राष्ट्रपिता

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
30 Jan 2013 - 2:13 pm
गाभा: 

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली !

पण

आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत

http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml

कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो .
ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे .

आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2013 - 3:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थांब नंद्या, लिंक देते.

हां, हे पहा. आमच्या लाडक्या 'फ्युच्यूरामा'ने त्यावरही दंगा केला होता. नाहीतर जगात कुठे, काय चाल्लंय मला कुठलं समजायला!

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2013 - 3:08 am | श्रीरंग_जोशी

birth certificate

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2013 - 3:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा दुसराच आहे. बघा, मुलाचं नाव लिहीलंय बराक हुसेन ओबामा दुसरा. गंडवता का भोळ्याभाबड्या जनतेला!

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2013 - 3:27 am | श्रीरंग_जोशी

बापाचे व मुलाचे नाव एकच असले की असे लिहायची पद्धत आहे.
आता व्यवहारात वापरताना दुसरा किती वेळा म्हणायचे?

धाकटे जॉर्ज बुश प्रसिद्ध झाल्यानंतर थोरल्यांच्या नावानंतर जेष्ठ असे जोडले गेले (व्यवहारात).

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2013 - 2:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मते तुम्ही या भावनादुखीबद्दल मनोगत सदस्य केशवसुमार यांना सू करू शकता. आता सू शब्दाचा अर्थ इंग्लिश क्रियापद, इंग्लिश नाव किंवा मराठी क्रिया यांच्यापैकी कसा लावायचा ते तुम्ही आणि केशवसुमार आपसात बघून घ्या.

माझा व्यक्तिगत सल्ला (देण्याची उबळ आलीच आहे तर देऊन टाकते. तर तो) असा की आपल्याकडे जशी किरण, शिरीष, सुमन उभयलिंगी नावं असतात तसं हे एक असं समजून सोडून द्या.

सुधीर मुतालीक's picture

31 Jan 2013 - 7:13 am | सुधीर मुतालीक

आदिती रसग्रहण जबरी आहे. इंम्प्रेस्ड !!

बाळकराम's picture

31 Jan 2013 - 4:56 am | बाळकराम

सौ सुनारकी तो एक लुहार की! एक नंबर!

क्लिंटन's picture

30 Jan 2013 - 9:10 pm | क्लिंटन

काय टाईमपास चाललाय? संविधानात जरी अशा पदव्या द्यायची तरतूद नसली तरी लोकांनी कोणाला अशा पदव्या देऊ नये असा कोणताही कायदा सांगत नाही.गांधीजीना राष्ट्रपिता म्हणावेसे वाटत असेल तर जरूर म्हणा आणि तसे वाटत नसेल तर म्हणू नका.त्यावर एवढा गदारोळ कशाकरता?

मन१'s picture

30 Jan 2013 - 9:25 pm | मन१

गदारोळ टी आर पी साठी असावा.

विकास's picture

30 Jan 2013 - 9:51 pm | विकास

तुमच्या प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रतिसादाच्या शिर्षकाच्या प्रश्नात दडलयं, हे कधी कळणार? ;)

त्यावर एवढा गदारोळ कशाकरता?
टाईमपास चाललाय

सस्नेह's picture

30 Jan 2013 - 9:49 pm | सस्नेह

धागा व धागाकर्तीचे गोलगोल प्रतिसाद वाचून खात्री झाली की 'मी'पणाचा पाढा म्हणणारे सक्षम प्रतिस्पर्धी मिपावर (हाय रे दुर्दैवा) आहेत !

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2013 - 10:48 pm | प्रसाद गोडबोले

'मी'पणाचा पाढा >> =))
गोलगोल प्रतिसाद>> =)) =)) =))

ताई काय गोलगोल आहे हो ??... सरळ स्पष्ट मत आहे " एकतर असल्या पदव्या कोणालाच देवु नका , आणि द्यायचे ठरलेच तर कोणालाही हरकत घेवु नका "

-- राष्ट्रकाकु गिरीजा

कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो .

आम्हाला म्हणायचे होते

राष्ट्रपिता( असंविधानिक ) + छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति = राष्ट्रकाकु , राष्ट्रमामा , राष्ट्रआजोबा , राष्ट्रपत्नी , राष्ट्र्राख .... वगैरे वगैरे असंविधानिक गोष्टी येतील

मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

केन्द्रिय गृहमंत्रालयाने जे म्हणले तेच मी री-इटरेट केलेय ...

या विधानांवरून, जे काही म्हणायचे आहे ते काय ? अन तुम्हाला म्हणायचे आहे की मंत्रालयाला हे हे कुणाला स्पष्ट होते ?

माझ्या माहितीनुसार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 'राष्ट्रपिता' ही उपाधी महात्मा गांधींना १९४४ मध्ये सिंगापुर रेडियोवरील आपल्या भाषणात दिली. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर सुभाषबाबुंचा विश्वास नव्हता,पण गांधीजींबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. तसेच सरोजिनी नायडू यांनीही १९४७ साली एका संमेलनात त्यांना ही उपाधी दिली होती.
ही पदवी असंवैधानिक असली तरी जेव्हा दिली गेली तेव्हा हे संविधान अस्तित्वात नव्हते.भारतातच नव्हे तर इतर देशांत ही गांधीजी "राष्ट्रपिता" म्हणून ओळखले जातात. ही उपाधी लादलेली आहे असे मुळीच वाटत नाही.

अशी उपाधी घटनासंमत असावी काय?

कपिलमुनी's picture

31 Jan 2013 - 1:01 am | कपिलमुनी

मिपाकरांस वेगळे सांगणे नलगे

बाळकराम's picture

31 Jan 2013 - 4:52 am | बाळकराम

गांधीजी तुम्ही राष्ट्रपिता मानता किंवा नाही तुमच्यावर असलेल्या/नसलेल्या संस्कारांचा प्रश्न आहे, पण सांविधानिक हक्कांच्या गोष्टी करणार्‍यांना बीबीसी सारख्या विदेशी (आणि मूलतः भारत-द्वेष्ट्या) वेबसाईटचा आधार घ्यावा लागला यातच सगळं आलं, नाही का?

बाळ सप्रे's picture

31 Jan 2013 - 10:04 am | बाळ सप्रे

कोणा एका लखनौच्या १० वर्षाच्या मुलीला प्रश्न पडतो "गांधीजी (जी म्हणू ना?) राष्ट्रपिता का?".. गुगल करणे, आईवडील/शिक्षकांना विचारणे, पुस्तके वाचणे सोडून ती थेट प्रश्न विचारते गृहमंत्रालयाला आर.टी.आय.खाली..
आर्.टी.आय. चा मूळ उद्देश्य काय तर सरकारी निर्णय्/प्रक्रिया यात पारदर्शकता असावी आणि कोणावर अन्यायकारक असु नये.. याची जाण त्या मुलीला नाही तर किमान पालकांना असायला हवी.. त्याच्याअभावामुळे आपल्या जिज्ञासेखातर ती प्रश्न विचारते.. गृहमंत्रालयदेखिल त्याला सरकारी खाक्यात/ भाषेत उत्तर देते.. उत्तरदेखिल असे की.. "आधार कार्ड नसले तर तुम्ही असंविधानिक" या टाईपचे.. या किरकोळ घटनेची बी.बी.सी. पासून सकाळपर्यंत सर्व वृत्तपत्र दखल घेतात.. "गांधींची राष्ट्रपिता पदवी असंविधानिक"..
आणि त्यापुढे मिपावर धागा.. प्रतिसाद.. गांधीजी नेहेरु पेरु शास्त्री कात्री.. कवितेचे रसग्रहण..
सुतावरुन स्वर्गचे याहून चांगले उदाहरण मिळणे कठीण आहे..
एक चित्रपट काढता येईल..

आता एकदा घटना वाचा.. त्यात बर्‍याच गोष्टी नसतीलच.. कारण ती घटना आहे.. विश्वकोष/विकीपिडीया/गुगल नाही. मग त्यात नसलेले सगळेच "असंविधानिक" .. मग किती गोष्टींची घटनेशी तुलना कराल!! आणखी खूप धागे काढायला वाव आहे..

दीपक साळुंके's picture

31 Jan 2013 - 11:50 am | दीपक साळुंके

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही.

ज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही.

ज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे.

भारतीय इतिहासात राष्ट्राची ही संकल्पना अगदी नवीन होती. भूगोल, धार्मिक श्रद्धा वा सांस्कृतिक एकतेच्या आधारावर नव्हे, तर राजकीय ऐक्य व त्यातून भविष्यात साकार होणारे एकजिनसी राज्य या आधारावर भारतीय राष्ट्रवादाची बांधणी करण्यात आली. येथून पुढे भारतात एकमेकांशी संघर्ष करणार्‍या राज्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार होते. पाचशेपेक्षा अधिक संख्येने अस्तित्वात असलेली राज्ये व त्यांचे राजे मिटवून एक राज्य निर्माण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी पुरे केले. त्यामुळे राष्ट्र ही कल्पना वास्तवामध्ये रूपांतरित झाली आणि शासनव्यवस्था म्हणून लोकशाहीचा विचार केला गेला.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोणी अडाणी गृहस्थ नव्हते. भारताच्या धाडसी, शूर सुपुत्रांपैकी ते एक होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता या गुणविशेषणाने संबोधण्यापूर्वी त्या शब्दाचा अर्थ त्यांना पूर्णांशाने ठाऊक होता. (पाहा ः नेताजी सुभाषचंद्र बोस, ब्लड बाथ, प्रथमावृत्ती- सिंगापूर, पुनर्मुद्रण- लाहोर, १९४७. नेताजींचे ६ जुलै १९४४ रोजी झालेले आझाद हिंद रेडिओवरील भाषण, पान ५५) नेताजी जाणून होते की, आधुनिक भारतीय राष्ट्राचे म. गांधी हे मूर्तिरूप आहेत.

म. गांधींनी आपल्या सत्याग्रहाच्या संघर्षतंत्राच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपर्‍यात, सर्वदूर अशी राजकीय जागृती करून शस्त्रहीन, दडपलेल्या भारतीय जनतेला स्वातंत्र्यसंग्रामात समाविष्ट करून घेतले.

आजच्या भारताचे राष्ट्रपिता, महात्मा गांधी आणि फक्त महात्मा गांधी असू शकतात, हा इतिहासाचा दाखला आहे. याबाबत तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही आणि खळखळ करण्याचे तर बिलकुलच कारण नाही.

- मधु लिमये यांच्या "राष्ट्रपिता कोण?" या लेखातून.

थोडक्यात सांगायचं तर,
राष्ट्र : एकत्र नांदायची/ संकटं झेलायची/ लढायची इच्छा असलेल्या समाजांचा/लोकांचा समुह.
राष्ट्रपिता: राष्ट्रनिर्मीती घडवुन आणणारा.

भारत हे राष्ट्र नव्हतं. ते सर्वदुर पसरलेल्या स्वातंत्र्यचळवळीमुळे निर्माण झालं, प्रथमच लोकांना आपण एक आहोत, आपला शत्रु एक आहे आणि आपलं स्वत:च राज्य असावं असे ह्याच चळवळीमुळे वाटु लागलं. हि चळवळ भारतव्यापी केली ती गांधींनी (त्यांच्या संघटन कौशल्यामुळे, भारतीय मानसिकतेच्या जाणीवेमुळे), म्हणुन त्यांना राष्ट्रपिता म्हटले गेले.

सुनिल पाटकर's picture

31 Jan 2013 - 3:01 pm | सुनिल पाटकर

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया....
ब्रिटिश साम्राज्याचा पाया ढासळणा-या या महात्म्यास कोटीकोटी प्रणाम

संविधानिक असो कि असंविधानिक
कुणाला पटो अथवा न पटो
कुणी म्हणो अथवा न म्हणो
मी मात्र गांधीजीनी राष्ट्रपिता म्हणणार ......

इरसाल's picture

2 Feb 2013 - 10:54 am | इरसाल

प्रत्येक कंपुचा असा एक काळ असतो. नवा कंपु आल्यावर त्यांना कोणी विचारत नाही.

राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही + १००००००००००००००००

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Feb 2013 - 12:05 am | निनाद मुक्काम प...

कोणत्याही नेत्यांचे मोठेपण हे त्याला मिळालेल्या उपाध्या नाही तर त्यांचे अनुयायी त्यांची विचारसरणी कितपत पाळतात व मानतात ह्यावर अवलंबून असते ,
कारण व्यक्ती महत्त्वाची नाही तर तिचे विचार महत्त्वाचे असतात.
गांधीच्या मृत्यू नंतर पुण्यात जी हिंसा झाली तिचे सूत्रधार पकडले न जाणे,
ह्यावरून त्याना मानणारे ह्यापुढे त्यांच्या नावाचा एक चलनी नाणे म्हणून वापर करणार व सत्ता उपभोगणार हे नक्की झाले.
आज भारतात हिंसा बेदम होते , गावाकडे चला ह्या संदेशाची अंमलबजावणी होत नाही ,
अश्यावेळी गांधी ह्यांची विचारसरणी जर बहुसंख्य भारतीय मानत नसतील
त्यांचा फाशीला विरोध होता तरीही आज जनतेच्या मागणीमुळे राष्ट्रपती ह्यांनी बलात्कार प्रकरणात फाशी ह्या शिक्षेचा अंतर्भाव केला.
गांधी ह्यांना धर्मावर आधारीत राष्ट्र ही संकल्पना मान्य नाही ,

गांधींना अपेक्षित दारूबंदी आपल्या देशात मोदींच्या गुजरात मध्ये शक्य आहे.
अश्यावेळी भारतात एखाद्या नेत्याला पदव्या देऊन व्यक्ती पूजेचे स्तोम उगाच कशाला माजवायचे,
गांधी माणूस म्हणून व्यक्तिशः थोर असेल एकवेळ मानू. पण त्यांचे अनुयायी व पहिल्या मंत्री मंडळातील अनेक नेते हे संधी साधू होते. पहिले सरकार स्थापन झाल्यावर गांधींना आपल्याच स्वदेशी लोकांच्या निर्णयाविरुद्ध उपोषण करावे लागले ही शोकांतिका आहे. आज कम्युनिस्ट किंवा संघ ह्यांची मत लोकांना आवडो किंवा नको त्यांच्या अनुयायांना आवडतात. व ते त्यांचे पालन करतात ,
गांधीच्या अनुयायांनी त्यांची अहिंसेचे मते त्यांच्या वधानंतर हिंसा करून धुळीस मिळवली ,ह्यावरून त्यांचे अनुयायी किंवा त्यांचा नावाचा वापर करणारे हे गांधी ह्या ब्र्यांड चा वापर करणार होते व त्यांनी तो आजतागायत केला आहे. त्यांच्या विचारांची अजून शोकांतिका अजून काय असावी.

आणि लोकशाही ची सर्वात मोठी शोकांतिका पुढे झाली
म्हणजे स्वतंत्र भारतात तो स्वतंत्र होण्यासाठी गांधी व क्रांतिकारक व अनेक हुतात्मे ह्यांचा सक्रिय सहभाग होता., हयात गांधींचा सहभाग मोठा व इतरांनाच कमी असा दुजाभाव करणे योग्य नाही ,
पण स्वतंत्र भारतात गांधी एक सामान्य नागरिक होते , व त्यांनी निवडून दिल्या, सरकारचा निर्णय त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी उपोषण केले हा त्यांचा हक्क होता ,
सध्या अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल साठी उपोषण केले ,
पण त्यावेळी दुर्दैव असे होते की
गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही.
लोकशाही ची क्रूर चेष्टा म्हणजे एक माणूस सरकारला वेठीस धरू शकतो हे सार्या जगाला आपण दाखवून दिले ,
आज गांधी ह्यांचा वध झाला नसता तर पुढे मंत्री मंडळाचा प्रत्येक निर्णय त्यांना विचारून घ्यावा लागला असता. किंवा तो पुढे बदलावा लागला असता , हे कितपत योग्य आहे.
एक साधा मुद्दा गांधी ह्यांना धर्मावर आधारीत राष्ट्र ही संकल्पना मान्य नव्हते , हे त्यांचे वैयक्तिक मत होते. पण आपल्या सरकारने ते आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक हिस्सा बनवून आपल्याच सोबत स्वतंत्र झालेल्या ज्यू राष्ट्राचे अस्तित्व नाकारले , ज्याची निर्मिती प्रगत राष्ट्रांच्या पाठिंब्याने झाली होती ,
जेव्हा नरसिंह राव ह्यांनी हे धोरण बदलून ज्यू राष्ट्रांची संबंध स्थापन केले तेव्हा पासून ते आजतागायत आपण व ज्यू राष्ट्र दहशतवाद , व्यापार , कृषी ह्या अनेक शेतात सहकार्य करत आहोत ,
जर्मनीत एकता हिटलर सर्व निर्णय घ्यायचा ,व भारतात असे सर्व निर्णय गांधी घ्यायला लागले , सरकारच्या विरुद्ध यशस्वी उपोषण करून त्यांनी हेच दाखवून दिले की तुमचा निर्णयावर माझा अंकुश असेल.
मुळात भारतीय जनतेला मिठाचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा त्यांची कारणे माहिती होती.
पण स्वतंत्र भारतात भारतीय नागरिकांना गांधी ह्यांनी देशाच्या सरकार विरुद्ध उपोषण का करत आहोत हे सांगून विश्वासात घेतले ,
त्यांच्या उपोषणाचे कारण व त्यांच्या मागण्या ह्यावर स्वतंत्र भारतातील समस्त नागरिकांचे त्यावेळी मत कोणी जाणून घेतले.

हिटलर ताकदीने आपले निर्णय जनतेवर लादायचा , तर गांधी स्वतंत्र भारतात उपोषणा द्वारे इमोशनल ब्लॅकमेल करून आपली मत आपल्या सरकारवर व पर्यायाने जनतेवर लादत होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Feb 2013 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय अभ्यासु आणि मस्त प्रतिसाद....

राही's picture

4 Feb 2013 - 9:19 am | राही

ही सर्व चर्चा गांधी ह्या माणसाबाबत चालली आहे, त्याच्या अनुयायांबाबत नव्हे.त्याच्या स्वतःच्या आचरणावरून त्याला पदव्याबिदव्या जे काही मिळायचे न मिळायचे ते मिळून/हरपून गेले.कोणत्याही महान नेत्याचे अनुयायी/मुले त्या नेत्यापेक्षा मोठे असूच शकत नाहीत.ते थिटेच असतात.ते जर त्या महात्म्यापेक्षा मोठे झाले तर ते स्वतःच महात्मा बनतील. तसे होत नाही,कधी झालेले नाही.शिवाजी महाराज,लो.टिळक,डॉ.आंबेडकर,स्वा.वी.सावरकर,हिं.हृ.स.बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या बाबतीत ते खरे आहे कारण तो निसर्गनियम आहे. महात्मा शतकातून एखादाच होतो.दर पिढीमागे एक असे काही गणिती प्रपोर्शन नसते.

गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही.
लोकशाही ची क्रूर चेष्टा म्हणजे एक माणूस सरकारला वेठीस धरू शकतो हे सार्या जगाला आपण दाखवून दिले ,

निनाद, स्वातंत्र्य मिळल्यावर ही गांधीजींना उपोषणाला बसले होते आणि त्यांनी हट्टाने सरकार कडून काहीतरी मान्य करुन घेतले इथंपर्यंत तुम्ही सांगितले.. पण नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केलं आणि सरकारने त्यांच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे तुम्ही स्पष्ट केलं नाहीये..

माझ्या माहीतीनुसार गांधीजीनी स्वातंत्रानतंर पहीलं अन शेवटंच ( जे दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातलं ही शेवट्च ) उपोषण ६ जाने १९४८ ला सुरु केलं... हे उपोषण सरकार च्या कुठल्याही निर्णयाविरुद्ध नव्हतं तर देशातल्या जनतेविरुद्ध होतं. देशभरात दंगलींचा जो आगडोंब उसळला होता तो शांत करण्यासाठी तमाम हिंदू आणि मुसलमान जनतेला अवाहन म्हणून त्यांनी उपोषण केलं. हे उपोषण १२ दिवस चाललं. १८जानेवारी ला हजारो हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी सामंजस्याचं वचन दिल्यावर हे उपोषण सुटलं..
तसेच सीमाभागात होणारा हिंसाचार थांबवण्यासाठी भारत अन पाक दोन्ही देशानी रक्तपाताचा मार्ग न अवलंबता चर्चा करुन गुंता सोडवावा याचा आग्रह गांधींनी धरला होता..
ब्रिटीशांनी आपल्या ताब्यात दिलेला देश हा फुटिरतेची बिजे पेरली गेलेला अन् जर्जर अवस्थेतला होता. देशाची घडी बसवायचा एकमेव मार्ग शांतता होता, धुमसता सीमाभाग, रक्तबंबाळ जनता हा नव्हता.
नथुराम गोडसे ज्या प्रव्रुत्तींचा चेहरा होता त्यांना पाकीस्तान सांमज्स्याच प्रकरण मान्य नव्हतं. हिंसाचाराला प्रत्युत्तर हिंसा हवं हे माननारया गोडसे ने ३० जानेवारी १९४८ ला गांधींचा खुन केला. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं सरकार ला वेठिस धरणारं कुठलंही उपोषण गांधींनी केलं नाही.

संधीसाधु अनुयायी, भ्रष्ट नेते यांच्यामुळे गांधीवाद चुकीचा ठरत नाही.. देशाची आज जी काही दुरावस्था आहे त्याचे खापर ज्याने स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले अन स्वातंत्र्य मिळल्यावर एक वर्षाच्या आत ज्याचा भ्याड खुन करण्यात आला अशा व्यक्तीवर फोडने चुकीचे आहे.

गांधींच्या अहिंसेला भेकडपणा अन फक्त क्रांतीकारकांच्याच त्यागाला शौर्य म्हणून उपयोग नाही. कारण कुठल्याही क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत हा, रक्तबंबाळ आणि एकमेकांच्याच जिवावर उठलेला कधीही नव्हता..

बाबा पाटील's picture

4 Feb 2013 - 11:27 am | बाबा पाटील

सही प्रतिसाद....

नितिन थत्ते's picture

4 Feb 2013 - 11:33 am | नितिन थत्ते

>>पण स्वतंत्र भारतात गांधी एक सामान्य नागरिक होते , व त्यांनी निवडून दिल्या, सरकारचा निर्णय त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी उपोषण केले हा त्यांचा हक्क होता ,
सध्या अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल साठी उपोषण केले ,
पण त्यावेळी दुर्दैव असे होते की
गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही.

त्यावेळी जे सरकार होते ते "निवडून दिलेले" सरकार नव्हते. काहीसे काळजीवाहू म्हणतात तसे. कारण घटना तयार नव्हती. आणि लोकसभाही नव्हती. जी होती ती कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्ली होती. तिचे काम घटना बनवण्याचे होते. जे लोक निवडून आले होते ते कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्लीवर निवडून आले होते त्यातले काही नॉमिनेटेड सुद्धा होते.

आंबेडकरांना हवे असलेले हिंदू कोड बिल आत्ता आणू नये कारण सध्याचे सरकार घटनात्मकरीत्या निवडून आलेले नाही असा सल्ला डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना दिला होता असे वाचल्याचे स्मरते.

गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही.

हे तत्व अजूनही काँग्रेस कसोशीने आचर्णात आणत आहे... फक्त आता मोहनदास करमचंद गांधीं च्या ऐवजी सोनीया गांधी आहेत, एवढाच काय तो फरक !

पण तुमच आपलं कैच्याकै... एव्ढा मोठ्ठा मुद्दा डोळ्याआड कर्ता म्हण्जे काय ! तुमचा तीर्व णीषेढ !

राही's picture

4 Feb 2013 - 12:24 pm | राही

त्याकाळी गांधी आणि गांधीप्रणीत काँग्रेस हा एकच मोठा फोर्स होता, इतर पक्ष अगदी नगण्य, किरकोळ होते, मुस्लिम लीग वगळता. त्या काळातले राजकीय वाङ्मय विशेषतः वर्तमानपत्रे किंवा त्यातील उतारे वाचल्यावर हे लक्षात येते. हिंदुमहासभेलातर चार टाळक्यांव्यतिरिक्त कोणीही विचारत नव्हते.आम जनता कधीच यांच्या पाठीशी नव्हती.त्या काळच्या ललित वाङ्मयातही गांधीजींची लोकप्रियता ग्रथित झालेली आहे.उदा.खांडेकरांच्या कादंबर्‍यातून ती दिसते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 2:10 am | निनाद मुक्काम प...

पण नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केलं आणि सरकारने त्यांच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे तुम्ही स्पष्ट केलं नाहीये..
असे म्हणतात की ५५ कोटी पाकिस्तान द्यावे अशी गांधीजी ह्यांची प्रमुख मागणी होती.
पण हा मुद्दा मी आधी लिहिला नाही , काही गांधी प्रेमी हा मुद्दा अमान्य करतात.
मुळात मला त्यांच्याकडून सविस्तररीत्या जाणून घ्यायला आवडले की गांधी ह्यांनी स्वतंत्र भारतात भारतीय सरकारच्या विरोधात नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केले.
आणि थत्ते तुम्ही काळजीवाहू भारतीय सरकार असे जरी म्हणाला तरी ह्या सरकार मध्ये गांधी ह्यांना आदर्श मानणारे नेहरू , पटेल थोडक्यात ९० हून जास्त टक्के मंत्री गांधी ह्यांना मानणारे व जाणणारे होते , गांधी ह्यांना कोणत्या गोष्टीला विरोध आहे हे माहिती असून त्यांनी एक निर्णय घेतला , आणि गांधीजी ह्यांना काही दिवस उपाशी
बसवले , थोडक्यात त्यांच्या हयातीत त्यांचे अनुयायी सत्ता स्पर्श झाल्यावर बिथरले ,
अश्या महान नेत्याचे विचार व त्यांचा जनतेवर प्रभाव सगळेच उद्बोधक आहे
नेहरू व पटेल ह्याच्यापेक्षा थत्ते त्यावेळी भारतीय पंतप्रधान असते तर गांधीजींना उपोषण करावे लागले नसते.

आनन्दिता's picture

5 Feb 2013 - 3:28 am | आनन्दिता

असे म्हणतात की ५५ कोटी पाकिस्तान द्यावे अशी गांधीजी ह्यांची प्रमुख मागणी होती.
पण हा मुद्दा मी आधी लिहिला नाही , काही गांधी प्रेमी हा मुद्दा अमान्य करतात.

निनादराव तुमच्या सारख्या अभ्यासु माणसासमोर काही लिहीणे म्हणजे फार हिमतीचे काम आहे तरीही जुरुर्र्त करतेच.:). (गांधीजींच नाव घेऊन)
मुळात ५५ कोटी पाकीस्तान ला द्यावेत ही मागणी गांधीजींची नव्हती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकार बरोबर आपला जो करार झाला होता त्यात ही तरतूद करण्यात आली होती. या करारान्वये भारताच्या स्वातंत्र्यानंतर (पर्यायाने फाळणीनंतर) भारताने under the terms of division of assets and liabilities ७५ करोड रु पाकीस्तान ला द्यायचे सर्वानुमते( आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार) ठरले होते .यानुसार २० कोटी रुपयांचा हप्ता देण्यात ही आला होता. उरलेले ५० कोटी देण्यास मात्र सरकार टाळाटाळ करत होतं. अशामुळे एक आंतरराष्ट्रीय करार तर बिनसणार होताच पण एक एथिकल देश म्हणून असणारी भारताची प्रतिमा मलिन होणार होती..

याच ५५ कोटी च कारण देऊन नथुरामाने खुनाला ,वध वगैरे सोज्वळ प्रकारात घुसवायचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचे गोडसेप्रेमी पण तोच पुकारा करतात.
पण.....
नथुराम गोडसेने मे १९४४ आणि सप्टेंबर १९४४ मधेही गांधींच्या हत्येचा असफल प्रयत्न केला होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जवळजवळ अडिच वर्षापुर्वी ... तेव्हा हे ५५ कोटी प्रकरण च काय पण भारताच्या फाळणीचा ही पत्ता नव्हता. मग त्याने जी कारणे सांगितली आहेत त्यावर कितपत विश्वास ठेवायचा. म्हणून कदाचित मला नथुराम गोडसे मधे सो कॉल्ड देशभक्ती पेक्षा माथेफिरुपणाच जास्त दिसतो..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 1:52 pm | निनाद मुक्काम प...

सरकार जर टाळाटाळ करत असेल तर त्यामागे सरकारची काही भूमिका असू शकते.
कदाचित पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी कुटनीती म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला असेल , ह्या निर्णयावरून मला नाही वाटत तत्कालीन भारतीय जनता व विरोधी पक्ष ह्यांनी आक्षेप घेतला असेल,
मुळात ह्या मुद्द्यावरून गांधी ह्यांनी उपोषण केले का नाही हे मला माहीत नाही ,
म्हणूनच गांधी प्रेमी जनतेकडून मी नक्की काय कारण होते हे जाणून घेण्याची मनीषा व्यक्त केली.

गांधी ५५ कोटी मुद्द्यावर चूक होते की बरोबर हा मूळ मुद्दा नाही आहे ,
हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे ,
सरकारने जो निर्णय घेतला त्यावर भारतीय जनता व तत्कालीन विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याचे आठवत नाही ,
आधीच दंगली ने व्यथित झालेले हिंदू व मुसलमान त्यात पाकिस्तान लष्कराने केलेली आगळीक मुळात देशाची झालेली फाळणी अश्या पार्श्व भूमीवर एकटे गांधी नैतिकता
दाखवत होते , आणि दुर्दैव म्हणजे सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले ,
लोकशाहीत सरकार व जनता व राजकीय पक्ष ह्यांच्या विरोधात एक व्यक्ती जातो व स्वतःचे म्हणणे सिद्ध करतो हे कितपत योग्य आहे ,
गोडसे ह्यांनी जे कृत्य केले ते चूक की बरोबर हे मला माहित नाही,
पण देशाची फाळणी झाली व अल्प संख्यांक मुसलमान ह्यांनी हिंसेच्या जोरावर नाकावर टिच्चून ती फाळणी मिळवली , तेव्हा ह्या हिंसेसमोर अहिंसक गांधी व त्यांची तत्त्वे पराभूत झाली ,
अश्यावेळी परत परत आपली पराभूत तत्वे परत परत उगाळत देशाला अजून किती नुकसान सो कॉल्ड नैतिकतेच्या नावाखाली करून घ्यायचे होते.
कृष्णनीती व चाणक्यनीती जाणणारा हा देश काही धर्मांध लोकांच्या हिंसे पुढे हतबल व्हावा. आणि देशाचा महत्त्वाचा भाग स्वतःपासून विलग करावा ही शोकांतिका आहे ,
नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2013 - 1:54 pm | निनाद मुक्काम प...

सरकार जर टाळाटाळ करत असेल तर त्यामागे सरकारची काही भूमिका असू शकते.
कदाचित पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी कुटनीती म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला असेल , ह्या निर्णयावरून मला नाही वाटत तत्कालीन भारतीय जनता व विरोधी पक्ष ह्यांनी आक्षेप घेतला असेल,
मुळात ह्या मुद्द्यावरून गांधी ह्यांनी उपोषण केले का नाही हे मला माहीत नाही ,
म्हणूनच गांधी प्रेमी जनतेकडून मी नक्की काय कारण होते हे जाणून घेण्याची मनीषा व्यक्त केली.
माझ्या मते येथे थोडाबहुत ह्या घटनेवर प्रकाश टाकला आहे,
माझ्या मते दोन देशांमध्ये एखादा करार होतो , तो जर एखादे राष्ट्र आपल्या देशाच्या हितासाठी तोडत असेल तर त्यात वावगे काय आहे ,
उद्या अमेरिका व पाकिस्तान ह्यांनी करार केले व काही कारणास्तव पाकिस्तान व अमेरिकेने तो करार मोडला तर ते नैतिकते पेक्षा वास्तविक मुद्द्यांवर भर देऊन प्रश्न सोडतात.
गांधी ५५ कोटी मुद्द्यावर चूक होते की बरोबर हा मूळ मुद्दा नाही आहे ,
हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे ,
सरकारने जो निर्णय घेतला त्यावर भारतीय जनता व तत्कालीन विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याचे आठवत नाही ,
आधीच दंगलीने व्यथित झालेले हिंदू व मुसलमान त्यात पाकिस्तान लष्कराने केलेली आगळीक मुळात देशाची झालेली फाळणी अश्या पार्श्व भूमीवर एकटे गांधी नैतिकता
दाखवत होते , आणि दुर्दैव म्हणजे सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले ,
लोकशाहीत सरकार व जनता व राजकीय पक्ष ह्यांच्या विरोधात एक व्यक्ती जातो व स्वतःचे म्हणणे सिद्ध करतो हे कितपत योग्य आहे ,
गोडसे ह्यांनी जे कृत्य केले ते चूक की बरोबर हे मला माहित नाही,
पण देशाची फाळणी झाली व अल्प संख्यांक मुसलमान ह्यांनी हिंसेच्या जोरावर नाकावर टिच्चून ती फाळणी मिळवली , तेव्हा ह्या हिंसेसमोर अहिंसक गांधी व त्यांची तत्त्वे पराभूत झाली ,
अश्यावेळी परत परत आपली पराभूत तत्वे परत परत उगाळत देशाला अजून किती नुकसान सो कॉल्ड नैतिकतेच्या नावाखाली करून घ्यायचे होते.
कृष्णनीती व चाणक्यनीती जाणणारा हा देश काही धर्मांध लोकांच्या हिंसे पुढे हतबल व्हावा. आणि देशाचा महत्त्वाचा भाग स्वतःपासून विलग करावा ही शोकांतिका आहे ,
नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,

५५ कोटी आणि गांधी उपोषण यावर मिपावरच मी एक चर्चा खूप पूर्वी सुरू केली होती. आता स्वतःचे लेखन दिसत नसल्याने शोधता येणार नाही पण तुम्हाला शोधता आली तर ती वाचून तुमचे मत काय ते बनवा असे सांगता येईल.

मन१'s picture

6 Feb 2013 - 7:11 pm | मन१

दुवा सापदात नाहिये.
तुम्ही, इन्द्राज पवार, थत्ते, सुनील ह्या सर्वांनी जबरदस्त माह्तिई दिली होतीत.
"गांधींमुळं लै नुकसान झालं." किंवा "गांधी ही व्यक्ती वाटते तितकी भोळी/सात्विक्/भली नाही" ही माझी दोन्ही मतं त्यामुळं बदलली नाहित. पण ५५ कोटींबाबतचा मोठ्ठा गैरसमज दूर झाला; आणी १९४७ - १९४८ च्या काश्मीर युद्धाबद्द्दलचाही. निदान त्याबाबतीत तरी प्रचलित फेसबुकी मते चूक आहेत हे उमगले.

मनोबा,
http://www.misalpav.com/node/16478 या लेखाबध्दल बोलत आहेस का? येथील पवार, थत्ते, अन सुनिल यांचे प्रतिसाद अप्रतिम आहेत.
असो , माझ्या खानदानात जरी आर्मी बैकग्राउंड असली तरीही गांधीजींबध्द्ल आदर कधीही कमी होणार नाही याचे कारण मी मुस्लिम आहे म्हणुन नव्हे तर गांधींजींची सत्याग्रहाची वृत्ती अन सर्वांना एकत्रपणे आणुन भारतीय स्वतंत्रतेचे विचाराचे बीज पेरण्याचे समंजसता जी भारतीय गावागावात पोहचली होती. त्यांची ग्रामसुधार विचाराचे चीज मणिभाई देसाई यांनी खुप प्रमाणात केल.
गांधीजींच्या अहिंसेला समजणे सोपे नाही हे मान्य पण बलात्कारीवृतीला गांधीजींनी समर्थन केले असते का हा संभ्रम / विचार किती खालच्या पातळीचा आहे याचे आश्चर्य व खरंच किळस वाटली. असो ज्याची त्याची समज !
(असो, नेहमीप्रमाणे संपादकमंडळ माझे प्रतिसाद उडवतात व ते उडवतील त्यामुळे याबध्दल आता काहीच फरक पडत नाही म्हणा तरीही मनोबा, तुझ्यासाठी हा प्रतिसाद लिहीला)

http://www.misalpav.com/node/12510 त्यात तुला ५५ कोटी बध्द्ल चा उल्लेख आहे
निश्चितपणे हाच तुला असलेल्या लेखाचा दुवा असावा.
~ वाहीदा

मन१'s picture

7 Feb 2013 - 1:38 pm | मन१

ही चर्चा तर आहेच.
ह्याशिवायही अजून एक होती. शीर्षक आता आठवत नाहिये.

ऋषिकेश's picture

7 Feb 2013 - 2:30 pm | ऋषिकेश

तो दुवा मी निनाद यांना खव मध्ये मिळाल्यावर डकवला होता आता इथे देतोय.

http://www.misalpav.com/node/12556

मत बदललं पाहिजे हा हट्ट नाहिच. सार्‍या तथ्यांनंतरही तेच मत राहिलं तरी ठिकच. फक्त तथ्यांना डावलून बनवलेली मतं तितकिशी योग्य वाटत नाहीत

उपास's picture

6 Feb 2013 - 7:29 pm | उपास

कोणी त्या जुन्या चर्चेचा दुवा देईल का?
खरा इतिहास हा बरेचदा लपला जातो, जे राहातं ते एखाद्या व्यक्तिच त्याविषयी मतं!

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2013 - 7:57 pm | श्रीगुरुजी

"नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,"

+१

खलिस्तानबरोबरच काश्मिर, हैद्राबाद, गोवा, जुनागढ इ. नवे देश सुद्धा अस्तित्वात आले असते.

'समजा गोडसेने गांधीजींचा वध केला नसता तर भारतात चांगले/वाईट असे नक्की कोणते बदल घडले असते?' असा प्रश्न मी एका दुसर्‍या चर्चेत विचारला होता. पण त्या प्रश्नाला कोणीही उत्तर दिले नव्हते. आतापर्यंतची चर्चा वाचून मला असे वाटते की, 'समजा गोडसेने गांधीजींचा वध केला नसता तर खालील घटना घडल्या असत्या/नसत्या.

- महाराष्ट्रात ब्राह्मणांविरूद्धची दंगल १९४८ साली झाली नसती. पण अशी दंगल नंतरच्या काळात झालीच असती कारण काही लोकांच्या मनात ब्राह्मणांविरूद्ध जो राग खदखदत होता, त्या रागाला गांधीवधाचे निमित्त मिळून त्यांनी दंगल केली. जर ही घटना घडलीच नसती तर त्यांनी १९४८ नंतर काही काळाने काहीतरी वेगळ्या कारणावरून ब्राह्मणांविरूद्ध दंगल केलीच असती.

- जुनागढ, हैद्राबाद इ. संस्थाने पोलिस कारवाईने स्वतंत्र भारतात सामील झाली नसती व त्यांना स्वतंत्र देशाचे स्वरूप द्यावे असा गांधीजींनी हट्ट धरून तो पूर्ण करायला लावला असता.

- गांधीजींच्या कोणावरही सक्ती न करण्याच्या आग्रहामुळे काश्मिरचा स्वतंत्र देश झाला असता किंवा ते पाकिस्तानमध्ये सामील झाले असते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Feb 2013 - 1:25 pm | पुण्याचे वटवाघूळ

"नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,"

कशावरून हो? उगीचच गांधीजींच्या नावाने काहीही खपवायचे?

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2013 - 2:51 pm | श्रीगुरुजी

"माझ्या मते दोन देशांमध्ये एखादा करार होतो , तो जर एखादे राष्ट्र आपल्या देशाच्या हितासाठी तोडत असेल तर त्यात वावगे काय आहे ,"

+१

भारताने फाळणीच्या वेळी पाकिस्तानचे ५५ कोटी द्यायचा करार केला असेलही. पण पाकिस्तानने विश्वासघात करून काश्मिरमध्ये सैन्य घुसवून युद्ध सुरू केल्यानंतरसुद्धा भारताने तो करार पाळावा यासाठी उपोषण करून सरकारला वेठीस धरणे अयोग्य होते.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2013 - 2:56 pm | श्रीगुरुजी

गेल्या महिन्यातच मालदीवने माले येथील विमानतळाच्या देखभालीचे भारताच्या जीमआर कंपनीला दिलेले कंत्राट रद्द केले. याचा निषेध म्हणून भारताने मालदीवला देण्यात येणारी ५० कोटी डॉलर्सची मदत थांबविली आहे. याबाबतीत "जशास तसे" हे योग्य धोरणच भारताने राबविले. १९९१ च्या इराक युद्धाच्या वेळी सुद्धा अमेरिकेने जॉर्डनची आर्थिक मदत थांबविली होती.

एखादा परका देश आपल्या देशाच्या हिताविरूद्ध धोरण राबवित असेल, तर त्या परक्या देशाशी सुरू असलेले करार सुरू ठेवणे हा भाबडेपणा आहे.

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2013 - 3:13 pm | पिलीयन रायडर

महात्मा गांधी ह्या विषयावर खुप चर्चा चालु आहे. माझे एकंदरीत इतिहास ह्या विषयवर फार वाचन नाही. महात्मा गांधी बद्दल तर फारसे काही नाहीच. पण तरीही माझे "ऐकीव" माहितीवरुन त्यांच्या बद्दल एक मत तयार झाले आहे.. जे फारसे चांगले नाही. त्याची कारणे खालील प्रमाणे असावीत..
१. मला अहिंसा पटते..ती दुसर्‍याला आपणहुन त्रास देऊ नये इतपत.. पण कुणी आपल्याला त्रास दिला तर त्याला अद्दल घडवावी ह्या मताची मी आहे. त्यामुळे एखाद्यानी आपल्याला मारले तर आपण दुसरा गाल पुढे करावा हे मला अजिबात पटत नाही. वर कुठे तरी वाचल्या प्रमाणे त्यांचा ह्या पद्धतीनी स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग जास्त व्यापक असेलही.. पण तरीही आपण दुसर्‍यावर हल्ला करु नये म्हणुन शांततेनी आंदोलन करावं इतपत हेही समजु शकते.. पण (पुन्हा इथेच वाचल्या प्रमाणे) बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा असं जर गांधी (इथे मी त्यांना महात्मा म्हणु शकत नाही..) तर त्यांच्यात आणि आसाराम बापुंमध्ये फरक तो काय? जे स्वतःला गांधी वादी म्हणतात ते त्यांच्या ह्या मताचे समर्थन करतात का?
२. नथुराम गोडसे ह्यांना त्यांचा पाठिंबा मिळतो ज्यांना म्.गांधी पटत नाहीत. "दुश्मन का दुश्मन.." हा न्याय आहे तिथे.. त्यामुळे काही प्रमाणात मलाही गोडसेंच वागणं पटत..
३. अजुन एक मोठा राग म.गांधी बद्दल असाही असु शकतो की, त्यांच्या पुधे सशस्त्र क्रांतीचे श्रेय अव्हेरले जाते. माझ्या मते (माझ्या तुट्पुंज्या माहितीनुसार) सशस्त्र क्रांती सुद्धा अत्यंत महत्वाची होती..

बाकी मला कशात फार रस नाही कारण त्यावर चर्चा करण्याची माझी लायकी नाही..
पण.. "बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा" ह्या मता बद्दल गांधीप्रेमींचे नक्की मत काय?
(इथे आधी लिहिले असल्यास मला त्या प्रतिसादाची लिंक द्यावी.)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2013 - 5:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

आजानुकर्ण's picture

6 Feb 2013 - 7:04 pm | आजानुकर्ण

"बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा" ह्या मता बद्दल गांधीप्रेमींचे नक्की मत काय?

यावर गांधीप्रेमींच्या मताने काय फरक पडतो. गांधीप्रेमींचे मत हे गांधींचे मत होत नाही. गांधींनी अशा प्रकारच्या केसींवर विशेष टिप्पणी केल्याचे वाचल्याचे आठवत नाही त्यामुळे 'आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते' स्वरुपाची चर्चा होऊ शकते. दुसरा मुद्दा सशस्त्र क्रांतीचा. गांधीबाबत लिहिणारे कधीही सशस्त्र क्रांतीचे श्रेय अव्हेरत नाहीत, मात्र सशस्त्र क्रांतीबाबत लिहिणारे नेहमीच जातायेता गांधींना टपल्या कशा मारता येतील ते पाहत असतात.

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2013 - 7:17 pm | पिलीयन रायडर

यावर गांधीप्रेमींच्या मताने काय फरक पडतो. गांधीप्रेमींचे मत हे गांधींचे मत होत नाही

फरक तर खुद्द गांधींच्या मतानेही पडत नाही हो. पण त्यांची मते, विचार, निर्णय हे कसे योग्य होते.. अगदी अहिंसे पासुन ते फाळणी पर्यंत.. हे इथे सांगतच आहात तर मग मी विचारतेय त्या मुद्द्याला सोयिस्कर बगल का देताय?

मात्र सशस्त्र क्रांतीबाबत लिहिणारे नेहमीच जातायेता गांधींना टपल्या कशा मारता येतील ते पाहत असतात.

असेलही.. पण एरवी तावातावाने मुद्दे लिहीणारे मात्र गांधीच्या बाबतीत काही मुद्दे (काही ठराविक सत्याचे प्रयोग) मात्र विसरतात हे ही तेवढेच खरे..

तुम्हाला वाद घालायचाच असेल तर घाला, मी मात्र सरळ मनाने प्रष्न विचारला आहे. माझी गांधींबद्दलची बरीच मते इथे असलेली चर्चा वाचुन बदलली कारण खुप जणांनी इथे त्याची उत्तम कारणमीमांसा केली आहे... उदा:- फाळणी.. पण तरीही जे प्रष्न शिल्लक रहातात ते मी विचारले आहेत. जर त्याचे ही निराकरण होणार असेल तर त्यात वाईट काय?

आजानुकर्ण's picture

6 Feb 2013 - 8:04 pm | आजानुकर्ण

फरक तर खुद्द गांधींच्या मतानेही पडत नाही हो. पण त्यांची मते, विचार, निर्णय हे कसे योग्य होते.. अगदी अहिंसे पासुन ते फाळणी पर्यंत.. हे इथे सांगतच आहात तर मग मी विचारतेय त्या मुद्द्याला सोयिस्कर बगल का देताय?

सोयीस्कर बगल दिलेली नाही. अहिंसेपासून फाळणीपर्यंत स्वतः गांधी जिवंत होते. त्यांनी स्वतः त्या मुद्द्यांवर स्वतःची मते व्यक्त केली आहेत. बलात्काराबाबत त्यांनी काही मत व्यक्त केल्याचे माझ्या वाचनात आले नाही.

. पण एरवी तावातावाने मुद्दे लिहीणारे मात्र गांधीच्या बाबतीत काही मुद्दे (काही ठराविक सत्याचे प्रयोग) मात्र विसरतात हे ही तेवढेच खरे..

ते मुद्दे कोण विसरले आहे हे कळले नाही. येथे कोणी त्या ब्रम्हचर्याबाबतच्या मुद्द्यांचा प्रतिवाद किंवा गांधींना असे केलेच नाही वगैरे म्हटले आहे काय? या मुद्दयांबाबत गांधींनी स्वतः त्यांची पुस्तके आणि वर्तमानपत्रातील लेख यामध्ये लिहिले आहे. स्वतः गांधींनीही त्याबाबत काही लपवलेले नाही.

माझी वाद घालायची इच्छा नाही पण सरळ उत्तर हेच आहे की गांधींनी बलात्काराबाबत काही स्पेसिफिक विधाने केलेली नाहीत. त्यांच्या अहिंसेचा हवा तसा सोयीस्कर अर्थ लावून गांधीजी बलात्कार सहन करायला सांगत होते का (आणि आसाराम बापूंशी तुलना) वगैरे अर्थ काढणे हे सरळ मनाने विचारलेले वाटत नाही एवढेच सांगायचे होते.

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2013 - 3:08 pm | पिलीयन रायडर

बलात्काराबाबत त्यांनी काही मत व्यक्त केल्याचे माझ्या वाचनात आले नाही.

हे घ्या..

http://misalpav.com/comment/456420#comment-456420
6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote: “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (D Keer, Mahatma Gandhi, Popular Prakashan, p. 473). Just before the partition, when both the Hindu and Sikh women were being raped by Muslims in large numbers in West Punjab, Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth, advised Gandhi (Lapierre and Collins, p. 479).

ही मदनबाण ह्यांची प्रतिक्रिया पहा. हे वाचुनच मला काही प्रश्न पडले होते जे मी विचारले आहेत. आता जर तुम्ही गांधींनी जे जे काही केलं..किंवा त्यांच्या सोबत जे जे घडलं..अहिंसा, सत्याचे प्रयोग पासुन ते फाळणी, त्यांचा खुन/ वध.. सगळं कसं योग्य/ अयोग्य होतं हे सांगत आहत.. (तुम्ही म्हणजे सर्व गांधीप्रेमी) तर मग ह्या मुद्या वरही तुमचे मत मला हवे आहे..

या मुद्दयांबाबत गांधींनी स्वतः त्यांची पुस्तके आणि वर्तमानपत्रातील लेख यामध्ये लिहिले आहे. स्वतः गांधींनीही त्याबाबत काही लपवलेले नाही.

हो सांगितयल ना.. पण म्हणुन ते योग्य होत नाही.. इतर स्त्रियांसोबत नग्न झोपणे की अंघोळ करणे हे तुम्हाला योग्य वाटतं का? ह्यावर्ही मत द्यावे..

तुमच्या लक्षात येत नाहीये.. हे असे मुद्दे आहेत जे लोकांना गांधी द्वेषी बनवतात.. त्यांचं मत कलुषित करतात..

आणि मला हेच सांगायचे आहे की मी गांधीप्रेमी ही नाही आणि द्वेषीही नाही.. माझे मत अजुन बनत आहे.. चर्चा वाचुन बदलत आहे.. मुळात कुठली तरी एक बाजु घेतलीच पाहीजे असा माझा अट्टहास नाही. पण ज्याला तुम्ही राष्ट्र्पिता/ महात्मा म्हणता त्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्यावर चर्चा होणारच.. तीच करायचा माझा हेतु आहे. तुम्हाला माझे हेतु सरळ वाटो न वाटो, मी तुम्हाला वैयक्ति़ काही विचारलच नाहीये..

त्यांच्या अहिंसेचा हवा तसा सोयीस्कर अर्थ लावून गांधीजी बलात्कार सहन करायला सांगत होते का (आणि आसाराम बापूंशी तुलना) वगैरे अर्थ काढणे हे सरळ मनाने विचारलेले वाटत नाही एवढेच सांगायचे होते.

मी कुठे "सोयिस्कर" अर्थ लावलाय हे ही सांगा..
गांधी अहिंसावादी होते म्हणजे त्यांनी नक्कीच बलात्काराला सहन करा असं "म्हणलं असेल.." असा "शोध" मी लावत नाहीये..

हे ही वाचा... http://digitaljournal.com/article/321957

वाहीदा's picture

7 Feb 2013 - 4:07 pm | वाहीदा

तुम्ही दिलेल्या दुव्याखालील http://digitaljournal.com/article/321957 प्रतिसाद वाचावा

quote
Mar 28, 2012 by Hans Smedbol
#3
among many erroneous statements of fact, i have chosen to illustrate one error with the information provided in Wikipedia about the death of Kasturba Gandhi...which completely disagrees with your assertion that he refused proper medical treatment to his wife:
"....then came a relapse.
The doctor said Ayurvedic medicine could do no more for her. To those who tried to bolster her sagging morale saying "You will get better soon," Kasturba would respond, "No, my time is up." Shortly after seven that evening, Devdas took Mohandas and the doctors aside. In what he would later describe as "the sweetest of all wrangles I ever had with my father," he pleaded fiercely that Ba be given the life saving medicine, even though the doctors told him her condition was beyond help. It was Mohandas, after learning that the penicillin had to be administered by injection every four to six hours, who finally persuaded his youngest son to give up the idea. "Why do you want to prolong your mother's agonies after all the suffering she has been through?" Gandhi asked. Then he said, "You can't cure her now, no matter what miracle drug you may muster. But if you insist, I will not stand in your way."[1]"
i don't know how you can read that to imply that Gandhi refused treatment to his wife. First he went along with the Ayurvedic medical approach, which many if not most Indians of that day, and indeed this day, would first pursue in hopes of relief.
and she appeared to improve at first for a while...then the relapse...the Vaidyas (the ayurvedic doctors) declared her beyond hope of their care....
other allopathic doctors (or vaidyas with western medical training) were consulted about the new penicillin treatment...they suggested that it wouldn't work now...Gandhi listened to this, and being realistic asked his grief stricken son, if it wouldn't be better to just let his mother go, rather than stick a needle into her arm or bum or whatever every four to six hours, causing her a lot of pain with no gain, because the doctors thought it hopeless.
but in the end of his statement, he bowed to the will of his son in this matter....if the son wanted to insist on Penicillin treatment he would not stand in the way.
how do you interpret this to be a refusal of treatment. hindsight is a wonderful view...it's 100%....we can look back and decide that Gandhi's approach was wrong, and that he should have gone for the pencillin treatments much earlier...but this was 1944...Indians had every right in those days to rely upon Ayurveda FIRST and allopathic medicine second...even today this kind of treatment is often followed by Indians and others who respect Ayurveda....first the Ayurvedic medicine...and if that doesn't help enough...they go to the Allopathic medicine....unless of course it appears to be an emergency...life or death....
Penicillin was not yet widely used in those days, and the injections every four to six hours would have been painful...as there was no hope of the treatment succeeding (according to the doctors' advice at least), how was Gandhi remiss in his discussions with his son?
it seems to me that you are an anti-Gandhi type, because quite a few of the arguments you use are open to other interpretations than your own, and some of them are outright wrong, such as that accusation above of Gandhi denying his wife essential treatment for her Bronchial infection. He did the best he could with what he knew, medically speaking, at that time. i think he acted out of compassion towards his wife, rather than cruelty....he saw how much she was already suffering from her heart disease, and the chronic bronchial troubles (brought on in childhood).....he saw that even if she did "recover" it wouldn't be a real recovery, because of the heart disease, which was killing her slowly and painfully. but he did not stand in the way of his son's administering the anti-biotics...he only advised against it, at that time, for some very plausible reasons, in my view.
also quinine at that time was an already well established medical resource against Malaria, even if not a traditional Ayurvedic medicine. it was administered in India so regularly that Schweppes put it into their "Tonic Water", where you can still find it. i guess they thought that the amount of Gin and Tonics that the Brits used to drink in India, would provide therapeutic amounts of quinine.

Read more: http://digitaljournal.com/article/321957#tab=comments&sc=0#ixzz2KCueBL9f

अन (मदन)बाळाने जे डकविले आहे ते धनंजय किर यांच्या पुस्तकातील आहे जे त्यांचे स्वतःचे गांधीबध्द्ल मत आहे that is his own interpretation of Gandhiji and can not be read as Gandhi has stated although he claims it so त्यामुळे पास. Due respect to his great(?) writing abilities, मी धनंजय किर यांच्याबाबतीतही बरेच वाचले आहे पण मला ते येथे देणे योग्य वाटत नाही .

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2013 - 5:09 pm | पिलीयन रायडर

ते आर्टिकल मी दिलं एक मत प्रवाह दाखवायला. त्या खालील प्रतिसादात जे लिहिलय ते माझ्या मुद्द्याला धरुन नाही.. त्यावर काही भाष्य? दुसरं असं की त्या सत्याच्या प्रयोगांबद्दल काय म्हणायच मग? का ते तसं वागायचे मुलींसोबत? का तेही खोटं आहे? असं काही वाचनात आलं की मग ह्या बलात्कारा सारख्या मुद्द्यावर विश्वास बसु शकतो..
बर..
धनंजय कीर कोण? त्यांच मत अस कशावरुन बनवलं त्यांनी? ते खोटं लिहीत असतील तर मग कुणी त्यावर आक्षेप घेतला आहे का? तुम्ही इथे लिहीणार नाही म्हणताय.. मग तुम्ही मला व्यनी का करत नाही?

अन हो येथे ही अन बरेच ठिकाणी बरेच जणं बरेच काही आक्षेपार्ह्य लिहीतात / बोलतातही अन ते तुनळीवर प्रकाशित ही करतात . पण आक्षेप घेण्यासाठी वेळ ही असायला हवा ना ? पण डोक्यावरुन पाणी जायला लागले की कधीतरी त्यावर आक्षेप ही घेतला जातो पण मग तो प्रतिसाद मिटविला जातो. गप्प बसणे म्हणजे ते accept करणे होत नाही. 'सत्याचे प्रयोग' या वर बर्‍याच चर्चा झाल्या आहेत व होतील.
असो,
हाथी चले अपनी चाल,
कुत्तर भुके तो भुकवा दे !! हा आमचातरी मुलमंत्र आहे.
(येथे कुत्तर अन हाथी हे व्यक्तीशः कोणालाही संबोधायचे नाही )
अन धनंजय कीर यांच्याबध्द्ल मला लिहीणे जाऊद्या , पण बोलण्यातही रस नाही
सच्चाई छुप नहीं सकती,
बनावट के उसुलोंसे,
के खुशबु आ नहीं सकती कभी कागज के फुलोंसे ! :-)
असो , बाकी तुर्तास इतकेच ! शुभ रात्री !!
~ वाहीदा

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2013 - 8:02 pm | श्रीगुरुजी

मनोहर माळगावकरांच्या एका इंग्रजी पुस्तकात मी असे वाचले होते की फाळणीनंतर पाकिस्तानमधील बरीच हिंदू कुटुंबे दिल्लीला आल्यानंतर सुरवातीला त्यांना दिल्लीत फुटपाथवर/तंबूत रहावे लागले. त्यांना काही काळातच दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीचा सामना करायला लागला. त्यामुळे, मुस्लिम सोडून गेलेल्या काही मोकळ्या मशिदीत या कुटुंबांची तात्पुरती सोय करण्याचा सरकारचा विचार होता. पण काही मुस्लिमांच्या आक्षेपामुळे त्या कुटुंबांना मशिदीत आश्रय देण्यास गांधीजींनी विरोध केला व त्यामुळे ही योजना बारगळली.

हे खरे की खोटे याची मला कल्पना नाही. परंतु माळगावकर या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकात असे वाचल्याचे आठविते.

राही's picture

6 Feb 2013 - 8:37 pm | राही

दिल्लीच्या मशिदीत निर्वासितांना राहू दिले गेले नाही या बद्दल माहिती नाही.ते कदाचित खरे असेलही,पण देशभरात निर्वासितांची रहाण्याची सोय ज्या तातडीने आणि कार्यक्षमतेने करण्यात आली त्याला जगात तोड नाही.देश नुकताच स्वतंत्र झालेला,प्रशासनाची घडी न बसलेली,वाहतूक साधने नाहीत, बांधकाम साहित्यही तुट्पुंजे,देशभरातील रेल वे आणि असल्यानसल्या विमानसेवेसह कित्येक वाहने सीमेवर निर्वासितांच्या ने-आणीसाठी तैनात करावी लागलेली अशा स्थितीत भराभर कँप्स उघडून बराकी बांधण्यात आल्या.असे वाचले आहे की वाहतूक साधनांच्या टंचाईचा प्रभाव कश्मीरातल्या सैन्य आणि रसदपुरवठ्यावरही पडला.आधी सीमेवर येऊन ठेपलेल्या निर्वासितांना भराभर देशभर पांगवण्यात आले.खुद्द मुंबईमध्ये खार,सांताक्रुझ, गोरेगाव येथे मोठ्या वसाहती नव्याने बांधण्यात आल्या.उल्हासनगर हे नवे शहर वसवण्यात आले.याशिवाय बंगाल,गुजरात,राजस्थान, कर्णाटकातही निर्वासितांना वसवण्यात आले.तातडीची मदत दिल्यानंतर हे पुनर्वसनाचे कार्य जवळजवळ दोन वर्षे चालले होते.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2013 - 4:18 pm | पिंपातला उंदीर

बाकी नथुराम आणि त्याच्या तथाकथित संघटना यांचे स्वातंत्र्य लढ्यातल योगदान काय हा विषय पण उप चर्चेला घ्यायला हरकत नाही

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2013 - 1:02 am | निनाद मुक्काम प...

देशाला स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळाले
दुसर्या महायुद्धात ब्रिटीश साम्राज्य खिळखिळे झाले , वसाहतवादी फ्रांस , इंग्लंड देश उध्वस्त झाले , जगाच्या पटलावर अमेरिका ,रशिया ह्या नवीन महाशक्ती उदयाला आल्या , इंग्रजांची एक आख्खी पिढी उध्वस्त झाली , युद्धानंतर तेथील तरुण पिढीला स्वतःचा देश उभारण्याचे काम करायचे होते , परदेशात वसाहतीत जाणे त्यांना मान्य नव्हते ,
कधी नव्हे तो मजूर पक्ष इंग्लंड मध्ये सत्तेवर आला हे सर्व शक्य झाले ते दुसरे महायुद्ध झाले म्हणून
मजूर पक्ष भारताला स्वतंत्रता देण्याच्या बाजूने होता तर अमेरिका व रशिया वसाहत वादाच्या विरुद्ध होती कारण आता ते नवीन महासत्ता होते व युरोपियन देशांकडे वसाहती असणे म्हणजे स्वस्तात कच्चा माल व बाजारपेठ त्यांच्याकडे असणे म्हणजे त्यांच्याशी ह्या नवीन महासत्तेला असमतोल व विषम व्यापारी स्पर्धा करावी लागली असती ,
इंग्रजांनी भारताला स्वतंत्रता दिली ह्यामागे दुसरे महायुद्ध हे प्रमुख कारण आहे ,
तसे पहिले आपला शेजारी श्रीलंका सुद्धा शांततेच्या मार्गाने इंग्रजांशी लढा देत होते , मात्र १९४८ साली त्यांनी युद्धानंतर श्रीलंकेला इंग्रजांनी डोमिनन असा दर्जा दिला आणि मग १९७२ साली ते पूर्णतः स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले ,
गांधी सारखा महात्मा श्रीलंकेत चळवळ चालवत नव्हता किंबहुना तरीही इंग्रज तेथून टप्याने गेले , व त्यांनी पुढे अनेक आपल्या वसाहतींना गांधी सारखे नेतृत्व नव्हे
तरी इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले.
उचलले मीठ व साम्राज्याचा पाया खचला
अशी भंपक गिरी श्रीलंकन इतिहासात शिकवत नाहीत ,
दुसरे महायुद्धाने अनपेक्षितरीत्या वसाहतींना टप्प्याटप्याने स्वातंत्र्य मिळवून दिले.

ज्या इंग्रजांनी भारतिय स्त्रियांना बाटवले, अत्याचार केले, भारतिय पुरुषांची सतत सालटि सोलली त्या हरामखोर इंग्रजांविरुध्द अजिबात हात उगारु नका/ प्रत्युत्तर देउ नका/ गप्पपणे मार खा, मरा अथवा दुसरा गाल पुढे करा पण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या हिंसेला हिंसेने न्हवे तर केवळ अहिंसेनेच उत्तर द्या त्यांनी काहिही केले तरी शांतच रहा अशी लांछ्चनास्पद व संतापदायक, षंडदायक अधर्मीक साद समस्त भारतियबांधवांना घातल्या बद्दल स्वातंत्र्यापुर्वीच गांधिजींचा का बरे खुन झाला नाही ?

काही तरी नवीन विषय काढा बॉ ;)

नाही तर जुने धागे उपसा आणि अभ्यास वाढवा. कंटाळा आला बॉ आता;)

tech

तेच ते...

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

कवी - विंदा करंदीकर

विकास's picture

7 Feb 2013 - 10:42 pm | विकास

हे असेच जेंव्हा मिपाच्या सुरवातीच्या काळात चालू झाले होते, त्यावेळेस वैतागललेल्या तत्कालीन मालकाने या आणि अशाच काही विषयांवर लिहू नये असे म्हणले होते.

नाना चेंगट's picture

7 Feb 2013 - 10:54 pm | नाना चेंगट

हा हा हा
आणि तेव्हा तथाकथित गांधीप्रेमाने भारलेल्या सदस्यांनी खूपच आगपाखड केली होती.

सुनील's picture

7 Feb 2013 - 11:05 pm | सुनील

नक्की कोणत्या विषयावर लिहू नये असे म्हटले होते? (आणि कोणत्या विषयांवर लिहिल्यावर "मिपा आज पावन" झाला, अशा भावना व्यक्त केल्या होत्या?)

अर्थात, हे खाजगी स्थळ असल्यामुळे मालक-चालकांना अशी एकतर्फी बंधने घालता येतातच वा घालू असे इशारे देता येतात!

म्हणूनच शिळ्या कढीला आता पुन्हा पुन्हा उत आणत बसण्यापेक्षा, ते जुने धागे वाचा. तिथे हे सगळे आधीच चघळून झाले आहे, असे सांगायचे होते.

असो.

उपास's picture

7 Feb 2013 - 10:16 pm | उपास

जुन्या धाग्याच्या लिंक्स उसवल्या, एका दमात सगळं वाचून काढलं, बरं वाटलं. ह्या जुन्या धाग्यांना उसवण्यासाठी वहिदा,ऋषिकेश तसेच इतरांनी ते दुवे दिले म्हणूनच हे शक्य झालं. थत्ते, इंद्रा तसेच इतरांचे संदर्भपूर्ण पण संयत प्रतिसाद आवडले, चर्चेचा असा दर्जाच मिसळीला चव आणतो त्याचा प्रत्यय आला.

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2013 - 10:36 pm | श्रीरंग_जोशी

Truth_Can_be_troubled_cannot_be_defeated

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2013 - 12:08 am | निनाद मुक्काम प...

गांधींच्या उपोषणाची कारणे कोणती असे मी गांधीप्रेमी मिपाकरांना प्रश्न विचारला होता.
ह्यावर मला खरड वहीत ही खरड व कारण मिळाली.
शांततेसाठीच उपोषण होते यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी दिल्लीत त्यांची जाहिर सभा झाली. त्यात पुढील ७ अटी मान्य करण्यात आल्या
१. हिंदू मुस्लिम, शीख व इतर धर्मिय दिल्लीत भावाभावाप्रमाणे आणि सौहार्दाने राहण्याची हमी देत आहोत. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील अशी प्रतिज्ञा करीत आहोत.
२. गेल्या वर्षी प्रमाणे ख्वाजा कुतुबुद्दीन मझचा उरूस होईल.
३. सब्जीमंडी, करोलबाग पहाडगंज व अन्य भागांत मुसलमानांना नेहमीप्रमाणे व्यवहार पार पाडता येतील
४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत.
५. जे दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ इच्छितात त्यांना हरकत असणार नाहि व त्यांना पूर्वीचे रोजगार करण्यास प्रतिबंध केला जाणार नाहि
६. हे सारे प्रयत्न वैयक्तीक रित्या करू. यात शासनाची अथवा लष्करची मदत घेतली जाणार नाहि.
७. महात्म्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा व आपले उपोषण संपवावे आणि आम्हास नेतृत्त्व व मार्गदर्शन करावे.
त्यावर माझे मत मी असे व्यक्त केले ,

ज्या कारणासाठी उपोषण करण्यात आले असे येथे नमूद केले आहे , ते सर्व प्रथम दर्शनी मला थोतांड वाटते. ही कारणे खरी वाटत नाहीत.
मुळात ह्यात जी कारणे दिली आहेत , तिचा सरळ अर्थ असा होतो की हिंदू जनतेने भारतात मुस्लिम बांधवांची जप्त केलेली जमिनी , मालमत्ता किंवा मशिदी परत द्याव्या व त्यांना भारतात शांततेने जगू द्यावे
ही मागणी दंगलीच्या पार्श्वभूमीवर चूक की बरोबर हा मुद्दा सध्या विचारात घेतला नाही तरी ,
सामान्य भारतीय हिंदू जनतेकडून मुसलमान लोकांना भारतात निर्भयपणे राहण्यास हमी मिळावी असा त्याचा अर्थ होता.
आता ह्यावर समस्त हिंदू भारतीय जनता ज्यांची माथी भडकली आहेत , त्यांच्या वतीने स्वयंघोषित १३० जणांची शांतता कमिटी नेमली जाते ह्यात प्रसाद तमाम जनतेच्या वतीने शांततेची हमी देतात . हे किती हास्यापद आहे , मुळात आजच्या काळात ह्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का
उद्या पाकिस्तान १३० जणांची कमिटी नेमून पाकिस्तान मधील अल्प संख्यांक समुदायाची त्यांच्या सुरक्षित जगण्याची हमी तमाम मुस्लिम पाकिस्तानी जनतेच्या वतीने घेत असेल तर त्यावर विश्वास ठेवावा का

एखादे पुस्तक हा काही आधार होत ठरत नाही ,
मुळात प्रसाद ह्यांचे गांधी ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे हे म्हणणे म्हणजे मानभावी पणाचा कळस आहे,
मुळात हिंदूंचा मुस्लिम बांधवांच्या विषयी उद्रेक उफाळून येईल पर्यत गांधी मुस्लिम पुरस्कृत हिंसेवर तोडगा काढू शाळे नाही ,
त्याला उत्तर देणाऱ्या हिंदूला ते थांबवू शकले नाही ,
म्हणून जर समजा त्यांनी हिंदूनी शांतता राखावी व मुस्लिमांच्या मशिदी परत द्याव्या अश्या ७ मागण्या केल्या .
तर एकच प्रश्न असा उद्भवतो
प्रसाद व त्यांच्या १२९ सदस्यांना असे का वाटले गांधी ह्यांचे मार्गदर्शन भारतीय जनतेला विशेषतः हिंदू व शीख जनतेला उपयोगी ठरेल ,
कारण गांधी सुरवातीपासून हिंसेच्या विरुद्ध होते तरी पहिले मुसलमान व मग हिंदू , शीख ह्यांनी हिंसा केली ,

मुळात माझा सुरवातीपासून हा मुद्दा आहे की ५५ कोटी चा मुद्दा नाही ,
तर जनतेच्या भावनेचा कदर न करणे व काश्मीर वर हल्ला झाल्यावर त्यांनी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने काहीही विशेष न करणे
व त्यांच्या मनात पाकिस्तानला ५५ कोटी देणे जे त्यावेळच्या सरकारसह जनतेला नामंजूर होते ,
ह्या गोष्टी त्यांना हटवादी , व जनता च सरकारला इमोशनल ब्लेक मेल करणारा
ठरवतात

लोकशाहीत एक नागरिक जनतेच्या भावांची कदर न करता आपल्या मागण्या सरकार कडून वदवून घेतो ,
अरे मुळात गांधी ह्यांचे उपोषण स्थगित करावे म्हणून ही १३० मंडळी दंगलीत होरपळलेल्या हिंदू व शीख बांधवांचे प्रतिनिधित्व करत होती का
खुद भारतात मुसलमानी हिंदूची हिंसा केली अगदी कुर्ल्यात व मुंबईत ,मुस्लिम बहुल भागात हिंदूची कत्तल झाली ह्यात माझ्या आजोबांचे मित्र मारल्या गेले ,
तेव्हा भारतात मुसलमानांनी शांतता राखावी अशी मागणी उपोषणात का बरे मांडली नाही
कदाचित मुसलमान आपल्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावतील अशी भीती वाटली असेल.
फाळणी नंतर भारतात राहण्याच्या निर्णय घेणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मला आदर वाटतो ,
गांधींना पर्याय म्हणून त्यावेळी त्यांना मुस्लिम लीग चे छत्र लाभले ,
मुळात बोस व जीना एकेकाळी ज्या पक्षात होते त्या पक्षातून मुस्लिम दुरावण्यास
गांधी व त्यांचे अनुयायी जबाबदार आहेत.
मुळात धर्म व राजकारण अशी गल्लत खिलापत चळवळीला पाठिंबा देऊन गांधी ह्यांनी केली ,
नेताजी ह्यांनी आझाद हिंद सेनेतील इंग्रजांशी एकनिष्ठ मुस्लिम सैनिकांना देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले ह्यात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गांधी त्याच्या उमेदीच्या काळात सुद्धा भारतीय सैनिकांचे इंग्रजांच्या प्रती निष्ठा कमी करू शकले नव्हते ,
नेताजींनी मुस्लिम सैनिकांना देशाचा हवाला दिला धर्माचा नाही ,
आजच्या काळात सुद्धा त्यांचे विचार भारतात बाणवला जातात
मी प्रथम भारतीय मग धर्म येतो , तेथे गांधीच्या आश्रमात मुस्लिम फक्त अभक्ष्य भक्षण करतात म्हणून राहू शकत नव्हते अशी ही ह्या महात्म्यांची थोरवी ,

अवतार's picture

9 Feb 2013 - 11:19 am | अवतार

ह्यांनी आझाद हिंद सेनेतील इंग्रजांशी एकनिष्ठ मुस्लिम सैनिकांना देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले ह्यात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गांधी त्याच्या उमेदीच्या काळात सुद्धा भारतीय सैनिकांचे इंग्रजांच्या प्रती निष्ठा कमी करू शकले नव्हते ,
नेताजींनी मुस्लिम सैनिकांना देशाचा हवाला दिला धर्माचा नाही ,
आजच्या काळात सुद्धा त्यांचे विचार भारतात बाणवला जातात

ह्याच नेताजींनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणणे हा निव्वळ योगायोगच असू शकेल काय?

श्रीलंका येथील ब्रिटीश विरोधी चळवळीच्या नेत्यांकडून गांधींना बोलावण्यात आले होते. त्याचा हा दुवा.
Mahatma Gandhi's visit to Chilaw, Sri Lanka

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2013 - 2:23 pm | निनाद मुक्काम प...

श्रीलंकेत त्यांनी गांधी ह्यांना बोलावले असेल ,
आज त्यांच्या इतिहासात कोणा एका व्यक्तीला महात्मा बनवून त्याला श्रीलंका स्वातंत्र्य प्राप्तीचे फुकटचे श्रेय दिले जात नाही ,
दुसरे महायुद्ध हे वसाहत वाद संपवणारे ठरले ,हे जागतिक सत्य श्रीलंकन इतिहासात सांगितले जाते ,
युद्ध हे नेहमी बहुआयामी परिणाम कारक असते ,
अफगाण मध्ये रशिया युद्ध झाले
ह्यात अलकायदा व तालिबान ची निर्मिती झाली ,
पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज होतांना डोळे मिटून घेतलेल्या अमेरिकेच्या पैश्याच्या जोरावर काश्मिरी दहशतवाद पोसला , त्यांनी खलिस्तान चळवळीला पाठबळ पुरवले ,
पण हे युद्ध जेव्हा संपले तेव्हा रशिया फुटला
आणि भारताला कधी नव्हे तो साम्यवादी विळख्यातून मोकळा श्वास घ्यायला मिळाला.
आणि मग मनमोहन ब नरसिंह राव ह्यांनी खर्या अर्थाने भारताची आर्थिक व परराष्ट्र धोरण वसवले.
थोडक्यात दुसरे महायुद्ध हे जगाचा भूगोल बदलण्यात यशस्वी झाले.
नेताजी ह्यांना नवीन पक्ष स्थापन करावा लागला देशाच्या स्वतंत्रता संग्राम मध्ये त्यांचे व गांधी ह्यांचे विचार व मार्ग वेगवेगळे होते ,
गांधी ह्यांना त्यांनी महात्मा असे संबोधले तसे पहिले तर गेल्या दोन चार वर्षात
मोदी गुजरात मध्ये गांधी ह्यांचा हटकून उल्लेख करतात, तोही अत्यंत आदराने
तेव्हा राजकारणात केलेले वक्तव्य हे तेही एका नेत्याने दुसर्‍या नेत्याबद्दल हे तत्कालीन असू शकते ,किंवा त्यामागे गर्भित अर्थ असतात.

आता वाजपेयी ह्यांनी १९७१ च्या विजयानंतर ज्यांना आपल्या हिंदू देवतेची उपमा दिली त्यांच्या विषयी त्यांचे मत आणीबाणी नंतर नक्कीच बदलले होते.

तुम्हाला गांधी ह्यांच्या विषयी नेताजी ह्यांची मुलगी अनिता बोस ह्यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
अनिता बोस ह्यांनी आपल्या वडलांना कधीच पहिले नाही ,
मात्र आपली आई जी नेताजी ह्यांची पत्नी असण्यासोबत आधी त्यांची सेक्रेटरी होती , व नेताजी ह्यांचे भारताविषयी मत , भारतीय नेत्याच्या विषयी मत व त्यांच्या भारताच्या विषयी भविष्याबाबत योजना ह्या सर्व नेताजी ह्यांच्या पत्नीस माहिती होत्या ,
नेताजी , नेताजी हयंचे जर्मनी मधील कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
पुढे नेताजी ह्यांची कन्या अनिता बोस भारतात नेताजींच्या कुटुंबियांकडे नियमितपणे जायची,
एवढेच कशाला नेहरू ह्यांच्या शेवटच्या आजारपणात एक आठवडा त्यांना नेहरू ह्यांनी
त्यांना वास्तव्यास बोलावले होते,
तेव्हा नेहरू ह्यांनी आपल्या जुन्या मित्राबाबत अनेक आठवणींना उजाळा दिला.
कदाचित १९६२ च्या नंतर नेहरू ह्यांचा आपल्या सशस्त्र क्रांती करणाऱ्या मित्रांची आठवण होणे ह्यामागे काव्यगत न्याय होता.
एवढे सांगण्याच्या मागे एवढेच की अनिता बोस आपल्या वडलांना न भेटून सुद्धा तुमच्या आमच्या पेक्षा अधिक जाणत होत्या ,
त्यांनी रेडीफ मेल ला दिलेल्या मुलाखतीत गांधी वोज नो सेंट आणि नेताजी ह्यांच्याविषयी अनेक मत व्यक्त केली आहेत ,

जनता करत असते. जिथे जनता लढते तिथे फौजा निकामी होतात. १८५७ ची क्रांती ही सशस्त्र क्रांतीच होती. परंतु जनतेचा पाठींबा न मिळाल्याने त्यातून परिणामकारक काहीही निष्पन्न झाले नाही हा इतिहास आहे. १६८९ मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर रायगड पडला. औरंगजेबची लाखोंची खडी फौज आणि प्रचंड आर्थिक ताकद यांच्या समोर पुरेशी शस्त्रे नसतांनाही सामान्य जनता लढली ती कोणत्या प्रेरणेवर? जिथे आदिलशाही आणि कुतुबशाही सारखी राज्ये टिकू शकली नाहीत तिथे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून लढण्याची उर्मी जनतेमध्ये कशी निर्माण झाली? प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. सत्य पाहण्याचा आणि ते समजून घेण्याचा आहे. क्रांती ही सामान्य जनतेच्या पोटात पेटलेल्या आगीतून निर्माण होते. बंदुकीच्या गोळ्यांतून नाही. ज्या क्रांतीला असा व्यापक पाया मिळत नाही ती यशस्वी होत नाही.

श्रीलंकेत गांधींना स्वातंत्र्य प्राप्तीचे श्रेय दिले जात नाही. पण तेथील स्वातंत्र्य चळवळ उभी राहण्यात गांधींचे योगदान नाकारता येत नाही. त्याशिवाय त्यांना तिथे बोलावण्याचे कारण नव्हते. गांधीजी श्रीलंकेत आलेच नव्हते असा इतिहास देखील तिथे शिकवला जात नाही.

ज्या नेत्याच्या पाठी जनता उभी नसेल तो फार काळ नेता राहू शकत नाही. गांधींशी मतभेद झाल्यावर नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडूक जिंकली खरी. पण हा पराभव आपला वैयक्तिक पराभव आहे असे गांधींनी जाहीर केल्यावर नेताजींचा काँग्रेसमधील पाठींबा कमी होऊ लागला होता. नेहरू पटेल सुभाष यांच्याकडे गांधीजींची माणसे म्हणूनच बघितले जात होते. गांधींच्या विरोधात उभे राहिल्यानंतर ह्यांच्यापैकी कोणालाही राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्ररीत्या नेता होणे कठीण होते. एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक, सैनिकी ताकद नसतांना त्याचा इतका प्रभाव का पडत असावा ह्याचे उत्तर फार सोपे नसले तरी अवघड निश्चितच नाही.

गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून स्वत:ची राजकीय पोळी जर नेताजींना भाजून घायची असती तर मुळात गांधींशी भांडून काँग्रेसमधून बाहेर पडण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. हेच काँग्रेसमध्ये राहून करणे त्यांना शक्य होते. पण तसे झालेले नाही. त्यामुळे ह्या विधानात गर्भित अर्थ शोधण्याची गरज नाही.
नेताजींच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेना विजयी व्हावी असे गांधींना मनातून वाटत होते हे मौलाना आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथात नमूद केले आहे. आणि दुसरे महायुद्ध हेच जर स्वातंत्र्य मिळण्याचे कारण मानायचे असेल तर मग नेताजी आणि इतर वीर क्रांतिकारक ह्यांच्या त्यागाचेही काहीच मोल राहत नाही. ह्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा देखील भंपकपणाच म्हणावा लागेल.
राज्यसत्ता ही सैन्यावर नाही तर लोकांच्या निष्ठेवर अवलंबून असते. जनतेच्या निष्ठा गमावून बसलेले राज्यकर्ते निव्वळ सैन्याच्या आधारावर राज्य करू शकत नाहीत. ब्रिटीश इंडियाच्या ज्या भागांवर गांधीजींचा प्रभाव कायम राहिला ते सगळे भाग स्वतंत्र भारतात सामील झाले आणि ज्या ठिकाणी गांधीजींचा प्रभाव कमी झाला ते भूभाग भारतापासून तोडले गेले हे ऐतिहासिक सत्य आहे. संस्थाने खालसा करण्याचे श्रेय निश्चितच सरदार पटेल यांचे आहे. पण त्या संस्थानांतील जनतेच्या मनात स्वतंत्र भारतात सामील होण्याची इच्छा कोणी निर्माण केली हे उघडपणे मांडले जात नाही.
साम्राज्यवादी राज्याचा प्रतिनिधी असलेला न्यायाधीश ज्यांचे महात्म्य मान्य करतो त्यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांकडून घेण्याची आवश्यकता नाही. एरवी गल्लीतील ब्रॅडमन देखील सचिन तेंडूलकरच्या चुका दाखवतच असतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2013 - 9:55 pm | निनाद मुक्काम प...

आपला काहीतरी गैरसमज झाला आहे ,
गांधीजी ह्यांचे ह्या लढ्यात योगदान कोणीच नाकारत नाही , सशस्त्र क्रांती , त्यांचे अनुयायी व क्रांतिकारक ह्या सर्वांचे समान योगदान होते , दुसरे महायुद्ध हे वसाहत वाद संपवायला कारणीभूत ठरले हे देखील निखालस सत्य आहे ,
आणि तुम्ही जर नेताजींचे मत विचारत असाल आधी हे लक्षात ह्या , ह्या जगात शाश्वत असे काहीच नसते , हेच मताच्या बाबतीत लागू पडते ,

तर मत हे परिवर्तनीय असते , आज महाराष्ट्राचे मुख मंत्री व मोदी हे घोटाळ्यात अडकले नसल्याने त्यांच्या बद्दल माझी प्रतिमा चांगली आहे , मात्र उद्या त्यांचे नाव एखाद्या घोटाळ्यात उघडकीस आले तर माझे मत नक्कीच बदलेले ,
टिळकांना त्यांच्या हयातीत जीना हे पुढे फाळणीचे खलनायक ठरतील अशी कल्पना सुद्धा नव्हती ,
सारे जहासे अच्छा ही कविता लिहिणारे कवी इकबाल पुढे वेगळे होण्याची भाषा करतील असे कोणालाच वाटले नव्हते ,
वाजपेयी ह्यांनी १९७१ नंतर इंदिरा गांधी ह्यांचे कौतुक केले त्यांना देवीची उपमा दिली पुढे आणीबाणी नंतर त्यांचे मत बदलले ,
नेताजी ह्यांचे मत बदलू शकते ,
मुळात जो भारताचा भाग गांधीजींच्या प्रभावाखाली नव्हता तो त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या मुस्लिम लीग च्या प्रभावाखाली होता ,
ह्या लोकांनी हिंसा देशावर लादली ह्या हिंसेवर गांधी ह्यांच्याकडे उत्तर नव्हते.
आजच्या काळात त्यांची फाशी ची शिक्षा नको हि विचारसरणी अफजल गुरु ला फाशी दिल्यावर आपल्या जनतेने फटाके फोडून आनंद व्यक्त करून साजरा केला ,
गांधी हे राजकीय नेते होते व इतर नेत्यांप्रमाणे त्यांचे भारताच्या स्वतंत्र संग्रामात योगदान आहे , पण ते महात्मा नक्कीच नव्हते ,
साने गुरुजी , स्वामी विवेकानंद , विनोबा भावे , र धो कर्वे त्यांचे वडील , संत गाडगे महाराज , असे अनेक द्रष्टे महात्मे ह्या देशात होऊन गेले ,ज्यांनी ह्या देशातील समाज सुधारणा करण्यासाठी समाजातील एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आपले जीवन वेचले , आपल्या निवडलेल्या जीवन ध्येयाशिवाय उगाच आपली अनेक विषयांवर असलेली मते जनतेवर लादली नाहीत.

क्रांती जनता करत असते ही पुस्तकी वाक्ये झाली
सध्या आपली भारतीय जनता पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद लष्करी मार्गाने सोडवावा ह्या मताची आहे , आतंकवादी फाशीवर चढवावे ह्या मताशी आहे ,
पाकिस्तानबाबत सामान्य भारतीय जनता अहिंसक मार्गाने उपोषण करून प्रश्न सुटेल
ह्या मताची बिलकुल नाही आहे , व देशात हिंसेचा म्हणजे क्रिमिनल रेट पहिला तर गांधी ह्यांची तत्वे किती ठिसूळ होती व सध्या तिचा अपवाद वगळता वास्तविक जीवनात कोठेच वापर केला जात नाही हे दाहक सत्य तुम्ही नाकारत असाल , तर मग हे राम असेच म्हटले पाहिजे.

आणि संभाजी राजाच्या मृत्यूनंतर जनता लढली ती काही अहिंसक मार्गाने नव्हे तर सशस्त्र लढा देऊन ह्यातून तुम्हीच म्हटल्या प्रमाणे १८५७ चा लढा यशस्वी झाला नाही पण औरंगजेब विरुद्ध सशस्त्र लढा यशस्वी झाला ह्याचा अर्थ सशस्त्र लढ्याला जनतेची साथ असेल तर मुघल सम्राट ज्याचे वशंज इंग्रजांच्या हून जास्त शतके दिल्ली वर सत्ताधीश होते तो पराभूत झाला ,
आता प्रश्न असा निर्माण होतो की इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा संपूर्ण भारतात का बरे एकच वेळी उभारल्या गेला नाही ,
संपूर्ण भारतभर गांधी पोहोचले हे त्यांचे यश आहे हे मी मानतो
बहुतांशी भारतात त्यांचे कमी अधिक प्रमाणात अनुयायी निर्माण झाले ,
त्यांनी सशस्त्र लढा उभारला असता तर इंग्रज अमेरिकेतून जसे पळाले तसे
भारतातून पळाले असते ,
आता अमेरिकेतून इंग्रज हाकलल्या गेले ते सुद्धा वॉशिंग टन ह्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकन जनतेने उपोषण व अहिंसक मार्गाने आपला लढा चालवला. असेच म्हणावे लागेल.

प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. सत्य पाहण्याचा आणि ते समजून घेण्याचा आहे.

नेताजी ह्यांचे मत बदलू शकते
अगदी बरोबर आहे. ह्याच नेताजींनी एके काळी गांधीजी हे आउटडेटेड फर्निचर आहे असे म्हटले होते. त्याच नेताजींनी नंतर त्यांना राष्ट्रपिता म्हटले. आउटडेटेड फर्निचर ते राष्ट्रपिता हा प्रवास आश्चर्यजनक आहे.

आपले मत देशावर लादणे.
लादणे ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा? एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक, सैनिकी ताकद नसतांना त्याचा इतका प्रभाव का पडत असावा ह्याचे उत्तर फार सोपे नसले तरी अवघड निश्चितच नाही.

क्रांती जनता करत असते ही पुस्तकी वाक्ये झाली
ज्यांच्यासाठी क्रांती करायची त्यांचाच पाठींबा नसेल तर त्या क्रांतीला मुळातच काही अर्थ राहत नाही. क्रांती म्हणजे प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथून नवीन राजवट स्थापन करणे. जनतेच्या सहभागाशिवाय हे करणे कसे शक्य आहे ह्याचा उलगडा होणे कठीण आहे. अगदी अलीकडे अण्णा हजारे यांनी जे आंदोलन केले ते शस्त्रांच्या कमतरतेमुळे नव्हे तर जनतेच्या उदासीनतेमुळे अयशस्वी ठरले.

पण औरंगजेब विरुद्ध सशस्त्र लढा यशस्वी झाला
लढा सशस्त्र होता म्हणून नाही तर जनतेची त्या लढ्याला साथ होती म्हणून यशस्वी झाला. हे तुम्हीच मान्य केले आहे.

मुळात जो भारताचा भाग गांधीजींच्या प्रभावाखाली नव्हता तो त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या मुस्लिम लीग च्या प्रभावाखाली होता
स्वतंत्र मुस्लिम मतदार संघ १९०९ मध्ये अस्तित्वात आले. त्याला टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९१६ मध्ये लखनौ करार करून अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर गांधींनी मुस्लिम लीगशी एकही करार केला नाही. १९४६ साली सत्तांतराची वेळ जवळ आली तेव्हा दंगली घडल्या. मुस्लिम लीगला मिळणाऱ्या बहुसंख्य मुस्लिम मतांच्या आधारावर पाकिस्तान अस्तित्वात आले. दंगलींच्या आधारावर नव्हे.

संपूर्ण भारतभर गांधी पोहोचले हे त्यांचे यश आहे
हे फक्त गांधीच करू शकले कारण ह्या देशातील जनतेची मानसिकता त्यांनी नीट ओळखली होती. जी साधने गांधींना उपलब्ध होती तीच साधने इतर नेत्यांना देखील उपलब्ध होती. तरीही लोक गांधींच्याच पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे. जे नेते प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम जनतेच्या पुढ्यात ठेवतात त्यांच्या पाठी जनता उभी राहते. संपूर्ण जनता सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ शकत नाही हे सत्य सर्वांनाच कळत होते. अशा लढ्याचे परिणाम काय झाले असते हे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच कळत होते. ब्रिटिशांना भारतातून घालवणे हे महत्वाचे होतेच. पण स्वतंत्र भारत एकसंध ठेवणे हे त्याहूनही जास्त महत्वाचे होते. स्वतंत्र भारतात सामील होण्याला केवळ मुस्लिम लीगचाच नव्हे तर बऱ्याच हिंदू संस्थानिकांचाही विरोधच होता. शिखांचीही स्वायत्ततेची मागणी पुढे आली होती. द्रविडीस्तानची मागणी केली जात होती.
अशा परिस्थितीत नि:शस्त्र पण बहुसंख्य असलेल्या जनतेच्या रेट्याच्या दडपणाशिवाय आजचा विशाल एकसंध भारत अस्तित्वात येऊ शकला नसता. हे सगळ्यात महत्वाचे कार्य गांधीजींनी केले आहे. त्यांना महात्मा म्हटले नाही तरी आधुनिक भारत घडवण्यात त्यांचे योगदान हे इतर सर्वांपेक्षा मोलाचे होते हे निखळ सत्य आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2013 - 5:22 pm | निनाद मुक्काम प...

एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक
देशात तेव्हा मुठभर उद्योजक होते त्यातील बजाज सारखे असंख्य गांधी भोवती घुटमळत होते.
आउटडेटेड फर्निचर ते राष्ट्रपिता हा प्रवास आश्चर्यजनक आहे.
आउटडेटेड फर्निचर ही पदवी संविधानात बसते का
गांधी व नेताजी एकमेकांच्या देशभक्ती विषयी साशंक नव्हते मात्र त्याच्या स्वतंत्रता मिळवण्याच्या मार्ग वेगवेगळे होते , आणी गांधी ह्यांचा अहिंसक तत्वे निदान भारतात तरी काळाच्या ओघात नष्ट झाली ,
मुळात गांधी ह्यांनी तत्कालीन समाजाला अहिंसक व भेकड तत्वाच्या गुंगीत ठेवले ,
पुढे त्यांच्या अवती भवती बालपण घालवलेल्या इंदिराजी नी आपले वडील व गांधी ह्यांच्या उलट राजकारण केले , ह्यात १९७१ चे युद्ध असो किंवा आणीबाणी
जेथे त्यांच्यावर महात्म्याच्या महात्म्य प्रभाव टाकू शकले नाही तेथे आजच्या घडीला भारतीय जनतेच्या वर हा प्रभाव कसा राहीन.
लढा सशस्त्र होता म्हणून नाही तर जनतेची त्या लढ्याला साथ होती म्हणून यशस्वी झाला. हे तुम्हीच मान्य केले आहे.

मी हे मान्य केले आहे पण तुम्ही मान्य केले आहे का
इंग्रजांच्या विरुद्ध गांधी ह्यांनी बहुसंख्य जनता त्यांच्या पाठीशी असतांना सशस्त्र लढा का नाही उभारला हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे ,
मुळात गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांती चे नुसते नाव काढले असते तर अंदमान मध्ये त्यांची तेलाच्या घाण्याला १२ तास दिवसाचे ड्युटी लागली असती , आणि तेथे नरकयातना भोगून
ते भारतात जिवंत आले असते तर त्यांना त्यांचे महात्म्य जनतेला दाखविण्याची संधी मिळाली असती ,
पण इंग्रजांनी गांधी ह्यांचा अंदमान च्या काळा पाण्याच्या शिक्षेसाठी विचार सुद्धा केला नाही ,
नेताजी एकटे देशाबाहेर पडले , व देशाच्या साठी सशस्त्र क्रांती उभारली , त्यावेळी जर ते इंग्रजांच्या हातात सापडले असते तर त्यांची रवानगी सुद्धा अंदमान येथे नक्की होती किंवा भगत सिंह सारखा फास नशिबी होता ,
त्यांना आश्रमांत बसून सत्याचे प्रयोग करणे जमले नाही ,

गांधींनी मुस्लिम लीगशी एकही करार केला नाही. १९४६ साली सत्तांतराची वेळ जवळ आली तेव्हा दंगली घडल्या. मुस्लिम लीगला मिळणाऱ्या बहुसंख्य मुस्लिम मतांच्या आधारावर पाकिस्तान अस्तित्वात आले. दंगलींच्या आधारावर नव्हे.
तुमच्या लिहिण्याचा तुम्हाला अर्थबोध झाला आहे का अशी शंका आली.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सत्तांतर जवळ आले नि दंगली झाल्या म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान साठी दंगल झाली ,
मुळात जेथे मुस्लिम लीग ची सत्ता होती तेथेच प्रामुख्याने दंगली झाल्या
पण पंजाबात व बंगाल मध्ये ह्या दंगली होत होत्या तेव्हा मुस्लिम लीग पुरस्कृत होत्या तेव्हा ह्या दंगलीत जे हिंदू , शीख मरत होते किंवा बलात्कार होत होते तेथे गांधींच्या पक्षाची सत्ता नव्हती थोडक्यात त्या भागात गांधी ह्यांचा प्रभाव नव्हता
तेव्हा जर हिंदू व शीख समुदायाला गांधी वाचवू शकत नव्हते तर त्यांना प्रतिकार करण्यापासून गांधी का परावृत्त करत होते ,अहिंसेचा फुकटचा सल्ला देण्याचा त्यांना काय अधिकार ,
इंग्रजांनी लष्कराचा वापर करण्यास नकार दिला तेव्हा हिंदू व शीख ह्यांनी हिंसेला कसे उत्तर द्यावे जेथे सत्तेवर असलेला मुस्लिम लीग दंगेखोरांना पुरस्कृत करत होता.
ह्यांना शेळीचे दुध पियुन , सत्याचे प्रयोग करून शांतता राखण्याचे आव्हान करायला काय जाते ,
ज्याचे जळते त्याला कळते.
बहुसंख्य मुस्लिम असणारा भागात आपण हिंसा केली तर गांधी आणि त्यांची अहिसंक तत्वे आपले काहीही वाकडे करू शकणार नाही हि मुस्लिम लीग ला खात्री होती म्हणूनच त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला ,हे तुमच्या लक्षात आले आहे का
थोडक्यात हिंसा ही अहिंसेवर प्रभावी ठरली
उद्या त्याच वेळी शीख समुदाय जास्त असलेल्या भागात त्यांनी हिंसा सुरु केली असती तर
ह्याच अनुषंगाने पुढे धर्म हाच एक मुद्दा न राहता प्रत्येकाने प्रादेशिकता ह्या मुद्यावर हिंसा सुरु केली असती तर ....
ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे
इंदिरा गांधी ह्यांनी बांगला देश निर्मितीच्या वेळी बी बी सी च्या आगाऊ पत्रकाराला हेच उत्तर दिले
त्याने विचारले तुम्ही लष्करी कारवाई का केली.
तेव्हा इंदिरा जी म्हणाल्या आमच्या समोर हिंसा , बलात्कार होत होते ते नुसते पाहून आम्ही गप्प बसायचे का
तुम्ही का नाही ज्यू लोकांची हिंसा झाली तेव्हा गप्प बसला ,
आता मुस्लिम लीग च्या हिंसेला इंग्रजांनी लष्करी हस्तक्षेप नाकारला तेव्हा त्यांच्या हिंसेला उत्तर देणे हे जनतेच्या हातात होते , जेथे वेळप्रसंगी गवताला देखील भाले फुटतात त्या देशात मुस्लिम लीग च्या गाव गुंडांना उत्तर देणे आपल्याला सहजशक्य होते.

अवतार's picture

10 Feb 2013 - 8:57 pm | अवतार

देशात तेव्हा मुठभर उद्योजक होते
गांधींभोवती त्या काळचे सर्वच राजकारण आणि समाजकारण फिरत होते. त्यातच हे उद्योजक देखील होते. हे उद्योजक गांधीजींना वैयक्तिक मदत करत नव्हते. काँग्रेस या संघटनेला आर्थिक मदत करत होते. वर म्हटल्याप्रमाणे जी साधने गांधींना उपलब्ध होती तीच साधने इतर नेत्यांना देखील उपलब्ध होती. तरीही लोक गांधींच्याच पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे.

आउटडेटेड फर्निचर ही पदवी संविधानात बसते का
संविधानात काय बसते आणि काय नाही याचा विचार करायचा झाला तर इतर अनेक लोकांच्या पदव्या रद्द कराव्या लागतील. संविधानात वंदे मातरम म्हणण्याचीही सक्ती नाही. ते म्हणायला नकार देणारे देशद्रोही नाहीत. हे मान्य करण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी संविधानाचा कीस पाडायला हरकत नाही.

मी हे मान्य केले आहे पण तुम्ही मान्य केले आहे का
वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही.
जे अंदमानात १२ तास तेलाच्या घाण्यावर काम करत होते त्यांच्या सुटकेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि स्वत: गांधीजींनीही ब्रिटीश सरकारला विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी अहिंसेचा विचार केला नाही. गांधीजींनी जी आंदोलने केली ती आपल्याला कोणती शिक्षा होणार याची पर्वा न करता केली. ते काही राजकीय स्टंट नव्हते.

सशस्त्र लढा का नाही उभारला
सशस्त्र लढा कोणाच्या विरोधात उभारायचा होता? भारतात ब्रिटीशांची संख्या फक्त तीन लाखांच्या आसपास होती. इतर सर्वच ठिकाणी भारतीयच होते. हे सर्वच भारतीय अत्यंत निष्ठेने ब्रिटीश साम्राज्याचे रक्षण करत होते. अशा परिस्थितीत सशत्र लढ्याचे परिणाम काय झाले असते? इतकी साधी गोष्ट ज्यांना कळत नाही त्यांनी भारताचा इतिहास नीट समजून घ्यावा. पुरातन भारताचा इतिहास हा एकसंध भारताचा इतिहास नाही. अल्लाउद्दिन खिलजीपासून ते पानिपतपर्यंत आणि पोर्तुगीजांपासून ते ब्रिटीश साम्राज्यापर्यंत नजर टाकली तर कुठेही परकीय आक्रमणाचा प्रतिकार एकमुखाने झालेला दिसत नाही. अशा मानसिकतेतून आधुनिक राष्ट्रवाद कसा काय उभा राहणार होता? आज ज्यांना हिंसा करण्याची खुमखुमी आली आहे त्यांना हे हिंसा करण्याचे बळ कुठून प्राप्त झाले हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारून बघावा.

ज्याचे जळते त्याला कळते.
माझे आजोबा हे कराचीला राहत होते. पाकिस्तान निर्मितीच्या काळात त्यांना त्यांचे राहते घर आणि नोकरी सोडून कुटुंबासह भारतात परतावे लागले. इथे आल्यावर इतर निर्वासितांप्रमाणे त्यांना देखील मुंबईच्या फुटपाथवर काही दिवस काढावे लागले. माझे वडील आणि त्यांची इतर भावंडे तेव्हा खूपच लहान होती. तेव्हा फाळणीच्या जखमा काय असतात हे मला चांगलेच माहित आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते ह्याचा अर्थ मला कोणी शिकवू नये.
ब्रिटीशांच्या मूळ योजनेप्रमाणे त्यांनी ज्या संस्थानांकडून सत्ता काबीज केली होती त्यांच्याकडे सत्ता सोपवून परत जाण्याचा त्यांचा उद्देश होता. तसेच भारताला वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले होते. दुबळे केंद्र सरकार आणि शक्तिशाली प्रांतिक सरकारे अशा रचनेचा किती भयानक परिणाम भारतावर झाला असता ते वेगळे सांगण्याची गरज नसावी. ह्या योजनेला विरोध झाला नसता तर माझ्या आजोबांसारख्या असंख्य निर्वासितांना कायम निर्वासित म्हणूनच जगावे लागले असते. ही योजना जिन्ना यांनी मान्य केली असतांनाही नेहरूंनी उधळून लावली. हे गांधींच्या पाठींब्याशिवाय शक्य नव्हते. ज्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचे आरोप होतात त्यांनी हिंदूंच्या हिताचा विचार करणे हे आश्चर्यच म्हटले पाहिजे.

अहिंसेचा फुकटचा सल्ला देण्याचा त्यांना काय अधिकार
फुकटचा सल्ला अहिंसेचा असला काय किंवा हिंसेचा असला काय तो फुकटचाच असतो. दुसऱ्यांना चिथावणी देऊन स्वत: कपडे सांभाळण्याचे महान कार्य करणाऱ्यांच्या पाठी कोणीही उभे राहत नाही. दंगली थांबवण्यासाठी अनवाणी पायांनी कोण फिरत होते हे जगजाहीर आहे. अशा वेळी हिंसेचे समर्थन करणारे नेमके काय करत होते? आपल्या जीवाला धोका आहे हे उघड झाले असतांनाही जे पोलिस संरक्षण नाकारण्याची हिम्मत दाखवू शकतात त्यांनी दिलेला सल्ला हा अव्यवहार्य म्हणता येईल पण फुकटचा नक्कीच म्हणता येत नाही.

गांधींचा प्रत्येक विचार व्यवहार्य होता, शंभर टक्के बरोबरच होता असा माझा दावा नाही. किंबहुना स्वत: नेहरूंनीच गांधीप्रणीत अर्थव्यवस्थेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण ज्या आदर्शाच्या दिशेने मानव समाजाला वाटचाल करायची आहे तो आदर्श गांधींपेक्षा फार वेगळा असेल असेही वाटत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2013 - 10:28 pm | निनाद मुक्काम प...

@तरीही लोक गांधींच्या पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे.
बहुसंख्य मुसलमान तर मुस्लिम लीग च्या पाठी उभे राहिले व पाकिस्तान मध्ये म्हणूनच गांधींना हिंदूंचा नेता मानले जाते भले स्वतः गांधीनी स्वतःला तसे समजले नाही तरी , आणि आपण म्हटले तसे त्या काळचे सर्वच राजकारण आणि समाजकारण फिरत होते,
थोडक्यात व्यक्ती केंद्रित व्यवस्था निर्माण झाली होती, व त्याच्या पक्षात ही परंपरा
आजही पाळली जाते, आणि एकाच व्यक्ती भवती ह्या खंडप्राय देशाचे राजकारण चालावे हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने तेव्हाही व आजसुद्धा योग्य नाही आहे ,
@. दंगली थांबवण्यासाठी अनवाणी पायांनी कोण फिरत होते हे जगजाहीर आहे. अशा वेळी हिंसेचे समर्थन करणारे नेमके काय करत होते?
त्यांचे अनवाणी फिरणे हिंसा थांबवू शकले नाही , बलात्कार सुद्धा दंगल थांबवू शकले नाही
आणि देशाची फाळणी थांबवू शकले नाही , हे गांधी ह्यांचे अपयश होते.
मुळात मुस्लिम लीग ने इंग्रजांच्या सहाय्याने हातमिळवणी करून गांधी व त्यांच्या अनुयायांना हातोहात फसवले,, आझाद ह्यांनी आपल्या एका भाषणात इंग्रजांच्या नादी लागून तुम्ही देश तोडत आहात ह्याचे परिणाम वाईट होतील हे निक्षून सांगितले ,
पण तेव्हा वेळ निघून गेली होती ,
गांधी व त्यांचे अनुयायी ह्या सर्व प्रकरणात राजकारणाच्या सर्वच पातळीवर साफ निष्फळ ठरले ,
हिंसा अहिंसेवर प्रभावी ठरली व देश तुटला ,
म्हणूनच गांधी हे महात्मा ठरत नाहीत , ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढणारे एक स्वातंत्र्यसैनिक होते जसे सशस्त्र क्रांतिकारक होते ,
व्यक्ती गांधींचे अनेक विचार जेथे त्यांच्या अनुयायांनी मानले नाही व आजच्या काळात तर त्यांचा भारतात नगण्य प्रभाव आहे ,
ज्या देशात बुद्ध जन्मला त्याचे विचार , आचार त्याचे अनुयायी आजही जगभरात अनेक देशांमध्ये निष्ठेने पाळले जातात ,तो खरा महात्मा
उगाच महात्मा शब्दाचे अवमूल्यन करू नये.
गांधी , नेताजी , भगत सिंह आणि बाबू गेनू सारेच एका विचारधारेचे पाईक होते.सारेच भारत मातेची लेकरे होते ,
राष्ट्राचे सुपुत्र होते , त्यांना उगाच पिता बनवू नका.

अवतार's picture

10 Feb 2013 - 11:38 pm | अवतार

थोडक्यात व्यक्ती केंद्रित व्यवस्था निर्माण झाली होती
ज्या देशाला स्वत:चे सरकार नाही, संविधान नाही त्या देशातील जनतेचा साम्राज्यवादी सत्तेविरुद्धचा लढा हा व्यक्तीकेंद्रितच असतो. हा लढा सशस्त्र मार्गाने झाला असता तरी व्यक्तीकेंद्रितच झाला असता. नेताजींचा लढा देखील व्यक्तीकेंद्रितच होता. स्वतंत्र भारतात जी घराणेशाही निर्माण झाली त्याचा संबंध गांधींशी जोडणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. लोकशाही विषयी गांधींचे हे विचार आहेत:-
My notion of democracy is that under it, the weakest shall have the same opportunities as the strongest…. No country in the world today shows any but patronizing regard for the weak…. Western democracy, as it functions today, is diluted fascism…. True democracy cannot be worked by twenty men sitting at the center. It has to be worked from below, by the people of every village.

त्यांचे अनवाणी फिरणे हिंसा थांबवू शकले नाही
बंगाल आणि दिल्ली येथील दंगली कोणामुळे थांबल्या याचे उत्तर इतिहासाने दिलेले आहे. ज्यांचे प्रयत्न अपुरे पडतात त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हेतूंवर नाही. मुस्लिमबहुल भागांत हिंदूंनी मुस्लिमांना मारल्यावर मुस्लिम हातावर हात धरून स्वस्थ बसले असते असे ज्यांना वाटते त्यांना हिंदूंची कितपत काळजी आहे हे उघड आहे. जिथे आमचे सैन्य अपुरे पडले तिथे गांधीजी हे one man army असल्याचे खुद्द ब्रिटीश व्हाईसरॉयने जाहीर केले.

देशाची फाळणी थांबवू शकले नाही , हे गांधी ह्यांचे अपयश होते
जिन्ना यांना १६ मे ची योजना का मान्य होती आणि नेहरूंनी गांधींच्या पाठींब्याने ती योजना का उलथून टाकली हे कळले की असले प्रश्न पडत नाहीत. फाळणीचा प्रस्ताव हा स्वत: गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर मांडला आणि मान्य करवून घेतला. केवळ नेहरू, पटेल यांना हे गांधींशिवाय साध्य करणे अशक्य होते. मुस्लिम लीगला जे हवे होते ते देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून फाळणी झाली. दंगलींना घाबरून नव्हे.

हिंसा अहिंसेवर प्रभावी ठरली
अन्यायाचा प्रतिकार करण्याची दुर्दम्य इच्छा जनतेमध्ये निर्माण होणे हे महत्वाचे आहे. हिंसा-अहिंसा ही नंतरची गोष्ट आहे. शत्रूशी लढण्याची ज्यांची सिद्धताच नसते त्यांच्या हाती शस्त्रे देऊनही काही उपयोग नसतो. अल्लाउद्दिन खिलजीच्या आठ हजारांनी यादवांच्या लाखांची धूळधाण उडवली तेव्हा गांधीजी जन्माला आले नव्हते.

गांधी हे महात्मा ठरत नाहीत
गांधींना कोणी काय म्हणावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हटलेच पाहिजे अशी सक्ती नाही तसेच महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणूच नये अशीही सक्ती करता येत नाही. गांधींपासून किती देशांतील लोकांनी प्रेरणा घेतली आहे हे सांगण्याची गरज नाही. ज्यांचे नेतृत्व जनतेला मान्य असते त्यांच्याच बाबतीत यश-अपयशाची शक्यता निर्माण होते. ज्यांचे नेतृत्वच जनतेला मान्य नाही त्यांच्या यशालाही किंमत नसते आणि अपयशालाही महत्व नसते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Feb 2013 - 4:15 am | निनाद मुक्काम प...

@ज्या देशाला स्वत:चे सरकार नाही, संविधान नाही त्या देशातील जनतेचा साम्राज्यवादी सत्तेविरुद्धचा लढा हा व्यक्तीकेंद्रितच असतो.
अमेरिकेत त्यांचा लढा यशस्वी झाला पण जॉर्ज तेथे महात्मा बनला नाही.

मुस्लिम लीगला जे हवे होते ते देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून फाळणी झाली. दंगलींना घाबरून नव्हे.
ह्या अर्थाने खलिस्तान चळवळीच्या नेत्यांना हवे ते सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून देशाची फाळणी झाली का
नेताजींचा लढा देखील व्यक्तीकेंद्रितच होता.
सशस्त्र क्रांती ही व्यक्ती केंद्रित असती हे मान्य आहे ,निदान ह्यापुढे भारताचा इतिहास पाकिस्तान नेहमी आक्रमण करणार आणि भारत बचाव करत राहणार असे चित्र दिसले नसते. भारतचे स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही अशी अनेक धोरणे आपल्या परराष्ट्र नीतीत आली नसती , गांधी हे इतर राजकीय नेत्यासारखे नेते होते व सामान्य माणूस चुका करतो तसे नेते करतात. त्यांचे पाय मातीचे असतात. हे एकदा जाणून घेतले आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू,

सशस्त्र क्रांती ही व्यक्ती केंद्रित असती हे मान्य आहे ,निदान ह्यापुढे भारताचा इतिहास पाकिस्तान नेहमी आक्रमण करणार आणि भारत बचाव करत राहणार असे चित्र दिसले नसते. भारतचे स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही अशी अनेक धोरणे आपल्या परराष्ट्र नीतीत आली नसती , गांधी हे इतर राजकीय नेत्यासारखे नेते होते व सामान्य माणूस चुका करतो तसे नेते करतात. त्यांचे पाय मातीचे असतात. हे एकदा जाणून घेतले आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू,

पण गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांतीला पाठिंबा दिला असता तर मुस्लिम लीग ची स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या कल्पनेला वेळीच साम, दंड , भेद वापरून ठेसता आले असते ,
देशाची अखंडता कायम राहावी म्हणून अनवाणी पायाने हिंडून शांततेची भीक हिंस्र लांडग्यांच्या पुढे मागायची वेळ आली नसती , आणि पाकिस्तान निर्माण झाला तरी दंगली चालू होत्या वर काश्मीर समस्या निर्माण झाली , नेभ ळत अहिसंक नेतृत्व असल्यामुळे पाकिस्तानची हि हिंमत झाली.

जिथे आमचे सैन्य अपुरे पडले तिथे गांधीजी हे one man army असल्याचे खुद्द ब्रिटीश व्हाईसरॉयने जाहीर केले.

तुम्हीपण राव भलतीच कमाल करतात. देऊन देऊन कोणाचा दाखला दिला
ह्याच इंग्रजांवर मौलाना आझाद ह्यांनी मुस्लिम समाजाला संबोधत एका भाषणात ह्याच्या नादाला लागून तुम्ही पाकिस्तान निर्माण केला असे म्हटले आहे ,
हे भाषण खूप महत्त्वाचे ह्यासाठी आहे की ह्यात त्यांनी पाकिस्तान चे पुढे काय भविष्य असेल ह्याबाबत काही मुद्दे सांगितले होते. आणि ते पुढे खरे ठरले ,
सध्या पाकिस्तानात आझाद ह्यांच्या ह्या भाषणाचा आधार देत त्यांची भविष्यवाणी दुर्देवाने पाकिस्तान बाबत खरी ठरली ह्या अर्थी कार्यक्रम करण्यात आला.
क्लिप १२, ४७ पासून भाषण ऐका.

भारत व पाकिस्तान मधील दोन्ही बाजूने इंग्रजांना मुस्लिम व हिंदू मध्ये फाळणी दरम्यान संशयित म्हणून पहिले जाते,

क्लिप १२, ४७ पासून भाषण ऐका.

अवतार's picture

11 Feb 2013 - 10:49 am | अवतार

प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही.
हे वारंवार सांगतो आहे. त्याबाबत अधिक चर्चा नको.

पण जॉर्ज तेथे महात्मा बनला नाही
गांधींना कोणी काय म्हणावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हटलेच पाहिजे अशी सक्ती नाही तसेच महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणूच नये अशीही सक्ती करता येत नाही. हे देखील आधीच सांगितले आहे. तसेच अमेरिकेत जॉर्ज वॉशिंगटन आणि त्याच्या बरोबरीने जे स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते त्यांना फाउंडिंग फादर्स ऑफ द युनायटेड स्टेट्स असे संबोधण्यात येते. हे संबोधन राष्ट्रपिता या संबोधनापेक्षा तत्वत: कसे निराळे आहे याची उकल कृपया करावी.

भारत स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही
गांधींना ज्या प्रकारची लोकशाही अपेक्षित होती त्या मार्गाने नेहरू आणि पटेल गेले नाहीत. संस्थाने खालसा करतांना सैनिकी कारवाई करायला ते कचरले नाहीत. युनायटेड नेशन्स ने १९४८ मध्ये युद्धबंदीचे आवाहन केल्यावरही भारतीय सैन्य मागे आले नव्हते. शस्त्रसंधी १९४९ मध्ये झालेला आहे. ज्यांचे प्रयत्न अपुरे पडतात त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हेतूंवर नाही.

गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांतीला पाठिंबा दिला असता
सशस्त्र क्रांतीसाठी त्यावेळी किती लोक तयार होते हे सर्वांनाच माहित आहे. त्याचे परिणाम काय झाले असते हे देखील वरच सांगितले आहे. परत तीच चर्चा नको.

आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू
संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे याबाबत दुमत नाही. गांधी हे संविधानापेक्षा मोठे आहेत ही भूमिका चुकीची आहे. तसेच गांधींना विरोध करणारे, त्यांच्या खुनाचा कट रचणारे हे ही संविधानाच्या वर नाहीत. त्यांचेही पाय मातीचेच होते हे देखील मान्य व्हायला हरकत नसावी.

देऊन देऊन कोणाचा दाखला दिला
हे त्यांचे वैयक्तिक मत नसून ती वस्तुस्थिती आहे. दाखला वस्तुस्थितीच्या आधारे दिला आहे.

ह्याच्या नादाला लागून तुम्ही पाकिस्तान निर्माण केला
सशस्त्र क्रांती करणाऱ्या नेताजींनी जेव्हा जिन्ना यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मुस्लिम लीगला "ब्रिटीश सरकारपेक्षा अधिक काहीतरी" देण्याची तयारी दर्शवली होती. हे "अधिक काहीतरी" काय असू शकेल याचा अंदाज करता येऊ शकतो. सुरेंद्रनाथ बानर्जी ते टिळक आणि गांधींपासून ते नेताजींपर्यंत सर्वच नेते मुस्लिम लीगला मिळणारा मुस्लिम जनाधार काढून तो काँग्रेसच्या पाठी कसा उभा करावा ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत होते. १९१६ मध्ये लखनौ करारात लीगला जे मिळाले त्यानंतर १९४७ पर्यंत लीगची एकही मागणी काँग्रेसने मान्य केली नाही म्हणून फाळणी झाली. आम्ही त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असे जिन्ना म्हणत होते त्याचा हा अर्थ आहे. कोट्यावधी जनतेचे प्रश्न हे निव्वळ शस्त्रांचा वापर करून सोडवता येत नाहीत. त्यासाठी राजकारणच करावे लागते. कोट्यावधी जनतेला मारत सुटणे हा पर्याय व्यवहार्यतेच्या चौकटीत कसा बसवायचा ह्याचे उत्तर ज्यांना सापडले आहे त्यांनी तो पर्याय जरूर वापरून पाहावा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Feb 2013 - 2:04 am | निनाद मुक्काम प...

सत्य परिस्थिती अशी आहे की मुस्लिम बहुसंख्य भागात जेथे मुस्लिम लीग ची सत्ता होती तेथे त्यांनी हिंदू , शीख ह्यांचे खून व बलात्कार सुरु केले ते थांबवणे गांधी ह्यांच्या हातात नव्हते ,मात्र जेव्हा हिंदू व शीख चवताळून उठले तेव्हा त्यांना थांबवण्यात गांधी अग्रेसर होते , बहुसंख्य मुस्लिम दंगलकर्ते हे जीना ह्यांचे समर्थक असून गांधी त्यांना कोणत्याही प्रकारे थांबवू शकले नाही.
जीना फाळणी शिवाय दुसरे काही बोलत नव्हते, तर नेहरू ,गांधी पटेल हे फाळणीच्या विरोधात होते , अश्यावेळी अचानक एडविना ह्यांनी नेहरू ह्यांना दंगलीत होणारे मृत्यू व हानीचा दाखला देऊन फाळणीसाठी राजी केले ,
माउंटबेटन वर १९८६ साली बीबीसी ने एका टेलीविजन सिरीज केली त्यात ह्या घटनेचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे , एडविना व नेहरू ह्यांचे मधुर संबंध त्यांनी ह्यात स्पष्ट पणे दाखवले आहेत ,
माझ्यामते हे सत्य असल्याशिवाय आपल्यास एका बड्या अधिकाऱ्यांशी अशी खोटी बदनामी ते कशाला करतील , म्हणूनच आझाद ह्यांची त्यांच्या भाषणात माउंट बेटन
ह्यांना खलनायक संबोधत त्याने नेहरू व गांधी ह्यांना फाळणीला राजी केले ,

दोन्ही पक्ष आपापल्या मतावर ठाम होते व दंगल अव्याहत पणे सुरु होती ,
गांधी ह्यांचे दंगल थांबण्याचे प्रयत्न अपुरे होते कारण जेव्हा हिंदू व शिखांनी प्रतिकार करायला सुरवात केली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार हे पाहून फाळणीसाठी
मान्यता देण्यात आली , गंमत म्हणजे ह्याच माउंटबेटन ला नेहरू ह्यांनी स्वतंत्र भारतात पहिला गव्हर्नर म्हणून नेमले मात्र माउंटबेटन ह्यांची इच्छा असूनही जीना ह्यांनी त्यांना पाकिस्तानचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात साफ नकार दिला , म्हणूनच
पाकिस्तान मध्ये जीना ह्यांचा शब्द अंतिम होता तर काश्मीर वर हल्ला झाला तेव्हा नेहरू ह्यांना काश्मीर मध्ये सैन्य पाठविण्यात नकार देणारे हेच माउंटबेटन होते,
गांधी हतबल होऊन हा तमाशा पाहत होते ,
आता जीना ह्यांनी काश्मिरात त्यांचे सैन्य घुसले ते काय गांधी ह्यांनी उपोषण करून परत जाणार नव्हते ,
मुळात त्या जीनची एवढी हिंमत झाली कारण त्यांना आपल्या तत्कालीन नेभळट अहिंसक नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता जो आपल्या नेत्यांनी खोटा पडू दिला नाही.
मुळात जीना ह्यांनी उद्दामपणे पाकिस्तानात हिंसा सुरु ठेवली व काश्मीरवर आक्रमण केले तेव्हा गांधी ह्यांच्या हाताबाहेर परिस्थिती गेली होती कारण काश्मिरात घुसलेल्या
पाकिस्तानी सैन्य व पाकिस्तानात होणारे हत्याकांड गांधी कोणत्याही परिस्थितीस थांबू शकत नव्हते.

मुळात जो जीना दंगलीला जबाबदार आहे त्याच्याशी ही मंडळी चर्चा करत होती , त्याचवेळी ज्यू हत्या कांडाच्या नंतर जेव्हा हिटलर चा पाडाव झाला तेव्हा नाझी अधिकाऱ्यांना शोधून शोधून मारल्या गेले ,
मात्र भारत स्वतंत्र झाला तरी काश्मीरवर हल्ला झाला तरी पाकिस्तानात हिंदू व शीख मारल्या गेले तेथे पाकिस्तानात तर गांधी जाऊ शकत नव्हते व हिंसा थांबवू शकत नव्हते, तेव्हा त्यांनी भारतात मुसलमानाची हिंसा होऊ नये म्हणून प्रयत्न चालवले तेव्हा ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात मारत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा त्यांना शांतता राखा असे सांगणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते.
त्यावेळी जी गोष्ट लाल बहादूर शास्त्री ह्यांनी केली ती गांधी , नेहरू ह्यांनी करणे गरजेचे होते ,
जेव्हा १९६५ साली अनपेक्षितरीत्या काश्मीर वर आक्रमण झाले तेव्हा शास्त्री ह्यांनी दुसरी आघाडी अकस्मात पंजाबात उघडली.आपले सैन्य लाहोर पर्यंत पोहोचले व तह झाला.
पण गांधी व नेहरू हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले ,
प्रत्येक नेत्याचा उत्कर्षाचा एक काळ असतो व पडता काळ देखील ,
हिटलर ला डोक्यावर घेणारी जर्मन जनता पुढे युद्धाला कंटाळून त्याला नावे ठेवू लागली.
गांधी ह्यांना सुरवातीला सामान्य माणसाला राजकारणात सक्रिय केल्यामुळे ते लोकप्रिय नेते झाले , मात्र मुस्लिम लीग च्या राजकारणापुढे ते पुरते हतबल झाले.
म्हणूनच ते राजकीय नेते ,स्वातंत्र्य सैनिक ठरतात महात्मा नाहीत.

अवतार's picture

14 Feb 2013 - 5:23 pm | अवतार

गांधींना महात्मा म्हणायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. स्वत: गांधींनी असा आग्रह धरला नव्हता. ज्यांना ते महात्मा वाटतात त्यांना त्यासाठी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. ज्यांना ते महात्मा वाटत नाहीत त्यांनाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काही लोक गांधींना महात्मा मानतात म्हणून त्यांचे महत्व वाढत नाही आणि काही लोक महात्मा मानत नाहीत म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही.

जीना फाळणी शिवाय दुसरे काही बोलत नव्हते
१६ मे १९४६ची योजना ही भारताचे हिंदू वर्चस्व गट आणि मुस्लिम वर्चस्व गट असे विभाजन करणारी होती. बलुचिस्तान, सिंध, पंजाब हा गट तसेच संपूर्ण बंगाल आणि आसाम हा दुसरा असे गट मुस्लिम लीगच्या वाट्याला आले होते. ही योजना जिन्ना यांनी मुस्लिम लीग कौन्सिल समोर मान्य केली कारण त्यांच्या मते "ह्याच्याहून चांगले काही मिळणे शक्य नव्हते" [Nothing better could be obtained].
७ जुलै १९४६ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेत नेहरू हे अध्यक्ष झाले. १० जुलै ला नेहरूंनी पत्रकार परिषदेत घोषणा केली, "१६ मे च्या योजनेत हवे तसे बदल करायला काँग्रेस स्वतंत्र आहे." काँग्रेस ह्या योजनेत बहुमताच्या जोरावर हवे तसे बदल घडवू शकते हे जिन्ना यांना कळल्यावर त्यांनी २७ जुलै ला ही योजना धुडकावून लावली. परिणामी पाकिस्तानची मागणी पुढे रेटण्याशिवाय लीगकडे दुसरा पर्याय राहिला नाही. संपूर्ण बंगाल, आसाम आणि पंजाब यांच्याऐवजी अर्धा बंगाल आणि अर्धा पंजाब यांच्यावर समाधान मानणे लीगला भाग पडले. असले तुकड्यांत विभागलेले पाकिस्तान स्वीकारल्याबद्दल काही मुस्लिमांनी खुद्द जिन्ना यांच्यावरच हल्ला केला होता. आम्हाला कलकत्त्यापासून कराचीपर्यंत पाकिस्तान हवे आहे ही त्यांची मागणी होती.

नेभळट अहिंसक नेतृत्व
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. १९१६ च्या लखनौ करारात लीगच्या स्वतंत्र मतदार संघांना आणि सिंध च्या विभक्तीकरणाला मान्यता देणे हे टिळक यांचेच श्रेय आहे. ह्याच आधारावर पुढे मुस्लिम वर्चस्व गट तयार झाले. फाळणीची बीजे खऱ्या अर्थाने इथेच रोवली गेली.

एडविना व नेहरू
कोट्यावधी हिंदूंचे हित वाऱ्यावर सोडून देणाऱ्या योजनेला गांधी नेहरू पटेल हे संमती देऊच शकत नव्हते. २७ जुलै ला जिन्ना ह्यांनी ही योजना नाकारली.पाकिस्तानच्या मागणीसाठी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृतीचा दिवस जाहीर झाला. २२ मार्च १९४७ रोजी माउंटबेटन भारतात आला. त्याआधीच फाळणी अपरिहार्य ठरली होती. कोणत्याही परिस्थितीत फाळणी टाळणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट असते तर गोष्टी या थराला आल्याच नसत्या. एडविना व नेहरू यांच्या कथा मनोरंजक असल्या तरी वस्तुस्थितीशी त्याचा संबंध नाही.

जिथे हिंदूंची बहुसंख्याच नाही तिथे हिंसा किंवा अहिंसा कुठल्याच मार्गाने हिंदूंना ताकद दाखवणे शक्य नव्हते. आज काश्मीरमध्ये इतके सैन्य असूनही ती डोकेदुखी बनली आहे. संपूर्ण पाकिस्तान सैन्याच्या जोरावर जिंकून जरी घेतला तरी तो प्रदेश ताब्यात ठेवणे हे अशक्यप्राय आहे. प्रत्येक प्रश्न सैनिकी कारवाईने सुटत असता तर राजकारणाला महत्वच राहिले नसते.
जिथे आपली ताकद दाखवणे शक्य आहे तिथे नियंत्रण मिळवणे आणि जिथे शक्ती कमी पडते तिथे माघार घेऊन जे ताब्यात आहे त्यावर वर्चस्व राखणे ह्याला राजकीय शहाणपण म्हणतात. शिवाजी महाराजांनीही तेच केले. काँग्रेसच्या नेत्यांनीही तेच केले. राजकारण हा शक्तीचा खेळ आहे, भावनांचा नव्हे. ह्याचा विसर ज्यांना पडतो त्यांना आक्रमणाच्या निव्वळ वल्गना करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2013 - 12:32 am | निनाद मुक्काम प...

माझ्या प्रतिसादावर काही मिपाकर हमखास वापरतात ती क्लृप्ती वापरण्यास आली.
ती वापरण्यात आली
म्हणजे माझ्या प्रतिसादाचे काही निवडक वाक्ये हायलाईट करून त्यांच्याशी शब्दांचे खेळ करायचे.
त्याला उत्तर मी खरडवहीत न देता येथे ह्या धाग्यावर देतो , कारण हि चर्चा सुरु ह्या धाग्यामुळे झाली,

बाकी ठिक.. काही अधिकच्या माहितीवरून आपापले मत बनवावे - पडताळून पहावे इतकेच सांगणे होते. यानंतरही मतावर ठाम आहात असे दिसते. त्यामुळे मी प्रतिवाद करण्यात हशील नाही

फक्त दोनच गोष्टी

ते सर्व प्रथम दर्शनी मला थोतांड वाटते

हा पूर्वग्रह आहे असे म्हणावयास जागा आहे. तो टाळून बघता आले तर उत्तम. स्वतःच्या मताची प्रामाणिक चिकित्सा करताना काही काळापुरता तरी तो बाजुला ठेवला असावा अशी अपेक्षा करतो.

हे किती हास्यापद आहे , मुळात आजच्या काळात ह्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का

घटना ज्या काळात घडल्या आहेत त्या काळात हे शक्य होते. आताचे संदर्भ, आताची निती-अनितीच्या कल्पना/परिस्थिती याचा चष्मा त्या काळच्या जनतेला, नेत्यांना का लावावा?

असो. इथे आपली सहमती होणे कठीण आहे तेव्हा लेट्स् अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री

माझे मत

अधिक माहिती बद्द्ल म्हणत असाल तर मिपावर जेव्हा जेव्हा मी राजकारणावर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत व्यक्त करतो ते अनेकदा खरे ठरते म्हणजे भविष्यात मी आधी म्हटल्याप्रमाणे एखादी घटना घडते ज्याचा दाखला मी वृत्त पत्रातून आलेल्या बातमीची लिंक देऊन लगेच देतो. उदा मलाला हिचे पार नोबल साठी मानांकन होणे व त्यासाठी परकीय प्रसारमाध्यमांचा अट्टाहास हे जेव्हा भारतात व जगात तिच्या नावाचा जयघोष चालला होता तेव्हा मिपावर लिहिले होते ,

सांगण्याचा मुद्दा माझी मते वाचन व प्रत्यक्ष लोकांशी जे एखाद्या बातमीबाबत संबंधी असतात त्यांच्याशी बोलून बनवतो.
सिंधी व पंजाबी मित्र असल्याने दंगलीचा अनुभव प्रत्यक्ष ऐकला होता , स्वतः माझे आजोबा रेल्वेत कार्यरत असल्याने त्यावेळी त्यांना दिल्लीत निर्वासित शिबिरात काम करण्याचा योग आला , ते सरकारी चाकर होते , संघाशी संबंध नव्हता
मात्र एक सामान्य माणूस म्हणून त्यावेळी गांधी ह्यांनी आम्हाला आमच्या कुटुंबाला वार्‍यावर सोडले ही सार्वत्रिक भावना होती ,
मुळात जीना ह्यांनी आपला समुदाय अल्पसंख्यांक आहे हे माहित असून सुद्धा लढवय्ये पंजाबी , व शीख समुदायाचे हत्याकांड व बलात्कार सत्र सुरु केले ,
ह्यातून व्यापारी सिंधी सुद्धा सुटले नाही , मुळात त्यांची एवढी हिंमत का झाली ,आजच्या भाषेत त्यांनी ही रिस्क कशी घेतली ,
त्यांना अशी भीती का वाटली नाही की हिंदू प्रतिकार करतील
ह्याचे कारण जीना व मुस्लिम लीग ला पक्की खात्री होती , तेव्हा हिंदूचे प्रतिनिधित्व अहिंसावादी करत आहेत ,
आपली जमात गांधी ह्यांनी उपोषण केले म्हणून त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन बलात्कार व हत्याकांड थांबवणार नाहीत किंवा गांधी व त्यांच्या अनुयायांनी कितीही शांततेची आर्जवे केली तर त्याला बळी पडणार नाहीत ,
आणि त्यांचे चाल यशस्वी झाली ,
जेव्हा हिंदुनी प्रतिकार सुरु केला तेव्हा माझे अनुयायी अहिंसेला तिलांजली देऊन
हिंसा करत आहेत हे पाहणे गांधी ह्यांच्या नशिबी आले ,
ह्या महात्म्याला त्याच्या हयातीत त्याच्या तत्त्वांची विचारांची पायमल्ली पहावी लागली.
व ही पाहणे सहन झाले नाही म्हणून पाकिस्तान ला मान्यता देण्यात आली
कारण जीना ह्यांच्या हिंसेला गांधी ह्यांच्याकडे उत्तर नव्हते,
राजकारणातून आपली पराभूत तत्वे स्वतः सोबत घेऊन खरे तर गांधी ह्यांनी तेव्हाच साबरमती येथे जाऊन आपला राजकीय सन्यास घेणे अभिप्रेत होते ,
स्वतंत्र भारतात त्यांना करण्याजोगे खूप होते ,
आंबेडकर करत होते त्या दलितांच्या उद्धाराचे कार्य ,आपल्या राजकीय गुरु गोखल्यांच्याच
शैक्षणिक संस्थांचे जाळे भारतातील गावात पसरवणे,
किंवा खेड्यात चला ह्या त्यांच्या सूत्रानुसार एखाद्या खेड्यात जाऊन ते स्वयंपूर्ण करणे व मग त्या धर्तीवर इतर खेडी विकसित करणे ,
ह्यासाठी उत्तर भारतातील अमेठी पेक्षा सुंदर पर्याय नव्हता ,
कारण गांधी नावाचे अनेक महात्मे अमेठीत निपजले पण मागाहून विकसित झालेल्या बारामती किंवा कणकवली सारखी प्रगती तेथे अजून होऊ शकली नाही ,
पण त्यांनी तसे केले नाही,
इतर मुस्लिम ,हिंदू संस्थानिक भारतात आपले संस्थान विलीन करत होते , मात्र निजामाला खास वागणूक का देण्यात आली ,
त्यांचे इंग्रजांशी चांगले संबंध असतील पण इंग्रज काय गांधी , नेहरू ह्यांचे जावई लागत होते का
एकवेळ नेहरूंचे आपण समजू शकतो , पण गांधी ह्यांना पाकिस्तान ची कल्पना मान्य नव्हती तर निजामाला स्वतंत्र का राहू दिले ,
ह्या विरुद्ध त्यांनी उपोषण का केले नाही , हैद्राबादी जनतेच्या भावना त्यांना समजल्या नाही ,

आपण येथे घटना ज्या काळात घडल्या आहेत त्या काळात हे शक्य होते. आताचे संदर्भ त्या काळच्या जनतेला, नेत्यांना का लावावेत?
असे लिहिले तेव्हा मला मौज वाटली.
त्यांचे काय आहे ,
मनुष्याचे मानसशास्त्र हे काळानुसार बदलत नाहीत ,
नीती अनीतीच्या कल्पना जरी बदलल्या तरी माणसाचे वागणे व वृत्ती तीच राहते ,
म्हणजे काय तर
त्या काळात सध्याच्या पाकिस्तानात व बांगलादेशात जो प्रकार झाला तीला दंगल असे म्हणतात ,ज्यात नरसंहार झाला ,
व आजच्या काळात गुजरात मध्ये जे झाले त्याला सुद्धा दंगल म्हणतात ज्यात नरसंहार झाला , काळ बदलला म्हणून दंगलीत जे घडते तेच घडले ,
थोडक्यात सांगायचे तर त्यावेळी व आज सुध्धा गांधी ह्यांना पाकिस्तान निर्मिती थांबणे शक्य झाले नाही किंबहुना भारताकडून आपल्याला ५५ कोटी येणे बाकी आहे ह्या पैशावर आपले राष्ट्र चालवणे अवलंबून आहे हे माहिती असून पाकिस्तानी सैन्य
काश्मीर मध्ये आगळीक करत, हे आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणे आहे ,
आणि त्यांनी ही आगळीक का केली तर भारत सरकार प्रचंड आदर्शवादी असलेल्या नेत्याचे अनुयायी आहेत ,
कुठल्याही लोकशाही असलेल्या देशात एका व्यक्तीसाठी देशाची इभ्रत व सुरक्षा पणाला लावल्या गेली नाही ,
जी त्याकाळी हात जोडून प्रसाद ह्यांनी लावली.
कुठलाही नेता हा वर्तमानकाळात जे निर्णय घेतो त्यांचे भविष्यातील परिणाम हे त्याच्या जनतेची भविष्यातील पिढीला भोगावे लागतात त्यावरून त्या नेत्याचे मूल्यांकन होते.
गांधी हे महात्मा नव्हते तर स्वतःची मत , स्वतःची तत्त्वे , स्वतःचे विचार हे देशाच्या गळी मारणारे होते , त्याकाळात हिटलर ने जर्मन समाज कसा असावा त्यांचे काय आदर्श असावेत हे स्वतःच्या आत्मचरित्रात त्याने लिहून ठेवले ,
गांधींना सुद्धा तमाम भारतीय समाजाकडून हीच अपेक्षा होती.
मुळात एका व्यक्तीची मते ती कितीही चांगली असो पण संपूर्ण समाजाच्या माथी मारणे हे लोकशाही असलेल्या देशात नक्कीच चांगले नव्हते , असे प्रकार एकतर कम्युनिस्ट चीन मध्ये किंवा धर्मावर आधारीत इराण मध्ये होतात ,
देशाच्या दुर्दैवाने त्याकाळी गांधी व त्यांच्या राजकीय पक्षाला तुल्यबळ विरोधक नव्हते ,
किंबहुना त्यांचे राजकीय असे विशेष अस्तित्व नव्हते ,
म्हणूनच आपण म्हणून ती पूर्व दिशा असा गांधी व तत्कालीन सरकारचा ग्रह झाला व ह्यातून त्यांच्याकडून असे वर्तन घडले , कारण आपण घेऊ त्या निर्णयाला देशाची जनता झक मारून पाठिंबा देईल कारण त्यांना दुसरा वाली कोण आहे ,
हिंदू महासभेला मुस्लिम लीग सारखे राजकीय अस्तित्व निर्माण करता आले नाही ,
म्हणूनच गांधीचे फावले ,
पुढे त्यांचा वधाचे निमित्त सरकार व प्रसार माध्यम ताब्यात असणार्‍या तत्कालीन सरकार ने आपल्या विरोधकांना गोबेल नीतीमुळे जनतेत पुरते बदनाम केले व सत्ता आपल्या हातात ठेवली

जर गांधी ह्यांचा खून दंगलीत स्वकीय गमावलेल्या एका मुस्लिम तरूणाकडून
भावनेच्या भरात झाला असता तर काय झाले असते
अशी कल्पना डोक्यात आली. तर गांधीच्या अनुयायांनी त्यांची घरे सुद्धा जाळायला कमी केले नसते ,

भारतासारख्या देशात व्यक्ती पूजेचे स्तोम आहे. एखाद्या व्यक्तीला महात्मा ठरवले की त्यांच्यात दोष असे नव्हतेच , त्याने चुकीचे निर्णय घेतलेच नाही.
असे जर मानायचे ठरवले तर खेदाने
हे राम असेच म्हणावे लागेल.

अविनाशकुलकर्णी's picture

11 Feb 2013 - 10:59 am | अविनाशकुलकर्णी

गाम्धिनी निराळ्या दलित मतदार संघास विरोध करुन मोठे काम केले ..
नाहि तर आज ओबीसी निराळे मतदार संघ दिसले अस्ते का?

अभिजित - १'s picture

11 Feb 2013 - 1:23 pm | अभिजित - १

बाकी गांधी ना राष्ट्रपिता म्हणणे म्हणजे एक भंपक पणा आहे . आज गांधी राष्ट्रपिता ( अनधिकृत का होईना, पण आहे . भारत सरकार ने अधिकृत जाहीर केले नाही राष्ट्रपिता , म्हणून अनधिकृत ) पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !! मला हिंदी सिनेमातील एक संवाद आठवतो . त्या मुलीला वाईट मार्गाला लावायचा प्रयत्न होत असतो. तिला कुस्करताना तो खलनायक म्हणतो - आजसे हर दिन तेरी शादी होगी . हर दिन नया दुल्हा .
तसाच हा प्रकार वाटतो .
बाकी जगात असा दुसर कोणता देश आहे का ज्याला असे पिता / माता आहेत ? बहुतेक नसावेत.
No one is bigger than this Country. If some one tries to project himself that way, he is enemy no 1 of the country.
बाकी गांधीना जी न लावल्यामुळे कोणची मने दुखावली असतील तर क्षमस्व . पण , सावरकर टिळक यांना का नाही बरे हा जी लावत कोन्ग्रेस् वाले आणि इतर लोक ?

प्रसाद गोडबोले's picture

11 Feb 2013 - 2:29 pm | प्रसाद गोडबोले

बाकी जगात असा दुसर कोणता देश आहे का ज्याला असे पिता / माता आहेत ? बहुतेक नसावेत. >>> अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता आहे !!

नितिन थत्ते's picture

11 Feb 2013 - 3:08 pm | नितिन थत्ते

>> भारत सरकार ने अधिकृत जाहीर केले नाही राष्ट्रपिता , म्हणून अनधिकृत च )

ओक्के.

>>पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !!

बरोबर. तसे होतच असते. होतच राहील. त्यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही.

>>No one is bigger than this Country. If some one tries to project himself that way, he is enemy no 1 of the country.

गांधींना (पाहिजे तर गांधीला असं म्हणू या) राष्ट्रपिता म्हणतात देशपिता नाही. तुमच्या वाक्यात कंट्री असा शब्द आहे. आणि मी राष्ट्रपिता आहे/मला राष्ट्रपिता म्हणा असं गांधीने कधी म्हटल्याचं ऐकलं नाही. त्यामुळे तुमचं दुसरं वाक्य गैरलागूच आहे. एनिमी नं वन वगैरे तर कै च्या कै....

>>बाकी गांधीना जी न लावल्यामुळे कोणची मने दुखावली असतील तर क्षमस्व .

हॅ हॅ हॅ. मी गांधी या विषयावर मिसळपाववर भरपूर प्रतिसाद लिहिले आहेत. कधीही मी गांधीजी असा उल्लेख केलेला नाही. पण त्याने कोणा गांधीप्रेमींची मनं दुखावली जाण्याचा इतिहास नाही. गांधींना गांधीजी म्हणण्याचीसुद्धा कोणी सक्ती केलेली नाही. बाय द वे बाकीच्यांचं सोडा. टिळक आणि सावरकर यांना तुमच्या प्रतिसादापुरतं तरी तुम्ही "जी" जोडायचं होतं की !!!!!

राही's picture

13 Feb 2013 - 2:01 pm | राही

गांधींना मिपावर कोणी काहीही म्हटले तरी मिपावरच्या गांधीवाद्यांच्या बाबतीत 'पित्त खवळणे','गरळ ओकणे',असले काही होत नाही.तसेच साप,विंचू,षंढ,कुत्रा असले शब्दही कधी त्यांना वापरावेसे वाटत नाहीत,वापरावे लागत नाहीत.त्यांच्या प्रतिसादांत कधीही आक्रस्ताळेपणा.त्रागा,आगपाखड दिसून येत नाही.
या बाबतीत त्यांची तुलना मुंबईकरांशी करावीशी वाटते. समोरचा जर काही अद्वातद्वा बोलत असेल तर ते केवळ चेहेर्‍यावर आश्चर्य आणून 'हो का? खरं की काय?' असे काहीसे म्हणून बाजूला सरतात !

अभिजित - १'s picture

14 Feb 2013 - 12:10 am | अभिजित - १

>>पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !!
बरोबर. तसे होतच असते. होतच राहील. त्यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मी हार्बर रेल्वे ने प्रवास करत होतो. मानखुर्द , गोवंडी .. दुपारची वेळ होती. दोन १५ / १६ वर्षाची टपोरी मुले बाजूला उभी होती. तिथलीच .. त्यांचा संवाद -

१ ला मुलगा - मुन्ना आजकाल तेरे घर में वो नया कोन आयेला है ?
२ रा - अरे वो समझले मेरा नया बाप हि है . अपना सब खर्चा पानी छुटता है . तो अपने को क्या करना है। कोई भी आये।
1 ला - लेकिन तेरा असली बाप ? और साला हर साल तेरे घर में नया नया आदमी दिखता है। मजे है तेरे माँ के .
2 रा - वो तो साला पता नहीं किधर गया। माँ भी जवान है . और साला फ़ोकट में किसीको देने से ये बेहतर है। सबसे बड़ी बात .. बोल मत किसिक्को .. शुरुवात में मैंने साला बहोत आवाज किया पहले बार . तो तब वो आदमी था . मेरे को बजुमे लेके गया। और एक गाँधी थमा दिया हातमे. साला ५०० रुपया .. बस्स मई खुश। माँ का भी काम होता है। घर का खर्च पानी चलता है। सबसे बड़ी बात अपने को हर महीने एक गाँधी। साला गाँधी है अगर साथ तो हर छे महीने में नया बाप .. अपने को क्या ?
2 रा - हॅ हॅ हॅ. ( इथे मला मिसळ पाव वरील त्या व्यक्तीचे हसणे आठवले . आणि यांना पण दर वर्षी नवीन बाप हे आनंदाचे वाटते हे बघून .. )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Feb 2013 - 2:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'मुक्त स्त्री'चं अर्धमुर्ध का होईना, चित्रण आवडलं. झोपडपट्टीतल्या, टपोरी दिसणार्‍या मुलांनाही व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य समजतं हे ही रोचक आहे. आणि १५-१६ वर्षाच्या पोराशी गोडी-गुलाबीने वागावं हे सावत्र बापाला समजणं हे तर आणखीनच उत्तम.

राही's picture

14 Feb 2013 - 11:57 am | राही

गलिच्छ.
'संभवामि युगे युगे' असे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच म्हणून ठेवले आहे. हिंदु लोक पुनर्जन्म मानतात. आत्म्याला पुनर्जन्म असतो मग महात्म्यालाही तो असावा.
ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. गुजरातीमध्ये संत मानवांना बापू,बाप्पा (बाप,पिता या अर्थी)म्हणण्याची प्रथा आहे. जसे, मोरारजी बापू,अनिरुद्ध बापू,आसाराम बापू,बाप्पा रावळ इ.

अनामिका's picture

14 Feb 2013 - 1:01 am | अनामिका

He was never a "Mahatma" .I refused to call him "Mahatma" I never in my life called him" Mahatma" and he doesn't deserve that title .Not even from the point of view of his Morality-Babasaheb Ambedkar

http://m.youtube.com/watch?hl=en&gl=US&client=mv-google&v=ZJs-BJoSzbo&fu...

मनोरा's picture

17 Feb 2013 - 7:51 am | मनोरा

भारतातील मोहनदास करमचन्द गान्धी हे जगातल्या बर्याच देशातील लोकांना माहीत आहेत. त्यांनी वाचलेले आहेत. त्यांच्या कडे त्यांच्या भाषेतील पुस्तकांत गान्जीजी चे चांगल्या प्रकारे वर्णन आहे. शिवाय पापीस्तान सोडता. अहो हॉलीवूड वाले त्यांच्यावर सिनेमा काढतात व जग तो पहातो म्हणजे काय तो लहान मानुस होता?

खटासि खट's picture

17 Feb 2013 - 9:14 pm | खटासि खट

नव्या काळात पदव्या पुन्हा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्यास सुचवण्या :

राष्ट्रपिता (या शब्दास शब्दशः जागेल असं व्यक्तिमत्व) - आ. इम्रान हाश्मी
लोकमान्य - सलमान खान
नेताजी - मौलाना मुलायमसिंहजी
महात्मा - भास्कर जाधव
राष्ट्रसंत - रामदेवबाबा
क्रांतिवीर - बाबू बजरंगी / दारासिंह और उनके अन्य साथी

(मी वक्ता कसा झालो या मनजींच्या नव्या पुस्तकातून साभार. यास सोनियाची प्रस्तावना लाभलेली आहे )

हा ट्रेण्डसेटर धागा श्रद्धांजलीसाठी होता का ?

सर्जेराव's picture

11 Dec 2013 - 12:01 pm | सर्जेराव

चर्चा चांगली आहे, पण ह्याबाबतीत लोकाच्या भावना जास्त महत्वाच्या. लोकांच्या मनात ते राष्ट्रपिताच.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2014 - 12:52 pm | प्रसाद गोडबोले

महात्मा गांधींना चे पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरण आणि विनम्र अभिवादन !

( ह्यावर्षी "राष्ट्रपिता" हा टॅग लावलेला नाही हे पाहुन बरे वाटले ... चला ....हळु हळु का होईना आपण मॉबोक्रसी कडुन अ‍ॅबसोल्युट कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रसी कडे सरकायला लागलो तर :) )

सुनील's picture

30 Jan 2014 - 1:43 pm | सुनील

ह्यावर्षी "राष्ट्रपिता" हा टॅग लावलेला नाही हे पाहुन बरे वाटले

माणसाने असेच अल्पसंतोषी रहावे! :)

पृथ्वी गोल आहे, प्रसादभाऊंची जाणीव खोल आहे

(सुभाषचंद्र बोस ह्यांनी राष्ट्रपिता ह्या नावानं गौरव केलेल्या, नसता केला तरी तसेच असलेल्या) महात्मा गांधींना विनम्र अभिवादन.

ऋषिकेश's picture

30 Jan 2014 - 1:58 pm | ऋषिकेश

पुण्यतिथी निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र आदरांजली वाहतो!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2014 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.

आनन्दिता's picture

30 Jan 2014 - 11:43 pm | आनन्दिता

असेच्च म्हणते!!! अन नेहमी म्हणणार!!!

अनुप ढेरे's picture

30 Jan 2014 - 3:03 pm | अनुप ढेरे

हा वाद परत उकरला गेलाच आहे तर गांधीजींची हत्या झाली का वध हा वाद पण उकरायचा का?

प्यारे१'s picture

30 Jan 2014 - 3:19 pm | प्यारे१

७९ वर्षांच्या नि:शस्त्र...

च्यायला, झालंय की हे!

अनुप ढेरे's picture

30 Jan 2014 - 3:25 pm | अनुप ढेरे

ती चर्चा झालिये ते माहितिये. पण राष्ट्रकाकू गिरिजांना हा पण वाद उकरायची इछ्छा आहे का ते विचारल?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2014 - 3:54 pm | प्रसाद गोडबोले

नाही. त्यावादात रस नाही ...मरणान्तिनी वैराणि.... झालं गेलं सिंधुला मिळालं ...

ते लोक त्यांच्या काळात जगले , आपण आपल्या काळात जगतोय ...आणि महत्वाचे म्हणजे

इथे वाद केवळ संविधान मानायचे (की ज्याच्या मते अशी कोणतीही पदवी देता येत नाही , एव्हन भारतरत्न कोणा अमुक्तमुक व्यक्तीने मी भारतरत्न अमुकतमुक असे लावले तर भारतरत्नही काढुन घेतात ) की व्यक्तिपुजा असा आहे .

सुनील's picture

30 Jan 2014 - 4:07 pm | सुनील

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांचे अनुक्रमे शिवाजी टर्मिनस आणि टिळक टर्मिनस असे नामांकुचन करण्यासाठी रेल्वेला कळवायलाच हवे! ;)

आणि हो, सरदार सरोवर नव्हे, सरोवर बर्र्का!! ;)

खेरीज, विविध xxx पुरुष आणि xxx सम्राट ह्यांचा उल्लेखदेखिल नुसत्या नावानिशीच नै का? ;)

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2014 - 4:56 pm | प्रसाद गोडबोले

सुनिलराव तुम्ही फार घोळ करताय साहेब ... जरा एकदा चर्चेतुन फिरुन या की व्यवस्थित ...

इथे कोणी महात्माजींच्या महात्मा पदवी विषयी काही तरी बोललय का ?

प्रश्न राष्ट्रविषयक पदवी द्यावी की नको असा आहे .

आता उद्य्या राष्ट्रसरदार किंवा राष्ट्रमान्य किंव्वा राष्ट्रपुरुष अशा पद्या कोणाला दिल्या गेल्यातरी त्याला विरोध केलाच पाहीजे .

अवांतर : काही काही ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना "राष्ट्रगुरु" अशीही पदवी लावतात , त्यालाही विरोध नोंदवलेला आहे मी .

बाळ सप्रे's picture

31 Jan 2014 - 10:01 am | बाळ सप्रे

तुमचा मुद्दा पदवी "संविधानिक" नाही असा होता. आणि "राष्ट्रपिता" या शब्दाला आक्षेप होता.

आता "राष्ट्र" विषयक असा करताय!!! :-)

तुम्ही चर्चेतुन फिरण्यापूर्वी तुमच्या धाग्याच्या शब्दातून फिरुन या!! तेथे तुम्ही स्वतः "राष्ट्रनायक" असा शब्द वापरलाय !!! :-) - :-)

प्रसाद गोडबोले's picture

2 Feb 2014 - 12:56 pm | प्रसाद गोडबोले

दगडापेक्षा वीट मऊ !

शिवाय सगळेच बदल असे एका झटक्यात नाही करता येत .... ते हळु हळुच करावे लागतात ....

२०१३ मधे राष्ट्रपिता च्या ऐवजी राष्ट्रनायक म्हणु
२०१४ मधे राष्ट्रनायकच्या ऐवजी केवळ महात्मा म्हणु
पुढे
२०१५ मधे महात्माच्या ऐवजी मोहनदास करमचंद गांधी म्हणु ...

असे हळु हळु जाऊ ....

कसं आहे की एका पक्क्या राजकारणी माणसाला ही देवत्वाची चढवलेली पुंटं ही हळु हळुच काढावी लागतील .... जर गडबडीत काढायचा प्रयत्न केला तर मुर्तीभंजनाचा आरोप येईल ( शिवाय मुर्तीपुजक अजुनच कट्टर होतील )

स्लो बट स्टेडी

बाळ सप्रे's picture

3 Feb 2014 - 10:41 am | बाळ सप्रे

मूळ मुद्दा तुम्ही सोडुन दिला आहे .. त्यावर मुद्देसूद प्रतिवाद करता येत नाहिये.. पळवाट काढ्लेली आहे.. त्यामुळे आमचा पास !!

सुनील's picture

3 Feb 2014 - 11:00 am | सुनील

मूळ मुद्दा तुम्ही सोडुन दिला आहे

मुदलात मुद्दा असा होताच कुठे?

बाळ सप्रे's picture

3 Feb 2014 - 11:53 am | बाळ सप्रे

तेही बरोबरच!! पण जो काही थातुर मातुर मुद्दा घेउन धागा काढला तो ही आता सोडला!! :-)

प्रसाद गोडबोले's picture

3 Feb 2014 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

खुश रहा . :)

विटेकर's picture

30 Jan 2014 - 3:26 pm | विटेकर

आदरणीय महात्मा गांधी ना विनम्र श्रद्धांजली !

" गांधी " नावाची कॉंग्रेस नी जी लक्तरे केली आहेत , त्यावर खरे म्हणजे अधिक भाष्य करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचे अनुयायी त्यांचा खून रोज करतात .. एखाद्या नेत्याच्या नशीबी इतकी मोठ्ठी शोकांतिका यावी यापरता दुर्दैव नाही.
त्याच बरोबर गांधी-हत्येमुळे हिंदुत्वाचे जे कमालीचे नुकसान झाले,त्यासारखे ही दुर्दैव नाही!
१.कदाचित गांधीजी आणखी २/४ वर्षे असते तर त्यांनी आपल्या हातांनी काँग्रेस विसर्जित केली असती , जवाहरलालनी जरा कमी गुण उधळले असते आणि
२.कदाचित कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी साधनशुचिता आणि चांगली माणसे काँग्रेस मधे राहीले असती आणि पर्यायाने भारतीय राजकारणातही !
३.कदाचित भारताचा विकास "भारतीय" पद्धतीने झाला असता , पाश्चिमात्य लोकांचे अंधानुकरण झाले नसते.
४.कदाचित भारत हा अधिक हिंदू राहिला असता , हिंदू धर्माला आणि पर्यायाने जगाला बरे दिवस आले असते.
५.कदाचित हिंदू लोक त्यांच्या स्व्-भावहून वेगळे इतके आक्रमक झाले नसते
६.कदाचित सर्वधर्म समभाव सारख्या भोंगळ आण बावळट कल्पना प्रचारात आल्या नसत्या पण प्रत्यक्षात मात्र धार्मिक -सौहार्द राहिले असते
७.कदाचित गांधीजींचा अपसमज ( हिंदू- मुस्लिम ऐक्य ) दूर झाला असता (आणि तशी सुरुवात झाली होती )आणि काँग्रेसचे अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचे घाणेरडे राजकारण अस्तित्वात आले नसते.
८.कदाचित मुस्लिमांचा खरा खुरा विकास झाला असता.
९. कदाचित भारत शक्तिशाली झाला असता.

जाऊ द्या .. या जर्-तर ला काही अर्थ नाही .
जसे व्यक्तिचे प्रारब्ध असते तसे राष्ट्राचेही असावे कदाचित ...

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2014 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

कसं असतं की काही काही वाद विवाद हे कायम होत राहिले पाहिजेत आणि एखाद्या विषयावर चर्चा होते ह्याचाच अर्थ की तो विषय १००% सर्वमान्य नाहीये ....
... वादविवाद चर्चा अन त्यातुन इव्हॉल्व्ह होत जाणार्‍या विचारधारा हाच लोकशाहीचा प्राण आहे . नुसत्या व्यक्तिपुजेला चिकटुन राहुन धर्म तयार होत असतात ...लोकशाही नव्हे ....

.
असो .

चर्चा मागील पानावरुन पुढे चालु ...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

चिगो's picture

30 Jan 2014 - 5:24 pm | चिगो

राष्ट्रपिता महात्मा गांधींना मनःपुर्वक श्रद्धांजली..

अवतार's picture

30 Jan 2014 - 10:47 pm | अवतार

खरंच ह्या राष्ट्राचा पिता म्हणवून घेण्याची इच्छा असती तर ते स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी दिल्लीत आवर्जून हजर राहिले असते. पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले! ज्यांच्या नावाने कालपर्यंत घोषणा देत होतो ते आज कशा अवस्थेत आहेत हे विचारण्याची तसदी एक टक्का भारतीयांनी देखील घेतली नाही. दंगलींमध्ये होरपळून निघालेल्या जीवांची कोणाला पडलेली नव्हती तर महात्म्याची काय कथा? स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते हे भान त्याच क्षणी विसरले गेले. त्यानंतर उरल्या त्या केवळ जयंत्या, पुण्यतिथ्या आणि पोकळ अस्मितांच्या घोषणा! केवळ नाईलाज म्हणून एकत्र राहणाऱ्या कळपांना "राष्ट्र" म्हणणे ही राष्ट्रवादाची कुचेष्टा आहे. अमुक तमुक आमचे राष्ट्रपुरुष आहेत किंवा नाहीत ह्याचा फैसला साठ वर्षांनंतरही जिथे लागत नाही त्या भूभागाला नेमके काय म्हणायचे ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

फारएन्ड's picture

30 Jan 2014 - 10:53 pm | फारएन्ड

खरंच ह्या राष्ट्राचा पिता म्हणवून घेण्याची इच्छा असती तर ते स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी दिल्लीत आवर्जून हजर राहिले असते. पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले! ज्यांच्या नावाने कालपर्यंत घोषणा देत होतो ते आज कशा अवस्थेत आहेत हे विचारण्याची तसदी एक टक्का भारतीयांनी देखील घेतली नाही. दंगलींमध्ये होरपळून निघालेल्या जीवांची कोणाला पडलेली नव्हती तर महात्म्याची काय कथा? >>> नेमके एकदम!

बाप्पू's picture

31 Jan 2014 - 12:51 am | बाप्पू

गांधी हे महात्मा नव्हते तर स्वतःची मत , स्वतःची तत्त्वे , स्वतःचे विचार हे देशाच्या गळी मारणारे होते ,

१००% सहमत...!!!

डिजेबॉय's picture

31 Jan 2014 - 1:18 am | डिजेबॉय

कोण महात्मा

मंदार दिलीप जोशी's picture

31 Jan 2014 - 11:02 am | मंदार दिलीप जोशी

मोहनदास करमचंद गांधी यांना श्रद्धांजली

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2014 - 4:40 am | निनाद मुक्काम प...

@पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले!
त्यांच्या हातात अजून काय उरले होते ,
जीना ह्यांनी त्यांच्या नाकावर टिच्चून पाकिस्तान घेतला ,
अल्प संख्यांक मुस्लिम लीग ने भारताच्या घशातून
पाकिस्तान घेतला म्हणजे नक्की काय केले
तर
हिंसेने अहिंसेवर विजय मिळवला ,आपल्यावर हल्ले होतांना पाहून हिंदू व शीख ह्यांनी हिंसेंचा मार्ग स्वीकारला , तेव्हा देशभर आजतागायत अहिंसेचे थोतांड काही दिवसात गळून गेले
की जीना हे मिळालेल्या पाकिस्तानवर खुश नव्हते .
हे गांधींना माहिती होते , त्यामुळे ह्यापुढे हिंसेच्या जीवावर
स्वतंत्र पाकिस्तानचे जनक जीना अजून काय काय करतील ह्याचा नेम कोणालाही नव्हता.
जीना जिंकले
नेहरू ह्यांना मंत्रिपद मिळाले ,आता जागतिक राजकारणात त्यांना भराऱ्या मारणे शक्य होणार होते ,
गांधींना काय मिळाले ,
हिंसेने ग्रस्त भारत
अहिंसा वादाला दिलेली तिलांजली.
आपल्या तत्वांचा झालेला पराभव त्याना जिव्हारी लागला नसता तरच नवल होते.

अवतार's picture

1 Feb 2014 - 10:22 am | अवतार

हा तत्वांचा होत नसतो. ती तत्वे न पेलवणाऱ्या मानसिकतेचा होत असतो. इथे हिंसा-अहिंसा वाद उकरून काढण्याचा हेतू नाही. "नैतिकता" हा एकमेव फरक सोडला तर पशू आणि मानव ह्यांच्यात इतर कोणताच फरक उरत नाही. आजपर्यंत मानव समाजाची जी काही प्रगती झाली आहे ती मानवातल्या पशुत्वाला मोकाट सोडण्यातून नव्हे तर पशुत्वाला लगाम घालण्यातून झाली आहे. बुद्धापासून गांधींपर्यंत सर्वांनी ह्या पशुत्वाला लगाम घालण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यात त्यांना व्यक्तिगत पातळीवर यश मिळाले तरी समाज मात्र ह्या तत्वांसाठी अजून पूर्णत: तयार नाही हेच वास्तव आहे. पण आज हिंसा करणाऱ्यांनाही हिंसेचे बौद्धिक पातळीवर समर्थन करावे लागते हे देखील पशुत्वाकडून मानवत्वाकडे होणाऱ्या प्रगतीचेच लक्षण आहे.

गांधींनी काय मिळवले आणि काय गमावले ह्याचा हिशोब गांधींबरोबरच संपला. गांधींना समर्थन देऊन किंवा विरोध करून आज आपण काय मिळवतो किंवा गमावतो आहोत आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या काय मिळवणार किंवा गमावणार आहेत ह्याचा विचार होणे आवश्यक आहे. मुळात गांधी ही व्यक्ती महत्वाची नसून ज्या तत्वांसाठी त्यांनी संघर्ष केला ती तत्वे व्यवहार्य पातळीवर आणण्याची क्षमता आपल्या किंवा पुढील पिढ्यांमध्ये निर्माण होऊ शकते काय हा प्रश्न महत्वाचा आहे.

प्रतिसादाबद्दल आभार!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2014 - 11:39 pm | निनाद मुक्काम प...

हा फार मोठा विनोद आहे.
आपल्या पिढीत गांधी फक्त नोटेवर , रस्त्यांच्या नावांवर व जयंती साठी उरले आहेत.
त्यांची भाकड तत्वे त्याच्या सोबत अस्ताला गेली.
कारण ती अव्यवहारी होती , ही वस्तुथिति आज तुम्ही नाकारू शकत नाही ,
हा तत्वांचा होत नसतो. ती तत्वे न पेलवणाऱ्या मानसिकतेचा होत असतो
मुळात सर्व सामान्य माणसाला न पेलवणारी तत्वे त्यांच्या गळी उतरवणे खरच गरजेचे होते का
गोधरा कांड झाले व त्यानंतर जी दंगल झाली त्याचा परिणाम म्हणून आजतागायत गुजरात मध्ये परत दंगल झाली नाही ,
ज्या दिवशी जीना ह्यांच्या सांगण्यावरून पहिला हिंदू मारला गेला ,पहिली हिंदू शीख महिलेवर बलात्कार झाला तेव्हा हिंदूंना त्यांच्या पद्धतीने प्रतिउत्तर देण्याचा मार्ग मोकळा असता तर आज बांगला देश व पाकिस्तान बनले नसते ,
ज्या ज्यू राष्ट्राच्या निर्मितीला गांधी ह्यांचा तात्विक विरोध होता त्याच राष्ट्राने हिंसेला हिंसेने उत्तर देऊन नुसते आपले अस्तित्व टिकवले नाही तर आज त्या छोट्या राष्ट्रापुढे जो आपल्याबरोबर ह्या जगात अस्तित्वात आला
त्यांच्याकडून शस्त्र विकत घ्यावी लागतात व दहशतवादांच्या विरूध लढण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते.
गांधीजी ह्यांची तत्वे म्हणजे कागदी तलवार आहे , जी भिंतीवर लटकलेली छान दिसते ,पण प्रत्यक्ष तिचा वापर शून्य असतो ,
देशाला चाणक्य ,नेताजी ह्यांच्या विचार , तत्वे ह्यांची गरज होती व आजही आहे.
गांधी हे तत्कालीन अनेक देश्भक्तच्या पैकी एक असून
कॉँग्रेस चे एक पुढारी होते , त्यांना काही लोक मानायचे +

इतकेच

.

अवतार's picture

2 Feb 2014 - 10:17 am | अवतार

निव्वळ भौगोलिक सीमा नव्हे. राष्ट्र म्हणजे कोट्यावधी जनतेच्या मनात असलेली एकसंध सांस्कृतिक घटक म्हणून जगण्याची प्रबळ इच्छा.

आज रशियाने चेचन्यामध्ये गेली कित्येक दशके शस्त्रे आणि सैन्य यांच्या जोरावर वर्चस्व निर्माण केले आहे. पण त्याची किंमत त्यांना आजही चुकवावी लागत आहे. बांगलादेशच्या निर्मितीला पाकिस्ताननेही संघटित अत्याचारांच्या जोरावरच लगाम घालण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला ते समोर आहेच. अगदी भारताची मदत मिळाली नसती तरी तो असंतोषाचा वणवा विझवणे हे शस्त्रांच्या जोरांवर शक्य नव्हते. आज पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. पण तरीही तेथील जनता जाहीरपणे स्वत:ला पाकिस्तानी नव्हे तर बलुच म्हणवून घेते. श्रीलंकन सैन्याने प्रभाकरनला संपवले पण तमिळ जनतेच्या मनातील तमिळ इलमची इच्छा अजूनही संपलेली नाही.

ह्या सर्व देशांप्रमाणेच भारताची अवस्था व्हावी असे वाटत असेल तर निव्वळ हिंसा आणि शस्त्रांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील जनतेच्या भावनांची पर्वा न करता बिनधास्तपणे त्यांच्यावर आक्रमण करावे. पण त्यानंतर तरी हिंदुंचा खरेच विजय होणार आहे का हे हिंदूंना स्पष्ट करावे.

मुळात सर्व सामान्य माणसाला न पेलवणारी तत्वे

गांधी हे माझ्या तुटपुंज्या माहितीप्रमाणे कोणी प्रेषित नसून वासना आणि विकारांच्या आहारी गेलेली एक सर्वसामान्य व्यक्ती होते. बुद्धाची कहाणी देखील काही फार वेगळी नाही. त्या अवस्थेतून जर बुद्ध किंवा गांधींसारखा सामान्य मनुष्य स्वत:च्या व्यक्तीमत्वात एवढा प्रचंड बदल घडवून आणू शकतो तर इतरांना ते करणे अशक्य नाही. पण त्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ती आपल्यापैकी कोणातच नाही. ज्यांना स्वत:मध्ये बदल घडवायचा नसतो ते इतरांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत.

अस्तित्व टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा कोणालाच चुकलेला नाही. पण अस्तित्व नेमके कशासाठी टिकवायचे हा प्रश्न केवळ माणसालाच पडतो. त्या प्रश्नामागचे कुतूहल कायम राहणे ह्यातच माणसाचे माणूसपण आहे.

अर्धवटराव's picture

2 Feb 2014 - 10:47 am | अर्धवटराव

अस्तित्व नेमके कशासाठी टिकवायचे हा प्रश्न केवळ माणसालाच पडतो. त्या प्रश्नामागचे कुतूहल कायम राहणे ह्यातच माणसाचे माणूसपण आहे.

>> तुफ्फान. +१

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2014 - 11:57 am | टवाळ कार्टा

तर आज बांगला देश व पाकिस्तान बनले नसते

उलट बरेच झाले ....

सुनील's picture

3 Feb 2014 - 8:42 am | सुनील

ज्या दिवशी जीना ह्यांच्या सांगण्यावरून पहिला हिंदू मारला गेला ,पहिली हिंदू शीख महिलेवर बलात्कार झाला तेव्हा हिंदूंना त्यांच्या पद्धतीने प्रतिउत्तर देण्याचा मार्ग मोकळा असता तर....

गांधींचा हिंसेला विरोध होताच पण हा मार्ग कोणी अडवला होता? हा मार्ग तेव्हाही मोकळाच होता आणि ज्यांना चोखाळायचा होता ते तो चोखाळत होतेच!

असो.

अतिशय अप्रतिम प्रतिसाद.... सहमत.

केवळ व्यक्तिपुजेत रमलेल्या, इतिहासातुन कधीही काहीही न शिकणार्‍या, जागतिक व्य्वहाराकडे व राजकारणाकडे काणाडोळा करणार्‍या व त्याच्याशी आपले काहीही घेणेदेणे नाही असे समजणार्‍या, आपल्या भवितव्याची विवन्चना असणार्‍या परन्तु त्यावरचा उपाय माहित नसणार्‍या, अर्धपोटी राहणार्‍या एकुणच बधीरता आलेल्या समाजातल्या मोठ्या वर्गाला ह्या असल्या वान्झोट्या तत्वप्रणालीचा काय उपयोग ?? व्यावहारिक द्रुष्ट्या त्याचा काय उपयोग ?? त्याने जर एकुणच सर्व सामाजिक प्रश्ण सुटणार असतील तर गोष्ट निराळी.

आदर्श तत्वे ही एकन्दरीत सर्वार्थाने आदर्श ( सामाजिक, सास्क्रुतिक, आर्थिक व राजकीय या अर्थाने ) समाजासाठी काही प्रमाणात ठीक आहेत आजच्या जगात, केवळ तोन्डी लावण्यापुरती. आता अजुन किती दिवस हा असला टाळ्कुटेपणा चालायचा हे तो परमेश्वरच जाणे.

विनोद१८

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Feb 2014 - 1:05 am | निनाद मुक्काम प...

आपले अस्तित्व टिकवणे हे बेसिक इन स्टिंग आहे ते माणसाला निसर्गाने बहाल केले आहे . माणूसपण वैगैरे ह्या भ्रामक कल्पना असून मानव हा आपल्या मेंदूच्या जीवावर पृथ्वीतलावर इतर प्राण्यांना वेठीस धरून किंबहुना पाळीव बनवून जगतो ,
आपल्याला डासाने चावले तर अगदी झोपेत सुद्धा त्याला हाताने मारून आपण हिंसा करतो.
कारण माणसाला जगण्यासाठी हत्या करावी लागते.
शरीरात घुसलेल्या विषाणूंना आपण जगण्यासाठी पर्ति जैविके देऊन मारावे लागते.
जगातील सर्व प्रश्नावर हिंसा हे उत्तर नसते , मात्र हिंसेवर फक्त हिंसा हेच उत्तर असते.

अवतार's picture

3 Feb 2014 - 8:53 pm | अवतार

हा एकच शब्द सोडला तर बाकी वाक्याला हरकत नाही. सर्वनाश करून घेण्यापेक्षा शांतीचा मार्ग नेहमीच उत्तम असे महाभारतात स्वत: भगवान श्रीकृष्णानेच सांगून ठेवले आहे. संयम हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. याबाबत दुमत नसावे (अशी उगाचच आपली वेडी आशा!).

यावरून एक जुने गाणे आठवले.

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळराने खडकात!

(हे तुम्हाला व्यक्तिश: उद्देशून नसून हिंसेला पर्यायच नाही या विचारसरणीला उद्देशून आहे.)

राही's picture

3 Feb 2014 - 11:21 am | राही

अवतार यांचे सर्व प्रतिसाद विशेषतः 'राष्ट्रप्रेम हे' हा वरील प्रतिसाद फार आवडला. इतरांच्या आक्रस्ताळी, शब्दबंबाळ,आणि गैरलागू मुद्द्यांनी भरलेल्या प्रतिसादांमध्ये हे सर्व प्रतिसाद आपल्या संयत भाषेमुळे आणि मुद्देसूदपणामुळे उठून दिसले.
विशेषतः पाकिस्तान आणि बांग्लादेशवर आक्रमण करून किंवा त्यांच्याशी युद्ध करून त्यांना जिंकून घ्यावे म्हणणार्‍यांचा प्रतिवाद छान केला आहे. नुसती भूमी जिंकून उपयोग नसतो. तेथील जनताही अनुकूल असावी लागते. नाही तर गनिमी युद्ध सुरू होते जे आटोक्यात आणणे कठिण असते. पुन्हा एव्हढा मोठा प्रदेश स्थानिकांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने ताब्यात ठेवायचा म्हणजे मोठाच ताप. जागोजागी सैन्य तैनात करावे लागेल. आपल्या सीमा इराण, अफ्घानिस्तान, ब्रह्मदेश या सारख्या अशांत प्रदेशाला जाऊन भिडतील. त्या शिवाय एवढी मोठी मुस्लिम लोकसंख्या बृहद्भारतात समाविष्ट झाली तर हिंदूचा लोकसंख्येतील टक्का कमालीचा घसरेल. सैन्यात, सरकारी नोकर्‍यांत सगळीकडेच ते लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मागतील. हां, आता तेथील मुस्लिम लोकसंख्येबाबत हिट्लरचा मार्ग आचरावा असे कोणाचे मत असल्यास गोष्ट वेगळी.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 12:55 pm | माहितगार

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या नवीन मिपा धाग्या करता प्रतिसाद हवे आहेत.

(आणि त्या करता विनंती या धाग्यावर का करत आहे हे वेगळे सांगणे न लगे :) )

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2014 - 10:42 am | प्रसाद गोडबोले

राष्ट्रविषयक पदवीवरुन अजुन एक वाद ...हे पहा

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/bhayy...

तुम्हीही घेऊन टाका स्वतःला अशी एखादी पदवी. हाय काय आनि नाय काय. नाहीतर फेसबुकवरील तुमच्या प्रोफाईल फोटो मध्ये तेजोवलय आहेच. ;)

तसं केल्यास तुमच्या प्रमुख चेलेगणांमध्ये आमची गणना करायला मात्र विसरु नका. तुम्ही जेव्हा जेव्हा मौनात जाल तेव्हा तेव्हा तुमचे जन उद्धाराचे महान कार्य आम्ही करु. :)

अनुप ढेरे's picture

10 Jul 2014 - 11:04 am | अनुप ढेरे

नव्या सरकारच धोरण काय असणारे याबाबत?