शंका निरसन.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
22 Feb 2013 - 7:38 pm

"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह."
तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?"
"HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो माणसाच्या शरिरात शिरला की त्याची इम्युन सिस्टिम हळू हळू निकामी करतो."

"म्हणजे व्हायरस काँप्युटर सारखा आपल्या शरीरातही शिरतो?" काहीसा अचंबीत चेहेरा करत लेक विचारती झाली.
"अगं व्हायरस म्हणजे जंतू, जे शरीरात शिरले की आरोग्य बिघडतं. काँप्युटरचं ही तसच असत पण त्यात काही खरे जीव-जंतू जात नाही. तो एक प्रकारचा प्रोग्रॅम असतो, ज्यामुळे काँप्युटर बिघडतो. म्हणुन त्याला ही व्हायरस ची लागण झाली म्हणतात.

"HIV खूप डेंजरस असतो ना गं? कधीच बरा नाही होत ना तो? कसा होतो?" पुन्हा चेहेर्‍यावर चिंतेचे ढग जमायला लागले होते.
"हो बाळा, अजुन तरी त्याच्यावर औषध सापडलं नाही. पण जगभरात सगळीकडे त्यावर काम चालू आहे. पुढे मागे शोध लागतीलच त्याच्या वरच्या औषधांचे.
कसा होतो म्हणशील तर मुख्यकरून बॉडी फ्लूईड्स मधून तो पसरतो. जसं की समजा एखाद्या माणसाला अपघात झाला, त्याला रक्त द्यायचं असेल आणि त्याला जर एखाद्या HIV पॉझिटिव्ह माणसाचं रक्त दिलं तर त्यातून त्याला HIV होऊ शकतो. तसच बाळ पोटात असताना आईला जर HIV असेल तर बाळालाही HIV होऊ शकतो. किंवा बाळ लहान असताना HIV पॉझिटिव्ह आईच्या दुधातूनही बाळाला HIV होऊ शकतो." (सध्या तशी लहान असल्याने प्रसार होण्याच मुख्य कारण सांगायचं टाळलं.)
"एक प्रकारे कंटेजियस असला तरी ईतर सर्दी-तापा पसरत नाही. शेक हँड केल्याने एकत्र डबा खाल्ल्याने, खेळल्याने होत नाही."

"हो, टिव्हीवरच्या अ‍ॅडमध्येही तसचं दाखवलंय खरं" थोडसं हसू गालावर खेळवत लेक म्हणाली.

टिव्हीवर मागे जाहिरात लागली होती, HIV पॉझिटिव्ह गर्भवती बायकांनी वेळच्यावेळी औषधोपचार केले तर होणार्‍या बाळाला HIVची लागण होण्यापासुन वाचवता येते. बहुतेक ती जाहिरात पाहूनच मनात विचारांच जाळं गुंफलं गेलं असावं.
कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं थोडंच रहातं. मुलं मोठी होताना अनेक शंकाकुशंकांनी घेरलेली असतात. योग्यवेळी त्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. काय म्हणता?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

22 Feb 2013 - 7:41 pm | रेवती

बाबौ! गणपा, तुझी लेक भारी भारी प्रश्न विचारते बुवा!

कधी काय विचारेल ह्याचा नेम नाही.तरी तुम्ही तिच्या शंका निरसन अगदी योग्य प्रकारे करता. ह्यामुळे आम्हाला पण पोरांच्या बरोबर कसे वागले पाहिजे हे कळते.धन्यवाद गणपा शेठ.

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:42 pm | नाना चेंगट

गणपा तुझी लेक बुद्धीच्या बाबतीत तिच्या आईवर गेली आहे असे दिसते.

गणपा's picture

22 Feb 2013 - 7:47 pm | गणपा

शंकाच नाही.
आम्ही तिच्या वयाचे असताना निव्वळ माठ होतो आणि अजुनही आहोत यात दुमत नाही. :)

विकास's picture

22 Feb 2013 - 10:40 pm | विकास

आम्ही तिच्या वयाचे असताना निव्वळ माठ होतो

आणि आता? ;) (ह. घे. रे!)

बाकी प्रश्न विचारणे ही आत्ताची स्टेज आहे. अजून थोडी मोठी झाल्यावर आपण प्रश्न न विचारताच उत्तरे पण सांगता येऊ लागतात तेंव्हा कौतुकही वाटते आणि काळजी देखील! :-)

+१००, अजून थोडी मोठी झाल्यावर आपण प्रश्न न विचारताच उत्तरे पण सांगता येऊ लागतात तेंव्हा कौतुकही वाटते आणि काळजी देखील! - सध्या माझा लेक याच स्टेज मध्ये आहे, आणि बहुतेक वेळा टिव्हीचा रिमोट ढिम्म काम करत नाही, असो.

शुचि's picture

22 Feb 2013 - 7:51 pm | शुचि

खरच हुषार आहे लेक.

लेकीपेक्षा आई-बाबांचं कौतुक जास्त... सर्व प्रश्नांना न डगमगता उत्तरे देत असल्याबद्दल !

अर्धवटराव's picture

22 Feb 2013 - 10:50 pm | अर्धवटराव

गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ पालकत्वाचे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 3:03 am | दादा कोंडके

सहमत. हुशार मुलगी आणि सुज्ञ पालक, तुम्हा तिघांचही जाम कौतुक वाटतं. येउद्या असेच रोजचेच छोटे-छोटे अनुभव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ पालकत्वाचे
उत्तम उदाहरण म्हणावं लागेल

सहमत. नै तर आम्ही, गप्प बैस असं म्हणलो असतो.

चिगो's picture

23 Feb 2013 - 9:43 am | चिगो

हेच म्हणतो.. बढीया, गणपाभाऊ आणि वैनी..

(आणखी काही वर्षांतच असल्या प्रश्नांना तोंड देण्याची तयारी करत असलेला) चिगो..

तर्री's picture

22 Feb 2013 - 9:41 pm | तर्री

सहसा मुलांना काही समजले नाही असे प्रश्न "वाह्यातपणात " मोडू शकतात एवढे समजून अनेकदा गप्प बसतात. तुमची मुलगी प्रश्न विचारते - कुटुंबात म्हणजे सुसंवाद आहे.
कौतुकास्पद !

पैसा's picture

22 Feb 2013 - 10:02 pm | पैसा

सौ. गणपा चे जास्तच!

लौंगी मिरची's picture

22 Feb 2013 - 10:30 pm | लौंगी मिरची

लहान मुले छान प्रश्न विचारतात पण कधी कधी उत्तरे देणे अवघड होऊन बसते .माझा मोठा मुलगा ७ वर्षांचा आहे . त्याला हिंदी समजत नाहि , मराठितले बरेचसे
नविन ( त्याच्यासाठी ) आणि अवघड शब्द समजत नाहित . पण आम्हि बर्‍याचदा त्याच्यासाठी इंग्लिश भाषांतर उपलब्ध असलेले हिंदी चित्रपट बघतो .
असाच एक चित्रपट पहात असताना .. हिरोला एक साइड हिरो हिरोइनवर झालेल्या
अत्याचाराबद्दल सांगत होता .. त्याचा इंग्रजी अनुवाद ह्याने वाचला ( तो सगळे हिंदी , मराठी चित्रपट खालच्या इंग्रजी ओळी देत असतिल तरच बघतो , अन्यथा नाहि )
आम्हि सगळे पिच्चर पहाण्यात मग्न होतो इतक्यात " ममा रेप मीन्स ? " असा प्रश्न आला ,आणि काय उत्तर द्यावं कळेच ना . तरि मी चेहेर्‍यावरचे भाव अजिबात न बदलु देता ..
रेप म्हणजे एखाद्याच्या मनाविरुद्ध वागणे , त्याला आपल्या मनासारखं वागण्यासाठी फोर्स करणे .तर पटकन म्हणाला " म्हणजे माझ्यावर अभ्यासाच्या बाबतित जे घडतं तेच का ? "

यावर हसण्यावारी नेलं .. पण काहितरी उत्तर द्यावच लागतं नाहितर मग हा शब्द लक्षात ठेवुन डीक्शनरीत शोधत बसतो , नाहितर गूगलवर अर्थ शोधतो , शेवटचा पर्याय म्हणुन शाळेत टीचरला विचारतो .एक गोष्ट आहे कि कुठलिहि शंका ताबडतोब विचारतो ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं .

( अवांतर : स्मायली कसे टाकायचे )

स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त अंतर ठेवू नका. तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आहे.
:)
माझ्या मुलाने 'शीला की जवानी' म्हणजे काय हा प्रश्न दोनदा विचारून झालाय. काय उत्तर द्यावं हे समजत नाहीये.
;)

लौंगी मिरची's picture

22 Feb 2013 - 10:37 pm | लौंगी मिरची

धन्यवाद रेवती :)

तुषार काळभोर's picture

23 Feb 2013 - 9:23 am | तुषार काळभोर

त्याला समजावा की गाणं असं आहे:
माय नेम इज शीला... शीला कीजवाणी... (ललवाणी, मालपाणी, आडवाणी या धर्तीवर)

नाही हो पैलवानजी, इतकं सोपं असतं का! माझ्याआधी त्यानं ते गाणं पाहिलं त्याच्या मित्राकडे, तसंच एक गन्ग्नॅम स्टाईल की काहीतरी पाहिलं. शीलाच्या गाण्यात काही इंग्लीश वाक्ये आहेत ती लगेच समजली त्यामुळे लपवालपवी फारशी करता येत नाही. ललवाणी, मालपाणी वगैरे सांगताना याचा एक मित्र याच आडनावाचा आहे. उगीच "काय रे तुमच्याकडे कीजवाणी असे लास्ट नेम असते का?" असे विचारून डोक्याला आणखी व्याप होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2013 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेप म्हणजे एखाद्याच्या मनाविरुद्ध वागणे , त्याला आपल्या मनासारखं वागण्यासाठी फोर्स करणे

मराठी-इंग्लिशमधली १५-३५ वयाच्या लोकांची स्लँग तपासलीत तर अशाच अर्थाने बलात्कार/रेप हा शब्द वापरला जातो असं लक्षात येईल. पण निर्जीव वस्तूंवरही बलात्कार होतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ कुवतीपेक्षा अधिक काम देणे असा होतो. "मेंदूवर बलात्कार"मधेही अशीच अर्थछटा अभिप्रेत असते.

गणपा, गुड लक तुम्हां दोघांना.

महेश भट्ट्च्या जवळ आलेल्या लोकांची बुध्दी का कुणास ठावुक काम देत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 2:24 am | विश्वनाथ मेहेंदळे

नाहितर गूगलवर अर्थ शोधतो

आयला, कठीण आहे. कमी वयात नको त्या विषयांचे exposure अडवायचे कसे ?

लौंगी मिरची's picture

23 Feb 2013 - 10:50 pm | लौंगी मिरची

खरय विश्वनाथ , शाळेतच कंप्युटर विषय शिकवला जात असल्याने कसा हाताळायचा ते सगळं कळतं , त्यामुळे घरी जमेल तेवढं लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय सद्ध्यातरि काहि दिसत नाहि आहे .

आदिती सहमत .

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 11:03 pm | अभ्या..

:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 2:25 am | विश्वनाथ मेहेंदळे

सध्या तशी लहान असल्याने प्रसार होण्याच मुख्य कारण सांगायचं टाळलं.

थोडी मोठी असती आणि तुम्ही नसते सांगितले तर तिनेच सांगितले असते कदाचित.

यावरून अनेक विनोद आठवले. इथे सांगता येनार नाहीत. या खवत ;-)

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 5:15 am | स्पंदना

कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं थोडंच रहातं. मुलं मोठी होताना अनेक शंकाकुशंकांनी घेरलेली असतात. योग्यवेळी त्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. काय म्हणता?

+१

अशा लहान वयात लेकीने आईबददल जी काळ्जी दाखवली ती कौतुकास्पद आहे
पण इतक्या लहान वयात मुलांच्या शंकेचे निरसण करणे कठीण आहे.... उत्तम उदाहरण