✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शंका निरसन.

ग
गणपा यांनी
Fri, 02/22/2013 - 19:38  ·  लेख
लेख
"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह." तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?" "HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो माणसाच्या शरिरात शिरला की त्याची इम्युन सिस्टिम हळू हळू निकामी करतो." "म्हणजे व्हायरस काँप्युटर सारखा आपल्या शरीरातही शिरतो?" काहीसा अचंबीत चेहेरा करत लेक विचारती झाली. "अगं व्हायरस म्हणजे जंतू, जे शरीरात शिरले की आरोग्य बिघडतं. काँप्युटरचं ही तसच असत पण त्यात काही खरे जीव-जंतू जात नाही. तो एक प्रकारचा प्रोग्रॅम असतो, ज्यामुळे काँप्युटर बिघडतो. म्हणुन त्याला ही व्हायरस ची लागण झाली म्हणतात. "HIV खूप डेंजरस असतो ना गं? कधीच बरा नाही होत ना तो? कसा होतो?" पुन्हा चेहेर्‍यावर चिंतेचे ढग जमायला लागले होते. "हो बाळा, अजुन तरी त्याच्यावर औषध सापडलं नाही. पण जगभरात सगळीकडे त्यावर काम चालू आहे. पुढे मागे शोध लागतीलच त्याच्या वरच्या औषधांचे. कसा होतो म्हणशील तर मुख्यकरून बॉडी फ्लूईड्स मधून तो पसरतो. जसं की समजा एखाद्या माणसाला अपघात झाला, त्याला रक्त द्यायचं असेल आणि त्याला जर एखाद्या HIV पॉझिटिव्ह माणसाचं रक्त दिलं तर त्यातून त्याला HIV होऊ शकतो. तसच बाळ पोटात असताना आईला जर HIV असेल तर बाळालाही HIV होऊ शकतो. किंवा बाळ लहान असताना HIV पॉझिटिव्ह आईच्या दुधातूनही बाळाला HIV होऊ शकतो." (सध्या तशी लहान असल्याने प्रसार होण्याच मुख्य कारण सांगायचं टाळलं.) "एक प्रकारे कंटेजियस असला तरी ईतर सर्दी-तापा पसरत नाही. शेक हँड केल्याने एकत्र डबा खाल्ल्याने, खेळल्याने होत नाही." "हो, टिव्हीवरच्या अ‍ॅडमध्येही तसचं दाखवलंय खरं" थोडसं हसू गालावर खेळवत लेक म्हणाली. टिव्हीवर मागे जाहिरात लागली होती, HIV पॉझिटिव्ह गर्भवती बायकांनी वेळच्यावेळी औषधोपचार केले तर होणार्‍या बाळाला HIVची लागण होण्यापासुन वाचवता येते. बहुतेक ती जाहिरात पाहूनच मनात विचारांच जाळं गुंफलं गेलं असावं. कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं थोडंच रहातं. मुलं मोठी होताना अनेक शंकाकुशंकांनी घेरलेली असतात. योग्यवेळी त्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. काय म्हणता?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12855 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

बाबौ! गणपा, तुझी लेक भारी

रेवती
Fri, 02/22/2013 - 19:41 नवीन
बाबौ! गणपा, तुझी लेक भारी भारी प्रश्न विचारते बुवा!
  • Log in or register to post comments

तुमची पोरगी एक कोडेच आहे.

वेताळ
Fri, 02/22/2013 - 19:42 नवीन
कधी काय विचारेल ह्याचा नेम नाही.तरी तुम्ही तिच्या शंका निरसन अगदी योग्य प्रकारे करता. ह्यामुळे आम्हाला पण पोरांच्या बरोबर कसे वागले पाहिजे हे कळते.धन्यवाद गणपा शेठ.
  • Log in or register to post comments

गणपा तुझी लेक बुद्धीच्या

नाना चेंगट
Fri, 02/22/2013 - 19:42 नवीन
गणपा तुझी लेक बुद्धीच्या बाबतीत तिच्या आईवर गेली आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

शंकाच नाही.

गणपा
Fri, 02/22/2013 - 19:47 नवीन
शंकाच नाही. आम्ही तिच्या वयाचे असताना निव्वळ माठ होतो आणि अजुनही आहोत यात दुमत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

?

विकास
Fri, 02/22/2013 - 22:40 नवीन
आम्ही तिच्या वयाचे असताना निव्वळ माठ होतो
आणि आता? ;) (ह. घे. रे!) बाकी प्रश्न विचारणे ही आत्ताची स्टेज आहे. अजून थोडी मोठी झाल्यावर आपण प्रश्न न विचारताच उत्तरे पण सांगता येऊ लागतात तेंव्हा कौतुकही वाटते आणि काळजी देखील! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१००, अजून थोडी मोठी झाल्यावर

५० फक्त
Sat, 02/23/2013 - 09:14 नवीन
+१००, अजून थोडी मोठी झाल्यावर आपण प्रश्न न विचारताच उत्तरे पण सांगता येऊ लागतात तेंव्हा कौतुकही वाटते आणि काळजी देखील! - सध्या माझा लेक याच स्टेज मध्ये आहे, आणि बहुतेक वेळा टिव्हीचा रिमोट ढिम्म काम करत नाही, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खरच हुषार आहे लेक.

शुचि
Fri, 02/22/2013 - 19:51 नवीन
खरच हुषार आहे लेक.
  • Log in or register to post comments

लेकीपेक्षा आई-बाबांचं कौतुक

सस्नेह
Fri, 02/22/2013 - 19:59 नवीन
लेकीपेक्षा आई-बाबांचं कौतुक जास्त... सर्व प्रश्नांना न डगमगता उत्तरे देत असल्याबद्दल !
  • Log in or register to post comments

+१००

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 22:50 नवीन
गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ पालकत्वाचे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+१०००

दादा कोंडके
Sat, 02/23/2013 - 03:03 नवीन
सहमत. हुशार मुलगी आणि सुज्ञ पालक, तुम्हा तिघांचही जाम कौतुक वाटतं. येउद्या असेच रोजचेच छोटे-छोटे अनुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/23/2013 - 08:47 नवीन
गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ पालकत्वाचे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल सहमत. नै तर आम्ही, गप्प बैस असं म्हणलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

चिगो
Sat, 02/23/2013 - 09:43 नवीन
हेच म्हणतो.. बढीया, गणपाभाऊ आणि वैनी.. (आणखी काही वर्षांतच असल्या प्रश्नांना तोंड देण्याची तयारी करत असलेला) चिगो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मुलगी प्रश्न विचारते -

तर्री
Fri, 02/22/2013 - 21:41 नवीन
सहसा मुलांना काही समजले नाही असे प्रश्न "वाह्यातपणात " मोडू शकतात एवढे समजून अनेकदा गप्प बसतात. तुमची मुलगी प्रश्न विचारते - कुटुंबात म्हणजे सुसंवाद आहे. कौतुकास्पद !
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Fri, 02/22/2013 - 22:02 नवीन
सौ. गणपा चे जास्तच!
  • Log in or register to post comments

प्रश्न.

लौंगी मिरची
Fri, 02/22/2013 - 22:30 नवीन
लहान मुले छान प्रश्न विचारतात पण कधी कधी उत्तरे देणे अवघड होऊन बसते .माझा मोठा मुलगा ७ वर्षांचा आहे . त्याला हिंदी समजत नाहि , मराठितले बरेचसे नविन ( त्याच्यासाठी ) आणि अवघड शब्द समजत नाहित . पण आम्हि बर्‍याचदा त्याच्यासाठी इंग्लिश भाषांतर उपलब्ध असलेले हिंदी चित्रपट बघतो . असाच एक चित्रपट पहात असताना .. हिरोला एक साइड हिरो हिरोइनवर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगत होता .. त्याचा इंग्रजी अनुवाद ह्याने वाचला ( तो सगळे हिंदी , मराठी चित्रपट खालच्या इंग्रजी ओळी देत असतिल तरच बघतो , अन्यथा नाहि ) आम्हि सगळे पिच्चर पहाण्यात मग्न होतो इतक्यात " ममा रेप मीन्स ? " असा प्रश्न आला ,आणि काय उत्तर द्यावं कळेच ना . तरि मी चेहेर्‍यावरचे भाव अजिबात न बदलु देता .. रेप म्हणजे एखाद्याच्या मनाविरुद्ध वागणे , त्याला आपल्या मनासारखं वागण्यासाठी फोर्स करणे .तर पटकन म्हणाला " म्हणजे माझ्यावर अभ्यासाच्या बाबतित जे घडतं तेच का ? " यावर हसण्यावारी नेलं .. पण काहितरी उत्तर द्यावच लागतं नाहितर मग हा शब्द लक्षात ठेवुन डीक्शनरीत शोधत बसतो , नाहितर गूगलवर अर्थ शोधतो , शेवटचा पर्याय म्हणुन शाळेत टीचरला विचारतो .एक गोष्ट आहे कि कुठलिहि शंका ताबडतोब विचारतो ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं . ( अवांतर : स्मायली कसे टाकायचे )
  • Log in or register to post comments

स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त

रेवती
Fri, 02/22/2013 - 22:34 नवीन
स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त अंतर ठेवू नका. तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आहे. :) माझ्या मुलाने 'शीला की जवानी' म्हणजे काय हा प्रश्न दोनदा विचारून झालाय. काय उत्तर द्यावं हे समजत नाहीये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

धन्यवाद रेवती

लौंगी मिरची
Fri, 02/22/2013 - 22:37 नवीन
धन्यवाद रेवती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माय नेम इज

तुषार काळभोर
Sat, 02/23/2013 - 09:23 नवीन
त्याला समजावा की गाणं असं आहे: माय नेम इज शीला... शीला कीजवाणी... (ललवाणी, मालपाणी, आडवाणी या धर्तीवर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाही हो पैलवानजी, इतकं सोपं

रेवती
Tue, 02/26/2013 - 09:02 नवीन
नाही हो पैलवानजी, इतकं सोपं असतं का! माझ्याआधी त्यानं ते गाणं पाहिलं त्याच्या मित्राकडे, तसंच एक गन्ग्नॅम स्टाईल की काहीतरी पाहिलं. शीलाच्या गाण्यात काही इंग्लीश वाक्ये आहेत ती लगेच समजली त्यामुळे लपवालपवी फारशी करता येत नाही. ललवाणी, मालपाणी वगैरे सांगताना याचा एक मित्र याच आडनावाचा आहे. उगीच "काय रे तुमच्याकडे कीजवाणी असे लास्ट नेम असते का?" असे विचारून डोक्याला आणखी व्याप होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

रेप म्हणजे एखाद्याच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/22/2013 - 23:17 नवीन
रेप म्हणजे एखाद्याच्या मनाविरुद्ध वागणे , त्याला आपल्या मनासारखं वागण्यासाठी फोर्स करणे
मराठी-इंग्लिशमधली १५-३५ वयाच्या लोकांची स्लँग तपासलीत तर अशाच अर्थाने बलात्कार/रेप हा शब्द वापरला जातो असं लक्षात येईल. पण निर्जीव वस्तूंवरही बलात्कार होतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ कुवतीपेक्षा अधिक काम देणे असा होतो. "मेंदूवर बलात्कार"मधेही अशीच अर्थछटा अभिप्रेत असते. गणपा, गुड लक तुम्हां दोघांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

सनी लियोन ने तर रेप ची व्याख्या वेगळीच केली होती

वेताळ
Sat, 02/23/2013 - 10:24 नवीन
महेश भट्ट्च्या जवळ आलेल्या लोकांची बुध्दी का कुणास ठावुक काम देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नाहितर गूगलवर अर्थ शोधतो

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 02/23/2013 - 02:24 नवीन
नाहितर गूगलवर अर्थ शोधतो
आयला, कठीण आहे. कमी वयात नको त्या विषयांचे exposure अडवायचे कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

शक्य तेवढं लक्ष .

लौंगी मिरची
Sat, 02/23/2013 - 22:50 नवीन
खरय विश्वनाथ , शाळेतच कंप्युटर विषय शिकवला जात असल्याने कसा हाताळायचा ते सगळं कळतं , त्यामुळे घरी जमेल तेवढं लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय सद्ध्यातरि काहि दिसत नाहि आहे . आदिती सहमत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

(No subject)

अभ्या..
Fri, 02/22/2013 - 23:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सध्या तशी लहान असल्याने

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 02/23/2013 - 02:25 नवीन
सध्या तशी लहान असल्याने प्रसार होण्याच मुख्य कारण सांगायचं टाळलं.
थोडी मोठी असती आणि तुम्ही नसते सांगितले तर तिनेच सांगितले असते कदाचित. यावरून अनेक विनोद आठवले. इथे सांगता येनार नाहीत. या खवत ;-)
  • Log in or register to post comments

होय बाबा!

स्पंदना
Tue, 02/26/2013 - 05:15 नवीन
कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं थोडंच रहातं. मुलं मोठी होताना अनेक शंकाकुशंकांनी घेरलेली असतात. योग्यवेळी त्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. काय म्हणता?
+१
  • Log in or register to post comments

अशा लहान वयात लेकीने आईबददल

kanchanbari
Tue, 02/26/2013 - 11:30 नवीन
अशा लहान वयात लेकीने आईबददल जी काळ्जी दाखवली ती कौतुकास्पद आहे पण इतक्या लहान वयात मुलांच्या शंकेचे निरसण करणे कठीण आहे.... उत्तम उदाहरण
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा