Skip to main content

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 10/05/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येणार कुवेतचे शेख :) गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही. त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे. मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील) कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल. शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) ) मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :) अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.

वाचने 59039
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

तुर्तास, आमच्या द्रुष्टीने "आकुर्डी" हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण.
असं करुया, पुण्यात आल्यावर ज्या ठिकाणी उभे राहाल ते ते ठिकाण मध्यवर्ती म्हणून घोषित करुन टाकू आपण!! ;)

In reply to by मुक्त विहारि

असं नका करु, मी आता मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती ठिकाण अशा पाट्या रंगवायला घेतल्यात त्यांचं काय करायचं आता? किमान अर्धा डझन मध्यवर्ती ठिकाणं होऊन जाऊदेत. पाह्यजे तर आकुर्डीला आपण 'मानाचं पहिलं मध्यवर्ती ठिकाण' असा किताब देऊ. ;)

In reply to by सूड

असं नका करु, मी आता मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती ठिकाण अशा पाट्या रंगवायला घेतल्यात त्यांचं काय करायचं आता? किमान अर्धा डझन मध्यवर्ती ठिकाणं होऊन जाऊदेत. पाह्यजे तर आकुर्डीला आपण 'मानाचं पहिलं मध्यवर्ती ठिकाण' असा किताब देऊ. ;)
बनव की...फक्त ठिकाणाचे नाव नको लिहू....ज्या ठिकाणाला मध्यवर्ती घोषीत करायचे असेल तिथे जाऊन खोचायची हा.का.ना.का.

In reply to by सूड

बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी ठेवणार असाल तर अंमळ अशक्य दिसतंय!!
तुझ्या अथवा सगाच्या घरी एक्स्टेंडेड कट्टा करायचा का? ;)

In reply to by टवाळ कार्टा

माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पक्षी-तीर्थ वाल्यांचा लोच्या होईल.

In reply to by सूड

म्हणूनच सगाचे घर हा ब्याकप आहे (अर्थात त्याला जमले तर)

हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ नये ?? काही जण मुंबईतूनच पुण्यात जाताहेत नं ? सजेशन ...'बाबू गणेशन' (बार्बेक्यू नेशन) ठाण्यात सुद्धा आहेच ...

In reply to by अत्रन्गि पाउस

त्यांचा एक सत्कार जगातल्या मध्यवर्ती ठिकाणी पण होणार आहेच, तेंव्हा परीघातल्या म्हणजे, मुंबई-पुणे इत्यादी, ठिकाणी जायला जमत नसेल तर, मध्यवर्ती ठिकाणी होणार्‍या शेख साहेबांच्या सत्काराला नक्की या. खर्च आपापला... जगातील मध्यवर्ती ठिकाण कोणते? हा प्रश्र्न इथे गैरलागू आहे.

In reply to by मुक्त विहारि

मु वि शेठ मला हेच कळेना हे शेख बृहन मुंबईचे असून पुण्याच्या नादाला का लागत आहेत. आता तुम्ही मध्यवरती ठिकाणी कट्टा होईल म्हटल्यावर जरा बरे वाटले.

In reply to by सुबोध खरे

जगातल्या मध्यवर्ती ठिकाणी पक्षी-तीर्थाला आल्या शिवाय त्यांची भ्रमणगाथा पुर्ण होत नाही, असा पुरावा आहे.

In reply to by मुक्त विहारि

पण जगाचे मध्यवर्ती तर यांबू आहे ना ?

In reply to by खेडूत

यांबू हे तात्पुरते होते. आता परत मुळ स्थानी.

In reply to by मुक्त विहारि

अगदि खरं. १५ जून ९९% मी मध्यवर्ती डोंबोलीत असेन....जागा तीच आपली...फेमस नंदी पॅलेस...मील बैठेंगे सब यार. तस्मात १५ जून संध्याकाळ मोकळी ठेवा आणि हो ह्या वेळेस गाडगील साहेबांना पण आवर्जून आमंत्रण द्या. डॉकः अहो लग्न/मुंजी निमित्त पुण्यास जाणं होणार आहे सो सोचा गले हात एक कट्टा भी हो जाय. पण आपण १५ ला भेटूच.

In reply to by अत्रन्गि पाउस

हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ नये ?? काही जण मुंबईतूनच पुण्यात जाताहेत नं ? सजेशन ...'बाबू गणेशन' (बार्बेक्यू नेशन) ठाण्यात सुद्धा आहेच ...
ठाण्यात बाबू गणेशनच्या पेक्षा चांग्ल्या जागा आहेत :)

कुवेतचे शेख म्हण डोक्याला पुण्याच्या दुचाकीस्वार तरुणींप्रमाणे फडके गुंडाळून आणि लोडाला टेकून बिलोरी काचेच्या पात्रातून रंगीत द्रव्य प्राशन करीत अल्पवस्त्रांकित बिंदूचाचीचे नृत्यकौशल्य पाहत माशाअल्ला अशी दाद देणारा.. असंच चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं,

In reply to by मुक्त विहारि

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.मुक्तविहारी आणी ईतर मिपाकरांचा सत्कार पुणे कट्याला प्रत्यक्ष हजेरी लावुन केला जाईल. कट्टाउत्सुक-जेपी

In reply to by जेपी

पण आपले आवडते पेय आपली वाट बघत आहे. ह्याची नोंद आपण घेतली असेलच.

In reply to by मुक्त विहारि

आपले आवडते पेय आपली वाट बघत आहे. ह्याची नोंद आपण घेतली असेलच. यस्स सर...

In reply to by जेपी

कट्टोत्सुक असा माफक बदल सुचवतो. -खाटुक संचालित अखिल भारतीय व्याकरणधरे समिती, गॉथम खुर्द-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खाटुक संचालित अखिल भारतीय मिपा व्याकरणसुधार समिती, गॉथम खुर्द- सत्कार समीती मानद सदस्य जेपी लक्ष्य असू दे

In reply to by टवाळ कार्टा

जेपी सर पुस्तकं वाटतात का? मलाही आवडेल पुस्तक घ्यायला.

In reply to by मुक्त विहारि

मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त इतरानी कुणाला व्यनी करायचा ??

In reply to by जेपी

मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त इतरानी कुणाला व्यनी करायचा ??
मुंबै अथवा पुणे यातील जे जवळ असेल तिकडच्या मिपाकरांना (म्हणजे जे कट्ट्याला येणार आहेत त्याच मिपाकरांना)

In reply to by मुक्त विहारि

आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि करायचा?
मला करा...

In reply to by टवाळ कार्टा

तरीपन या ठिकानी असं झाईर करतो की पूर्ण प्रयत्न केले जातील....

In reply to by टवाळ कार्टा

१) नळस्टॉप पासचं समुद्र/निसर्ग २) नदीकाठचं मिर्चमसाला ३) शोरबा बार्बेक्यू, सिंहगड रोड ४) राजधानी ५) सुकांता ६) दिल्ली किचन ७) वाडेश्वर ८) दुर्वांकूर ९) खैबर १०) गंधर्व

In reply to by सूड

सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल" हे वाचले नै कै?

In reply to by सूड

इथे कुक्कुटमांसयुक्त अप्रतिम व्यंजने मिळतात हे मुद्दाम नमूद करतो (चिकन राजकुमार संतोषी...हे एक अद्भुत प्रकर्ण आहे) मत्स्योपहार हा तर त्यांचा नमूद एकल विक्री मुद्दा आहे .... त्यांचे विविधरंगीपेयसाठा ह्यात एकधान्यी पेये विशेषेकरून मांडली आहेत ... तस्मात आमची पसंती निसर्ग ला ... बाकी आम्ही ठाणेकरांनी पुण्यातील उपाहारगृहांची माहिती देणे ह्यातील औध्दत्य केवळ क्षमेस पात्र ठरो हि परमेश्वरचरणी प्रार्थना ...

In reply to by अत्रन्गि पाउस

चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि मासेमारी येथील चवही तितकीच उजवी वाटली.

या कट्ट्याला यायची ईछ्चा आहे. त्यासाठी काय करावे लागेल [ आमन्त्रण मिळण्यासाठी ] ?

In reply to by मोदक

त्याआधी त्यांची पुर्वतयारी म्हणुन आपण एक छोटा कट्टा करु. तु, मी, ते असा. तु येता येता त्यांना हिंजवडीला पिक करु शकशिल. इकडे प्राधिकरणामधे वल्ली, अन्या, औरंगजेब, बुवा वगैरे येणार असतील रविवारचे तर ठरवु बेतं कसं?

कट्टा ६ मेच्या संध्याकाळी असेल...बहुतेक ५ वाजल्यापासून (पुणेकरांनी जागा ठरवण्यात पुढाकार घ्यावा)

In reply to by सूड

http://www.misalpav.com/comment/695130#comment-695130 हे नक्की का? मग हेच्च फायनल मला कोणीतरी पत्ता सांगा रे...मी फुरसुंगीहून येणार :(

In reply to by सूड

https://www.zomato.com/pune/nisarg-erandwane मेनु कार्ड इथे आहे . पण कोणी शाकाहारी असतील तर त्यांचा काय ?

In reply to by दिपक.कुवेत

काही बंदी वैगरे नाहीये, पण मला आठवतंय त्यानुसार पर्याय कमी आहेत. पण म्हटलं आता मुनीवरांनी प्रश्न विचारलाच आहे, तर काहीतरी उत्तर द्यावंच. ;)

हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे का ? निसर्ग जवळ आहे आणि १० जूनपर्यंत इकडे आहे. त्यामुळे जमू शकते.

In reply to by विशाखा पाटील

होय अखिल मिपाकरांचा कट्टा आहे. तुम्हीही जरुर या.