बाप्पाचा नैवेद्यः शाही खीर
साहित्यः
२ लीटर दूध
१ वाटी भिजवून, भरडसर वाटलेले तांदूळ
पाव वाटीपेक्षा जरा कमी खवा किसून घेणे
पाऊण वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) साखर
काजू, बदाम, पिस्ता काप
अर्धा टीस्पून वेलचीपूड
पाव टीस्पून जायफळपूड
केशर
कृती:
ही खीर मी मातीच्या भांड्यात बनवली आहे, मूळ पाककृतीत मातीच्या भांड्यात किंवा कुंडीत ही खीर बनवली जाते.
प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यात दूध उकळायला ठेवावे.
दुधाला उकळी आली की त्यात तांदळाचा रवा घालून सतत ढवळावे.
तांदूळ शिजला की त्यात साखर घालून ढवळावे.
खीर हळूहळू घट्ट होत आली की त्यात खवा मिक्स करून घ्यावा.
खवा घातल्यावर पाचएक मिनिटे शिजवावे.
त्यात सुकामेवा काप, वेलचीपूड, जायफळपूड व केशर मिक्स करावे.
ही खीर रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यामुळे या खिरीला अप्रतिम चव येते :)
चांदीचा वर्ख लावून गार सर्व्ह करावी ही शाही खीर.
नोटः
टीप :
मातीच्या भांड्यात ही खीर बनवली तर चविष्ट लागते, पण मातीचे भांडे नसल्यास नेहमीच्या भांड्यात बनवली तरी चालेल.
या खिरीची पाककृती माझ्या बहिणीच्या मुस्लीम मैत्रिणीची आहे, त्यांच्याकडे मातीच्या कुंडीत ही खीर बनवली जाते. त्यात ते केवडा इसेन्सही वापरतात, चालत असेल तर तुम्ही जरूर वापरा.
वाचने
21818
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा!
सोपी आहे बनवायला. मातीच्या
सुं द र !
सुरेख नेहमीप्रमाणेच.नक्की
मस्त खीर, करून बघण्यासारखी.
मस्त दिसतेय खिर.
+१
In reply to मस्त दिसतेय खिर. by त्रिवेणी
हो हो त्रि खीर फ्रिजमध्ये
In reply to मस्त दिसतेय खिर. by त्रिवेणी
सहिच, शाही खीर सोप्पि आहे
सुंदर आणि सोप्पी!
मस्तं खीर.
सानिका, खूप महिन्यानी तुझी
धन्यवाद रायनची आई :)
In reply to सानिका, खूप महिन्यानी तुझी by रायनची आई
स्वयंपाकासाठी भांडे तयार करून घ्यावे.
In reply to सानिका, खूप महिन्यानी तुझी by रायनची आई
जब्रा पाकृ आहे. खीर प्रकार
शाही असूनही सोप्पी कृती.
वाह
वा..
साने कीती चविष्ट असेल ही खीर,
सुंदर!!
मस्त
मस्त रेसिपी सानि आणि सोप्पी
शाही दिसतेय खरंच!!
मस्त पदार्थ! आता मलाही मातीचे
सुंदर! आणि खरंच अगदी शाही
सोपी स्वादिष्ट खिर !
ते मातीच्या वाडग्यात फिरनी
अरेरे काय हा अत्याचार
+१
In reply to अरेरे काय हा अत्याचार by दिपक.कुवेत
+१००००००
In reply to +१ by सूड
फिरनी....
फिरनी....
In reply to फिरनी.... by प्रभाकर पेठकर
छानच झालेली आहे. मातीच्या
छान नैवेद्य
लवकरच करून
अप्रतिम
..