काही माणस
काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने,
थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने.
दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना,
त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना.
अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी,
बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी.
माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,
लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.
गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,
डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.
खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना,
खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना.
तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.
स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना.
कवी: ग्रीष्म गुंजाळ
९७३०९५६५५७
प्रतिक्रिया
17 Sep 2008 - 2:41 pm | ग्रीष्म
खुप काही मला बोलायाचे आहे ,
पण आता मी बोलणार नाही .
काळजतले दु:ख कुणाला इथ सांगणार नाही.
लोक इतके शहाने आजचे की ,
उद्या त्यावर माझा हक्क ठेवणार नाही.
मी गाइल माझे गाणे आज ज्यांचा समोर
उद्या तीच लोक माझे सुरांशी नाते ठेवणार नाही .
मी आता कोणाशी बोलणार नाही .
गुपीत तीचे कोणाला सांगणार नाही.
डोळ्यात तीच्या पाणी आता खुठे दाटून येणार नाही ?
ती गेली कुटे दुर ती माझ्या हृदयात ठान मांडून आहे .
मी बोलतो रोज तीच्याशी एकांत रात्री ,
चांदण्या असतात संगतीला .
रोज नवी आठवण मग आमच्या दोघांच्या पंगतीला,
मी आता काही बोलणार नाही
गुपीत आमचे आता खोलणार नाही
ती येते रोज रात्री भेटायला नदीच्या किनारी,
गुपीत तीचे इथल्या पाण्याला मी सांगणार नाही .
ती असते फुलांच्या सवे बागेत मज संगे
पण भोवर्याच्या समोर मी भेटणार नाही.
तीने दिलाय होकार मी मलाही सांगणार नाही.
लोक इथले इतके शहाने की त्यावरही
गुपचुप बोलायची संधी सोडणार नाही.
काल परयंत ती होती फक्त ...माझी मैत्रीण ,
आज झाली ....जीवाची सखी
हे गुपीत मी पाळ्नार आहे .
आजुन खुप तीच्या संगे बोलायाचे आहे .
पण आता बोलणार नाही .
डोळ्यांची भाषया मी तीच्या कडून शिकनार आहे .
दोघांचा करार कालचा ..मी पाळ्नार आहे .
तीने घेतलेली शपथ ती मोडून गेली
पण मी माझे वचन मोडणार नाही .
मनातले माझ्या मी ,मी कुणाला आता सांगणार नाही
17 Sep 2008 - 3:03 pm | मनस्वी
ग्रीष्म, 'काही माणसे' कविता मस्त आहे!
'कुणाला सांगायचे नाही' पण छान आहे.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
17 Sep 2008 - 3:13 pm | ग्रीष्म
धन्यवाद म्हणणार नाहि पन या पेक्षा सुंदर कविता जरुर लिहिल
3 Oct 2008 - 6:49 pm | ग्रीष्म
रात्र चांगली अर्धी सरून गेल्यावर
मी एक कटिंग (पण )पटियाला पेग सारखी भरून घेतो
तू फोडलेला एश ट्रे समोर आ वासून उभा
तेंव्हा त्याच्या तोंडी एक सिगारेट देतो
सुरु होतो मग एक घोट एक झुरका ...
खिडकीच्या फुटलेल्या काचेतून मग आभळाला हात जातो.
सिगारेट च्या धुरांच्या ढगात मग पावसाचा शोध होतो
हळु हळु मग पेला गरीब
अन एश ट्रे श्रीमंत होत जातो
मग तुझ्या आठवनीचा खेळ सुरु होतो
सिगारेट चे गरम श्वास धुरातुंन मग सर्वत्र तुझे चित्र रेखाटतात ..
त्यातून सुटलेले क्षण मग कागदाला चिकटतात .
पेल्यातली की सरना-या रात्रीची पण डोक्यात शिरत जाते एक नशा
मिळत जाते मग एक प्रवासाला वेगळिच दिशा
......................................................
.......................................................
हळु हळु मग एक एक करून तुझी आठवण सतावत जाते
अन मग रात्रच सोबत जागत जाते
हळु हळु मनातल सार कागदावर उतरत जाते
आणि मनात तुझी आठवण जागत येते
..इतक्यात दारावर एक थाप पड़ते
अन मग माझी धांदल उड़ते
एश ट्रे लपवायचा कुठे ?
थोड्या वेळात त्याला लपउन
मी दार हळूच उघडतो तू दाराशी उभी
तुला मी आत घेतो ...
घरात साचलेला धुर बघून तू काही विचारणार
इतक्यात मी कछवा मछर अगरबत्तिच नाव घेतो .
टेबलावरचा ग्लास नाकापाशी नेत मी प्यायलो काय ?
याचा तू अंदाज घेत मला जवळ घेते
केसात हात फिरवत माझ गीत गात रहाते.
...इतक्यात शेजारच आलार्म च घड्याळ सकाळ झाल्याच केकाटत जाते
मी आपला डोळे चोळत उठतो
बघतो तर पेन कानाला टेबलावर ग्लास तस्साच
दाराला कड़ी आतून तशीच ...
मी सोफ्यावर एकटाच ..फ़क्त एश ट्रे तिथून गायब
मी त्याचा शोध घेतो ..तुझे एक अजुन स्वप्न समोरच्या कागदावर
त्याला फाइल लाउन देतो .
सकाळी माझी हालत बघून आरसा मला हसत राहतो ....
फाइल मला विचारत रहाते कधी येणार माझी सखी ???
4 Oct 2008 - 12:50 am | विसोबा खेचर
माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,
लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.
गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,
डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.
वा! ग्रीष्मातल्या उन्हासारखंच अगदी चटके बोचणारे लिहिले आहे! :)
कविता आवडल्या...
तात्या.
4 Oct 2008 - 4:28 am | मदनबाण
तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.
स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना.
फारच सुंदर कविता..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
4 Oct 2008 - 7:15 am | अनिल हटेला
वाह !!!
तीनही कविता मस्त !!!
अजुन येउ देत !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Nov 2008 - 5:20 pm | ग्रीष्म
रुतु बदलताना पानझड...
तसा समाज झडून गेला .
पानासोबत मानस झडून गेले ...
जणू रुतु बदलले ..
अन पक्षी इथले उडून गेले ...
गळताना त्यानी साधा आवाजही केला नाही
की पानझडी नंतरची वा-यावरची सळसळ
कानावर पडली नाही ...
पडले ते फ़क्त समाजाचे गरम श्वास ...
पडले चांगले क्षणासाठी का होईना
पण मनाला भिडले ...
समाज फ़क्त उभा आहे तिथ
जणू कुणीतरी स्टयाचू केल्यामुळ...
झड़ना-या समाजाभोवती डोळ्यात पानी आणून ...
अंकुर दडून बसलेत इथल्या
गावातल्या घराघरात अन शहरांच्या गल्ली बोळात...
आज सारा गाव माझा वाट बघतोय
इथला रुतु बदलण्याची ...
सारा समाज आज झडून गेला ....
उरलेत जणू फ़क्त काटे ...
दंगली अन जाळपोळ जणू त्याचेच तोटे ?
शहर वाट बघतय इथला हा रुतु बदलण्याची ?
पुन्हा नवी पालवी समाजाला फुटन्याची ..
अन दंगालीच ग्रहण सुटन्याची ...
रुतु बदलावे तसा समाज बदलून गेला ?
आता वाट बघावी लागणार ....
नव्या वसंताची पालवी फुटन्याची...
कवी ग्रीष्म म्हणे ...
आता करारे तयारी नव्याने पुन्हा झटन्याची...
नाही दिसत लक्षणे इठला कुम्भकर्ण उठण्याची ...
24 Nov 2008 - 5:23 pm | ग्रीष्म
गाळुनि घाम
करी रात्रनदीन काम
कधी कुलव पाभर
कधी सोबत नांगर
खेळ जीवनाचा त्यानं
असा मातीत मांडला.
मागतो दान दैव
त्याच्याशी भांडला.
धरनी आईच्या कुशीत परितो
सा-या स्रुष्टिच धन
भल्या आभळा एवढ
गड्याच मोकळ मन
बरसती नभ पडतात धारा
धरनी आईच्या कुशीला मग फूटे पाण्याचा पाझर
पेरितो रान सार
मग पुन्हा मुखी पांडूरंगाचा गजर
फुलून येत रान त्याच
जसा मोराचा पिसारा
आता खुलुन आल सपान त्याच
त्याच्या दुखाला थोडा इसरा
फूले त्याच रान
दारी सावकार उभा
७/१२ च्या उता-यावर वाढलेला
पिढयान पिढयानचा तो बोजा .
लड़की लेक त्याची मैना
हाती घेउन गोफन उभी ती पिकात
ओठी गाण्यांची लकेर
पाखरांचा थवा उडे रे तिच्या धाकात
तीच सोळाव सरल...
घोर बापाच्या जिवाला
गिळन्या काळजाचा घास,
मेला सावकार तो धावला.
तेच पड़कं घर
मोडकं त्यांच दार
अन गळकं छप्पर,
दारी उभी सुनी गुरांची दावन .
बळी राजा गाडून मातीत
इथे हसतो रावन
सावकार बैंक
दारी लेकीच लगीन
संग पोराची पढाई
एकटाच देतोय दारिद्र्याशी लढाई .
साखारिचे भाव इथे गगनाला भिडे
भाव द्यायला उसाला सदा सरकार रडे.
कापसाच सोन पिकत मळ्यातरे ज्याच्या
दोन वारं नवं कापड नाही सरणावर त्याच्या
रात्रं दीन राबतो हां मळ्यातरं त्याच्या
दलाल खातात मलाई
फाशीचा फंदा पड़े गळ्यात रे ह्याच्या
करितो काम गाळीतो घाम
पुढा-यांच्या सदा मोठाल्या उड्या
बलिराजा गाडला मातीत
परी मंत्र्याना इथे नव्या को-या गाड्या .
फ़क्त पॅकेज जाहिर
फुक्या मदतीच्या घोषणा
कोण निजतो उपाशी कुणाची भागते तृष्णा ?
वीटे जिव त्याचा
त्यान बाभळीला टांगला
आत्महत्तेचा प्रश्न केवल
संसदेच्या चर्चा सत्रात रंगला
बळी राजाच कवडी मोलापरी जिन
परी प्रेताला मिलतो लाख मोलाचारे भाव