✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 06/20/2015 - 20:23  ·  लेख
लेख
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे. रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. आधीच्या पदाधिकार्‍यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती. सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे. तर आता हा त्रास कमी कसा करता येईल? सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे. आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे. येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच. तरी पण त्यांनी जुमानले नाही तर. पोलीसांकडे तक्रार नोंदवता येईल का? किंवा कोर्टाकडून ह्या देवळाच्या आवाजी कार्यक्रमांवर बंदी आणता येईल का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
मदत
वाद

प्रतिक्रिया द्या
31743 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी

एस
Sat, 06/20/2015 - 21:28 नवीन
भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी किंवा त्या विश्वस्तांनी दाद न दिल्यास सरळ न्यायालयाकडून मनाई आदेश आणू शकता.
  • Log in or register to post comments

कायद्यानं जाण्या ऐवजी

प्यारे१
Sat, 06/20/2015 - 21:34 नवीन
कायद्यानं जाण्या ऐवजी सामोपचारा चा वापर करावा असं वाटतं. कायद्यानं विरोध केल्यास तुम्हाला मूळ मुद्दा बाजूस पडून अकारण शिव्यांचं धनी व्हावं लागेलच त्याबरोबर धर्मबुडवे वगैरे विशेषणं लागून त्रास होण्याची शक्यता आहे. त्याची सर्वार्थानं तयारी असल्यास पुढचा मार्ग अवलंबणे.
  • Log in or register to post comments

त्यांनी एसी लावून काचेची दारं

कंजूस
Sat, 06/20/2015 - 21:40 नवीन
त्यांनी एसी लावून काचेची दारं लावली तर देवापर्यंत आवाज लवकर पोहोचेल.
  • Log in or register to post comments

एसी चा खर्च करा भरपूर फायदे

उगा काहितरीच
Sat, 06/20/2015 - 22:53 नवीन
एसी चा खर्च करा भरपूर फायदे होतील . १) आवाज बंद २) लोक खुश ३) देणगीदार म्हणून नाव झळकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मागे एका एसी लावण्याच्या

कंजूस
Sun, 06/21/2015 - 06:12 नवीन
मागे एका एसी लावण्याच्या धाग्यावर त्याची इकॅानमी दिलेली आहेच.पहिला एसी मठ अशी प्रसिद्धी झाली की इतर मठ आणि नावाजलेली देवळेही एसी होण्याचा धुमधडाका शुरू होईल. खालील पाट्या दिसतील- "एसी साठी देणगीदार- १) २) ३) वगैरे. नंतर "या महिन्याचे एसी बिल श्रीरामभक्त अमुक अमुक यांचेकडून" वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

हा धागा वाचत राहीन. माझ्या

रेवती
Sat, 06/20/2015 - 23:42 नवीन
हा धागा वाचत राहीन. माझ्या माहेरच्या सोसायटीत तरी यावर काही उपाय काढता आलेला नाही. कारण सोसायटीच्या अगदी बाहेरच असलेले (विनापरवाना) देऊळ माजी नगरसेवकाचे आहे. म्हणजे तिथे आधी देऊळ नव्हतेच. गणेशोत्सव झाल्यानंतर उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी एक बंद खोली केली होती. त्याचे दरवाजे बांधून होईपर्यंत जाळी लावली होती. बघता बघता येणारा जाणारा पैसे टाकू लागला, नारळ फोडू लागला. मग कश्याला हा बुवा बंद दरवाजे करतोय! त्याने नक्षीदार खांब रोवले आणि काचेचे दरवाजे, दानपेटी वगैरे. पब्लिक इतके वेडे असते की आता ते देऊळ म्हणून वापरले जाते. मग आता जे आहे ते नीट वापरावे ना! तर ते नाही! देवळाच्या मागे आडोसा करून वर्तमानपत्रवाला मनुष्य, सकाळी तात्पुरता दूध स्टॉल, संध्याकाळी वडापाव अशा गाड्या लागतात. त्या लोकांनी सांगितले की (२ वर्षांपूर्वी हां) ११०० रुपये प्रतिमहिना देतोय नगरशेवकान्ला आनि मग धंदा करतोय. आमाला कोनी हटवू शकत नाही. आता होते काय की सोसायटीत येणार्‍या जाणार्‍या तरण्या मुलींच्या आईवडीलांच्या जिवाला घोर लागलाय. नेहमी मूर्ख पब्लिकचा राबता सोसा. च्या गेटपाशी असतो व यथेच्छ टवाळी चालू असते. अनेक तक्रारी करूनही उपयोग नाही. वॉचमनने सोसायटीत वॉच ठेवण्याऐवजी त्यालाच वॉच करण्याची गरज पडतिये. एकतर काही वयस्क रहिवासी नियमबाह्य कामे त्याला करायला सांगतात, उदा. दूध आणणे, दळणाचे डबे आणणे, उपहारगृहातून पार्सले आणणे वगैरे. तोच गेटवर मूर्ख लोकांशी गप्पा मारत बसतो.
  • Log in or register to post comments

उपाय

सर्वसाक्षी
Sat, 06/20/2015 - 23:58 नवीन
सर्व त्रस्त नागरिकांनी आसपास सर्वत्र फलक लावुन येणार्‍या भक्तांना संदेश द्या की १) इश्वर बहीरा नाही, त्याला भक्तांचे बोलणे ऐकु येते. २) लाउड स्पिकर कितीही मोठा लावलात तरी त्याचा आवाज स्व्रर्गापर्यंत पोचू शकत नाहीच, मात्र आवाजाने तुम्ही पृथ्वीवर नर्क निर्माण करीत आहात. ३) लाउड स्पिकर लावुन आपण स्वतःला व देवाला ढणाणा लाउड स्पिकर लावणार्‍या झोपड्वासियाच्या पातळीवर नेउन ठेवत आहात ४) तरीही लाऊड्स्पिकर लावायचा अट्टाहास असेल तर मिळमिळीत भजने न लावता ढिंच्याक गाणी लावा, त्यामुळे भक्तगण झपाट्याने वाढतील.
  • Log in or register to post comments

हे सर्व "त्यांना " का नाही

उगा काहितरीच
Sun, 06/21/2015 - 10:20 नवीन
हे सर्व "त्यांना " का नाही सांगत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

+++१११

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/21/2015 - 23:35 नवीन
+++१११ यात अजुन एक भर! गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून "आपल्या भक्ति श्रद्धेपोटि दुसय्रांचा छळ करणे,हे महाराज देखिल कसे चुकीचे मानत असत!" याचे दाखले काढा. त्याच्या प्रिंट़ाऊट्स काढुन तिकडे आजुबाजुला आणि विशेषता: त्यांच्या तिथे येणाय्रा भक्तांना दिसतील असे लावा.. फुल्ल टू मुन्नाभाई श्टाइलनी गांधीगिरी करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

रोचक प्रकरण आहे

द-बाहुबली
Sun, 06/21/2015 - 00:02 नवीन
काय घडले ते अवश्य कळवा.
  • Log in or register to post comments

असेच एक देऊळ-सोसायटीतल्या

कंजूस
Sun, 06/21/2015 - 06:17 नवीन
असेच एक देऊळ-सोसायटीतल्या गॅराजमधले -मुलुंड पश्चिम-२५ वर्षांपुर्वी-"मुंबई माँ".
  • Log in or register to post comments

कशाला त्रागा करून घेताय..

तुषार काळभोर
Sun, 06/21/2015 - 11:31 नवीन
जवळपास प्रत्येक सोसायटीत/कॉलनीत/गल्लीत/वस्तीत/गावात हेच असते. आमच्या घरापासून २०० मी अंतरावर एक विठ्ठलमंदीर आहे. तेथे दर हिवाळ्यात काकडआरती असते. रोज पहाटे त्याचा मंद स्वर ऐकू येतो, साधारण ७-७.३० पर्यंत. एकदा त्यावेळेदरम्यान मंदीराजवळून चाललो असताना कळले की कर्णा लावलाय अन् तो कर्णकर्कश्श आवाजात किंचाळतोय. दया आली जवळ राहणार्‍या लोकांची. असाच आवाज १-४ तास चालणार्‍या लग्नाच्या वराती, गणपती-देवी(तोरण)-शिवजयंती-आंबेडकर जयंती च्या मिरवणुकीतही असतो. (मागच्या आठवड्यात तर जिजामाता/अहिल्याबाई होळकर यांपैकी कुणाची तरी मिरवणूक होती! गढूळाचं पाणी कुनी ढवळीलं...........!!!!! ) स्थानिक 'नेतृत्व/आधारस्तंभ्/इत्यादी'च्या वाढदिवसाला हेच असते. ईद/मोहरमला हेच असते. १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला हेच असते. पुण्यात पालखी आल्यावर दोन दिवस हेच असते. कितीवेळा कोणत्या गोष्टींसाठी त्रास करून घेणार? (डायनोसॉरच्या वेळी झाला होता तशा महाविनाशाशिवाय या भारतदेशाला कोणीही वाचवू शकणार नाही, यावर ठाम विश्वास असणारा) पैलवान
  • Log in or register to post comments

कानात कापसाचे बोळे घालून बसा

टवाळ कार्टा
Sun, 06/21/2015 - 11:34 नवीन
कानात कापसाचे बोळे घालून बसा ...भारतात आंधळ्या बहिर्या भक्तांची कमी नाहीये...सोसायटीला काहितरी चिरिमीरी मिळत असेल तर कमीटी कधीही मठाच्या विरुध्ध बोलणार नाही
  • Log in or register to post comments

काट्याने काटा काढा...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 06/21/2015 - 11:48 नवीन
सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे
असे असेल तर तुम्ही पण तुमच्या सोसायटी मधे रोज एखादा कार्यक्रम आयोजित करा. साउंड सिस्टीम भाड्याने आणून त्यांच्या भजनाची / किर्तनाची वेळ पाहुन त्याच वेळी कर्कष्य आवाजात सिनेमाची किंवा इतर जास्तीजास्त भंकस गाणी मोठमोठ्यांदी लाउन ठेवायची. "कर्ण्यांची तोंडे अर्थात मठा कडे". जर चारपाच सोसायट्यांची एकत्र तक्रार असेल तर रोज एका सोसायटीने हा कार्यक्रम करायचा. त्या आधि त्यांच्या भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करायला विसरु नका. समजा ते तुमच्या विरुध्द पोलिसात वगेरे गेले तर उपयोगी येईल. तुमच्या नशिबाने सध्या रमझान सुरु आहे. तेव्हा लाउडस्पीकरवर रमझानची सुरेल गाणी वाजवायची आणि दिवसातून पाच वेळा नमाजाची बांग असेलच. यासाठी सोसायटी मधे कोणी मुसलमान कुटुंब रहात असले पाहीजे असे काही नाही. पण रहात असेल तर त्यांनाही तुमच्यात सामिल करुन घेता आले तर उत्तमच. (फक्त रमझान सेलिब्रेशन परमनंट होणार नाही असे बघावे नाहितर "भिक नको पण कुत्रा आवर" आशी तुमची आवस्था होईल) दोनतीन दिवसात तुम्हाला शरण आलेच पहिजेत. एकदा का शरण आले की मग मात्र कोणतीही दयामाया दाखवू नका. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर

टवाळ कार्टा
Sun, 06/21/2015 - 13:42 नवीन
काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केलेला कोणत्यातरी धरणाचे पाणी सोडण्याच्या ठिकाणी ४ जण नेमके पाणी सोडण्याच्या वेळेसच ती जागा धावत पार करायला जातात पण पाणी झपकन वाढल्याने मध्येच अडकून पडतात आणि पाण्याचा जोर वाढल्याने अगदी २-३ मिनीटांतच पुढे पाण्याबरोबर दरीत कोसळतात.... त्याआधी त्याच व्यक्तीने असाच एक व्हिडिओ फॉरवर्ड केलेला... एका मॉलमध्ये लहान मुलगा एस्कलेटरची फिरती पट्टी (जी कठड्याला चिटकून फिरत असते) धरून ठेवतो आणि पट्टीबरोबर ओढला जाउन पहिल्या मजल्यावरुन खाली पडतो वायझेड लोक साले...लोकांचे अपघाती मरणेसुध्धा एखाद्या इव्हेंटची क्लिप असल्यासारखी फॉरवर्ड करतात... ज्याने फॉरवर्ड केला तो शाळेत एक शांत, अभ्यासू टैपचा मुलगा होता (आताचे म्हैत नै) पण अगदी चारचौघांसारखा नाकासमोर चालणारा...घरच्यांचे ऐकून आज्ञाधारकपणे ठरवून लग्न करून २ वर्षांत मुल झालेला...अगदी देव-देव नै पण आस्तीक टैपचा...व्यसनांपासून दूर असणारा...अगदी मनःशांतीसाठी सद्गुरु बैठकीला जाणारा वगैरे टैपचा मुलगा आहे... तो व्हिडिओ बघताच माझी पहिली प्रतिक्रिया "भें**...why the f*ck people forward such videos"...असा व्हिडिओ कोणी फॉरवर्ड केलाच तर आपणसुध्धा मेंढरांसारखे तोच व्हिडिओ दुसर्याला पाठवायचा??? पाठवण्याआधी जरा एकदा विचार करून पहा "जर त्या व्हिडिओत आपण स्वतः असतो अथवा आपल्या जवळच्यांपैकी असते आणि दुसरा कोणी आपला व्हिडिओ असा शेअर करत असेल तर आपण काय करू". सगळ्यात वाईट्ट म्हणजे तो व्हिडिओ पाठवून १२ तास उलटून गेले...अज्जून दुसर्या कोणानेही त्या व्यक्तीला विरोध केलेला नै...स्वतःकडे वाईटपणा येउ नये यासाठी??? डोक्यातला वैताग इथे बाहेर काढत आहे...
  • Log in or register to post comments

हे घ्या

नाखु
गुरुवार, 06/25/2015 - 09:02 नवीन
मुवी खास तुमच्या साठी न्यायालयीन आरती धार्मीक पण धर्मवेडा नसलेला भोट नाखु
  • Log in or register to post comments

आजच सोसायटीची मीटींग झाली.....

मुक्त विहारि
Sat, 06/27/2015 - 22:46 नवीन
सगळ्याच सभासदांचा मंदिरामुळे होणार्‍या द्वनी प्रदूषणाला विरोध असल्याने, सोसायटी तशी तक्रार मंदिराच्या पदाधिकार्‍यांना करणार आहे. बघू आता पुढे काय होत आहे ते.... अपसेट्स देत राहीनच. कदाचित, इतर कुणाला पण हा असा त्रास होत असेल किंवा पुढे-मागे झालाच तर त्या मिपाकराला नक्कीच फायदा होईल. (एकनिष्ठ मिपाकर) मुवि
  • Log in or register to post comments

अपडेट्स

dadadarekar
Sun, 06/28/2015 - 09:53 नवीन
अपडेट्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे भक्ती साँग नियमत ऐकत जा...

मदनबाण
Sun, 06/28/2015 - 09:23 नवीन
हे भक्ती साँग नियमत ऐकत जा... चित्तातली चलबिचल कमी होउन मनःशांती लाभेल ! ;) जाता जाता :- आपल्या आस्थेचा दुसर्‍यांना त्रास का ? मी गोंदवल्याला जाउन आलो आहे अतिशय सुंदर अनुभव आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments

पोलिसात जाउनही काही झाले नाही

खटपट्या
Sun, 06/28/2015 - 11:34 नवीन
पोलिसात जाउनही काही झाले नाही किंवा अत्रुप्त यांनी सुचवलेले गांधीगीरीचाही काही फायदा झाला नाही तर. तुमच्या सोसायटीत अखंड हरीनाम सप्ताह वगैरे चालू करा. मोठ्या मोठ्याने भजने लावा. भोंगे मठाकडे वळवा. जसास तसे उत्तर द्या..
  • Log in or register to post comments

स्वानुभव.

भाते
Sun, 06/28/2015 - 14:08 नवीन
दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग. दहावी बारावीच्या परिक्षा चालू होत्या. बाजूच्या इमारतीत लग्न/संगीत कार्यक्रमासाठी मंडप घातला होता. शनिवारी दुपारी खुर्च्या आणि लाऊड स्पिकर्स यांची जुळवाजुळव चालू झाली. सातच्या सुमारास तिकडे लोक यायला लागले. साडेसात वाजता कर्कश्य आवाजात गाणी लाऊन त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाज्यांना हादरे बसत होते. सगळ्या इमारतीमधले लोक खाली उतरून आपसात चर्चा करू लागले. दहा वाजता लाऊड स्पिकर्सची वेळ संपल्यावर आजूबाजूच्या इमारतीमधले सगळे जण (सुमारे शंभर) एकत्र येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्यांना दहा वाजल्यानंतर लाऊड स्पिकर्स बंद करायला सांगितले. संगीत कार्यक्रमात धुंद असलेल्या त्यांनी (सुमारे पन्नास) त्याला विरोध केला. इतरांकडून अचानक विरोध झाल्याने बिथरलेल्या लोकांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या गाडीतुन दोन पोलिस आल्यावर त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि लाऊड स्पिकर्स बंद करून कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. अर्थात, मी वर दिलेला अनुभव 'लाऊड स्पिकर्सची दहाची डेडलाईन' संबंधी असल्याने पोलिसांनी कारवाई केली होती. या गोष्टी तपासुन पहा. गोंदवलेकर महाराजांचा मठ ज्या इमारतीत आहे ती जागा कोणातरी एका इसमाच्या नावावर असेल. त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? वरती सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचा आजूबाजूच्या सोसायट्यांना याचा त्रास होतो आहे. मग प्रत्येक सोसायटीने आपल्या सर्व-साधारण सभेत याची चर्चा करून पोलिसांकडे तक्रार करायचा ठराव मंजुर करून घ्या आणि सर्वांनी एकत्रितपणे पोलिसांकडे याची तक्रार करा. पोलिस यावर नक्की कारवाई करतील. हा त्रास कायमचा थांबवण्यासाठी, नाईलाजाने मठाविरुध्द कोर्टात जायचा शेवटचा पर्याय तुमच्याकडे आहेच! जाताजाता, तुमचा हा त्रागा तुम्ही सोशल मिडियावर मांडला आहे याची त्यांना जाणिव करून द्या.
  • Log in or register to post comments

काही उत्तरे....

मुक्त विहारि
Sun, 06/28/2015 - 19:39 नवीन
त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? नाही... इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? नाही.... मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? माहीत नाही. पण सोसायटीच्या परवानगीशिवाय पोलीस कसे काय परवानगी देवू शकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

नाही, नाही, माहित नाही!

भाते
Sun, 06/28/2015 - 20:44 नवीन
म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!) जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे. मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे. जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे. विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

उत्तरे....

मुक्त विहारि
Sun, 06/28/2015 - 21:06 नवीन
"म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!") "जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे." आर्थिक लाभ नाही.तर फसवणूक.सुरुवातीला एकादशीच्या नावाने परवानगी घेतली.पण पुढे प्रस्थ वाढत गेले. "मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे." सध्या तरी प्रश्र्न कागदोपत्री सोडवायचे ठरले आहे.सुदैवाने सोसायटीतली सगळीच माणसे मठामुळे होणार्‍या ध्वनी-प्रदूषणाने त्रस्त आहेत, त्यामुळे दुहीचा प्रश्र्न येत नाही. "जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे." समोरच हॉस्पीटल आहे आणि ते पण लेखी तक्रार सोसायटीकडे करणार आहेत. "विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?" बहूदा असावी.नक्की माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

ह्म्म्म्म्म

योगी९००
Sun, 06/28/2015 - 14:26 नवीन
काही उपाय मिळाला का? मध्ये मध्ये जाऊन लाऊड्स्पिकरवर पाणी टाका किंवा वायरी तोडा...
  • Log in or register to post comments

कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते आहेत ?

माहितगार
Tue, 07/24/2018 - 14:39 नवीन
या दुव्यावर अजून दोन दुव्यांची माहिती आहे. ज्यात आपल्या जागेतून दुसर्‍यांचे ध्वनी प्रदुषणकरणारे स्पिकर हॅक करुन विराम देता येऊ शकतो अशी काही माहिती असावी असे दिसते आहे. याचे तथ्य चेक करुन कुणि मिपाकर अथवा कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते मार्गदर्शन करु शकल्यास पहावे.
  • Log in or register to post comments

दुवा राहिलाच की हा घ्या दुवा

माहितगार
Tue, 07/24/2018 - 14:41 नवीन
दुवा राहिलाच की हा घ्या दुवा Silence Neighbours By Transmitting Your Music To Their Speakers
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

आता हा त्रास थांबला आहे का?

रामचंद्र
Fri, 04/12/2024 - 01:31 नवीन
आता हा त्रास थांबला आहे का?
  • Log in or register to post comments

नाही....

मुक्त विहारि
Tue, 04/23/2024 - 16:18 नवीन
आणि हा त्रास थांबण्याची शक्यता पण नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

आपण पोलिसांत तक्रार केली आहे

रामचंद्र
Tue, 04/23/2024 - 20:03 नवीन
आपण पोलिसांत तक्रार केली आहे म्हणता. पोलीस आयुक्तांना ईमेल करून पाहता का? थोडी सावकाश पण नक्की दखल घेतली जाते असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सध्या तरी, काहीच करणार नाही....

मुक्त विहारि
Wed, 04/24/2024 - 10:25 नवीन
सध्या तरी, काहीच करणार नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

कधीच थांबणार नाही

कर्नलतपस्वी
Fri, 04/12/2024 - 06:11 नवीन
येडझवे लोक आहेत. माझ्या फ्लॅट पासून १००मिटरवर पांडुरंग रुखमाई चे देऊळ आहे. जमिनी विकून बक्कळ पैसा, बिना सायलेन्सर च्या फटफट्या,डिजे डाॅल्बी ,नुसता उत आलाय. लग्आनसराई, अगदी बैलपोळा,चतुर्थी, शिवजयंती, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुठेतरी पळून जावेसे वाटते. पोलीसांना तक्रार केली तरी काही उपयोग नाही. समुपदेशन,स्थानिक पुढारी सर्व काही फेल. आता सुद्धा हरीनाम सप्ताह निमीत्त गाव गदर्भ गळा काढून रेकता आहेत. नवरा बायको केव्हांच पळून गेलेत.(कोण ते अंदाज लावा). अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणी सरावा प्रवास सारा -आरती प्रभू आशी इच्छा असताना नशिबी मात्र.... अखेरच्या वळणावर आला कर्णकर्कश डाॅल्बीवाला किटले कान उडाली झोप झडकरी यावा आता निरोप -त्रासलेला कसरत पराधीन आहे जगती ..... सहन करणे एवढेच हातात आहे.
  • Log in or register to post comments

सहन करणे एवढेच हातात आहे.

सुबोध खरे
Wed, 04/24/2024 - 11:04 नवीन
सहन करणे एवढेच हातात आहे. घराच्या बेडरुमला साउंड प्रूफिंग करून घ्या. खर्च ३ लाखापर्यंत येईल असाही किंवा फेनेस्ट या आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या कंपन्या आहेत. परंतु खोलीला आणि मनाला नक्की शांतता लाभेल. घरच बदलण्यापेक्षा कितीतरी स्वस्त आणि खात्रीचा उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

माझ्या लहानपणी

धर्मराजमुटके
Tue, 04/23/2024 - 09:09 नवीन
माझ्या लहानपणी आजुबाजूला बरेच लोक मंगळवार चे मौनव्रत पाळायचे, असा प्रयोग करुन पाहायला हवा. त्यामुळे कदाचित ध्वनीप्रदुषण कमी होईल. माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. आजूबाजूच्या गाड्या बिनाकामाच्या हॉर्न वाजवतच असतात त्यामुळे मला हॉर्नची गरज पडत नाही. शिवाय तो बंद आहे त्यामुळे गाडी जपून चालवावी लागते हा अजून एक फायदा. घरातील टिव्ही सात-आठ वर्षापुर्वी बंद पडला तो परत घेतला नाही त्यामुळे अजून प्रदुषण कमी झाले. मी पहिल्यापासून माणूसघाणा असल्यामुळे कुणाशी जास्त बोलत चालत नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. माझ्या इतक्या वाईट सवयींमुळे ध्वनीप्रदुषण कमी होण्यास हातभार लागतोय हे पाहून मनी आनंद जाहला.
  • Log in or register to post comments

माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार

सुबोध खरे
Wed, 04/24/2024 - 11:00 नवीन
माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. हॉर्न न आवाजवल्याने एखादा माणूस मध्ये आला तर ब्रेक मारावा लागतो आणि त्या नंतर परत गाडीला वेग देताना जळणाऱ्या पेट्रोलचे प्रदूषण याचा परिणाम ध्वनी प्रदूषणापेक्षा कितीतरी जास्त आहे. हॉर्न कमी आणि आवश्यक असेल तरच वाजवावा हे सत्य. परंतु हॉर्न दुरुस्तच न करणे हे पटत नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा