२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज
झी-न्यूज अंदाज
http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-si...
http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report.pdf
भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२
काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९,
इतर - १७१-१८१
टाईम्स नाऊ-सी व्होटर अंदाज
http://timesofindia.indiatimes.com/tmes-now-cvoter-national-lok-sabha-el...
भाजप - २०२, रालोआ - २२७
काँग्रेस - ८९, संपुआ - १०१
इतर - २१५
_______________________________________________________________________________
मतदानोत्तर चाचण्यांचे विविध संस्थांचे अंदाज
एबीपी-माझा या संस्थेच्या अंदाजानुसार मोदी वाराशणीतून, सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, राहुल गांधी, प्रिया दत्त, किरीट सोमय्या इ. विजयी होण्याची शक्यता आहे.
तर ज्योतिरादित्य सिंदीया, कपिल सिब्बल, अरूण जेटली इ. हरण्याची शक्यता आहे.
_______________________________________________________________________________
मिपाकर 'क्लिंटन' यांचा अंदा़ज
http://www.misalpav.com/node/27857#new
भाजप - २१८, रालोआ - २६०
काँग्रेस - ९३, संपुआ - ११५
इतर - १६८
_________________________________________________________________________________
प्रत्यक्ष निकालानंतर मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज व क्लिंटन यांनी स्वतःच्या अभ्यासातून परिश्रमपूर्वक काढलेले अंदाज यांची तुलना करता येईल.
प्रतिक्रिया
14 May 2014 - 11:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग.
हे अंदाज खरोखरच अभ्यास करून काढलेले असतात की आपल्याआवडी नुसार टाकलेले असतात काही कळायला मार्ग नाही. प्रत्येक मतदारसंघात निवडून येण्यासाठी वेगवेगळे निकष असतात. कुणाला आपला जातवालाच हवा अस्सतो तर कुणाला काम करणारा हवा असतो.काहीजण पंतप्रधान कोण ते पाहून मत देतात.
शुक्रवारी सकाळी पाहुया काय होतय ते.
(आज तक्,आय बी एन लोकमत्,स्टार प्रवाह्,टाइम्स नाउ पाहणारी)माई
15 May 2014 - 12:15 pm | श्रीगुरुजी
>>> उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग.
माझा स्वतःचा काहीही अंदाज नाही.
पण नान्या, तुझा स्वतःचा काहीतरी अंदाज असेल ना. तो सांगून टाक.
15 May 2014 - 7:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मला आकडे वगैरे काही कळत नाहीत रे गुरुजी.माझे अंदाज-
लाडू वाटपाचे काम सकाळपासून चालु होईल;मोदी दिल्लीला जायला दुपारी निघतील,संध्याकाळच्या सुमारास लेख पडायला चालु होतील-"चहावाला ते पंतप्रधान्","मोदींपुढील आव्हाने","जगभरातून अभिष्टचिंतनाचे संदेश","गांधीनगरमध्ये फटाक्यांची आतषबाजी"...
15 May 2014 - 7:31 pm | हाडक्या
ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो.. :D .. :D
15 May 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी
>>> ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो..
:yahoo:
16 May 2014 - 12:55 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
14 May 2014 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा
15 May 2014 - 9:35 am | मैत्र
ऐकीव माहिती : भाजपा संघाच्या एक्झिट पोल प्रमाणे एन डी ए ला २५८-२६० जागा मिळतील असा अंदाज आहे..
त्याप्रमाणे आणि क्लिंटनचा प्रत्येक जागेचा अभ्यास जास्त योग्य वाटतो आहे या चॅनेलवाल्यांच्या अवास्तव आकड्यांपेक्षा.
पण गेल्या वेळच्या विधानसभा निकालांचे परफेक्ट अंदाज सांगणार्या टुडेज.चाणक्य ने ३२५ चा अवाढव्य आकडा सांगितला आहे.
उद्याअखेर कळेलच खरे काय ते!
15 May 2014 - 9:52 am | पैसा
सरकार कोणाचंही येवो. नवीन पंतप्रधान मिळणार हे नक्कीच!
15 May 2014 - 9:57 am | जेपी
बर याबरोबरच आंध्रा आणी तेलगंणा विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल काय येतील?
15 May 2014 - 11:47 am | ऋषिकेश
माझा अंदाज
एन्दीए २५२
युपीए १०९
15 May 2014 - 12:12 pm | श्रीगुरुजी
२००४ मध्ये एनडीटीव्ही चा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज सर्वात कमी फरकाने चुकला होता. सर्व वाहिन्यांनी रालोआला संपुआच्या तुलनेत खूप जास्त जागांचा अंदाज दिला होता. आजतक ने रालोआला २६० व संपुआला १७० चा अंदाज दिला होता. एनडीटीव्ही ने रालोआला २२५ व संपुआला २०० चा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात रालोआला १८७ व संपुआला २३४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एनडीटीव्ही चा अंदाज कमीतकमी फरकाने चुकला होता.
काल एनडीटीव्ही ने रालोआला २५०, संपुआला ८९ व इतरांना १५६ चा अंदाज दिला आहे. उद्या काय ते कळेलच.
15 May 2014 - 12:15 pm | संपत
माझा अंदाज
एन्दीए २१० - २३०
युपीए १४० - १६०
आआप १० - १४
15 May 2014 - 12:37 pm | आनन्दा
माझा अंदाज थोडा वेगळा आहे - रालोआ एक तर २५०-२७० मध्ये असेल, पण जर त्यांनी ती मॅजिक फिगर क्रॉस केलि तर मग मात्र कठीण आहे. यावेळेस वाढलेली १०% मते किमान १००-१५० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी आहेत असे मला वाटते. ती जर आआप ने घेतली नाहीत तर भाजपालाच मिळणार. त्यमुळे ती मते मिळाल्यास भाजपाला एकहाती बहुमत देखील मिळू शकेल.
16 May 2014 - 1:50 pm | बहिरुपी
अभिनंदन आनन्दा.
17 May 2014 - 3:47 pm | आनन्दा
धन्यवाद.
16 May 2014 - 2:40 am | बाळकराम
भाजप- २००-२०५, रालोआ- २२५-२३५
संपुआ- ११०-१२०
आआप- ५-८
इतर- १८०-२०३
उद्या काय ते कळेलच
16 May 2014 - 10:40 am | श्रीगुरुजी
विकास यांनी निकालासाठी दुसरा धागा सुरू केलेला दिसतोय. हरकत नाही. प्रत्यक्ष निकाल व आधीचे अंदाज याची तुलना व्हावी या उद्देशाने मी हा धागा सुरू केला होता. पण आता निकालाविषयी तिथेच चर्चा करूया.
16 May 2014 - 1:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अप्पा, अरे लिंक तरी द्या त्या धाग्याची.
16 May 2014 - 8:39 pm | श्रीगुरुजी
रालोआला शेवटी ३३७ च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. जर सर्व मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांची तुलना केली तर खालील चित्र दिसते.
टाईम्स नाऊ : २४९-२६५
एनडीटीव्ही : २५०
सीएनएन आयबीएन : २७०-२८२
आजतक : २७२
एबीपी न्यूजअ : २८१
इंडिया टीव्ही : २८९
न्यूज २४ (चाणक्य) : ३४०
म्हणजे या सर्वांपैकी न्यूज २४ (चाणक्य) यांचाच अंदाज जवळपास ९९ टक्के बरोबर आला आहे. तर निकाल व अंदाज यातील सर्वाधिक अंतर (अंदाजे २७-२८ टक्के फरक) एनडीटीव्हीचे अंदाज व प्रत्यक्ष निकाल यात आहे.
क्लिंटन यांचा अंदाज (२६०) हा देखील मोठ्या फरकाने चुकला. त्यांचे काही राज्यांचे अंदाज चुकले (उदा. कर्नाटक). पण आपले अंदाज चुकल्याचा त्यांना देखील आनंद झाला असणार.
16 May 2014 - 8:40 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रात व इतर अनेक राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. सुशीलकुमार शिन्द्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभव पत्करावा लागला यावर अजूनही विश्वास बसत नाही. सुप्रिया सुळेंचे २००९ मधील मताधिक्य (३,३७,००० मतांची आघाडी) घसरून जेमतेम ७३००० वर आले. पवारांचा प्रभाव महाराष्ट्रातून संपत असल्याचे हे संकेत आहेत.
भाजपला फक्त एकच धक्का बसला. तो म्हणजे अरूण जेटलींचा पराभव. अमृतसरमधून पूर्वी २ वेळा निवडून आलेल्या सिधूला तिकिट नाकारून जेटलींना देणे ही भाजपची चूक ठरली. जेटलींना दिल्लीतून उभे करून अमृतसरमधून परत सिधूला तिकिट दिले असते तर अमृतसरची जागा देखील मिळाली असती.
काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळविता येतील इतक्या जागा देखील मिळालेल्या नाहीत (५५ पेक्षा कमी). ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सिब्बल, खुर्शीद, राणे, भुजबळ इ. अत्यंत बेताल व उन्मत्त नेते किंवा त्यांचे नातेवाईक निवडणुक हरले हे चांगले झाले.
16 May 2014 - 9:32 pm | पैसा
सिद्धूला तिकीट नाकारले तेव्हाच जेटली हरण्याची शक्यता आहे असं मनात आलं होतं. लोकांनी केवळ भाजपाच्या नावावर मते दिलेली नाहीत असा याचा अर्थ.
जेटली भावी उपपंतप्रधान म्हणत होते त्याचं आता काय होतंय पाहूया. स्मृती इराणी किंवा सिद्धू यांना मोदींच्या दुसर्या जागेवर निवडून यायची संधी आहे.
19 May 2014 - 4:31 pm | दुश्यन्त
सिद्धूला कशाला आता भाजप निवडून आणेल. तिकीट नाकारलं म्हणून या महाभागाने प्रचार केला नाही आणि मतदानाला पण आला नाही.एवढी नाराजी कशाला.तरी बर त्याची बायको भाजपची आमदार आहे.त्याला आता लगेच तरी भाजप निवडून आणणार नाही. बडोद्यातून अमित शहा किंवा अन्य कुणी गुजराती नेताच निवडून येईल.
16 May 2014 - 9:48 pm | विकास
जे १९७७ साली देखील महाराष्ट्राला करायला जमले नाही ते या वेळेस करून दाखवले! त्याबद्दल मराठी जनतेचे अभिनंदन. राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाच्या/आघाडीच्या जागा आपल्या राज्यात असणे महत्वाचे असते कारण त्यामुळे मंत्रीपदे देखील मिळू शकतात. महाराष्ट्राला यात नक्कीच फायदा होईल असे वाटते.
16 May 2014 - 10:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ती तशी मंत्रीपदे आताही होती.अतिशय महत्वाचे असे देशाचे गृहमंत्रीपद आपले सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे भूषवत होते. शिवाय कृषीमंत्री शरद पवार,राजीव शुक्ला हे ही होते.असो.
नेहमी कॉन्ग्रेसला चिकटून राहणार्या मराठी जनतेने ह्यावेळी त्यांच्या विरोधात कौल दिला हे बरे झाले.
16 May 2014 - 11:19 pm | आत्मशून्य
काही म्हणा उध्दव ठाकरेंचे स्टार्स (?) बाकी जोरात आहेत. बोल्णे शामळु वाटते तरी एखादी संघटना न्हवे पण पक्ष चालवायचे मात्र सॉलीड डोके आहे की काय वाटु लागले आहे. विशेषतः बहुतांश जेष्ठ जुन्या जाणत्या उमेदवारांना डावलुन नव्या चेहर्यांना संधी देण्याची खेळी मोदी लाटेवर अचुक साधली तरी कौतुक करायलाच हवे.
17 May 2014 - 7:23 pm | संपत
+१
19 May 2014 - 4:36 pm | दुश्यन्त
खरोखर उद्धवकडे पक्ष/संघटना चालवण्याचे कौशल्य आहे. २००७ आणि २०१२ ला विरोधक आणि मिडीयाने रान उठवून पण त्यानी मुंबई महापालिका आपल्याकडेच ठेवली. २००९ च्या लोकसभेत राज्यात शिवसेना कॉंग्रेसनंतर (११ जागा जिंकून) दुसर्या जागी होती.विशेष म्हणजे तेव्हा सेनेने मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग गमावले होते तरी खास करून ग्रामीण भागातून एकूण ११ जागा मिळवल्या होत्या. आता पण ते मनोहर जोशी वगैरे ज्येष्ठांना बरोबर हाताळत आहेत.
17 May 2014 - 5:20 pm | नानासाहेब नेफळे
फोटोवाल्यादादाचे काही एक कर्तृत्व नाही ,मांडवलीदादाच्या कोहिनूर नवनिर्माण पक्षाचे पितळ उघडे पडल्याने फोटोग्राफरचा फायदा झाला.
17 May 2014 - 5:42 pm | आनन्दा
साहेब राजकारण नेहमीच असे पडद्याआडून चालते..
19 May 2014 - 8:48 pm | श्रीगुरुजी
दारूण पराभवानंतर काँग्रेस आता खडबडून जागी होईल. संपुआच्या दुसर्या सत्रात काँग्रेस नेते अत्यंत उन्मत्त आणि उर्मट झाले होते. त्यांचा रथ चार अंगुळे वर चालत होता. सिब्बल, मनीष तिवारी, दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा, खुर्शिद असे अनेक काँग्रेसजनांनी संपूर्ण ताळतंत्र सोडला होता. याच काळात तेलंगण राष्ट्रीय समिती, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राजद, लोजप इ. अनेक सहकारी सोडून गेले तरी काँग्रेसची गुर्मी कायम होती आणि आता त्याचीच जबर शिक्षा त्यांना मिळाली.
२०१४ ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आहे. नंतर फेब्रु २०१५ मध्ये झारखंड व हरयानाची, डिसेंबर २०१५ मध्ये बिहार व मे २०१६ मध्ये केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, प. बंगाल व आसामच्या निवडणुका आहेत. दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणुक देखील होऊ शकते.
आता काँग्रेस पुन्हा एकदा जुने व नवीन सहकारी शोधू लागेल. महाराष्ट्रात शेकाप व रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गट, गवई गट व कवाडे गटाशी काँग्रेस युती करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लालूच्या बरोबरीने संजदशी युती करण्याचा प्रयत्न राहील. कर्नाटकमध्ये निजद, तामिळनाडूत द्रमुक व इतर काही द्रविड पक्ष, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस झारखंड मध्ये बाबुलाल मरांडीचा पक्ष इ. नवे, जुने सहकारी काँग्रेस शोधण्याच्या प्रयत्नात राहील.
भारतीय राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना असायचा. विरोधी पक्षांच्या फाटाफुटीमुळे काँग्रेसचे फावायचे. जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष एकत्र आले तेव्हा तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला (१९७७, १९८९, १९९८, १९९९). पण यापुढील काळात भाजप विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना होईल.
19 May 2014 - 9:32 pm | विकास
आज काँग्रेसजनांनी अपेक्षेप्रमाणे नेतृत्वावर विश्वास दाखवून गांधी मातापुत्राचे राजीनामे नाकारले! मनमोहनसिंग यांनी तर पंतप्रधान म्हणून स्वत:चीच जबाबदारी आहे असे म्हणले! एका अर्थी ते खरे देखील आहे. पण तरी देखील त्या माय-लेकराला कसे काही वाटत नाही? आता लोकसभेत किती हजेरी लावतात ते पहायचे.
19 May 2014 - 9:37 pm | प्रचेतस
19 May 2014 - 10:33 pm | विकास
तरी एक दु:खात सुख म्हणजे, आमच्या राहुलबाबांना (सत्तारूपी) विष खावे लागले नाही.
20 May 2014 - 11:54 am | ऋषिकेश
त्या मायलेकरांनीही जबाबदारी स्वीकारल्याचे जाहिर टिव्हीकर सांगितले आहे की!
20 May 2014 - 4:15 pm | विकास
राजपुत्राने तर अगदी सुहास्य वदनाने सांगितले होते.
प्रश्न खरेच काँग्रेस (आणि सोनीया-राहूल विशेष करून) आत्मपरीक्षण करत आहे का हा आहे. त्यांनी नाही केले तर काँग्रेसविरोधकांसाठी चांगलेच आहे. पण काँग्रेससाठी मात्र ...
आणि हो, मी राहूलच्या विरुद्ध नाही. कशासाठी विरुद्ध राहू? पण केवळ गांधी घराण्यातला म्हणून विश्वास ठेवावा असे म्हणणार्या काँग्रेसी वृत्तीच्या विरुद्ध नक्की आहे.
20 May 2014 - 2:59 pm | इरसाल
ह्या नाकारलेल्या राजीनाम्याबद्दल मटा वर बातमी आलेली आहे, त्यात पराभवाच्या ऐवजी बलात्कार टाकुन जरा ३ इडियट करुन पहावा ही लम्र इनंती.
लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sonia-and-rahul-gandhi-con...
20 May 2014 - 12:59 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रात काँ-राकाँ विधानसभेतील विजयासाठी आता पुन्हा जुन्याच वाटेने जातील असं वाटंतय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राखीव जागा, नामांतर, मोफत गोष्टी इ. लोकानुनयी निर्णयांची पुढील काही महिन्यात खैरात होईल. सर्वात प्रथम पुणे विद्यापीठाचे नामांतर करून माळी समाजाला गाजर दाखविले जाईल. नंतर मराठा आरक्षण करून मराठ्यांना व फुकट वीज जाहीर करून शेतकर्यांना गाजर दाखविले जाईल.
निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या अशा लोकानुययी सवंग निर्णयांचा पूर्वी मतांवर परीणाम होत होता. आता तसे होईल का? केंद्र सरकारने सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश, जाटांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश असे निव्वळ सवंग व लोकानुययी निर्णय घेतले होते. डिझेल ची दरवाढ देखील रोखून धरली होती व १२ मे ला ७ वाजता निवडणुक संपल्यावर लगेच ८ वाजता डिझेलचे भाव वाढवून आपल्या नालायक कारकीर्दीचा संपुआने शेवट केला होता. अशा सवंग निर्णयांचा काहीच परीणाम झाला नव्हता व संपुआला जबरदस्त मार मिळाला. महाराष्ट्रात देखील तसेच होवो.
21 May 2014 - 9:02 am | विकास
गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार! ;)
21 May 2014 - 9:21 am | चौकटराजा
आपले स्वप्न साकार करण्यासाठी माणूस काय काय करतो.तिस्ता मुळे तर मोदीना प्रसिद्धी मिळाली. मोदी हे "दादा" गिरी करायला ठीक आहेत हे भाजपाला पटले. मोदी प्रधानमंत्री झाले. आता गुजराथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देऊन सांगतात कुणाला ?तिस्ताचा प्ल्यान फुलप्रूफ होता .
21 May 2014 - 8:16 pm | श्रीगुरुजी
>>> गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार!
:yahoo:
मोदींच्या विजयात टिस्टा, तहलका, कोब्रापोस्ट, गुलैल, तरूण तेजपाल, अनिरूद्ध बहल, डॉग्विजय इ. मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. ही मंडळी नसती तर मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकले नसते.
21 May 2014 - 8:27 pm | विकास
"मौत का सौदागर" म्हणून हिणावणार्यांचे नाव तुम्ही घेतले नाहीत त्याबद्दल निषेध. ;) जर त्या वेळेस त्या "मौत का सौदागर" म्हणाल्या नसत्या आणि इमाने इतबारे प्रचार केला असता तर मोदी कदाचीत दुसर्यांदा मुख्यमंत्री देखील झाले नसते. परीणामी गुजरात डेव्हलपमेंट मॉडेल जनतेपुढे मांडू शकले नसते...
21 May 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
अरे हो! राजमाता आणि युवराज राहिलेच. त्यांच्याप्रमाणे बेनीप्रसाद वर्मा, फारूख अब्दुल्ला, इम्रान मसूद, खुर्शिद, मणिशंकर इ. ना देखील निव्वळ अनावधानाने श्रेय द्यायचे राहून गेले याबद्दल दिलगीर आहे.
22 May 2014 - 8:48 am | इरसाल
या लोकांचे श्रेयअव्हेर केल्याबद्द्ल तुमच्यावर कारवाई का करु नये ?