मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
17 Sep 2012 - 1:34 pm

मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली... मुर्ती घडवण्यासाठी योग्य माती कालवायला निदान २ तास तरी लागले...

हात जाम दमले होते, मग दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेतला आणि जेवण उरकल्यावर मुर्ती घडवायला लागलो... जमेल का? मागच्या वर्षी इतकीच मुर्ती छान घडेल का? असे प्रश्न मनात न आणता मी काम सुरु केलं... आधी बैठक, मग पाय, मग पोट अश्या प्रकारे मुर्तीला आकार येऊ लागला... पोटाला नीट आकार दिल्यावरच मग चेहरा करायला घ्यावा, पण मी तसं न करता पोटाला अर्धवट आकार दिल्यावर चेहरा करायला घेतला आणि पोटावर ठेवला... मुर्ती लहान असल्यामुळे मला नंतर पोटाला हवा तसा आकार द्यायला खूपच कष्ठ करावे लागले... आता मुर्तीचे हात आणि पाय करायला घेतले... एक हात लहान, तर एक मोठा असं होत होतं... सगळे हात समान आकारचे करायला एक तास तरी लागलाच असेल... मग पावलं पायांना जोडली आणि ढोबळ मानाने मुर्तीला आकार देवून झाला, आता निवांतपणे मुर्तीच फिनीशींग करायला लागलो...

फिनीशींग करताना जाणवलं की मुर्तीची सोंड जरा पातळ झालीय, मग ती सोंड काढली आणि जरा जाड सोंड बसवली... आता मुर्ती प्रपोर्शनेट वाटत होती... मला गणपतीचे कान छान जमत असल्यामुळे मुर्तीचे कान पटकन झाले...

आता सगळ्यात अवघड काम म्हणजे डोळ्यांच काम हाती घेतलं... डोळे करताना जरा भीती वाटते, म्हणून मुर्ती नीट घडल्यावर जरा आत्मविश्वास वाढला, की मग मी डोळ्यांच काम हाती घेतलं... नुसत्या दोन भुवया करायला मला २ तास लागले... मग मातीचं जानवं पण मुर्तीवर चढवलं आणि मुर्ती वाळायला ठेवली... कधी उन्हात, तर कधी टंगस्टनचा बल्ब पेटवून मुर्ती वाळवत होतो... अधून-मधून अजून थोडं-थोडं फिनीशींग चालूच होतं... २ दिवसांनी मुर्ती पुर्णपणे वाळल्यावर पांढरा रंग दिला...

व्हाईट-वॉश नंतर साधारण १२ तासानंतर रंगकाम सुरु केलं... अंगाला स्लेट कलर द्यायचं ठरवलं होतं... खूप वेळ प्रयत्न करुन पण मनासारखा रंग बनत नव्हता, मग त्यातल्या त्यात जो योग्य वाटत होता तो रंग अंगाला दिला... पितांबर पिवळ्या रंगाने रंगवलं, पण अंगाच्या स्लेट कलरवर पिवळा पितांबर उठून दिसेना, मग पिवळा आणि लाल रंग मिसळून पितांबर भगव्या रंगाच केलं...

अलंकार सोनेरी रंगवायचे होते म्हणून "गोल्डन पोस्टर कलर" आणला... हा रंग ब्रशने पसरवला तर सोनेरी वाटतच नव्हता, म्हणून लिटरली ब्रशने तो मी मुर्तीवर चिकटवला... सगळ्यात शेवटी डोळे पुर्ण केले आणि गणपती बाप्पाची मुर्ती पुर्णे झाली...

३-४ दिवसांपुर्वी जेव्हा मी मुर्ती करायला घेतली, तेव्हा मुर्ती इतकी सुरेख घडेल असं मला सुध्दा वाटलं नव्हतं...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.in/

कला

प्रतिक्रिया

लै भारी रे.
हा गुण ही आहे का तुझ्यात. :)

विमुक्त's picture

17 Sep 2012 - 1:43 pm | विमुक्त

जमेल ते करायचा पुरेपुर प्रयत्न करत असतो :)

यशोधरा's picture

17 Sep 2012 - 1:39 pm | यशोधरा

झक्कास रे विमुक्ता! एकदम भारी!
हल्ली कुठे भटकंती नाही का?

विमुक्त's picture

17 Sep 2012 - 1:48 pm | विमुक्त

भटकंती चालू आहे, पण लिहीणं जरा कमी झालय...

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर

वा..! चित्रकला आणि शिल्पकला दोन्ही कलांचा नुसता दर्शनिय आस्वाद घेणे एवढेच मला जमते. त्यामुळे गणपती चे घडविलेले शिल्प आवडले एवढेच म्हणू शकतो.

माझ्या डोळ्यांना तरी मस्तकाचा भाग, बाकी शरीराच्या मानाने, थोSSSSSSSडा मोठा झाल्यासारखा वाटतो आहे. जाणकार आपले मत देतीलच.

प्रचेतस's picture

17 Sep 2012 - 1:54 pm | प्रचेतस

काय देखणी मूर्ती झालीय राव.

खुपच सुंदर मुर्ती... मानलं बुवा तुम्हाला.... :)

गवि's picture

17 Sep 2012 - 1:59 pm | गवि

वा.. आवडली होममेड गणेशमूर्ती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2012 - 2:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

+१
मस्त मस्त मस्त

मी_आहे_ना's picture

17 Sep 2012 - 5:20 pm | मी_आहे_ना

असेच म्हणतो..

प्रभो's picture

17 Sep 2012 - 2:14 pm | प्रभो

भारी रे!!

उदय के'सागर's picture

17 Sep 2012 - 2:18 pm | उदय के'सागर

सुंदरच... स्वतः बनवलेल्या गोष्टींचं महत्त्व आणि आनंद काही औरच :) जमल्यास ह्या मूर्तीचं विसर्जन करु नका :)

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

पुष्कर जोशी's picture

20 Sep 2012 - 4:12 pm | पुष्कर जोशी

मग पुढील वर्षी नवीन मूर्ती नाही बघयला मिळणार ..

मनराव's picture

17 Sep 2012 - 2:29 pm | मनराव

एक नंबर रे......!!!

भारी जमली आहे एकदम.... डोळे आणि हाता-पायाची बोटं जमणं लै अवघड...

गणपतीच्या हस्तमुद्रांवर फार मेहनत घेतलेली जाणवते आहे मूर्ती बघताना. मस्तच !!

पांथस्थ's picture

17 Sep 2012 - 3:24 pm | पांथस्थ

एकदम मस्त घडली आहे गणेश मुर्ती!!

लीलाधर's picture

17 Sep 2012 - 4:06 pm | लीलाधर

एवढेच म्हणेन... गणपती बाप्पा मोरया !

लीलाधर's picture

17 Sep 2012 - 4:06 pm | लीलाधर

एवढेच म्हणेन... गणपती बाप्पा मोरया !

ज्ञानराम's picture

17 Sep 2012 - 4:09 pm | ज्ञानराम

शेवटचा काही फोटो दिसत नाही
बाकी उत्तम झाली आहे मुर्ती... सुंदर...

वैनतेय's picture

17 Sep 2012 - 4:13 pm | वैनतेय

मुर्ती एकच नंबर!!!

यावर्षी मी पण केलिये पण इतकी सुंदर नाही झाली...

चौकटराजा's picture

17 Sep 2012 - 4:19 pm | चौकटराजा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे दरवर्षी " पेण" येथील रेखीव मूर्ती स्थपिण्याच्या मानसिकतेतून मुक्तता झाली
हे महत्वाचे. माझ्या माहितीप्रमाणे १०० एक वर्षापूर्वी अनेक घरी मूर्ती स्वत" च बनवीत असत. विमुक्त राव
मनाची ही भरारी आपल्या भटकंती प्रमाणेच लै भारी !

ताक - उंदीर बनविण्यापूर्वीच माती संपलेली दिसतेय !

सुंदर ! :)
गणपती बाप्पा मोरया !!! :)

मूकवाचक's picture

17 Sep 2012 - 5:26 pm | मूकवाचक

गणपती बाप्पा मोरया!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2012 - 5:01 pm | अत्रुप्त आत्मा

आपल्या कलेस सलाम मारणेत आलेला आहे... --^--

सहज's picture

17 Sep 2012 - 5:10 pm | सहज

विमुक्ता वेलकम बॅक!!!!!!

मीनल's picture

17 Sep 2012 - 5:32 pm | मीनल

मूर्ती सुंदर दिसते आहे. मला मुकुट, स्वस्तिक आणि गंध आवडले.

अभ्या..'s picture

17 Sep 2012 - 5:35 pm | अभ्या..

छान झाली आहे.

>>>>ताक - उंदीर बनविण्यापूर्वीच माती संपलेली दिसतेय !<<<<<
माती संपली तर राहु दे. आसनावर रंगाने तरी काढा मामा. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2012 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे. लंबर एकचा गणपती मला अंतिम रंगकाम झालेल्या गणपती इतकाच आवडला.
कलाकारी आवडली. लगे रहो.

-दिलीप बिरुटे

मूर्ती चांगली जमलीये.
फारच संयम पाहिजे यासाठी.
अभिनंदन.

वामन देशमुख's picture

17 Sep 2012 - 5:55 pm | वामन देशमुख

हौशी कलाकाराच्या मानाने मुर्ती खूपच छान! अजून काही (सजावट वगैरे) केलीय का?

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 7:04 pm | नाना चेंगट

मस्त !!!

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 7:05 pm | नाना चेंगट

मस्त !!!

पैसा's picture

17 Sep 2012 - 7:20 pm | पैसा

मस्तच!

प्यारे१'s picture

17 Sep 2012 - 8:38 pm | प्यारे१

मोरया.....!

ॐ गं गणपतये नमः !

किसन शिंदे's picture

17 Sep 2012 - 8:45 pm | किसन शिंदे

जबराट!!

पण बाप्पा एवढा रागाने का पाहतोय? ;)

चौकटराजा's picture

22 Sep 2012 - 12:34 pm | चौकटराजा

फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी आयकरात ३० च्या ऐवजी ३५ टक्के दराची एक आणखी स्लॅब वाढवावी असे सांगणारा कोणी वॉरेन बफे
भारतात नाही याचा गणपतीला मनस्वी राग आलेला आहे !

विकास's picture

17 Sep 2012 - 9:05 pm | विकास

एकदम आवडली! गोंडस आहे. :-)

रंग कुठले वापरले? केवळ शाडूच्या मातीची असल्याने (म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरीस नसल्याने), इको फ्रेंडली आहे असे म्हणता येईल असे वाटते.

दोन्ही पाय जुळवलेली बालरुप मुर्ति रंगावरुन वीट्ठलदर्शणी वाटली.
छान आहे फक्त डोक्याचा भाग शरिरापेक्षा साधारण मोठा जानवला .
राग माणु नये .मुर्त्ति सुंदर ,कलेचं कौतुक .

आपली कला खूप आवडली आहे.
घरी केलेल्या गणपतीला स्वत: खपून केलेली आरास व आपल्याच बागेतील फुलांची पूजा हा योग अनुभवला आहे . तेंव्हा विसर्जनाच्या दिवशी डोळ्यात पाणी आले होते.

कौशी's picture

17 Sep 2012 - 10:20 pm | कौशी

खुप खुप आवडली.

प्रास's picture

17 Sep 2012 - 10:35 pm | प्रास

मूर्ती झकास बनलेली आहे.
आणि हो, मला व्यक्तिशः गणपतीच्या मूर्तीमध्ये धडाच्या तुलनेने डोकं थोडं मोठं असणंच योग्य वाटतं. शेवटी लहानग्या बाळाच्या धडावर हत्तीचं शिर जोडलेलं आहे शंकरदेवानं, नै का?

५० फक्त's picture

17 Sep 2012 - 10:53 pm | ५० फक्त

उत्तम, सुड म्हणतो तसं हस्तमुद्रा अतिशय उत्तम झालेल्या आहेत.

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2012 - 11:16 pm | पिवळा डांबिस

मूर्ती मस्त बनली आहे. आवडली.
हार्दिक अभिनंदन!

अमोल केळकर's picture

20 Sep 2012 - 11:01 am | अमोल केळकर

खुप मस्त !
यावर्षी आम्हाला शाडूची मुर्ती मिळाली नाही. पुढील बर्षीसाठी आत्ताच नोंदणी करु का तुमच्याकडे ? :)

मोरया !

अमोल केळकर

शेफ's picture

20 Sep 2012 - 2:03 pm | शेफ

मुर्ती छान जमली आहे.
मलाही एकदा प्रयत्न करायला आवडेल. पण... शाडुची माती कुठे मिळेल?

नि३सोलपुरकर's picture

22 Sep 2012 - 11:57 am | नि३सोलपुरकर

खुप मस्त ! विमुक्ता,
फारच संयम पाहिजे या कले साठी.
अभिनंदन.

सुधीर's picture

22 Sep 2012 - 3:50 pm | सुधीर

सुंदर झालीए मूर्ती.

सुंदर!

- ( मूर्तीपूजक) सोकाजी

दादा कोंडके's picture

22 Sep 2012 - 5:35 pm | दादा कोंडके

पण दुसर्‍या फोटोत दिसणारी मूर्ती शेवटच्या मूर्तीपेक्षा छान दिसतेय!

येस्स! मलापण दुसर्‍या फोटोतली मुर्ती आवडली.
विमुक्त तुमच कौतुक कराव तेव्हढ थोडच.एव्हढ्या छान्छोकीच्या जमान्यात कोण स्वतः तयार करुन बघेल नाही का?

सुमीत भातखंडे's picture

23 Sep 2012 - 12:07 pm | सुमीत भातखंडे

उत्तम घडल्ये मुर्ती...

शुचि's picture

25 Sep 2012 - 7:41 am | शुचि

आहाहा क्या बात है!

मस्त सुंदर झालीये मुर्ती ,

आता भटकंती पण लिहायला घे बर !

आश's picture

26 Sep 2012 - 10:12 am | आश

खुपचं छान