Skip to main content

डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो. उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो. १. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते? २.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते. ३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे? ४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का? ५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.! ६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?

वाचने 36087
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

आजच बघितले, मुंबैत ४ मोठे गणपती अजूनही (सकाळी ११ वाजता) विसर्जनाच्या प्रतिक्षेत होते...आणि असल्या बेजबाबदारपणामुळे ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला...चांगले सुरु आहे संस्कृतीरक्षण

In reply to by टवाळ कार्टा

सध्याचा गणेशोत्सव म्हणजे संस्कृतीरक्षण आहे का? तुमची संस्कृतीरक्षणाची व्याख्या काय..?

डीजे, समूह अतिढोलवादन या मेंदु बधीर करणार्‍या नशा आहेत.म्हणून त्या काही लोकांना हव्याहव्याशा वाटतात.

एखाद्या गोष्टीचा अतिरेक केव्हाही वाईटच...! डॉल्बी डीजे वगैरे कधीही आपल्या संस्कृतीचा भाग नव्हता..पण आपल्यातल्याच काही लोकांनी डॉल्बी डीजेला आपल्या संस्कृतीत रुजविण्यास उत्तेजन दिले आहे. डॉल्बी डीजेवर बंदी आणली हे फारच उत्तम केले... देर आए दुरुस्त आए...! गणेशोत्सवातली डॉल्बी डीजेची फालतुगिरी वाकड मध्ये अनुभवली आहे. आणि त्याचा त्रिवार णिशेध...!

डॉल्बी ऐकून भावना निचरुन चित्त शुद्ध होते ! अरेरे ! पं. भिमसेन , राशीद खान , पं. शिवकुमार , लता , आशा ... असे लोक वर्षानुवर्षे चुकीचं संगीत गात - वाजवत बसलेत आणि आपण मूर्ख लोक त्यांच ऐकत बसलोय

सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे? परवाणगी कुणाच्या बापाची डॉल्बी आमच्या हक्काची आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.! कोण करतोय तिच्या आXXXXXX भाXXXXX गणेशोत्सव म्हणजे काल तयार झालेला उत्सव नसून जवळ जवळ एक शतकाचा त्याचा इतिहास आहे आणि आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही. संस्कृतीकी जीवनाच्या आड स्वत: कोण ते टिळक का कोण ते सुद्धा येवू शकत नाहीत कारण शतकाचा इतिहास उत्तरोतर प्रगल्भ झालेला आहे. काल "बाई वाड्यावर या" या गाण्याव्रर काही मुली आणि महिलाही आपापल्या भावनांचा काहीतरी..... हं..निचरा करत होत्या. सरकारने खर तर अश्या उन्माद रीचवण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहनपर रेशनवर दारूची सोय केली पाहिजे. सागल्यानलाच सोपं होईल, सगळ्यांनीच झीन्गाट व्हायचं, कालपर्यंत ज्यांला कोनाला डोल्बीची परेशानी होती त्यांची पन सोय व्हईल. समद्यांच भल हीच तर लोकशाही .... चल भावड्या DJ ...DJ ... आवाज वाढव डिजे तुज्या...

In reply to by झेन

संस्कृतीकी जीवनाच्या आड स्वत: कोण ते टिळक का कोण ते सुद्धा येवू शकत नाहीत कारण शतकाचा इतिहास उत्तरोतर प्रगल्भ झालेला आहे. काल "बाई वाड्यावर या" या गाण्याव्रर काही मुली आणि महिलाही आपापल्या भावनांचा काहीतरी..... हं..निचरा करत होत्या.
हो काल प्रभात रोड च्या तिथे "कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई" वर साभिनय नाचताना बघून माझे ब्लड्प्रेशर असले वाढले की सरळ घरीच यावे लागले. बायकोला वाटले की त्या फालतू डीजे च्या आवाजामुळे झाले तसे.

मी पण १००% नास्तिक आहे. पण तरीही डॉल्बीवरील बंदीने गणेशोत्सवातली जान निघून गेली, उत्सव मिळमिळित झाला हे वाचून बिचार्‍या 'भक्तां'बद्दल वाईट वाटले. वाईट्ट ते पोलीस आणि प्रशासन हो... फक्त एक प्रश्न राहून राहून मनात येतो , टाळ मृदुंगाच्या जल्लोषात 'माऊली माऊली' वा 'ग्यानबा तुकाराम' असे तोंडाने म्हणत तल्लीन होणार्‍या वारकर्‍यांना डॉल्बीची का बरे गरज पडत नसावी ? त्यांची वारी , त्यातला तो रिंगण सोहळा का बरे मिळमिळीत होत नसावा ?

In reply to by मराठी कथालेखक

त्यांची वारी , त्यातला तो रिंगण सोहळा का बरे मिळमिळीत होत नसावा ?>>>>>> कारण वारी ही संतांनी सुरु केली होती आणि गणेश उत्सव राजकीय नेत्यांनी..!! मी तर बाबा मस्त नाचलो DJ च्या तालावर रात्री पण गणेशा प्रति भाव तुसभर ही कमी नव्हता झाला. (संवेदनशील) कानाच्या लोकांना त्रास हा होणारच. बाकी चालू द्यात

आमच्या सोसायटीसमोर विसर्जन तलाव आहे.कालच्या दिवशी राजकीय नेत्यांचे मंडप पडले.थरथरुन,संतापून, हतबल होऊन आम्ही..........................स्वस्थ बसलो.

न्यायालयाने डॉल्बि डीजेच्या परवानगीचे अधिकार पोलिस अधिक्षकांना दिले आहेत,डॉल्बी चालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही परवानगी दिली गेली नाही,हा मुद्दा आहे.एरवी चिरीमीरी खाणारे या बाबतीत सक्ती का करत आहेत हा मुद्दा आहे.

डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का? ------> हे असे प्रश्न असू शकते -, हेच प्रश्न पडले आहे मला!!!!!

a Supreme Court judgement to state that freedom to practise religion does not extend to “any and every place”. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरत आवाज प्रदूषणा विरुद्ध पाऊले उचलण्याचा "हुकूम"(WRIT OF MANDAMUS) दिला असून नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी प्रत्येक विभागात एक सक्षम अधिकारी नेमण्याचा हुकूम दिला आहे. आणि अशा अधिकाऱ्याने जर कार्यवाही करण्यासाठी काणा डोळा केला तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा घटनेतील कलम २१ प्रमाणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे यात धर्म किंवा जातीचा संबंध येत नाही आणि सर्व धर्माची प्रार्थनास्थळे यांनाही हा आदेश लागू होतो असे न्यायालयाने म्हटले आहे. आवाज फाउंडेशन या संस्थेने केलेल्या अर्जावर दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे( गोंगाट मोजण्याचे मीटर खरेदी न केल्यामुळे) महाराष्ट्राचे गृह सचिव श्री के पी बक्षी याना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. याची पुढची सुनावणी ४ ऑक्टोबर ला आहे. यामुळे चिरीमिरी घेऊन काणा डोळा करणे पोलिसांना अशक्य झालेले आहे. मी स्वतः रात्री १२ वाजून पाच मिनिटांनी आवाजाबद्दल फोन क्र. १०० ला तक्रार केली आणि मुलुंड पोलीस स्टेशनला फोन उचलत नाहीत हि तक्रार केली असता पुढच्या पाच मिनिटात सगळे ढोल ताशे एकदम बंद झाले. दुर्दैवाने पुण्यात याचीअंमलबजावणी नीट झालेली नाही किंवा नागरिकांना याची पुरेशी माहिती नसावी असे वाटते. या गोष्टीला सर्वत्र प्रसिध्धी देणे आवश्यकआहे आणि नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. नवरात्रीत महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी आपल्या आसपास होणाऱ्या आवाजाबद्दल पोलिसांना तक्रार करणे आवश्यक आहे नि पोलीस काही कारवाई करीत नसतील तर आवाज फाउंडेशन च्या वेबसाईट वर तक्रार करा http://www.dnaindia.com/mumbai/report-strictly-implement-noise-pollutio… मिसळपाव वर याबद्दल अगोदर लेख लिहायला पाहिजे होता असे वाटते. नागरिक म्हणून कर्तव्यात कसूर झाल्याबद्दल क्षमस्व.

भ्रष्टाचारातून तयार झालेल्या खड्ड्यात पडून रोज किती जीव जातात, अवैध दारुधंद्यामुळे गरीब मृत्युमुखी पडतात, पोलीसांवर डॉल्बीबंदीचा हकनाक ताण येतो. ते सोडून डॉल्बीच्या मागे का लागता? अ‍ाता गाड्यांमुळे प्रदूषण होतंय म्हणून गाड्या चालवायच्या बंद करायच्या का? बैलगाडाबंदी, फटाकाबंदी, गुलालबंदी, दहीहंडीबंदी तसे आता अगरबत्ती लावायलाही बंदी घालणार का? जनरेटर उद्योग, लाईट उद्योग, कामगार, डेकोरेशन, सुतारकाम वगैरे अनेक लोक या बंदीमुळे बेकार होतील. हे कमी शिक्षण असणारे कामगार बेरोजगार होतील आणि ध्वनीप्रदूषणापेक्षा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होईल. हे एसीमध्ये बसून डॉल्बीवर बंदी घालणारे कधी महाराष्ट्रावर सुलतानी-अस्मानी संकटं आल्यावर धावून आलेत का? विनाकारण डॉल्बीचा इश्यू मोठा करुन गोरगरीब-कामगारांवर अन्याक होतोय. (इति व्हाट्सॅप फॉर्वर्ड)

In reply to by आजानुकर्ण

व्हॅट्सऍप वर येणाऱ्या ढकलपत्रांची लायकी काय असते ते आपल्याला माहिती आहे. सोमवार पेठेत राहणारे आमचे आजोबा घराच्या तीन बाजूला असलेल्या गणेश मंडळांच्या बोम्बल्या लाउड स्पीकरच्या आवाजाने वेडे पिसे होत याची आठवण होत आहे. १०० लोकांच्या सणासाठी १० हजार लोकांना वेठीस धरणे हा मूलभूत हक्काची पायमल्ली आहे. हे ढकलपत्र पाठवणाऱ्या माणसाला दहीहंडीच्या दिवशी मुंबईत के इ एम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग उपचाराच्या कक्षात उभे केले पाहिजे. मी १९८८ साली तेथे दहीहंडी च्या दिवशी गेलो तेंव्हा तेथील शल्यक्रियागृह रात्रभर चालू होते आणि तेथे ६८ जणांना शल्यक्रिया करायला लागली. बाकी ज्यांना शक्य आहे त्यांना प्लास्टर घालून घरी पाठवून दिलं. The Supreme Court may have recently woken up to the inherent danger of ever-steeper human pyramids and the participation of under-age govindas but doctors have long had to deal with the fallout of this revelry. Last year, one person died, while 129 were injured, a significant fall from one death and 290 injuries in 2014. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Extra-KEM-docs-to-be-on-… http://indianexpress.com/article/mumbai/365-govindas-hurt-in-dahi-handi… नऊ थरांची हंडी केली पाहिजे हे कुठल्या धर्मग्रन्थात लिहिले आहे? हा सर्व बाजार आणि त्यांचे प्रायोजक यांनी आपल्या सण आणि समारंभाचे अपहरण केले आहे आणि सामान्य माणसांना वेठीस धरलेले आहे. दहीहंडी वरून पडून जे तरुण कायमचे जायबंदी होतात त्यांच्या आयुष्याची वाताहत होते हे पाहायला कोणता राजकीय पक्ष येतो. त्यांच्या तालावर नाचून आपल्या सणाचे असे व्यंग करणे हा मूर्खपणा आहे. जी तरुण मुले मृत्यूमुखी पडतात त्यांच्या आई वडिलांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे. कांता राजकीय पक्ष किंवा त्यांचा कार्यकर्ता अशा आईबापाला म्हातारपणात आधार देतो आहे? आमच्या लहानपणी आम्ही तीन थरांची हंडी करीत होतो. मोठी माणसे पडणाऱ्या मुलांना पकडायला उभी राहत. दहा वर्षात एकही मुलाला दुखापत झाली नाही. आमचा सण कुठे कमी पडला?

In reply to by सुबोध खरे

"आमच्या लहानपणी आम्ही तीन थरांची हंडी करीत होतो. मोठी माणसे पडणाऱ्या मुलांना पकडायला उभी राहत. दहा वर्षात एकही मुलाला दुखापत झाली नाही. आमचा सण कुठे कमी पडला?" खरंच सणांमधला तो निरागसपणा आता जवळजवळ नामशेष झाला आहे. पूर्वी गणपती म्हटले के कितीतरी कार्यक्रम असायचे. कथाकथन, नाटके, व्याख्याने ह्यांची मेजवानी असायची. मंडळातल्या मुलांचे कितीतरी कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. हल्ली ते सारे मागे पडले आहे.

सगळे सण.. गणपती, शिवजयंती, काळा पहाड - Tue, 24/03/2015 - 16:15 सगळे सण.. गणपती, शिवजयंती, दिवाळी, दुर्गाष्टमी, आंबेडकर जयंती, मुहर्रम, फर्स्ट इयर, सगळे बर्थडेज पब्लिक पद्धतीनं साजरे करायला कायद्यानं आणि बळाचा वापर करून बंदी आणली पाहिजे. तुमचा धर्म तुमच्या घरात. रस्त्यावर नको. इथं आधी एक गणपती म्हणजेच फक्त त्रास होता आता सगळ्या सणांना हे बेक्कार लोक डीजे आणि ढोल ताशे घेवून फिरतात. ज्यांना एवढंच नाचायचंय त्यांची रग उतरवायला पोलिसांनी सगळ्यांना परेड करून रस्त्यातले खड्डे भरायच्या आणि ट्रॅफिक मॅनेज करायच्या कामाला जुंपलं पाहिजे. जबरदस्तीनं. डेली त्रास साला. http://www.misalpav.com/comment/680927#comment-680927 अजुनही तितकीच लागु कमेंट!!

या चर्चेत तशी बरीच उशीरा एंट्री मारत आहे. तरीही
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
यातले तांत्रिक डिटेल माहित नाहीत. पण गणेशोत्सवाच्या नावावर जो अभूतपूर्व धांगडधिंगा चालतो तो तरी नक्कीच वाईट आहे.
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
ते त्यांचे मत झाले आणि त्यात तुम्हाला तथ्य जाणवले. पण तेच इतरांनाही पटावे असे अजिबात नाही.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे? याचे उत्तर वर घाटपांडे काकांनी दिलेच आहे.
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
नाही. त्याउलट पोलिस अतिरेक करत नसून फारच सौम्य भूमिका घेत आहेत असे वाटते.
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
हो ना. इतक्या सगळ्या गोष्टींनी लोक मरतात--कोणी कॅन्सरने तर कोणी हृदयविकाराने.आणि हे पण अगदी सर्रास होते.मग बॉम्बस्फोटात काही लोक मारले गेल्यानंतरच एवढा गहजब का होतो?
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
अजिबात नाही. किंबहुना पुढील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावरच बंदी घालावी असे मत असल्यामुळे डॉल्बी-डीजे यांना परवानगी द्यावी असे वाटायचा प्रश्नच नाही.

एव्हाना आपल्या लक्षात आल असेल की सुजाण सुसंस्कृत व विवेकी असण्याचा व अस्तिक नास्तिकतेचा संबंध नाही! असो!

लांडगे अस्तिक-नास्तिक दोन्ही कळपात असतात आणि संधी ची वाट बघत असतात. ढोंगी लांडग्यावरून जनरलायझेशन...... असोच. कळपाबाहेरचा झेन

बंदोबस्ताच्या पोलिसांचे काय हाल होत असतील दीवसाचे २०-२० तास डॉल्बीच्या पुढे उभे राहुन? प्रतिज्ञापत्र देउनही सर्रास अतीउच्च आवाजात डॉल्बी लावली जाते, हटकणार्या पोलिसांना मंडळाचे मुजोर कार्यकर्ते मारहाण करतात. एकंदरीत डॉल्बीला परवानगी देण्यासारखी परीस्तीती राहीली नाही. भक्ती भावनेचा नीचरा टाळ्या वाजऊन, भजन गाउन करता येतो. बाकी सगळ्या भावनांचा नीचरा रस्त्यावर करायची गरज नाही. शतकाच्या ईतिहासात ९०% वेळा गणेशोत्सव डॉल्बीशीवाय उत्तम रीत्या, कुणालाही त्रास न होता पार पडला आहे, वाढला आहे. त्यामुळे, गणेशोत्सवात डॉल्बी सारख्या सिस्टमची काहीही गरज नाही.

गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा साजरी होणारी शिवजयंती, दहीहंडी, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बौद्ध पौर्णिमा, ताबूत, मोहर्रम, लग्नमुंजीच्या मिरवणुका, श्रावणातील सार्वजनिक सत्यनारायण इ. रस्त्यावर येऊन साजरे होणारे सर्व सण, समारंभ पूर्णपणे बंद व्हायला हवे.

दिवसेंदिवस गणेशोत्सवाचा प्रवास गुड टू बॅड टू वर्स्ट होत चाललाय, 15 20 वर्षांपूर्वी खूप छान साजरा व्हायचा हा उत्सव, त्याची आतुरतेने वाटही पहायचो, सोसायटीतले लोक सगळे मिळून गणपती पहायला जायचे, मजा असायची, नंतर गर्दीचे वाईट अनुभव यायला लागले आणि मग इच्छाच गेली. एकदा मिरवणूकीत पाहिले, बाप्पाच्या मूर्तीसमोर टेम्पोवर उभा राहून एक तृतीयपंथी कुठल्या बकवास गाण्यावर इतका अचकट विचकट नाच करत होता, लोक त्याला वर अजून प्रोत्साहन देत होते, किळसवाणा प्रकार सगळा. आत्ताही तसेच दृश्य दिसते सगळीकडे, काल रस्त्याकडील लोखंडी रेलींवर उभा राहून नाचणारा, फुल झिंगाट तर्राट झालेला, कधीही पडू शकेल अशा अवस्थेत एक माणूस पाहिला. यावेळेस पहिल्यांदा असं झालं की विसर्जन मिरवणूक पहायला बाहेर पडलो, जेमतेम थोडं फिरलो असू, पण त्या गर्दी आणि दणदणाटाने इतका त्रास व्हायला लागला की लगेच मागे फिरलो. तो डॉल्बी, डीजे प्रकार भयंकर असतो, छळच एक प्रकारे, त्या आवाजाने एखाद्याचा हार्टफेल व्हायचा, तासनतास तो गोंगाट सहन करणाऱ्या पोलिसांचे किती हाल होतात, एकूण सगळ्या सिस्टीमवरच किती ताण येतो हे दहा दिवस, फक्त मानाच्या गणपतींची मिरवणूक मात्र छान असते, ढोल ताशे, पारंपारिक खेळ इ.मुळे प्रेक्षणीय, श्रवणीय आणि शिस्तबद्ध. सर्वच आवाजी उत्सव सिरियसली बंद व्हायला हवेत, त्यातून काहीही साध्य होत नाही, त्यामागील मूळ विचार, हेतू केव्हाच मागे पडलेत.

सगळे डॉल्बी फोडून टाकले पाहिजेत अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहे. छातीवर हातोडी मारल्यागत वाटते. छुपे ज्यामर लावून हल्लू हल्लू सगळ्या डॉल्बीची वाट लावली पाहिजे असे हिंस्र विचार आजकाल मनात फार येऊ लागलेत.

In reply to by बॅटमॅन

हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्‍यांना देवाने जाम शिक्षा द्यावी त्यासाठी मी त्याला लोटांगण घालायला तयार आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्‍यांना देवाने जाम शिक्षा द्यावी त्यासाठी मी त्याला लोटांगण घालायला तयार आहे
अरे वा! मग उद्यापासून १०८ प्रदक्षिणा आणि लोटांगणे तुमच्या आवडीच्या/निवडीच्या देवाला (कुठल्यापण धर्माच्या चालेल हो) घाला आणि मग पहा चमत्कार! शिक्षा म्हणून पुढच्या जन्मी त्या सर्वांची घरे उन्हात बांधली जातील याची मी खात्री देतो बघा. :)

व्हॉट्स अप वरून साभार पप्पी दे पप्पी दे पारुला.. आवाज वाढव DJ तुला आईची.. चिमणी उडाली भुर्र.. पोरी जरा जपून दांडा धर.. झिंग झिंग झींगाट... या आणि अशा अनेक भक्तीरसाने ओथंबलेल्या गाण्यांच्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती किंवा इतर सणाच्या काळात विविध चित्रपटांची गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवली जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न. ------ कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला बाई मज बघतोय रिक्षावाला अतिशय भाव पूर्ण गाणं आहे. अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही ------ बिडी जलैले जिगर से पिया ... जिगर मा बडी आग है.... अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे. ------- आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे ... अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे डीजे म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्या शी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगनियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय. ------ पप्पी दे पप्पी दे पारूला अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे. ------- झालय झिंग झिंगाट देवीची आरती चालू असताना जस भगत च्या अंगी येत तस तुज़्या आगमना नी मि त्या आनंदानी कोणता ही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा ----- याड लागल भगवंताच्या भक्तित लोक इतके वेडे होतात घर दार संपत्ति माया मोह सगळे पाश तुटले जातात न तुज याड लागत ------ D j वाले बाबू मेरा गाना बजाओ भगवंताला अत्यंत कळकळी ने सांगितले आहे या भावगीता मधे डीजे वाले म्हणजे भगवंत भगवंता माझी प्रार्थना तुज़्या हृदया पर्यन्त पोहचावी म्हणून तुच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण जे तुला हव हे भाव मनात जागवत आता गणेशोत्सवातील गाणी ऐका. आता त्रास होणार नाह

या सगळ्यात कोणी त्या निचर्‍याबद्दल बोललेच नाही की राव. मुळात असाही निचरा वगैरे गरजेची गोष्ट आहे हे खरंय पण कुठेपण कोपरा गाठून मोकळे होण्यासारखं हे होतंय. करा की निचरा इतरांना कशाला त्रास (ते सफाई वगैरे कुचकामी सल्ले आहेत)? मुळात निचराच करायचा तर "समाजसेवक" अशा नेत्यांनी साउंडप्रूफ असे हॉल सारखे क्लब्स (आपलं ते उत्सव कार्यालये) बांधावीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डिजे वगैरे निचर्‍यासाठी जे काय लागेल ते फुकट उपलब्ध करुन द्यावे. रग जिरेपत्तूर नाचावे आणि गप घरी जावे. दर शुक्रवारी/शनिवारी हेच कारेक्रम इतरांसाठी पण ठेवावे. एक दिवस मिक्स आणि एकेक दिवस एकच जेंडरच्या लोकांना असे वाटप करावे फारतर (आऱक्षण पण लागू करा ;)). ते देवा-धर्माचं वायलं आणि हे निचर्‍याचं वायलं, हे ध्यानात घेतलं पायजे.
गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा साजरी होणारी शिवजयंती, दहीहंडी, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बौद्ध पौर्णिमा, ताबूत, मोहर्रम, लग्नमुंजीच्या मिरवणुका, श्रावणातील सार्वजनिक सत्यनारायण इ. रस्त्यावर येऊन साजरे होणारे सर्व सण, समारंभ पूर्णपणे बंद व्हायला हवे.
येग्झॅक्टली. यात अजून राजकीय/जातीय आणि कसलेकसले मेळावे पण अ‍ॅडवा. जे काय साजरं करायचंय ते रस्त्यावर येऊन, इतरांच्या दारात जाऊन, दुसर्‍यांना त्रास होईल असं नको. क्लबात जाऊन कानठळ्या आवाजात झिंगून मनसोक्त नाचावे, मैदानात फक्त खेळ व्हावेत आणि रस्त्यावर फक्त दळण-वळण (मग फुटपाथ चालणार्‍यांसाठी रिकामे व्हावेत हे पण आलंच) व्हावं. सिम्पल्स.!! पण इतका साधा-सरळ-सोपा विचार केला तर कसं चालेल.

In reply to by अस्वस्थामा

खरच चांगला विचार आहे, मला मध्ये काही दिवसापूर्वी एका आयडीने विचारणाही केलेली. सोलापुरात इतका उत्सवाचा भडीमार असतो काही लिहित का नाही. मी स्वतःच या उत्सवाच्या अर्थकारणात जी साखळी असते त्याच्याशी संबधित आहे, सो माझे इंटरेस्ट असतातच. पण एक नागरिक म्हनून नाही बघवत हे. नवल ह्याचेच वाटते की, लोकमान्यानी जो उत्सव बघून ती आयडीया पुण्यात राबवली तो गणपती आमच्या गावातला. आजोबा गणपती. स्वामी श्रध्दानंदांची परंपरा ती. पण नंतर पुण्याच्याच डीजे स्पीकर वॉल, १००-१०० जणाचे ढोलपथक असल्या दलिंदर प्रथा का अनुकरण कराव्यास्या वाटू लागल्या. यंदा परत ते मुलींनी पण फेटे बिटे बांधून ढोल वाजवायचे, मग त्याना बघायला गर्दी, त्यांचे फॅशन शो, तासातासाने मेकप टच करायला एक व्हॅन. च्यामारी काय हाय काय हे? मग ज्ञान्प्रबोधीनी पण. मग पोरांनी उगी फेटेबिटे बांधून बुलेटवर रॅल्या काढायच्या, अरे काय हे. सोलापुरात परंपरा लेझीमची. एकेका मंडळाचे दीड दोन हजार जणांचे पथ लेझीम खेळते. शिस्तीत, एका ड्रेसात. लोकल आमदार खासदारांचे पण डाव पाठ असतात. स्वतः लेझीम घेऊन खेळतात ते. त्याच्या प्रॅक्टीस रात्री रस्त्यावर चालायच्या पण आवाज नाही जास्त. एक हलगी, दोन तडमताशे. बास्स. एका मंडळाने तर एका वर्षी नेहमीचा हलगीवाला एन वेळी निधन पावला म्हनून फक्त संबळाच्या आवाजावर लेझीम खेळला. त्या लेझीमवाल्यांना पण आता डीजेची चटक लावायला सुरुवात झालीय. मानाची मंडळे वन ब्रँड स्पॉन्सर होतात, वर्गणी न मागता येते. सगळे चालते. लिहायला बसलो तर टेराबाईटी मॅटर होईल पण डोक्याच्या बाहेरचा विषय झालाय. सोलापुरच्याच भाषेत "बसबस केलंय"

सोपी आयडीया .. या बाबतीत चिन चा आदर्श घ्यावा .. तिकडे मुख्य सणांना ५ दिवस सुट्टी असते .. पण आधिचा व नंतरचा शनिवार रविवार वर्कींग असतो ... मोठी सुट्टी. मिळआल्याने ज्यांना आवडत नाही ते शहरा बाहेर जातील .. आणि ज्यांना साजरा करायचा आहे ते साजरा पण करतील ..

काही अवांतर शंका.. 1. डॉल्बी डीजे वर बंदी आणली तशी ढोलपथकांवर का आणल्या जात नाही ? की ढोलपथकांमुळे संस्कृतीरक्षण होते आणि डॉल्बी मुळे होत नाही ? माझ्या माहितीप्रमाणे हे ढोलपथकं पोलिसांना आणि कायद्यांना अजिबात जुमानत नाहीत 2. ढोलपथकांच्या सादरीकरणामध्ये नावीन्य का नसते ? त्याच त्याच थीम वर्षानुवर्षे वाजवतात आणि वरून त्याचा अभिमान सदृश माज दाखवतात. 3. ढोल वाजवत असताना ते एक घंटासदृश्य वाद्य ठणाणण्यात येते. या दोन वाद्यांचा संगीताच्या पातळीवर नेमका काय संबंध आहे ? 4.ढोलपथक आणि डॉल्बी वाजवणाऱ्या कोणाच्याच घरात पेशंट, लहान मुलं, म्हातारे आजी आजोबा नसतात का?

रामकुंडावर एकदा एक छोटीशी पालखी मिरवणूक बघितली होती, अंदाजे वीसेक जण वाजवत असतील, सर्व पारंपरिक वाद्य, चामड्याचे. प्लास्टिक नाही, इतका सुंदर आणि अंगात भिनत जाणारा आवाज कि क्या बात है.. विशेष म्हणजे त्या मिरावणुकीपासून दीडशे फुटावर काहीच ऐकू येत नव्हते, जवळ गेल्यावर त्रास नव्हे तर गुंगी चढत होती नादाची, खरोखर काही गोष्टी मिनियेचर छान असतात, फुगवून मोठ्या केल्या कि फक्त मोठेपणाचं समाधान मिळतं, बाकी सगळं हरवते,