आप की बदमाशियोंके....

विकास's picture
विकास in राजकारण
18 Jan 2014 - 7:59 pm

"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...

वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.

लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.

वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.

असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्‍या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.

व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

27 Jan 2014 - 1:19 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

अहो त्यांनी केजारीवालांची तुलना नाझींशी केली म्हणून थोडी गम्मत गेली. तसेही मोदी पंतप्रधान झाले म्हणून दंगली घडवतील असे नाही.शिवसेना सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात कुठे दंगली झाल्या?

न्यायालयात काय सिध्द झाले ते सोडून द्या... तुम्हाला खरेच असे वाटते कि ह्या दंगली भाजप पक्षाच्या पाठीम्ब्याशिवाय झाल्या? मी ९३ च्या दंगली जवळून पाहिल्या आहेत. काही ओळखीच्या अहमदाबादवासियांच्याशी देखील बोललो आहे.गुजरातने मुंबैवाल्यांकडून टिप्स घेतल्या असाव्यात असे वाटले. ३ दिवस चालणाऱ्या दंगली उत्सुर्फ नसतात. पोलिसांपासून बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

नरेंद्र मोदी चांगले पंतप्रधान होतील हे मान्य.
कोंग्रेस पासून सर्वांचेच हात रक्ताने माखलेले आहेत हेही खरं.
पण गुजरात दंगलीत भाजपचा (आणि पर्यायाने मोदींचा)सहभाग नव्हता असे मानणे हा खरच भोंगळपणा आहे. त्यावेळी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या निम्न वर्गीय भाजप समर्थाकाशी थोड्या गप्पा मारा.खूप गोष्टी कळतील.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 11:37 pm | बंडा मामा

दंगली झाल्या तेव्हा गुजरात सरकारवर खुद्द वाजपेयी इतके नाराज होते की त्यांनी संतापात पंतप्रधान पदाचा राजिनामा खरडला होता. जसवंत सिंह स्वतः ह्याचे साक्षीदार आहेत. वाजपेयींनाही तेव्हा टिस्टा सेटलवाड्नेच फसवले होते बहुदा.

विकास's picture

25 Jan 2014 - 11:40 pm | विकास

हा विषय आधी बराच चर्चीला गेला आहे आणि येथे अवांतर होईल तसेच हा धागा बराच मोठा झाला आहे. हवे असल्यास वेगळा धागा चालू करा आणि आपण अजून चर्चा करू. :)

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 11:44 pm | बंडा मामा

त्या चर्चेचे फलित काय होते हे थोडक्यात सांगु शकाल का?

विकास's picture

25 Jan 2014 - 11:54 pm | विकास

तुम्हाला जे वाटले ते तुमच्यासाठी फलित.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 11:58 pm | बंडा मामा

म्हणजे त्या दृष्टीने चर्चा पुढे नेऊ शकू..ह्या हेतुने विचारले होते, फलित काय होते.

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2014 - 1:19 am | संजय क्षीरसागर

मुळात ही पोस्ट लेखकानं अरविंद केजरीवालांना बदनाम करण्यासाठी टाकली होती :

उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

आणि पर्यायानं ती भाजपाच्या समर्थनार्थ होती:

यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे.

२० जानेवारी पर्यंत साधारण १७/१८ समविचारी प्रतिसाद येऊन ती जवळजवळ खुडूक झाली होती.

माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि एकांगी झालायं' या प्रतिसादानंतर (ज्यात केजरीवालांची मुलाखत आहे) पोस्ट पुन्हा पेटली. आणि लेखक भावनाविवश झाले, त्यांनी (सुशीलकुमार शिंद्यांच्या आधीच!) हे विधान केलं :

एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू असे माझे आधीच असलेले मत ही मुलाखत पाहून दृढ झाले.

तरीही प्रत्येक वेळी, अरविंद केजरीवाल हा सचोटीचा आणि प्रामाणिक माणूस आहे (पद्धत चुकीची असेल पण हेतू निखळ आहे) हे मी दाखवून दिलं.

पुढे सोमनाथ भारतींच्या वर्तणूकीवरुन आणि त्यांच्या `मोदींकडून किती पैसे घेतले?' या प्रश्नावरुन इथल्या राजकीय मुत्सद्यानी पुन्हा केजरीवालांवर झोड उठवली. त्यावर उत्तर म्हणून मला मोदी मुळात कायकाय बोललेत ही लिंक सापडली!

तो विडीओ बघितल्यावर मोदी नक्की काय आहेत आणि ते आआपाच्या विरोधात आहेत म्हणून बिजेपीवाले पेटलेत हा गौप्यस्फोट (मला तरी नव्यानंच) झाला.

आता बिजेपीचं: `लोकांच्या भावनांना हात घालणारं डावपेचांच राजकारण' का अरविंद केजरीवालांच: `साधं-सोपं प्रश्नसोडवणूकीचं समाजकारण' इतका सोपा पर्याय लोकांसमोर आहे; हे या चर्चेचं फलित!

(खरं तर मनमोहनसिंगासारखा अत्यंत नेमस्त गृहस्थ `मोदी पंतप्रधान होणं देशाच्या हिताचं नाही' इतकं ढळढळीत विधान कसं करु शकतो याचं मला ही तो विडिओ पाहण्यापूर्वी आश्चर्य वाटत होतं)

संपत's picture

26 Jan 2014 - 1:42 am | संपत

भाजप 'आप'ला विरोध करणे साहजिकच आहे. कॉंग्रेस आपल्या मरणाने मरत आहे. आता भाजपच्या अश्वमेधात केवळ आपचा अडथळा आहे. 'आप'ला कसा आणि किती पाठींबा मिळेल काहीच सांगता येत नाही. दिल्लीत पोपट झाला तसा देशात होणे मोदींना परवडणारे नाही. पूर्ण बहुमत मिळाले नाही तर पक्षांतर्गत विरोधदेखील बळकट होईल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2014 - 2:56 am | हतोळकरांचा प्रसाद

दिल्लीत नेमका काय पोपट झाला हे वाइच इस्काटुन सांगचाल का? दिल्लीत आआपची लाट (हो हि लाटच होती जन्लोकपाल आंदोलन, निर्भया आंदोलन, आणि शिला दिक्षित सरकारने केलेला भ्रष्टाचार यामुळे आलेली लाट) असतानाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या जवळ असतानाही घोडाबाजार न करता बाहेर राहणं म्हणजे पोपट होणे असे आपले मत आहे काय?

@संक्षि - आणि वर टाकलेली मोदींची चित्रफित हा तुमचा मोदींच्या भाषणशैलिवर असलेला वैयक्तिक राग व्यक्त करण्यायापलिकडे काहीहि नाही. त्यांनी व्यक्त केलेले कुठले मुद्दे त्यांना चांगला प्रशासक होण्यापासून रोखतात हे जरा सांगाल काय? केजरीवाल जर खरच प्रामाणिक आणि राजकीयमहत्वाकांक्षाविरहित आहेत तर ज्या राज्यांमध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याचे खुले कौतुक का करत नाहीत? गुजरातच्या विकासाबद्दल, बिहारमधील गुन्हेगारी कमी होण्याबद्दल, केरळमधील शैक्षणिक वाटचालीबद्दल कधी उघड बोलत नाहीत. विकसित राज्यांमधल्या या गोष्टी चांगल्या आहेत त्या दिल्लीसह सगळीकडे असल्या पाहिजेत असे कधी बोलताना दिसत नाहीत. उठ कि सूट सरसकट सगळ्यांना भ्रष्ट म्हणत स्वताच्या पक्षाचा उदोउदो करणे हि राजकीय महत्वाकांक्षा नाही का? बर असा करताना करताना आपल्या पक्षातील विरोधाला डावलणे आणि आपल्या पक्षातील आरोप झालेल्या लोकांना पाठीशी घालणे हे काय आहे? कुठे आहे ट्रान्सपरन्सि?

आपण अजून कुठलेच सरकार चालवले नाही त्यामुळे आधी दिल्लीच्या लोकांना प्रशासन काय आहे दाखवू आणि मग देशपातळीवर लढू असा मार्ग का नाही? राजकीय महात्वाकांक्षेमुळे? बरं मान्य केलं कि तुम्हाला देश पातळीवरील मुद्दे मांडण्यासाठी लोकसभेत प्रतिनिधित्व हवे आहे, तर मग निवडक जागा जिथे तुम्हाला संधी आहे आणि जिथे खरच चांगला खासदार नाही अशा जागा न लढवता ४०० जागा लढवून अनेक मतदारसंघांचे निकाल बदलवण्याचा घाट का? राजकीय महात्वाकांक्षेमुळे? त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटते व तुम्ही सुध्दा आंधळ्या भक्तांच्या यादीत आहात काय अशी शंका यायला जागा देते.

बंडा मामा's picture

26 Jan 2014 - 7:42 am | बंडा मामा

दिल्लीत प्रचंड काँग्रेस विरोधी लाट असुनही भाजपची मते कमी झाली ह्याला पोपट म्हणा किंवा मोदी इफेक्ट.

पोपट झाला म्हणजे 'हाथ आया,मुह न लगा'. आप नसता तर भाजप आज दिल्लीमध्ये सत्तेत असता.

सत्तेच्या जवळ असतानाही घोडाबाजार न करता बाहेर राहणं

मघाशी हे वाक्य नजरेतून सुटले होते. आता हसू थांबल्यावर टाईप करतो आहे. आजकाल भाजपचा देखील आतला आवाज बोलू लागला आहे वाटते..

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2014 - 10:02 am | हतोळकरांचा प्रसाद

आता कुठला "चष्मा" लावला असेल बरं यांनी? पण कसं असतं माहित आहे का घोड्यावर बसून चाललात कि तुमच्यासारखी लोकं म्हणतात कि चालत का जात नाही आणि चालत चाललं कि म्हणणार कि घोडा आहे कि हो. अर्थात असं करण्याचा मक्ता फक्त माध्यमांनी घेतलेला नाही म्हणा.

पोपट झाला म्हणजे 'हाथ आया,मुह न लगा'. आप नसता तर भाजप आज दिल्लीमध्ये सत्तेत असता.

याला राजकीय चर्चेच्या दृष्टीकोनातून काही अर्थ आहे का? कि फक्त विरोधाला विरोध? जर भाजपने सरकार स्थापन केले असते (किंवा भविष्यात केले,तसे घडण्याची शक्यताही आहे) तर आआपचा पोपट झाला असं मत बनवण्याची प्रगल्भतपण आहे का तुमच्याकडे? (असेल तर वेरी गुड).

दिल्लीत प्रचंड काँग्रेस विरोधी लाट असुनही भाजपची मते कमी झाली ह्याला पोपट म्हणा किंवा मोदी इफेक्ट.

@बंडा मामा - जसा तुम्हाला ती कॉंग्रेसविरोधि लाट वाटते तसं मला ती आआपच्याबाजूची लाट वाटते (कारणे वर लिहिली आहेतच मी). आणि आआपची लाट (माझ्यामते) असतानाहि ते सत्ता स्वबळावर मिळवु शकले नाहीत आणि आता कॉंग्रेसच्या हाताचे खेळणे होऊन बसले आहेत हा त्यांचा पोपट मानायचा का मी? मला वाटतं राजकीय चर्चेत अशे मुद्दे येणे म्हणजे मुद्द्यांचा अभाव दुसरं काही नाही!

तुम्हाला असे म्हणायचे आहे कि भाजपने यापूर्वी घोडेबाजार केला नाही? कि पूर्वी केला असेल पण ह्यापुढे करणार नाहीत? २० वर्षांपूर्वी माझा असल्या वाक्यांवर विश्वास बसला असता. दुर्दैवाने आता बसत नाही.

दुसऱ्या मुद्द्याबद्दल, आपने भाजपला दिल्लीत सत्तेपासून दूर ठेवले हे तुम्हाला मान्य नाही का? आप नसते तरीही भाजपला एवढ्याच जागा मिळाल्या असत्या कि वाढल्या असत्या ? तेच लोकसभेतही घडण्याची शक्यता आहे(घडेलच असे नाही. आप अजूनही देशस्तरावर डार्क हॉर्स आहे).

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2014 - 12:30 am | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला असे म्हणायचे आहे कि भाजपने यापूर्वी घोडेबाजार केला नाही?

अजिबात नाही. पण यावेळेला केला नाही हि वस्तुस्थिती नाहीये का? आणि पुढे करतील कि नाही हे माहित नाही. पण आआपच्या बाबतीत तरी तुम्ही खात्रीपूर्वक हा दावा कसा करू शकणार?

दुसऱ्या मुद्द्याबद्दल, आपने भाजपला दिल्लीत सत्तेपासून दूर ठेवले हे तुम्हाला मान्य नाही का?

अगदी मान्य आहे. आणि हाच मुद्दा अपेक्षीत आहे. पोपट केला म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती वाटली म्हणून प्रतिवाद केला. याआधीही बऱ्याच लोकांनी दिल्लीत भाजपचे पानिपत झाले असे मूद्दे आणले होते त्याच धर्तीवर तुमचा "पोपट" असेल असे वाटल्यामुळे प्रतिसाद दिला. तसे नसेल तर तुमच्याशी +१ सहमत!

बंडा मामा's picture

26 Jan 2014 - 8:37 am | बंडा मामा

माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि एकांगी झालायं' या प्रतिसादानंतर (ज्यात केजरीवालांची मुलाखत आहे) पोस्ट पुन्हा पेटली. आणि लेखक भावनाविवश झाले,

अहो ते अजूनही म्हणत आहेत, केजरीवाल अनार्की आणतोय आणि तेही अण्वस्त्रधारी देशात वगैरे. वाचले का? मला तर वाचुन हसू येते आहे...हा बदमाश,वेडा,महाचालू,अनार्किस्ट अण्वस्त्र घेऊन येतो आहे! सावध रहा भारतीयांनो, रात्र वैर्‍याची आहे.

केजरीवाल दिल्लीत आणि स्कोर सेटलिंग गल्लीत. :)

विकास's picture

26 Jan 2014 - 2:55 am | विकास

आम आदमी पार्टी आणि केजरीवाल-यादव सगळेच भारतींचे काही चुकले नाही असे म्हणत होते. आता भारती स्वत:च म्हणत आहेतः: AAP's midnight raid: Was not aware of procedures, says Somnath Bharti

पेशाने वकील आणि कायदामंत्री असलेले भारती म्हणत आहेतः "I am not aware of procedures. If I would have known them, I would not have made these alleged mistakes," Mr Bharti said while addressing lawyers on the eve of Republic Day at Saket district courts premises in New Delhi. यावाक्यातली गंमत पहा. स्वतःबद्दलचेच वाक्यः "I would not have made these alleged mistakes" =))

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2014 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

मला राजकारणात रस नाही. देशापुढे असलेले दोन मुख्य प्रश्न (भ्रष्टाचार आणि जातीयवाद) कोण सोडवतो हा सर्वांसारखाच माझा कन्सर्न आहे. मोदींनी गुजराथचा विकास केलायं पण त्यांच्यावर दंगल (हेतूपूर्वक) आवरु न शकल्याचं सावट आहे इतकीच जुजबी माहिती मला होती. अरविंदच्या असेंब्लीतल्या भाषणानं राजकारणापेक्षा प्रश्नावर फोकस करुन ते सोडवणं किती सोपं आहे याची मला कल्पना आली. तो विडिओ मी तीन वेळा अत्यंत लक्षपूर्वक पाहिला...अँड आय गॉट इंटरेस्टेड इन हिज न्यू अप्रोच टू द इश्यू. मुख्य म्हणजे माणूस अत्यंत प्रामाणिक वाटला!

त्यामुळे इथे हा लेख प्रकाशित झाल्यावर मी अरविंदच्या बाजूनं उभा राहिलो.

नाऊ कमिंग टू योर पॉइंट :

वर टाकलेली मोदींची चित्रफित हा तुमचा मोदींच्या भाषणशैलिवर असलेला वैयक्तिक राग व्यक्त करण्यायापलिकडे काहीहि नाही. त्यांनी व्यक्त केलेले कुठले मुद्दे त्यांना चांगला प्रशासक होण्यापासून रोखतात हे जरा सांगाल काय?

जस्ट कंपेअर द टू विडिओज. अरविंदचं असेंब्लितलं भाषण (जिथे बिजेपीनं त्याला पुरता पेचात पकडलाय) आणि तो फक्त प्रश्नावर फोकस करतोयं. ही जस्ट डिफाईन्स `वॉट इज अ कॉमन मॅन' अँड वॉट ही वाँट्स टू डू; दॅट्स ऑल!

आणि अत्यंत लक्षपूर्वक मोदींचा विडिओ बघा. फक्त साडेतीन मिनिटं आहे. मोदींना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मागे देशव्यापी पक्ष उभा आहे. स्वतःची गौरवशाली कारकिर्द आहे. स्टील ही गोज टू द चिपेस्ट लेवल डू डिफेम द अदर!

इतक्या साध्या गोष्टी कुणाच्याही लक्षात येतील :

हजारे आणि केजरीवाल यांच्यात फक्त कार्यपद्धतीबद्दल मतभेद आहे (व्यवस्थे बाहेरुन की व्यवस्थेचा भाग बनून). हजारे व्यवस्थेत उतरायला तयार नाहीत म्हटल्यावर सत्ताप्राप्तीला त्यांच्याकडून काहीच धोका नाही याची प्रत्येक नेत्याला कल्पना आहे. मोदी या परिस्थितीचा किती खालच्या दर्जाला जाऊन विपर्यास करतात ते पाहा:

`केजरीवालांनी हजारेंच्या (भ्रष्टाचारमुक्ती) आंदोलनाच्या पाठीत सुरा खुपसला!' (अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं तर त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी `आंदोलन' हा शब्दप्रयोग केला आहे), `हजारेंच्या (शेजारी बसून) त्यांचाच पायाखालची चादर ओढून घेतली', `हजारेंच्या आंदोलनाची बालहत्या केली!' अशी भडकावू विधानं मोदी करतात जी तद्दन खोटी आहेत.

ही गोज टू दी एक्स्टेंट की आआपानं काँग्रेसचा भ्रष्टाचार करण्याचा हौसला वाढवला. आणि अत्यंत धूर्तपणे म्हणतात की `जो अण्णाके हो न सके वो आपके नही हो सकते'. म्हणजे एका वाक्यात अण्णा आणि केजरीवाल यांच्यात दुही निर्माण करण्याचा आणि जनतेच्या भावनेला हात घालून आपल्याकडे ओढण्याचा दयनीय प्रयत्न! (केजरीवालनी अण्णांना फसवलं तो तुम्हाला ही फसवेल) पब्लिक टाळ्या पिटायला तयार!

आणि वाक्यात चढउतार करत अत्यंत नाटकी अविर्भाव करत म्हणतात :
`काँग्रेस तो `हातसे लूटती थी' ये `झाडू मारके' साफ कर देंगे'

पुढे तर अत्यंत निराधार आणि खोटी विधानं आहेत : `ये काँग्रेसके पैसोंसे चल रहा खेल है!'

आणि शेवट करतांना मकान आणि दुकान असला फालतू अनुप्रास साधून म्हणतात :
`जैसे उन्होंने मकान देनेका वादा करके धोका दिया वैसाही अब ये नयी दुकान खोलके धोका दिया है'

त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटते व तुम्ही सुध्दा आंधळ्या भक्तांच्या यादीत आहात काय अशी शंका यायला जागा देते.

नाही. मी पूर्णपणे पूर्वग्रहरहित आहे. पण मोदींचा अविर्भाव बघता ते अत्यंत दांभिक आहेत आणि सत्ताप्राप्तीसाठी किंवा ती टिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील हे मी नि:संशयपणे सांगू शकतो.

म्हणून मी वरती म्हटलंय : `खरं तर मनमोहनसिंगासारखा अत्यंत नेमस्त गृहस्थ `मोदी पंतप्रधान होणं देशाच्या हिताचं नाही' इतकं ढळढळीत विधान कसं करु शकतो याचं मला ही तो विडिओ पाहण्यापूर्वी आश्चर्य वाटत होतं'

प्यारे१'s picture

26 Jan 2014 - 12:41 pm | प्यारे१

सरजी, आपने और आआप ने तो हमारी आँखे खोल दी!

मोदींना अ‍ॅक्टींग शिकवा रे कुणीतरी!

असेंब्लित अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी (२८ डिसेंबर), अरविंद केवळ काही दिवस हंगामी मंत्रीपदावर होता. त्या दिवशी, आयुष्यात पहिल्यांदा तो असेंब्लित उभा आहे. त्याची राजकीय कारकिर्द आणि पूर्वानुभव शून्य आहे. बिजेपी सदस्यांची तर काही ऐकून घ्यायची तयारी नाही कारण पक्षानं व्हिप काढलायं! (याला म्हणतात राजकारण). आणि कॉंग्रेसनं (ज्यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिम सुरु होण्याचा धोकायं) सपोर्ट करु म्हटलंय. इतक्या बेसहारा परिस्थितीत हा माणूस स्वतःच्या पक्षासाठी बोलायला उभा राहातो आणि इतकं कमालीचं संयत तरीही प्रभावी भाषण करतो.

कुणाविरुद्ध काही तक्रार नाही, कुठलंही राजकीय भाष्य नाही, कसलाही आवेश नाही, जस्ट द मॅनिफेस्टो! याचं एकच कारण - तो प्रामाणिक आहे! त्याला सत्तेपेक्षा तत्वं महत्त्वाचं आहे.

माझ्या पहिल्या प्रतिसादाच्या लिंकमधे फक्त सुरुवातीचा भाग आलायं म्हणून संपूर्ण भाषणाची लिंक देतो. जस्ट लिसन!

आणि याउलट, मोदी गेली कित्येक वर्ष सत्तेत आहेत. बिजेपीसारखा बलाढ्य पक्ष त्यांच्या मागे आहे. ते स्वतः पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झालेत. राजकारणात कमालीचे मुरलेले आहेत. त्यांना केजरीवालची भीती वाटावी? ही डिफेम्स सच अ नोव्हाईस? ज्याला स्वतःच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा अभिमान आहे त्याला खरं तर बोलायचीही गरज नाही कारण त्याचं कार्यच साक्ष आहे. तो फक्त इथून पुढे काय करणार आहे ते जनतेला सांगेल. ही विल जस्ट एक्स्प्लेन हिज मॅनिफेस्टो.

आता मोदींची वर दिलेली लिंक पाहा, जस्ट अ शेम! देशाचा भावी पंतप्रधान या लेवलला येऊ शकतो? इतकी फालतू राजकीय मानसिकता आणि सत्तालोलुपता दाखवू शकतो? अरविंदची दखल घेण्याचं आणि इतकं खोटं आणि नाटकी बोलण्याचं एकच कारण आहे - अरविंदकडे इमानदारी आहे आणि मोदी दांभिक आहेत. त्यांना जनहितापेक्षा पंतप्रधान कधी होतो याची घाई झालीये. अँड दॅट इज द स्प्लिट! `मी देशासाठी काय करु इच्छितो यापेक्षा मला पंतप्रधान करा' या मनाच्या (खर्‍या) पैलूनं उचल खाल्लीये.

मोदी उत्तम विकास कार्य करु शकतात हे गुजराथवरनं सिद्ध झालंय. देशासाठी सुद्धा तसंच कार्य करायची त्यांची आंतरिक सचोटी असती तर पंतप्रधानपद त्यांच्याकडे झक्कत येईल. जी जनता अरविंदसारख्या सामान्य माणसाला रातोरात मुख्यमंत्री बनवते तीच त्यांना एकजुटीनं पंतप्रधानपदी विराजमान करायला किती वेळ लागणारे?

पण जो दांभिक आहे तो आपसूक नाटकी होतो आणि त्या नाटकीपणामुळे सामान्यातला सामान्य माणूस त्याचा मानसिक दुभंग ओळखू शकतो. मला मोदींच्या दांभिकपणाचं दु:खं नाही, या देशाच्या दुर्भाग्याचं वाईट वाटतं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2014 - 2:20 am | हतोळकरांचा प्रसाद

मुद्दा १ : काही मुद्द्यांशी सहमत! मलाही वैयक्तिक मोदींनी त्याप्रकारची कॉंग्रेसला शोभेल अशी टीका करणं आवडत नाही. पण तरीही मला वाटते कि काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अण्णांचं स्वताचं मत याबद्दल कुठल्या बाजूला झुकतं? आणि माझं अजूनही तेच मत आहे कि तुम्ही त्यांचा भाषणशैलीवर आधारित मतं बनवत आहात. त्यांनी केलेली टीका हि अनेक जणांनी केलेली टीका आहे. आणि अण्णांच्या आंदोलनांचा वाजलेला बोऱ्या हि कशाची फलनिष्पत्ती होती असे तुम्हाला वाटते?

मुद्दा २ : तुम्ही मोदींच्या या भाषणाची तुलना केजरिवालांच्या विधिमंडळातल्या भाषणाबरोबर करून कोण विकासाचं कसं चित्र रंगवतंय असं दाखवण्याचा प्रयत्न करताय. केजरिवालांनी त्या भाषणात विरोधकांवर टीका केली नाही आणि राजकीय भाष्य केला नाही याचा अर्थ ते प्रामाणिक असा तुम्ही लावत आहात. पण इतर वेळेस उठ कि सुट इतर राजकीय पक्षांवर पुरावारहित टीका करने प्रामाणिकपणाचे लक्षण आहे काय? कॉंग्रेस आणि भाजप मिले हुये असं म्हणत सरसकट सगळ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या एकाच चष्म्याने पाहणे प्रामाणिकपणाचे आहे काय? ज्या राज्यांचा विकास होतो आहे त्या राज्यांबद्दल प्रामाणिकपाने मान्य करणे संयुक्तिक नाही काय? अगदी गुजरातमधेही भ्रष्टाचार असेल तर त्याचे पुरावे देऊन लोकांसमोर सत्य आणणे जास्त संयुक्तिक नाही काय? कि फक्त टीका करून मोकळे होणे हे इतर "चालू" राजकारण्यांचेच धोरण केजरीवाल घेऊन चालणार आहेत?

आता तुमचं वरचंच विश्लेषण केजरिवालांची चित्रफित आणि मोदींची खालील चित्रफित याची तुलना करून परत मांडाल का?
(कृपया पूर्ण चित्रफित पाहूनच मत मांडावीत कारण यात त्यांनी त्यांचं विकासाचं चित्र मांडलेलं आहे).
मोदींचं विकासाचं चित्र
तुम्ही टाकलेलं मोदींचं वरील भाषण हि दिल्लीतील एक प्रचारसभा आहे. तुलना करायचीच असेल तर ती केजारीवालांच्या खालील चित्रफ़ितिशि करावी. त्यांनीही भाजप कॉंग्रेसवर कुठल्या भाषेत टीका केली आहे, कोणते दावे केले आहेत, त्यातले किती पूर्ण झाले आहेत (त्यांना वेळ मिळावा हे माझेही मत आहे पण मग जनतेला भुलवण्यासाठी अवास्तव घोषणा का? दिल्लीत कॉंग्रेसला हरवण्याची भाजपची औकात नाही, जो कॉंग्रेस या भाजपा को वोट देगा वो देश का गद्दार होगा असे त्यांचे म्हणणे आहे, खोटा मंदिर मुद्दा, पुराव्याविना घातपाताचे आरोप इ.) हे थोडे तपासून पाहावे एवढेच म्हणणे आहे. मला खात्री आहे कि तुम्हाला हे दांभिकपणाचे वाटणार नाही त्याला कारण तुमचा तो "चष्मा". पण मुद्दा एवढाच आहे कि फक्त पुर्वग्रह्रहित आहे म्हणणे आणि तसे वागणे यात फरक आहे. वर विकासजींनी टाकलेल्या अनेक चित्रफितीतील केजरीवालांचा दुटप्पीपणा न जाणवणे हे कशाचे द्योतक आहे? केजरिवाल प्रामाणिक आहेत का नाहीत हे वेळच ठरवेल पण सध्यातरी ते आधीच्या त्यांच्या बऱ्याच दाव्यांना बगल देताना दिसत आहेत. त्यांनी पहिल्या १५ दिवसांत केलेल्या घोषणा या पूर्ण नाहीत असे स्पष्टपणाने न सांगणे हे प्रामाणिकपणाचे आहे असे मला तरी वाटत नाही.
तुलना करायचीच असेल तर या चित्रफ़ितिशि करावी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2014 - 2:32 am | हतोळकरांचा प्रसाद

वरील प्रतिसाद संक्षींच्या मागच्या पानावरील मला उद्देशून असलेल्या पतिसादाबद्दल आहे.

साधारण वीस मिनीटं ऐकू शकलो कारण मोदींचं नेहेमी प्रमाणे, आवाजातले चढ-उतार आणि हातवारे करत:

`मी कामगार आहे म्हणून माझ्याशी (निवडणूक) लढत नाहीत' (त्याच्या आडून लगेच उच-नीचका भाव आणि जातीयवादकडे निर्देश), मग पुढे `कौनसी मां अपने बेटे की बली देगी?' (द सोनिया, मनमोहन अँड राहूल ट्रायो) वगैरे चालू झालं. आय कांट वेस्ट माय टाईम एनी मोर.

साधी गोष्ट आहे, मोदींचं सगळं भाषण `पब्लिक रिस्पॉन्सवर' अवलंबून आहे त्यामुळे त्यांना उगीच लांबलचक आणि कंटाळवाणी भंकस करायला लागते. असा नेता तुम्हाला लखलाभ. कारण हेच राजकारण आपण स्वातंत्रोत्तर काळापासनं पाहात आलोय. आणि जनतेच्या भावनांशी खेळून त्याच तिकीटावर तोच खेळ तुमच्यासारख्या विचारसरणीच्यांना हवाय.

केजरीवालांचा प्रामाणिकपणा आणि मोदींचं नाटकी भाषण यात तुलनाच होऊ शकत नाही. बाकी तुमची मतं तुमच्यापाशी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2014 - 11:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

धन्यवाद आपली मौलिक २० मिनिटे दिल्याबद्दल! आम्ही तुम्हालापण आमचा नेता "लखलाभ" होवो असा आग्रह कधीच धरला नव्हता. म्हणून परत म्हणतो फक्त "आम्ही पुर्वग्रहरहित म्हणण्याने काही होत नाही". आपण एखद्यविरुद्ध राळ (खरंतर गरळ म्हणायला पाहिजे असे वाटते आहे) उठवतो तेव्हा त्याची पूर्ण शहनिशा करून बोलावे. तुमच्या वरील प्रतिसादानंतर मला फक्त एवढेच जाणवले कि आपण बराच वेळ निरर्थक चर्चा केली. पण म्हणणे अजुनन्हि तेच आहे ते भाषण पूर्ण बघा आणि मग या चर्चा करयला. असो, तुमच्या नेत्याचे एकसुरी, भपकेबाज आणि फक्त लोकांना एक भाबडी आशा दाखवून कुठल्याही योजनेविना केलेली पोपटपंची आम्ही ऐकून मते व्यक्त करतो आणि म्हणून कोण खरा दांभिक आहे हे ठरवू शकतो.

आणि तुम्ही परत एकदा सिद्ध केलेत कि तुम्ही फक्त भाषाशैलीवर टीका करत आहत मुद्द्यांवर नाही. असो थांबवु इथेच चर्चा आपण, आपल्या "अमुल्य" प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

संजय क्षीरसागर's picture

28 Jan 2014 - 11:18 am | संजय क्षीरसागर

आपण एखद्यविरुद्ध राळ (खरंतर गरळ म्हणायला पाहिजे असे वाटते आहे) उठवतो तेव्हा त्याची पूर्ण शहनिशा करून बोलावे.

मी शेवटचं सांगतो, तुम्ही फक्त मी दिलेल्या लिंकमधली मोदींची निराधार वक्तव्य जस्टीफाय करुन दाखवा! खरं तर अण्णा आणि अरविंदमधे, मोदीच विष पेरतायंत. तुमच्या लिंकमधे सुद्धा तसलेच नाटकी अविर्भाव आहेत. जर त्यांच्याकडे तगडा मॅनिफेस्टो असेल तर त्यांना लोकांचा अनुनय करण्याची आणि इतक्या खालच्या लेवलवर जाण्याची गरजच नाही. आणि मुख्य म्हणजे भाषणात पाणी घालूनघालून स्वतःकडे लक्ष वेधायची आवश्यकता नाही.

बाय द वे या तीन महत्त्वाच्या घटना :

१) राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात केजरीवाल केंद्रस्थानी (मटा). इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी आणि देशातल्या आणि विदेशातल्या नामंकित आणि बदल घडवू शकणार्‍या व्यक्तींनी अरविंदमधे इंटरेस्ट घेतलायं.

२) अण्णांच्या मध्यस्थीमुळे विनोदकुमार बिन्नींचं धरणं पाच तासात समाप्त. याचा अर्थ अण्णांनाही अरविंदला संधी द्यावी असं वाटतंय (दहा दिवस का होईना).

३) काँग्रेसनं आपचा पाठिंबा तूर्तास काढणार नाही असं जाहिर केलंय. यात काँग्रेसचे काहीही राजकीय डावपेच असोत, आआपाला सत्तेवरनं हलवणं काँग्रेसला सध्या शक्य नाही.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 12:27 pm | प्यारे१

मोदींना चर्चेत कुणी आणलं त्यांनी दहा उठाबशा (खर्‍या) काढा.

वरच्या गोष्टींमध्ये काही गृहीतकं
१. मटा हे सीरियसली वाचण्याचं वृत्तपत्र आहे.
२. अण्णा हजारेंना केजरीवाल मानतात.
३. अण्णांना लार्जर दॅन लाईफ इमेज आहे.
४. अण्णा नि अण्णांचं उपोषण सरकार सीरियसली घेतं.
५. कॉंग्रेस सध्या हतबल आहे.

असो!

@ विकास(शेठ), काही कन्स्ट्रक्टीव्ह करा की हो!
तुम्हाला नसतील कामं. लोकांचा वेळ का घालवताय??? आँ?

संजय क्षीरसागर's picture

28 Jan 2014 - 12:46 pm | संजय क्षीरसागर

चोमडेपणाची सवयं जाईल तर शप्पथ!

१. मटा हे सीरियसली वाचण्याचं वृत्तपत्र आहे.

ती वास्तविक बातमी आहे.

२. अण्णा हजारेंना केजरीवाल मानतात.

दोन्ही आहे. अण्णा केजरीवालांना आणि केजरीवाल अण्णांना मानतात कारण भ्रष्टाचार हटवणं हा समान मुद्दा आहे.

३. अण्णांना लार्जर दॅन लाईफ इमेज आहे.

विनोदकुमार बिन्नींनी अण्णांच ऐकलं यावरनं त्यांच्या शब्दाला किंमत आहे

४. अण्णा नि अण्णांचं उपोषण सरकार सीरियसली घेतं

हा जगाशी संपर्क नसल्याचा उघड पुरावा आहे!

५. कॉंग्रेस सध्या हतबल आहे.

काँग्रेस सपोर्ट काढणार नाही याचा तो अर्थ आहे.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 12:54 pm | प्यारे१

>>> चोमडेपणाची सवयं जाईल तर शप्पथ!
'गेट वेल सून' म्हणण्याशिवाय काहीही बोलू इच्छित नाही.

हे आकाशातल्या बापा, सगळ्यांना सद्बुद्धी दे.

(३०० ची 'जुळणी' केली बरका.)

अनिरुद्ध प's picture

28 Jan 2014 - 1:04 pm | अनिरुद्ध प

प्यारे१ आणि हा माझा ३०० वा प्रतिसाद

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2014 - 12:52 pm | श्रीगुरुजी

>>> मी शेवटचं सांगतो, तुम्ही फक्त मी दिलेल्या लिंकमधली मोदींची निराधार वक्तव्य जस्टीफाय करुन दाखवा!

केजरीवालांची उक्ती आणि कृती यांची तुलना केलीत तर मोदी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे हे नक्कीच लक्षात येईल.

>>> खरं तर अण्णा आणि अरविंदमधे, मोदीच विष पेरतायंत.

हा तुमचा जावईशोध आहे. मोदींना असे करण्याची काहीही गरज नाही आणि अण्णा मोदींच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार्‍यातले नाहीत.

>>> तुमच्या लिंकमधे सुद्धा तसलेच नाटकी अविर्भाव आहेत.

तुमच्या म्हणण्यानुसार कदाचित मोदींचं भाषण नाटकी असेल, पण केजरीवालांसारखी त्यांची कृती नाटकी नाही. उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची हे आपण जाणत असालच.

>>> जर त्यांच्याकडे तगडा मॅनिफेस्टो असेल तर त्यांना लोकांचा अनुनय करण्याची आणि इतक्या खालच्या लेवलवर जाण्याची गरजच नाही. आणि मुख्य म्हणजे भाषणात पाणी घालूनघालून स्वतःकडे लक्ष वेधायची आवश्यकता नाही.

ज्याच्याकडे काहीतरी करण्याची तळमळ आहे, कार्यक्रम आहे आणि करून दाखविण्याचे अधिकार आहेत, त्या व्यक्तीला वीज, पाणी अशा प्रश्नांवर लोकानुनयी निर्णय घेण्याची, रस्त्यावर आंदोलन करून फार्स करण्याची, स्वतःच्या बेताल सहकार्‍यांना पाठीशी घालण्याची आणि मुख्य म्हणजे ज्या पक्षाच्या भ्रष्टाचारात २ वर्षे शंख केला त्याच पक्षाची मदत घेऊन त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्याची गरज होती का?

>>> १) राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात केजरीवाल केंद्रस्थानी (मटा). इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी आणि देशातल्या आणि विदेशातल्या नामंकित आणि बदल घडवू शकणार्‍या व्यक्तींनी अरविंदमधे इंटरेस्ट घेतलायं.

गेल्या वर्षभरात मोदींना भेटण्यासाठी अनेक परदेशी उच्चपदस्थ येऊन गेले आहेत हे कदाचित आपल्याला माहित नसावे.

>>> २) अण्णांच्या मध्यस्थीमुळे विनोदकुमार बिन्नींचं धरणं पाच तासात समाप्त. याचा अर्थ अण्णांनाही अरविंदला संधी द्यावी असं वाटतंय (दहा दिवस का होईना).

अरविंदला संधी देण्यापेक्षा बिन्नीची नाचक्की अण्णांमुळे वाचली असा याचा अर्थ आहे.

>>> काँग्रेसनं आपचा पाठिंबा तूर्तास काढणार नाही असं जाहिर केलंय. यात काँग्रेसचे काहीही राजकीय डावपेच असोत, आआपाला सत्तेवरनं हलवणं काँग्रेसला सध्या शक्य नाही.

आपल्या भ्रष्टाचाराला अभय देण्याच्या बदल्यात काँग्रेसने पाठिंबा दिला आहे हे उघड आहे, कारण पाठिंबा घेतल्यापासून कॉन्ग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध केजरीवाल गप्प आहेत. काँग्रेससारखा बदनाम पक्ष कोणालाही मोबदल्याशिवाय पाठिंबा देत नाही. किंबहुना भाजप सरकार बनविण्याच्या स्थितीत नसताना विधानसभा स्थगित ठेवून राज्यपालांच्या माध्यमातून प्रॉक्सी सरकार चालविण्याची संधी काँग्रेस गमावणे शक्य नव्हते. त्यामुळे कोणत्यातरी जबरदस्त मोबदल्याच्या बदल्यात काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. तो मोबदला कोणता हे सहज लक्षात येते.

विकास's picture

26 Jan 2014 - 7:59 pm | विकास

महाराष्ट्र आप च्या संघटक (कन्वेनर) अंजली दमाणिया म्हणाल्या दाऊद आणि गवळी पण आप ला सहाय्य करू शकतात. अर्थात नंतर आप ने ते वाक्य अप्रत्यक्षपणे मागे घेतले... त्या आधी त्यांनी आपचा विरोध हा काँग्रेसपेक्षा भाजपला राहील असे देखील जाहीर केले आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2014 - 8:58 pm | श्रीगुरुजी

जी मंडळी सत्तेसाठी काँग्रेससारख्या बदनाम पक्षाची मदत घेऊ शकतात, त्यांना तुलनेत दाऊद आणि गवळी सारखे गँगस्टर अगदीच सौम्य वाटणार.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2014 - 8:54 pm | श्रीगुरुजी

>>> जी जनता अरविंदसारख्या सामान्य माणसाला रातोरात मुख्यमंत्री बनवते तीच त्यांना एकजुटीनं पंतप्रधानपदी विराजमान करायला किती वेळ लागणारे?

केजरीवालांना जनतेने खरंच रातोरात मुख्यमंत्री बनवलं? तसं असतं तर त्यांनी ९ डिसेंबरलाच शपथ घेतली असती. पण त्यांचा शपथविधी २८ डिसेंबरला झाला. त्यांना खरोखरच जनतेने रातोरात मुख्यमंत्री बनवलं असतं तर ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध २ वर्षे त्यांनी रान उठवलं त्याच काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची, निकाल लागल्यानंतर काँग्रेसचा पाठिंबा घेउ की नको असे जनतेला विचारत बसण्याची नाटकं करण्याची आणि निकाल लागल्यानंतर तब्बल २० दिवस थांबण्याची काय आवश्यकता होती?

>>> पण जो दांभिक आहे तो आपसूक नाटकी होतो आणि त्या नाटकीपणामुळे सामान्यातला सामान्य माणूस त्याचा मानसिक दुभंग ओळखू शकतो.

केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का?

>>> मला मोदींच्या दांभिकपणाचं दु:खं नाही, या देशाच्या दुर्भाग्याचं वाईट वाटतं.

मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.

केजरीवाल स्वतः काय म्हणतात ते राजदीप सरदेसाईंच्या मुलाखतीत ऐका, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. कॉंग्रेसनं बिजेपी नको म्हणून आपणहून आआपाला पाठिंबा दिलायं आणि तो त्यांनी दिल्लीचं जनमत घेऊन स्विकारलाय. केजरीवाल म्हणतात : `काँग्रेस जर उद्या पाठिंबा काढणार असेल तर आजच काढायला सांगा. आम्हाला काही फरक पडत नाही'.

केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का?

तुम्ही चर्चेत उशीरा सामिल झालात. त्यांच्या आंदोलनात काहीही फार्स नव्हता.

मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.

तुम्ही आतापर्यंत झालेली चर्चा, केजरीवालांचं म्हणणं आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत हे उघड आहे. ऑल ऑफ अ सडन तुम्ही स्वतःचं मत मांडलंय इतकंच. तुमच्या या विधानाला काहीही आधार नाही.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2014 - 1:51 pm | श्रीगुरुजी

>>> केजरीवाल स्वतः काय म्हणतात ते राजदीप सरदेसाईंच्या मुलाखतीत ऐका, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील.

ते काय म्हणतात याला काहीच महत्त्व नाही. त्यांची कृती काय आहे यालाच महत्त्व आहे. उक्तीवरून मी एखाद्या व्यक्तीविषयी भारावून जाऊन मत बनवत नाही. त्याला कृतीची जोड लागते. केजरीवाल ९ डिसेंबरपासून पराकोटीचा नाटकीपणा करत आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार दांभिकतेतूनच नाटकीपणा जन्माला येतो. केजरीवालांचा दांभिकपणा स्पष्ट दिसत आहे.

>>> कॉंग्रेसनं बिजेपी नको म्हणून आपणहून आआपाला पाठिंबा दिलायं आणि तो त्यांनी दिल्लीचं जनमत घेऊन स्विकारलाय.

या दिल्लीच्या जनमताचा खरेखोटेपणा कोणी तपासलाय का? दूरदर्शन वाहिन्यांवर असेच एसेमेस मागवून विजेता ठरवितात. यांच्या एसेमेस मोहिमेत खरे किती, खोटे किती, दिल्लीतून आलेले किती, बाहेरून आलेले किती, एका माणसाने एकच एसेमेस पाठविला का अधिक याची तपासणी झालेली नाही. आपल्याला भाजप पाठिंबा देणार नाही व काँग्रेसने पाठिंबा दिल्यास आपल्याला सत्ता मिळू शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी एसेमेसचे नाटक करून सत्ता मिळविली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध आधी रान उठविताना त्याच पक्षाचा पाठिंबा घेताना यांना काहीही खंत वाटली नाही. काँग्रेसबरोबर पडद्यामागे काय तडजोड झाली असणार ते उघड आहे कारण सत्तेवर आल्यावर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागायला त्यांनी सुरूवात केली.

>>> केजरीवाल म्हणतात : `काँग्रेस जर उद्या पाठिंबा काढणार असेल तर आजच काढायला सांगा. आम्हाला काही फरक पडत नाही'.

पाठिंब्याची जेव्हा खात्री असते तेव्हाच असे लुटुपुटीचे आव्हान दिले जाते. भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला आपचे सरकार सत्तेवर ठेवणे गरजेचे आहे हे केजरीवालांना माहित आहे. म्हणूनच राणा भीमदेवी थाटात अशी लुटुपुटीची आव्हाने दिली जात आहे.

>>>>>> केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का?

>>> तुम्ही चर्चेत उशीरा सामिल झालात. त्यांच्या आंदोलनात काहीही फार्स नव्हता.

त्यांचे हे आंदोलन हा पूर्णपणे फार्स होता. काँग्रेस व आपने एकमेकांसाठी हा फार्स केला. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो अशा स्वरूपाचे हे आंदोलन होते.

>>>>>> मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.

>>> तुम्ही आतापर्यंत झालेली चर्चा, केजरीवालांचं म्हणणं आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत हे उघड आहे. ऑल ऑफ अ सडन तुम्ही स्वतःचं मत मांडलंय इतकंच. तुमच्या या विधानाला काहीही आधार नाही.

हा तुमचा गैरसमज आहे. मी सर्व चर्चा वाचलेली आहे. याच धाग्यावर आधी प्रतिसादही दिलेले आहेत. विश्वास बसत नसेल तर पान क्र. १ पासून वाचून बघा. मी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी धागा उघडला होता. त्यात हे लिहिले होते की ४ राज्यात काँग्रेसचा पराभव व्हावा ही माझी इच्छा आहे. त्यापैकी छत्तीसगड, राजस्थान व म्.प्र. मध्ये भाजप विजयी व्हावा, पण दिल्लीत आपचे सरकार यावे असे मला वाटते. परंतु ८ डिसेंबर पासून केजरीवालांची नाटके बघितल्यावर माझा भ्रमनिरास झाला.

केजरीवाल आणि १९८९ मधील वि.प्र.सिंग यांच्यात कमालीचे साम्य मला आढळते. दोघेही स्वच्छ राजकारणाचा नारा देत होते. दोघांनाही बहुमत न मिळाल्याने इतरांचा पाठिंबा घ्यावा लागला. दोघांनीही सत्तेवर आल्यावर नाटकीपणा करून लोकांचा भ्रमनिरास केला. जे वि.प्र. सिंगांचे झाले, केजरीवाल त्याच मार्गाने निघाले आहेत.

केजरीवाल आणि १९८९ मधील वि.प्र.सिंग यांच्यात कमालीचे साम्य मला आढळते

तुम्ही सगळी राजकीयप्रक्रिया तुमच्या पूर्वानुभवातून पाहता त्यामुळे तुम्हाला नवं काही घडू शकेल असं वाटतंच नाही. आणि ते सहाजिकच आहे. आतापर्यंत इतक्या राजकारण्यांनी देश लुटलाय की कुणी प्रामाणिक असेल याची शक्यताच वाटत नाही. त्याला तुमचा नाईलाज आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2014 - 2:58 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्ही सगळी राजकीयप्रक्रिया तुमच्या पूर्वानुभवातून पाहता त्यामुळे तुम्हाला नवं काही घडू शकेल असं वाटतंच नाही. आणि ते सहाजिकच आहे. आतापर्यंत इतक्या राजकारण्यांनी देश लुटलाय की कुणी प्रामाणिक असेल याची शक्यताच वाटत नाही. त्याला तुमचा नाईलाज आहे.

पुन्हा एकदा तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे. मी प्रत्येक राजकीय प्रक्रीया पूर्वानुभवातून पाहत नाही. प्रत्येकवेळी काहीतरी नवे घडेल, निदान यावेळी तरी काहीतरी नवे आणि चांगले घडेल या आशेवर मी असतो. दिल्लीत 'आप'ला सत्ता मिळावी असे ८ डिसेंबरपर्यंत माझे प्रामाणिक मत होते. परंतु जेव्हा आप व भाजप या दोघांनाही पूर्ण बहुमत मिळाले नाही, तेव्हाच शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यानंतरच्या काळात केजरीवालांच्या नाटकी कृतींमुळे त्यांच्याबद्दल भ्रमनिरास होत गेला आणि केजरीवाल हे दांभिक आहेत याची आता खात्रीच होत चाललेली आहे.

केजरीवालांचा प्रवास बघताना साहजिकच भूतकाळातील साम्य असलेल्या घटना आठवतात. त्यात प्रकर्षाने आठवणारी घटना म्हणजे वि. प्र. सिंगांचा उदयास्त. १९८७ ते १९८९ या २ वर्षात वि. प्र. सिंगांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध युद्ध छेडले होते. हा माणूस आशेची नवी पहाट घेऊन आला होता. अत्यंत तुल्यबळ काँग्रेसविरूद्ध हा एकाकी योध्दा होता. केजरीवालांनीही २०११ ते २०१३ या २ वर्षात अशी आशा जागविली होती. १९८९ च्या निकालात वि. प्र. सिंगांच्या जनता दलाला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. केजरीवालांचे अगदी असेच झाले. पंतप्रधान पदावर पक्षाच्या बैठकीत निवड होण्यासाठी वि.प्र. सिंगांनी अत्यंत अनावश्यक कारस्थाने केली. देवीलालला हाताशी धरून चंद्रशेखरांना अंधारात ठेवून स्वतःची निवड करून घेतली. वास्तविक पक्षाच्या बैठकीत ते चंद्रशेखरांचा पराभव करून सहज निवडून आले असते. पण विनाकारण देवीलालच्या सहाय्याने कारस्थान करून चंद्रशेखरांना तोंडघाशी पाडून ते स्वत: पंतप्रधान झाले. केजरीवालांनी देखील मुख्यमंत्री होण्यासाठी एसेमेस मागविण्याची नाटके केली. एकदा पंतप्रधान झाल्यावर वि.प्र.सिंगांनी पंजाबात उघड्या जीपमधून फिरण्याचे नाटक केले. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर अशीच उघड्य्यावर झोपण्याची नाटके करत आहेत. ज्या बोफोर्स प्रकरणाविरूद्ध सिंगांनी रान उठविले होते, सत्तेवर आल्यावर त्या प्रकरणाचा त्यांना विसर पडला. ज्या शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध केजरीवाल बोलत होते, ते आता गप्प आहेत.

वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. जनतेचा त्यांच्याविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता. केजरीवाल त्याच मार्गाने निघाले आहेत. त्यांचीही राजकीय अख्रेर अशी होऊ नये असे वाटते.

आम आदमी मुख्यमंत्री आणि घटनेचे दिल्लीतले पालक केजरीवाल यांनी प्रजासत्ताकदीनाला ध्वजारोहण केले पण ध्वजवंदन केले नाही.

नंतर दिल्लीच्या प्रजासत्ताक सोहळ्यास आम आदमी बरोबर बसण्याऐवजी व्हिव्हीआयपी साठी राखून ठेवलेल्या कक्षात बसले. (त्यांनी तसेच बसायला हवे असे माझे मत आहे. पण जनतेसमोर म्हणूनच उगाच साधेपणाचे ढोंग करू नये इतकेच म्हणणे आहे).

AK

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2014 - 11:42 pm | संजय क्षीरसागर

आतापर्यंत तुम्हाला स्वतःचं मत बनवता येत असेल अशी कल्पना होती, पण फक्त पुचाट लिंक्स आणि फालतू गोष्टी घेऊन उगीच केजरीवालांविरुद्ध रान उठवणं यापलिकडे तुम्हाला काहीही करता आलं नाही. कधी चहाचा मुद्दा तर कधी टॉयलेटचा तर कधी केजरीवाल कुठे बसलेत याचा फोटो!

मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती. बट दॅट इज बियाँड यू. एकूण परिस्थिती पाहता तुमच्या या लेखावर तुम्ही पूर्णपणे निरुत्तर झालात पण ते मान्य करण्याचा दिलखुलासपणा तुमच्याकडे नाही.

एनी वे, धिस इज माय लिमिट. मला केजरीवालांना सपोर्ट करायचं होतं आणि ते सत्ताभिलाषेची घोडचूक करत नाहीत आणि सामान्यांनसाठी लढतायंत तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करत राहिन. तुमच्या या लेखामुळे मला ती संधी उपलब्ध करुन दिलीत याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. तुमची मतं बदलावीत आशी माझी अपेक्षा नाही आणि माझं मत तुम्ही बदलू शकत नाही.

विकास's picture

27 Jan 2014 - 12:56 am | विकास

तुमच्या या लेखामुळे मला ती संधी उपलब्ध करुन दिलीत याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.

यु वेलकम. :)

पण फक्त पुचाट लिंक्स आणि फालतू गोष्टी घेऊन उगीच केजरीवालांविरुद्ध रान उठवणं यापलिकडे तुम्हाला काहीही करता आलं नाही.

सहमत. पुचाट आणि फालतूच आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच गोष्टींचा वापर करत केजरीवालांची नौटंकी चालू आहे. खरे म्हणजे सुरवातीस त्यांनी पाणी आणि बिजलीवरून मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे जाहीर केल्यानंतर या असल्याच पुचाट गोष्टींवरून ते आक्रस्ताळेपणा करत आहेत आणि जनतेचे लक्ष स्वत:च्या चुकांवरून दुसरीकडे हलवत आहेत.

मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती.
मी ती बघितलीच नव्हती. एकदा का कुठलीही चर्चा दोन पानांच्या पुढे गेली की ट्रॅक करणे अवघड जाते. त्या व्यतिरीक्त हा लेख आणि चर्चा केजरीवाल यांच्यावर होती आणि त्या संदर्भातच माझ्या कडूनराहील. तुम्ही स्वतः अथवा येथील केजरीवालसमर्थक/मोदी विरोधक नवीन चर्चा सुरू करू शकता. तेथे उत्तरे नक्की देईन (अर्थात परत परत दंगलीसंदर्भातील चावून चावून चोथा झालेली चर्चाच परत करत बसलात तर निव्वळ आधीच्या चर्चेचे दुवे देईन). शिवाय आत्ताच वाचल्याप्रमाणे, तुम्ही एका पुढच्या प्रतिसादात, "अ‍ॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो" म्हणले आहात. ते आम्हाला चहा मिळाला, नाही, शौचालय नव्हते, मी कसा साध्या घरात रहाणार असले दांभिक केजरीवाल अ‍ॅक्टींग करून कसे सांगत आहेत ते तुम्हाला कुठेतरी पटले आहे असेच वाटते. असो.

तुमची मतं बदलावीत आशी माझी अपेक्षा नाही आणि माझं मत तुम्ही बदलू शकत नाही.

झोपलेल्याला जागे करता येते, त्यामुळे मी कुणाची मते बदलण्याच्या भानगडीत पडत नाही. पण हा माणूस देशाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे. जर उद्या ते चुकीचे ठरले तर मी ते मान्य करेन. पण जो पर्यंत हा काश्मीर, नक्षलवाद, आदी संदर्भातली देशविघातक मते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे अराजकता ज्याला योग्य वाटतात त्या व्यक्तीकडून दुर्दैवाने जास्त अपेक्षा करता येणार नाही.

तुम्ही म्हणता की केजरीवालांचे साधे रहाणे, गट्स तुम्हाला आवडतात, बाकी राजकारणाचा आणि तुमचा संबंध नाही. साधे रहाणे मला वाटत नाही कारण ते दांभिक आहेत. त्या संदर्भात जरी मी त्यांच्यावर टिका केली असली तरी त्यांचे गट्स मला देखील कौतुकास्पद वाटतात. मात्र हे सगळे आपण चर्चा करतो आहोत कारण ते राजकारणात आहेत म्हणून आणि त्यांच्याकडून एक राजकीय नेतृत्व म्हणून अपेक्षा उंचावल्या होत्या म्हणून. त्यांना जनतेने निवडून दिले आहे ते वरकरणी जरी आधीची सरंजामशाही आणि भ्रष्टाचार दूर करण्यासाठी असले तरी प्रामुख्याने एक चांगला डिसिजनमेकर / शासक मिळेल या आशेन, लाल दिव्याची गाडी नसलेला. साध्या घरात रहाणारा, मफलर गुंडाळून पाताळ धुंडाळणार म्हणून नाही... असो.

करेक्ट! खरं तर केजरीवालांविरुद्ध होती. आणि अपरोक्षपणे मोदी समर्थनार्थ होती. कारण यू वेंट टू द एक्सटेंट :

एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू आहे

फक्त कल्पना करा, अरविंद इथले सदस्य असते तर तुमच्या आयडीची काय गत झाली असती?

आणि आता तुम्ही म्हणतायः

तुम्ही स्वतः अथवा येथील केजरीवालसमर्थक/मोदी विरोधक नवीन चर्चा सुरू करू शकता.

वॉट अ ज्योक! म्हणजे तुम्ही केजरीवालांचं प्रतिमा हनन करा आणि समर्थकांनी वेगळे धागे काढायचे!

मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती:
मी ती बघितलीच नव्हती!

शाब्बास! म्हणजे अजूनही बघितली नाही का? कारण त्याविषयी चकार शब्द नाही. आणि त्या विडिओवरनं मी जो निष्कर्ष काढलायं त्यावरनं प्रतिसाद!

लेखनशैली कॉपी करुन विचारक्षमता येईल आणि मग प्रतिसादाला उत्तर देता येईल ही अपेक्षा वृथा आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जे काही लिहीलंय ते सर्व बाद ठरतं.

झोपलेल्याला जागे करता येते, त्यामुळे मी कुणाची मते बदलण्याच्या भानगडीत पडत नाही.

यालाच तर दांभिकपणा म्हणतात! तुम्हाला केजरीवालांविषयी मतपरिवर्तन घडवायचं नव्हतं तर धागा कशाला काढला?

पण हा माणूस देशाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे.

शाब्बास! मोदींविषयी मनमोहनसिंगसारख्या (राजकारणातून निवृत्ती जाहिर केलेल्या) दिग्गजाचं मत ग्राह्य की तुमचं? अर्थात ते उघड आहे.

पुढे तुम्ही तेच चर्‍हाट पुन्हापुन्हा वळतायं. सो आय क्लोज.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2014 - 1:33 pm | श्रीगुरुजी

>>> शाब्बास! मोदींविषयी मनमोहनसिंगसारख्या (राजकारणातून निवृत्ती जाहिर केलेल्या) दिग्गजाचं मत ग्राह्य की तुमचं? अर्थात ते उघड आहे.

मनमोहन सिंगांसारख्या दिग्गजांची अजून बरीच मते आहेत.

उदा.

१) १९८४ च्या शिखांविरूद्धच्या दंगलीत रा. स्व. संघाचा हात होता.
२) देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा, विशेषतः, मुस्लिमांचा सर्वात पहिला हक्क आहे.
३) मी दुर्बल नाही.
४) राहुलमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण एकवटले आहेत.
५) (ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या मुस्लिम तरूणाला दहशतवादाच्या आरोपावरून अटक झाल्यावर) त्याच्या काळजीने मी रात्रभर झोपू शकलो नाही.
६) २जी, कोळसा वाटप इ. प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.

आता याच दिग्गजांनी "मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक आहे" अशी आकाशवाणी केली आहे. वरील वाचाळ वक्तव्ये आणि हे नवीन अशोभनीय वक्तव्य एकाच माळेतले आहे. या दिग्गजांचं हे मत ग्राह्य धरायचं तर मग वरील वक्तव्यंही ग्राह्य धरावी लागतील.

स्वतःच्या १० वर्षांच्या अत्यंत विघातक राजवटीपेक्षा जास्त विघातक दुसर्‍या कोणाची राजवट असूच शकणार नाही हे यांच्या लक्षात कसे येत नाही?

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2014 - 2:09 pm | संजय क्षीरसागर

मनमोहनसिंगांची इतर विधानं निराधार >म्हणून त्यांचं मोदींविषयीचं ते विधान निराधार> आणि म्हणून माझा निष्कर्ष चूक!

इट इज द अदर वे, मोदी सत्ताभिलाषी आहेत आणि ती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते काहीही करु शकतात हा त्यांच्या भाषणाचा अर्थ आहे. (मागच्या पानावर विडिओ लिंक दिलीये).

आणि मनमोहनसिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाला तेच म्हणतायंत. इट इज जस्ट अ कन्फर्मेशन ऑफ माय कन्क्लूजन. यू वेंट द राँग वे.

तुम्ही फक्त एक प्रूव्ह करा, मोदी जर इतके थोर आहेत तर फक्त महिनाभर सुद्धा झाला नाही अश्या मुख्यमंत्र्यावर त्यांना इतके खालच्या पातळीवर जाऊन आरोप का करावे लागतात? (विडिओ पाहा)

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2014 - 3:12 pm | श्रीगुरुजी

>>> मनमोहनसिंगांची इतर विधानं निराधार >म्हणून त्यांचं मोदींविषयीचं ते विधान निराधार> आणि म्हणून माझा निष्कर्ष चूक!

मनमोहन सिंगांची सर्वच विधाने निराधार असतात. त्यामुळे मोदींविषयीचे त्यांचे खोडसाळ विधान अपवाद असण्याची शक्यता शून्य आहे.

>>>> इट इज द अदर वे, मोदी सत्ताभिलाषी आहेत आणि ती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते काहीही करु शकतात हा त्यांच्या भाषणाचा अर्थ आहे. (मागच्या पानावर विडिओ लिंक दिलीये).

सत्ताभिलाषी असणे यात काहीही चूक, बेकायदेशीर किंवा घटनाविरोधी नाही. केजरीवालसुद्धा सत्ताभिलाषी आहेत आणि म्हणूनच काँग्रेसचा पाठिंबा घेताना त्यांना जराही खंत वाटली नाही. पण सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मोदी काहीही करू शकतात म्हणजे काय करू शकतात? ते गेली १२ वर्षे घटनात्म्क व कायदेशीर मार्गाने मुख्यमंत्री आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये चांगला विकास होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मोदी केजरीवालांसारखी एसेमेस मागविण्याची व आपल्या विरोधी पक्षाकडून पाठिंबा मिळवून त्या बदल्यात त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याची अनैतिक व नाटकी कृत्ये करत नाही.

>>>> आणि मनमोहनसिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाला तेच म्हणतायंत. इट इज जस्ट अ कन्फर्मेशन ऑफ माय कन्क्लूजन. यू वेंट द राँग वे.

अ‍ॅक्च्युअली यू वेंट द राँग वे. मनमोहन सिंगांच्या बरळण्याला तुम्ही विनाकारण महत्त्व दिलेत.

>>> तुम्ही फक्त एक प्रूव्ह करा, मोदी जर इतके थोर आहेत तर फक्त महिनाभर सुद्धा झाला नाही अश्या मुख्यमंत्र्यावर त्यांना इतके खालच्या पातळीवर जाऊन आरोप का करावे लागतात? (विडिओ पाहा)

ते खालच्या पातळीवर गेलेले नाहीत. तुमचा तसा गैरसमज झालेला आहे. तुम्ही आंधळेपणाने केजरीवालभक्तीचा चष्मा डोळ्यांवर चढविल्याने तुम्हाला तसे वाटत आहे. ज्याला पदावर येऊन एक महिनासुद्धा झाला नाही अशा माणसाने पहिल्या दिवसापासून नौटंकी सुरू करून अप्रामाणिकपणा केल्यावर त्याच्यावर टीका होणारच. त्याचे कौतुक होण्याची अपेक्षाच ठेवू नका. सुशीलकुमार शिंदे तर केजरीवालांना "वेडा" म्हणाले. सोमनाथ भारती अत्यंत बहकल्यासारखे वागत आहेत आणि केजरीवाल त्यांना पाठीशी घालत आहेत. अशा माणसावर, केवळ तो नवीन आहे म्हणून टीका न करता त्याचे कौतुक करायचे का?

अवांतर - वास्तविक पाहता मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू आहेत. गेली १२ वर्षे मोदींविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरून हीन प्रचार सुरू आहे हे तुम्हाला मान्य व्हावे.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2014 - 10:19 pm | संजय क्षीरसागर

तुमचा तसा गैरसमज झालेला आहे?

तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही, फक्त सरळसोट, निराधार विधानं करता येतात. जी साडेतीन मिनिटांची लिंक आहे त्यातलं मोदींचं बोलणं तुम्ही जस्टीफाय करु शकत नाही. एकच सांगतो, जर हातोळकरांनी दिलेली लिंक वीस मिनीटातच इतकं काही सांगून जाते तर पूर्ण लिंकवर मी लिहायला घेतलं तर तुमच्या आदरस्थानावर फार अनर्थ ओढवेल. पण खालच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, इथे थांबतो.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही, फक्त सरळसोट, निराधार विधानं करता येतात. जी साडेतीन मिनिटांची लिंक आहे त्यातलं मोदींचं बोलणं तुम्ही जस्टीफाय करु शकत नाही. एकच सांगतो, जर हातोळकरांनी दिलेली लिंक वीस मिनीटातच इतकं काही सांगून जाते

तुम्हाला वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून फक्त इतरांविषयी चुकीचे निष्कर्ष काढता येतात. मला प्रतिवाद करता येत नाही हा माझ्याविषयीचा चुकीचा निष्कर्ष किंवा विकास निरूत्तर झालेत हा त्यांच्याविषयीचा चुकीचा निष्कर्ष हे याचेच निदर्शक आहे.

केजरीवाल ८ डिसेंबरपासून जे विचित्र वागत आहेत त्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोणी काहीही प्रतिसाद दिला तरी तुमचं एकच टुमणं, केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा, एवढाच तुमचा युक्तीवाद. केजरीवाल भाषणात किंवा मुलाखतीत काय बोलतात याला फारसे महत्त्व नाही. पण त्यांची कृती काय आहे यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. २ वर्षे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध शंखनाद केल्यावर अचानक यूटर्न घेऊन त्याच पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार बनविणे व त्याच्या मोबदल्यात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला अभय देणे या त्यांच्या कृतीत तुम्हाला काहीही वावगे वाटलेले नाही. ही विसंगती निदर्शनास आणून दिल्यावर तुमचा प्रतिसाद असतो की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. केजरीवालांनी एसेमेस मागविण्याची नाटके केली हे दाखवून दिले असता तुमचा प्रतिसाद होता की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. सोमनाथ भारती अत्यंत बेताल वागत आहेत आणि पोलिसात त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल झालेला आहे. तरीसुद्धा केजर्रीवाल त्यांचे समर्थन करत आहेत. ही विसंगती दिसत असताना तुमचा प्रतिसाद म्हणजे केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. रस्त्यावर बसून केजरीवालांनी जी नौटंकी केली ती निंदनीय आहे हे दिसत असताना सुद्धा तुमचा प्रतिसाद होता की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा.

ते काय बोलतात याला काय महत्त्व आहे? त्यांची कृती त्यांच्या उक्तीशी पूर्ण विसंगत आहे. पण अशी विसंगती दाखवून दिली तरी तुमचा प्रतिसाद म्हणजे केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. धन्य आहे तुमची!

>>> तर पूर्ण लिंकवर मी लिहायला घेतलं तर तुमच्या आदरस्थानावर फार अनर्थ ओढवेल. पण खालच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, इथे थांबतो.

मोदींच्याविरूद्ध लिहिताना तुमचा प्रतिसाद म्हणजे मोदींच्या भाषणाची लिंक बघा आणि आदरणीय परमपूजनीय मनमोहन सिंग त्यांच्याबद्दल काय बोललेत ते बघा. मनमोह्न सिंगांचे अत्यंत अशोभनीय बरळणे हा तुमच्या मोदीविरोधाचा आधार. त्याचे तुम्हाला कौतुक. पण मोदींनी केजरीवालांवर केलेली टीका मात्र तुम्हाला सहन होत नाही.

असो. त्या पूर्ण लिंकवर तुम्हाला लिहायचे असेल तर जरूर लिहा. तुमच्यासारख्यांच्या लेखनामुळे आमच्या आदरस्थानावर कोणताही अनर्थ ओढवत नाही. गेली १२ वर्षे अनेकजण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदींवर टीका करत आहेत. त्या वाचाळांमध्ये काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंग आणि काल राहुल पण सामील झाला. या दिग्गजांपुढे तुम्ही किस झाड की पत्ती. तेव्हा संकोच न करता जरूर लिहा.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 1:29 pm | प्यारे१

श्रीगुरुजींचा (आयडी एका व्यक्तीची आठवण करुन देत असल्यानं) सौम्य णिषेढ!

आता विचारा णिषेढ का ?
तर...

मनमोहन सिंग आणि काल राहुल पण सामील झाला. या दिग्गजांपुढे तुम्ही किस झाड की पत्ती.

ह्या वाक्याबद्दल निषेध. आम्ही आमच्या सरांना काही पण म्हणू पण म्हणून म मो किंवा विशेषतः राहुल ह्यांना दिग्गज नि त्यांच्या तुलनेत आमचे सर 'कि झा प' नामंजूर....

खरंतर जोर्दार णि षे ढ करनार होतो पण जौ द्या!

रमेश आठवले's picture

27 Jan 2014 - 2:40 pm | रमेश आठवले

आत्तापर्यंत २८४ साद- प्रतिसाद या विषयावर आले आहेत. गंभीर आणि विस्तृत चर्चा झाल्या आहेत. सगळे प्रतिसाद व्यवस्थित वाचले नसल्या मुळे मी खाली मांडत असलेलेला मुद्दा चर्चेत आला की नाही हे नक्की सांगता येत नाही --
उप राज्यपाल नजीब जंग यांनी 'आप' चे बौद्धिक नेते योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा सम्पल्यावर , त्यांना केजरीवाल यांच्यासाठी गरम परोठे बांधून दिले आणि ही लाच खाल्या नंतरच केजरीवाल यांनी धरणा मागे घेतला असे वाचनात आले आहे.
दुसरी अशीच हलकी फुलकी गोष्ट
अर्थ मंत्री चिदम्बरम यांनी davos येथील एका मुलाखतीत त्याना आलेल्या एका sms ची माहिती दिली. त्यात असा मजकूर होता
भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला सांगितले - do your धर्मा
केजरीवाल यांना मात्र भगवंतांनी सांगितले- do your धरणा