Skip to main content

डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो. उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो. १. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते? २.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते. ३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे? ४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का? ५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.! ६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?

वाचने 36087
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

येत्या दसऱ्याला प्रत्येक शहरातल्या, गावातल्या प्रशासनाने (पोलीस/पालिका) सर्व डॉल्बी मैदानात उभ्या कराव्यात आणि रावणाचे दहन करण्यापेक्षा डॉल्बी नामक राक्षसाचे दहन करावे असे मला वाटते.

आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
असो.

In reply to by संदीप डांगे

खून बलात्कार दरोडे चोर्‍या आणि इतर अनेक अवैध गोष्टी घडत असतात.तेथेथेहीम तेथेही लागू पडेल की मग. असो..... सातार्‍यात दोन वर्षापूर्वी डॉलबी च्या आवाजाच्या हादर्‍याने ऐन मिरवणूकीत एक जुनी इमारत पडून त्याखाली लोक च्चिरडून मेले. रेझोनन्स मुळे एखादी इमारत मानवी र्‍हदयाचे काय होत असेल मग?

पोलिसांना सूट देणे चुकीचे आहे. कायदा कुठे आणि कसा apply व्हावा ह्याबाबत clarity असणे अत्यावश्यक आहे नाहीतर पोलीस आपले जीवन सोपे बनवतील आणि जनतेच्या हक्काची पायमल्ली करतील. उदा कुणी दंगा घडवून आणायची धमकी दिल्यास पोलीस त्यांना सोडून देतील आणि पापभिरू लोकांना जास्त दटावतील. गणेशोत्सव म्हणजे काल तयार झालेला उत्सव नसून जवळ जवळ एक शतकाचा त्याचा इतिहास आहे आणि आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही.

In reply to by साहना

तुमचा पत्ता द्या ना प्लिज, पुढच्या गणपतीला तुमच्या घरासमोर तीस तास मिरवणूक नाचवणार फुल्ल डिजे लावून! आपल्याला लै आनंद झाला तुमच्यासारखे सपोर्टर पाहून. तेवढा मान तर तुम्हाला दिलाच पाहिजे. s भाड में जाये जनता, मै नाचू जैसे मन मंगता

In reply to by अजया

:-))) संदिप साहेब माझ्यातर्फे आणिक ३ भिंती...

In reply to by संदीप डांगे

अगदी अगदी...आपण ३-३ तास वेगवेगळ्या मंडळांना संधी देउ...प्रत्येकाला भावनेचा निचरा व्हायला तितकीच मदत...सगळी सोसायटी आर्टिश्टिक फ्लेक्ष लावुन सजवू (फ्लेक्ष बनवायचे काँट्रॅक्ट आप्ल्या अभ्याकडेच द्यायचे)

In reply to by साहना

'पोलिसांना सूट दिली' ह्याचा अर्थ स्वतः पोलिसांनी तसे काही केले तर हरकत नाही ( They are an exception to the rule) असा होतो. तसे काही केलेले दिसत नाही. आपणांस 'पोलिसांना "डॉल्बी सिस्टीम"* असावी किंवा नसावी" हे केस-बाय-केस ठरवण्याची जबाबदारी दिली आहे, ते चूक आहे' असे म्हणायचे असावे. तसे असेल तर ते अगदी अव्यवहार्य आहे. 'उन्मादा'ची बाब हाताबाहेर जायला लागली तर ती कुठल्यातरी सरकारी विभागाने/खात्याने स्वतःच्या अखत्यारीतच ठरवून त्यावर जे काही करायचे ते केले पाहिजे. आता हे ठरवतांना जे काही निकष त्यांनी वापरायचे, व ते कसे वापरायचे त्यात, ह्या बाबीच्या गांभिर्यानुसार तारतम्य असावे. म्हणजे अगदी ते संपूर्ण शास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक केसमध्ये साऊंड लेव्हलची मोजमापे घेऊन, कागदोपत्री तशी नोंद करून त्यानुसार निवाडर्यानुसाराशी अपेक्षा करणे अव्यवहार्य आहे, म्हणून चुकिचे आहे. (* ह्या सर्वात 'डॉल्बी लॅब्स' उगाच बदनाम होते आहे, पण तो वेगळा विषय आहे).

मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते Kaka kenjale wah Kay bolalat aapan :)

डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? Great-Thinker, Kumthekar, Kenjale who or whatever you are tell us the advantages of the mentioned sound systems first. उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का? What do you mean by that ? ताब्यात दिला आहे ? बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला Disgusting I could have ignore and kick this dhaga on paud phata as I always do for yours but any way ..

तुमचा पत्ता द्या ना प्लिज, पुढच्या गणपतीला तुमच्या घरासमोर तीस तास मिरवणूक नाचवणार फुल्ल डिजे लावून! If Mandar Kenjale is ready for this, I promise i will bear all the expenses for DJ and anything that is / will require to make the festival a spicy one. As Kenjale feel it मिळमिळीत this time. Let's have it Baby thinker.

आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही. Sahna ji ka Kya kahna :(

कायदा कुठे आणि कसा apply व्हावा ह्याबाबत clarity असणे अत्यावश्यक आहे. Sahana ji knows it better than a bench of high Cort then. Sahana ji ka kya kahana :)

१) होय, वाईट आहेत असे वाटते. त्या अनारोग्यकारक आहेत. २) पारंपारीक गणेशविसर्जन मिरवणूक कशी असायची हे पाहिले तर मिळमिळीत वाटणार नाही. आता भक्तिभाव जर मिळमिळीत वाटत असेल तर दोष लोकांच्या विचारात आहे. ३)तरुणाईच्या उन्मादाचा निचरा होण्यास सरकारने दुसरे उपाय योजावेत. ५० टक्के तरुणाई आहे व ५० टक्के निर्बल जनता आहे असे मानल्यास निर्बलांच्या जिवावर तरुणांनी उन्मादाचा निचरा करण्याचे अधिकार नाहीत. एवढेच गाजवायची खुमखुमी असेल तर एखादी झोपडपट्टी, समुद्र किनारा, गटारगंगा, कचर्‍याचे राज्य असलेली ठिकाणे सफाईस घ्यावीत. सगळी रग जिरेल. अगदी तसेही नकोच असेल तर घरातील माळ्यावर चढवून जुन्या ट्रंका, पेट्या काढून त्यातील सफाई करण्यात आपल्या पालकांना गृहस्वच्छतेस हातभार लावावा. दिवाळीही येऊ घातलिये. भरपूर फराळाचे पदार्थ करून नातेवाईकांना, गरिबान्ला वाटून या. ४)न्यायालयाचा निर्णय पोलिस अमलात आणतायत म्हणून त्यास अतिरेक म्हणताय का? ५)कश्याला? केलाय ना तो आवाज बंद आता! शांत बसा. दिवसभर हॉर्न वाजवून डॉल्बीचा अनुभव देतच असतात!

In reply to by रेवती

येथे निर्बल या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. नाचल्याशिवाय पर्याय नाही असे वाटणारी ती तरुणाई व ज्यांना यात पडायचे नाही ती निर्बल असे तात्पुरते मानले आहे.

In reply to by रेवती

मस्त प्रतिसाद आहे. मागे सातार्यात डोल्बी मुळे भिंत पडली आणि काही लोक चेंगरून मेलें. कुत्री- इतर पक्षी - आजारी माणसे - म्हातारी माणसे - लहान बाळे - इतर सामान्य माणसे - ह्या सगळ्यापेक्षा ह्यांची खुमखुमी महत्त्वाची! ऱेवतीं नी सागितलेल्या गोष्टी करा खरच रग असल्यास

In reply to by सस्नेह

तुम्ही दोघेही त्याप्रमाणात बरोबर बोलताय, कारण वृत्तपत्रात वेगवेगळ्या बातम्या होत्या. ह्या बातमीनुसार भिंत पडून 3 जणांचा मृत्यू तर ह्या बातमी नुसार घर कोसळून तिघांचा मृत्यू. पण मी त्या भागातील असल्यामुळे व स्थानिक मराठी वृत्तपत्र वाचल्यामुळे भिंतच पडली होती असं म्हणेन.

In reply to by अमितदादा

LIC बिल्डिंगच्या शेजारची जी इमारत २०१४ च्या गणेशोत्सवात पडली तिच्या जवळ दोन इमारती सोडून मी रहात होते.

In reply to by सस्नेह

धन्यवाद, गैरसमज दूर केल्याबद्दल. कारण वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही प्रकारच्या बातम्या वाचल्या होत्या.

In reply to by सस्नेह

ताई हि पहा सकाळ मधील बातमी ह्या बातमीनुसार राजपथावर डॉल्बीच्या दणदणाटात शेकडो युवक थिरकत असतानाच साडेदहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत जनता बॅंकेलगतची "प्रीतम एजन्सी‘ हे दुकान असलेल्या इमारतीची भिंत "बीएसएनएल‘ कार्यालयाकडे जाणाऱ्या बोळात कोसळली. या दुर्घटनेत चारही लोक दगड, वीट, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. . अर्थात ह्या बातमीपेक्षा मी तुमच्यावर विश्वास ठेवेन कारण तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात.

In reply to by अमितदादा

तसेच हि प्रतिक्रिया विषय वाढवण्यासाठी किंवा प्रतिवाद करण्यासाठी नसून, मी त्यावेळी अशी बातमी स्थानिक वर्तमानपत्रात वाचली होती हे सिद्ध करण्यासाठी आहे.

Let me tell you it is call typo if you are looking so precisely. Marathit jar hya phone varun lihita aale aste tar English madhye naste lihile ho.

One more thing Sadhana ji (ohh ha cha dha zala) sorry Sahana ji tumchi Californian social service aawadli baw aaplyala. आम्ही कॅलिफोर्निया मध्ये ग्लोबल धर्म फौंडेशन चालवतो (अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्र) मी स्वतः Bookstruck.in द्वारे भारतीय साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे. They (गरीब) are fortunate that they have religious books instead of bread...or say instead of Kalashnikov.

३०० .

गणेशोत्सवातील डॉल्बी डीजेमुळेच तर आम्हाला नवनविन भक्तीगीते ऐकायला मिळतात. आता कालचंच पहा ना. वेळ रात्री जवळपास बाराची. एका मंडळाने अगदी आर्त स्वरातील "बाई वाड्यावर या" हे भक्तीगीत लावले होते. किती आपुलकी असते या लोकांना. स्वतः तर भक्तीरसात न्हाऊन निघतातच, आजूबाजूच्या बायांनाही भक्ती करायला वाड्यावर बोलावतात. गेल्यावर्षी "शांताबाई" हे भारुड माहिती झाले. त्याच्या आधीच्या वर्षी "पप्पी दे पप्पी दे पारुला" हे भक्तीगीत माहिती झाले ते गणेशोत्सवातच. त्यामुळे डॉल्बी डीजेवर बंदी हा आमच्या धर्माची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. पण तो आम्ही हाणून पाडू. जर कोणाला आमच्या या पवित्र भक्तीचा त्रास होत असेल तर त्यांनी आमच्या सणांच्या दिवसांमध्ये परदेशात जाऊन राहावे.

वेड मला वाद्याचा जल्लोष माझ्या ढोल-ताशाचा गर्व नव्हे तर मला माज आहे वादक असल्याचा


In reply to by संदीप डांगे

एका परात्पर गुरुंनी माझी जन्महिंदू अशी संभावना केल्याने माझे रक्त आता पेटून उठले आहे. आता माघार नाही. नादच खुळा. आता वाघाच्या जबडयात हात घालून त्याचे दातच मोजायचे.

In reply to by बोका-ए-आझम

अरे वा बोकेशा. लक्षात आहे तुमच्या? बादवे, परवा किशोर कदम, संदीप पाठक वगैरे सिरिअल पब्लिक शूटिंग्साठी आलेलं. हॉटेलात आले. फोटो बिटो काढले. गोरखने त्यांना पण विचारले. "पगार कीती पडतो म्हनून" आम्ही हाणायचा बाकी ठेवलेला. संदीपने का कुणीतरी आकडा सांगितला म्हणे.

In reply to by अभ्या..

गोरखला पत्रकारितेत जायला सांगा. कल्ला करेल तो तिथे. कुणालाही काहीही थंडपणे विचारू शकणारे लोक सध्या नाहीयेत तिथे.

In reply to by सतिश गावडे

हात सांभाळ रे...वाघाने हातच खाल्ला तर तुझ्या भावनांचा निचरा होणे कठिण होउन बसेल =))

In reply to by सतिश गावडे

@ "पप्पी दे पप्पी दे पारुला" ››› http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif @
एका परात्पर गुरुंनी माझी जन्महिंदू अशी संभावना केल्याने माझे रक्त आता पेटून उठले आहे. आता माघार नाही. नादच खुळा. आता वाघाच्या जबडयात हात घालून त्याचे दातच मोजायचे.
››› http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif कचकूण उप हास!

In reply to by सतिश गावडे

आता वाघाच्या जबडयात हात घालून त्याचे दातच मोजायचे.
हा टोला कोणासाठी????? एका समाजाचा किंबहुना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि शौर्याचा गौरव म्हणून "ते" वाक्य रूपक अर्थाने वापरले आहे. (खरोखरच कोण दात मोजायला जात नाहीत)

In reply to by सतिश गावडे

पुढच्या वर्षासाठी चे भक्ती सन्गीत हे ऐका डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे मग म्हना जाउंद्या ना बाळासाहेब

या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर हा लेख जरुर वाचावा. लोक हल्ली बलात्काराविषयी पण असच बोंब मारतात. खर तर तो लैंगिक भावनांचा निचरा आहे. फार असहिष्णु होत चाललेत लोक.

लेख आणि प्रतिसाद महाळॉळ आहेत! =)) =)) =)) लेखकराव, तुमचा काय साऊंड सिस्टीम भाड्याने द्यायचा साईड बिझनेस हाय का? त्या बिचार्‍या गणपती बाप्पावर तरी दया करा. हल्ली तो आवाजाला घाबरून पृथ्वीवर येतच नाही म्हणे!

मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.
गणेशोत्सव करूण झाला आहे याबद्दल सहमत.

काय सांगता, DJ वर बंदी होती. काल आमच्या विभागात गणपती विसर्जनाच्या वेळी फुल्ल आवाजात DJ वाजत होता, आणि तो पण रात्री 11 नंतर बंद झाला(उपकार केले आमच्या वर 11 ला बंद करून).
आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत
विवाहात कुठल्या प्रकारच्या उन्मादाचा निचरा करता आपण, कळावे...
उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
जॅम लफडा आहे आपला, बिचार्या पोलिसांनी काय करावं. जर पोलिसांनी, DJ कडे दुर्लक्ष केला असतं तर ह्याच धाग्याचा विषय जरा वेगळा असता... हा धागा पोलिसांच्या गलथान कारभारा बद्दल आणि गणेशोत्सवात होणाऱ्या उन्मादाबद्दल असता ... नाही का? अवांतर: आपलं बेअरिंग सुटत आहे असं माझं आपलं मत, खुपचं मावळ धागे आणि प्रतिसाद असतात आपले. कि ह्या id चं बेअरिंग मवाळ ठेवलं आहे आपण. अति अवांतर: सिगरेट सुटली का ??

काय राव , काळ मिरवणुकीत फुल्ल टाईट का ?

मुळात सर्व जाती धर्म पंथ आणि जे जे काही असेल त्या सगळ्यांचे सगळे उत्सव सण प्रथा चालीरीती, ह्या पैकी काहीही रस्त्यावर येऊन करण्याची गरज नाही. सगळं बंद करा. ज्याला त्याला ठराविक बंदिस्त जागा द्या आणि घाला म्हणा काय गोंधळ घालयचा तो. मुर्खांचा बाजार साला. आला गणपती नाचा, आली शिवजयंती नाचा, आली आंबेडकर जयंती नाचा, आली इद/मोहरम नाचा. म्हणजे निमित्त काहीही असो, उद्देश एकच, रस्त्यावर भयंकर कर्कश्य आवाजात आचकट विचकट गाणी वाजवायची त्या गाण्याच्या शब्दांनाही लाजवेल असे आचकट विचकट अंगविक्षेप करुन नाचायचे. तेही दारु पिऊन!! आणि ह्या सगळ्यामुळे सरकार आणि न्यायालयाला आपला वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करायला लागावा, या इतका दुसरा मुर्खपणा नाही. अरे कसले नियम करतात आणि कसले त्यावरुन वाद उकरुन काढतात? काही अक्कल?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

+1111

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मुळात सर्व जाती धर्म पंथ आणि जे जे काही असेल त्या सगळ्यांचे सगळे उत्सव सण प्रथा चालीरीती, ह्या पैकी काहीही रस्त्यावर येऊन करण्याची गरज नाही +१०० हे असे सर्व लष्करी तळांवर असते. त्यामुळे सणांचे पावित्र्य हि टिकून आहे आणि दोन धर्मियात अजिबात वाद किंवा तेढ नाही. मंदिरावरील स्पीकरच्या आवाज १५ फुटाच्या पलीकडे जात नाही कि मशिदीवरील भोंगे कानठळ्या बसवीत नाहीत. मिरवणुकीला डीजे किंवा बोम्बल्या( लाउड स्पीकर)ला परवानगी नाही). आवाजाची मर्यादा वाढली कि मशिदीवरचे लाऊड स्पीकर आधी बंद करा अशा तर्हेचा बचावाचा पवित्र घेण्याचा प्रश्नच नाही. http://www.hindustantimes.com/mumbai-news/ganeshotsav-noise-levels-abov… सगळे नियम धाब्यावर बसवून सण साजरे करण्याला प्रतिबंध घातलाच पाहिजे. ढोल ताशे तर फोडून टाकले पाहिजेत. १०० लोकांच्या भावनेचा निचरा होण्यासाठी १० हजार लोकांना वेथस धरण्याचा हा अश्लाघ्य प्रकार ताबडतोब थांबवला पाहिजे.

In reply to by मोदक

हि बघा सारली काडी मोदकाने.. काय रे मोदका?? :P

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मि. का., तुम्च्या मतान्ना ह्य अधिक काय सहमत होऊ शकेल कुणी? इत्क सहज आणिक सटिक लिहिले आहे. उम्मीद आहे कि तुमचे हे मत वाचल्या नन्तर काहिच शन्का उरणार नाहित. -आ. निनाव.

धागाकर्त्याने हा धागा काढुन मिपाकरांना त्यांचा उन्माद रिचवण्यास जी मदत केली आहे त्याला तोड नाही.. तर मंडळी वाजवा..! "आवाज वाढव डिजे तुज्या...