सहजच
आळसावलेल्या एका सकाळी
तू म्हणाव चल फिरून येऊ
कुठे कस काही न सांगता
घेऊन यावस मग समुद्रकिनारी
मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?"
तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली"
सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत
पडून राहाव गरम वाळुत
सूर्यास्ताला जाव गार पाण्यात
हलकेच उलगडावी तू माझी वेणी
मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील"
तू म्हणाव, "असू देत असेच सहजच "
बोचर्या थंडीची पर्वा न करता
ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या
आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर
तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?"
मी म्हणाव, "काही नाही, सहजच"
वाह...मस्तच. आवडली.
:) धन्यवाद :)
!!! एकदम रोमँटिक कविता !!!
छान कविता. थोडंसं 'लुप्त
होय, उत्साहात जरा दुर्लक्ष
मस्त! सुर्रेख लिहिली आहे!
आज काय ब्वा मजाय तुमच्या ह्यांची.....
राराने इतकी रोम्यांटीक कविता
खरं आहे पण.....
आं दुत्त दुत्त, आपण ज्याला
सहीच लिहिलंय.
अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला
=))
चितळे मास्तरांच गोदाक्का
:) कविता आवडली.
धन्यवाद :)
एकदम 'सहज' लिहील्यासारखी
करपलेल्या भाजीची पर्वा न करता
=))
खी खी खी =))
छान
छान !!
पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ,
+१
:)
चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)
कविता सुंदर आहे. अगदी अलगद
धन्यवाद विवि :)
एक्दम फर्मास
अरे वा, छानच!
.
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...
सर्व नवीन वाचकांना धन्यवाद.