गेल्या एक दोन आठवड्यापासून 'सर्जिकल स्ट्राईक' ह्या विषयावरून ईतक्या चर्चा,कुचर्चा,विचर्चा चालू आहेत की डोकं अगदी पिकलं ....
पवार साहेब म्हणाले,ह्यात काय, सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही बी केलंय की राव......
ह.भ.प. केजरीवाल महाराज दिल्लीकर म्हणाले पुरावे द्या... (खरं म्हणजे केजरीवाल वहिनी तरी त्यांना सीरियस घेत असतील का?,ही शंका आहे )
प.पु....राहुल गांधी तर खून की दलाली वगैरे... (लगेच हसायला काय झालं?....मी प.पु.म्हणालोय पप्पू नाही !...प.पु.म्हणजे परम पुज्ज....कॉंन्ग्रेसी चेल्यासाठी तर ते प.पु.आहेत ह्यात काही वादच नाही..नाही पटत?,ठीक आहे आता कंसाच्या बाहेरच यावं लागेल)
हं,आलो कंस तोडून बाहेर!....
एक मस्त प्रयोग सांगतो....सिम्पल केमेस्ट्री एक्सप्रिमेन्ट.... राहुल सर झोपल्यावर त्यांच्या पळपायाला पोटॅशियम सायनाईड लाऊन ठेवायचं.... दुसर्या दिवशी सकाळी येऊन बघायचं... दोन,चारशे कॉंन्ग्रेसी चेले मरुन पडलेले दिसतील.... पाच सहा चेहरे तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे असतील....
श्या!.... असं होतं यार... राहुल आणी केजरीवाल ही दोन नाव घेतली की मला भानच राहात नाही....
कुठे होतो आपण?.... हं...सर्जिकल स्ट्राईक ह्या विषयावर गंभीर चर्चा करत होतो...
व्हॉट ईज द रियल डेफिनेशन ऑफ सर्जिकल स्ट्राईक?
मरुद्या ती चर्चा...
ते बघा...एका खेडेगावातल्या शाळेत मोदी गुरुजी वर्गातल्या मुलांना ह्याच विषयावर गोष्ट सांगत आहेत... ती आधी ऐकू...मग करु आपली चर्चा....
अरे कॅमेरामन भाई....जरा ऊस क्लासरूम पर कॅमेरा फोकस करो...
तर पोरान्नो...फार्फार वर्षांपुरविची गोष्ट आहे...
कधीची गुर्जी?...रामाच्या येळची का?... सुताराचा नामु
गुर्जी नी हातात रूळ घेतला...नामदेव राव...या,जरा माझ्या जवळ या....
नामू गुरुजींच्या जवळ गेला...
रप्प !.. मायौ sss...नामू बूड चोळत उड्या मारायला लागला...
आता कुनाला काई प्रश्न इचारायचे आस्तील तर या हिकडं... आख्खा वर्ग चिडीचूप....
भारतपुर नावाचं येक गाव व्हत..... तर...त्या भारतपूर मधी एक गावगुंड व्हता....(शरद कोन म्हन्ल?,ए थुत्र्या,मारू का रूळ फयेकुन?)
त्याचं नाव पाकोबा शरीफ....नावात जरी शरीफ आसल तरी लै बेरकी बेन्याचं व्हतं बरका...
रस्त्यानं जानार्या येनार्याला...ऊगच्या ऊग टकुर्यात मारायचं... हिरीवर पानी भराय आलेल्या बाया बापड्यायला छेडायचं... ल्हान ल्हान पोरं वावरात टमरेल घ्येवून बसलेका,त्याहीच्ये टमरेलं दगुड मारून पाडायचे... कुनाच्या खुराड्यातुन कोंबड्या चोरायच्या...भावा भावात भाडनं लावायचे.... आता किती सांगावं....
लै म्हंजे लै तरास सगळ्या गावाला...
गावचं सरपंच व्हतं....आबा पाटील... माळकरी बुवा....लै द्येव मानुस... पर त्यो बी ह्या शरीफ ला कट्टाळून गेल्ता....
येक दिवशी पाटलीन काकू मंल्या....
अवो,काय तुमचं लक्ष हाय का नाई गावाकडं?...
त्यो मुडदा तिकडं सगळ्या गावाला तरास द्येतूया आन तुम्ही हिकडं गपगार बसलात!....
आबांनी भैरु ला सांगावा धाडला....
भैरु...तालमीतला गडी...यका बुक्कीत नारळ फोडणार... आजूबाजूच्या धा गावातला पैलवान त्याच्या म्होरं कुस्तीला हुबा ह्रायाचा नाई... दोन मिन्टात कुस्ती खतम....
भैरोबा..आरं त्या शरीफ ला कायतरी सांग बाबा....
तुमी काळजी करूनगासा आबा... त्याचं तंगडं तोडून गळ्यात बांधून टाकतो...भैरू दातवठ खात म्हन्ला.. आरं बाबा असं करु नगस....उगं म्येलबिलं तर वांदे व्हतील... त्याला समजावून सांगावं बाबा..आसं करु नग म्हनावं....
आसं नुस्त सांगितल्यावर काय व्हनार हो... ग्वाड बोलुन तर लाहान लेक्रू बी ऐकायचं नाही आबा...
बरं गड्या...मार्लास तरी उगं हाळु दोन तीन चापटा मार...ईट्टलाची शपथ हाय बघ तुला...
ह्ये काय पटलं नाय बघा आबा आपल्याला... ईट्टलाच नाव घ्येऊन माझ्ये हात बांधले तुम्ही...भैरू नाराजीत मान हालवत म्हन्ला...
आता उगं नाराज होऊ नगस...त्यो ईट्टल त्याला बगुन घ्येईल... जा,तेला समजावून सांग...
भैरु शरीफ च्या घरी ग्येला.... आन तेच्या समोर हात जोडून ईनंती करून आला....
हिकडं आबा पाटील खुश...चला,शरीफ सुधरला... आवो कसचं काय.... च्यार पाच दिसांनी पुन्ना त्या शरीफ चा खेळ चालु झाला की!... आता तर ज्यास्तच तरास वाल्डा....
पांडुरंगा....ईट्टला.... दरसाला परमानं पाटील आषाढी वारी ला निघाले... गावाच्या पंच्यायला बोलाविलं...
तर मंडळी आता चार सा म्हैने तात्या गावाचा कारभार बगतील... तात्या म्हंजे...धाकलं पाटील.... शेरात सिकुन आल्याला गडी...
त्या शरीफ चा पुन्ना जुन्या तिकिटावर नवा खेळ...
कोन हाय रं तिकडं...भैरु ला वाड्यावर बोलवा...तात्या गरजले
बोलाकी तात्या...आज कस्काय आठवन काहाल्डी?
जरा जवळ ये...
हं,बोला...
आपल्याला त्या शरीफ चा सर्जिकल ष्ट्राईक करायचा हाय... तात्या गालातल्या गालात हासत म्हन्ले.... म्हंजे काय वो तात्या?...भैरूनं टकूरं खाजवीत ईचारलं...
तात्यानं चंचीतुन तंबाखु काल्डी...डबीतून अंगठ्याच्या नखान चुना घ्येतला.
चांगली चरचरा मळली....दोन तीन हालक्या टाळ्या मारल्या...थोडा खकाना उल्डा
चिमटीत ली गोळी दाढखाली ठ्येवत तात्या मनलें...
आरं माज्या वाघा...ते शिक्रेट आस्तय...तू आधी त्येचे हाडं मोडून तर ये...मग सांग्तो.... पर येक गोष्ट ध्यानात ठिव...त्याला जित्ता ठिवायचा बरंका...जीवानिशी मारायचं न्हाई.... जाताना घोंगडं घ्येऊन जा...घोंगडं टाकून मारायचं बघ...त्येला कळालं न्हाई पायजे...
व्हय जी तात्या....भैरु लै खुस व्हऊन म्हन्ला
कुनाला हानायाचं आसलं तर त्येच्या आंगात हात्ती चं बळ यायचं... कुस्तीला बी कोनी येईना....आता किती दिवस मानसांनं तालमीतली माती खनायची हो?...
भैरू,आनी येक गोष्ट.... बोलाकी तात्या... त्याला हानुन झालं की घरला ये.... तुज्या वैनीनं मटन करून ठिवलंय....खाय भाकर कुस्करुन... हानामारी चं काम लै मेहनतीचं आस्तंय बाबा... आडकित्यानं सुपारी कातरत तात्या हासुन मनले....
व्हय जी...रामराम...लगेच येतो... घाई घाईत जोडं पायात घालंत भैरू म्हन्ला...
भैरू घोंगडं घ्येऊन शरीफ च्या घराकडं निघाला... दाराची कडी वाजवीली... शरीफ नं दार उघल्ड.... माशे पकडायचं जाळं टाकावं तस त्येच्या आंगावर घोंगडं टाकलं....
आर्धा पाऊन घंटा निस्ता आवाज... मायोsss.....म्येलोsss... दनादन..लाथा काय,आन बुक्क्या काय
भैरू नं त्येला लै म्हंजे लै मारलं... वैनी च्या हातचं कोल्लापुरी मटन आठवलं की माराय लै च्येव येतव्हता... भैरू चं काम झालं...आन भुक बी लै लागली व्हती.... त्याच्या डोळ्याम्होरं फकस्त मटनाचं भगुनं आन भाकरीची चवड दिसत व्हती...
दुसर्या दिवशी सक्काळी सक्काळी दवंडीवाला ग्यानु गावभर दवंडी द्येत फिरत व्हता....
आईका हो आईका... आजच्या दिवशी,सांच्यापारला,गावाचे सरपंच आबा साहेबांचे चरंजीव,तात्यानी समद्यास्नी चावडी वर बोलावलं हाय... येनार्याला माहिती कळल,न येनारा हाळहाळल....
सगळा गांव विचारात पल्डा....काय बातमी आसल बुवा....
दुपार पासूनच लोक चावडी वर जमाय चालू झाले... संध्याकाळ पर्यंत सगळा गाव चावडीवर हाजर...
तात्या उठले....सगळ्या मंडळींना नमस्कार केला.... भैरु तिकडं काय बसलास?....हिकडं ये.... भैरु ऊठून तात्या जवळ आला...
तर मित्रांनो....आपल्या भैरू पैलवानां नं एक जबरा काम केलेलं हाय... त्याच्या खांद्यावर हात ठेवीत तात्या म्हन्ले...
सगळ्या गावाला तरास देनारा गावगुंड....शरीफ मियाँ... आपल्या भैरु नं,काल रातरच्याला त्याच्या घरात घुसून,त्याचं हात पाय मोडून गळ्यात बांधल्याती...
आता हितून फुडं त्यानं कुणालाबी तरास देला तर मला सांगा.... त्याचा मुडदा पडलाच मनुन समजा.... आता ह्या येळेला फकस्त भैरूच न्हाई तर गावातले शंभर मान्सं काठ्या आन कुर्हाडी घ्येऊन जात्यालं... त्याचं शंभर तुकडं करून कुत्र्याला खाऊ घालु....
त्ये जाऊद्या.... तर आपल्या ह्या वाघाला,माज्याकडून चांदीचं कडं आनी एक हाजार एक रुपये बक्षीस द्येत हाये....
लोकाईच्या निस्त्या टाळ्या आन शिट्ट्या... कुनतरी गर्दीतून उठून भैरु ला फेटा बांधला... दुसरा कुनीतरी वरडला....यळकोट....यळकोssट जय मल्हाsssर....सगळ्या गर्दीनं उत्तर देलं....
भैरु हिकडं ये....तात्या म्हन्ले धिंगान्यामुळं कायबी ऐकायला येत नव्हतं...
कान हिकडं कर....
बिनघोर ठोकायचं आनी चावडी वर सगळ्या गावासमोर सांगनं म्हंजे सर्जिकल ष्ट्राईक... आलं का ध्यानात?...
दुसर्या दिशी... सगळ्या गावभर जिकडं तिकडं निस्ती चर्च्या... कुनी तात्या ची जय करतंय....कुनी भैरू ची जय करतंय.... शेवटी प्रकरन पार्वती काकु कडं ग्येलं...
खरं काम कुनी केलं...
काकूं मिर्च्या निवडत व्हती.... पोरायनी सगळी काहानी काकूच्या कानावर घातली...
हात्त मेल्यांनो... त्या शरीफ मियाँ ची कटकट गेलीया ते बगा की ! काम कुनी का करना पर काम झालं का नाई?... त्यात्या बी आपले आन भैरु बी आपलाच.... तुमचा डावा हात कामाचा का ऊजवा हात कामाचा?...व्हय रे?
काकू नं येका मिन्टात फैसला क्येला...
जावा आता, त्वांड काळ करा...मला लै कामं हैती.. न्हायतर येकेकाला मिर्च्या निवडायला बशवीते बगा... काम सांगते म्हंल्यावर सगळे उंदरावानी पटापट पांगले....
ए कॅमेरामन भाई....चल,पॅकअप कर दे....
अब ईसके बाद सर्जिकल स्ट्राईक का मतलब समझाने मे कोई मतलब ही नही है....
प्रतिक्रिया
28 Oct 2016 - 12:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
लै झाक.. आक्षी शंकर पाटील आटवले कि...
28 Oct 2016 - 12:33 pm | वडगावकर
आसं काय म्हंता म्हाराजा?
आमी तर शंकरराव चं पायतान
28 Oct 2016 - 12:13 pm | संजय पाटिल
लय भारी!!
28 Oct 2016 - 12:35 pm | टवाळ कार्टा
खिक्क, लय भारी
28 Oct 2016 - 12:39 pm | मराठी_माणूस
मस्त.
बाकी ते "परम पुज्ज" म्हणजे परम पुज्य का ?
28 Oct 2016 - 4:41 pm | वडगावकर
वा गुरु,मानलं बरका तुम्हाला!(एक मान्य करतो,ही लिखाणातली चूक होती )
सूक्ष्म विनोद म्हणजे काय हे तुमच्या मुळे कळालं बरका!
28 Oct 2016 - 5:01 pm | शाम भागवत
पूज्यचा अर्थ शून्य असाही होतो. मोठे शून्य म्हणता येईल.
:))
28 Oct 2016 - 6:25 pm | वडगावकर
वा,मग तर एकदम डेंजर विनोद झाला !
पुज्ज (शून्य)पूज्य (पूजनीय)...मग आमच्या राहुल गांधींना दोन्ही शब्द लागु होतील की
28 Oct 2016 - 1:27 pm | बोका-ए-आझम
लय भारी हो वडगावकर अण्णा!
28 Oct 2016 - 1:29 pm | प्रदीप
आवडले!
28 Oct 2016 - 1:44 pm | पाटीलभाऊ
मस्त लिहिलंय...!
28 Oct 2016 - 1:46 pm | पैसा
मस्त! फक्त ते मोदी गुर्जीचं कनेक्शन नीट नाही जोडलं गेलं. दुसरे कोणीही गुर्जी असते तरी इतकीच मजा आली असती!
28 Oct 2016 - 4:00 pm | वडगावकर
हांगा आश्शी आक्का!..म्या बी त्येच म्हन्ल,पन पोरं मनलें आमाला मोदी गुर्जीच पायजेल.
मरस्तोर मार्तेत पन गोष्ट सांगावं तर मोदी गुर्जीनच...आता काय करावं?
28 Oct 2016 - 5:06 pm | पैसा
=))
28 Oct 2016 - 6:31 pm | शाम भागवत
:))
28 Oct 2016 - 1:54 pm | टर्मीनेटर
मजा आली भाऊ वाचायला ...
28 Oct 2016 - 5:00 pm | वटवट
भावास्नी मज्जा आली बग
28 Oct 2016 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जबरदस्तं लिहिलयं :)!!!!
28 Oct 2016 - 5:19 pm | भम्पक
वडगावकर अण्णा एकच नंबर.....!!!
28 Oct 2016 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
28 Oct 2016 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा
जबार लिवलय. =)) खच्याक् खुट येकदम!
31 Oct 2016 - 1:32 pm | चिनु चे बाबा
खुप छान . मनस्वी आनंद झाला . आपल्या पुढील लिखानाच्या प्रतिक्षेत
31 Oct 2016 - 2:06 pm | उगा काहितरीच
मस्त भौ ! मज्जा आली वाचताना.
31 Oct 2016 - 4:55 pm | बदलापुरकर
Chanlihalay.
31 Oct 2016 - 9:48 pm | स्पार्टाकस
खल्लास लिवलंय वो!
1 Nov 2016 - 12:00 am | स्रुजा
:) :) :)
1 Nov 2016 - 10:42 am | वडगावकर
समस्त मिपाकरांना सप्रेम दंडवत
आपल्याला लिखाण आवडले,भरून पावलो
1 Nov 2016 - 11:30 am | अनिरुद्ध.वैद्य
=)) =))
1 Nov 2016 - 11:47 am | नाखु
वडगांवकर पाँईटाचा मुद्दा मांडलातकी !
कांडक्यातच दांडका.
कथाकथनी नाखु
1 Nov 2016 - 11:48 am | विजय_आंग्रे
राहुल सर झोपल्यावर त्यांच्या पळपायाला पोटॅशियम सायनाईड लाऊन ठेवायचं.... दुसर्या दिवशी सकाळी येऊन बघायचं... दोन,चारशे कॉंन्ग्रेसी चेले मरुन पडलेले दिसतील.... पाच सहा चेहरे तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे असतील....
सहि लिहिलय. =))