.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
बाप्पाचा नैवेद्यः शाही खीर
साहित्यः
२ लीटर दूध
१ वाटी भिजवून, भरडसर वाटलेले तांदूळ
पाव वाटीपेक्षा जरा कमी खवा किसून घेणे
पाऊण वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) साखर
काजू, बदाम, पिस्ता काप
अर्धा टीस्पून वेलचीपूड
पाव टीस्पून जायफळपूड
केशर
कृती:
ही खीर मी मातीच्या भांड्यात बनवली आहे, मूळ पाककृतीत मातीच्या भांड्यात किंवा कुंडीत ही खीर बनवली जाते.
प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यात दूध उकळायला ठेवावे.
दुधाला उकळी आली की त्यात तांदळाचा रवा घालून सतत ढवळावे.
तांदूळ शिजला की त्यात साखर घालून ढवळावे.
खीर हळूहळू घट्ट होत आली की त्यात खवा मिक्स करून घ्यावा.
खवा घातल्यावर पाचएक मिनिटे शिजवावे.
त्यात सुकामेवा काप, वेलचीपूड, जायफळपूड व केशर मिक्स करावे.
ही खीर रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यामुळे या खिरीला अप्रतिम चव येते :)
चांदीचा वर्ख लावून गार सर्व्ह करावी ही शाही खीर.
नोटः
टीप :
मातीच्या भांड्यात ही खीर बनवली तर चविष्ट लागते, पण मातीचे भांडे नसल्यास नेहमीच्या भांड्यात बनवली तरी चालेल.
या खिरीची पाककृती माझ्या बहिणीच्या मुस्लीम मैत्रिणीची आहे, त्यांच्याकडे मातीच्या कुंडीत ही खीर बनवली जाते. त्यात ते केवडा इसेन्सही वापरतात, चालत असेल तर तुम्ही जरूर वापरा.
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 8:55 am | पैसा
सुंदर दिसतेय! मातीच्या भांड्यात म्हणजे फिरनीसारखा प्रकार आहे का हा?
13 Sep 2016 - 9:03 am | यशोधरा
सोपी आहे बनवायला. मातीच्या भांडयामध्ये बनवून बघेन नक्की.
13 Sep 2016 - 9:21 am | अजया
सुं द र !
13 Sep 2016 - 9:45 am | नूतन सावंत
सुरेख नेहमीप्रमाणेच.नक्की बनवून पाहीन.
13 Sep 2016 - 9:52 am | विवेकपटाईत
मस्त खीर, करून बघण्यासारखी.
13 Sep 2016 - 9:54 am | त्रिवेणी
मस्त दिसतेय खिर.
एक शंका-रात्रभर फ्रिजमध्येच ठेवायची ना?कारण बाहेर ठेवली तर खराब होईल.
13 Sep 2016 - 12:16 pm | रुस्तम
हेच विचारणार होतो.
13 Sep 2016 - 8:41 pm | सानिकास्वप्निल
हो हो त्रि खीर फ्रिजमध्ये ठेवायची आहे :)
13 Sep 2016 - 10:25 am | पियुशा
सहिच, शाही खीर सोप्पि आहे करुन ब्घनएत येइल :)
13 Sep 2016 - 10:53 am | अनन्न्या
आता तुझी मातीची भांडी बघून घ्यायचा फार मोह होतोय,पण माझ्याकडे एवढ्या माणसांत ती जपून वापरणेच अवघड आहे.
13 Sep 2016 - 11:56 am | पद्मावति
मस्तं खीर.
13 Sep 2016 - 12:09 pm | रायनची आई
सानिका, खूप महिन्यानी तुझी रेसिपी पाहुन छान वाटल. मी तुझ्या पाककृती,फोटो,त्यातले चमचे सगळच मिस करत होते..एक प्रश्न आहे..मातीचे भांडे वापरल्यास; जरी ते स्वच्छ धुवून घेतले तरी खिरीला मातकट वास नाही येणार?
13 Sep 2016 - 8:43 pm | सानिकास्वप्निल
धन्यवाद रायनची आई :)
मातीच्या भांड्यात केलेल्या पदार्थांची चव नेहमीपेक्षा सरसचं लागते अजिबात मातकट वास येत नाही उलट ती चव अतिशय चविष्ट लागते, बनवून बघा आवडेल तुम्हाला नक्की :)
17 Sep 2016 - 1:03 am | प्रभाकर पेठकर
जरी ते स्वच्छ धुवून घेतले तरी खिरीला मातकट वास नाही येणार?
मातीचे भांडे स्वयंपाकात वापरण्याआधी त्याचे सिझनिंग केले जाते. म्हणजे नवे कोरे भांडे आणल्यावर, त्यात काठोकाठ पाणी भरुन, रात्रभर नुसते ठेवून द्यायचे. दुसर्या दिवशी सकाळी ते पाणी फेकून देऊन पुन्हा ताजे पाणी भरून ते चुलीवर ठेवून त्या पाण्याला उकळी आणायची. पाणी उकळल्यावर फेकून (पाणी फक्त) द्यायचे. आता ते भांडे स्वयंपाकात वापरायला तयार झाले आहे. त्यात शाही खिर, आमटी, भात काहीही बनवा, मातीचा वास येणार नाही. पण पदार्थाला उत्तम स्वाद येईल.
13 Sep 2016 - 12:28 pm | मृत्युन्जय
जब्रा पाकृ आहे. खीर प्रकार आवडत नसुनही ही खावीशी वाटते आहे.
13 Sep 2016 - 12:52 pm | पूर्वाविवेक
शाही असूनही सोप्पी कृती. नेहमीप्रमाणे आकर्षक छायाचित्रे.
13 Sep 2016 - 1:32 pm | कविता१९७८
वाह
13 Sep 2016 - 1:56 pm | स्वाती दिनेश
खीर मस्त एकदम शाही दिसते आहे.
स्वाती
13 Sep 2016 - 2:27 pm | कविता१९७८
साने कीती चविष्ट असेल ही खीर, सजवलीयेस ईतकी छान की अगदि पहितच राहावस वाटत
13 Sep 2016 - 3:05 pm | सूड
सुंदर!!
13 Sep 2016 - 3:21 pm | सविता००१
सुरेखच
13 Sep 2016 - 3:52 pm | Mrunalini
मस्त रेसिपी सानि आणि सोप्पी सुद्धा आहे. फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर.
13 Sep 2016 - 6:40 pm | मनिष
शाही दिसतेय खरंच!!
14 Sep 2016 - 12:15 am | रेवती
मस्त पदार्थ! आता मलाही मातीचे भांडे आणावेसे वाटायला लागले आहे.
14 Sep 2016 - 2:27 am | रुपी
सुंदर! आणि खरंच अगदी शाही दिसत आहे!
14 Sep 2016 - 8:31 am | इशा१२३
सोपी स्वादिष्ट खिर !
14 Sep 2016 - 8:35 am | अभ्या..
ते मातीच्या वाडग्यात फिरनी देतात त्याची आठवण आली. मस्त टेस्ट असते. मुंबईत १० वर्षापूर्वी चाखली होती.
16 Sep 2016 - 12:47 pm | दिपक.कुवेत
तू साधा वरण भात केलास तरी तो शाही बनत असेल.
17 Sep 2016 - 12:59 pm | सूड
+१
17 Sep 2016 - 10:52 pm | अजया
+१००००००
17 Sep 2016 - 1:05 am | प्रभाकर पेठकर
शाही खीर म्हणजे फिरनीच दिसते आहे. फक्त फिरनीत गुलाबजल वापरतात. बाकी पाककृती मस्तच दिसते आहे. करून पाहण्यात येईल.
17 Sep 2016 - 1:09 am | प्रभाकर पेठकर
फिरनी
17 Sep 2016 - 11:40 am | पिंगू
छानच झालेली आहे. मातीच्या भांड्यात एक वेगळीच चव लागते..
17 Sep 2016 - 11:45 am | सिरुसेरि
छान नैवेद्य
17 Sep 2016 - 4:46 pm | मनिमौ
बघण्यात येईल
17 Sep 2016 - 5:00 pm | सेलफोन
मस्त. ह्या खिरीत खव्याऐवजी Condensed Milk घालून पण छान चव लागेल.
17 Sep 2016 - 7:34 pm | चंपाबाई
छान