शंका निरसन.
"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह."
तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?"
"HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो माणसाच्या शरिरात शिरला की त्याची इम्युन सिस्टिम हळू हळू निकामी करतो."
"म्हणजे व्हायरस काँप्युटर सारखा आपल्या शरीरातही शिरतो?" काहीसा अचंबीत चेहेरा करत लेक विचारती झाली.
"अगं व्हायरस म्हणजे जंतू, जे शरीरात शिरले की आरोग्य बिघडतं. काँप्युटरचं ही तसच असत पण त्यात काही खरे जीव-जंतू जात नाही. तो एक प्रकारचा प्रोग्रॅम असतो, ज्यामुळे काँप्युटर बिघडतो. म्हणुन त्याला ही व्हायरस ची लागण झाली म्हणतात.
"HIV खूप डेंजरस असतो ना गं? कधीच बरा नाही होत ना तो? कसा होतो?" पुन्हा चेहेर्यावर चिंतेचे ढग जमायला लागले होते.
"हो बाळा, अजुन तरी त्याच्यावर औषध सापडलं नाही. पण जगभरात सगळीकडे त्यावर काम चालू आहे. पुढे मागे शोध लागतीलच त्याच्या वरच्या औषधांचे.
कसा होतो म्हणशील तर मुख्यकरून बॉडी फ्लूईड्स मधून तो पसरतो. जसं की समजा एखाद्या माणसाला अपघात झाला, त्याला रक्त द्यायचं असेल आणि त्याला जर एखाद्या HIV पॉझिटिव्ह माणसाचं रक्त दिलं तर त्यातून त्याला HIV होऊ शकतो. तसच बाळ पोटात असताना आईला जर HIV असेल तर बाळालाही HIV होऊ शकतो. किंवा बाळ लहान असताना HIV पॉझिटिव्ह आईच्या दुधातूनही बाळाला HIV होऊ शकतो." (सध्या तशी लहान असल्याने प्रसार होण्याच मुख्य कारण सांगायचं टाळलं.)
"एक प्रकारे कंटेजियस असला तरी ईतर सर्दी-तापा पसरत नाही. शेक हँड केल्याने एकत्र डबा खाल्ल्याने, खेळल्याने होत नाही."
"हो, टिव्हीवरच्या अॅडमध्येही तसचं दाखवलंय खरं" थोडसं हसू गालावर खेळवत लेक म्हणाली.
टिव्हीवर मागे जाहिरात लागली होती, HIV पॉझिटिव्ह गर्भवती बायकांनी वेळच्यावेळी औषधोपचार केले तर होणार्या बाळाला HIVची लागण होण्यापासुन वाचवता येते. बहुतेक ती जाहिरात पाहूनच मनात विचारांच जाळं गुंफलं गेलं असावं.
कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं थोडंच रहातं. मुलं मोठी होताना अनेक शंकाकुशंकांनी घेरलेली असतात. योग्यवेळी त्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. काय म्हणता?
याद्या
12904
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
बाबौ! गणपा, तुझी लेक भारी
तुमची पोरगी एक कोडेच आहे.
गणपा तुझी लेक बुद्धीच्या
शंकाच नाही.
In reply to गणपा तुझी लेक बुद्धीच्या by नाना चेंगट
?
In reply to शंकाच नाही. by गणपा
+१००, अजून थोडी मोठी झाल्यावर
In reply to ? by विकास
खरच हुषार आहे लेक.
लेकीपेक्षा आई-बाबांचं कौतुक
+१००
In reply to लेकीपेक्षा आई-बाबांचं कौतुक by सस्नेह
+१०००
In reply to +१०० by अर्धवटराव
गणापा भाउ आणि वैनी... सुज्ञ
In reply to +१०० by अर्धवटराव
+१
In reply to +१०० by अर्धवटराव
मुलगी प्रश्न विचारते -
अभिनंदन!
प्रश्न.
स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त
In reply to प्रश्न. by लौंगी मिरची
धन्यवाद रेवती
In reply to स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त by रेवती
माय नेम इज
In reply to स्मायली टाकण्यासाठी : ) फक्त by रेवती
नाही हो पैलवानजी, इतकं सोपं
In reply to माय नेम इज by तुषार काळभोर
रेप म्हणजे एखाद्याच्या
In reply to प्रश्न. by लौंगी मिरची
सनी लियोन ने तर रेप ची व्याख्या वेगळीच केली होती
In reply to रेप म्हणजे एखाद्याच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाहितर गूगलवर अर्थ शोधतो
In reply to प्रश्न. by लौंगी मिरची
शक्य तेवढं लक्ष .
In reply to नाहितर गूगलवर अर्थ शोधतो by विश्वनाथ मेहेंदळे
(No subject)
सध्या तशी लहान असल्याने
होय बाबा!
अशा लहान वयात लेकीने आईबददल