✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 09/04/2011 - 12:17  ·  लेख
लेख
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
164006 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

कर्मसिद्धांताचं विवेचन

कळस
Mon, 02/20/2017 - 20:03 नवीन
संजयजी, कर्मसिद्धांताचं सखोल विवेचन वाचायला खरचं आवडलं असतं . असो .अध्यात्म्यावर न लिहीण्याच्या आपल्या निर्णयाचा आदरच आहे. अध्यात्माच्या चौकटीबाहेर राहून जमेल तितके विवेचन केले त्यासाठी धन्यवाद. "अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..
  • Log in or register to post comments

कळसजी,

संजय क्षीरसागर
Mon, 02/20/2017 - 20:33 नवीन
अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती .. आता इथेच पाहा : मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो. अशा माझ्या सर्वोपयोगी प्रतिसादाला ..... तुमचा हा उपप्रतिसाद ! प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस

तो प्रतिसाद

कळस
Mon, 02/20/2017 - 21:08 नवीन
तो प्रतिसाद त्या मुददयापुरता होता. कारण मला त्या ठीकाणी अध्यात्माव्यतिरीक्त चा पैलू जाणून घ्यायचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण एकूण अध्यात्माविषयी अनास्था आहे

संजय क्षीरसागर
Mon, 02/20/2017 - 21:22 नवीन
हे दाखवून द्यायचं होतं ! आणि अध्यात्माशिवाय जीवनाला सार्थकता नाही. पण द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस

द फोरम हॅज लॉस्ट द

संदीप डांगे
Tue, 02/21/2017 - 01:01 नवीन
द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.
>> द्रूष्य और अद्रूष्य सभी के जिवका मंगल होए रे !! जल के थल के और गगनके ! प्राणी सुखिया होए रे !! दश दिशाओ के सभी प्राणी ! मंगला लाभी होए रे !! निरभय हो निरवय बने ! सभी निरामय होए रे !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! फिर से जाने धरम जगत में ! फिर से होवे जन कल्याण !! जागे जागे धरम जगत में ! होवे होवे जन कल्याण !! राग द्वेष और मोह दूर हो ! जागे शील, समाधी ज्ञान !! जन जन के दुःख मिट जावे ! फिर से जाग उठे मुस्कान !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे !!! भवतु सब्ब मंगलम् , भवतु सब्ब मंगलम् ,भवतु सब्ब मंगलम् सबका मंगल हो , सबका भला हो , सबका कल्याण हो शुभम् भवतु शुभम् भवतु शुभम् भवतु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अहं गळून पडला नाही

lakhu risbud
Wed, 02/22/2017 - 17:15 नवीन
बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा" क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा 'मला जे समजलयं ते सत्यच आहे.' असा अविर्भाव कायमच असतो. अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते. तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते. कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल " शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस

अहं गळून पडला नाही

lakhu risbud
Wed, 02/22/2017 - 17:15 नवीन
बाबा बुल्ले शहा म्हणतात "हुं तो यु जाणा की हु कुछ नहीं जाणा" क्षीरसागरांचा 'मला जे समजलयं तेच सत्य आहे.' किंवा 'मला जे समजलयं ते सत्यच आहे.' असा अविर्भाव कायमच असतो. अहं गळून पडला नाही आणि उगाच जडजड शब्द वापरुन दावे केले तर ते निव्वळ पुस्तकी पांडित्य ठरते. तस्मात अजून मडके कच्चे आहे असे नोंदवावे वाटते. कबीर म्हणतो "आपणो घर फुंक और फिर चौराहे पर मिल " शब्दशः घराला आग लावायची नसून मी पणाचा र्हास झाला पाहिजे अन्यथा निव्वळ शब्दांचे बुडबुडे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस

तुम्ही स्वत:ला काय समजता (तिरकसपणा अनभिप्रेत)?

गामा पैलवान
Mon, 02/20/2017 - 23:37 नवीन
संजय क्षीरसागर,
सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!
तुम्ही स्वत:ला काय समजता? जीवनकृत्याची मजा घेणारा समजता? की कर्मफळ न चिकटणारा असा (जो कार्यकारणाच्या बाहेर आहे) तो समजता? उत्तर द्यायचं नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मी स्वतःला काही समजत नाही तर

संजय क्षीरसागर
Tue, 02/21/2017 - 00:05 नवीन
फक्त एक निर्वैयक्तिक उपस्थिती आहे. त्यामुळे मला जीवनाची मजा तर येतेच पण कर्मलेपन होत नाही . ते काहीसं आकाशासारखं आहे , प्रेझेंट बट अनाफेक्टेड बाय इवेंटस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कर्मलेपन होत नसतांना ....

गामा पैलवान
Tue, 02/21/2017 - 02:52 नवीन
जर कर्मलेपन होत नाहीये, तर मग या व्यासपीठावर बेधडकपणे मतं मांडायला कसली अडचण आहे? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अध्यात्म म्हणजे बेधडकपणे मतं मांडणं नाही

संजय क्षीरसागर
Tue, 02/21/2017 - 10:27 नवीन
तो दोघातला आत्मिक संवाद आहे. समजलेला बोलायला राजी आणि शोधणारा ऐकायला राजी असेल तर संवाद होऊ शकतो. माझ्याविरोधात आयडी तयार करण्यात आले, ज्यांना अध्यात्माचा गंधही नाही त्यांनी विडंबनं पाडली, बाकी सभासदांनी त्यावर टाळ्या पिटल्या आणि सगळं संकेतस्थळाच्या धोरणात बसत असावं म्हणून एकाही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. एकसोएक लेख लिहूनही प्रत्येक लेखाकडे केवळ धुराळा उडवण्याची संधी म्हणून पाहिलं गेलं. गाढवांच्या चित्रांनी संकेतस्थळाची शोभा वाढवण्यात, त्यावर खिदळण्यात आणि फालतूची विडंबनं पाडण्यात पब्लिकला धन्यता वाटली. काल कालासारख्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या परिमाणावरचा लेख. महाराज निसर्गदत्त महाराज या अवलीया वरचा लेख. बुद्ध बुद्धाची एन्लायटन्मेट आणि त्याच्या शून्य या जगाला दिलेल्या अद्वितीय योगदानावरचा लेख. गोल्डफिश आणि गेस्टाल्ट गुर्जीएफ या भन्नाट सिद्धाच्या गेस्टाल्ट या प्रक्रियेवरचा लेख. रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा मन या अध्यात्मातल्या केंद्रिय विषयावर एक अनमोल लेखमाला लिहीण्याचे माझे प्रयत्न ! इथे लिहून मला एकच कळलं की धिस इज नॉट अ फोरम फॉर स्पिरिच्युअ‍ॅलिटी. पब्लिकला टाइमपास हवा आहे, जाणीवेचा रोख स्वतःप्रत आणण्याची कुणाचीही इच्छा नाही. मग मला अभिव्यक्तीचा दुसरा मार्ग शोधावा लागला. माझ्या अध्यात्मिक लेखनाचे जगभर पसरलेले असंख्य चाहते आहेत त्यांच्या आग्रहाखातर माझं समाधी हे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. नाऊ इट इज इनफ फॉर हिअर. अर्थात, आता टाइमपासचे धागे मीही काढतो आणि संकेतस्थळाच्या प्रकृतीला ते मस्त स्यूट होतात. सो एंजॉय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

टाईमपास

गामा पैलवान
Wed, 02/22/2017 - 01:14 नवीन
संजय क्षीरसागर, तुमच्या लेखांच्या दुव्यांबद्दल धन्यवाद! :-) वाचतो आहे. पब्लिकला जरी टाइमपास हवा असला तरी मला नकोय. त्यामुळे लिहिलंत तर तुम्हाला किमान एक गंभीर श्रोता तरी निश्चित मिळेल. अखेरीस अर्थातच तुमची इच्छा बलीयसी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या धाग्यावरील संजय उवाच तुफान

सतिश गावडे
Tue, 02/21/2017 - 21:30 नवीन
या धाग्यावरील संजय उवाच तुफान विनोदी आहेत. पुनर्जन्म संकल्पनेला नेटाने विरोध करताना स्वतः: तीच संकल्पना स्मृती, जीवेष्णा वगैरे शब्द वापरून वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत.
  • Log in or register to post comments

छान धागा आहे हा , चित्रगुप्त साहेब .. मला इथे काही अनुभव सांगायल

खिलजि
Sat, 12/29/2018 - 19:34 नवीन
अनुभव १ --- आमच्याकडे आतापर्यंत तीन पाळीव कुत्रे झाले . सुरुवातीला एक आशेशियन ( नाव ली ) , दुसरा डॉबरमन ( नाव शेरू ) आणि तिसरा आणि कदाचित शेवटचा बॉक्सर ( नाव राणा ) . तिन्ही कुत्रे छानपैकी जगले . बारा तेरा वर्षे प्रत्येकी .. राणा , डिसेंबर २०१७ ला गेला . मला खरे सांगायचे तेर कुत्रा हा प्रकार घरात बिलकुल आवडत नाही ..तरी माझा भाऊ तो आवड म्हणून घरात आणतो . त्याचे आणि माझे बरेच वाद होते या विषयावरून . माझे मत हेच कि कुत्रा जर आणायचा तर त्याची जबाबदारी त्याला आणणार्याने घेतलीच पाहिजे . भाऊ याला अपवाद होता . मी लग्नानंतर सायनला गेल्याने माझा राणाशी तास परिचय नव्हता . पण आईने एकदा फोन करून मला कळवले कि घरात शेरू गेल्यानंतर परत याने कुत्रा आणलाय . दिसायला एकदम विचित्र आहे आणि सारखं ओरडत असत . तूच त्याला समजावं बाबा .. मी येऊन सांगितलं पण त्याने ते काही ऐकलं नाही .. हळूहळू मीही त्या राणाला परिचयाचा झालो .. तो पन साला चलाख होता . तो माझा भाऊ कामावरून आला कि गप्प बसायचा , पण मी वरळीला आलो कि भुंकून भुंकून नुसता हैराण करायचा . त्याला बाहेर घेऊन जायचो तेव्हा तो कुठे शांत व्हायचा . असे त्याचे नि माझे नटे हळूहळू दृढ होत गेले . तो जाण्याआधी , फार आजारी होता . मी गुजरातला कामासाठी होतो काही दिवस . तो रात्र रात्र विव्हळायचा . सर्व जण बघून गेले तरीही तो प्राण सोडत नव्हता .. त्याची ती दशा बघून आईला आणि बाबाना खूप खूप त्रास होत होता . मला यायला किमान अजून दोन दिवस तरी लागणार होते. आईने मग ना राहवत , मला फोन केला आणि सांगितले कि बाबा खरंच याची अवस्था बघवत नाही आहे . मला तरी वाटत , कि तो तुझ्यासाठी थांबला आहे , शक्य झाल्यास तडक तिथून निघून ये . तो निपचित पडून असतो , नि खूप विव्हळत असतो . त्याच्या त्या दयनीय विव्हळण्याने , समोरच्या लोकांनी आपली तक्रार सुद्धा केली आहे . तर बघ , कास काय जमतंय ते . मी कसाबसा तिथून दीडेक दिवस आधीच निघालो आणि सरळ वरळीला गेलो .. बाहेर येताक्षणी , तो हलला आणि त्याच्या अंगात त्राण नव्हते तर त्याचा शेपटाकडचा भाग मायेने माझ्या येण्याची पोचपावती देत होता . आईने डोळ्यात अश्रू काढले आणि बाबाना म्हणाली बघा , हा सिद्धीसाठी थांबला होता एव्हढे दिवस . लगेच मी आत पाऊल टाकताक्षणी त्याने हळूच मान वर काढत माझ्याकडे नीट निरखून बघितले . मी म्हणालो " राणा , आज बाहेर जायचे नाही का .. त्याने विव्हळत काहीतरी सांगायचा प्रयत्न केला . आईने आईस्क्रीम पुढे केला नि म्हणाली दे त्याला चार पाच दिवस पोटात अन्नाचा कां नाही आहे . आश्चर्य म्हणजे त्याने थोडासा आइस्क्रीमही खाल्ला . मी तेथे थांबलो होतो पण नंतर रात्री साडेबाराला निघालो घरी जाण्यासाठी . घरी गेलो आणि झोपणार इतक्यात भावाचा फोन आला दीडच्या सुमारास " आपला राणा गेला " अनुभव २ --- माझी आई शनिवारी गेली , ६ जानेवारी २०१८ . तिचा देह आम्ही तिथेच शवागारात ठेवला होता आणि रविवारी सकाळी नेण्यासाठी आलो . आईला आणल्यावर तिला स्मशानात नेण्यापूर्वी विधी चालू होते . तेव्हा एक घटना घडली . मला तिचे हातपाय धुण्यासाठी सर्वानी पकडून आणले तेव्हा एक घटना घडली .. आईचे पायातले जोडावे अचानक बाहेर येऊन पडले . मामी पुढे अली होती ते घालायला पण मी लगेच उचलून ते पुन्हा पायात घातले . मला त्याचा अर्थ कळला नाही पण काहीतरी अनपेक्षित असे घडले होते ... अनुभव ३ --- आईच्या अग्निनंतर, घरात एका ताटाखाली पीठ पसरवून ठेवण्याची आमच्याकडे पध्द्त आहे . ते झाकून ठेवायचे रात्रभर आणि दिवा लावून ठेवायचा . सकाळी उठल्यावर आम्ही ते उघडून पहिले . काहीच कळले नाही . भावाने त्याचे फोटो काढले आणि मग सर्व समोर आले . त्याने तो फोटो , फोन उलटसुलट फिरवून नक्की काय आकृती आलीय ते बघण्याचा प्रयत्न केला आणि आनंदाने किंचाळला . त्या पिठावर चक्क समाधीच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या .. आजही त्याच्याकडे ते फोटो आहेत . यामागे तर्कशात्र काय आहे ते जाणून घेण्याचा ब्राह्मणाकडून प्रयत्न केला . कुणी सांगितले कि ती पुन्हा मनुष्य योनीत गेली आहे कुणी सांगितले कि तिचे तुमच्या घरात सदैव वास्तव्य राहील कुणी सांगितले कि ती लक्ष्मी होती म्हणून .. मला मात्र एक पटले कि माझी आई , गेल्यावरही आमच्याबरोबर आहे आणि तिला शिवलोक प्राप्त व्हावा यासाठी मी महादेवाकडे प्रार्थना करत आहे .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

समाधीच्या पाऊलखुणा

जॉनविक्क
Sat, 08/03/2019 - 20:26 नवीन
समाधीच्या पाऊलखुणा
म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

माझी आई रात्री झोपेत गेली

प्रकाश घाटपांडे
Sat, 08/03/2019 - 18:52 नवीन
माझी आई रात्री झोपेत गेली .तशी ती आजारी नव्हती .त्या दिवशी मी उठल्यावर फिरायला गेलो तेव्हा माझ्या मनात एक अदृश्य सावट फिरताना जाणवत होत .ते आई बाबत होत. घरी आल्यावर पाहिलं तर आई उठत नव्हती. डॉक्टर आल्यावर त्यांनी ती गेल्याचे सांगितले.मला विलक्षण आश्चर्य वाटल. योगायोग असू शकतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा