Skip to main content

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 10/05/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येणार कुवेतचे शेख :) गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही. त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे. मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील) कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल. शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) ) मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :) अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.

वाचने 59062
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

सोनेरी पाणी आणि चैतन्यकांडीमधे मी नाही. मात्र कुक्कुटान्न आणि मत्स्यखाद्य चालेल. पण कट्ट्याला ९९% येईन एका लग्नाला जायला नाही लागलं तर. शेख साहेबांसाठी नारळ, शालजोडीमधले तयार आहेत. रेसिप्या टाकुन त्रास देण्याबद्दल सत्कार करण्यात येईल ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नारळ कुठे फोडणार ते आधीच सांग...तशी तयारी करता येईल

In reply to by टवाळ कार्टा

दिपकशेख पनिरौदुल्लाखान कुवेती दांडपट्टेकर. ;)

बादवे. आपले ** काका पण येणारेत ना ह्याचं सुमारास. त्यांचं नावं पण ठेव टाकुन. मुद्दाम ** नी लिहिलयं. त्यांची परवानगी घेतलेली नाही म्हणुन. ;)

In reply to by टवाळ कार्टा

माझ्याबद्दल असेल तर स्वारी शक्तीमान. शक्य होणार नाही. धन्यवाद्स. :)

दीपकला भेटायला नक्की आवडेल. पण ७ ला रत्नागिरीत एका लग्नाला जायचं आहे. त्यामुळे पुणे वारी अशक्य.

In reply to by पैसा

पुणेकरांनी जरी तुझी नुसती चहावर (तो सुद्धा १७ वेळा सांगून) बोळवण केली असली तरी मी तूला हवं ते खायला घालीन...पार्टी माझाकडून लागू.

In reply to by दिपक.कुवेत

धन्यवाद रे! पण मला त्यासाठी रजनीकांत नाहीतर गेलाबाजार माईसाहेब तरी व्हावं लागेल. ते कसं जमायचं! नक्की भेटू कधीतरी. याच जन्मात! =))

In reply to by पैसा

या ओ. येताना काजुफळ घेउन या हवं तर. गप्पा मारता मारता फोडुन फळं परत देउ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला मुद्दा कळला नाय! =)) त्याच दिवशी माझ्या सख्ख्या मैत्रिणीच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न रत्नागिरीत आहे. तेव्हा एकाच वेळी एकाच दिवशी रत्नांग्री आणि पुण्यात हजर असायला मी एक तर रजनीकांत असले पाहिजे किंवा माई तरी. =))

In reply to by पैसा

आपल्या सदिच्छा हिचं आपली उपस्थिती छाप लग्नं होतं नैत का रत्नांग्रीस? बाकी नवर्‍या मुलाला लवकर मो़कळा कराव हो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण असतील त्याना फोन करीन आणि टवाळ कार्टा आला तर तू मला फोन कर. =))

In reply to by पैसा

णक्की. नारळाच्या शिमट्या आणाल का हो एक डझनभर. एक सहज आठवलं म्हणुन. टकाचा काही संबंध नाही.

In reply to by पैसा

त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण असतील त्याना फोन करीन आणि टवाळ कार्टा आला तर तू मला फोन कर. =))
आणि पैसा टै ग्यांग घेउन आल्या तर मला सांग रे ;)

In reply to by टवाळ कार्टा

डबल एजंट म्हणुन काम करणं बरचं अवघड दिसतयं. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चैला पैसा टैंना नक्की कोणीतरी माझी सुपारी दिली आहे धाग्यावर, खफवर मी आलो की मला फोन करायच्या धमक्या देत आहेत मी फुक्कट के काजू फुक्कट के मानकुराद न माग्ता पण :(

In reply to by टवाळ कार्टा

टका सद्ध्या मी "माझ्याशी मयतरी करणार का" टाईप मेसेज नी वैतागलोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टका सद्ध्या मी "माझ्याशी मयतरी करणार का" टाईप मेसेज नी वैतागलोय.
खिक्क...तसे व्यनी कोणाकडून येतात बरे? =))

In reply to by पैसा

मी पुण्यात गेल्तो तेव्हा पुणेकरांनी मला उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत पाजलेले...ते पण फुक्कट :)

In reply to by पैसा

एक तर तू नदीच्या पलिकडे गेला असशील किंवा ते पुणेकर नसतील.
मी अलीकडून पलीकडे गेलो की पलीकडून अलीकडे गेलो ते म्हैत नै

In reply to by टवाळ कार्टा

धन्या असणार तो!! उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत एका टवाळ माणसाला म्हणजे जरा अतिच झालं.

In reply to by सूड

धन्या असणार तो!! उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत एका टवाळ माणसाला म्हणजे जरा अतिच झालं.
ते मला न मागता मिळाले...तु मागतोस काय?

In reply to by टवाळ कार्टा

तु मागतोस काय?
छे मागत वैगरे नाही, आमचं आम्ही पितो/खातो. सोबत मित्र वैगरे असेल तर टीटीएमेम या न्यायाने कारभार चालतो.

In reply to by सूड

अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला टका एकटा बिल भरायला निघालेला. एक धायरीकर, एक तळेगावकर आणि एक आकुर्डीकरांनी पुणेरी दिलदारपणा दाखवुन टी.टी.एम.एम. करुन टक्याला गरिबीपासुन वाचवलं. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नशीब तूच बोल्लास, आम्ही बोललो की तोंड दिसतं!! =))))

In reply to by टवाळ कार्टा

नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत गेली असती वेळ. लोन खुप साधी गोष्ट आहे :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे बापरे, कोकम सरबत, उसाचा रस आणि वडापाव इतकं महाग झालंय पुण्यात?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भगवी कफनी वगैरे मला झेपणारे नै...पो.प.चे प्रेषित उर्फ "गिर जा" काका आहेत त्यांच्या कडे द्या पाठवून भगवी कफनी

६ जुन शनिवार आहे. त्यामुळे जगभरच्या हॉटेलात तौबा गर्दी असेल. त्यामुळे बाणेर रोडवरचे "ग्रीनपार्क" हे ठिकाण योग्य राहिल असे सुचवु इच्छितो. (इथे निवांत बसताही येइल आणि मोठ्या ग्रुपची सोयदेखील होउ शकते). दुसरे बरे ठिकाण म्हणजे पुणे विद्यापीठापासुन पाषाणकडे जायचा जो रस्ता आहे तिथे डेक्कन हिल्स का कायसे हॉटेल आहे. ते देखील बरे पडेल. अन्यथा बंजारा हिल्स किंवा गार्डन कॉर्ट बघा. तीर्थप्राशन, खाटखुट या सग्ळ्याची व्यवस्था होइल असे बघत पर्याय सुचवले आहेत.

In reply to by मृत्युन्जय

६ जुन शनिवार आहे. त्यामुळे जगभरच्या हॉटेलात तौबा गर्दी असेल. त्यामुळे बाणेर रोडवरचे "ग्रीनपार्क" हे ठिकाण योग्य राहिल असे सुचवु इच्छितो. (इथे निवांत बसताही येइल आणि मोठ्या ग्रुपची सोयदेखील होउ शकते). दुसरे बरे ठिकाण म्हणजे पुणे विद्यापीठापासुन पाषाणकडे जायचा जो रस्ता आहे तिथे डेक्कन हिल्स का कायसे हॉटेल आहे. ते देखील बरे पडेल. अन्यथा बंजारा हिल्स किंवा गार्डन कॉर्ट बघा. तीर्थप्राशन, खाटखुट या सग्ळ्याची व्यवस्था होइल असे बघत पर्याय सुचवले आहेत.
कुठेही बघा पण शेखांना मस्य व मला तंदूर मधला पक्षी असेल असे बघा :)

कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय? कट्ट्याला कंपु नसतो..

हे शेख साहेब कोण आहे हे कळाले तर फार आनंद होईल. :) आम्ही पण कट्ट्याला यायचा विचार करू.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे दिपक कुवेतकर! गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची शेगडी त्यांनी सांभाळलीये. पण ते सारखे पनीरचे पदार्थ करत असतात.

In reply to by रेवती

वाटलंच रेवतीकाकूच मदतीला धावून येणार. नक्की नक्की येऊ मग कट्टयाला.

In reply to by रेवती

गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची शेगडी त्यांनी सांभाळलीये. गादी सांभाळ्ल्या बद्धल शेख साहेबांना तहे दिल से शुक्रिया... ;) बाकी, आज्जे गणपा सेठ रिटायर झाले ? बापरे... कधी ? कसे ? का ? जाता जाता :- आध्य बल्लावाचार्य श्री.श्री.श्री गणपा शेठ तुम्ही जिथे कुठे गेला असाल तिथुन इथे परत या ! आम्ही तुमची वाट पाहत आहोत ! इति :- मदनराव प्रेमनगरकर आणि समग्र अघळ पघळ मित्रमंडळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

In reply to by मदनबाण

आलेत! जरा इकडे तिकडे बघ. घराच्या जवळ दिसेल कुठेतरी! सध्या आंतरजालीय नेटवर्कच्या एकूणच बाहेर आहे तो.

In reply to by पैसा

आलेत! जरा इकडे तिकडे बघ. घराच्या जवळ दिसेल कुठेतरी! अच्छा अच्छा ! असं व्हयं... बरं वाटलं बघा आम्हासनी. :) जाता जाता :- युएस टाईम मधे आज्जे आणि इंडिया टाईम मधे पै तै गादी चालवतात तर ! ;) नमस्कार त्या "हुच्च" गादीला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

In reply to by रेवती

सांभाळणारा? गणपा एकमाद्वीतीय आहे आणि माझ्याहुन सरस असे एक सो एक बल्लवाचार्य आहेत की ईथे!!

In reply to by कपिलमुनी

हा देखील उत्तम पर्याय आहे. अगोदर टेबल राखून ठेवता येइल.
बाबू गणेशन असेल तर २ दिवस उपवास करून येउ ;)

In reply to by कपिलमुनी

ह्याचा उकल अद्याप व्हायचा आहे.... तुर्तास, आमच्या द्रुष्टीने "आकुर्डी" हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण.