Skip to main content

राष्ट्रपिता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 30/01/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली ! पण आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो . ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे . आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

वाचने 67675
प्रतिक्रिया 283

प्रतिक्रिया

In reply to by विकास

तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत
अगदी बरोबर. पेरूच्या संस्कृतीला माया संस्कृती असे म्हणतात (नक्की ना? हेमांगी यांचे लेख पुन्हा वाचायला हवेत). तर माया हा संस्कृत शब्द नाही का? यावरून, माया समाज इथूनच तिथे गेला, हे सिद्ध होते! सुनील (पुना) ओक

In reply to by सुनील

किती किती जाहिरात कराल आपल्या थिअर्‍यांची? या वरच्या प्रजासत्ताक काव्यात पेरू देशाचा आणि माया संस्कृतीचा संबंध काय? माया समाज आणि पेरू देशाचे नागरिक मूळचे भारतीयच आहेत. अहो, अजून काही वर्ष तिथे टांगून रहा (hang in there); सगळे मानव आफ्रिका खंडातून नाही भारतीय उपखंडातून आले असं तुमच्या लक्षात येईल. पण आपण इथे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतरच्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत. संदर्भ म्हणून रामचंद्र गुहांचं India after Gandhi वाचा, म्हणजे समजेल मी काय म्हणते आहे ते!

In reply to by सुनील

तसे भारत आणि पेरू यांचे संबंध फार जुने आहेत
अगदी बरोबर. पेरूच्या संस्कृतीला माया संस्कृती असे म्हणतात (नक्की ना? हेमांगी यांचे लेख पुन्हा वाचायला हवेत). तर माया हा संस्कृत शब्द नाही का? यावरून, माया समाज इथूनच तिथे गेला, हे सिद्ध होते!
अर्थात. माया समाज इथूनच त्या गावाला गेला. म्हणूनच तर आंग्लभाषेत पेरूला 'गावा' म्हणतात! पहा: आम्ही जातो अमुच्या 'गावा',अमुचा राम राम घ्यावा. (पुन्हा ओक)

In reply to by नंदन

होय. आणि माया संस्कृतीतले पेद्रट लोकं पेरूमधून ब्राझिलमधे पाठवले गेले. त्यांची वस्ती आता 'पेद्रो द गावा'मधे आहे. -- बेसुमार ओक.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही दिलेल्या 'पेद्रो द गावा' च्या दुव्यामधला मिशेलचा पुल्लींगी उपयोग पाहून (मिशेल म्हणाला माझे ही तिथे जायचे बरेच वर्षे राहून गेले आहे.), ओबामाच्या राज्यात रहाणार्‍या माझ्या सारख्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या आहेत.

In reply to by विकास

आतापर्यंत वाटत होतं की तुम्ही रॉमनीराज्यातले? की त्याच्या पक्षाप्रमाणे तुम्हीही त्यांना विसरलात? ;)

In reply to by नंदन

अहो ओबामाचे सर्व अमेरीकेवर राज्य आहे. त्यात मॅसॅच्युसेट्स पण येतेच की. शिवाय रॉमनी आता नावापुरता शेजारी (शेजारच्या गावात) राहीला आहे. कारण जिस गली मे तेरा घर न हो बालमा... असे म्हणत त्याने मॅसॅच्युसेट्स सोडले आहे... तो आता तुमच्या कॅलीफोर्नियात रहातो. शेवटी रिपब्लीकन (पिडां) काका तिथे रहातात ना! ;)

In reply to by विकास

अरे वा, मॅसेच्युसेट्स मधून कधी निघालात? ओबामांचे जन्मराज्य (हवाई) की कर्मराज्य (इलिनॉय)?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>> पुरावा द्या की त्यांचा जन्म हवाईत झाला. :प आंतरजालीय अंतू बर्वा म्हटले पाहिजे तुम्हांस [न्हेरु - टिळक - ट्यां - सुईण इ.]

In reply to by नंदन

थांब नंद्या, लिंक देते. हां, हे पहा. आमच्या लाडक्या 'फ्युच्यूरामा'ने त्यावरही दंगा केला होता. नाहीतर जगात कुठे, काय चाल्लंय मला कुठलं समजायला!

In reply to by श्रीरंग_जोशी

हा दुसराच आहे. बघा, मुलाचं नाव लिहीलंय बराक हुसेन ओबामा दुसरा. गंडवता का भोळ्याभाबड्या जनतेला!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बापाचे व मुलाचे नाव एकच असले की असे लिहायची पद्धत आहे. आता व्यवहारात वापरताना दुसरा किती वेळा म्हणायचे? धाकटे जॉर्ज बुश प्रसिद्ध झाल्यानंतर थोरल्यांच्या नावानंतर जेष्ठ असे जोडले गेले (व्यवहारात).

In reply to by विकास

माझ्या मते तुम्ही या भावनादुखीबद्दल मनोगत सदस्य केशवसुमार यांना सू करू शकता. आता सू शब्दाचा अर्थ इंग्लिश क्रियापद, इंग्लिश नाव किंवा मराठी क्रिया यांच्यापैकी कसा लावायचा ते तुम्ही आणि केशवसुमार आपसात बघून घ्या. माझा व्यक्तिगत सल्ला (देण्याची उबळ आलीच आहे तर देऊन टाकते. तर तो) असा की आपल्याकडे जशी किरण, शिरीष, सुमन उभयलिंगी नावं असतात तसं हे एक असं समजून सोडून द्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती रसग्रहण जबरी आहे. इंम्प्रेस्ड !!

काय टाईमपास चाललाय? संविधानात जरी अशा पदव्या द्यायची तरतूद नसली तरी लोकांनी कोणाला अशा पदव्या देऊ नये असा कोणताही कायदा सांगत नाही.गांधीजीना राष्ट्रपिता म्हणावेसे वाटत असेल तर जरूर म्हणा आणि तसे वाटत नसेल तर म्हणू नका.त्यावर एवढा गदारोळ कशाकरता?

In reply to by क्लिंटन

तुमच्या प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रतिसादाच्या शिर्षकाच्या प्रश्नात दडलयं, हे कधी कळणार? ;) त्यावर एवढा गदारोळ कशाकरता? टाईमपास चाललाय

धागा व धागाकर्तीचे गोलगोल प्रतिसाद वाचून खात्री झाली की 'मी'पणाचा पाढा म्हणणारे सक्षम प्रतिस्पर्धी मिपावर (हाय रे दुर्दैवा) आहेत !

In reply to by सस्नेह

'मी'पणाचा पाढा >> =)) गोलगोल प्रतिसाद>> =)) =)) =)) ताई काय गोलगोल आहे हो ??... सरळ स्पष्ट मत आहे " एकतर असल्या पदव्या कोणालाच देवु नका , आणि द्यायचे ठरलेच तर कोणालाही हरकत घेवु नका " -- राष्ट्रकाकु गिरीजा

In reply to by प्रसाद गोडबोले

कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो .
आम्हाला म्हणायचे होते
राष्ट्रपिता( असंविधानिक ) + छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति = राष्ट्रकाकु , राष्ट्रमामा , राष्ट्रआजोबा , राष्ट्रपत्नी , राष्ट्र्राख .... वगैरे वगैरे असंविधानिक गोष्टी येतील
मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.
केन्द्रिय गृहमंत्रालयाने जे म्हणले तेच मी री-इटरेट केलेय ...
या विधानांवरून, जे काही म्हणायचे आहे ते काय ? अन तुम्हाला म्हणायचे आहे की मंत्रालयाला हे हे कुणाला स्पष्ट होते ?

माझ्या माहितीनुसार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 'राष्ट्रपिता' ही उपाधी महात्मा गांधींना १९४४ मध्ये सिंगापुर रेडियोवरील आपल्या भाषणात दिली. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर सुभाषबाबुंचा विश्वास नव्हता,पण गांधीजींबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. तसेच सरोजिनी नायडू यांनीही १९४७ साली एका संमेलनात त्यांना ही उपाधी दिली होती. ही पदवी असंवैधानिक असली तरी जेव्हा दिली गेली तेव्हा हे संविधान अस्तित्वात नव्हते.भारतातच नव्हे तर इतर देशांत ही गांधीजी "राष्ट्रपिता" म्हणून ओळखले जातात. ही उपाधी लादलेली आहे असे मुळीच वाटत नाही.

गांधीजी तुम्ही राष्ट्रपिता मानता किंवा नाही तुमच्यावर असलेल्या/नसलेल्या संस्कारांचा प्रश्न आहे, पण सांविधानिक हक्कांच्या गोष्टी करणार्‍यांना बीबीसी सारख्या विदेशी (आणि मूलतः भारत-द्वेष्ट्या) वेबसाईटचा आधार घ्यावा लागला यातच सगळं आलं, नाही का?

कोणा एका लखनौच्या १० वर्षाच्या मुलीला प्रश्न पडतो "गांधीजी (जी म्हणू ना?) राष्ट्रपिता का?".. गुगल करणे, आईवडील/शिक्षकांना विचारणे, पुस्तके वाचणे सोडून ती थेट प्रश्न विचारते गृहमंत्रालयाला आर.टी.आय.खाली.. आर्.टी.आय. चा मूळ उद्देश्य काय तर सरकारी निर्णय्/प्रक्रिया यात पारदर्शकता असावी आणि कोणावर अन्यायकारक असु नये.. याची जाण त्या मुलीला नाही तर किमान पालकांना असायला हवी.. त्याच्याअभावामुळे आपल्या जिज्ञासेखातर ती प्रश्न विचारते.. गृहमंत्रालयदेखिल त्याला सरकारी खाक्यात/ भाषेत उत्तर देते.. उत्तरदेखिल असे की.. "आधार कार्ड नसले तर तुम्ही असंविधानिक" या टाईपचे.. या किरकोळ घटनेची बी.बी.सी. पासून सकाळपर्यंत सर्व वृत्तपत्र दखल घेतात.. "गांधींची राष्ट्रपिता पदवी असंविधानिक".. आणि त्यापुढे मिपावर धागा.. प्रतिसाद.. गांधीजी नेहेरु पेरु शास्त्री कात्री.. कवितेचे रसग्रहण.. सुतावरुन स्वर्गचे याहून चांगले उदाहरण मिळणे कठीण आहे.. एक चित्रपट काढता येईल.. आता एकदा घटना वाचा.. त्यात बर्‍याच गोष्टी नसतीलच.. कारण ती घटना आहे.. विश्वकोष/विकीपिडीया/गुगल नाही. मग त्यात नसलेले सगळेच "असंविधानिक" .. मग किती गोष्टींची घटनेशी तुलना कराल!! आणखी खूप धागे काढायला वाव आहे..

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही. ज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही. ज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे. भारतीय इतिहासात राष्ट्राची ही संकल्पना अगदी नवीन होती. भूगोल, धार्मिक श्रद्धा वा सांस्कृतिक एकतेच्या आधारावर नव्हे, तर राजकीय ऐक्य व त्यातून भविष्यात साकार होणारे एकजिनसी राज्य या आधारावर भारतीय राष्ट्रवादाची बांधणी करण्यात आली. येथून पुढे भारतात एकमेकांशी संघर्ष करणार्‍या राज्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार होते. पाचशेपेक्षा अधिक संख्येने अस्तित्वात असलेली राज्ये व त्यांचे राजे मिटवून एक राज्य निर्माण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी पुरे केले. त्यामुळे राष्ट्र ही कल्पना वास्तवामध्ये रूपांतरित झाली आणि शासनव्यवस्था म्हणून लोकशाहीचा विचार केला गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोणी अडाणी गृहस्थ नव्हते. भारताच्या धाडसी, शूर सुपुत्रांपैकी ते एक होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता या गुणविशेषणाने संबोधण्यापूर्वी त्या शब्दाचा अर्थ त्यांना पूर्णांशाने ठाऊक होता. (पाहा ः नेताजी सुभाषचंद्र बोस, ब्लड बाथ, प्रथमावृत्ती- सिंगापूर, पुनर्मुद्रण- लाहोर, १९४७. नेताजींचे ६ जुलै १९४४ रोजी झालेले आझाद हिंद रेडिओवरील भाषण, पान ५५) नेताजी जाणून होते की, आधुनिक भारतीय राष्ट्राचे म. गांधी हे मूर्तिरूप आहेत. म. गांधींनी आपल्या सत्याग्रहाच्या संघर्षतंत्राच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपर्‍यात, सर्वदूर अशी राजकीय जागृती करून शस्त्रहीन, दडपलेल्या भारतीय जनतेला स्वातंत्र्यसंग्रामात समाविष्ट करून घेतले. आजच्या भारताचे राष्ट्रपिता, महात्मा गांधी आणि फक्त महात्मा गांधी असू शकतात, हा इतिहासाचा दाखला आहे. याबाबत तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही आणि खळखळ करण्याचे तर बिलकुलच कारण नाही. - मधु लिमये यांच्या "राष्ट्रपिता कोण?" या लेखातून. थोडक्यात सांगायचं तर, राष्ट्र : एकत्र नांदायची/ संकटं झेलायची/ लढायची इच्छा असलेल्या समाजांचा/लोकांचा समुह. राष्ट्रपिता: राष्ट्रनिर्मीती घडवुन आणणारा. भारत हे राष्ट्र नव्हतं. ते सर्वदुर पसरलेल्या स्वातंत्र्यचळवळीमुळे निर्माण झालं, प्रथमच लोकांना आपण एक आहोत, आपला शत्रु एक आहे आणि आपलं स्वत:च राज्य असावं असे ह्याच चळवळीमुळे वाटु लागलं. हि चळवळ भारतव्यापी केली ती गांधींनी (त्यांच्या संघटन कौशल्यामुळे, भारतीय मानसिकतेच्या जाणीवेमुळे), म्हणुन त्यांना राष्ट्रपिता म्हटले गेले.

उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया.... ब्रिटिश साम्राज्याचा पाया ढासळणा-या या महात्म्यास कोटीकोटी प्रणाम संविधानिक असो कि असंविधानिक कुणाला पटो अथवा न पटो कुणी म्हणो अथवा न म्हणो मी मात्र गांधीजीनी राष्ट्रपिता म्हणणार ......

प्रत्येक कंपुचा असा एक काळ असतो. नवा कंपु आल्यावर त्यांना कोणी विचारत नाही.

कोणत्याही नेत्यांचे मोठेपण हे त्याला मिळालेल्या उपाध्या नाही तर त्यांचे अनुयायी त्यांची विचारसरणी कितपत पाळतात व मानतात ह्यावर अवलंबून असते , कारण व्यक्ती महत्त्वाची नाही तर तिचे विचार महत्त्वाचे असतात. गांधीच्या मृत्यू नंतर पुण्यात जी हिंसा झाली तिचे सूत्रधार पकडले न जाणे, ह्यावरून त्याना मानणारे ह्यापुढे त्यांच्या नावाचा एक चलनी नाणे म्हणून वापर करणार व सत्ता उपभोगणार हे नक्की झाले. आज भारतात हिंसा बेदम होते , गावाकडे चला ह्या संदेशाची अंमलबजावणी होत नाही , अश्यावेळी गांधी ह्यांची विचारसरणी जर बहुसंख्य भारतीय मानत नसतील त्यांचा फाशीला विरोध होता तरीही आज जनतेच्या मागणीमुळे राष्ट्रपती ह्यांनी बलात्कार प्रकरणात फाशी ह्या शिक्षेचा अंतर्भाव केला. गांधी ह्यांना धर्मावर आधारीत राष्ट्र ही संकल्पना मान्य नाही , गांधींना अपेक्षित दारूबंदी आपल्या देशात मोदींच्या गुजरात मध्ये शक्य आहे. अश्यावेळी भारतात एखाद्या नेत्याला पदव्या देऊन व्यक्ती पूजेचे स्तोम उगाच कशाला माजवायचे, गांधी माणूस म्हणून व्यक्तिशः थोर असेल एकवेळ मानू. पण त्यांचे अनुयायी व पहिल्या मंत्री मंडळातील अनेक नेते हे संधी साधू होते. पहिले सरकार स्थापन झाल्यावर गांधींना आपल्याच स्वदेशी लोकांच्या निर्णयाविरुद्ध उपोषण करावे लागले ही शोकांतिका आहे. आज कम्युनिस्ट किंवा संघ ह्यांची मत लोकांना आवडो किंवा नको त्यांच्या अनुयायांना आवडतात. व ते त्यांचे पालन करतात , गांधीच्या अनुयायांनी त्यांची अहिंसेचे मते त्यांच्या वधानंतर हिंसा करून धुळीस मिळवली ,ह्यावरून त्यांचे अनुयायी किंवा त्यांचा नावाचा वापर करणारे हे गांधी ह्या ब्र्यांड चा वापर करणार होते व त्यांनी तो आजतागायत केला आहे. त्यांच्या विचारांची अजून शोकांतिका अजून काय असावी. आणि लोकशाही ची सर्वात मोठी शोकांतिका पुढे झाली म्हणजे स्वतंत्र भारतात तो स्वतंत्र होण्यासाठी गांधी व क्रांतिकारक व अनेक हुतात्मे ह्यांचा सक्रिय सहभाग होता., हयात गांधींचा सहभाग मोठा व इतरांनाच कमी असा दुजाभाव करणे योग्य नाही , पण स्वतंत्र भारतात गांधी एक सामान्य नागरिक होते , व त्यांनी निवडून दिल्या, सरकारचा निर्णय त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी उपोषण केले हा त्यांचा हक्क होता , सध्या अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल साठी उपोषण केले , पण त्यावेळी दुर्दैव असे होते की गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही. लोकशाही ची क्रूर चेष्टा म्हणजे एक माणूस सरकारला वेठीस धरू शकतो हे सार्या जगाला आपण दाखवून दिले , आज गांधी ह्यांचा वध झाला नसता तर पुढे मंत्री मंडळाचा प्रत्येक निर्णय त्यांना विचारून घ्यावा लागला असता. किंवा तो पुढे बदलावा लागला असता , हे कितपत योग्य आहे. एक साधा मुद्दा गांधी ह्यांना धर्मावर आधारीत राष्ट्र ही संकल्पना मान्य नव्हते , हे त्यांचे वैयक्तिक मत होते. पण आपल्या सरकारने ते आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक हिस्सा बनवून आपल्याच सोबत स्वतंत्र झालेल्या ज्यू राष्ट्राचे अस्तित्व नाकारले , ज्याची निर्मिती प्रगत राष्ट्रांच्या पाठिंब्याने झाली होती , जेव्हा नरसिंह राव ह्यांनी हे धोरण बदलून ज्यू राष्ट्रांची संबंध स्थापन केले तेव्हा पासून ते आजतागायत आपण व ज्यू राष्ट्र दहशतवाद , व्यापार , कृषी ह्या अनेक शेतात सहकार्य करत आहोत , जर्मनीत एकता हिटलर सर्व निर्णय घ्यायचा ,व भारतात असे सर्व निर्णय गांधी घ्यायला लागले , सरकारच्या विरुद्ध यशस्वी उपोषण करून त्यांनी हेच दाखवून दिले की तुमचा निर्णयावर माझा अंकुश असेल. मुळात भारतीय जनतेला मिठाचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा त्यांची कारणे माहिती होती. पण स्वतंत्र भारतात भारतीय नागरिकांना गांधी ह्यांनी देशाच्या सरकार विरुद्ध उपोषण का करत आहोत हे सांगून विश्वासात घेतले , त्यांच्या उपोषणाचे कारण व त्यांच्या मागण्या ह्यावर स्वतंत्र भारतातील समस्त नागरिकांचे त्यावेळी मत कोणी जाणून घेतले. हिटलर ताकदीने आपले निर्णय जनतेवर लादायचा , तर गांधी स्वतंत्र भारतात उपोषणा द्वारे इमोशनल ब्लॅकमेल करून आपली मत आपल्या सरकारवर व पर्यायाने जनतेवर लादत होते.

In reply to by निनाद मुक्काम …

ही सर्व चर्चा गांधी ह्या माणसाबाबत चालली आहे, त्याच्या अनुयायांबाबत नव्हे.त्याच्या स्वतःच्या आचरणावरून त्याला पदव्याबिदव्या जे काही मिळायचे न मिळायचे ते मिळून/हरपून गेले.कोणत्याही महान नेत्याचे अनुयायी/मुले त्या नेत्यापेक्षा मोठे असूच शकत नाहीत.ते थिटेच असतात.ते जर त्या महात्म्यापेक्षा मोठे झाले तर ते स्वतःच महात्मा बनतील. तसे होत नाही,कधी झालेले नाही.शिवाजी महाराज,लो.टिळक,डॉ.आंबेडकर,स्वा.वी.सावरकर,हिं.हृ.स.बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या बाबतीत ते खरे आहे कारण तो निसर्गनियम आहे. महात्मा शतकातून एखादाच होतो.दर पिढीमागे एक असे काही गणिती प्रपोर्शन नसते.

In reply to by निनाद मुक्काम …

गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही. लोकशाही ची क्रूर चेष्टा म्हणजे एक माणूस सरकारला वेठीस धरू शकतो हे सार्या जगाला आपण दाखवून दिले ,
निनाद, स्वातंत्र्य मिळल्यावर ही गांधीजींना उपोषणाला बसले होते आणि त्यांनी हट्टाने सरकार कडून काहीतरी मान्य करुन घेतले इथंपर्यंत तुम्ही सांगितले.. पण नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केलं आणि सरकारने त्यांच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे तुम्ही स्पष्ट केलं नाहीये.. माझ्या माहीतीनुसार गांधीजीनी स्वातंत्रानतंर पहीलं अन शेवटंच ( जे दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातलं ही शेवट्च ) उपोषण ६ जाने १९४८ ला सुरु केलं... हे उपोषण सरकार च्या कुठल्याही निर्णयाविरुद्ध नव्हतं तर देशातल्या जनतेविरुद्ध होतं. देशभरात दंगलींचा जो आगडोंब उसळला होता तो शांत करण्यासाठी तमाम हिंदू आणि मुसलमान जनतेला अवाहन म्हणून त्यांनी उपोषण केलं. हे उपोषण १२ दिवस चाललं. १८जानेवारी ला हजारो हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी सामंजस्याचं वचन दिल्यावर हे उपोषण सुटलं.. तसेच सीमाभागात होणारा हिंसाचार थांबवण्यासाठी भारत अन पाक दोन्ही देशानी रक्तपाताचा मार्ग न अवलंबता चर्चा करुन गुंता सोडवावा याचा आग्रह गांधींनी धरला होता.. ब्रिटीशांनी आपल्या ताब्यात दिलेला देश हा फुटिरतेची बिजे पेरली गेलेला अन् जर्जर अवस्थेतला होता. देशाची घडी बसवायचा एकमेव मार्ग शांतता होता, धुमसता सीमाभाग, रक्तबंबाळ जनता हा नव्हता. नथुराम गोडसे ज्या प्रव्रुत्तींचा चेहरा होता त्यांना पाकीस्तान सांमज्स्याच प्रकरण मान्य नव्हतं. हिंसाचाराला प्रत्युत्तर हिंसा हवं हे माननारया गोडसे ने ३० जानेवारी १९४८ ला गांधींचा खुन केला. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं सरकार ला वेठिस धरणारं कुठलंही उपोषण गांधींनी केलं नाही. संधीसाधु अनुयायी, भ्रष्ट नेते यांच्यामुळे गांधीवाद चुकीचा ठरत नाही.. देशाची आज जी काही दुरावस्था आहे त्याचे खापर ज्याने स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले अन स्वातंत्र्य मिळल्यावर एक वर्षाच्या आत ज्याचा भ्याड खुन करण्यात आला अशा व्यक्तीवर फोडने चुकीचे आहे. गांधींच्या अहिंसेला भेकडपणा अन फक्त क्रांतीकारकांच्याच त्यागाला शौर्य म्हणून उपयोग नाही. कारण कुठल्याही क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत हा, रक्तबंबाळ आणि एकमेकांच्याच जिवावर उठलेला कधीही नव्हता..

In reply to by निनाद मुक्काम …

>>पण स्वतंत्र भारतात गांधी एक सामान्य नागरिक होते , व त्यांनी निवडून दिल्या, सरकारचा निर्णय त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी उपोषण केले हा त्यांचा हक्क होता , सध्या अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल साठी उपोषण केले , पण त्यावेळी दुर्दैव असे होते की गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही. त्यावेळी जे सरकार होते ते "निवडून दिलेले" सरकार नव्हते. काहीसे काळजीवाहू म्हणतात तसे. कारण घटना तयार नव्हती. आणि लोकसभाही नव्हती. जी होती ती कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्ली होती. तिचे काम घटना बनवण्याचे होते. जे लोक निवडून आले होते ते कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्लीवर निवडून आले होते त्यातले काही नॉमिनेटेड सुद्धा होते. आंबेडकरांना हवे असलेले हिंदू कोड बिल आत्ता आणू नये कारण सध्याचे सरकार घटनात्मकरीत्या निवडून आलेले नाही असा सल्ला डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना दिला होता असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by निनाद मुक्काम …

गांधीसाठी सर्व भारताने निवडून दिलेले सरकार झुकले व त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मान्य करतांना इतर गटांचे ,समूहाचे मत अजिबात घेतले नाही. हे तत्व अजूनही काँग्रेस कसोशीने आचर्णात आणत आहे... फक्त आता मोहनदास करमचंद गांधीं च्या ऐवजी सोनीया गांधी आहेत, एवढाच काय तो फरक ! पण तुमच आपलं कैच्याकै... एव्ढा मोठ्ठा मुद्दा डोळ्याआड कर्ता म्हण्जे काय ! तुमचा तीर्व णीषेढ !

In reply to by गब्रिएल

त्याकाळी गांधी आणि गांधीप्रणीत काँग्रेस हा एकच मोठा फोर्स होता, इतर पक्ष अगदी नगण्य, किरकोळ होते, मुस्लिम लीग वगळता. त्या काळातले राजकीय वाङ्मय विशेषतः वर्तमानपत्रे किंवा त्यातील उतारे वाचल्यावर हे लक्षात येते. हिंदुमहासभेलातर चार टाळक्यांव्यतिरिक्त कोणीही विचारत नव्हते.आम जनता कधीच यांच्या पाठीशी नव्हती.त्या काळच्या ललित वाङ्मयातही गांधीजींची लोकप्रियता ग्रथित झालेली आहे.उदा.खांडेकरांच्या कादंबर्‍यातून ती दिसते.

पण नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केलं आणि सरकारने त्यांच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे तुम्ही स्पष्ट केलं नाहीये.. असे म्हणतात की ५५ कोटी पाकिस्तान द्यावे अशी गांधीजी ह्यांची प्रमुख मागणी होती. पण हा मुद्दा मी आधी लिहिला नाही , काही गांधी प्रेमी हा मुद्दा अमान्य करतात. मुळात मला त्यांच्याकडून सविस्तररीत्या जाणून घ्यायला आवडले की गांधी ह्यांनी स्वतंत्र भारतात भारतीय सरकारच्या विरोधात नक्की कोणत्या कारणासाठी उपोषण केले. आणि थत्ते तुम्ही काळजीवाहू भारतीय सरकार असे जरी म्हणाला तरी ह्या सरकार मध्ये गांधी ह्यांना आदर्श मानणारे नेहरू , पटेल थोडक्यात ९० हून जास्त टक्के मंत्री गांधी ह्यांना मानणारे व जाणणारे होते , गांधी ह्यांना कोणत्या गोष्टीला विरोध आहे हे माहिती असून त्यांनी एक निर्णय घेतला , आणि गांधीजी ह्यांना काही दिवस उपाशी बसवले , थोडक्यात त्यांच्या हयातीत त्यांचे अनुयायी सत्ता स्पर्श झाल्यावर बिथरले , अश्या महान नेत्याचे विचार व त्यांचा जनतेवर प्रभाव सगळेच उद्बोधक आहे नेहरू व पटेल ह्याच्यापेक्षा थत्ते त्यावेळी भारतीय पंतप्रधान असते तर गांधीजींना उपोषण करावे लागले नसते.

In reply to by निनाद मुक्काम …

असे म्हणतात की ५५ कोटी पाकिस्तान द्यावे अशी गांधीजी ह्यांची प्रमुख मागणी होती. पण हा मुद्दा मी आधी लिहिला नाही , काही गांधी प्रेमी हा मुद्दा अमान्य करतात.
निनादराव तुमच्या सारख्या अभ्यासु माणसासमोर काही लिहीणे म्हणजे फार हिमतीचे काम आहे तरीही जुरुर्र्त करतेच.:). (गांधीजींच नाव घेऊन) मुळात ५५ कोटी पाकीस्तान ला द्यावेत ही मागणी गांधीजींची नव्हती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकार बरोबर आपला जो करार झाला होता त्यात ही तरतूद करण्यात आली होती. या करारान्वये भारताच्या स्वातंत्र्यानंतर (पर्यायाने फाळणीनंतर) भारताने under the terms of division of assets and liabilities ७५ करोड रु पाकीस्तान ला द्यायचे सर्वानुमते( आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार) ठरले होते .यानुसार २० कोटी रुपयांचा हप्ता देण्यात ही आला होता. उरलेले ५० कोटी देण्यास मात्र सरकार टाळाटाळ करत होतं. अशामुळे एक आंतरराष्ट्रीय करार तर बिनसणार होताच पण एक एथिकल देश म्हणून असणारी भारताची प्रतिमा मलिन होणार होती.. याच ५५ कोटी च कारण देऊन नथुरामाने खुनाला ,वध वगैरे सोज्वळ प्रकारात घुसवायचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचे गोडसेप्रेमी पण तोच पुकारा करतात. पण..... नथुराम गोडसेने मे १९४४ आणि सप्टेंबर १९४४ मधेही गांधींच्या हत्येचा असफल प्रयत्न केला होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जवळजवळ अडिच वर्षापुर्वी ... तेव्हा हे ५५ कोटी प्रकरण च काय पण भारताच्या फाळणीचा ही पत्ता नव्हता. मग त्याने जी कारणे सांगितली आहेत त्यावर कितपत विश्वास ठेवायचा. म्हणून कदाचित मला नथुराम गोडसे मधे सो कॉल्ड देशभक्ती पेक्षा माथेफिरुपणाच जास्त दिसतो..

In reply to by आनन्दिता

सरकार जर टाळाटाळ करत असेल तर त्यामागे सरकारची काही भूमिका असू शकते. कदाचित पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी कुटनीती म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला असेल , ह्या निर्णयावरून मला नाही वाटत तत्कालीन भारतीय जनता व विरोधी पक्ष ह्यांनी आक्षेप घेतला असेल, मुळात ह्या मुद्द्यावरून गांधी ह्यांनी उपोषण केले का नाही हे मला माहीत नाही , म्हणूनच गांधी प्रेमी जनतेकडून मी नक्की काय कारण होते हे जाणून घेण्याची मनीषा व्यक्त केली. गांधी ५५ कोटी मुद्द्यावर चूक होते की बरोबर हा मूळ मुद्दा नाही आहे , हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे , सरकारने जो निर्णय घेतला त्यावर भारतीय जनता व तत्कालीन विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याचे आठवत नाही , आधीच दंगली ने व्यथित झालेले हिंदू व मुसलमान त्यात पाकिस्तान लष्कराने केलेली आगळीक मुळात देशाची झालेली फाळणी अश्या पार्श्व भूमीवर एकटे गांधी नैतिकता दाखवत होते , आणि दुर्दैव म्हणजे सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले , लोकशाहीत सरकार व जनता व राजकीय पक्ष ह्यांच्या विरोधात एक व्यक्ती जातो व स्वतःचे म्हणणे सिद्ध करतो हे कितपत योग्य आहे , गोडसे ह्यांनी जे कृत्य केले ते चूक की बरोबर हे मला माहित नाही, पण देशाची फाळणी झाली व अल्प संख्यांक मुसलमान ह्यांनी हिंसेच्या जोरावर नाकावर टिच्चून ती फाळणी मिळवली , तेव्हा ह्या हिंसेसमोर अहिंसक गांधी व त्यांची तत्त्वे पराभूत झाली , अश्यावेळी परत परत आपली पराभूत तत्वे परत परत उगाळत देशाला अजून किती नुकसान सो कॉल्ड नैतिकतेच्या नावाखाली करून घ्यायचे होते. कृष्णनीती व चाणक्यनीती जाणणारा हा देश काही धर्मांध लोकांच्या हिंसे पुढे हतबल व्हावा. आणि देशाचा महत्त्वाचा भाग स्वतःपासून विलग करावा ही शोकांतिका आहे , नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,

In reply to by निनाद मुक्काम …

सरकार जर टाळाटाळ करत असेल तर त्यामागे सरकारची काही भूमिका असू शकते. कदाचित पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी कुटनीती म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला असेल , ह्या निर्णयावरून मला नाही वाटत तत्कालीन भारतीय जनता व विरोधी पक्ष ह्यांनी आक्षेप घेतला असेल, मुळात ह्या मुद्द्यावरून गांधी ह्यांनी उपोषण केले का नाही हे मला माहीत नाही , म्हणूनच गांधी प्रेमी जनतेकडून मी नक्की काय कारण होते हे जाणून घेण्याची मनीषा व्यक्त केली. माझ्या मते येथे थोडाबहुत ह्या घटनेवर प्रकाश टाकला आहे, माझ्या मते दोन देशांमध्ये एखादा करार होतो , तो जर एखादे राष्ट्र आपल्या देशाच्या हितासाठी तोडत असेल तर त्यात वावगे काय आहे , उद्या अमेरिका व पाकिस्तान ह्यांनी करार केले व काही कारणास्तव पाकिस्तान व अमेरिकेने तो करार मोडला तर ते नैतिकते पेक्षा वास्तविक मुद्द्यांवर भर देऊन प्रश्न सोडतात. गांधी ५५ कोटी मुद्द्यावर चूक होते की बरोबर हा मूळ मुद्दा नाही आहे , हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे , सरकारने जो निर्णय घेतला त्यावर भारतीय जनता व तत्कालीन विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याचे आठवत नाही , आधीच दंगलीने व्यथित झालेले हिंदू व मुसलमान त्यात पाकिस्तान लष्कराने केलेली आगळीक मुळात देशाची झालेली फाळणी अश्या पार्श्व भूमीवर एकटे गांधी नैतिकता दाखवत होते , आणि दुर्दैव म्हणजे सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले , लोकशाहीत सरकार व जनता व राजकीय पक्ष ह्यांच्या विरोधात एक व्यक्ती जातो व स्वतःचे म्हणणे सिद्ध करतो हे कितपत योग्य आहे , गोडसे ह्यांनी जे कृत्य केले ते चूक की बरोबर हे मला माहित नाही, पण देशाची फाळणी झाली व अल्प संख्यांक मुसलमान ह्यांनी हिंसेच्या जोरावर नाकावर टिच्चून ती फाळणी मिळवली , तेव्हा ह्या हिंसेसमोर अहिंसक गांधी व त्यांची तत्त्वे पराभूत झाली , अश्यावेळी परत परत आपली पराभूत तत्वे परत परत उगाळत देशाला अजून किती नुकसान सो कॉल्ड नैतिकतेच्या नावाखाली करून घ्यायचे होते. कृष्णनीती व चाणक्यनीती जाणणारा हा देश काही धर्मांध लोकांच्या हिंसे पुढे हतबल व्हावा. आणि देशाचा महत्त्वाचा भाग स्वतःपासून विलग करावा ही शोकांतिका आहे , नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,

In reply to by निनाद मुक्काम …

५५ कोटी आणि गांधी उपोषण यावर मिपावरच मी एक चर्चा खूप पूर्वी सुरू केली होती. आता स्वतःचे लेखन दिसत नसल्याने शोधता येणार नाही पण तुम्हाला शोधता आली तर ती वाचून तुमचे मत काय ते बनवा असे सांगता येईल.

In reply to by ऋषिकेश

दुवा सापदात नाहिये. तुम्ही, इन्द्राज पवार, थत्ते, सुनील ह्या सर्वांनी जबरदस्त माह्तिई दिली होतीत. "गांधींमुळं लै नुकसान झालं." किंवा "गांधी ही व्यक्ती वाटते तितकी भोळी/सात्विक्/भली नाही" ही माझी दोन्ही मतं त्यामुळं बदलली नाहित. पण ५५ कोटींबाबतचा मोठ्ठा गैरसमज दूर झाला; आणी १९४७ - १९४८ च्या काश्मीर युद्धाबद्द्दलचाही. निदान त्याबाबतीत तरी प्रचलित फेसबुकी मते चूक आहेत हे उमगले.

In reply to by मन१

मनोबा, http://www.misalpav.com/node/16478 या लेखाबध्दल बोलत आहेस का? येथील पवार, थत्ते, अन सुनिल यांचे प्रतिसाद अप्रतिम आहेत. असो , माझ्या खानदानात जरी आर्मी बैकग्राउंड असली तरीही गांधीजींबध्द्ल आदर कधीही कमी होणार नाही याचे कारण मी मुस्लिम आहे म्हणुन नव्हे तर गांधींजींची सत्याग्रहाची वृत्ती अन सर्वांना एकत्रपणे आणुन भारतीय स्वतंत्रतेचे विचाराचे बीज पेरण्याचे समंजसता जी भारतीय गावागावात पोहचली होती. त्यांची ग्रामसुधार विचाराचे चीज मणिभाई देसाई यांनी खुप प्रमाणात केल. गांधीजींच्या अहिंसेला समजणे सोपे नाही हे मान्य पण बलात्कारीवृतीला गांधीजींनी समर्थन केले असते का हा संभ्रम / विचार किती खालच्या पातळीचा आहे याचे आश्चर्य व खरंच किळस वाटली. असो ज्याची त्याची समज ! (असो, नेहमीप्रमाणे संपादकमंडळ माझे प्रतिसाद उडवतात व ते उडवतील त्यामुळे याबध्दल आता काहीच फरक पडत नाही म्हणा तरीही मनोबा, तुझ्यासाठी हा प्रतिसाद लिहीला)

In reply to by वाहीदा

http://www.misalpav.com/node/12510 त्यात तुला ५५ कोटी बध्द्ल चा उल्लेख आहे निश्चितपणे हाच तुला असलेल्या लेखाचा दुवा असावा. ~ वाहीदा

In reply to by मन१

तो दुवा मी निनाद यांना खव मध्ये मिळाल्यावर डकवला होता आता इथे देतोय. http://www.misalpav.com/node/12556 मत बदललं पाहिजे हा हट्ट नाहिच. सार्‍या तथ्यांनंतरही तेच मत राहिलं तरी ठिकच. फक्त तथ्यांना डावलून बनवलेली मतं तितकिशी योग्य वाटत नाहीत

In reply to by ऋषिकेश

कोणी त्या जुन्या चर्चेचा दुवा देईल का? खरा इतिहास हा बरेचदा लपला जातो, जे राहातं ते एखाद्या व्यक्तिच त्याविषयी मतं!

In reply to by निनाद मुक्काम …

"नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ," +१ खलिस्तानबरोबरच काश्मिर, हैद्राबाद, गोवा, जुनागढ इ. नवे देश सुद्धा अस्तित्वात आले असते. 'समजा गोडसेने गांधीजींचा वध केला नसता तर भारतात चांगले/वाईट असे नक्की कोणते बदल घडले असते?' असा प्रश्न मी एका दुसर्‍या चर्चेत विचारला होता. पण त्या प्रश्नाला कोणीही उत्तर दिले नव्हते. आतापर्यंतची चर्चा वाचून मला असे वाटते की, 'समजा गोडसेने गांधीजींचा वध केला नसता तर खालील घटना घडल्या असत्या/नसत्या. - महाराष्ट्रात ब्राह्मणांविरूद्धची दंगल १९४८ साली झाली नसती. पण अशी दंगल नंतरच्या काळात झालीच असती कारण काही लोकांच्या मनात ब्राह्मणांविरूद्ध जो राग खदखदत होता, त्या रागाला गांधीवधाचे निमित्त मिळून त्यांनी दंगल केली. जर ही घटना घडलीच नसती तर त्यांनी १९४८ नंतर काही काळाने काहीतरी वेगळ्या कारणावरून ब्राह्मणांविरूद्ध दंगल केलीच असती. - जुनागढ, हैद्राबाद इ. संस्थाने पोलिस कारवाईने स्वतंत्र भारतात सामील झाली नसती व त्यांना स्वतंत्र देशाचे स्वरूप द्यावे असा गांधीजींनी हट्ट धरून तो पूर्ण करायला लावला असता. - गांधीजींच्या कोणावरही सक्ती न करण्याच्या आग्रहामुळे काश्मिरचा स्वतंत्र देश झाला असता किंवा ते पाकिस्तानमध्ये सामील झाले असते.

In reply to by श्रीगुरुजी

"नशीब खलिस्तान चळवळ गांधीच्या हयातीत झाली नाही ,नाहीतर अजून एक देश अस्तित्वात आला असता ,"
कशावरून हो? उगीचच गांधीजींच्या नावाने काहीही खपवायचे?

"माझ्या मते दोन देशांमध्ये एखादा करार होतो , तो जर एखादे राष्ट्र आपल्या देशाच्या हितासाठी तोडत असेल तर त्यात वावगे काय आहे ," +१ भारताने फाळणीच्या वेळी पाकिस्तानचे ५५ कोटी द्यायचा करार केला असेलही. पण पाकिस्तानने विश्वासघात करून काश्मिरमध्ये सैन्य घुसवून युद्ध सुरू केल्यानंतरसुद्धा भारताने तो करार पाळावा यासाठी उपोषण करून सरकारला वेठीस धरणे अयोग्य होते.

गेल्या महिन्यातच मालदीवने माले येथील विमानतळाच्या देखभालीचे भारताच्या जीमआर कंपनीला दिलेले कंत्राट रद्द केले. याचा निषेध म्हणून भारताने मालदीवला देण्यात येणारी ५० कोटी डॉलर्सची मदत थांबविली आहे. याबाबतीत "जशास तसे" हे योग्य धोरणच भारताने राबविले. १९९१ च्या इराक युद्धाच्या वेळी सुद्धा अमेरिकेने जॉर्डनची आर्थिक मदत थांबविली होती. एखादा परका देश आपल्या देशाच्या हिताविरूद्ध धोरण राबवित असेल, तर त्या परक्या देशाशी सुरू असलेले करार सुरू ठेवणे हा भाबडेपणा आहे.

महात्मा गांधी ह्या विषयावर खुप चर्चा चालु आहे. माझे एकंदरीत इतिहास ह्या विषयवर फार वाचन नाही. महात्मा गांधी बद्दल तर फारसे काही नाहीच. पण तरीही माझे "ऐकीव" माहितीवरुन त्यांच्या बद्दल एक मत तयार झाले आहे.. जे फारसे चांगले नाही. त्याची कारणे खालील प्रमाणे असावीत.. १. मला अहिंसा पटते..ती दुसर्‍याला आपणहुन त्रास देऊ नये इतपत.. पण कुणी आपल्याला त्रास दिला तर त्याला अद्दल घडवावी ह्या मताची मी आहे. त्यामुळे एखाद्यानी आपल्याला मारले तर आपण दुसरा गाल पुढे करावा हे मला अजिबात पटत नाही. वर कुठे तरी वाचल्या प्रमाणे त्यांचा ह्या पद्धतीनी स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग जास्त व्यापक असेलही.. पण तरीही आपण दुसर्‍यावर हल्ला करु नये म्हणुन शांततेनी आंदोलन करावं इतपत हेही समजु शकते.. पण (पुन्हा इथेच वाचल्या प्रमाणे) बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा असं जर गांधी (इथे मी त्यांना महात्मा म्हणु शकत नाही..) तर त्यांच्यात आणि आसाराम बापुंमध्ये फरक तो काय? जे स्वतःला गांधी वादी म्हणतात ते त्यांच्या ह्या मताचे समर्थन करतात का? २. नथुराम गोडसे ह्यांना त्यांचा पाठिंबा मिळतो ज्यांना म्.गांधी पटत नाहीत. "दुश्मन का दुश्मन.." हा न्याय आहे तिथे.. त्यामुळे काही प्रमाणात मलाही गोडसेंच वागणं पटत.. ३. अजुन एक मोठा राग म.गांधी बद्दल असाही असु शकतो की, त्यांच्या पुधे सशस्त्र क्रांतीचे श्रेय अव्हेरले जाते. माझ्या मते (माझ्या तुट्पुंज्या माहितीनुसार) सशस्त्र क्रांती सुद्धा अत्यंत महत्वाची होती.. बाकी मला कशात फार रस नाही कारण त्यावर चर्चा करण्याची माझी लायकी नाही.. पण.. "बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा" ह्या मता बद्दल गांधीप्रेमींचे नक्की मत काय? (इथे आधी लिहिले असल्यास मला त्या प्रतिसादाची लिंक द्यावी.)

In reply to by पिलीयन रायडर

"बलात्कार होत असेल तर ओठ आवळुन तो सहन करावा" ह्या मता बद्दल गांधीप्रेमींचे नक्की मत काय?
यावर गांधीप्रेमींच्या मताने काय फरक पडतो. गांधीप्रेमींचे मत हे गांधींचे मत होत नाही. गांधींनी अशा प्रकारच्या केसींवर विशेष टिप्पणी केल्याचे वाचल्याचे आठवत नाही त्यामुळे 'आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते' स्वरुपाची चर्चा होऊ शकते. दुसरा मुद्दा सशस्त्र क्रांतीचा. गांधीबाबत लिहिणारे कधीही सशस्त्र क्रांतीचे श्रेय अव्हेरत नाहीत, मात्र सशस्त्र क्रांतीबाबत लिहिणारे नेहमीच जातायेता गांधींना टपल्या कशा मारता येतील ते पाहत असतात.

In reply to by आजानुकर्ण

यावर गांधीप्रेमींच्या मताने काय फरक पडतो. गांधीप्रेमींचे मत हे गांधींचे मत होत नाही
फरक तर खुद्द गांधींच्या मतानेही पडत नाही हो. पण त्यांची मते, विचार, निर्णय हे कसे योग्य होते.. अगदी अहिंसे पासुन ते फाळणी पर्यंत.. हे इथे सांगतच आहात तर मग मी विचारतेय त्या मुद्द्याला सोयिस्कर बगल का देताय?
मात्र सशस्त्र क्रांतीबाबत लिहिणारे नेहमीच जातायेता गांधींना टपल्या कशा मारता येतील ते पाहत असतात.
असेलही.. पण एरवी तावातावाने मुद्दे लिहीणारे मात्र गांधीच्या बाबतीत काही मुद्दे (काही ठराविक सत्याचे प्रयोग) मात्र विसरतात हे ही तेवढेच खरे.. तुम्हाला वाद घालायचाच असेल तर घाला, मी मात्र सरळ मनाने प्रष्न विचारला आहे. माझी गांधींबद्दलची बरीच मते इथे असलेली चर्चा वाचुन बदलली कारण खुप जणांनी इथे त्याची उत्तम कारणमीमांसा केली आहे... उदा:- फाळणी.. पण तरीही जे प्रष्न शिल्लक रहातात ते मी विचारले आहेत. जर त्याचे ही निराकरण होणार असेल तर त्यात वाईट काय?

In reply to by पिलीयन रायडर

फरक तर खुद्द गांधींच्या मतानेही पडत नाही हो. पण त्यांची मते, विचार, निर्णय हे कसे योग्य होते.. अगदी अहिंसे पासुन ते फाळणी पर्यंत.. हे इथे सांगतच आहात तर मग मी विचारतेय त्या मुद्द्याला सोयिस्कर बगल का देताय?
सोयीस्कर बगल दिलेली नाही. अहिंसेपासून फाळणीपर्यंत स्वतः गांधी जिवंत होते. त्यांनी स्वतः त्या मुद्द्यांवर स्वतःची मते व्यक्त केली आहेत. बलात्काराबाबत त्यांनी काही मत व्यक्त केल्याचे माझ्या वाचनात आले नाही.
. पण एरवी तावातावाने मुद्दे लिहीणारे मात्र गांधीच्या बाबतीत काही मुद्दे (काही ठराविक सत्याचे प्रयोग) मात्र विसरतात हे ही तेवढेच खरे..
ते मुद्दे कोण विसरले आहे हे कळले नाही. येथे कोणी त्या ब्रम्हचर्याबाबतच्या मुद्द्यांचा प्रतिवाद किंवा गांधींना असे केलेच नाही वगैरे म्हटले आहे काय? या मुद्दयांबाबत गांधींनी स्वतः त्यांची पुस्तके आणि वर्तमानपत्रातील लेख यामध्ये लिहिले आहे. स्वतः गांधींनीही त्याबाबत काही लपवलेले नाही. माझी वाद घालायची इच्छा नाही पण सरळ उत्तर हेच आहे की गांधींनी बलात्काराबाबत काही स्पेसिफिक विधाने केलेली नाहीत. त्यांच्या अहिंसेचा हवा तसा सोयीस्कर अर्थ लावून गांधीजी बलात्कार सहन करायला सांगत होते का (आणि आसाराम बापूंशी तुलना) वगैरे अर्थ काढणे हे सरळ मनाने विचारलेले वाटत नाही एवढेच सांगायचे होते.

In reply to by आजानुकर्ण

बलात्काराबाबत त्यांनी काही मत व्यक्त केल्याचे माझ्या वाचनात आले नाही.
हे घ्या..
http://misalpav.com/comment/456420#comment-456420 6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote: “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (D Keer, Mahatma Gandhi, Popular Prakashan, p. 473). Just before the partition, when both the Hindu and Sikh women were being raped by Muslims in large numbers in West Punjab, Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth, advised Gandhi (Lapierre and Collins, p. 479).
ही मदनबाण ह्यांची प्रतिक्रिया पहा. हे वाचुनच मला काही प्रश्न पडले होते जे मी विचारले आहेत. आता जर तुम्ही गांधींनी जे जे काही केलं..किंवा त्यांच्या सोबत जे जे घडलं..अहिंसा, सत्याचे प्रयोग पासुन ते फाळणी, त्यांचा खुन/ वध.. सगळं कसं योग्य/ अयोग्य होतं हे सांगत आहत.. (तुम्ही म्हणजे सर्व गांधीप्रेमी) तर मग ह्या मुद्या वरही तुमचे मत मला हवे आहे..
या मुद्दयांबाबत गांधींनी स्वतः त्यांची पुस्तके आणि वर्तमानपत्रातील लेख यामध्ये लिहिले आहे. स्वतः गांधींनीही त्याबाबत काही लपवलेले नाही.
हो सांगितयल ना.. पण म्हणुन ते योग्य होत नाही.. इतर स्त्रियांसोबत नग्न झोपणे की अंघोळ करणे हे तुम्हाला योग्य वाटतं का? ह्यावर्ही मत द्यावे.. तुमच्या लक्षात येत नाहीये.. हे असे मुद्दे आहेत जे लोकांना गांधी द्वेषी बनवतात.. त्यांचं मत कलुषित करतात.. आणि मला हेच सांगायचे आहे की मी गांधीप्रेमी ही नाही आणि द्वेषीही नाही.. माझे मत अजुन बनत आहे.. चर्चा वाचुन बदलत आहे.. मुळात कुठली तरी एक बाजु घेतलीच पाहीजे असा माझा अट्टहास नाही. पण ज्याला तुम्ही राष्ट्र्पिता/ महात्मा म्हणता त्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्यावर चर्चा होणारच.. तीच करायचा माझा हेतु आहे. तुम्हाला माझे हेतु सरळ वाटो न वाटो, मी तुम्हाला वैयक्ति़ काही विचारलच नाहीये..
त्यांच्या अहिंसेचा हवा तसा सोयीस्कर अर्थ लावून गांधीजी बलात्कार सहन करायला सांगत होते का (आणि आसाराम बापूंशी तुलना) वगैरे अर्थ काढणे हे सरळ मनाने विचारलेले वाटत नाही एवढेच सांगायचे होते.
मी कुठे "सोयिस्कर" अर्थ लावलाय हे ही सांगा.. गांधी अहिंसावादी होते म्हणजे त्यांनी नक्कीच बलात्काराला सहन करा असं "म्हणलं असेल.." असा "शोध" मी लावत नाहीये.. हे ही वाचा... http://digitaljournal.com/article/321957

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही दिलेल्या दुव्याखालील http://digitaljournal.com/article/321957 प्रतिसाद वाचावा
quote Mar 28, 2012 by Hans Smedbol #3 among many erroneous statements of fact, i have chosen to illustrate one error with the information provided in Wikipedia about the death of Kasturba Gandhi...which completely disagrees with your assertion that he refused proper medical treatment to his wife: "....then came a relapse. The doctor said Ayurvedic medicine could do no more for her. To those who tried to bolster her sagging morale saying "You will get better soon," Kasturba would respond, "No, my time is up." Shortly after seven that evening, Devdas took Mohandas and the doctors aside. In what he would later describe as "the sweetest of all wrangles I ever had with my father," he pleaded fiercely that Ba be given the life saving medicine, even though the doctors told him her condition was beyond help. It was Mohandas, after learning that the penicillin had to be administered by injection every four to six hours, who finally persuaded his youngest son to give up the idea. "Why do you want to prolong your mother's agonies after all the suffering she has been through?" Gandhi asked. Then he said, "You can't cure her now, no matter what miracle drug you may muster. But if you insist, I will not stand in your way."[1]" i don't know how you can read that to imply that Gandhi refused treatment to his wife. First he went along with the Ayurvedic medical approach, which many if not most Indians of that day, and indeed this day, would first pursue in hopes of relief. and she appeared to improve at first for a while...then the relapse...the Vaidyas (the ayurvedic doctors) declared her beyond hope of their care.... other allopathic doctors (or vaidyas with western medical training) were consulted about the new penicillin treatment...they suggested that it wouldn't work now...Gandhi listened to this, and being realistic asked his grief stricken son, if it wouldn't be better to just let his mother go, rather than stick a needle into her arm or bum or whatever every four to six hours, causing her a lot of pain with no gain, because the doctors thought it hopeless. but in the end of his statement, he bowed to the will of his son in this matter....if the son wanted to insist on Penicillin treatment he would not stand in the way. how do you interpret this to be a refusal of treatment. hindsight is a wonderful view...it's 100%....we can look back and decide that Gandhi's approach was wrong, and that he should have gone for the pencillin treatments much earlier...but this was 1944...Indians had every right in those days to rely upon Ayurveda FIRST and allopathic medicine second...even today this kind of treatment is often followed by Indians and others who respect Ayurveda....first the Ayurvedic medicine...and if that doesn't help enough...they go to the Allopathic medicine....unless of course it appears to be an emergency...life or death.... Penicillin was not yet widely used in those days, and the injections every four to six hours would have been painful...as there was no hope of the treatment succeeding (according to the doctors' advice at least), how was Gandhi remiss in his discussions with his son? it seems to me that you are an anti-Gandhi type, because quite a few of the arguments you use are open to other interpretations than your own, and some of them are outright wrong, such as that accusation above of Gandhi denying his wife essential treatment for her Bronchial infection. He did the best he could with what he knew, medically speaking, at that time. i think he acted out of compassion towards his wife, rather than cruelty....he saw how much she was already suffering from her heart disease, and the chronic bronchial troubles (brought on in childhood).....he saw that even if she did "recover" it wouldn't be a real recovery, because of the heart disease, which was killing her slowly and painfully. but he did not stand in the way of his son's administering the anti-biotics...he only advised against it, at that time, for some very plausible reasons, in my view. also quinine at that time was an already well established medical resource against Malaria, even if not a traditional Ayurvedic medicine. it was administered in India so regularly that Schweppes put it into their "Tonic Water", where you can still find it. i guess they thought that the amount of Gin and Tonics that the Brits used to drink in India, would provide therapeutic amounts of quinine. Read more: http://digitaljournal.com/article/321957#tab=comments&sc=0#ixzz2KCueBL9f
अन (मदन)बाळाने जे डकविले आहे ते धनंजय किर यांच्या पुस्तकातील आहे जे त्यांचे स्वतःचे गांधीबध्द्ल मत आहे that is his own interpretation of Gandhiji and can not be read as Gandhi has stated although he claims it so त्यामुळे पास. Due respect to his great(?) writing abilities, मी धनंजय किर यांच्याबाबतीतही बरेच वाचले आहे पण मला ते येथे देणे योग्य वाटत नाही .

In reply to by वाहीदा

ते आर्टिकल मी दिलं एक मत प्रवाह दाखवायला. त्या खालील प्रतिसादात जे लिहिलय ते माझ्या मुद्द्याला धरुन नाही.. त्यावर काही भाष्य? दुसरं असं की त्या सत्याच्या प्रयोगांबद्दल काय म्हणायच मग? का ते तसं वागायचे मुलींसोबत? का तेही खोटं आहे? असं काही वाचनात आलं की मग ह्या बलात्कारा सारख्या मुद्द्यावर विश्वास बसु शकतो.. बर.. धनंजय कीर कोण? त्यांच मत अस कशावरुन बनवलं त्यांनी? ते खोटं लिहीत असतील तर मग कुणी त्यावर आक्षेप घेतला आहे का? तुम्ही इथे लिहीणार नाही म्हणताय.. मग तुम्ही मला व्यनी का करत नाही?

In reply to by पिलीयन रायडर

अन हो येथे ही अन बरेच ठिकाणी बरेच जणं बरेच काही आक्षेपार्ह्य लिहीतात / बोलतातही अन ते तुनळीवर प्रकाशित ही करतात . पण आक्षेप घेण्यासाठी वेळ ही असायला हवा ना ? पण डोक्यावरुन पाणी जायला लागले की कधीतरी त्यावर आक्षेप ही घेतला जातो पण मग तो प्रतिसाद मिटविला जातो. गप्प बसणे म्हणजे ते accept करणे होत नाही. 'सत्याचे प्रयोग' या वर बर्‍याच चर्चा झाल्या आहेत व होतील. असो, हाथी चले अपनी चाल, कुत्तर भुके तो भुकवा दे !! हा आमचातरी मुलमंत्र आहे. (येथे कुत्तर अन हाथी हे व्यक्तीशः कोणालाही संबोधायचे नाही ) अन धनंजय कीर यांच्याबध्द्ल मला लिहीणे जाऊद्या , पण बोलण्यातही रस नाही सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसुलोंसे, के खुशबु आ नहीं सकती कभी कागज के फुलोंसे ! :-) असो , बाकी तुर्तास इतकेच ! शुभ रात्री !! ~ वाहीदा

मनोहर माळगावकरांच्या एका इंग्रजी पुस्तकात मी असे वाचले होते की फाळणीनंतर पाकिस्तानमधील बरीच हिंदू कुटुंबे दिल्लीला आल्यानंतर सुरवातीला त्यांना दिल्लीत फुटपाथवर/तंबूत रहावे लागले. त्यांना काही काळातच दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीचा सामना करायला लागला. त्यामुळे, मुस्लिम सोडून गेलेल्या काही मोकळ्या मशिदीत या कुटुंबांची तात्पुरती सोय करण्याचा सरकारचा विचार होता. पण काही मुस्लिमांच्या आक्षेपामुळे त्या कुटुंबांना मशिदीत आश्रय देण्यास गांधीजींनी विरोध केला व त्यामुळे ही योजना बारगळली. हे खरे की खोटे याची मला कल्पना नाही. परंतु माळगावकर या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकात असे वाचल्याचे आठविते.

In reply to by श्रीगुरुजी

दिल्लीच्या मशिदीत निर्वासितांना राहू दिले गेले नाही या बद्दल माहिती नाही.ते कदाचित खरे असेलही,पण देशभरात निर्वासितांची रहाण्याची सोय ज्या तातडीने आणि कार्यक्षमतेने करण्यात आली त्याला जगात तोड नाही.देश नुकताच स्वतंत्र झालेला,प्रशासनाची घडी न बसलेली,वाहतूक साधने नाहीत, बांधकाम साहित्यही तुट्पुंजे,देशभरातील रेल वे आणि असल्यानसल्या विमानसेवेसह कित्येक वाहने सीमेवर निर्वासितांच्या ने-आणीसाठी तैनात करावी लागलेली अशा स्थितीत भराभर कँप्स उघडून बराकी बांधण्यात आल्या.असे वाचले आहे की वाहतूक साधनांच्या टंचाईचा प्रभाव कश्मीरातल्या सैन्य आणि रसदपुरवठ्यावरही पडला.आधी सीमेवर येऊन ठेपलेल्या निर्वासितांना भराभर देशभर पांगवण्यात आले.खुद्द मुंबईमध्ये खार,सांताक्रुझ, गोरेगाव येथे मोठ्या वसाहती नव्याने बांधण्यात आल्या.उल्हासनगर हे नवे शहर वसवण्यात आले.याशिवाय बंगाल,गुजरात,राजस्थान, कर्णाटकातही निर्वासितांना वसवण्यात आले.तातडीची मदत दिल्यानंतर हे पुनर्वसनाचे कार्य जवळजवळ दोन वर्षे चालले होते.

बाकी नथुराम आणि त्याच्या तथाकथित संघटना यांचे स्वातंत्र्य लढ्यातल योगदान काय हा विषय पण उप चर्चेला घ्यायला हरकत नाही

In reply to by पिंपातला उंदीर

देशाला स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळाले दुसर्या महायुद्धात ब्रिटीश साम्राज्य खिळखिळे झाले , वसाहतवादी फ्रांस , इंग्लंड देश उध्वस्त झाले , जगाच्या पटलावर अमेरिका ,रशिया ह्या नवीन महाशक्ती उदयाला आल्या , इंग्रजांची एक आख्खी पिढी उध्वस्त झाली , युद्धानंतर तेथील तरुण पिढीला स्वतःचा देश उभारण्याचे काम करायचे होते , परदेशात वसाहतीत जाणे त्यांना मान्य नव्हते , कधी नव्हे तो मजूर पक्ष इंग्लंड मध्ये सत्तेवर आला हे सर्व शक्य झाले ते दुसरे महायुद्ध झाले म्हणून मजूर पक्ष भारताला स्वतंत्रता देण्याच्या बाजूने होता तर अमेरिका व रशिया वसाहत वादाच्या विरुद्ध होती कारण आता ते नवीन महासत्ता होते व युरोपियन देशांकडे वसाहती असणे म्हणजे स्वस्तात कच्चा माल व बाजारपेठ त्यांच्याकडे असणे म्हणजे त्यांच्याशी ह्या नवीन महासत्तेला असमतोल व विषम व्यापारी स्पर्धा करावी लागली असती , इंग्रजांनी भारताला स्वतंत्रता दिली ह्यामागे दुसरे महायुद्ध हे प्रमुख कारण आहे , तसे पहिले आपला शेजारी श्रीलंका सुद्धा शांततेच्या मार्गाने इंग्रजांशी लढा देत होते , मात्र १९४८ साली त्यांनी युद्धानंतर श्रीलंकेला इंग्रजांनी डोमिनन असा दर्जा दिला आणि मग १९७२ साली ते पूर्णतः स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले , गांधी सारखा महात्मा श्रीलंकेत चळवळ चालवत नव्हता किंबहुना तरीही इंग्रज तेथून टप्याने गेले , व त्यांनी पुढे अनेक आपल्या वसाहतींना गांधी सारखे नेतृत्व नव्हे तरी इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. उचलले मीठ व साम्राज्याचा पाया खचला अशी भंपक गिरी श्रीलंकन इतिहासात शिकवत नाहीत , दुसरे महायुद्धाने अनपेक्षितरीत्या वसाहतींना टप्प्याटप्याने स्वातंत्र्य मिळवून दिले.

ज्या इंग्रजांनी भारतिय स्त्रियांना बाटवले, अत्याचार केले, भारतिय पुरुषांची सतत सालटि सोलली त्या हरामखोर इंग्रजांविरुध्द अजिबात हात उगारु नका/ प्रत्युत्तर देउ नका/ गप्पपणे मार खा, मरा अथवा दुसरा गाल पुढे करा पण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या हिंसेला हिंसेने न्हवे तर केवळ अहिंसेनेच उत्तर द्या त्यांनी काहिही केले तरी शांतच रहा अशी लांछ्चनास्पद व संतापदायक, षंडदायक अधर्मीक साद समस्त भारतियबांधवांना घातल्या बद्दल स्वातंत्र्यापुर्वीच गांधिजींचा का बरे खुन झाला नाही ?

काही तरी नवीन विषय काढा बॉ ;) नाही तर जुने धागे उपसा आणि अभ्यास वाढवा. कंटाळा आला बॉ आता;) tech तेच ते... सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहील्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल, सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार सुख थोडे दु:ख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे त्या स्वप्नाचे शिल्पकार, कवि थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध नऊ धगे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती ' तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती ' तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एकतारी करीन म्हटले आत्महत्त्या रोमिओची आत्महत्त्या दधीचिची आत्महत्त्या आत्महत्त्याही तीच ती आत्मा ही तोच तो हत्त्याही तीच ती कारण, जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते कवी - विंदा करंदीकर