कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 1:16 am

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला .

पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती . हो शाळेत प्रवेशासाठी इंटरव्हू असतो . त्याला तसे म्हणत नाहीत . पण एडमिशन साठी आई बाप पोर या तिघांनी येउन भेटायचे असते आणि शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात आणि मुख्याध्यापक पालकाना विचारतात . आमचा कार्टा तसा वाइच बडबड्या आणि चण्ट आहे . गाणी , कविता सगळ्या तालात म्हणतो . ए टु झेड , एक ते दहा सगळे तोंडपाठ आहे . त्यामुळे आमची पत्नी पोराला पढवत नसून दस्तुरखुद्द आम्हालाच पढवत होती . निट बोल उगीच वाद विवाद नकोत वगैरे . म्हणजे त्या पोराच्या शाळा एडमिशन वेळीही मी काही तात्विक खुसपट काढून शाळा मेनेजमेंट शी वाद उकरून काढेन … इतका दुर्दम्य विश्वास आमच्याबद्दल तिकडून आहे . असो .

शेवटी एकदाचे त्या शाळेत पोहोचलो . तिथे एक रीसेप्शनिस्ट. बयेला विचारल शाळा आतून बघता येईल का ? अतिशय मंद असे प्रोफेशनल मंदस्मित करत तिने नकार दिला . मग विचारल बर फी किती ? (हा मुद्द्याचा प्रश्न ) . यु नीड टु गो थ्रू अवर एडमिशन फोर्म , फोर डीटेल्स . म्हटलं वोक्के . दे बाई तुझा फार्म . यु नीड तू पे एट द काउण्टर एण्ड कलेक्ट युर फोर्म फ्रोम देअर . बर बाई मग तू कशाला बसलीस इथे ? असो तर फोरम ची किंमत रुपये सहा हजार फक्त . च्यामारी आणि नाई पटली शाळा तर ? गेले का फुकट ? मग थोडा तात्विक वाद विवाद करून तिच्याकडून फी विषयी माहिती काढलीच . या विवाद्समयी आमचे कुटुंब आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत आहे असा भास झाला . तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त . हि मेडिकल वा इंजिनिअरइंग ची फी नाही हो . बालवाडी शाळेची आहे . शेवटी आम्ही तिघेही विजयी मुद्रेने शाळेबाहेर पडलो तेंव्हा दोन लक्ष सहा सहस्त्र होन वाचवल्याचा आनंद आमच्या मुखमंडलांवर झळकत होता .

कालच्या अशा अनुभवांमुळे आज शाळा शोधताना फी हा मुद्दा प्रथम ठेवला आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी इण्टर्नेशनल शाळा हुडकून काढली. तरी फी साठ हजार वर्षाला . ठीक आहे म्हटलं होऊ दे खर्च . शिक्षणात तडजोड नको . मग रविवारच्या भल्या पहाटे नौ वाजता उठून आमची तीक्कल नव्या शाळेचा इण्टरव्ह्यू देण्यासाठी निघाली . वाटेत अर्धांग यावेळी मात्र मुलाची उजळणी करून घेत होते . ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणा पाहू असे उच्चारायचा अवकाश . आमचे पिल्लू स अभिनय गाणे सुरु करते आणि दहा पंधरा कविता नाचासकट म्हणून झाल्या कीच थांबते. एक ते दहा म्हण म्हटले कि एक ते वीस म्हणते . ए 2 झेड तर ऐपाल , बोल , कॅट अशी उदाहरणे देत घडा घडा म्हणते . आमही दोन्हीही सुजाण पालकांनी अभिमानाने या आमच्या छोट्या बुद्धिमान सिंघम कडे प्रेमान पाहिलं .

आणि बाल सिंघम सकट नव्या शाळेत दाखल झालो . प्रशस्त शाळा . सर्व वर्ग एसी . रिसेप्शन सुद्धा एयर कंडीशन . आणि रखवालदार पण इंग्लिश बोलणारा . मग रिसेप्श्निस्ट ने हसून स्वागत केले . चार वर्षापूर्वीच उघडलेली नवी शाळा असल्याने--- गिर्हाइके हवी होती वाटत त्याना . चला कालच्या मानानं आज सुरवात बरी झाली होती . एकदम पॉश आणि भारी होती शाळा . …. मग त्या सुंदर आणि हसतमुख रिसेप्शनिस्ट न सर्व माहिती सांगितली . प्लीज वेट फोर फ़ाइव्ह मिनिटस असे लाडीकपणे म्हटली . चला म्हणजे पाच मिनिटातच इण्टर व्ह्यू सुरु होणार होता तर . एव्हढ्यातच-- आईच्या गावात-- आमच्या बाल सिंगम ची सटकली. तो सोफ्यावर उभा राहिला आणि स्वत:ची चड्डी काढु लागला .

मी भर्रकन त्याची चड्डी पुन्हा वर केली आणि त्याला नजरेने दटावण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो . पण तो कसला ऐकतो ? मला हि चड्डी नको …. लाल वाली पायजेल … म्हणून त्यान भोकाड पसरला . रडण्याचे तार सप्तक सुरु जाहले . प्रत्येक आलाप पहिल्यापेक्षा चढ्या सुरात आणि मोठ्ठ्या आवाजात . परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले . मग त्यांच्या मातोश्रींनी एक धपाटा घातला . सिंघम ला हा अपमान फार जिव्हारी लागला असावा . त्याने रडे बंद केले . आणि स्वारी गाल फुगवून चिडून रुसून बसली .

मग मी बायको आणि रुसलेला बालक असे तिघे . एका केबिनमध्ये दाखल झालो . स्वारी चिडक्या नजरेने मातोश्रींकडे पहात होती . शेट्टी पिता पुत्र हि शाळा चालवतात . त्यापैकी हा पुत्र शेट्टी . तो शाळेचा एडमिन हेड म्हणे . त्याने सर्व कागदी सोपस्कार पार पाडले . पॉवर पोइण्ट प्रेझेन्टेशन मध्ये शाळेची माहिती सांगितली . केंब्रीज युनिव्हर्सिटिचे प्रमाणपत्र दाखवले वगैरे . तर पुढचा मुद्दा असा होता कि मी फी भरणे वगैरे सोपस्कार पार पाडायचे आणि आईने मुलाला घेऊन जायचे इंटरव्हू साठी . मी चेक बुक काढून सही करू लागलो . आणि सौ ने बाळाला उचलले . सिंघमाची पुन्हा सटकली … आई मारते मी नाई जाणार तिच्याबरोबर … बाबा तू घे … आणि त्याने बाबा बाबा बाबा बाबा चे तारसप्तक सुरु केले . तो बिचारा पुत्र शेट्टी पोराची समजूत काढायला त्याला पेन दाखवू लागला . कार्ट्याने पेन हिसकावले …. पुत्र शेट्टी च्या तोंडावर फेकून मारले …… आणि तार सप्तक खर्ज्यात नेत तो हट्टाने जमिनीवर झोपला . आता अजून तमाशा नको म्हणून मी त्याला उचलले …. आणि इंटरव्हू साठी नेले . कागदी सोपस्कार महिला दिनानिमित्त पत्नीला करावे लागले .

मी इंटरव्हू साठी सिंगम सकट एका सुस्वभावी शिक्षिकेसमोर उभा होतो . ती चाईल्ड साकोलोजी वगैरे शिकली होती म्हणे . अगदी गोड हसून ती सिंगम कडे पाहिले . त्याचा राग बराचसा निवळला असावा . रडला नाही अजिबात . मग तिने त्याला त्याच्या कलाने प्रश्न विचारायला सुरवात केली. व्होट इस युवर नेम ? स्वारी मक्ख ! आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला . मग तिने काय काय विचारले , प्राणि सांग , पक्षि सांग , बाबाच नाव सांग , इंग्लिश, हिंदी, मराठी अशा सर्व भाषेत विचारले . आमचे राजपुत्र ढिम्म बसलेले . चेहर्यावरची माशी हलत नव्हती . मग म्हणाली कविता म्हण , ट्विंकल ट्विंकल म्हण …. सिंघम ढिम्म ! एक शब्द बोलायला तय्यार नाही पट्ठ्या .

शेवटी कंटाळून ती निघून गेली . शाळा प्रवेश हुकलाच होता . पोराने साठ हजारही वाचवले होते बहुतेक !. मी प्रेमाने आमच्या सुपुत्राकडे पाहिले . जशी ती बाहेर गेली तसा कार्टा बोलला मला गाणी म्हणायचीत . त्याला बकोट धरून उचलला आणि टिचर्स रुम मध्ये घेऊन गेलो . तिथे पट्ठ्या जो सुरु झाला ..... साग्रसंगीत गाणी आणि नाचासकट ! शेवटच्या नाच रे मोरा गाण्याला तर टिचर्स रूम चे टेबल खालून तबल्या सारखे वाजवून दाखवले ..... हुश्श ! शेवटी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंत झाला आणि मी विजयी मुद्रेने चिरंजीवांना कडेवर घेऊन बाहेर पडलो .

चला मुलाचे उज्ज्वल भविष्य आम्ही इंटरनेशनल शाळेत सुरक्षित केले होते. आता शेवटची भेट . ती म्हणजे शाळेचे ट्रस्टी पिता शेट्टी यांच्याशी . एकंदर माणूस सभ्य . आत जाण्याआधी पोराला लालूच दाखवली . गुड बोय सारखा वाग ह ! तुला चोकलेट देईन मी ! झाल … जसा पिता शेट्टिशि संवाद सुरु झाला तसा पोरान घोषा लावला । बाबा चोकलेट दे ना ! चोकेत दे ! शेट्टी अथवा मी एक जरी वाक्य बोललो -- कि हा चोकेतचा गजर !

शेट्टी ला सवय असावी तो दयार्द नजरेने पहात होता . मग शेट्टी शाळेत फकस्त इंटरनेशनल अभ्यासक्रम नाही आपली महान भारतीय संस्कृती वगैरे बोलू लागला . आमच्या पोराला संस्कृतीत फारसा इंटरेस्ट नसावा . त्याचे आपले चोकेत दे चे पालुपद सुरु होते. मग शेट्टी म्हणाला शाळेत नोंव्हेज चिकन मटन वगैरे आणायचे नाही . असा नियम आहे बरेच विद्यार्थी जैन आहेत वगैरे . आमच्या पोराने चिकन हा शब्द जसा ऐकला तशी त्याची भुक जागृत झाली … त्याने चोकेत चा घोष बदलला . आई चिकन दे …चिकन दे…. चिकन दे …। नवा घोष सुरु केला .

इतका वेळ मोठ्या प्रयत्नाने दाबून ठेवलेले हसू भळ्ळ दिशि माझ्या थोबाडातुन बाहेर पडले . बायकोही फुटली - आम्ही दोघे खो खो हसू लागलो . आम्हाला हसताना पाहून सिंघम अजून जोराने खोटा नकली हसू लागला . शेट्टी पिता पुत्र आमच्या चक्रम तिक्कलिकडे आश्चर्याने पहात राहिले …।

बालकथालेख

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

10 Mar 2014 - 1:25 am | आयुर्हित

उत्तम अवलोकन बाल सिंगमचे व रीसेप्शनिस्टचे, आवडले!

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2014 - 1:51 am | श्रीरंग_जोशी

धमाल अनुभवकथन आवडले.

प्रवेशनाट्यावर एवढा खुसखुशीत लेख लिहिलाय तर प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर लेखमालिका लिहू शकाल असे वाटते.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 10:07 am | अत्रन्गि पाउस

नाट्यछटा समोर उभी राहिली...
बाकी शाळा प्रवेश ह्या विषयात मला काहीही अकल्पित वाटणे अलीकडे बंद झालेले आहे :D

तुमचा अभिषेक's picture

16 Mar 2014 - 12:35 am | तुमचा अभिषेक

गेले काही दिवस ऑफिसमध्ये रोज जेवताना या मुलांच्या अ‍ॅडमिशनचे एकेकाचे अनुभव आणि रडगाणे ऐकतोय त्याने मला मुले जन्माला घालायची भिती वाटून राहिली होती.. पण या खुसखुशीत लेखाने मात्र मूड मस्त बनवला.. असेच एक-दोन ओळखीचे वात्रट पण तितकेच तल्लख बालसिंघम, बालबिरबल, बालतेनालीरामण वगईरे वगईरे डोळ्यासमोर आले..

खटपट्या's picture

10 Mar 2014 - 2:07 am | खटपट्या

धमाल केली कि सिंघम ने

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2014 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा

@परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले .>>> =)) द्रुष्य नयनी आले! =))
@ आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला .>>> :D प्वार तुमच्यावर गेले आहे,असे निरिक्षण नोंदवतो! =))

अनुप ढेरे's picture

10 Mar 2014 - 9:52 am | अनुप ढेरे

:)
छान लिहिलय.

सुहास..'s picture

10 Mar 2014 - 10:12 am | सुहास..

लय भारी !!

धन्या's picture

10 Mar 2014 - 10:27 am | धन्या

आवडला.

शिक्षणयात्रा या पुस्तकात डॉ. लता काटदरे यांनी "इंटरनॅशनल स्कुल्स" बद्दलचे भ्रम आणि वास्तव खुप सविस्तर लिहिले आहेत.

sy

सौंदाळा's picture

10 Mar 2014 - 10:55 am | सौंदाळा

धम्माल लेख.
तुमच्या बाल सिंघमचे अजुन किस्से वाचण्यास उत्सुक ;)

प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आवडला. आणि छोटा सिंघम अजून धमाल करणार शाळेत - तेही पुढे लिहा, अशी विनंती.

सखी's picture

11 Mar 2014 - 12:10 am | सखी

प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आवडला. आणि छोटा सिंघम अजून धमाल करणार शाळेत - तेही पुढे लिहा, अशी विनंती. -- हेच म्हणते.
बाकी हे नेमक्या वेळी शून्यात नजर लावने - ३,४ वर्षाच्या चिमुकल्यांना कसे जमते हे मला न सुटलेलं कोडं आहे. :)

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2014 - 11:04 am | पिलीयन रायडर

मस्त लेख..!!

मला नेहमीच असं वाटतं की हे इंटरनॅशनल स्कुल वाले शाळा चालवत नसुन दुकान चालवतात.. दुकान पण म्हणता नाही येणार कारण दुकानात ग्राहकाला वस्तु घ्यायची का नाहि हे ठरवण्याचा अधिकार असतो. इथे तर एक्द तुम्ही ग्राहक झालात की कंपल्सरी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल.. सगळं सगळं ह्यांच्या दुकानातुनच घ्यावा लागतं..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2014 - 11:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले

आयाईग्ग्गं....हे जबर आवडलं...!!!

सो तर फॉर्म ची किंमत रुपये सहा हजार फक्त...

तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त..

अर्र तेच्या मराठी मिडीयम स्टेट बोर्डाची ची २५ पोरं शिकतीलं की हो त्यात...!! विंटरणॅशल डाका आहे की हो खिशावर...!! शेट्टी लोकं हाटेलाबरोबर शाळा पणं चालवायला लागले ;)...!!

मनीषा's picture

10 Mar 2014 - 12:11 pm | मनीषा

बाल सिंघमच्या लीला :)

भोसडीचे मराठीत बोलत नाहीत म्हणुन दोघांना तर एकाने तिच्या केसांकडे पाहुन मॅगी म्हटल म्हणुन्,असे तिन वर्गमित्रांवर हात साफ करुन घेतले होते.मॅडम शाळेत सकाळी ८ वाजता गेल्या व ११ वाजता अस्मादिकांना शाळेच्या प्रिन्सिपल समोर हजेरी लावावी लागली होती.पण मुख्याध्यापक बाईंना १५ मिनिटातच कळुन चुकल्,पोरीच्या ओरिजनल जिन्समध्येच प्रॉब्लेम आहे,आणी आपल्या शाळेला हे आता पुढची काही वर्ष सहन करायला लागणार आहे.त्यानंतर मात्र दोन दिवसात कन्येच्या वर्गास मराठी समजणारी टीचर देण्यात आल्या.आणी बरेचसे प्रश्न सुरळीत सुटले.

काळा पहाड's picture

11 Mar 2014 - 1:14 am | काळा पहाड

आवडलं. बाकी अशा पैसे उकळणार्‍या शाळा मालकांना (जर पाल्य शिक्षणात विशेष प्रगती करत नसेल तर) दणके द्यावेत असे माझे स्वच्छ मत आहे. जर दुकानासारखेच पैसे द्यायचे असतील तर दुकानासारखाच "माल" पारखून घेण्यात काहीही वाईट नाही. बाकी पुढचा फी वाढीचा राडा कधी होतोय वाट बघतोय. भाग घ्यायची विछ्छा आहे.

बिकेसीमधल्या एका जागतिक शाळेच्या फॉर्मची किंमत २५ हजार रुपये फक्त आणि वर्षाची फी २० लाख रुपये फक्त आहे (८ वी किंवा ९ वी साठी). अर्थात ही दोन-तिन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. सध्याचा भाव माहित नाही. शिवाय अभ्यासक्रमातली प्रत्येक वस्तु/गोष्ट शाळेतुनच घेतली पाहिजे असा नियम आहे. हे ऐकुन त्यावेळी मला चक्कर यायचीच बाकी राहिली होती.

सुरुवात तर छानच झाली तेव्हा या विषयावर पुढे सविस्तर लेखमाला येऊ द्या.

बापरे, किती भयंकर आहे हे शाळा प्रकरण. गरीब लोकांनी काय करायचे. त्यांना जमत नाही म्हणुन त्यांच्या मुलांनी मग शिकायचेच नाही का?
पण तुमचे पिल्लु आवडले. :D :D

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Mar 2014 - 6:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

भारतात लोक कितीही गरीब असले तरी त्यांची लग्ने श्रीमंत असतात. तस्मात शाळा आणि गरीबी हे समीकरण जमत नाही.
जाता जाता---पुण्यात अजुनही २०-२५ हजार फी घेणार्‍या उत्तम ईंग्लिश मिडीयम शाळा आहेत. CBSE/ISCE नाहीत पण दर्जा ऊत्तम ....देवाचे आभार कशा कशासाठी मागवेत म्हणतो

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2014 - 6:35 pm | पिलीयन रायडर

पुण्यातल्या उत्तम शाळांची (दर्जा उत्तम..) नावं देऊ शकाल का?
मराठी माध्यमाच्याही शाळा चालतील...

बॅटमॅन's picture

11 Mar 2014 - 6:38 pm | बॅटमॅन

हेच म्हंटो.

बाकी, याबद्दल कधीकाळी मिपावर चर्चा झालेली आठवतेय, यद्यपि धागा असा नव्हता. पण कुठला धागा ते विसरलो.

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2014 - 6:47 pm | पिलीयन रायडर

अजुन काही प्रश्न..
१. CBSE / ICSE नेहमी ईंटरनॅशनल (म्हणजेच ५० हजार + फीस) असणार्‍या शाळांमध्येच असतो का?
२. मुलाला आपण जसे सिशुवर्ग , बालवाडी , पहिली असे शिकलो तसे शिकवता येणे शक्य आहे का? म्हणजे प्ले ग्रुप, मिनी केजी, उप्पर केजी , सिनियर केजी आणि मग पहिली... असला बावळट प्रकार टाळता येतो का?
३. मराठी शाळांची फीस किती असते?
४. मराठी आणि इंग्रजी शाळांच्या दर्जा मध्ये खरच फार लक्षणीय फरक असतो का? पुढे आयुष्यात मराठि मुलं मागे आणि इंग्रजी शाळांमधली मुलं पुढे असं काही होतं का?
५. समजा इंग्रजी शाळेत घातलच.. तरी बाकी सगळं ठिक आहे पण पोराला सिक्स्टीन सिक्स्जा नाईन्टि सिक्स च्या ऐवजी सोळ सक शह्याण्णव.. असं शिकवता येईल का?

बाकी सोडा, पण मी शिकलो तिथे बालवाडीची २ वर्षे होती. त्याच्या आधी १ वर्ष सवयीची शाळा नावाचा प्रकार होता, सबब पहिलीच्या आधी ३ वर्षे हा प्रकार मराठी शाळेतसुद्धा असतोच, नै का?

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2014 - 6:55 pm | पिलीयन रायडर

मी तरी हे नाही ऐकलं कधी.. कारण आम्ही ३ र्‍या वर्षी शाळेत गेलो.. ५ व्या वर्षी पहिलीत..
आता पोरं २ र्‍या वर्षी शाळेत जातात, ६ व्या वर्षी पहिलीत.. जरा जास्त शिक्षण होतय हे असं मला वाटतं..
आणि वर ह्या २ तासाच्या शाळेची फिस ५० हजार आहे.. अधिक बाकी वह्या पुस्तकं सगळं शाळेतुनच घ्यायचं..
आता तर हे ही ऐकलय की आई "वर्किंग मदर" असेल तर प्रवेश मिळत नाही.. म्हण्जे लॉटरी सिस्टीम असली तरी "काही शाळांमध्ये" अशा मुलांना कधी लॉटरी लागल्याचं ऐकीवात नाही..

लोकांना २० लाखाची पॅकेज असतील्..असो बापडी..
आम्ही सामान्य माणसं विथ सामान्य पगार आहोत..
असल्या फिया परवडणार्‍या नाहीत..ते ही वय वर्ष २ पासुन..

बॅटमॅन's picture

11 Mar 2014 - 8:18 pm | बॅटमॅन

सहमत आहेच. नो डौट.

पैसा's picture

16 Mar 2014 - 10:07 am | पैसा

कँपात मिलिटरीच्या शाळा असतात. तिथे बहुतेक सीबीएससी अभ्यासक्रम असतो. हिंदी मीडियम आणि फी शून्य. आमच्या इथे फोंड्याला अशा शाळेत सिव्हिलियन्सच्या मुलांना प्रवेश देतात. मात्र शिस्त फारच कडक आहे असं ऐकून दोन्ही कारट्यांना तिथे घालायचं धाडस केलं नाही. कारण मग नोकरी सोडून मुख्याध्यापकाच्या खोलीसमोर कँप टाकायला लागला असता.

जि.प.प्राथ.शाळेचे विद्यार्थी आहेत.माझ्या शाळेच्या १९९८-९९ च्या १२ वीच्या बॅचचे आम्ही २३ डॉक्टर,४५ इंजिनियर,४ आय.पि.एस.,३ कलेक्टर,८ तहसिलदार व गटविकासाधिकारी,काही शिक्षक/प्राध्यापक, आणी जे पुढे फारसे शिकले नाहीत ते ३ प्राणी खोर्‍याने पैसा कमवणारे अब्जाधिश.त्यातला एक हरामखोर कुठे एकत्र भेटलो की त्रयस्थ व्यक्तीला ओळख करुन देताना सांगतो, हे डॉक्टर,हे इंजिनियर्,अथवा तहसिलदार आमचे मित्र व मी त्यांच्यातला अडाणी गरिब मानुस(फक्त ह्या गरिब माणसाकडे जगातल्या भारतात मिळणार्‍या सर्वत्त्तम गाड्यांचे कलेक्शन आहे)
सांगायचा मुद्दा एकच की यातले ९९% प्राणी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहेत.त्यामुळे लय भारी इंटरनेशनल स्कुल किंवा हायफंडु क्लासेस आणी गुणवत्ता यांचा काही संबध आहे असे मला तरी नाही वाटत. दुसरे म्हणजे आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे,याच ज्वलंत उदाहरण पहायच असेल तर यु ट्युब वर भरत आंधळे आय.पी. एस. याचे एक भाषण आहे ते एका,नक्की बर्‍याच गोष्टी समजतील.http://www.youtube.com/watch?v=gmwKu0W3Ymw

मुक्त विहारि's picture

11 Mar 2014 - 9:42 pm | मुक्त विहारि

"आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे,"

प्रचंड सहमत

हवालदार's picture

11 Mar 2014 - 10:54 pm | हवालदार

कन्ची वो शाळा तूमची ? ४ आय.पि.एस., ३ कलेक्टर एका वर्शात? लै भारी.

बाबा पाटील's picture

12 Mar 2014 - 11:48 am | बाबा पाटील

पण अशीही माझी शाळा डॉक्टर इंजिनियरची फॅक्टरी आहे.

इरसाल's picture

10 Mar 2014 - 1:34 pm | इरसाल

मी पण प्री-नर्सरी साठी डोनेशन अक्षरी ४२ हजार मात्र व वर्षाचा सगळा खर्च अक्षरी सव्वा लाख फक्त केलेला आहे.
(गुजरात मधे नाही हं ! नाहीतर उगाच मोहोळ ओहळासारखे मागे घरंगळत यायचे)

प्यारे१'s picture

10 Mar 2014 - 1:42 pm | प्यारे१

दोन लाखांमध्ये आम्ही इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल, नंतर राहिलेले पेपर नि त्यांच्या फ्या असं सगळं संपवलं होतं.

दोन लाखामध्ये काय काय शिकवतात हो????

दोन लाखांमध्ये इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल,

सेम हिअर! अन तो खर्च दोन लाखांपेक्षा अंमळ कमीच भरलाय. मास्टर्सला तर एक छदामही खर्च करावा लागला नै कारण फीच नव्हती.

काळ तर मोठा कठीण आला.....

सव्यसाची's picture

20 Mar 2014 - 10:31 am | सव्यसाची

stipend विसरला वाटतं? ;)

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 12:43 pm | बॅटमॅन

अहो ती तर जमेची बाजू आहे, तूर्तास फक्त खर्च पाहतोय.

बाकी स्टायपेंड ही पेंड उत्तम आहे याबद्दल दुमत नाहीच ;)

असो. पण त्यां वर्गात २० पेक्षा जास्त मुले नसणारच. अगदी दहावी होइपर्यंत. म्हणुनच प्रत्येकाकडे वैयक्तीक लक्ष, सर्वांगीण विकास/शिक्षण वगैरे वगैरे व्यवस्थीत दिले जाणार. उत्कृश्ट वातावरण व सुरेख आणी दर्जेदार शिक्षक उपलब्ध्द हमखास असणार.

भारतात शिक्षणाच्या दर्जाबाबत काय बोलावे ? पोरगं हुशार असो वा ढ, डिग्र्या झाल्या तरी पोराला नोकरीची ३वर्ष जावी लागतात प्रोफेशनल प्रोडक्टीव आउटपुट द्यायला इतक रद्दड शि़क्षण असते(प्रश्न निर्माण व्हावा हे का शिकवले होते). अन आपण मात्र उगाच तिकडच्या लोकांनी कॉलेज अर्धवट सोडले अन कंपनी सुरु केली वा कॉलेजात असतानाच याहु/फेसबुकमधे जॉबला लागले असे काही वाचले की त्या बद्दल तोंडत बोटे घालतो हे कसे शक्य आहे ? पण याचे मुख्य कारण शिक्षणाचा अत्युच्च दर्जा होता/आहे हे मात्र सोयिस्करपणे विसरतो.

म्हणुनच पैसे जास्त जात असतील तरी हरकत नाही पण अशी अतिशय दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था मात्र हवीच. शाळा म्हणजे कंटाळा वैताग न्हवे तरयासाठीव ज्ञानाचा स्त्रोत आहे यासाठी हा खर्च फार नाही.

अर्थात आज युट्युबर अगदी हार्वर्ड वगैरेची विवीध विषयांची लेकचर्स उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही फक्त सर्वोत्कृश्ट आणी उपयुक्त एव्हडेच शिकु शकता. म्हणजे जर खर्च झेपत नसेल तरही पोराला आइन्स्टाइन घडवायचा मार्ग प्रत्येकाला उपलब्ध आहेच. मुद्दा फक्त पालक म्हणून तुम्ही किती कश्ट घेउ इछ्चीता एव्हडाच उरतो.

मुक्त विहारि's picture

10 Mar 2014 - 1:46 pm | मुक्त विहारि

मज्जा आहे...

पैसा's picture

10 Mar 2014 - 2:18 pm | पैसा

मस्त लेख! आंतर्राष्ट्रीय शाळांच्या नावाने चांगभलं! ;) तुमचे चिरंजीव मात्र बापाच्या पावलावर पाऊल टाकून निघालेले दिसताहेत. त्यामुळे सौ. राजघराणे यांची जरा काळजी वाटली! =))

बाकी या शाळांमधे A for Apple असंच शिकवतात ना? की A for आम आदमी पार्टी वगैरे असतंय? :-/ नाही म्हणजे एवढा खर्च शिक्षणावर केल्यावर तो भरून काढायला राजकारणासारखं जबरदस्त क्षेत्रच करियरसाठी मिळालं पाहिजे!

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

A for Apple

यातच Ap आणि App हे दोन्ही संदेश आलेत- मोबाईल अ‍ॅपद्वारे अन आपद्वारे अशा दोन्ही प्रकारे पैसा कमवण्याची सुचवणी केलीय बघा.

पैसा's picture

10 Mar 2014 - 2:24 pm | पैसा

सगळी इन्व्हेस्टमेंटच!

आत्मशून्य's picture

11 Mar 2014 - 4:49 pm | आत्मशून्य

ICSE की CBSE ? फरक अंजावर हुडकाच पण ढोबळमानाने इतकेच म्हणता येते ICSE हे अर्थातच भारताबाहेर पडायचे उपयुक्त माध्यम आहे. अर्थातच ICSE जास्त टफ/व्हास्ट वगैरे वगैरे वगैरे... आहेच. बाकी स्टार्टींग २० लाखाचे वार्षीक प्याकेज भेटल्यावर हा खर्च म्हणजे फारच नगण्य वाटतो. सेफ इन्वेस्टमेंट. जरुर करावी.

कोणत्या शाळेत असे प्याकेज मिळते हो ?
आय आय टी मधील प्रत्येकाला सुद्धा असे मिळत नाही. अगदी अमेरिकेतही नाही. तेथे इंजिनियर ला सुद्धा असे स्टार्टींग प्याकेज सहज मिळायचे दिवस गेले.(डॉलरचे रुपयात रुपांतर गृहीत धरून)

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 10:14 pm | आत्मशून्य

कोणत्या शाळेत असे प्याकेज मिळते हो ?

ठ्ठो। d: d: xDXDXD =) =)

सव्यसाची's picture

20 Mar 2014 - 10:34 am | सव्यसाची

सहमत..
इथे M.Tech केल्यावरही २० लाख मिळतील याची शाश्वति नाही..

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 12:44 pm | बॅटमॅन

पण मिळूही शकतील, कोणी सांगावे ;)

सुखी's picture

10 Mar 2014 - 2:19 pm | सुखी

जबर्या.... मस्त लिवलय....

श्रीवेद's picture

10 Mar 2014 - 2:30 pm | श्रीवेद

बाल सिंघम आवडले.

दिव्यश्री's picture

10 Mar 2014 - 2:57 pm | दिव्यश्री

अनुभवाचे बोल आवडले ... :)

आमच्या प्यांटवाल्यांच्या एका मित्राने मुलांच्या शिक्षणासाठी ऑनसायीट सोडून पुण्याला बिर्हाड हलवले . मुलगी वयवर्ष ५ आणि मुलगा वयवर्ष २ . मुलीच्या शाळेत एडमिशन घेतली कारण भावंडाना कमी फी असते म्हणे ...असो ...ज्याचा त्याचा प्रश्न ...
मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले आहे . पालक कसे आणि किती कष्ट घेतात हे पहिले आहे . माझ्या वर्गात एक विद्यार्थी होता ज्याचे वडील पिठाच्या गिरणीवरती काम करत होते . हातावरती पोट पण मुलं मात्र इंग्रजी माध्यमात . ते अशिक्षित , मुलांचा अभ्यास घेऊ शकत नव्हते म्हणून मुलांना शिकवणी पण होती . मला हे समजल तेंव्हा आधी आश्चर्य वाटल नंतर वाईट वाटल....

मला नेहमी प्रश्न पडतात... मुलांचा उज्जल भवितव्यासाठी पालक इतके कष्ट घेतात , पैसे खर्च करतात ई.. पुढे खरचं हि मुल व्यवस्थित शिकतील का? मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ????

रमताराम's picture

12 Mar 2014 - 12:25 pm | रमताराम

<<मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ???? >> लाखमोलाचा प्रश्न !!!!!!
कुणाच्या तरी डोक्यात माझ्याप्रमाणेच हा प्रश्न आलेला पाहून समाधान वाटलं. पालकांची पहिली जबाबदारी मूल हे काही अंशी मला मान्यच आहे, कारण पालकांच्या निर्णयानेच ते या जगात आले आहे. परंतु मुलाला सर्व काही मिळावे म्हणून उरस्फोड करत हिंडणारे पालक पाहिले की मला त्यांची दया येते, कधी रागही येतो.

नात्यात देवाणघेवाणीचा विचार नसतो हे ही मान्य, पण हे असे धावाधाव करून आपल्या सार्‍या इच्छा-आकांक्षा मारून ज्या मुलाला उभे केले ते पोरगं खरंच आईबापाबद्दल तेवढीच आस्था बाळगून राहील याची किती शक्यता राहील? तुम्ही पिठाच्या गिरणीत असणार्‍या बापाचे उदाहरण दिले आहे, मध्यंतरी दूरदर्शनवर एका चर्चा कार्यक्रमात एक भाजीवाला आपण कसे मुलाला बेष्टं इंग्लिश शाळेत घातले आहे वगैरे सांगत होता. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर झालेलं त्याचं पोरगं किती अभिमानाने वा आत्मीयतेने बापाबरोबर राहणार आहे. लग्नानंतर प्रायवसी च्या नावाखाली किंवा तो ही वाईटपणा नको म्हणून परगावी वा परदेशी रोजगारास जाऊन तो झटकून टाकण्याची शक्यता किती? इथे मी त्या मुलाला सर्वस्वी दोष देत नाही. पालक-मुलाच्या राहणीमानात फरक पडला की विचारात पडतो आणि सहजीवन अवघड होत जाते. हे सर्वस्वी गैर आहे असे एकतर्फी विचार करण्याचे काहीच कारण नाही. तसा फरक पडू नये म्हणून मुलाने पालकांच्याच पातळीवर रहावे असा आग्रह धरणे तर चूक आहेच. परंतु नाते असले तरी मग ते असे एकतर्फी का असावे? मुलाच्या प्रगतीसाठी १००% श्रम करण्यापेक्षा ८०-२० किंवा ६०-४० अशी मुलासाठी-स्वतःसाठी केलेली काय वाईट. जसे मूल ही आपली जबाबदारी आहे तसे आपले आयुष्य चांगले असावे याची जबाबदारीही मुख्यतः आपली स्वतःचीच असते ना? स्वतःसाठी थोडे स्वत:चे असे आयुष्य राखून ठेवले तर त्याला स्वार्थीपणा का म्हणावे, पुढे जाऊन मूलही स्वार्थीपणाने वागणार नाही याची काय खात्री. तेव्हा पश्चात्ताप करण्यापरिस आधीच थोडे स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर काय चूक? 'तुम्ही अमूक केले असतेत तर माझं असं नुकसान झालं नसतं' असं किरकिरणार्‍या कार्ट्याला 'माझी जेवढी कुवत होती तेवढं मी केलं, कदाचित तुझी कुवत कमी पडली म्हणून एवढ्यात तुला हवं ते मिळवू शकला नाहीस' असं ठणकावून सांगण्याचा कणखरपणा पालकांमधे असायला हवाच असं मला वाटतं. पण इथे मुख्यतः धाड्स कमी पडतं. त्यामुळे 'चार लोक काय म्हणतील' या अदृश्य भीतीला बळी पडणं नि शेजारपाजार्‍यांशी वा एकुण आपल्या वर्तुळात असणार्‍यांशी - त्यांच्या पोरांशी आपल्या पोराची - स्पर्धा करण्याच्या नादात सारासार विवेक केव्हाच खुंटीला टांगला जातो.

शिवाय इतके सारे पुढे पुढे करून, बाह्य कुबड्यांचा आधार देत पोराला उभे करायचा प्रयत्न केला तर ते पोरगं अधिकच परावलंबी वृत्तीचे होईल ही एक शक्यता राहतेच. मुळात इतके सुरक्षित आयुष्य त्याच्या भोवती उभे केले तर पहिल्या संघर्षाच्या प्रसंगी ते मोडून पडण्याची शक्यता अधिक, कारण 'दोन द्यावे दोन घ्यावे' च्या खुल्या जगात त्याला पाय रोवून उभे रहावेच लागणार आहे, पडत, उठत त्यातून शिकत पुढे जावे लागणार आहे. तिथे या रेडिमेड चौकटीचे आयुष्य जगणार्‍या मुलांना आवश्यक ती स्किल्स विकसित झालेली असणार आहेत का? की ती स्किल्सही आधीच ठरवून त्या चौकटीत बसवून देणार आहेत, आणि असल्यास कशी?हा स्वार्थत्याग वगैरे मुख्यतः घरच्या बाईच्या प्रगतीच्या मुळावर येतो. दुर्दैवाने 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही हे अलाहिदा. अर्थात विचारपूर्वक, सारा साधकबाधक विचार करून जर त्यांनी मुलासाठी आपले वैयक्तिक आशा-आकांक्षा बाजूला ठेवल्या तर त्या निस्वार्थ भावनेचं कौतुक आहेच फक्त तो निर्णय जाणतेपणे घेतलेला असेल तरच, केवळ परंपरेच्या वा सामाजिक दडपणाखाली - आणि अर्थातच घरातील दडपणाखाली - घेतलेले असेल तर नव्हे. परंतु दुर्दैवाने हा पीअर प्रेशरचा भाग मातेवर अधिक परिणाम करतो असा अनुभव आहे. माझं पोरगं 'सग्गळ्या मुलांत नि सग्गळ्या विषयात' हुश्शार वगैरे करण्याचा आटापिटा - मुख्यतः उच्चशिक्षित स्त्रियांमधे - अनुभवाला येतो. एकाच वेळी महागडं शिक्षण - जे चांगलं असतं असं गृहितक आहे - एक्स्ट्रा क्लासेस, वर पोरगं चतुरस्र वगैरे असावं म्हणून गाण्यापासून क्रिकेटपर्यंत आणि मुलगी असेल तर नाचापासून कराटे-तायक्वोंदोपर्यंत (सेल्फ डिफेन्स नको का शिकवायला) सग्गळं त्या पोराला नाचायला लावायचं नि स्वतःही नाचायचं... खरंतर धावत रहायचं. सगळं एकदम करण्यापेक्षा एकामागून एक करणं शक्य नाही का? पण तसं नाही. ऑलराउंडर पाहिजे पोरगं. म्हणून मग सगळं थोडं थोडं नि कुठलंच खोलात न शिकवणारे एम्बीए चे अभ्यासक्रम हे आमचे टार्गेट असते, कारण पैसाही दाबून मिळातो. पाचवी पासून 'तुला हे एंजिनियरिंग्च्या अभ्यासाला उपयोगी पडेल' हे ठसवणार्‍या आया आसपास पाहतो आहे. तेव्हा जसा बापाने मुलाला सारं सारं देण्यासाठी उरस्फोड करणं विकृत तसंच आईचं त्याने सग्गळं सग्गळं शिकावं नि इतर पोरांपेक्षा लै भारी असावं म्हणून त्याला सतत धावतं ठेवत त्याचं बालपण हिरावून घेणंही.

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2014 - 1:25 pm | पिलीयन रायडर

असं वर्मावर बोट नाही ठेवायच हो..
जस्ट ५ च मिनिटापुर्वी मुलाला पाळणाघरात पाहुन आले.. ०.१५ मिलिसेकंदात त्याला मी दिसले आणि त्यानी भोकाड पसरलं.. सध्या त्याच्या मावशी "आई नाहीच आली.." असं पटवत असतील.. मी मात्र येताना स्वतः मधल्या आईला शिव्या घालत आले.. काय उपयोग ह्या सगळ्याचा जर पोर असं बाहेर राह्तय वगैरे वगैरे...मग अर्थातच नेहमी प्रमाणे कळीचा प्रश्न विचारला स्वतःला.. "सोडावी का नोकरी?".. प्रश्न संपायच्या आत महिन्याचा १०-१५ तारखेलाच लयाला जाणारा बॅक बॅलेन्स आठवला.. गप गुमान वर येऊन कामाला लागले..

अर्थात ह्या प्रश्ना खेरीज "जर अबीरनी आपल्याला सांभाळलं नाही तर म्हातारपणी कसं धकवायचं?" हा ही माझा आवडता प्रश्न आहेच..

तुमच्या मुद्द्यात पॉईंट आहे.. सगळं पोरांना अर्पण केलं तर म्हातारपणी खायचं काय? आणि पोरांकडे हात पसरायचे नाहीत वगैरे मत तर आहेतच..

ऋषिकेश's picture

12 Mar 2014 - 1:31 pm | ऋषिकेश

म्हणूनच तु माझा मित्र (टिकून) आहेस! :) ;)

दिव्यश्री's picture

12 Mar 2014 - 1:36 pm | दिव्यश्री

तुम्ही अगदी सगळ बरोबर मांडल आहे.
उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर >>> पुढे त्याच आई बापाची या बालिष्टरला लाज वाटणार नाही कशावरून ? बरेच मुलं आजकाल आपले पालक काय नौकरी , व्यवसाय करतात हे सांगत नाहीत . लहानपणीच त्यांच्या मध्ये कुठेतरी लाजीरवाणा न्यूनगंड येतो , बरोबरीची मुले आपल्याला हसतील ई... तो कर्तव्य म्हणून पैसे पाठवत राहील पण ...असो .

'दोन द्यावे दोन घ्यावे' >>> ++ १
'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना>>> मी तर म्हणेन कुटुंबाचं सुख तेच आपल सुख असाच विचार ९९% महिला करतात . स्वतःच अस्तित्व विसरून जाण्यात धन्यता मानतात . पण आपण स्वतः वर किती अन्याय करतो हे त्यांनाही समजत नाही. पुढे मग सगळेच त्या स्त्रीला गृहीत धरतात . स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे हि एक आणखी अभिनास्पद गोष्ट आहे आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत .आपल आरोग्य चांगल ठेवण हि जबाबदारी आहे , कर्तव्यच आहे हे मान्य नसत .कारण कर्ती स्त्रीच जर आजारी पडली तर सगळ घर आजारी पडत , हे समजत म्हणून मग पर्याय कायतर स्वतःकडे दुर्लक्ष .
बराच मोठा प्रतिसाद झाला . थांबते. नाहीतर लगेच कोणीतरी येउन सांगेल कि धाग्याचा विषय बघा आणि मग लिहा. :D

बॅटमॅन's picture

12 Mar 2014 - 2:23 pm | बॅटमॅन

आयला.....निव्वळ पर्खड अन म्हणूनच जबर्‍या!!!!! _/\_

दिव्यश्री's picture

12 Mar 2014 - 9:22 pm | दिव्यश्री

तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला . :D

पण हे अनुभवातून आलेले शहाणपण / बोल आहेत. आमच्या मातोश्रींनी कधीही स्वतःची काळजी घेतली घेतली नाही आणि शेवटी सिव्हियर हार्ट एटेक मध्ये रुपांतर होऊन त्या आम्हाला सोडून गेल्या .

बॅटमॅन's picture

18 Mar 2014 - 7:04 pm | बॅटमॅन

तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला

हॅ हॅ हॅ, अजून बरेच शॉक बसतील, अंमळ डॉळे उघडे ठेवले तर ;)

बाकी
...............

रेवती's picture

18 Mar 2014 - 7:15 pm | रेवती

आग्गायाया.... हा प्रतिसाद वाचायचा र्‍हायला होता हो ररा.
आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये.
प्रतिसाद आवडला हे वेगळे सांगत बसत नाही.

इरसाल's picture

19 Mar 2014 - 2:43 pm | इरसाल

आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये.
ते इथे सांगुन काय उपेग? आम्ही थोडीच " हाणा इथं" मधे वाचायला जाणार आहोत.

अरेच्च्या! एवढेच ना! मी काय म्हंटे तुम्ही मला विचारत जावा ना. अनाहितामध्ये काय चालले आहे हे मी सांगू शकीन. तसे ते बर्‍याचजणांना सांगून झाले आहे. तुम्हाला म्हणून सांगते, सध्या लिपस्टीकच्या नवीन शेडस् व कपाळाला लावण्याच्या टिकल्यांच्या मागील डिंक त्वचेस किती घातक? यावर चर्चा चालू आहेत. वर उल्लेखलेला प्रतिसाद दिला तो म्हैलादिनाच्या धाग्यावर आहे व त्या धाग्यातील सगळ्यांचा रस संपलेला आहे. एकंदरीतच वेगळा विभाग घेऊन सगळ्याजणी स्वतंत्र झाल्याने कोणाची काही तक्रार राहिली नाही आता!

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 6:06 pm | पिलीयन रायडर

रेवाक्का रॉक्स!!!

इरसाल's picture

21 Mar 2014 - 3:20 pm | इरसाल

आज काय नविन विषेश चाललय हाणा इथ मधे ?
डिंकाचे फिक्स झाले का नायतर एक उपाय सांगतो माझी आजी कुंकु कपाळाला व्यवस्थित चिकटुन रहावा म्हणुन मधमाशांच्या मेणाचा उपयोग करायची.
लिपस्टिकबद्दल म्हणाल तर.....
एक बुजुर्ग एका सभेत..... मला ह्या लिपस्टिकचा, ना रंग पसंत आहे ना गंध पसंत आहे ना चव ! :;)

सुबोध खरे's picture

10 Mar 2014 - 2:58 pm | सुबोध खरे

I've never let my school interfere with my education.

Mark Twain

साती's picture

11 Mar 2014 - 9:55 am | साती

;)

आत्मशून्य's picture

10 Mar 2014 - 4:41 pm | आत्मशून्य

मस्त लिखाण...!

बापरे! काय शाळा म्हणायच्या की कोण?
असे ऐकले आहे की काही शाळांमध्ये १२ वाजता जेवण व तीन वाजता खाऊही दिला जातो मग मुले घरी साधे जेवायला कुरकुर करतात. असो. सगळे बदलले आहे एवढे खरे! तुमच्या मुलाच्या गमती जमती आवडल्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Mar 2014 - 6:29 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्हाला आणि बाल सिंघमला!!
बाकी सद्ध्या हिच मोहीम हाती घेतोय, फक्त पुण्यात.
बघू काय काय होतय!

त्यापेक्षा सरळ शीबीएसीइ चा अभ्यासक्रम असलेल्या तुलनेने स्वस्त शाळाही उपलब्ध आहेत.

यसवायजी's picture

10 Mar 2014 - 10:48 pm | यसवायजी

Raajaputraane dhamaal keli. mast.
ChaDDee aaNee chikan.. :))

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2014 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

शेवटी कुठे अ‍ॅडमिशन झाली की नाही?

स्पंदना's picture

11 Mar 2014 - 3:12 am | स्पंदना

धमाल आली असेल ना?
पण काही म्हणा पोर मात्र हुषार दिसतय.

पाषाणभेद's picture

16 Mar 2014 - 5:39 am | पाषाणभेद

बाप तसा बेटा. छोटा हुषार आहे.

लौंगी मिरची's picture

11 Mar 2014 - 9:45 am | लौंगी मिरची

फार हसवले तुमच्या सिंघमने . आमच्या मोठ्या सिंघमला लेख वाचुन दाखवला . घरातल्या सगळ्याच मंडळींनी लेखाचा आस्वाद घेतला , मजेशिर एकदम .

आशु जोग's picture

11 Mar 2014 - 10:26 am | आशु जोग

इथे
http://www.misalpav.com/node/26186

आठवण झाली

शाळेने आम्हाला काय दिले असेल तर न्यूनगंड हे अवचटांचे वाक्य मला नेहमी आठवते.

असो. विनोदी लेखन प्र चं ड आवडले. एक प्रकारची करूण-कॉमेडीच ही!

मृत्युन्जय's picture

12 Mar 2014 - 1:51 pm | मृत्युन्जय

लेख मस्त्त जमला आहे. शाळांच्या फिया ऐकल्या की जीव टांगणीला लागतो. पण असले खर्च करावेच लागतील हे ही जाणुन आहे.

मधुरा देशपांडे's picture

15 Mar 2014 - 11:02 pm | मधुरा देशपांडे

अनुभवकथन आवडले. शाळांच्या फीज आणि त्यांचे प्रवेश याविषयी अनेक किस्से ऐकलेत.
माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी जवळजवळ २-३ महिने दररोज ऑफिसमधून खास परवानगी घेऊन त्या भावी शाळेला भेट देण्यासाठी जायची. सुरुवातीला मला वाटले की गंमत करतेय. तिथे जाउन काय करणार. पण जेव्हा हे रोज झालं तेव्हा विश्वास बसला. तिथे जाऊन करायचे काय तर फक्त त्या मुख्याध्यापिका येतील तेव्हा त्या ऑफिस समोर बसून राहायचं. काही बोलायचे नाही. त्या बाई आत गेल्या की ही परत. त्यांनी म्हणे फक्त चेहरा बघितला पाहिजे की रोज किती प्रयत्नाने ही व्यक्ती शाळेत येते आहे. म्हणजे तिला किती त्या शाळेविषयी प्रेम आहे वगैरे वगैरे. असे जवळजवळ २-३ महिने (यात विशेष म्हणजे बॉस ने ही परवानगी दिली होती यासाठी) ऑफिसपासून १० किमी वर असणाऱ्या शाळेत तिने हजेरी लावली. प्रवेशाच्या निकालाच्या दिवशी तिला प्रचंड टेन्शन आले होते आणि नशीबाने शेवटी प्रवेश मिळाला.शिवाय हे करावेच लागते हा दृष्टीकोन. नाहीतर म्हणे शिक्षण चांगले होणार नाही. ही एकच शाळा तेवढी चांगली आहे. हे सगळे सुरुवातीला मला नवल वाटत होते आणि नंतर कीव करावीशी वाटत होती.

फियांचे आकडे ऐकून गरगरायला झाले! कठीण आहे शिक्षणाचे. आत्ता इतकी फी तर पुढे काय?

बाकी तुमच बालसिंघम एकदम आवडला! :)

सस्नेह's picture

17 Mar 2014 - 3:28 pm | सस्नेह

लेखन अन किस्सा.
बाकी शाळांच्या फिया ऐकून, आम्ही इंजिनिअरींगची फी वर्षाची चार हजार भरलेली आठवली अन गहिवरून आले.

बाबा पाटील's picture

17 Mar 2014 - 7:10 pm | बाबा पाटील

माझी एक वर्षाची फी होती,७००० रु, साडेचार वर्षाची फी झाली ३१५०० रु. ती पण स्कॉलरशिपमुळे परत मिळाली,लेकीची बालवाडीची फी भरली ३२००० रु,भेंडी डोका आउट झाला राव.

शैलेन्द्र's picture

17 Mar 2014 - 8:53 pm | शैलेन्द्र

:)
माझं M Sc. पर्यंतचं सगळं शिक्षण जितक्या पैशात झाले तितके मुलाच्या मोन्तेसोर्रीलाच गेले..

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Mar 2014 - 9:09 pm | भ ट क्या खे ड वा ला

सुटलो या चक्रातून असे वाटले.

अभिनंदन ह्या चक्रातून सुटण्याबद्दल... पण आम्ही लवकरच ह्या चक्रामध्ये पुरते भरडून निघणार असे दिसते आहे... :(

फास्टरफेणे's picture

17 Mar 2014 - 11:20 pm | फास्टरफेणे

पुण्यातल्या एका शाळेत मुलाच्या ज्यु. के.जी च्या मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाला इंग्रजी अजिबात येत नव्हतं...मुख्याधापिकेने चॉकलेटचा बाऊल (का बोल!) मुलापुढे सरकावला आणि म्हणाल्या "प्लीज टेक वन"...मुलाला त्या काय म्हणाल्या ते कळलं नाही, पण चॉकलेट्स पुढे सरकावलेली पाहून त्याने दोन्ही मुठी भरुन चॉकलेट्स घेतली आणि पँटच्या खिशात कोंबली. मी पटकन "त्यांनी एकच चॉकलेट घ्यायला सांगितलंय, बाकीची परत ठेव" असं सांगितलं. त्यानं २-३ चॉकलेट्स खिशातून काढून ठेवली...
त्यांनी अजुनही १-२ प्रश्न इंग्रजीत विचारले...चिरंजीवांनी अर्थातच एकाचेही उत्तर दिले नाही.
शाळेतून परत येताना सौ म्हणाल्या "प्रवेश मिळायचा नाही"...अर्थात मला फारशी काळजी नव्हती!
घरी आलो. मुलाचे कपडे बदलताना लक्षात आलं पठ्ठ्याच्या खिशात आणखी ३-४ चॉकलेट्स होती !!! :)
(मनात म्हणालो ३०-४० हजारातले ३-४ रुपये वसूल झाले :) )
त्याच शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा विचार आला, मुलाखत घेऊन शाळेने नक्की काय साध्य केलं?

काही शाळांमध्ये आजीआजोबांचेही इंटरव्ह्यू होतात असे ऐकले आहे. आता आमच्या एका नातेवाईक आजींना वय वर्षे ७०, इंग्रजी येत नसल्याने त्यांच्या नातीला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही व लांबच्या शाळेत जावे लागले (तिथे ही अट नसावी). आणखी एका मुलीच्या आजीला वाचनापुरते इंग्रजी येत असल्याने नातीला शाळेत प्रवेश मिळाला. या दोघी आज्या, आजोबे नातवंडांचा अभ्यास घेणे राहू द्या पण जवळ रहातही नाहीत, वेगळ्या गावांना राहतात, कधीमधी येतात.
तुमचा अनुभव वाचून एकदम हे आठवले. कित्येक संबंध नसलेल्या गोष्टींचा बाऊ करतात शाळा. तुमच्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळाली ते चांगले झाले.

च्यायला. शाळा नक्की भारतातलीच आहे की आम्रविकेतली ????????????????

आज्जीआजोबांचा इंटर्व्ह्यू म्हञ्जे कमालच झाली. उद्या भेंडी सोसायटीतल्या शेजारपाजार्‍यांचा इंटर्व्ह्यू घेतील, डोकं वाप्रायला काय बंदी आहे का यांना?

इरसाल's picture

18 Mar 2014 - 10:06 am | इरसाल

युवर भांडीवाली आणी झाडुपोछावाली इज ऑल्सो इन्व्हायटेड फॉर इन्टर्व्हु.
लगे हात सोसायटीचा वॉचमन, कचरावाला, इलेक्टीशन, पेपरवाला येणारे सेल्स्मन इ.इ. आल्सो इन्व्हायटेड हं !

रेवती's picture

18 Mar 2014 - 7:20 pm | रेवती

अरे बाबा, हामेरिकेतल्या नव्हेत या शाळा, सातारा रोडच्या किंवा पद्मावतीच्या आसपास ज्या कोणत्या नवीन निघाल्या असतील त्यातली एक आहे, अर्थातच नाव माहित नाही. ती बालवाडीत अ‍ॅडमिशन न मिळाली मुलगीही आता आठवी नववीत असावी. निदान बारा पंध्रा वर्षांपासून हे चालू असावे.

बॅटमॅन's picture

18 Mar 2014 - 7:29 pm | बॅटमॅन

औघड आहे बॉ सगळं.......

आमच्या वेळी अन आमच्या इथं असं नव्हतं बॉ....................

(अं.ह. इ.इ. झालेला) बॅटमॅन.

त्रिवेणी's picture

18 Mar 2014 - 6:46 pm | त्रिवेणी

s

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2014 - 7:32 pm | प्रकाश घाटपांडे

चला आमच्या जण्रल नॉलिज मदी भर पडली. आमच्या क गुर्जी पोराला उभ करायचे आन त्याला उजव्या हातानी डोक्याउन डाव्या कानाला हात लावायला सांगायचे. कानाला हात लागला कि प्वॉरग शाळेत.