✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सहजच

र — रातराणी, Sun, 10/09/2016 - 18:29
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

प्रतिक्रिया द्या
12658 वाचन

💬 प्रतिसाद (33)

वाह...मस्तच. आवडली.

पद्मावति
Sun, 10/09/2016 - 18:35 नवीन
वाह...मस्तच. आवडली.
  • Log in or register to post comments

:) धन्यवाद :)

रातराणी
Sun, 10/09/2016 - 18:37 नवीन
:) धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

!!! एकदम रोमँटिक कविता !!!

अभिजीत अवलिया
Sun, 10/09/2016 - 18:39 नवीन
!!! एकदम रोमँटिक कविता !!!
  • Log in or register to post comments

छान कविता. थोडंसं 'लुप्त

एस
Sun, 10/09/2016 - 19:11 नवीन
छान कविता. थोडंसं 'लुप्त मात्रा अनुस्वार' याकडं लक्ष दिलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

होय, उत्साहात जरा दुर्लक्ष

रातराणी
Sun, 10/09/2016 - 20:10 नवीन
होय, उत्साहात जरा दुर्लक्ष झालं खरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्त! सुर्रेख लिहिली आहे!

यशोधरा
Sun, 10/09/2016 - 19:14 नवीन
मस्त! सुर्रेख लिहिली आहे!
  • Log in or register to post comments

आज काय ब्वा मजाय तुमच्या ह्यांची.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 10/09/2016 - 19:29 नवीन
एकच कल्ला नुसता ! रच्याकने दिवसभर समुद्रावर बसून करपायला नाही का होणार ?
  • Log in or register to post comments

राराने इतकी रोम्यांटीक कविता

यशोधरा
Sun, 10/09/2016 - 19:35 नवीन
राराने इतकी रोम्यांटीक कविता लिहिली आणि तुम्ही एकदम करपायच्याच गोष्टी बोलायला लागलात! दुत्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

खरं आहे पण.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 10/09/2016 - 19:49 नवीन
प्रश्न तर पडतातच नं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आं दुत्त दुत्त, आपण ज्याला

रातराणी
Sun, 10/09/2016 - 20:09 नवीन
आं दुत्त दुत्त, आपण ज्याला करपने म्हणतो ते काही लोक हौस म्हणून टयान केलय म्हणतात बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सहीच लिहिलंय.

प्रचेतस
Sun, 10/09/2016 - 20:09 नवीन
सहीच लिहिलंय. बाकी सूर्यास्तानंतर समुद्राचं पाणी उबदार असते आणि जमीन गार म्हणून तर मतलई वारे सुरु होतात.
  • Log in or register to post comments

अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला

रातराणी
Sun, 10/09/2016 - 20:11 नवीन
अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Sun, 10/09/2016 - 20:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

चितळे मास्तरांच गोदाक्का

रातराणी
Sun, 10/09/2016 - 20:23 नवीन
चितळे मास्तरांच गोदाक्का सांगा बर आता वारे कुठल्या दिशेला वाहतायत? आठवल सहजच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:) कविता आवडली.

अजया
Sun, 10/09/2016 - 20:09 नवीन
:) कविता आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

रातराणी
Sun, 10/09/2016 - 20:12 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

एकदम 'सहज' लिहील्यासारखी

जव्हेरगंज
Sun, 10/09/2016 - 21:37 नवीन
एकदम 'सहज' लिहील्यासारखी वाटली! :)
  • Log in or register to post comments

करपलेल्या भाजीची पर्वा न करता

अभ्या..
Mon, 10/10/2016 - 00:56 नवीन
करपलेल्या भाजीची पर्वा न करता भरावेत बकाण्यावर बकाणे लक्ख डब्याचे झाकण लावता लावता आठवावेत ते सुखाचे उखाणे मी हळूच पहावे तुझ्या डब्याकडे तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, विशेष आमची मिशेष" . येनी वे रारा. कविता ज्याम आवाडलीय. मस्तच.
  • Log in or register to post comments

=))

चांदणे संदीप
Mon, 10/10/2016 - 05:08 नवीन
अभ्यादादाचा तडका.... कविताका अंग अंग भडका! ;) रातराणीतै कविता येकच लंबर... ज्याम आवडलीये! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खी खी खी =))

रातराणी
Mon, 10/10/2016 - 07:42 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/10/2016 - 07:10 नवीन
छानचं!
  • Log in or register to post comments

छान !!

सतिश गावडे
Mon, 10/10/2016 - 07:40 नवीन
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
वाह..
  • Log in or register to post comments

पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ,

रातराणी
Mon, 10/10/2016 - 07:46 नवीन
पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ, यशोतै, मापदादा, वल्लीसर, अजयातै, जव्हेरभाऊ, अभ्या.., संदीपदा, मिकादादा, आणि गावडेसर सर्वांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments

+१

चाणक्य
Mon, 10/10/2016 - 09:07 नवीन
रोमँटीक. दिल गार्डन गार्डन हो गया.
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Mon, 10/10/2016 - 09:29 नवीन
छान,
  • Log in or register to post comments

चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)

रातराणी
Mon, 10/10/2016 - 10:08 नवीन
चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

कविता सुंदर आहे. अगदी अलगद

विअर्ड विक्स
Mon, 10/10/2016 - 15:48 नवीन
कविता सुंदर आहे. अगदी अलगद सहज पणे मनातून पानावर उमटलीये !!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद विवि :)

रातराणी
Tue, 10/11/2016 - 13:23 नवीन
धन्यवाद विवि :)
  • Log in or register to post comments

एक्दम फर्मास

नाखु
गुरुवार, 10/13/2016 - 09:09 नवीन
उपमांचा मारा न करता, म्हणून खूप आवडली. कवीता ही सहजच झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments

अरे वा, छानच!

प्राची अश्विनी
Wed, 09/16/2020 - 16:11 नवीन
अरे वा, छानच!
  • Log in or register to post comments

.

शाम भागवत
Wed, 09/16/2020 - 16:16 नवीन
👌
  • Log in or register to post comments

अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...

गणेशा
गुरुवार, 09/17/2020 - 20:30 नवीन
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments

सर्व नवीन वाचकांना धन्यवाद.

रातराणी
Fri, 09/18/2020 - 04:30 नवीन
थँक्यु थँक्यु थँक्यु 🤗
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा