ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
20 Jun 2015 - 8:23 pm

सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे.

रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात.

आधीच्या पदाधिकार्‍यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती.

सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे.

तर आता हा त्रास कमी कसा करता येईल?

सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे.

आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे.

येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच.

तरी पण त्यांनी जुमानले नाही तर. पोलीसांकडे तक्रार नोंदवता येईल का?

किंवा कोर्टाकडून ह्या देवळाच्या आवाजी कार्यक्रमांवर बंदी आणता येईल का?

समाजजीवनमानमदतवाद

प्रतिक्रिया

भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी किंवा त्या विश्वस्तांनी दाद न दिल्यास सरळ न्यायालयाकडून मनाई आदेश आणू शकता.

प्यारे१'s picture

20 Jun 2015 - 9:34 pm | प्यारे१

कायद्यानं जाण्या ऐवजी सामोपचारा चा वापर करावा असं वाटतं. कायद्यानं विरोध केल्यास तुम्हाला मूळ मुद्दा बाजूस पडून अकारण शिव्यांचं धनी व्हावं लागेलच त्याबरोबर धर्मबुडवे वगैरे विशेषणं लागून त्रास होण्याची शक्यता आहे. त्याची सर्वार्थानं तयारी असल्यास पुढचा मार्ग अवलंबणे.

त्यांनी एसी लावून काचेची दारं लावली तर देवापर्यंत आवाज लवकर पोहोचेल.

उगा काहितरीच's picture

20 Jun 2015 - 10:53 pm | उगा काहितरीच

एसी चा खर्च करा भरपूर फायदे होतील . १) आवाज बंद २) लोक खुश ३) देणगीदार म्हणून नाव झळकेल...

मागे एका एसी लावण्याच्या धाग्यावर त्याची इकॅानमी दिलेली आहेच.पहिला एसी मठ अशी प्रसिद्धी झाली की इतर मठ आणि नावाजलेली देवळेही एसी होण्याचा धुमधडाका शुरू होईल.

खालील पाट्या दिसतील-

"एसी साठी देणगीदार-
१)
२)
३)
वगैरे.

नंतर
"या महिन्याचे एसी बिल
श्रीरामभक्त अमुक अमुक यांचेकडून"
वगैरे.

हा धागा वाचत राहीन. माझ्या माहेरच्या सोसायटीत तरी यावर काही उपाय काढता आलेला नाही. कारण सोसायटीच्या अगदी बाहेरच असलेले (विनापरवाना) देऊळ माजी नगरसेवकाचे आहे. म्हणजे तिथे आधी देऊळ नव्हतेच. गणेशोत्सव झाल्यानंतर उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी एक बंद खोली केली होती. त्याचे दरवाजे बांधून होईपर्यंत जाळी लावली होती. बघता बघता येणारा जाणारा पैसे टाकू लागला, नारळ फोडू लागला. मग कश्याला हा बुवा बंद दरवाजे करतोय! त्याने नक्षीदार खांब रोवले आणि काचेचे दरवाजे, दानपेटी वगैरे. पब्लिक इतके वेडे असते की आता ते देऊळ म्हणून वापरले जाते. मग आता जे आहे ते नीट वापरावे ना! तर ते नाही! देवळाच्या मागे आडोसा करून वर्तमानपत्रवाला मनुष्य, सकाळी तात्पुरता दूध स्टॉल, संध्याकाळी वडापाव अशा गाड्या लागतात. त्या लोकांनी सांगितले की (२ वर्षांपूर्वी हां) ११०० रुपये प्रतिमहिना देतोय नगरशेवकान्ला आनि मग धंदा करतोय. आमाला कोनी हटवू शकत नाही. आता होते काय की सोसायटीत येणार्‍या जाणार्‍या तरण्या मुलींच्या आईवडीलांच्या जिवाला घोर लागलाय. नेहमी मूर्ख पब्लिकचा राबता सोसा. च्या गेटपाशी असतो व यथेच्छ टवाळी चालू असते. अनेक तक्रारी करूनही उपयोग नाही. वॉचमनने सोसायटीत वॉच ठेवण्याऐवजी त्यालाच वॉच करण्याची गरज पडतिये. एकतर काही वयस्क रहिवासी नियमबाह्य कामे त्याला करायला सांगतात, उदा. दूध आणणे, दळणाचे डबे आणणे, उपहारगृहातून पार्सले आणणे वगैरे. तोच गेटवर मूर्ख लोकांशी गप्पा मारत बसतो.

सर्वसाक्षी's picture

20 Jun 2015 - 11:58 pm | सर्वसाक्षी

सर्व त्रस्त नागरिकांनी आसपास सर्वत्र फलक लावुन येणार्‍या भक्तांना संदेश द्या की

१) इश्वर बहीरा नाही, त्याला भक्तांचे बोलणे ऐकु येते.
२) लाउड स्पिकर कितीही मोठा लावलात तरी त्याचा आवाज स्व्रर्गापर्यंत पोचू शकत नाहीच, मात्र आवाजाने तुम्ही पृथ्वीवर नर्क निर्माण करीत आहात.
३) लाउड स्पिकर लावुन आपण स्वतःला व देवाला ढणाणा लाउड स्पिकर लावणार्‍या झोपड्वासियाच्या पातळीवर नेउन ठेवत आहात
४) तरीही लाऊड्स्पिकर लावायचा अट्टाहास असेल तर मिळमिळीत भजने न लावता ढिंच्याक गाणी लावा, त्यामुळे भक्तगण झपाट्याने वाढतील.

उगा काहितरीच's picture

21 Jun 2015 - 10:20 am | उगा काहितरीच

हे सर्व "त्यांना " का नाही सांगत ?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2015 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११
यात अजुन एक भर!
गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून "आपल्या भक्ति श्रद्धेपोटि दुसय्रांचा छळ करणे,हे महाराज देखिल कसे चुकीचे मानत असत!" याचे दाखले काढा. त्याच्या प्रिंट़ाऊट्स काढुन तिकडे आजुबाजुला आणि विशेषता: त्यांच्या तिथे येणाय्रा भक्तांना दिसतील असे लावा.. फुल्ल टू मुन्नाभाई श्टाइलनी गांधीगिरी करा!

द-बाहुबली's picture

21 Jun 2015 - 12:02 am | द-बाहुबली

काय घडले ते अवश्य कळवा.

असेच एक देऊळ-सोसायटीतल्या गॅराजमधले -मुलुंड पश्चिम-२५ वर्षांपुर्वी-"मुंबई माँ".

तुषार काळभोर's picture

21 Jun 2015 - 11:31 am | तुषार काळभोर

जवळपास प्रत्येक सोसायटीत/कॉलनीत/गल्लीत/वस्तीत/गावात हेच असते.
आमच्या घरापासून २०० मी अंतरावर एक विठ्ठलमंदीर आहे. तेथे दर हिवाळ्यात काकडआरती असते. रोज पहाटे त्याचा मंद स्वर ऐकू येतो, साधारण ७-७.३० पर्यंत. एकदा त्यावेळेदरम्यान मंदीराजवळून चाललो असताना कळले की कर्णा लावलाय अन् तो कर्णकर्कश्श आवाजात किंचाळतोय. दया आली जवळ राहणार्‍या लोकांची.
असाच आवाज १-४ तास चालणार्‍या लग्नाच्या वराती, गणपती-देवी(तोरण)-शिवजयंती-आंबेडकर जयंती च्या मिरवणुकीतही असतो. (मागच्या आठवड्यात तर जिजामाता/अहिल्याबाई होळकर यांपैकी कुणाची तरी मिरवणूक होती! गढूळाचं पाणी कुनी ढवळीलं...........!!!!! ) स्थानिक 'नेतृत्व/आधारस्तंभ्/इत्यादी'च्या वाढदिवसाला हेच असते. ईद/मोहरमला हेच असते. १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला हेच असते. पुण्यात पालखी आल्यावर दोन दिवस हेच असते.
कितीवेळा कोणत्या गोष्टींसाठी त्रास करून घेणार?

(डायनोसॉरच्या वेळी झाला होता तशा महाविनाशाशिवाय या भारतदेशाला कोणीही वाचवू शकणार नाही, यावर ठाम विश्वास असणारा) पैलवान

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 11:34 am | टवाळ कार्टा

कानात कापसाचे बोळे घालून बसा ...भारतात आंधळ्या बहिर्या भक्तांची कमी नाहीये...सोसायटीला काहितरी चिरिमीरी मिळत असेल तर कमीटी कधीही मठाच्या विरुध्ध बोलणार नाही

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2015 - 11:48 am | ज्ञानोबाचे पैजार

सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे

असे असेल तर तुम्ही पण तुमच्या सोसायटी मधे रोज एखादा कार्यक्रम आयोजित करा. साउंड सिस्टीम भाड्याने आणून त्यांच्या भजनाची / किर्तनाची वेळ पाहुन त्याच वेळी कर्कष्य आवाजात सिनेमाची किंवा इतर जास्तीजास्त भंकस गाणी मोठमोठ्यांदी लाउन ठेवायची. "कर्ण्यांची तोंडे अर्थात मठा कडे". जर चारपाच सोसायट्यांची एकत्र तक्रार असेल तर रोज एका सोसायटीने हा कार्यक्रम करायचा.

त्या आधि त्यांच्या भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करायला विसरु नका. समजा ते तुमच्या विरुध्द पोलिसात वगेरे गेले तर उपयोगी येईल.

तुमच्या नशिबाने सध्या रमझान सुरु आहे. तेव्हा लाउडस्पीकरवर रमझानची सुरेल गाणी वाजवायची आणि दिवसातून पाच वेळा नमाजाची बांग असेलच. यासाठी सोसायटी मधे कोणी मुसलमान कुटुंब रहात असले पाहीजे असे काही नाही. पण रहात असेल तर त्यांनाही तुमच्यात सामिल करुन घेता आले तर उत्तमच. (फक्त रमझान सेलिब्रेशन परमनंट होणार नाही असे बघावे नाहितर "भिक नको पण कुत्रा आवर" आशी तुमची आवस्था होईल)

दोनतीन दिवसात तुम्हाला शरण आलेच पहिजेत. एकदा का शरण आले की मग मात्र कोणतीही दयामाया दाखवू नका.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 1:42 pm | टवाळ कार्टा

काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केलेला

कोणत्यातरी धरणाचे पाणी सोडण्याच्या ठिकाणी ४ जण नेमके पाणी सोडण्याच्या वेळेसच ती जागा धावत पार करायला जातात पण पाणी झपकन
वाढल्याने मध्येच अडकून पडतात आणि पाण्याचा जोर वाढल्याने अगदी २-३ मिनीटांतच पुढे पाण्याबरोबर दरीत कोसळतात....

त्याआधी त्याच व्यक्तीने असाच एक व्हिडिओ फॉरवर्ड केलेला...

एका मॉलमध्ये लहान मुलगा एस्कलेटरची फिरती पट्टी (जी कठड्याला चिटकून फिरत असते) धरून ठेवतो आणि पट्टीबरोबर ओढला जाउन पहिल्या मजल्यावरुन खाली पडतो

वायझेड लोक साले...लोकांचे अपघाती मरणेसुध्धा एखाद्या इव्हेंटची क्लिप असल्यासारखी फॉरवर्ड करतात...
ज्याने फॉरवर्ड केला तो शाळेत एक शांत, अभ्यासू टैपचा मुलगा होता (आताचे म्हैत नै) पण अगदी चारचौघांसारखा नाकासमोर चालणारा...घरच्यांचे ऐकून आज्ञाधारकपणे ठरवून लग्न करून २ वर्षांत मुल झालेला...अगदी देव-देव नै पण आस्तीक टैपचा...व्यसनांपासून दूर असणारा...अगदी मनःशांतीसाठी सद्गुरु बैठकीला जाणारा वगैरे टैपचा मुलगा आहे...

तो व्हिडिओ बघताच माझी पहिली प्रतिक्रिया "भें**...why the f*ck people forward such videos"...असा व्हिडिओ कोणी फॉरवर्ड केलाच तर आपणसुध्धा मेंढरांसारखे तोच व्हिडिओ दुसर्याला पाठवायचा??? पाठवण्याआधी जरा एकदा विचार करून पहा "जर त्या व्हिडिओत आपण स्वतः असतो अथवा आपल्या जवळच्यांपैकी असते आणि दुसरा कोणी आपला व्हिडिओ असा शेअर करत असेल तर आपण काय करू".
सगळ्यात वाईट्ट म्हणजे तो व्हिडिओ पाठवून १२ तास उलटून गेले...अज्जून दुसर्या कोणानेही त्या व्यक्तीला विरोध केलेला नै...स्वतःकडे वाईटपणा येउ नये यासाठी???

डोक्यातला वैताग इथे बाहेर काढत आहे...

नाखु's picture

25 Jun 2015 - 9:02 am | नाखु

मुवी खास तुमच्या साठी न्यायालयीन आरती

धार्मीक पण धर्मवेडा नसलेला
भोट नाखु

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 10:46 pm | मुक्त विहारि

सगळ्याच सभासदांचा मंदिरामुळे होणार्‍या द्वनी प्रदूषणाला विरोध असल्याने, सोसायटी तशी तक्रार मंदिराच्या पदाधिकार्‍यांना करणार आहे.

बघू आता पुढे काय होत आहे ते....

अपसेट्स देत राहीनच.

कदाचित, इतर कुणाला पण हा असा त्रास होत असेल किंवा पुढे-मागे झालाच तर त्या मिपाकराला नक्कीच फायदा होईल.

(एकनिष्ठ मिपाकर) मुवि

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 9:53 am | dadadarekar

अपडेट्स

हे भक्ती साँग नियमत ऐकत जा... चित्तातली चलबिचल कमी होउन मनःशांती लाभेल ! ;)

जाता जाता :- आपल्या आस्थेचा दुसर्‍यांना त्रास का ? मी गोंदवल्याला जाउन आलो आहे अतिशय सुंदर अनुभव आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar

पोलिसात जाउनही काही झाले नाही किंवा अत्रुप्त यांनी सुचवलेले गांधीगीरीचाही काही फायदा झाला नाही तर. तुमच्या सोसायटीत अखंड हरीनाम सप्ताह वगैरे चालू करा. मोठ्या मोठ्याने भजने लावा. भोंगे मठाकडे वळवा. जसास तसे उत्तर द्या..

भाते's picture

28 Jun 2015 - 2:08 pm | भाते

दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग. दहावी बारावीच्या परिक्षा चालू होत्या. बाजूच्या इमारतीत लग्न/संगीत कार्यक्रमासाठी मंडप घातला होता. शनिवारी दुपारी खुर्च्या आणि लाऊड स्पिकर्स यांची जुळवाजुळव चालू झाली. सातच्या सुमारास तिकडे लोक यायला लागले. साडेसात वाजता कर्कश्य आवाजात गाणी लाऊन त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाज्यांना हादरे बसत होते. सगळ्या इमारतीमधले लोक खाली उतरून आपसात चर्चा करू लागले. दहा वाजता लाऊड स्पिकर्सची वेळ संपल्यावर आजूबाजूच्या इमारतीमधले सगळे जण (सुमारे शंभर) एकत्र येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्यांना दहा वाजल्यानंतर लाऊड स्पिकर्स बंद करायला सांगितले. संगीत कार्यक्रमात धुंद असलेल्या त्यांनी (सुमारे पन्नास) त्याला विरोध केला. इतरांकडून अचानक विरोध झाल्याने बिथरलेल्या लोकांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या गाडीतुन दोन पोलिस आल्यावर त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि लाऊड स्पिकर्स बंद करून कार्यक्रम थांबवण्यास सांगितले.
अर्थात, मी वर दिलेला अनुभव 'लाऊड स्पिकर्सची दहाची डेडलाईन' संबंधी असल्याने पोलिसांनी कारवाई केली होती.

या गोष्टी तपासुन पहा.
गोंदवलेकर महाराजांचा मठ ज्या इमारतीत आहे ती जागा कोणातरी एका इसमाच्या नावावर असेल. त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का?
मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का?

वरती सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचा आजूबाजूच्या सोसायट्यांना याचा त्रास होतो आहे.
मग प्रत्येक सोसायटीने आपल्या सर्व-साधारण सभेत याची चर्चा करून पोलिसांकडे तक्रार करायचा ठराव मंजुर करून घ्या आणि सर्वांनी एकत्रितपणे पोलिसांकडे याची तक्रार करा. पोलिस यावर नक्की कारवाई करतील. हा त्रास कायमचा थांबवण्यासाठी, नाईलाजाने मठाविरुध्द कोर्टात जायचा शेवटचा पर्याय तुमच्याकडे आहेच!

जाताजाता, तुमचा हा त्रागा तुम्ही सोशल मिडियावर मांडला आहे याची त्यांना जाणिव करून द्या.

मुक्त विहारि's picture

28 Jun 2015 - 7:39 pm | मुक्त विहारि

त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का?

नाही...

इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का?

नाही....

मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का?

माहीत नाही. पण सोसायटीच्या परवानगीशिवाय पोलीस कसे काय परवानगी देवू शकतात?

भाते's picture

28 Jun 2015 - 8:44 pm | भाते

म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!)

जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे.

मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे.

मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे.

जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे.
विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?

मुक्त विहारि's picture

28 Jun 2015 - 9:06 pm | मुक्त विहारि

"म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!")

"जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे."

आर्थिक लाभ नाही.तर फसवणूक.सुरुवातीला एकादशीच्या नावाने परवानगी घेतली.पण पुढे प्रस्थ वाढत गेले.

"मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे.

मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे."

सध्या तरी प्रश्र्न कागदोपत्री सोडवायचे ठरले आहे.सुदैवाने सोसायटीतली सगळीच माणसे मठामुळे होणार्‍या ध्वनी-प्रदूषणाने त्रस्त आहेत, त्यामुळे दुहीचा प्रश्र्न येत नाही.

"जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे."

समोरच हॉस्पीटल आहे आणि ते पण लेखी तक्रार सोसायटीकडे करणार आहेत.

"विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?"

बहूदा असावी.नक्की माहीत नाही.

योगी९००'s picture

28 Jun 2015 - 2:26 pm | योगी९००

काही उपाय मिळाला का?

मध्ये मध्ये जाऊन लाऊड्स्पिकरवर पाणी टाका किंवा वायरी तोडा...

या दुव्यावर अजून दोन दुव्यांची माहिती आहे. ज्यात आपल्या जागेतून दुसर्‍यांचे ध्वनी प्रदुषणकरणारे स्पिकर हॅक करुन विराम देता येऊ शकतो अशी काही माहिती असावी असे दिसते आहे. याचे तथ्य चेक करुन कुणि मिपाकर अथवा कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते मार्गदर्शन करु शकल्यास पहावे.

माहितगार's picture

24 Jul 2018 - 2:41 pm | माहितगार

दुवा राहिलाच की हा घ्या दुवा Silence Neighbours By Transmitting Your Music To Their Speakers