ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Mar 2014 - 1:15 pm

व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात.

half filled glass
ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात. अनुयायांच्या नशिबाने टोकाची का होईना भूमिका मांडणारे दोन्ही परस्पर विरुद्ध टोकाची बाजू मांडणार्‍या नेतृत्वात समंजसपणा असेल तर ते वस्तुस्थिती लक्षात घेऊन तडजोडीचा मार्ग निवडतात. या प्रकारात निष्पक्ष नेतृत्व मागे पडत पण काही का होईना टोकाच्या भूमिका असणार्‍यांमध्ये सख्य झालतर किमान शांतता तरी नांदते. (अशी शांतता न्याय्य असतेच असे नाही; पण मराठीत एक वाक्प्रचारआहे ''पादा पण नांदा'' ती अंशतः लागू पडते का ?) पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे टोकाची भूमीका घेणारी परस्पर विरुद्ध ध्रूवावरील दोन नेतृत्व प्रत्यक्षात संमजस असणे अपवादानेच घडते. तोपर्यंत संघर्षरत समुदायांच्या नशिबाला ससेहोलपटच लिहिलेली असते यात पिढ्याच्या पिढ्याही बरबाद होताना दिसून येतात. त्यातही संशयवाद आला तर नेतृत्वाला माघार तरी घ्यावी लागते किंवा निर्णय घ्यायचाच झालातर बर्‍याचदा त्यांच्या संशयग्रस्त पाठीराख्यांकडून किंवा अंतर्गत संघर्षातून जीवावर बेतण्यापर्यंतही प्रसंग होताना दिसतात.

ससे होलपट टाळण्याच्या दृष्टीने कमीतकमी संघर्षातून तडजोडी साधावयाच्या असतील अथवा दोन्ही बाजूंचे (खरे) निष्पक्ष नेतृत्व पुढे आणावयाचे असेल तर त्याला तर्कसुसंग मांडणी करण्याचे कौशल्य अवगत असणे, स्वहीत अथवा समुहाच्या हिताची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही वेळा भूमीकेतील तार्कीक उणीवांची कबूली दोन्ही बाजू देत नाहीत तरीपण किमान पक्षी/प्रसंगी दोन्ही बाजूंच्या तार्कीक उणीवा पद्धतशीरपणे दाखवून ठेवणे भावी काळात तोडग्यावर सहमती घेण्याच्या दृष्टीने उपयूक्त ठरणारे असू शकते. म्हणून तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवांचा पद्धतशीर अभ्यास सर्वांच्याच हिताचा असू शकतो.

काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग? (छायाचित्रे आणि सौजन्य विकिमीडिया कॉमन्स)
जटील समस्या सोडवण्यातील मोठ्या अडथळ्यातील एक म्हणजे, समस्यांकडे केवळ काळ्या किंवा पांढर्‍या या दोन रंगांशिवाय पहाण्याची तयारी नसणे. असे लोक अधिक पर्याय उपलब्ध असतांना देखील त्यातील खरे तर आपल्याला हवा असलेला एकच पर्याय पाहू इच्छितात. दुसरा पर्यायाचा एकच गट केलेला असतो तो म्हणजे अस्विकार्ह पर्यायांचा. हे उपलब्ध पर्यांयांना चुकीच्या पद्धतीने दुभागणे असते.

Black and white
चुकीच्या दुभाजनाची निष्पत्ती चुकीच्या निष्कर्षात होते. 'जर पर्याय 'अ' चुकीचा असेल तर पर्याय 'ब' बरोबर असलाच पाहीजे.' ;एखाद्याचा दृष्टीकोण 'क्ष' नसेल तर तो 'ज्ञ' असलाच पाहीजे.

केवळ काळ्या किंवा पांढर्‍या दोनच रंगांशिवाय इतर पर्याय विचारात घेण्याबद्दल अनिच्छा अथवा नकारार्थी दृष्टीकोणामागे बहूधा, समस्येस निश्चित एकमेव उत्तरांचा अभाव, आणि समस्येतून उद्भवणारी अनिश्चित संदीग्ध स्थिती हाताळण्यातील अक्षमता, ही संभाव्य कारणे असतात.एखादी गोष्ट स्पष्ट अथवा माहित नसण्यातून, येणारी संदीग्धता अथवा अनिश्चितीते बद्दल असंयम, (उणीवयुक्त) निष्कर्शाप्रत पोहोचण्याची घाई, हि सत्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग नसून, कम्फर्ट हवी असल्याने हा उताविळपणा घडतो.

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
चुकीचे कारण सांगण्यातील घाई चुकीच्या अर्थबोधास कारणीभूत होण्याची शक्यता असते. वरवरचे धागे जुळवून शितावरून भात म्हणत, सुतावरून स्वर्ग गाठला जाऊ शकतो, आणि साप साप म्हणून भुई थोपटली जाऊ शकते.
ज्यात वैध शक्यता अंतर्भूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पर्यायी कारण मीमांसा, सर्व शक्यता पुरेसा अवधी न दिला जाताच बाद केल्या जातात. ग्राह्य शक्यता कोणत्या आहेत ते सुस्पष्ट होण्यापूर्वीच, त्यांची शक्यता नाकारणे म्हणजेच मनाला चारी बाजूने झापडे लावून बंद करणे अथवा क्लोज माइंडेड असणे होय.

*'क्ष' गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसणे, हा 'ज्ञ' गोष्ट बरोबर असल्याचा पुरावा नसतो. -हा विरोधाभास एक तार्किक उणीवेचा प्रकार आहे.
*माझ्याकडे क्ष गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नाही = माझ्याकडे कारण मीमांसा उपलब्ध आहे,हे दोन्ही परस्पर विरोधी दावे एकदम केल्यासारखे आहे.
*"ज्या गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसते" ="त्याची कारण मीमांसा उपलब्ध नसते" एवढे आणि एवढेच त्या पलीकडे काही नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी 'क्ष' गोष्टीवर विश्वास नाही म्हणजे त्याला 'क्ष' सत्य असूच शकत नाही असे म्हणायचे असते असे नाही; क्ष सत्य असूच शकत नाही म्हणत असेल तर तो झाला क्लोज माइंडेडनेस; पण विश्वास नाही पण तर्कसुसंगत पुरावे आल्यास विश्वास ठेवेन हा झाला मनाचा खुलेपणा (ओपन माइंडेडनेस).

*मि.पा. धागे:
** मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
** सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक
** बौद्धिक कृष्णविवर
*-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण
* चिकित्सामक विचार कसा करावा

**(येथील चर्चा मराठी विकिप्रकल्पात वापरावयाची असल्यामुळे आपले या धाग्यावरील चर्चेतील लेखन कॉपीराईट्फ्री होते आहे असे गृहीत धरून चालतो)
** खासकरून विषय समजण्यास सोपा करता यावा म्हणून विषयास अनुसरून चांगली उदाहरणे; संबंधीत वाक्प्रचार आणि म्हणी व्यंगचित्रे (कॉपीराईट फ्री) उपलब्ध असल्यास हवे आहे.
** चर्चा सहभाग, प्रतिसाद, तसेच विषयांतर टाळण्यासाठी आपणा सर्वांना आणि मिपा प्रशासनास धन्यवाद

संस्कृतीधर्मसमाजतंत्रराजकारणशिक्षणविचारमाहितीवादप्रतिभा

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

9 Mar 2014 - 7:12 pm | मंदार कात्रे

शुभेच्छा !

मारकुटे's picture

10 Mar 2014 - 12:40 pm | मारकुटे

छान छान....

मंदार कात्रे आणि मारकुटे साहेब प्रोत्साहन आणि प्रतिसादाकरीता धन्यवाद

प्रकाश घाटपांडे's picture

10 Mar 2014 - 3:25 pm | प्रकाश घाटपांडे

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

माहितगार's picture

10 Mar 2014 - 10:53 pm | माहितगार

प्रकाश घाटपांडेजी आपल्या प्रतिसादा करता खूप खूप धन्यवाद. केवळ वाच्यार्थ घेतला तर आपल्या प्रतिसादाचा अर्थ सरळच रंजनात्मक आहे आणि त्याला उपप्रतिसाद द्यावयाचे किंवा कसे हे इतर मिपाकरांवर सोडतो. पण आपल्या विधानातील लक्ष्यार्थ ज्याला लक्षात येईल त्यांना माझा एवढा मोठा लेख न वाचता आपले स्टेटमेंटही विषय समजण्यास बर्‍यापैकी पुरेसे आहे त्या बद्दल धन्यवाद. अर्थात धागा तर्कशास्त्र विषयक असल्यामुळे जरासा खीस पाडतो आहे. आपले प्रतिसादातील विधान (एकतर ती बिअरच आहे हे गृहीत अनुमान करते ) आणि मुख्य म्हणजे दोनच पर्याय समोर ठेवते आहे. म्हणजे जो काही एक द्रवपदार्थ असेल तो न पिण्या करताचा पर्याय आपल्या विधानात नाही त्या अर्थाने ते ब्लॅक अँड व्हाईट स्टेटमेंट समजता येते का ?

शिवाय तो द्रव पदार्थ बिअरच असावा या आपल्या संभाव्य गृहीत अनुमानावरून मला भारतीय प्रमाणमीमांसेची तुलना सुचली म्हणून आपला प्रतिसाद त्या संबंधाने नवा धागा बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा करीता उदाहरण म्हणून वापरला.

आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

माहितगार's picture

15 Mar 2014 - 2:01 pm | माहितगार

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!

ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो.

ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ?

अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2014 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.

सहमत आहे.
बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो
जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.

माहितगार's picture

15 Mar 2014 - 1:47 pm | माहितगार

काळा अथवा पांढरा असे दोनच पर्याय विचारात घेण हि मानवाचा सहज स्वभाव आहे, त्यातला आपल्या तथाकथित सोयीचा वाटणारा पर्याय निवडून त्याचं समर्थन अशा टोकाला नेल जात की जिथून त्याला समतोल भूमिकेकडे घेऊन येण्यास कठीण जात. खूप कठीण परिश्रमांनी भूमीका बदलण्यात यश आलच तर सिसॉप्रमाणे विरुद्ध दिशेला पूर्ण घसरतात आणि मॅग्नेट चिटकवल्या सारखे चिटकून राहतात. चौकटी बाहेरचा विशीष्ट परिघा बाहेरचा विचारच न सुचल्यामुळे वृत्तीस कुपमंडूकता येते.

कुपमंडूकतेने होणार सगळ्यात मोठ नुकसान, आपल्या पुढे येणार्‍या अनेक संधी (दिसत नाहीत अथवा दिसल्यातरी गांभीर्याने घेत नाही) आणि आपण संधी गमावून बसत असतो, संधी खूप येतात, पण जसे स्थानकावर उशीरा पोहोचल्यामुळे गेलेली बस किंवा ट्रेन परत मिळू शकत नाही तसेच दुसरी संधी येई पर्यंत होणारा कालापव्यव हे एक न मोजले जाणारे मोठे नुकसानच असते.

इथे ग्रे एरिआ म्हणजे, लक्षात न घेतलेल्या बाजू आपण म्हणता तसे, आपल्या पुढील सर्व संधी वापरता याव्यात म्हणून लॅटरल थिंकिंग ची गरज भासते त्या करता एन डायमेन्शन आणि रंगीत पट्टयाचा विचार अवश्यंभावीच म्हणावयास हवा. हे सर्व पर्याय लक्षात घेतल्या नंतर निर्णय घेण्याच्या प्रसंगी कार्यकारण भाव आणि विवेक वापरून बुलियन अल्जेब्रा वापरावा लागू शकतो क्वचीत उपलब्ध ऑप्शन्स पैकी एक एक बाद करत जावा लागू शकतो म्हणून तर्कशास्त्रात बुलियन अल्जेब्रा पूर्ण कालबाह्य होईल का या बद्दल मी साशंक आहे. तर्कसुसंगत कृती निवडताना निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्याय ओपन माईंडने विचारात घेतले का आणि निवडलेला पर्याय तर्कसुसंगत व विवेकपूर्ण आहे का हे महत्वाचे.

फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते. विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधीक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थित समजून घेतला पाहीजे.

संदर्भ :

आत्मशून्य's picture

17 Mar 2014 - 2:49 am | आत्मशून्य

फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन
करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात
याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू
याची असते.

जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.

अनएक्सल्पेन्ड "[मराठी शब्द सुचवा]
१ फोड करुन सांगता न येण्यासारखे
२ समजावुन सांगता न येण्यासारखे
३ विष्लेशण करता न येणे.
४ क्षमस्व, या विषयाबद्दल अधिक विस्तारित माहीती उपलब्ध नाही.
हे शब्द कसे वाटतात?

आत्मशून्य's picture

17 Mar 2014 - 2:37 am | आत्मशून्य

आपण कधी तपास केला आहे का ? why something that makes sense is actually a making sense ? and how " relative " term does impact on it to turn it the other way around ? I mean why and how those same certain things stop making sense some time or opinions later ? okay fuzzy logic is core yet kind of different topic. find these answers and u will get a key to twist almost anything logic wis . [But such flawlessness is boring so good to get back messy anyway ;) ]

fuzzy logic ला मराठीत काही शब्द वापरात आहे का ? नसल्यास अथवा क्लिष्ट असल्यास कोणता शब्द वापरता येईल. पर्यायी मराठी शब्द असलाच पाहीजे असा आग्रह नाही पण पर्यायी शब्द विषयक चर्चेच्या निमीत्ताने संकल्पना समजून घेण्यास मदत होते असे वाटते म्हणून.

fuzzy करता डिक्शनरी पर्याय : 'अस्पष्ट', 'मोघम' इत्यादी दिसत आहेत. approximate करता : 'अदमासे', 'निकट', 'संनिकट' असे शब्द दिसतात.

आपल्या सवडी नुसार फझी लॉजीक बद्दल अधिक विस्तृत किंवा एखादा धागा वाचण्यास नक्कीच आवडेल.

[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]

हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

एखादे गाणे छान आहे वाइट आहे असे आपण म्हणत असतो...

एक असतो क्लासीक/बायनरी सेट ऑफ लॉजीक आणी दुसरा फजी लॉजीक.

तुम्हाला एखादे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर आवडत नाही पण नंतर अचानक आवडु शकते. (रेहमानच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हे चटकन अनुभवास येते) कारण काय ? फजी फॅक्टॉर ऑफ माइंड. टॉकींग पर्टीक्युलरली ऑफ हिम, रेहमानच्या गाण्यात मेलडी + सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स फजी होतो. म्हणजे त्याच्या गाण्यात गोडवा कितपत असेल/भावेल माहीत नाही पण गाणे ऐकण्याचा एक उत्कृश्ट (ऑसम) अनुभव मात्र रेहमान नक्किच तयार करतो. इतर संगीतकार मात्र गाण्यातील गोडव्यावर मेहनत जास्त घेतात ज्यामुळे आपोआप सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स सुधारीत व प्रभावशाली बनतो पण त्यातील भर मेलडीवरच असल्याने मेलडी जास्त मनात राहते. हे फजी लॉजीक संगीताच्या जॉनर प्रमाणे त्याच्या लिसनींग एक्सपिरिअन्स सोबत फजी बनुन व्यक्ती परत्वे एकाच गाण्याबाबत विवीध मते तयार करते.

जसे चहा १०० से. ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणने व्यवहारात मोघम असते. आपण वेटरला गरम चहा दे बोलतो. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से. ला तापव म्हटले तर ठरवताच येणार नाही आणि पुढची गंमत म्हणजे गरम चहा ची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी(फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते. म्हणूनच ते कंटाळवाणेही :) नो वेरीएशन. अलमोस्ट भावनाहिनता. कारण भावनेचे अस्तित्व हेच फजी एक्झिस्टन्स आहे. म्हणून भावना सतत बदलत असतात. मन चंचल आहे :) आजचा व्हिलन उद्याचा हिरोही बनायची शक्यता ही कायम असते (जसे नथुराम) ते या मुळेच.

कॉम्प्युटर गेम्समधे फजी लॉजीक विषेशत्वाने वापरले जाते उदा. ज्यामुळे एखाद्या कॅरॅक्टरवर तुम्ही हल्ला केला तर तो प्रतिहल्ला करेल, लपुनच राहील, **ला पायलावुन पळुन जाइल, सुरक्षीत जागा घेउइ की आत्मघाती हल्ला रचेल का तुमच्या मुवबाबत काहीतरी शिकेल अशा ऑलमोस्ट अगणीत शक्यता ज्या प्रत्यक्ष प्रोग्रामरने उपलब्ध करुन दिल्या असतील पण त्याची निवड मात्र तो ठरवु शकणार नाही तर त्या कॅरॅक्टरची कृत्रीम बुध्दीमत्ता ठरवेल. आणी हे रँडम नसते फजी असते. त्यामुळे खेळ इंटरेस्टींग राहतो बोअर होत नाही. जुन्या व्हिडीओगेम्स मधे हे वापरलेले नसायचे त्यामुळे त्याच्या मुव प्रेडीक्टीव एकसुरी व लवकरच कंटाळवाण्या होत असत.

एकुणच मानवी आयुष्याचे सर्व अंगप्रत्यंगच अशा फिजीफिकेशन ने व्यापलेले आहे. वीवीध उदाहरणापरत्वे जर आपण त्यातील फजी फिकेशनच्या अभ्यास केला तर गोष्टी जास्ती जास्त प्रेडीक्टीव व परीणामी बोअर होत जातात.

समजण्यास सोप्या उदाहरणांनी अलगद पणे सांगितल्यामुळे क्लिष्ट विषय सुसह्य झाला या बद्दल धन्यवाद. या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर मोघम तर्क नावाने लेख चालू केला. (अर्थातच खरे क्रेडीट आपले!)

आपल चहाच उदाहरण आवडल, त्यात शेवटी आपण म्हणता <<थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते.>> इथे 'वास्तव' ह्या शब्दाशी तुलना करता, सत्य हा शब्द निश्चितपणाने वापरता येतो ना याची खात्री करून हवी होती.

संकल्पना समजली पण सोबतच व्याख्येच्या स्वरूपात बांधण्याचा प्रयास म्हणून खालील प्रमाणे प्रयत्न केला, त्यात काहीतरी महत्वाच राहून जात आहे, आणि समजण्यास क्लिष्ट असं वाटत आहे. आपण आणि इतर जाणकारांनी त्यात सुधारणा सुचवाव्यात अथवा पर्यायी व्याख्या सूचवावी ही विनंती.

व्याख्या:
मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.

या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा :
वाफाळलेला चहा

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

सॉरी, काही कारणाने आपले " . हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते." हे वाक्य वरच्या प्रतिसादात कॉपीपेस्ट करूनही उमटले नाही.

आत्मशून्य's picture

20 Mar 2014 - 7:38 pm | आत्मशून्य

फजी फेक्टर बायपास केल्यावर जे उरते ते वास्तव म्हणता येत नाही कारण वास्तवता हिच फजी स्वरूपात आकलन केलि जाते. म्हणुन जास्ती जास्त शुध्द सत्य (रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि) हा शब्द अथवा लेस फजी एव्ह्डेच ठरवता येते.

अवांतर - फजी फेक्टर ओळ्खाय्चि सवय लागली की त्यानंतर केलेला कोणताही साधा विचार अगदी बुध्दीव्न्तालाही विचारत पाडायला पुरेसा असतो. मग जे कोमन सेंसला गहन विचार समजतात त्याच्या विदूषकी लिलंचा आनंद काय वर्णावा...

माहितगार's picture

20 Mar 2014 - 10:54 pm | माहितगार

फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल पण काही वेळा ते फजी परसेप्शन अथवा अपेक्षा, एका व्यक्ती पुरतीच सब्जेक्टीव्ह आहे बाकी तज्ञ किंवा इतर मेजॉरिटी असहमत असू शकते म्हणजे फजी स्वरूप प्रत्येक वेळी वास्तव असेल का ? (मी अजून समजून घेतो आहे)

"रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" या शब्द प्रयोगात thought of किंवा expected या दोन शब्दांची गरज भासू शकते का "थॉट ऑफ अथवा एक्सपेक्टेड, रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" "विचार केलेली अथवा अपेक्षीत, 'अचूकतेची' परिष्कृत संभाव्यता" असा काही बदल केला तर योग्य होऊ शकेल का

फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल

नॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच.

हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत.

फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली,

कारण फजिनेस इज अ‍ॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 12:27 am | आत्मशून्य

नुसते वाचताना फार किचकट वगैरे आहे वाटते, आणी फार टंकायचे श्रमही करवत नाहीत. पण हे किचकट वगैरे अजिबात नाही.

सॉरी इतर विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष वळल्यामुळे आपणास प्रतिसाद देण्यास विलंब झाला. खरे म्हणजे मी पुर्वी वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला किचकट वाटले होते पण आपल्या प्रतिसादातून उत्तम समजू लागले आहे. अर्थात मला फजी लॉजीक मला लॉजीकल फॉलसीजच्या माझ्या मुख्य विषयाही रिलेट करून पुन्हा अभ्यासावयाचे आहे. समर्थांची उक्ती आहे अभ्यासे प्रगटावे म्हणून सध्या फक्त श्रवण आणि मनन करतो आहे.

मला वाटतं या सर्वाच्या मुळाशी वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) यातील विरोधाभास देखिल असू शकतो . माणसांच्या वस्तूनिष्ठतेमुळे तर्कशास्त्र (Logic) व तत्वज्ञान (Philosophy) व बहुधा शास्त्र (science) यांचा प्रथम जन्म नंतर विस्तार झालाय; माणसाच्या आत्मनिष्ठतेतून कला व साहित्य यांचा उगम व नंतर विस्तार झालाय. पण यातही थोडाफार फरक असावा कारण वस्तुनिष्ठतेतून निर्माण होत असलेलं सर्व कांही अगदी एका ओळीत नसतील पण एका कॉरिडॉर मध्येच रहातात पण तसं कलेचं नसतं. एखाद्या शतकातील कला मागच्या शतकातील कलेपेक्षा वेगळी असू शकते, स्वतंत्र असू शकते, Renaissance चंच उदाहरण पहा.
कांही सुज्ञ माणसं वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन व्यवस्थितरीत्या आपला तोल सांभाळतात. एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर जरुरीप्रमाणे अगदी बरोबर वस्तूनिष्ठतेचा किंवा आत्मनिष्ठ्तेचा चष्मा लावून ते त्या गोष्टीकडे पाहू शकतात. पण ते सगळ्यांनाच शक्य नसतं. आपण बरेचजण चुकीचा चष्मा लावतो व ते आपल्या लक्षातच येत नाहीं कारण दोन्ही चष्म्यातून सारखंच दिसतं. फक्त एकाच प्रांतात वावरणाऱ्या एखाद्या तत्वज्ञानीला किंवा एखाद्या कविला हा 'आंतर-प्रांतीय' प्रवास अजून कठीण किंवा अशक्यप्रायहि वाटत असेल.
आईन्स्टाईनची Theory of Relativity व थोड्याफार प्रमाणात न्यूटनची Theory of Gravity या सर्वाला अपवाद असावी कारण या दोघांच्या Theories तत्कालीन Science च्या कॉरिडॉरच्या बाहेर होत्या, Relativity तर खुपच बाहेर. इथं कुठेतरी वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता यांचा एक दुर्मिळ संगम झाला असावा. कुणास ठाऊक पण Scienceचा पुढचा प्रवास या नवीन कॉरिडॉर मधून होईल किंव्हा दुसरा एखादा कॉरिडॉर देखिल निर्माण होऊ शकेल.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Black and White या दोन रंगामधील ज्या Grey च्या Shades आहेत त्या सर्व शोधून काढावयास हव्या व त्या प्रत्येक (उप) रंगाला नांव द्यायला हवं. मला वाटतं ही एक प्रदीर्घ defining process आहे. यावर Method of Inquiry (?) नावाच्या पुस्तकाने याचा छान उहापोह केलाय (हे पुस्तकंच उहापोहाबद्दलचं आहे) पुस्तक मिळणं असम्भव आहे पण नेट वर कांहीतरी मिळालं तर पहातो. Defining Processचं एक कच्च उदाहरण द्यायचं तर ते मी ‘सहानुभूती’ व by default या दोन शब्दांचं देईन. आत्ताचे त्यांचे अर्थ त्यांच्या मुळाशी अभिप्रेत असलेल्या अर्थापासून थोडे फार दूर आले आहेत असं नाहीं वाटत?

वर संबोधिलेल्याया पुस्तकाचं नांव आहे The Conduct of Inquiry: Methodology for Behavioral Science by Abraham Kaplan

माहितगार's picture

18 Mar 2014 - 11:31 am | माहितगार

प्रतिसाद आवडला, समर्पक आणि माहितीपूर्ण प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

माहितगार's picture

18 Mar 2014 - 11:35 am | माहितगार

वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) हि तुलनाही विशेषत्वाने आवडली.

विटेकर's picture

17 Mar 2014 - 12:57 pm | विटेकर

आणि प्रतिसाद ही !
मी याला "फजी लोजिक विरुद्ध बायनरी" असे नाव देईन.
भारतीय तत्वाज्ञानाप्रमाणे एका "त्या" सत्याशिवाय बाकी सारी सत्ये ही सापेक्ष होय. एका त्या सत्याशिवाय बाकी सारे जर नष्ट च होणार आहे तर ते सत्य कसे ?
आणि म्हणून भारतीय माणूस फजी लोजिक मधे आचार - विचार करतो. जसे की हो किंवा नाही असे थेट न म्हणता " मान हालवणे" ( त्या मान हालविण्याच्या गतीवर आणि आंदोलनावर होकार- नकाराची तीव्रता कमी अधिक होऊ शकते !
हे फजी लोजिक भारतीयांकडे धर्मातून आले.. हा ही मार्ग ईश्वराकडे नेतो .. हा ही नेतो.. तुमचा ही नेत असेल . ही धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या पॅथॉलॉजीमध्ये आहे. केवळ अल्लाच , केवळ येशूच केवळ माझाच पंथ नाहीतर तुम्ही नरकात जाणार हे निश्चित ! असला अतिरेक नस्ल्यामुळे विचारसरणीही तशीच झाली आहे.
त्यामुळे सहसा ठोस निर्णयाला न येणे .. समोरच्याचा विचार करुन मगच निर्णय देणे ,निर्णय देताना दिरंगाई ही सारी त्याचीच लक्षणे आहेत.

आत्मशून्य's picture

17 Mar 2014 - 5:44 pm | आत्मशून्य

fuzzy logic is at core :)

माहितगार's picture

18 Mar 2014 - 11:43 am | माहितगार

विटेकरजी आपल्या मताने विचारात पडलो खरा, पण सहमत आहे का हे अजू निश्चित सांगता येत नाही. आपल्या प्रतिसादावर अजून काही मते वाचण्यास मिळाल्यास आवडतील.

खाली आनन्दा यांचा प्रतिसाद आला आहे. आपण आणि आनन्दा एकमेकांच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देऊन चर्चा केल्यास वाचण्यास आवडेल असे वाटते.

आपल्याला आणि आनन्दा यांना प्रतिसादांकरिता धन्यवाद

कदाचित विषयांतर होईल, पण या ठिकाणी मी मिपावरीलच काही चर्चाचा उल्लेख करू इच्छितो.
१. गांधी वि. नथुराम.
२. ५५ कोटी
३. हिंदुव्तवादी वि. धर्मनिरपेक्ष ई.
४. दहशतवाद..
या चर्चा म्हणजे आपण म्हणता तश्या काळे आणि पांढरे अश्या चष्म्याचा परिणाम आहे. बहुधा बर्‍याच न फळणार्‍या चर्चा या याच भूमिकेमुळे मोडत असाव्यात.

भडकमकर मास्तर's picture

17 Mar 2014 - 6:41 pm | भडकमकर मास्तर

खूप छान आहे.. वीकांताला करून पाहीन.

आत्मशून्य's picture

17 Mar 2014 - 7:13 pm | आत्मशून्य

=) =) =) बेस्ट प्रतिसाद.

बॅटमॅन's picture

18 Mar 2014 - 11:30 am | बॅटमॅन

मास्तर रॉक्स =)) !! =)) =)) !! =)) =)) !! =))

माहितगार's picture

18 Mar 2014 - 11:45 am | माहितगार

विकांतास ? छान छान होऊद्या झालं :)