पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही.
त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे.
मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील)
कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल.
शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) )
मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :)
अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
माका बी येवचा आसा , पन टायम
माका बी येवचा आसा , पन टायम भेटल का नाय तेच्यावर डिपेंड हाय
बघुया नंतर कलवतो हा टका सायब ...
धाग्याने अर्धशतक गाठले....
जेपींच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
In reply to धाग्याने अर्धशतक गाठले.... by मुक्त विहारि
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.मुक्तविहारी आणी ईतर मिपाकरांचा सत्कार पुणे कट्याला प्रत्यक्ष हजेरी लावुन केला जाईल.
कट्टाउत्सुक-जेपी
आपण आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद....
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
पण
आपले आवडते पेय आपली वाट बघत आहे.
ह्याची नोंद आपण घेतली असेलच.
आपले आवडते पेय आपली वाट बघत
In reply to आपण आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद.... by मुक्त विहारि
आपले आवडते पेय आपली वाट बघत आहे.ह्याची नोंद आपण घेतली असेलच.
यस्स सर...
कट्टोत्सुक असा माफक बदल
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
कट्टोत्सुक असा माफक बदल सुचवतो.
-खाटुक संचालित अखिल भारतीय व्याकरणधरे समिती, गॉथम खुर्द-
शेवटचा हात.
In reply to कट्टोत्सुक असा माफक बदल by कॅप्टन जॅक स्पॅरो
खाटुक संचालित अखिल भारतीय मिपा व्याकरणसुधार समिती, गॉथम खुर्द-
सत्कार समीती मानद सदस्य
जेपी लक्ष्य असू दे
जेपी लक्ष्य असू दे
In reply to शेवटचा हात. by नाखु
१०० झाले की जेपी व्याकरणाचे पुस्तक देईल सत्कारात :)
जेपी सर पुस्तकं वाटतात का?
In reply to जेपी लक्ष्य असू दे by टवाळ कार्टा
जेपी सर पुस्तकं वाटतात का? मलाही आवडेल पुस्तक घ्यायला.
खाटुक अप्रूव्ह्ज धिस.
In reply to कट्टोत्सुक असा माफक बदल by कॅप्टन जॅक स्पॅरो
खाटुक अप्रूव्ह्ज धिस.
-खाटुकमॅन.
मी येत आहे.
मी येत आहे.
७ ला भोर ला लग्नाला जायचे आहे
७ ला भोर ला लग्नाला जायचे आहे, त्यामुळे शक्यता कमी वाटत आहे..
मुबई हून कोण कोण येत आहेत?
आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि करायचा?
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त
In reply to मुबई हून कोण कोण येत आहेत? by मुक्त विहारि
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त इतरानी कुणाला व्यनी करायचा ??
अनिवासी भारतीयांनी कुणाला व्य.नि. करायचा?
In reply to मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त by जेपी
हा पण एक उप-प्रश्र्न आहेच.
99
In reply to अनिवासी भारतीयांनी कुणाला व्य.नि. करायचा? by मुक्त विहारि
शेच्युंरीचा सत्कार मी करणार नाहीSSSSS
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त
In reply to मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त by जेपी
मुंबै अथवा पुणे यातील जे जवळ असेल तिकडच्या मिपाकरांना (म्हणजे जे कट्ट्याला येणार आहेत त्याच मिपाकरांना)
आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि
In reply to मुबई हून कोण कोण येत आहेत? by मुक्त विहारि
मला करा...
कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे
In reply to आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि by टवाळ कार्टा
कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे टक्या?
सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू
In reply to कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे by सूड
सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू
आमचं काही धरन्यातलं नाय ब्वा.........
In reply to सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू by टवाळ कार्टा
तरीपन या ठिकानी असं झाईर करतो की पूर्ण प्रयत्न केले जातील....
१) नळस्टॉप पासचं समुद्र
In reply to सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू by टवाळ कार्टा
१) नळस्टॉप पासचं समुद्र/निसर्ग
२) नदीकाठचं मिर्चमसाला
३) शोरबा बार्बेक्यू, सिंहगड रोड
४) राजधानी
५) सुकांता
६) दिल्ली किचन
७) वाडेश्वर
८) दुर्वांकूर
९) खैबर
१०) गंधर्व
सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ
In reply to १) नळस्टॉप पासचं समुद्र by सूड
सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल" हे वाचले नै कै?
मी सरसकट सगळं लिहीलंय, वाटेल
In reply to सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ by टवाळ कार्टा
मी सरसकट सगळं लिहीलंय, वाटेल ते निवडा.
निसर्ग
In reply to १) नळस्टॉप पासचं समुद्र by सूड
इथे कुक्कुटमांसयुक्त अप्रतिम व्यंजने मिळतात हे मुद्दाम नमूद करतो (चिकन राजकुमार संतोषी...हे एक अद्भुत प्रकर्ण आहे)
मत्स्योपहार हा तर त्यांचा नमूद एकल विक्री मुद्दा आहे ....
त्यांचे विविधरंगीपेयसाठा ह्यात एकधान्यी पेये विशेषेकरून मांडली आहेत ...
तस्मात आमची पसंती निसर्ग ला ...
बाकी आम्ही ठाणेकरांनी पुण्यातील उपाहारगृहांची माहिती देणे ह्यातील औध्दत्य केवळ क्षमेस पात्र ठरो हि परमेश्वरचरणी प्रार्थना ...
निसर्ग
In reply to निसर्ग by अत्रन्गि पाउस
मला तरी महाग वाटले :(
हो पण
In reply to निसर्ग by कपिलमुनी
चव कशी आहे ? :)
चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि
In reply to हो पण by अत्रन्गि पाउस
चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि मासेमारी येथील चवही तितकीच उजवी वाटली.
ठिके
In reply to चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि by बॅटमॅन
मग तिथे
खरोखर येणार असल्यासारखे/ख्या
In reply to ठिके by अत्रन्गि पाउस
खरोखर येणार असल्यासारखे/ख्या काय प्रतिसाद देताय?
म्हणजे ??
In reply to खरोखर येणार असल्यासारखे/ख्या by सूड
अहो येणारच आहे ...टका ला लिहिले आहे तसे ...
मला
या कट्ट्याला यायची ईछ्चा आहे. त्यासाठी काय करावे लागेल [ आमन्त्रण मिळण्यासाठी ] ?
धागा वाचला म्हणजे आमंत्रण
In reply to मला by gogglya
धागा वाचला म्हणजे आमंत्रण पोचले
धन्यवाद!
In reply to धागा वाचला म्हणजे आमंत्रण by टवाळ कार्टा
कट्टा PCMC मध्ये असला तर अती उत्तम!
चिमणराव सोबत ये.
In reply to धन्यवाद! by gogglya
चिमणराव सोबत ये.
त्याआधी त्यांची पुर्वतयारी
In reply to चिमणराव सोबत ये. by मोदक
त्याआधी त्यांची पुर्वतयारी म्हणुन आपण एक छोटा कट्टा करु. तु, मी, ते असा. तु येता येता त्यांना हिंजवडीला पिक करु शकशिल. इकडे प्राधिकरणामधे वल्ली, अन्या, औरंगजेब, बुवा वगैरे येणार असतील रविवारचे तर ठरवु बेतं कसं?
हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे
In reply to त्याआधी त्यांची पुर्वतयारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे कै? ;)
सोडु का तुझ्यावर....!!
In reply to हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे by टवाळ कार्टा
सोडु का तुझ्यावर....!!
७ तार्खेला असेल तर . परयत्न
७ तार्खेला असेल तर . परयत्न केल्या जाइल . .
पुण्यात तीर्थ + मासे परत एक्दा खायचे आहेच :)
कट्टा ६ मेच्या संध्याकाळी
कट्टा ६ मेच्या संध्याकाळी असेल...बहुतेक ५ वाजल्यापासून (पुणेकरांनी जागा ठरवण्यात पुढाकार घ्यावा)
नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल
In reply to कट्टा ६ मेच्या संध्याकाळी by टवाळ कार्टा
नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल करुन टाक टक्या!!
http://www.misalpav.com
In reply to नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल by सूड
https://www.misalpav.com/comment/695130#comment-695130
हे नक्की का? मग हेच्च फायनल
मला कोणीतरी पत्ता सांगा रे...मी फुरसुंगीहून येणार :(
https://www.zomato.com/pune
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
https://www.zomato.com/pune/nisarg-erandwane
हेच का ते निसर्ग??
हेच ते!!
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
हेच ते!!
निसर्ग
In reply to नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल by सूड
https://www.zomato.com/pune/nisarg-erandwane
मेनु कार्ड इथे आहे . पण कोणी शाकाहारी असतील तर त्यांचा काय ?
आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू
In reply to निसर्ग by कपिलमुनी
आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू किंवा मग टांग मारु!! ;)
तूला टांग मारणं
In reply to आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू by सूड
जास्त सोपं आहे!!! आणि डबा घरुन का?? व्हेज वर बंदि आहे का तिथे?
काही बंदी वैगरे नाहीये, पण
In reply to तूला टांग मारणं by दिपक.कुवेत
काही बंदी वैगरे नाहीये, पण मला आठवतंय त्यानुसार पर्याय कमी आहेत. पण म्हटलं आता मुनीवरांनी प्रश्न विचारलाच आहे, तर काहीतरी उत्तर द्यावंच. ;)
हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे
हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे का ? निसर्ग जवळ आहे आणि १० जूनपर्यंत इकडे आहे. त्यामुळे जमू शकते.
होय अखिल मिपाकरांचा कट्टा आहे
In reply to हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे by विशाखा पाटील
होय अखिल मिपाकरांचा कट्टा आहे. तुम्हीही जरुर या.
यायचं होतं.तारीख बघुन पास
यायचं होतं.तारीख बघुन पास दिल्या गेला आहे.
सुवर्णसंधी घालवताय =))
In reply to यायचं होतं.तारीख बघुन पास by अजया
सुवर्णसंधी घालवताय =))
काय करणार!मी सातला नक्की
काय करणार!मी सातला नक्की येणार होते.सहाला बाहेर आहे:(
माझ येण रद्दबातल..
माझ येण रद्दबातल..
मला ७ तारीख जास्त सोईची वाटते
मला ७ तारीख जास्त सोईची वाटते.
तारीख, वेळ आणि जागा नक्की झाल्यावर ती इथे टाकावी.
ठिकाण ठरले का?
ठिकाण ठरले की, नक्की कळवा..
नुसताच धागा लांबलाय.काहीच
नुसताच धागा लांबलाय.काहीच कन्फर्म नाही.यायचे असले तर कुठे कधी किती वाजता यावे,एकदा लिहुन टाका की.जमेलसं दिसतंय.७ ला दुपारी असेल तर फारच बरं!