सहजच

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
9 Oct 2016 - 6:29 pm

आळसावलेल्या एका सकाळी
तू म्हणाव चल फिरून येऊ
कुठे कस काही न सांगता
घेऊन यावस मग समुद्रकिनारी
मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?"
तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली"

सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत
पडून राहाव गरम वाळुत
सूर्यास्ताला जाव गार पाण्यात
हलकेच उलगडावी तू माझी वेणी
मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील"
तू म्हणाव, "असू देत असेच सहजच "

बोचर्या थंडीची पर्वा न करता
ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या
आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर
तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?"
मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

9 Oct 2016 - 6:35 pm | पद्मावति

वाह...मस्तच. आवडली.

रातराणी's picture

9 Oct 2016 - 6:37 pm | रातराणी

:) धन्यवाद :)

अभिजीत अवलिया's picture

9 Oct 2016 - 6:39 pm | अभिजीत अवलिया

!!! एकदम रोमँटिक कविता !!!

छान कविता. थोडंसं 'लुप्त मात्रा अनुस्वार' याकडं लक्ष दिलं पाहिजे.

रातराणी's picture

9 Oct 2016 - 8:10 pm | रातराणी

होय, उत्साहात जरा दुर्लक्ष झालं खरं :)

यशोधरा's picture

9 Oct 2016 - 7:14 pm | यशोधरा

मस्त! सुर्रेख लिहिली आहे!

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Oct 2016 - 7:29 pm | माम्लेदारचा पन्खा

एकच कल्ला नुसता !

रच्याकने दिवसभर समुद्रावर बसून करपायला नाही का होणार ?

राराने इतकी रोम्यांटीक कविता लिहिली आणि तुम्ही एकदम करपायच्याच गोष्टी बोलायला लागलात! दुत्त!

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Oct 2016 - 7:49 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रश्न तर पडतातच नं !

रातराणी's picture

9 Oct 2016 - 8:09 pm | रातराणी

आं दुत्त दुत्त, आपण ज्याला करपने म्हणतो ते काही लोक हौस म्हणून टयान केलय म्हणतात बर!

प्रचेतस's picture

9 Oct 2016 - 8:09 pm | प्रचेतस

सहीच लिहिलंय.

बाकी सूर्यास्तानंतर समुद्राचं पाणी उबदार असते आणि जमीन गार म्हणून तर मतलई वारे सुरु होतात.

अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला ? :)

प्रचेतस's picture

9 Oct 2016 - 8:13 pm | प्रचेतस

=))

रातराणी's picture

9 Oct 2016 - 8:23 pm | रातराणी

चितळे मास्तरांच गोदाक्का सांगा बर आता वारे कुठल्या दिशेला वाहतायत? आठवल सहजच =))

अजया's picture

9 Oct 2016 - 8:09 pm | अजया

:)
कविता आवडली.

रातराणी's picture

9 Oct 2016 - 8:12 pm | रातराणी

धन्यवाद :)

जव्हेरगंज's picture

9 Oct 2016 - 9:37 pm | जव्हेरगंज

एकदम 'सहज' लिहील्यासारखी वाटली!

:)

करपलेल्या भाजीची पर्वा न करता
भरावेत बकाण्यावर बकाणे
लक्ख डब्याचे झाकण लावता लावता
आठवावेत ते सुखाचे उखाणे
मी हळूच पहावे तुझ्या डब्याकडे
तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?"
मी म्हणाव, "काही नाही, विशेष आमची मिशेष"
.
येनी वे रारा. कविता ज्याम आवाडलीय. मस्तच.

चांदणे संदीप's picture

10 Oct 2016 - 5:08 am | चांदणे संदीप

अभ्यादादाचा तडका.... कविताका अंग अंग भडका! ;)

रातराणीतै कविता येकच लंबर... ज्याम आवडलीये!

Sandy

रातराणी's picture

10 Oct 2016 - 7:42 am | रातराणी

खी खी खी =))

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Oct 2016 - 7:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छानचं!

सतिश गावडे's picture

10 Oct 2016 - 7:40 am | सतिश गावडे

अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या
आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या

वाह..

रातराणी's picture

10 Oct 2016 - 7:46 am | रातराणी

पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ, यशोतै, मापदादा, वल्लीसर, अजयातै, जव्हेरभाऊ, अभ्या.., संदीपदा, मिकादादा, आणि गावडेसर सर्वांचे मनापासून आभार :)

चाणक्य's picture

10 Oct 2016 - 9:07 am | चाणक्य

रोमँटीक. दिल गार्डन गार्डन हो गया.

नीलमोहर's picture

10 Oct 2016 - 9:29 am | नीलमोहर

छान,

रातराणी's picture

10 Oct 2016 - 10:08 am | रातराणी

चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)

विअर्ड विक्स's picture

10 Oct 2016 - 3:48 pm | विअर्ड विक्स

कविता सुंदर आहे. अगदी अलगद सहज पणे मनातून पानावर उमटलीये !!!!!

रातराणी's picture

11 Oct 2016 - 1:23 pm | रातराणी

धन्यवाद विवि :)

नाखु's picture

13 Oct 2016 - 9:09 am | नाखु

उपमांचा मारा न करता, म्हणून खूप आवडली.

कवीता ही सहजच झाली पाहिजे.

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2020 - 4:11 pm | प्राची अश्विनी

अरे वा, छानच!

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 4:16 pm | शाम भागवत

👌

अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...

थँक्यु थँक्यु थँक्यु 🤗