ओवीतील वर्णन एकदम फिट्ट बसते... प्रत्यक्ष अनुभूती न घेता बुद्धिवादी कसे भ्रम निर्माण करतात. वर आम्हाला अनुभव घ्यायची गरज नाही असे म्हणणे योग्य आहे का यावर विचार व्हावा...

आणखी अनेक ओव्या दासबॊधामध्ये मिळतील ज्या या आणि अशा अनेक प्रश्नाचे समर्पक रित्या समाधान करू शकतील.

उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला वेव्हार |
परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१||

या प्रथम श्लोकाचा अर्थ सांगता येईल का ?

किंवा

मी तूं हा भ्रम | उपासनाही भ्रम |
ईश्वरभाव हाही भ्रम | निश्चयेंसीं ||११||

दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच ॥श्रीराम॥ अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ?

उत्पत्ती स्थिति संव्हार | याचा निरोपिला वेव्हार |
परमात्मा निर्गुण निराकार | जैसा तैसा ||१||

या आधीच्या म्हणजे पाचव्या समासामध्ये समर्थांनी उत्पत्ती स्थिति आणि संव्हार यावर निरूपण केले आहे. त्याचा संदर्भ पुढे घेत ही या सहाव्या समासाची सुरुवात आहे.

उत्पत्ती, स्थिति, संव्हार हे नियम सृष्टीला लागू होतात ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे.

दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच ॥श्रीराम॥ अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ?

- हे समजून घेण्यासाठी १० वा दशक पूर्ण समजून घ्यावा लागेल ते ही एखाद्या जाणकारांकडून.
तसेच समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे.

हा परमात्मा कोण ? त्याला मृत्यू नसेल तर त्याचा आपल्या मृत्यूशी संबंध काय ?

समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही,

ईश्वरभाव भ्रम असेल तर ईश्वराचा उपयोग काय ? स्वत : ला 'रामदास' म्हणणं हा ईश्वरभाव आहे की नाही ?

संजय क्षीरसागर's picture

12 Feb 2017 - 6:46 pm | संजय क्षीरसागर

उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?

संजय क्षीरसागर's picture

12 Feb 2017 - 7:06 pm | संजय क्षीरसागर

उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?

कळस's picture

14 Feb 2017 - 10:20 pm | कळस

संजयजी,
आपल्याला जीवनाचा (म्हणजेच मृत्युचाही) उलगडा झाला आहे तर त्याआधारे हे स्पष्ट करा की असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ? ह्याचा आपल्याला काही उलगडा झालाय का? प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नको.

धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2017 - 10:36 pm | संजय क्षीरसागर

असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ?

मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही.

मृत्यूसमयी बहुतेक जण एकतर भयभीत झालेले असतात किंवा त्यांची शुद्ध हरपलेली असते. सजग व्यक्तीला, आपल्याला जशी झोपेची चाहूल लागते तशी मृत्यूची चाहूल लागू शकते. (वर श्लोक उधृत केला आहे). अशी व्यक्ती कोणत्याही भ्रमात जात नाही त्यामुळे उपरोल्लेखित घटना त्या व्यक्तीच्याबाबतीत घडत नाहीत.

मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.

मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या (अभ्रक नाही हां...!) मेंदूवरच का पेस्ट होतील..? तुमच्या किंवा आमच्यासारख्या अतिसामान्य जनतेच्या मेंदूवर का पेस्ट होणार नाहीत..?

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 10:11 am | संजय क्षीरसागर

मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या मेंदूवरच का पेस्ट होतील..?

दुसर्‍याचे विचार मेंदूत शिरायला, व्यक्ती एकतर त्याप्रती रिसेप्टीव हवी (उदा. संमोहन किंवा माइंड रिडींग) किंवा बालकासारखी डॉरमंट हवी. सामन्यांच्या मेंदूत आधीच इतका ट्रॅफिक चालू असतो की अशा स्ट्रींग्ज शिरायला अवधी मिळत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती डिप्रेशनमधे गेली तर तिचा विचार करण्याच्या क्षमतेवरचा ताबा जातो (ज्याला मन कमकुवत होणं म्हणतात) आणि अशी व्यक्ती सुद्धा अस्तित्वात इतस्तः भटकणार्‍या विचारांची शिकार होऊ शकते, ज्याला भूतबाधा वगैरे म्हणतात.

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 10:23 am | संदीप डांगे

एक चमत्कारिक 'फर्स्ट हॅन्ड' अनुभव देतो.

विपश्यनेला गेलो होतो, तेव्हा अगदी पहिल्या क्षणापासून आपल्यासोबतची इतर शिबिरार्थी कोण, काय करतात, कामधंदा, शि़क्षण, नावगाव काहीही माहित नसते. ते थेट दहाव्या दिवशी बोलायची परवानगी मिळाल्यावरच. मी कटाक्षाने सर्वत्र मौन पाळले. तेव्हा चौथ्या-पाचव्या दिवशी, जेव्हा मन निर्विचार होऊ लागतं, तेव्हा अगदी एका सेकंदासाठी माझ्या मनात एक हिशोबाचा विचार चमकून गेला, एका औषध कंपनीच्या प्रतिनिधीला काहीतरी ऑर्डर द्यायची आहे, व त्याचे मागचे बील बघायचे आहे, असा एक अंधुक-पुसट पण ठाशीव विचार येऊन गेला. जणू मी कोणी मेडिकल/औषधांच्या क्षेत्रातला माणूस आहे. आश्चर्याचा धक्का मला दहाव्या दिवशी बसला जेव्हा कळले की माझ्या अगदी बाजूलाच नियमित बसणारा व्यक्ति हा मेडिकलच्या दुकानाचा मालक आहे व त्याची बायको त्याच्या अनुपस्थितीत दहा दिवस ते दुकान सांभाळत आहे आणि त्याला हे दहाही दिवस दुकान नीट चालू असेल काय ह्याची चिंता लागून होती. हे कसे घडले ह्याबद्दल मला आजही संभ्रम आहे. दहाव्या दिवशीच कळले की तो व्यक्ती बोलणे, व्यक्त होणे ह्याबाबतीत खूप अग्रेसिव, लाउड आहे. पण दहाव्या दिवसापर्यंत त्याचे तोंडून एक शब्दही मी कधी ऐकला नाही, तोही सर्वत्र मौनातच होता. कदाचित ते त्याचे विचार असे बाहेर येऊन माझ्या डोक्यापर्यंत पोचले की काय....? म्हणजे विचारांचे तरंग असतात असे जे म्हणतात ते खरे मानायचे? ;-)

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 3:30 pm | मराठी कथालेखक

तुम्ही तुमचा अनुभव एखाद्या या विषयातील संशोधन संस्थेस कळवा.
मग अशी संस्था इतर कुणाला असा काही अनुभव आला का याचा अभ्यास करु शकेल.
बाकी विपश्यनेबद्दल मलाही बरच कुतुहल आहे.

चौथ्या-पाचव्या दिवशी, जेव्हा मन निर्विचार होऊ लागतं

ह्याबद्दल अधिक सांगाल काय ?

सतिश गावडे's picture

21 Feb 2017 - 9:11 pm | सतिश गावडे

>> काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.

हे संशोधन कुणी केले? याबद्दल अधिक कुठे वाचता येईल?

गामा पैलवान's picture

15 Feb 2017 - 1:04 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही.

वास्तविक म्हणजे काय? भास म्हणजे काय? जर सर्व जगत भ्रम आहे तर वास्तविक आणि भास या दोहोंत फरक काय?

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 10:35 am | संजय क्षीरसागर

दहनानंतर सर्व देह राख होऊन मातीत मिसळतो, पाणी बाष्पीभूत होऊन पाण्यात, हवा हवेत, उष्णता वातावरणात आणि चेतना चेतनेत मिसळते. त्यामुळे देह पंचमहाभूतात विलीन होतो असं म्हणतात. वर म्हटल्याप्रमाणे मेंदू संपूर्णपणे फॉरमॅट होतो. थोडक्यात, एक जीवनपट पूर्णपणे संपतो. इट इज अ कंप्लीट कट ऑफ त्यामुळे एका जीवनाची दुसर्‍यात कंटीन्यूटी होत नाही. म्हणून वास्तविकात पुनर्जन्म असं काही नाही.

सतिश गावडे's picture

21 Feb 2017 - 9:19 pm | सतिश गावडे

असं कसं? तुम्हीच वर म्हटलं आहे:

काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.

खरं तर हे विधान मला प्रचंड विनोदी वाटत आहे. हे जर संजय उवाच असेल तर दिव्याखाली अंधारच म्हणायचा.

जर याला काही शास्त्रीय आधार असेल तर वाचायला आवडेल.

गणामास्तर's picture

15 Feb 2017 - 10:51 am | गणामास्तर

आयडींचा पुनर्जन्म होतो हे नक्की परंतु माणसांचा होतो कि नाही ते प्रा.अद्वयानंद गळतगे व्यवस्थित सांगू शकतील असे वाटते.

रागिणी९१२'s picture

15 Feb 2017 - 3:45 pm | रागिणी९१२

माझी आजी माझ्या आत्याकडे गेली होती. दोन दिवसातच ती आत्याला म्हणाली कि मला घरी जायचं आहे. खूपच मागे लागली. आणि येता येता आत्याला म्हणाली कि परत येईन असं वाटत नाही.
घरी आल्यावर माझ्या बाबांच्या नुसतं मागे लागली कि कचेरीत घेऊन चल. कागदांवर सह्या करायच्या आहेत. कोणाला काय द्यायचं हे पण सांगून ठेवलं. नंतर सगळं झाल्यावर ४-५ दिवसांनी ती मागच्या दारी पाय घसरून पडली. डोक्याला खूप लागलं. आणि ती कोमात गेली. जवळजवळ १ महिना ती कोमात होती, त्यानंतर ती गेली.
८२ वर्षाची होती पण चांगली धडधाकट होती, इकडून तिकडून तुरुतुरु चालायची. काम करायची हौस भारी होती तिची. कुठलाही आजारपण नव्हतं तरी तिला असं का वाटलं ?
हा निव्वळ योगायोग होता कि विधिलिखित?

गामा पैलवान's picture

15 Feb 2017 - 7:19 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

एका जीवनाची दुसर्‍यात कंटीन्यूटी होत नाही. म्हणून वास्तविकात पुनर्जन्म असं काही नाही.

पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात. ही स्वैर घटना ( = रँडम इव्हेण्ट) मानावी का?

आ.न.
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 11:58 pm | संजय क्षीरसागर

पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात

म्हणजे नक्की काय ?

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 6:49 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

स्मृतीरोपण म्हणजे काय ते इथे तुम्ही सांगितलं आहे :

काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या

हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे, असा माझा प्रश्न होता.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 9:33 pm | संजय क्षीरसागर

हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे,

अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्‍या रहस्यांपैकी ते एक आहे.

अरुण मनोहर's picture

16 Feb 2017 - 5:53 am | अरुण मनोहर

मिपावर लिहिलेल्या ह्या कथेत आहेत.

WaitingRoom

धन्यवाद संजयजी. या विषयाच्या संदर्भाने एक जाणून घ्यायला आवडेल की जी व्यक्ती मृत्युसमयी सजग असेल ,तिच्याबाबतीत काय संभावना आहेत ? तिच्याकडे अस्तित्वात विलीन होऊन जाण्या व्यतिरीक्त ईतर काही पर्याय उपलब्ध असतील का ?

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 10:47 pm | संजय क्षीरसागर

झोप म्हणजे रोज होणारा मृत्यू आहे आणि मृत्यू ही शेवटची झोप आहे. मेंदू हा बायोकंप्युटर आहे त्यात प्रत्येक बायो-सेल रेकॉर्डींगला टेल आणि हेड अ‍ॅड्रेसेस आहेत. त्यामुळे झोपेतला शेवटचा विचार हा सकाळी उठल्यावर पहिला विचार असतो.

इन द सेम वे, मरतांना जाणीवेनं धरलेला शेवटचा विचार (ब्रेन संपूर्ण फॉरमॅट झाला तरी) स्टीम्युलस बनून पुढच्या देह निर्मितीला कारणीभूत होतो. वास्तविकात मरतांना प्रत्येकाची अजून जगावं (जीवेष्णा) अशीच इच्छा असते, हीच इच्छा कामेच्छेत रुपांतरीत होऊन पुढच्या देह निर्मितीला सहाय्य करते.

सजगपणे जगणार्‍यानं जीवनाचा फुल स्पेक्ट्रम उपभोगलेला असतो. त्याला मरण शांत झोपेप्रमाणे येतं. आता जीवेष्णा धरायची की सोडायची ही त्याची मर्जी असते. म्हणून सजग व्यक्तीला जन्म-मरणाचा फेरा सुटतो असं म्हटलंय.

वर म्हटल्याप्रमाणे, वास्तविकात, पुनर्जन्म वगैरे काही भानगड नाही पण माणसाची जीवेष्णा इतकी अपरंपार आहे की राहीलेले उपभोग आणि फँटास्टिक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पुन्हा एक चान्स मिळावा असं त्याला मृत्यूसमयी वाटतं. या सगळ्या गदारोळातून माणसाला दिलासा मिळावा म्हणून पुनर्जन्माची कल्पना निघाली आहे.

आता यापलिकडे मी या विषयावर लिहू इच्छित नाही तरी जेवढं लिहीलं तेवढं गोड मानून घ्यावं.

सतिश गावडे's picture

21 Feb 2017 - 9:37 pm | सतिश गावडे

तुमच्या जिवेषणा वाल्या परिच्छेदावरून मला एका ऋषींची गोष्ट आठवली. मृत्यूसमयी त्यांचा जीव त्यांनी बाळगलेल्या एका हरणाच्या पाडसात अडकतो. त्याच्या या जीवेष्णेमुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो.

पुढचा जन्म म्हणजे पुनर्जन्म झाला ;)

कपिलमुनी's picture

22 Feb 2017 - 12:27 pm | कपिलमुनी

त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो.

पुढच्या जन्माच्या बुकींगसाठी जीव कुठे अडकवायचा ? गहन प्रश्नात कंफुज झालोय :)

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 1:25 pm | संदीप डांगे

कुठेच अडकवू नका देवा... उगा आपलं कायतरी व्हायचं आणि होत्याचं नव्हतं व्हायचं... =))

एक किस्सा...

एका गावात एक साधू माणूस होता.. प्रचंड जपजाप, पूजासाधना करायचा. पाहावे तेव्हा त्याची साधना चालू असायची... त्या गावात एक वेश्या होती. ती याच्या घरासमोरुन जातांना, ह्याला ध्यान करतांना बघून म्हणायची.. "गुरुजी.. आखीरकी की संभालना". कधीही येता-जाता. "गुरुजी.. आखीरकी की संभालना" बस्स! एवढंच. आखीरकी काय, कशाबद्द्ल, काय संभालना.. काय नाही.. हा सज्जन, चरफडायचा, पण ती वेश्या तिच्या काय तोंडी लागायचे म्हणून गप्प बसायचा... सगळ्या गावात चर्चा असायची. काय बुवा ही बया ह्या सज्जन माणसाला का अशी चिडवते ते...

अशी अनेक वर्षे गेली... बुवा म्हातारा झाला... खाटेला लागला. शेवटच्या घटका समीप आल्या... तरी वेश्या.. आखीरकी संभालना काही सोडलं नव्हतं तीने...

अशाच एका समयी म्हातारा सज्जन गचकला...

काही दिवसांनी चांभाराच्या घरी पुत्ररत्न झाले... पण ते लेकाचे जन्मल्यापासून जे बेंबाटायचे सुरु झाले ते काही थांबतच नव्हते... वैद्य झाले, मांत्रिक् झाले, झाडपाला, आजीबाईचा तजुर्बा, सगळं पिसून झालं... पोराला काय गुण येईना.. बाहेरची बाधा म्हणून गंडेदोरे बांधले, बोकडं कापून वाहिले पण आराम काय पडंना... सगळं गाव कावलं.. लेकराला नेमकं काय झालं... रडायचं थांबंच ना...

ही चर्चा वेश्येच्या कानी पडली.. म्हणे मी बघते... लोक बोल्ले, बघूद्या बोवा... हीला पण काय समजत असेल.. कोणाच्या का कारणे उपाय मिळू दे... पोर शांत होऊ दे...

वेश्या आली... पोराच्या जवळ बसली... हळूच कान पकडला आणि पिरगाळला... कानात खुसफुसली..."बोला था ना, आखीरकी संभालना.. सारा जनम संभालते रहे लेकिन आखीरी वक्त जब जान जाने लगी तो दरवाजे में रखी चमडे की चप्पलमें ध्यान अटका ना...? के इसको कोई ले जायेगा,, इसका क्या होगा, कोई चुरायेगा क्या...! अब, भुगतो चमडे में मन अटका.. चमडेमें जान अटकी... चमडे के साथ अब वापस जिंदगी अटकी... जनम-मरण के फेरेसे छुटने वाले थे... वापस अटक गये... अब रोकर क्या फायदा... इस बार जरुर याद रखना.. अब की बार तो आखीरकी संभालना..."

ते तान्हुलं नंतर कधीच रडलं नाही....

सतिश गावडे's picture

22 Feb 2017 - 1:42 pm | सतिश गावडे

जीवेष्णा फार वाईट हो.

सतिश गावडे's picture

22 Feb 2017 - 1:55 pm | सतिश गावडे

अडकून पडूच नका. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कसे सुटता येईल हा विचार करा.

एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी एका नगरामध्ये एक ब्राम्हण राहत होता. त्याला काही संतान नव्हते. नवस सायास उपास तापास असे सारे काही तो ब्राम्हण आणि त्याची पत्नी करत होते. अशाच एका नवसाला देव पावला आणि त्यांना मुलगा झाला. नारायणाच्या कृपेने झाला म्हणून त्या मुलाचे नाव नारायण ठेवले.

महत्प्रयासाने झालेल्या या मुलाचा बापाला लळा लागला. बसता उठता "नारायण" असे मुलाचे नाव तो ब्राम्हण घेऊ लागला.

वर्षे गेली. ब्राम्हणाच्या मुखीचा मुलाच्या नावाचा नारायण हा जप काही कमी झाला नाही. अखेर ब्राह्मणाची मृत्यू घटका आली. अगदी शेवटच्या क्षणीही ब्राम्हणाने "नारायण" असे म्हणून प्राण सोडला. झाले, ही खबर वैकुंठाला गेली आणि भगवंतांनी गरुडाला या ब्राह्मणाच्या लिंगदेहास वैकुंठी आणावयास पाठवले.

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 10:37 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्‍या रहस्यांपैकी ते एक आहे.

कर्मसिद्धांत नेमकं हेच रहस्य नियमांत बसवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 3:46 pm | संजय क्षीरसागर

कर्मसिद्धांतावर बोलायला लागलो तर ते एक नवीन प्रकरण होईल! सो आय स्टॉप.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2017 - 5:12 pm | प्रकाश घाटपांडे

तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता.

शब्द आवडला आहे या अवयवदानाच्य विडिओला लागू होईल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2017 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो. एक तर मेंदुला हो
णारा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे असं अर्धवट बोलणं होतं असं समजू पण मृत्यु झालेल्या व्यक्तीचा वावर, त्यांच्या काही खाणाखुणा, असं काही पुढे दिसत नाही. म्हणजे, हे सर्व मनाचे खेळ म्हणावे लागतील.

पण, मला या सृष्टीत काही अद्भूत असावं असं सारखं वाटत असतं.

-दिलीप बिरुटे
(भित्रा )

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 2:07 pm | संदीप डांगे

होतं हो हे कधी कधी... प्रत्येक मरणार्‍याबद्दल होत नाही. त्यामुळे शास्त्रिय दृष्ट्या सिद्ध करणं शक्य नाही.

माझ्या पत्नीचे आजोबा (आईचे वडील), अतिशय सज्जन माणूस, एमटीएनएल मध्ये नोकरीला होते. भिक्षुकीही करायचे पण कुणाकडून पैसे घेत नसत. सर्व भावभावंडांना लागेल तशी मदत निर्विकार भावाने करायचे. देवपूजा, मंत्रसाधना सगळं उच्चदर्जाचं, ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजासाधना करायचे. त्यांना सकाळी चहा-पाव खायला आवडायचा, सकाळचे सर्व सोपस्कार झाले की ७ वाजता ते चहा-पाव खायचे. आजवर मी कोणाकडूनही त्यांच्याबद्दल वाकडा शब्द ऐकला नाही. वयाच्या ८२ वर्षीपर्यंत अगदी ठणठणीत होते, कधीही हॉस्पिटल पाहिले नाही. पण अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेल्यावर दुसर्‍या दिवशी गेले.

त्यानंतर सलग १३ दिवस एक कावळा किचनच्या खिडकीत सकाळी सात वाजता यायचा. पहिल्या दिवशी ह्या लोकांना काही कळले नाही. पण त्या कावळ्याची धिटाई चमत्कारिक होती, उडवूनही तो गेला नाही. मग त्याला पावाचा तुकडा दिला तर पुढे येऊन त्याने तो चहात बुडवून खाल्ला... मग तेराव्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम रोज सकाळी सुरु होता. चौदाव्या दिवसानंतर तो कावळा कधीच दिसला नाही. ह्याची साक्षीदार आजी, माझी पत्नी व तीची एक मावशी अशा तिघी होत्या. ही २००७ ची घटना आहे. त्याआधी तो कावळा कधीच आला नाही, नंतरही नाही. आता ह्यात बुद्धीप्रामाण्यवादी ना ना प्रकारचे किंतुपरंतु काढू शकतात. माझी पत्नीही काही दैववादी, अंधश्रद्धाळू नाही पण हा प्रकार तिच्यासाठीही चकरावणारा होता. अशा अनुभवांचे डॉक्युमेन्टेशन व कार्यकारणभाव शास्त्रिय कसोटीवर सिद्ध होणे कठिण असते.

ह्याचबरोबर हेही आहेच की काही लोक भावभावनांच्या आहारी जाऊन, किंवा दिखाव्यासाठी म्हणून, किंवा स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी म्हणून अशा चमत्कारिक अनुभवांच्या काहीही टेपा लावतात. ती लोकं साधारण ओळखू येतात त्यांनी मारलेल्या थापांवरुन किंवा त्यांच्या नेहमीच्या स्वभावावरुन...

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.

मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो.

ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते.

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.

मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो.

ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्‍या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते.

=))

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 1:15 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

कर्मसिद्धांतावर बोलायला लागलो तर ते एक नवीन प्रकरण होईल! सो आय स्टॉप.

होऊ द्या खर्च. कर्मसिद्धांतावर तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 5:54 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे त्यामुळे कर्मसिद्धांताबद्दल लिहून पुन्हा वाद ओढवून घ्यायची इच्छा नाही.

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 7:06 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

कर्मसिद्धांताचं विवेचन अध्यात्मिक चौकटीच्या बाहेर राहूनही करता येणं शक्य असावं. किंबहुना तुम्हाला जमायला हरकत नाही, असा आपला माझा अंदाज. घेताय मनावर?

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 8:21 pm | संजय क्षीरसागर

सगळं जीवन हे क्षणोक्षणी कृत्यच आहे ! कृत्याची मजा यायला कर्मसिद्धांत कळून काहीही उपयोग नाही कारण तो, क्षणोक्षणी बदलणार्‍या अस्तित्वाच्या अब्जावधी पॅरामिटर्सचा वेध घेण्याची मूढता आहे. अ‍ॅनॅलिसिस पूर्ण होण्यापूर्वीच सर्व पॅरामिटर्स एखाद्या कॅलीडोस्कोपप्रमाणे बदलेले असतात. तस्मात, कृत्यामागचं कार्यकारण शोधायचा प्रयत्न पूर्णतः व्यर्थ आहे.

सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!

संजयजी,
कर्मसिद्धांताचं सखोल विवेचन वाचायला खरचं आवडलं असतं . असो .अध्यात्म्यावर न लिहीण्याच्या आपल्या निर्णयाचा आदरच आहे. अध्यात्माच्या चौकटीबाहेर राहून जमेल तितके विवेचन केले त्यासाठी धन्यवाद.
"अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 8:33 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..

आता इथेच पाहा :

मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो.
अशा माझ्या सर्वोपयोगी प्रतिसादाला ..... तुमचा हा उपप्रतिसाद !

प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नको

कळस's picture

20 Feb 2017 - 9:08 pm | कळस

तो प्रतिसाद त्या मुददयापुरता होता. कारण मला त्या ठीकाणी अध्यात्माव्यतिरीक्त चा पैलू जाणून घ्यायचा होता.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 9:22 pm | संजय क्षीरसागर

हे दाखवून द्यायचं होतं ! आणि अध्यात्माशिवाय जीवनाला सार्थकता नाही. पण द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.

संदीप डांगे's picture

21 Feb 2017 - 1:01 am | संदीप डांगे

द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.

>>

द्रूष्य और अद्रूष्य सभी के
जिवका मंगल होए रे !!

जल के थल के और गगनके !
प्राणी सुखिया होए रे !!

दश दिशाओ के सभी प्राणी !
मंगला लाभी होए रे !!

निरभय हो निरवय बने !
सभी निरामय होए रे !!

सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे !
तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !!

फिर से जाने धरम जगत में !
फिर से होवे जन कल्याण !!

जागे जागे धरम जगत में !
होवे होवे जन कल्याण !!

राग द्वेष और मोह दूर हो !
जागे शील, समाधी ज्ञान !!

जन जन के दुःख मिट जावे !
फिर से जाग उठे मुस्कान !!

सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे !
तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !!

जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे !!!

भवतु सब्ब मंगलम् , भवतु सब्ब मंगलम् ,भवतु सब्ब मंगलम्

सबका मंगल हो , सबका भला हो , सबका कल्याण हो

शुभम् भवतु शुभम् भवतु शुभम् भवतु

lakhu risbud's picture

22 Feb 2017 - 5:15 pm | lakhu risbud

बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा"
क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा
'मला जे समजलयं ते सत्यच आहे.'

असा अविर्भाव कायमच असतो.

अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते.
तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते.
कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल "
शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !

lakhu risbud's picture

22 Feb 2017 - 5:15 pm | lakhu risbud

बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा"
क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा
'मला जे समजलयं ते सत्यच आहे.'

असा अविर्भाव कायमच असतो.

अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते.
तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते.
कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल "
शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !

संजय क्षीरसागर,

सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!

तुम्ही स्वत:ला काय समजता? जीवनकृत्याची मजा घेणारा समजता? की कर्मफळ न चिकटणारा असा (जो कार्यकारणाच्या बाहेर आहे) तो समजता? उत्तर द्यायचं नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

21 Feb 2017 - 12:05 am | संजय क्षीरसागर

फक्त एक निर्वैयक्तिक उपस्थिती आहे. त्यामुळे मला जीवनाची मजा तर येतेच पण कर्मलेपन होत नाही . ते काहीसं आकाशासारखं आहे , प्रेझेंट बट अनाफेक्टेड बाय इवेंटस

गामा पैलवान's picture

21 Feb 2017 - 2:52 am | गामा पैलवान

जर कर्मलेपन होत नाहीये, तर मग या व्यासपीठावर बेधडकपणे मतं मांडायला कसली अडचण आहे?

-गा.पै.

तो दोघातला आत्मिक संवाद आहे. समजलेला बोलायला राजी आणि शोधणारा ऐकायला राजी असेल तर संवाद होऊ शकतो. माझ्याविरोधात आयडी तयार करण्यात आले, ज्यांना अध्यात्माचा गंधही नाही त्यांनी विडंबनं पाडली, बाकी सभासदांनी त्यावर टाळ्या पिटल्या आणि सगळं संकेतस्थळाच्या धोरणात बसत असावं म्हणून एकाही तक्रारीची दखल घेतली गेली नाही.

एकसोएक लेख लिहूनही प्रत्येक लेखाकडे केवळ धुराळा उडवण्याची संधी म्हणून पाहिलं गेलं. गाढवांच्या चित्रांनी संकेतस्थळाची शोभा वाढवण्यात, त्यावर खिदळण्यात आणि फालतूची विडंबनं पाडण्यात पब्लिकला धन्यता वाटली.

काल कालासारख्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या परिमाणावरचा लेख.

महाराज निसर्गदत्त महाराज या अवलीया वरचा लेख.

बुद्ध बुद्धाची एन्लायटन्मेट आणि त्याच्या शून्य या जगाला दिलेल्या अद्वितीय योगदानावरचा लेख.

गोल्डफिश आणि गेस्टाल्ट गुर्जीएफ या भन्नाट सिद्धाच्या गेस्टाल्ट या प्रक्रियेवरचा लेख.

रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा मन या अध्यात्मातल्या केंद्रिय विषयावर एक अनमोल लेखमाला लिहीण्याचे माझे प्रयत्न !

इथे लिहून मला एकच कळलं की धिस इज नॉट अ फोरम फॉर स्पिरिच्युअ‍ॅलिटी. पब्लिकला टाइमपास हवा आहे, जाणीवेचा रोख स्वतःप्रत आणण्याची कुणाचीही इच्छा नाही. मग मला अभिव्यक्तीचा दुसरा मार्ग शोधावा लागला. माझ्या अध्यात्मिक लेखनाचे जगभर पसरलेले असंख्य चाहते आहेत त्यांच्या आग्रहाखातर माझं समाधी हे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. नाऊ इट इज इनफ फॉर हिअर. अर्थात, आता टाइमपासचे धागे मीही काढतो आणि संकेतस्थळाच्या प्रकृतीला ते मस्त स्यूट होतात. सो एंजॉय !

गामा पैलवान's picture

22 Feb 2017 - 1:14 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमच्या लेखांच्या दुव्यांबद्दल धन्यवाद! :-) वाचतो आहे.

पब्लिकला जरी टाइमपास हवा असला तरी मला नकोय. त्यामुळे लिहिलंत तर तुम्हाला किमान एक गंभीर श्रोता तरी निश्चित मिळेल. अखेरीस अर्थातच तुमची इच्छा बलीयसी.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

21 Feb 2017 - 9:30 pm | सतिश गावडे

या धाग्यावरील संजय उवाच तुफान विनोदी आहेत. पुनर्जन्म संकल्पनेला नेटाने विरोध करताना स्वतः: तीच संकल्पना स्मृती, जीवेष्णा वगैरे शब्द वापरून वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत.

अनुभव १ ---

आमच्याकडे आतापर्यंत तीन पाळीव कुत्रे झाले . सुरुवातीला एक आशेशियन ( नाव ली ) , दुसरा डॉबरमन ( नाव शेरू ) आणि तिसरा आणि कदाचित शेवटचा बॉक्सर ( नाव राणा ) . तिन्ही कुत्रे छानपैकी जगले . बारा तेरा वर्षे प्रत्येकी .. राणा , डिसेंबर २०१७ ला गेला . मला खरे सांगायचे तेर कुत्रा हा प्रकार घरात बिलकुल आवडत नाही ..तरी माझा भाऊ तो आवड म्हणून घरात आणतो . त्याचे आणि माझे बरेच वाद होते या विषयावरून . माझे मत हेच कि कुत्रा जर आणायचा तर त्याची जबाबदारी त्याला आणणार्याने घेतलीच पाहिजे . भाऊ याला अपवाद होता . मी लग्नानंतर सायनला गेल्याने माझा राणाशी तास परिचय नव्हता . पण आईने एकदा फोन करून मला कळवले कि घरात शेरू गेल्यानंतर परत याने कुत्रा आणलाय . दिसायला एकदम विचित्र आहे आणि सारखं ओरडत असत . तूच त्याला समजावं बाबा .. मी येऊन सांगितलं पण त्याने ते काही ऐकलं नाही .. हळूहळू मीही त्या राणाला परिचयाचा झालो .. तो पन साला चलाख होता . तो माझा भाऊ कामावरून आला कि गप्प बसायचा , पण मी वरळीला आलो कि भुंकून भुंकून नुसता हैराण करायचा . त्याला बाहेर घेऊन जायचो तेव्हा तो कुठे शांत व्हायचा . असे त्याचे नि माझे नटे हळूहळू दृढ होत गेले . तो जाण्याआधी , फार आजारी होता . मी गुजरातला कामासाठी होतो काही दिवस . तो रात्र रात्र विव्हळायचा . सर्व जण बघून गेले तरीही तो प्राण सोडत नव्हता .. त्याची ती दशा बघून आईला आणि बाबाना खूप खूप त्रास होत होता . मला यायला किमान अजून दोन दिवस तरी लागणार होते. आईने मग ना राहवत , मला फोन केला आणि सांगितले कि बाबा खरंच याची अवस्था बघवत नाही आहे . मला तरी वाटत , कि तो तुझ्यासाठी थांबला आहे , शक्य झाल्यास तडक तिथून निघून ये . तो निपचित पडून असतो , नि खूप विव्हळत असतो . त्याच्या त्या दयनीय विव्हळण्याने , समोरच्या लोकांनी आपली तक्रार सुद्धा केली आहे . तर बघ , कास काय जमतंय ते . मी कसाबसा तिथून दीडेक दिवस आधीच निघालो आणि सरळ वरळीला गेलो .. बाहेर येताक्षणी , तो हलला आणि त्याच्या अंगात त्राण नव्हते तर त्याचा शेपटाकडचा भाग मायेने माझ्या येण्याची पोचपावती देत होता . आईने डोळ्यात अश्रू काढले आणि बाबाना म्हणाली बघा , हा सिद्धीसाठी थांबला होता एव्हढे दिवस . लगेच मी आत पाऊल टाकताक्षणी त्याने हळूच मान वर काढत माझ्याकडे नीट निरखून बघितले . मी म्हणालो " राणा , आज बाहेर जायचे नाही का .. त्याने विव्हळत काहीतरी सांगायचा प्रयत्न केला . आईने आईस्क्रीम पुढे केला नि म्हणाली दे त्याला चार पाच दिवस पोटात अन्नाचा कां नाही आहे . आश्चर्य म्हणजे त्याने थोडासा आइस्क्रीमही खाल्ला . मी तेथे थांबलो होतो पण नंतर रात्री साडेबाराला निघालो घरी जाण्यासाठी . घरी गेलो आणि झोपणार इतक्यात भावाचा फोन आला दीडच्या सुमारास " आपला राणा गेला "

अनुभव २ ---

माझी आई शनिवारी गेली , ६ जानेवारी २०१८ . तिचा देह आम्ही तिथेच शवागारात ठेवला होता आणि रविवारी सकाळी नेण्यासाठी आलो . आईला आणल्यावर तिला स्मशानात नेण्यापूर्वी विधी चालू होते . तेव्हा एक घटना घडली . मला तिचे हातपाय धुण्यासाठी सर्वानी पकडून आणले तेव्हा एक घटना घडली .. आईचे पायातले जोडावे अचानक बाहेर येऊन पडले . मामी पुढे अली होती ते घालायला पण मी लगेच उचलून ते पुन्हा पायात घातले . मला त्याचा अर्थ कळला नाही पण काहीतरी अनपेक्षित असे घडले होते ...

अनुभव ३ ---

आईच्या अग्निनंतर, घरात एका ताटाखाली पीठ पसरवून ठेवण्याची आमच्याकडे पध्द्त आहे . ते झाकून ठेवायचे रात्रभर आणि दिवा लावून ठेवायचा . सकाळी उठल्यावर आम्ही ते उघडून पहिले . काहीच कळले नाही . भावाने त्याचे फोटो काढले आणि मग सर्व समोर आले . त्याने तो फोटो , फोन उलटसुलट फिरवून नक्की काय आकृती आलीय ते बघण्याचा प्रयत्न केला आणि आनंदाने किंचाळला . त्या पिठावर चक्क समाधीच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या .. आजही त्याच्याकडे ते फोटो आहेत .
यामागे तर्कशात्र काय आहे ते जाणून घेण्याचा ब्राह्मणाकडून प्रयत्न केला . कुणी सांगितले कि ती पुन्हा मनुष्य योनीत गेली आहे कुणी सांगितले कि तिचे तुमच्या घरात सदैव वास्तव्य राहील कुणी सांगितले कि ती लक्ष्मी होती म्हणून .. मला मात्र एक पटले कि माझी आई , गेल्यावरही आमच्याबरोबर आहे आणि तिला शिवलोक प्राप्त व्हावा यासाठी मी महादेवाकडे प्रार्थना करत आहे ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जॉनविक्क's picture

3 Aug 2019 - 8:26 pm | जॉनविक्क

समाधीच्या पाऊलखुणा

म्हणजे काय ?

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2019 - 6:52 pm | प्रकाश घाटपांडे

माझी आई रात्री झोपेत गेली .तशी ती आजारी नव्हती .त्या दिवशी मी उठल्यावर फिरायला गेलो तेव्हा माझ्या मनात एक अदृश्य सावट फिरताना जाणवत होत .ते आई बाबत होत. घरी आल्यावर पाहिलं तर आई उठत नव्हती. डॉक्टर आल्यावर त्यांनी ती गेल्याचे सांगितले.मला विलक्षण आश्चर्य वाटल. योगायोग असू शकतो.