✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

र
राजघराणं यांनी
Mon, 03/10/2014 - 01:16  ·  लेख
लेख
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती . हो शाळेत प्रवेशासाठी इंटरव्हू असतो . त्याला तसे म्हणत नाहीत . पण एडमिशन साठी आई बाप पोर या तिघांनी येउन भेटायचे असते आणि शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात आणि मुख्याध्यापक पालकाना विचारतात . आमचा कार्टा तसा वाइच बडबड्या आणि चण्ट आहे . गाणी , कविता सगळ्या तालात म्हणतो . ए टु झेड , एक ते दहा सगळे तोंडपाठ आहे . त्यामुळे आमची पत्नी पोराला पढवत नसून दस्तुरखुद्द आम्हालाच पढवत होती . निट बोल उगीच वाद विवाद नकोत वगैरे . म्हणजे त्या पोराच्या शाळा एडमिशन वेळीही मी काही तात्विक खुसपट काढून शाळा मेनेजमेंट शी वाद उकरून काढेन … इतका दुर्दम्य विश्वास आमच्याबद्दल तिकडून आहे . असो . शेवटी एकदाचे त्या शाळेत पोहोचलो . तिथे एक रीसेप्शनिस्ट. बयेला विचारल शाळा आतून बघता येईल का ? अतिशय मंद असे प्रोफेशनल मंदस्मित करत तिने नकार दिला . मग विचारल बर फी किती ? (हा मुद्द्याचा प्रश्न ) . यु नीड टु गो थ्रू अवर एडमिशन फोर्म , फोर डीटेल्स . म्हटलं वोक्के . दे बाई तुझा फार्म . यु नीड तू पे एट द काउण्टर एण्ड कलेक्ट युर फोर्म फ्रोम देअर . बर बाई मग तू कशाला बसलीस इथे ? असो तर फोरम ची किंमत रुपये सहा हजार फक्त . च्यामारी आणि नाई पटली शाळा तर ? गेले का फुकट ? मग थोडा तात्विक वाद विवाद करून तिच्याकडून फी विषयी माहिती काढलीच . या विवाद्समयी आमचे कुटुंब आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत आहे असा भास झाला . तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त . हि मेडिकल वा इंजिनिअरइंग ची फी नाही हो . बालवाडी शाळेची आहे . शेवटी आम्ही तिघेही विजयी मुद्रेने शाळेबाहेर पडलो तेंव्हा दोन लक्ष सहा सहस्त्र होन वाचवल्याचा आनंद आमच्या मुखमंडलांवर झळकत होता . कालच्या अशा अनुभवांमुळे आज शाळा शोधताना फी हा मुद्दा प्रथम ठेवला आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी इण्टर्नेशनल शाळा हुडकून काढली. तरी फी साठ हजार वर्षाला . ठीक आहे म्हटलं होऊ दे खर्च . शिक्षणात तडजोड नको . मग रविवारच्या भल्या पहाटे नौ वाजता उठून आमची तीक्कल नव्या शाळेचा इण्टरव्ह्यू देण्यासाठी निघाली . वाटेत अर्धांग यावेळी मात्र मुलाची उजळणी करून घेत होते . ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणा पाहू असे उच्चारायचा अवकाश . आमचे पिल्लू स अभिनय गाणे सुरु करते आणि दहा पंधरा कविता नाचासकट म्हणून झाल्या कीच थांबते. एक ते दहा म्हण म्हटले कि एक ते वीस म्हणते . ए 2 झेड तर ऐपाल , बोल , कॅट अशी उदाहरणे देत घडा घडा म्हणते . आमही दोन्हीही सुजाण पालकांनी अभिमानाने या आमच्या छोट्या बुद्धिमान सिंघम कडे प्रेमान पाहिलं . आणि बाल सिंघम सकट नव्या शाळेत दाखल झालो . प्रशस्त शाळा . सर्व वर्ग एसी . रिसेप्शन सुद्धा एयर कंडीशन . आणि रखवालदार पण इंग्लिश बोलणारा . मग रिसेप्श्निस्ट ने हसून स्वागत केले . चार वर्षापूर्वीच उघडलेली नवी शाळा असल्याने--- गिर्हाइके हवी होती वाटत त्याना . चला कालच्या मानानं आज सुरवात बरी झाली होती . एकदम पॉश आणि भारी होती शाळा . …. मग त्या सुंदर आणि हसतमुख रिसेप्शनिस्ट न सर्व माहिती सांगितली . प्लीज वेट फोर फ़ाइव्ह मिनिटस असे लाडीकपणे म्हटली . चला म्हणजे पाच मिनिटातच इण्टर व्ह्यू सुरु होणार होता तर . एव्हढ्यातच-- आईच्या गावात-- आमच्या बाल सिंगम ची सटकली. तो सोफ्यावर उभा राहिला आणि स्वत:ची चड्डी काढु लागला . मी भर्रकन त्याची चड्डी पुन्हा वर केली आणि त्याला नजरेने दटावण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो . पण तो कसला ऐकतो ? मला हि चड्डी नको …. लाल वाली पायजेल … म्हणून त्यान भोकाड पसरला . रडण्याचे तार सप्तक सुरु जाहले . प्रत्येक आलाप पहिल्यापेक्षा चढ्या सुरात आणि मोठ्ठ्या आवाजात . परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले . मग त्यांच्या मातोश्रींनी एक धपाटा घातला . सिंघम ला हा अपमान फार जिव्हारी लागला असावा . त्याने रडे बंद केले . आणि स्वारी गाल फुगवून चिडून रुसून बसली . मग मी बायको आणि रुसलेला बालक असे तिघे . एका केबिनमध्ये दाखल झालो . स्वारी चिडक्या नजरेने मातोश्रींकडे पहात होती . शेट्टी पिता पुत्र हि शाळा चालवतात . त्यापैकी हा पुत्र शेट्टी . तो शाळेचा एडमिन हेड म्हणे . त्याने सर्व कागदी सोपस्कार पार पाडले . पॉवर पोइण्ट प्रेझेन्टेशन मध्ये शाळेची माहिती सांगितली . केंब्रीज युनिव्हर्सिटिचे प्रमाणपत्र दाखवले वगैरे . तर पुढचा मुद्दा असा होता कि मी फी भरणे वगैरे सोपस्कार पार पाडायचे आणि आईने मुलाला घेऊन जायचे इंटरव्हू साठी . मी चेक बुक काढून सही करू लागलो . आणि सौ ने बाळाला उचलले . सिंघमाची पुन्हा सटकली … आई मारते मी नाई जाणार तिच्याबरोबर … बाबा तू घे … आणि त्याने बाबा बाबा बाबा बाबा चे तारसप्तक सुरु केले . तो बिचारा पुत्र शेट्टी पोराची समजूत काढायला त्याला पेन दाखवू लागला . कार्ट्याने पेन हिसकावले …. पुत्र शेट्टी च्या तोंडावर फेकून मारले …… आणि तार सप्तक खर्ज्यात नेत तो हट्टाने जमिनीवर झोपला . आता अजून तमाशा नको म्हणून मी त्याला उचलले …. आणि इंटरव्हू साठी नेले . कागदी सोपस्कार महिला दिनानिमित्त पत्नीला करावे लागले . मी इंटरव्हू साठी सिंगम सकट एका सुस्वभावी शिक्षिकेसमोर उभा होतो . ती चाईल्ड साकोलोजी वगैरे शिकली होती म्हणे . अगदी गोड हसून ती सिंगम कडे पाहिले . त्याचा राग बराचसा निवळला असावा . रडला नाही अजिबात . मग तिने त्याला त्याच्या कलाने प्रश्न विचारायला सुरवात केली. व्होट इस युवर नेम ? स्वारी मक्ख ! आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला . मग तिने काय काय विचारले , प्राणि सांग , पक्षि सांग , बाबाच नाव सांग , इंग्लिश, हिंदी, मराठी अशा सर्व भाषेत विचारले . आमचे राजपुत्र ढिम्म बसलेले . चेहर्यावरची माशी हलत नव्हती . मग म्हणाली कविता म्हण , ट्विंकल ट्विंकल म्हण …. सिंघम ढिम्म ! एक शब्द बोलायला तय्यार नाही पट्ठ्या . शेवटी कंटाळून ती निघून गेली . शाळा प्रवेश हुकलाच होता . पोराने साठ हजारही वाचवले होते बहुतेक !. मी प्रेमाने आमच्या सुपुत्राकडे पाहिले . जशी ती बाहेर गेली तसा कार्टा बोलला मला गाणी म्हणायचीत . त्याला बकोट धरून उचलला आणि टिचर्स रुम मध्ये घेऊन गेलो . तिथे पट्ठ्या जो सुरु झाला ..... साग्रसंगीत गाणी आणि नाचासकट ! शेवटच्या नाच रे मोरा गाण्याला तर टिचर्स रूम चे टेबल खालून तबल्या सारखे वाजवून दाखवले ..... हुश्श ! शेवटी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंत झाला आणि मी विजयी मुद्रेने चिरंजीवांना कडेवर घेऊन बाहेर पडलो . चला मुलाचे उज्ज्वल भविष्य आम्ही इंटरनेशनल शाळेत सुरक्षित केले होते. आता शेवटची भेट . ती म्हणजे शाळेचे ट्रस्टी पिता शेट्टी यांच्याशी . एकंदर माणूस सभ्य . आत जाण्याआधी पोराला लालूच दाखवली . गुड बोय सारखा वाग ह ! तुला चोकलेट देईन मी ! झाल … जसा पिता शेट्टिशि संवाद सुरु झाला तसा पोरान घोषा लावला । बाबा चोकलेट दे ना ! चोकेत दे ! शेट्टी अथवा मी एक जरी वाक्य बोललो -- कि हा चोकेतचा गजर ! शेट्टी ला सवय असावी तो दयार्द नजरेने पहात होता . मग शेट्टी शाळेत फकस्त इंटरनेशनल अभ्यासक्रम नाही आपली महान भारतीय संस्कृती वगैरे बोलू लागला . आमच्या पोराला संस्कृतीत फारसा इंटरेस्ट नसावा . त्याचे आपले चोकेत दे चे पालुपद सुरु होते. मग शेट्टी म्हणाला शाळेत नोंव्हेज चिकन मटन वगैरे आणायचे नाही . असा नियम आहे बरेच विद्यार्थी जैन आहेत वगैरे . आमच्या पोराने चिकन हा शब्द जसा ऐकला तशी त्याची भुक जागृत झाली … त्याने चोकेत चा घोष बदलला . आई चिकन दे …चिकन दे…. चिकन दे …। नवा घोष सुरु केला . इतका वेळ मोठ्या प्रयत्नाने दाबून ठेवलेले हसू भळ्ळ दिशि माझ्या थोबाडातुन बाहेर पडले . बायकोही फुटली - आम्ही दोघे खो खो हसू लागलो . आम्हाला हसताना पाहून सिंघम अजून जोराने खोटा नकली हसू लागला . शेट्टी पिता पुत्र आमच्या चक्रम तिक्कलिकडे आश्चर्याने पहात राहिले …।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
24020 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

आई गं..

पिलीयन रायडर
Wed, 03/12/2014 - 13:25 नवीन
असं वर्मावर बोट नाही ठेवायच हो.. जस्ट ५ च मिनिटापुर्वी मुलाला पाळणाघरात पाहुन आले.. ०.१५ मिलिसेकंदात त्याला मी दिसले आणि त्यानी भोकाड पसरलं.. सध्या त्याच्या मावशी "आई नाहीच आली.." असं पटवत असतील.. मी मात्र येताना स्वतः मधल्या आईला शिव्या घालत आले.. काय उपयोग ह्या सगळ्याचा जर पोर असं बाहेर राह्तय वगैरे वगैरे...मग अर्थातच नेहमी प्रमाणे कळीचा प्रश्न विचारला स्वतःला.. "सोडावी का नोकरी?".. प्रश्न संपायच्या आत महिन्याचा १०-१५ तारखेलाच लयाला जाणारा बॅक बॅलेन्स आठवला.. गप गुमान वर येऊन कामाला लागले.. अर्थात ह्या प्रश्ना खेरीज "जर अबीरनी आपल्याला सांभाळलं नाही तर म्हातारपणी कसं धकवायचं?" हा ही माझा आवडता प्रश्न आहेच.. तुमच्या मुद्द्यात पॉईंट आहे.. सगळं पोरांना अर्पण केलं तर म्हातारपणी खायचं काय? आणि पोरांकडे हात पसरायचे नाहीत वगैरे मत तर आहेतच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ज्जे बात!

ऋषिकेश
Wed, 03/12/2014 - 13:31 नवीन
म्हणूनच तु माझा मित्र (टिकून) आहेस! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तुम्ही अगदी सगळ बरोबर मांडल

दिव्यश्री
Wed, 03/12/2014 - 13:36 नवीन
तुम्ही अगदी सगळ बरोबर मांडल आहे. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर >>> पुढे त्याच आई बापाची या बालिष्टरला लाज वाटणार नाही कशावरून ? बरेच मुलं आजकाल आपले पालक काय नौकरी , व्यवसाय करतात हे सांगत नाहीत . लहानपणीच त्यांच्या मध्ये कुठेतरी लाजीरवाणा न्यूनगंड येतो , बरोबरीची मुले आपल्याला हसतील ई... तो कर्तव्य म्हणून पैसे पाठवत राहील पण ...असो . 'दोन द्यावे दोन घ्यावे' >>> ++ १ 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना>>> मी तर म्हणेन कुटुंबाचं सुख तेच आपल सुख असाच विचार ९९% महिला करतात . स्वतःच अस्तित्व विसरून जाण्यात धन्यता मानतात . पण आपण स्वतः वर किती अन्याय करतो हे त्यांनाही समजत नाही. पुढे मग सगळेच त्या स्त्रीला गृहीत धरतात . स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे हि एक आणखी अभिनास्पद गोष्ट आहे आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत .आपल आरोग्य चांगल ठेवण हि जबाबदारी आहे , कर्तव्यच आहे हे मान्य नसत .कारण कर्ती स्त्रीच जर आजारी पडली तर सगळ घर आजारी पडत , हे समजत म्हणून मग पर्याय कायतर स्वतःकडे दुर्लक्ष . बराच मोठा प्रतिसाद झाला . थांबते. नाहीतर लगेच कोणीतरी येउन सांगेल कि धाग्याचा विषय बघा आणि मग लिहा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आयला.....निव्वळ पर्खड अन

बॅटमॅन
Wed, 03/12/2014 - 14:23 नवीन
आयला.....निव्वळ पर्खड अन म्हणूनच जबर्‍या!!!!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

धन्यवाद.

दिव्यश्री
Wed, 03/12/2014 - 21:22 नवीन
तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला . :D पण हे अनुभवातून आलेले शहाणपण / बोल आहेत. आमच्या मातोश्रींनी कधीही स्वतःची काळजी घेतली घेतली नाही आणि शेवटी सिव्हियर हार्ट एटेक मध्ये रुपांतर होऊन त्या आम्हाला सोडून गेल्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमचा असा प्रतिसाद वाचून

बॅटमॅन
Tue, 03/18/2014 - 19:04 नवीन
तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला
हॅ हॅ हॅ, अजून बरेच शॉक बसतील, अंमळ डॉळे उघडे ठेवले तर ;) बाकी ...............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

आग्गायाया.... हा प्रतिसाद

रेवती
Tue, 03/18/2014 - 19:15 नवीन
आग्गायाया.... हा प्रतिसाद वाचायचा र्‍हायला होता हो ररा. आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. प्रतिसाद आवडला हे वेगळे सांगत बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हू

इरसाल
Wed, 03/19/2014 - 14:43 नवीन
आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. ते इथे सांगुन काय उपेग? आम्ही थोडीच " हाणा इथं" मधे वाचायला जाणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरेच्च्या! एवढेच ना! मी काय

रेवती
Wed, 03/19/2014 - 18:00 नवीन
अरेच्च्या! एवढेच ना! मी काय म्हंटे तुम्ही मला विचारत जावा ना. अनाहितामध्ये काय चालले आहे हे मी सांगू शकीन. तसे ते बर्‍याचजणांना सांगून झाले आहे. तुम्हाला म्हणून सांगते, सध्या लिपस्टीकच्या नवीन शेडस् व कपाळाला लावण्याच्या टिकल्यांच्या मागील डिंक त्वचेस किती घातक? यावर चर्चा चालू आहेत. वर उल्लेखलेला प्रतिसाद दिला तो म्हैलादिनाच्या धाग्यावर आहे व त्या धाग्यातील सगळ्यांचा रस संपलेला आहे. एकंदरीतच वेगळा विभाग घेऊन सगळ्याजणी स्वतंत्र झाल्याने कोणाची काही तक्रार राहिली नाही आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

रेवाक्का रॉक्स!!!

पिलीयन रायडर
Wed, 03/19/2014 - 18:06 नवीन
रेवाक्का रॉक्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बरं

इरसाल
Fri, 03/21/2014 - 15:20 नवीन
आज काय नविन विषेश चाललय हाणा इथ मधे ? डिंकाचे फिक्स झाले का नायतर एक उपाय सांगतो माझी आजी कुंकु कपाळाला व्यवस्थित चिकटुन रहावा म्हणुन मधमाशांच्या मेणाचा उपयोग करायची. लिपस्टिकबद्दल म्हणाल तर..... एक बुजुर्ग एका सभेत..... मला ह्या लिपस्टिकचा, ना रंग पसंत आहे ना गंध पसंत आहे ना चव ! :;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

I've never let my school

सुबोध खरे
Mon, 03/10/2014 - 14:58 नवीन
I've never let my school interfere with my education. Mark Twain
  • Log in or register to post comments

:)

साती
Tue, 03/11/2014 - 09:55 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

:)

आत्मशून्य
Mon, 03/10/2014 - 16:41 नवीन
मस्त लिखाण...!
  • Log in or register to post comments

बापरे! काय शाळा म्हणायच्या की

रेवती
Mon, 03/10/2014 - 17:53 नवीन
बापरे! काय शाळा म्हणायच्या की कोण? असे ऐकले आहे की काही शाळांमध्ये १२ वाजता जेवण व तीन वाजता खाऊही दिला जातो मग मुले घरी साधे जेवायला कुरकुर करतात. असो. सगळे बदलले आहे एवढे खरे! तुमच्या मुलाच्या गमती जमती आवडल्या.
  • Log in or register to post comments

__/\__!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/10/2014 - 18:29 नवीन
तुम्हाला आणि बाल सिंघमला!! बाकी सद्ध्या हिच मोहीम हाती घेतोय, फक्त पुण्यात. बघू काय काय होतय!
  • Log in or register to post comments

इंटरनॅशनल स्कुल म्हटले की सगळे हेच आले. थोड्याफार फरकाने.

आत्मशून्य
Mon, 03/10/2014 - 22:27 नवीन
त्यापेक्षा सरळ शीबीएसीइ चा अभ्यासक्रम असलेल्या तुलनेने स्वस्त शाळाही उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

Raajaputraane dhamaal keli.

यसवायजी
Mon, 03/10/2014 - 22:48 नवीन
Raajaputraane dhamaal keli. mast. ChaDDee aaNee chikan.. :))
  • Log in or register to post comments

मस्त मांडलायं विषय!

संजय क्षीरसागर
Mon, 03/10/2014 - 23:57 नवीन
शेवटी कुठे अ‍ॅडमिशन झाली की नाही?
  • Log in or register to post comments

धमाल आली असेल ना?

स्पंदना
Tue, 03/11/2014 - 03:12 नवीन
धमाल आली असेल ना? पण काही म्हणा पोर मात्र हुषार दिसतय.
  • Log in or register to post comments

बाप तसा बेटा. छोटा हुषार आहे.

पाषाणभेद
Sun, 03/16/2014 - 05:39 नवीन
बाप तसा बेटा. छोटा हुषार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

फार हसवले तुमच्या सिंघमने .

लौंगी मिरची
Tue, 03/11/2014 - 09:45 नवीन
फार हसवले तुमच्या सिंघमने . आमच्या मोठ्या सिंघमला लेख वाचुन दाखवला . घरातल्या सगळ्याच मंडळींनी लेखाचा आस्वाद घेतला , मजेशिर एकदम .
  • Log in or register to post comments

इथेhttp://www.misalpav.com

आशु जोग
Tue, 03/11/2014 - 10:26 नवीन
इथे http://www.misalpav.com/node/26186 आठवण झाली
  • Log in or register to post comments

शाळेने आम्हाला काय दिले असेल

ऋषिकेश
Wed, 03/12/2014 - 13:33 नवीन
शाळेने आम्हाला काय दिले असेल तर न्यूनगंड हे अवचटांचे वाक्य मला नेहमी आठवते. असो. विनोदी लेखन प्र चं ड आवडले. एक प्रकारची करूण-कॉमेडीच ही!
  • Log in or register to post comments

लेख मस्त्त जमला आहे.

मृत्युन्जय
Wed, 03/12/2014 - 13:51 नवीन
लेख मस्त्त जमला आहे. शाळांच्या फिया ऐकल्या की जीव टांगणीला लागतो. पण असले खर्च करावेच लागतील हे ही जाणुन आहे.
  • Log in or register to post comments

अनुभवकथन आवडले. शाळांच्या फीज

मधुरा देशपांडे
Sat, 03/15/2014 - 23:02 नवीन
अनुभवकथन आवडले. शाळांच्या फीज आणि त्यांचे प्रवेश याविषयी अनेक किस्से ऐकलेत. माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी जवळजवळ २-३ महिने दररोज ऑफिसमधून खास परवानगी घेऊन त्या भावी शाळेला भेट देण्यासाठी जायची. सुरुवातीला मला वाटले की गंमत करतेय. तिथे जाउन काय करणार. पण जेव्हा हे रोज झालं तेव्हा विश्वास बसला. तिथे जाऊन करायचे काय तर फक्त त्या मुख्याध्यापिका येतील तेव्हा त्या ऑफिस समोर बसून राहायचं. काही बोलायचे नाही. त्या बाई आत गेल्या की ही परत. त्यांनी म्हणे फक्त चेहरा बघितला पाहिजे की रोज किती प्रयत्नाने ही व्यक्ती शाळेत येते आहे. म्हणजे तिला किती त्या शाळेविषयी प्रेम आहे वगैरे वगैरे. असे जवळजवळ २-३ महिने (यात विशेष म्हणजे बॉस ने ही परवानगी दिली होती यासाठी) ऑफिसपासून १० किमी वर असणाऱ्या शाळेत तिने हजेरी लावली. प्रवेशाच्या निकालाच्या दिवशी तिला प्रचंड टेन्शन आले होते आणि नशीबाने शेवटी प्रवेश मिळाला.शिवाय हे करावेच लागते हा दृष्टीकोन. नाहीतर म्हणे शिक्षण चांगले होणार नाही. ही एकच शाळा तेवढी चांगली आहे. हे सगळे सुरुवातीला मला नवल वाटत होते आणि नंतर कीव करावीशी वाटत होती.
  • Log in or register to post comments

फियांचे आकडे ऐकून गरगरायला

यशोधरा
Sun, 03/16/2014 - 09:37 नवीन
फियांचे आकडे ऐकून गरगरायला झाले! कठीण आहे शिक्षणाचे. आत्ता इतकी फी तर पुढे काय? बाकी तुमच बालसिंघम एकदम आवडला! :)
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

सस्नेह
Mon, 03/17/2014 - 15:28 नवीन
लेखन अन किस्सा. बाकी शाळांच्या फिया ऐकून, आम्ही इंजिनिअरींगची फी वर्षाची चार हजार भरलेली आठवली अन गहिवरून आले.
  • Log in or register to post comments

मी फुकटात डॉक्टर झालो राव

बाबा पाटील
Mon, 03/17/2014 - 19:10 नवीन
माझी एक वर्षाची फी होती,७००० रु, साडेचार वर्षाची फी झाली ३१५०० रु. ती पण स्कॉलरशिपमुळे परत मिळाली,लेकीची बालवाडीची फी भरली ३२००० रु,भेंडी डोका आउट झाला राव.
  • Log in or register to post comments

माझं M Sc. पर्यंतचं सगळं

शैलेन्द्र
Mon, 03/17/2014 - 20:53 नवीन
:) माझं M Sc. पर्यंतचं सगळं शिक्षण जितक्या पैशात झाले तितके मुलाच्या मोन्तेसोर्रीलाच गेले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आवडला

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 03/17/2014 - 21:09 नवीन
सुटलो या चक्रातून असे वाटले.
  • Log in or register to post comments

अभिनंदन ह्या चक्रातून

शिद
Tue, 03/18/2014 - 19:24 नवीन
अभिनंदन ह्या चक्रातून सुटण्याबद्दल... पण आम्ही लवकरच ह्या चक्रामध्ये पुरते भरडून निघणार असे दिसते आहे... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

आमचा अनुभव

फास्टरफेणे
Mon, 03/17/2014 - 23:20 नवीन
पुण्यातल्या एका शाळेत मुलाच्या ज्यु. के.जी च्या मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाला इंग्रजी अजिबात येत नव्हतं...मुख्याधापिकेने चॉकलेटचा बाऊल (का बोल!) मुलापुढे सरकावला आणि म्हणाल्या "प्लीज टेक वन"...मुलाला त्या काय म्हणाल्या ते कळलं नाही, पण चॉकलेट्स पुढे सरकावलेली पाहून त्याने दोन्ही मुठी भरुन चॉकलेट्स घेतली आणि पँटच्या खिशात कोंबली. मी पटकन "त्यांनी एकच चॉकलेट घ्यायला सांगितलंय, बाकीची परत ठेव" असं सांगितलं. त्यानं २-३ चॉकलेट्स खिशातून काढून ठेवली... त्यांनी अजुनही १-२ प्रश्न इंग्रजीत विचारले...चिरंजीवांनी अर्थातच एकाचेही उत्तर दिले नाही. शाळेतून परत येताना सौ म्हणाल्या "प्रवेश मिळायचा नाही"...अर्थात मला फारशी काळजी नव्हती! घरी आलो. मुलाचे कपडे बदलताना लक्षात आलं पठ्ठ्याच्या खिशात आणखी ३-४ चॉकलेट्स होती !!! :) (मनात म्हणालो ३०-४० हजारातले ३-४ रुपये वसूल झाले :) ) त्याच शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा विचार आला, मुलाखत घेऊन शाळेने नक्की काय साध्य केलं?
  • Log in or register to post comments

काही शाळांमध्ये आजीआजोबांचेही

रेवती
Tue, 03/18/2014 - 01:50 नवीन
काही शाळांमध्ये आजीआजोबांचेही इंटरव्ह्यू होतात असे ऐकले आहे. आता आमच्या एका नातेवाईक आजींना वय वर्षे ७०, इंग्रजी येत नसल्याने त्यांच्या नातीला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही व लांबच्या शाळेत जावे लागले (तिथे ही अट नसावी). आणखी एका मुलीच्या आजीला वाचनापुरते इंग्रजी येत असल्याने नातीला शाळेत प्रवेश मिळाला. या दोघी आज्या, आजोबे नातवंडांचा अभ्यास घेणे राहू द्या पण जवळ रहातही नाहीत, वेगळ्या गावांना राहतात, कधीमधी येतात. तुमचा अनुभव वाचून एकदम हे आठवले. कित्येक संबंध नसलेल्या गोष्टींचा बाऊ करतात शाळा. तुमच्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळाली ते चांगले झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फास्टरफेणे

च्यायला. शाळा नक्की भारतातलीच

बॅटमॅन
Tue, 03/18/2014 - 02:53 नवीन
च्यायला. शाळा नक्की भारतातलीच आहे की आम्रविकेतली ???????????????? आज्जीआजोबांचा इंटर्व्ह्यू म्हञ्जे कमालच झाली. उद्या भेंडी सोसायटीतल्या शेजारपाजार्‍यांचा इंटर्व्ह्यू घेतील, डोकं वाप्रायला काय बंदी आहे का यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बरोबर

इरसाल
Tue, 03/18/2014 - 10:06 नवीन
युवर भांडीवाली आणी झाडुपोछावाली इज ऑल्सो इन्व्हायटेड फॉर इन्टर्व्हु. लगे हात सोसायटीचा वॉचमन, कचरावाला, इलेक्टीशन, पेपरवाला येणारे सेल्स्मन इ.इ. आल्सो इन्व्हायटेड हं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे बाबा, हामेरिकेतल्या

रेवती
Tue, 03/18/2014 - 19:20 नवीन
अरे बाबा, हामेरिकेतल्या नव्हेत या शाळा, सातारा रोडच्या किंवा पद्मावतीच्या आसपास ज्या कोणत्या नवीन निघाल्या असतील त्यातली एक आहे, अर्थातच नाव माहित नाही. ती बालवाडीत अ‍ॅडमिशन न मिळाली मुलगीही आता आठवी नववीत असावी. निदान बारा पंध्रा वर्षांपासून हे चालू असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला

बॅटमॅन
Tue, 03/18/2014 - 19:29 नवीन
औघड आहे बॉ सगळं....... आमच्या वेळी अन आमच्या इथं असं नव्हतं बॉ.................... (अं.ह. इ.इ. झालेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

(No subject)

त्रिवेणी
Tue, 03/18/2014 - 18:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चला आमच्या जण्रल नॉलिज मदी भर

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/18/2014 - 19:32 नवीन
चला आमच्या जण्रल नॉलिज मदी भर पडली. आमच्या क गुर्जी पोराला उभ करायचे आन त्याला उजव्या हातानी डोक्याउन डाव्या कानाला हात लावायला सांगायचे. कानाला हात लागला कि प्वॉरग शाळेत.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

इरसाल
Wed, 03/19/2014 - 14:45 नवीन
पोरगं ५ वर्षाच ही गाठ पक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आम्ही एम बी बी एस झालो

सुबोध खरे
Wed, 03/19/2014 - 18:58 नवीन
आम्ही एम बी बी एस झालो तेंव्हा सहा महिन्यांची फी रु ११२/- ( रुपये एकशे बारा फक्त) होती. आमची मुले नौदलाच्या शाळेत (रुपये २५०)आणि नंतर डी ए व्ही ( दयानंद अंगलो वैदिक) शाळेतून दहावी झाली तेंव्हा त्यांची फी रुपये एक हजार महिना होती. आता पाच आकड्यातील फी बघून मला एक मोठा प्रश्न पडला कि या शाळात असे काय शिकवतात? माझा भाचा अशा एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत आहे (ज्याची फी सहा आकड्यात आहे). त्याचा दिवस सकाळी सात वाजता सुरु होतो तो शेवटी गृहपाठ करून होई पर्यंत रात्रीचे नउ वाजतात. यानंतर तो थकून फक्त झोपतो.(अमुक तास खेळ अमुक तास प्रोजेक्ट इ इ) आणि शेवटी त्याच्या आणि माझ्या मुलाच्या शैक्षणिक परिस्थितीत फारसा काहीही फरक नाही. (एखादे झाड आपण मुद्दाम आकार देऊन वाढवतो तसे) यात त्याचे बालपण हरवून गेले आहे. एकदा श्री जयन्त नारळीकरांची प्रकट मुलाखत पाहिली. त्यात त्यांना मुलाखतकाराने विचारले कि आपण एवढे आंतर राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहात तर आपल्या मुलांना असे वाटत नाही काय कि आपणही बोर्डात यावे कीर्ती मिळवावी इ . यावर ते शांतपणे म्हणाले कि शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते ती त्याच्या वरील स्वाराची इच्छा असते. आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या मुलांवर लादून त्यांना शर्यतीत पळवू नका.
  • Log in or register to post comments

मलाही हाच प्रश्न पडतो..

पिलीयन रायडर
Wed, 03/19/2014 - 19:27 नवीन
मलाही हाच प्रश्न पडतो.. मी माझ्या मुलाला समजा एखाद्या साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तर काय फरक पडणारे नक्की? काही विषय शिकायचे माध्यम वेगळे असेल सेमी इंग्लिश मध्ये महत्वाचे विषय इंग्लिश मध्ये शिकवतातच गणित वगैरे तर तसंही म्हणे मातृभाषेतुन शिकावं.. जो काही फी मधला फरक असेल तो मुला साठीच पण वेगळ्या गोष्टिं मध्ये वापरता येईल. त्याला इंग्लिश चांगलं बोलता यावं म्हणुन थोडे प्रयत्न करावे लागतील (पण घरात आई वडील इंग्लिश बोलत असतील आणि टिव्ही वगरे वर सतत काही तरी इंग्लिश्च बघत बसले असतील तर तो ही प्रॉब्लेम नाही..) लोक खुप पैसे देऊन स्वतःची जवाबदारी शाळेवर टाकु पहातात. खुप पैसा खर्च केला की मग आपण मुलाच्या अभ्यासाच्या ताणा तुन मोकळे असं वाटत असावं त्यांना. पण मुलांना तुमच्या "वेळ देण्याची" जास्त गरज आहे. तुम्ही मुलाला कोणत्याही शाळेत घाला, जर तुम्ही स्वतः तासभर त्याच्या सोबत बसणार असाल तर निश्चित ते मुल पुढे जाईल.. अर्थात त्यानी अभ्यासाची कोणती पद्धत वापरायची हा मुलाचा प्रश्न आहे.. (मी स्वतः पुस्तक वाचुन मुलांना समोर हरिदासाची कथा ऐकायला बसवणार्‍या आया पाहिल्या आहेत..) पण लाखो रुपये खर्च करुन तुम्हाला मुलाला द्यायला वेळच नसेल तर कशाचाच काही उपयोग नाही. शाळा शेवटी फक्त पुस्तकी ज्ञान देईल.. पण तुमचा मुलगा कुणासोबत असतो.. त्याला वाचनाची आवड आहे का? तो कोणत्या खेळात पुढे जाऊ शकतो.. त्याला एखादी कला येते का? त्याला लिहीताना वाचताना काही त्रास होतो का? त्याला ६०-७० मुलांच्या वर्गात ज्या पद्धतीनी शिकवलं जात ते समजतय का? वगैरे हजारो गोष्टींना पालक म्हणुन तुमचं लक्ष हवं.. लाको रुपये भरले तरी शाळेतले शिक्षक तुमच्या एवढ्या आत्मीयतेने तुमच्या मुलाकडे लक्ष देणार नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान !!

अम्रुता आफले
Fri, 03/21/2014 - 16:12 नवीन
३ वर्श्यापुर्वि माझ्या मुलाच्या प्रवेश्याचि पण अशिच वाट लागलि होति. एका शाळेत १० वाजता इंटरव्हू साथि गेलो तिथे इंटरव्हू नन्तर माझ्या मुलाला त्यानि चेन्डू दिला भेट म्हनुन ,११.३० ल दुस्र्या शाळेत गेलो तिथे पहिल्या शाळेच्या क्ष मुख्याध्यापिका नविन मुख्याध्यापिका म्हनुन रुजु झाल्या होत्या ....तिथे पन माझ्या मुलाला त्यानि चेन्डू दिला भेट म्हनुन ...तर माझा मुलगा त्यान म्हणाला मागच्या शाळेत मला असाच चेन्डू मिळाला आहे ..हे आइक्ल्यावर या शाळेत सोडा त्या शाळेत सुध्दा नाहि मिळाला प्रवेश.
  • Log in or register to post comments

हाहाहा!!

शुचि
गुरुवार, 04/24/2014 - 15:19 नवीन
हाहाहा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अम्रुता आफले

आज अद्वेय ला jr .kg ला

आरोही
गुरुवार, 04/24/2014 - 15:10 नवीन
आज अद्वेय ला jr .kg ला admission घेऊन आले ..आम्ही येथून शिफ्ट होणार असल्याने अजून प्रवेशसाठी साठी थांबले होते ..पण शिफ्ट होण्याचे काही काही कारणाने लांबले असल्याने २-३ दिवस येथील शाळेमध्ये चकरा मारत होतो आम्ही दोघे ..एका शाळेचा अनुभव सांगते ..हि शाळा अगदी घराजवल असल्याने याचा विचार करून आम्ही तेथे गेलो .आधी प्रवेश प्रक्रिया होऊन गेली आहे तरीही प्रवेश मिळतो का विचारले तर आधी हेड मास्तरीण बाई हो बोलल्या ..मी प्रवेश प्रक्रियेबद्दल विचारले तर मला बोलल्या nothing i just want to see the kid ...मी दुसऱ्या दिवशी अद्वेय ला घेऊन गेले तर या बाईंनी दुसर्या एका बाईंना बोलावून अद्वेय ला त्यांच्यासोबत न्यायला सांगितले .मी हि सोबत गेले ..मग बाईंनी एक वही आणि पेन्सिल घेऊन अद्वेय ला जवळ बसवून abcd z पर्यंत लिहायला सांगितली ...अद्वेय आधीच लाजरा त्यात मुडी हा कसला लिहितोय ...मग कसे तरी मी समजून त्याला लिहायला सांगितले त्याने फक्त ab c आणि h लिहिला पुढचे लिहायला तयार नवता ..मग बाई ती वही घेऊन मुख्याध्यापिका बाईंकडे गेल्या आणि त्या बाई मला बोलल्या," इसको तो abcd पुरा नाही आता ...jr kg के लिये abcd पुरा लिखना आना चाहिये ..मी सांगितले कि त्याला बोलता येते पण तो सगळेच शब्द पूर्ण लिहू शकेन असे नाहीच ...ओळखू शकतो ..तर या बाईंचे म्हणणे पडले कि ..तुम्ही त्याला क्लास लावा ..मग मी विचारले कि म्हणजे जर हे आले नाही तर प्रवेश मिळणार नाही का ??? मग त्या बाई जर चाच्पडल्या आणि म्हणाल्या नाही नाही असे काही नाही प्रवेश तुम्हाला नक्की मिळणार पण त्याला पूर्ण लिहिता यायला पाहिजे ..तुमचा प्रवेश आम्ही राखून ठेवतो आहोत ..पण तोपर्यंत याला क्लास लावा आणि तयार करा ..मला वाटले असेल असेच सगळे, म्हणून मी हो बोलून बाहेर आले ..मग त्या दुसर्या बाई ज्यांनी अद्वेय ला लिहायला लावले त्या बोलायला लागल्या कि कसे abcd लिहिता येणे किती गरजेचे आहे हे बघा इतर मुलांनी कसे लिहिले आहे ..आणि मग म्हणाल्या कि मी पण घेते क्लासेस या या ठिकाणी तुम्हाला हवे असेल तर लावा ...मग माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला ..हे सर्व कशासाठी चालले आहे ... मी आणि नवरा तडक बाहेर आलो ..नंतर दुसर्या दिवशी एका चांगल्या शाळेत जाउन चौकशी केली तर तेथे आधीच सर्व जागा भरल्या होत्या तरीपण काही पालकांच्या आग्रहास्तव एक नवीन तुकडी उघडण्यात येत आहे आहे असे कळले आणि आम्ही तेथेच प्रवेश घेतला ..हि शाळा तशी थोडी लांब आहे पण एकंदरीत मला चांगली वाटली ..आणि विशेष म्हणजे येथे मुलाची कुठलीच परीक्षा न घेता त्याला प्रवेश मिळाला .. माझा आक्षेप परीक्षा घेण्याबाबत नाहीच आहे पण एवढ्या लहान वयाच्या मुलांकडून a to z पर्यंत त्याचवेळी लिहिणे कसे काय अपेक्षित आहे ???येत असेल किवा नसेल तरी ते लिहितलच असे होईलच असे नाही .. आणि एवढ्या छोट्या मुलाला क्लास लावणे मला तरी पटत नाही .. मला तरी हे जरा चुकीचे वाटले खरेच ३.७ वर्षाच्या मुलाकडून हि अपेक्षा करणे बरोबर आहे का ???
  • Log in or register to post comments

हायला!

पैसा
गुरुवार, 04/24/2014 - 15:22 नवीन
त्या बैला तरी तिसर्‍या वर्षी अक्षरे काढता येत होती का? मुलांना ५ वर्षापर्यंत अक्षरे काढायला शिकवायची नसतातच. वरनं ट्युशन लावा म्हणे? धरून मारायला पाहिजे असल्या हावरटांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

अगं, खूप लवकर सगळं शिकवतात

कवितानागेश
Sat, 04/26/2014 - 17:23 नवीन
अगं, खूप लवकर सगळं शिकवतात हल्ली. माझी ५ वर्षाची भाची १००पर्यंत आकडे लिहिते आणि बरेच शब्द पण लिहिते. पण हे सगळं घरीच करुन घेत बसलं तर शाळेत काय शिकवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आनी हे जाले.....शं...बल!!!

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/26/2014 - 17:42 नवीन
आनी हे जाले.....

शं...बल!!!

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लेख खुसखुशीत जमला आहे .

शुचि
गुरुवार, 04/24/2014 - 15:20 नवीन
लेख खुसखुशीत जमला आहे .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा