✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

व
विमुक्त यांनी
Mon, 09/17/2012 - 13:34  ·  लेख
लेख
मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली... मुर्ती घडवण्यासाठी योग्य माती कालवायला निदान २ तास तरी लागले... हात जाम दमले होते, मग दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेतला आणि जेवण उरकल्यावर मुर्ती घडवायला लागलो... जमेल का? मागच्या वर्षी इतकीच मुर्ती छान घडेल का? असे प्रश्न मनात न आणता मी काम सुरु केलं... आधी बैठक, मग पाय, मग पोट अश्या प्रकारे मुर्तीला आकार येऊ लागला... पोटाला नीट आकार दिल्यावरच मग चेहरा करायला घ्यावा, पण मी तसं न करता पोटाला अर्धवट आकार दिल्यावर चेहरा करायला घेतला आणि पोटावर ठेवला... मुर्ती लहान असल्यामुळे मला नंतर पोटाला हवा तसा आकार द्यायला खूपच कष्ठ करावे लागले... आता मुर्तीचे हात आणि पाय करायला घेतले... एक हात लहान, तर एक मोठा असं होत होतं... सगळे हात समान आकारचे करायला एक तास तरी लागलाच असेल... मग पावलं पायांना जोडली आणि ढोबळ मानाने मुर्तीला आकार देवून झाला, आता निवांतपणे मुर्तीच फिनीशींग करायला लागलो... फिनीशींग करताना जाणवलं की मुर्तीची सोंड जरा पातळ झालीय, मग ती सोंड काढली आणि जरा जाड सोंड बसवली... आता मुर्ती प्रपोर्शनेट वाटत होती... मला गणपतीचे कान छान जमत असल्यामुळे मुर्तीचे कान पटकन झाले... आता सगळ्यात अवघड काम म्हणजे डोळ्यांच काम हाती घेतलं... डोळे करताना जरा भीती वाटते, म्हणून मुर्ती नीट घडल्यावर जरा आत्मविश्वास वाढला, की मग मी डोळ्यांच काम हाती घेतलं... नुसत्या दोन भुवया करायला मला २ तास लागले... मग मातीचं जानवं पण मुर्तीवर चढवलं आणि मुर्ती वाळायला ठेवली... कधी उन्हात, तर कधी टंगस्टनचा बल्ब पेटवून मुर्ती वाळवत होतो... अधून-मधून अजून थोडं-थोडं फिनीशींग चालूच होतं... २ दिवसांनी मुर्ती पुर्णपणे वाळल्यावर पांढरा रंग दिला... व्हाईट-वॉश नंतर साधारण १२ तासानंतर रंगकाम सुरु केलं... अंगाला स्लेट कलर द्यायचं ठरवलं होतं... खूप वेळ प्रयत्न करुन पण मनासारखा रंग बनत नव्हता, मग त्यातल्या त्यात जो योग्य वाटत होता तो रंग अंगाला दिला... पितांबर पिवळ्या रंगाने रंगवलं, पण अंगाच्या स्लेट कलरवर पिवळा पितांबर उठून दिसेना, मग पिवळा आणि लाल रंग मिसळून पितांबर भगव्या रंगाच केलं... अलंकार सोनेरी रंगवायचे होते म्हणून "गोल्डन पोस्टर कलर" आणला... हा रंग ब्रशने पसरवला तर सोनेरी वाटतच नव्हता, म्हणून लिटरली ब्रशने तो मी मुर्तीवर चिकटवला... सगळ्यात शेवटी डोळे पुर्ण केले आणि गणपती बाप्पाची मुर्ती पुर्णे झाली... ३-४ दिवसांपुर्वी जेव्हा मी मुर्ती करायला घेतली, तेव्हा मुर्ती इतकी सुरेख घडेल असं मला सुध्दा वाटलं नव्हतं... विमुक्त http://www.murkhanand.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24240 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

लै भारी रे. हा गुण ही आहे का

गणपा
Mon, 09/17/2012 - 13:35 नवीन
लै भारी रे. हा गुण ही आहे का तुझ्यात. :)
  • Log in or register to post comments

जमेल ते करायचा पुरेपुर

विमुक्त
Mon, 09/17/2012 - 13:43 नवीन
जमेल ते करायचा पुरेपुर प्रयत्न करत असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

झक्कास रे विमुक्ता! एकदम

यशोधरा
Mon, 09/17/2012 - 13:39 नवीन
झक्कास रे विमुक्ता! एकदम भारी! हल्ली कुठे भटकंती नाही का?
  • Log in or register to post comments

भटकंती चालू आहे, पण लिहीणं

विमुक्त
Mon, 09/17/2012 - 13:48 नवीन
भटकंती चालू आहे, पण लिहीणं जरा कमी झालय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्त.

प्रभाकर पेठकर
Mon, 09/17/2012 - 13:51 नवीन
वा..! चित्रकला आणि शिल्पकला दोन्ही कलांचा नुसता दर्शनिय आस्वाद घेणे एवढेच मला जमते. त्यामुळे गणपती चे घडविलेले शिल्प आवडले एवढेच म्हणू शकतो. माझ्या डोळ्यांना तरी मस्तकाचा भाग, बाकी शरीराच्या मानाने, थोSSSSSSSडा मोठा झाल्यासारखा वाटतो आहे. जाणकार आपले मत देतीलच.
  • Log in or register to post comments

छान

प्रचेतस
Mon, 09/17/2012 - 13:54 नवीन
काय देखणी मूर्ती झालीय राव.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर मुर्ती... मानलं

Mrunalini
Mon, 09/17/2012 - 13:58 नवीन
खुपच सुंदर मुर्ती... मानलं बुवा तुम्हाला.... :)
  • Log in or register to post comments

वा.. आवडली होममेड

गवि
Mon, 09/17/2012 - 13:59 नवीन
वा.. आवडली होममेड गणेशमूर्ती.
  • Log in or register to post comments

+१ मस्त मस्त मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/17/2012 - 14:12 नवीन
+१ मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

मी_आहे_ना
Mon, 09/17/2012 - 17:20 नवीन
असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भारी रे!!

प्रभो
Mon, 09/17/2012 - 14:14 नवीन
भारी रे!!
  • Log in or register to post comments

सुंदरच... स्वतः बनवलेल्या

उदय के'सागर
Mon, 09/17/2012 - 14:18 नवीन
सुंदरच... स्वतः बनवलेल्या गोष्टींचं महत्त्व आणि आनंद काही औरच :) जमल्यास ह्या मूर्तीचं विसर्जन करु नका :) गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

असे कसे ?

पुष्कर जोशी
गुरुवार, 09/20/2012 - 16:12 नवीन
मग पुढील वर्षी नवीन मूर्ती नाही बघयला मिळणार ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

एक नंबर रे......!!! भारी जमली

मनराव
Mon, 09/17/2012 - 14:29 नवीन
एक नंबर रे......!!! भारी जमली आहे एकदम.... डोळे आणि हाता-पायाची बोटं जमणं लै अवघड...
  • Log in or register to post comments

गणपतीच्या हस्तमुद्रांवर फार

सूड
Mon, 09/17/2012 - 15:02 नवीन
गणपतीच्या हस्तमुद्रांवर फार मेहनत घेतलेली जाणवते आहे मूर्ती बघताना. मस्तच !!
  • Log in or register to post comments

झकास!

पांथस्थ
Mon, 09/17/2012 - 15:24 नवीन
एकदम मस्त घडली आहे गणेश मुर्ती!!
  • Log in or register to post comments

सुंदर

लीलाधर
Mon, 09/17/2012 - 16:06 नवीन
एवढेच म्हणेन... गणपती बाप्पा मोरया !
  • Log in or register to post comments

सुंदर

लीलाधर
Mon, 09/17/2012 - 16:06 नवीन
एवढेच म्हणेन... गणपती बाप्पा मोरया !
  • Log in or register to post comments

काही फोटो दिसत नाहीत...

ज्ञानराम
Mon, 09/17/2012 - 16:09 नवीन
शेवटचा काही फोटो दिसत नाही बाकी उत्तम झाली आहे मुर्ती... सुंदर...
  • Log in or register to post comments

गणपती बाप्पा मोरया!!!

वैनतेय
Mon, 09/17/2012 - 16:13 नवीन
मुर्ती एकच नंबर!!! यावर्षी मी पण केलिये पण इतकी सुंदर नाही झाली...
  • Log in or register to post comments

सगळयात महत्वाचे ..

चौकटराजा
Mon, 09/17/2012 - 16:19 नवीन
सगळ्यात महत्वाचे म्हणजे दरवर्षी " पेण" येथील रेखीव मूर्ती स्थपिण्याच्या मानसिकतेतून मुक्तता झाली हे महत्वाचे. माझ्या माहितीप्रमाणे १०० एक वर्षापूर्वी अनेक घरी मूर्ती स्वत" च बनवीत असत. विमुक्त राव मनाची ही भरारी आपल्या भटकंती प्रमाणेच लै भारी ! ताक - उंदीर बनविण्यापूर्वीच माती संपलेली दिसतेय !
  • Log in or register to post comments

सुंदर ! गणपती बाप्पा मोरया

मदनबाण
Mon, 09/17/2012 - 17:00 नवीन
सुंदर ! :) गणपती बाप्पा मोरया !!! :)
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 09/17/2012 - 17:26 नवीन
गणपती बाप्पा मोरया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपल्या कलेस सलाम मारणेत आलेला

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/17/2012 - 17:01 नवीन
आपल्या कलेस सलाम मारणेत आलेला आहे... --^-- Image removed.
  • Log in or register to post comments

गणपती बाप्पा मोरया!

सहज
Mon, 09/17/2012 - 17:10 नवीन
विमुक्ता वेलकम बॅक!!!!!!
  • Log in or register to post comments

खूप छान

मीनल
Mon, 09/17/2012 - 17:32 नवीन
मूर्ती सुंदर दिसते आहे. मला मुकुट, स्वस्तिक आणि गंध आवडले.
  • Log in or register to post comments

छानच.

अभ्या..
Mon, 09/17/2012 - 17:35 नवीन
छान झाली आहे. >>>>ताक - उंदीर बनविण्यापूर्वीच माती संपलेली दिसतेय !<<<<< माती संपली तर राहु दे. आसनावर रंगाने तरी काढा मामा. ;-)
  • Log in or register to post comments

अहाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/17/2012 - 17:40 नवीन
मस्त रे. लंबर एकचा गणपती मला अंतिम रंगकाम झालेल्या गणपती इतकाच आवडला. कलाकारी आवडली. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मूर्ती चांगली जमलीये. फारच

रेवती
Mon, 09/17/2012 - 17:42 नवीन
मूर्ती चांगली जमलीये. फारच संयम पाहिजे यासाठी. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सजावट वगैरे

वामन देशमुख
Mon, 09/17/2012 - 17:55 नवीन
हौशी कलाकाराच्या मानाने मुर्ती खूपच छान! अजून काही (सजावट वगैरे) केलीय का?
  • Log in or register to post comments

मस्त !!!

नाना चेंगट
Mon, 09/17/2012 - 19:04 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

मस्त !!!

नाना चेंगट
Mon, 09/17/2012 - 19:05 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Mon, 09/17/2012 - 19:20 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मोरया.....! ॐ गं गणपतये नमः !

प्यारे१
Mon, 09/17/2012 - 20:38 नवीन
मोरया.....! ॐ गं गणपतये नमः !
  • Log in or register to post comments

जबराट!! पण बाप्पा एवढा रागाने

किसन शिंदे
Mon, 09/17/2012 - 20:45 नवीन
जबराट!! पण बाप्पा एवढा रागाने का पाहतोय? ;)
  • Log in or register to post comments

गणपतीचा राग

चौकटराजा
Sat, 09/22/2012 - 12:34 नवीन
फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी आयकरात ३० च्या ऐवजी ३५ टक्के दराची एक आणखी स्लॅब वाढवावी असे सांगणारा कोणी वॉरेन बफे भारतात नाही याचा गणपतीला मनस्वी राग आलेला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त!

विकास
Mon, 09/17/2012 - 21:05 नवीन
एकदम आवडली! गोंडस आहे. :-) रंग कुठले वापरले? केवळ शाडूच्या मातीची असल्याने (म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरीस नसल्याने), इको फ्रेंडली आहे असे म्हणता येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

दोन्ही पाय जुळवलेली बालरुप

जेनी...
Mon, 09/17/2012 - 21:09 नवीन
दोन्ही पाय जुळवलेली बालरुप मुर्ति रंगावरुन वीट्ठलदर्शणी वाटली. छान आहे फक्त डोक्याचा भाग शरिरापेक्षा साधारण मोठा जानवला . राग माणु नये .मुर्त्ति सुंदर ,कलेचं कौतुक .
  • Log in or register to post comments

क्रमाने घडत गेलेल्या बाप्पाना मोरया !

तर्री
Mon, 09/17/2012 - 21:52 नवीन
आपली कला खूप आवडली आहे. घरी केलेल्या गणपतीला स्वत: खपून केलेली आरास व आपल्याच बागेतील फुलांची पूजा हा योग अनुभवला आहे . तेंव्हा विसर्जनाच्या दिवशी डोळ्यात पाणी आले होते.
  • Log in or register to post comments

खुपच छान..

कौशी
Mon, 09/17/2012 - 22:20 नवीन
खुप खुप आवडली.
  • Log in or register to post comments

विमुक्तराव,

प्रास
Mon, 09/17/2012 - 22:35 नवीन
मूर्ती झकास बनलेली आहे. आणि हो, मला व्यक्तिशः गणपतीच्या मूर्तीमध्ये धडाच्या तुलनेने डोकं थोडं मोठं असणंच योग्य वाटतं. शेवटी लहानग्या बाळाच्या धडावर हत्तीचं शिर जोडलेलं आहे शंकरदेवानं, नै का?
  • Log in or register to post comments

उत्तम, सुड म्हणतो तसं

५० फक्त
Mon, 09/17/2012 - 22:53 नवीन
उत्तम, सुड म्हणतो तसं हस्तमुद्रा अतिशय उत्तम झालेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Mon, 09/17/2012 - 23:16 नवीन
मूर्ती मस्त बनली आहे. आवडली. हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

खुप मस्त !

अमोल केळकर
गुरुवार, 09/20/2012 - 11:01 नवीन
खुप मस्त ! यावर्षी आम्हाला शाडूची मुर्ती मिळाली नाही. पुढील बर्षीसाठी आत्ताच नोंदणी करु का तुमच्याकडे ? :) मोरया ! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मस्त !

शेफ
गुरुवार, 09/20/2012 - 14:03 नवीन
मुर्ती छान जमली आहे. मलाही एकदा प्रयत्न करायला आवडेल. पण... शाडुची माती कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

खुप मस्त ! विमुक्ता,

नि३सोलपुरकर
Sat, 09/22/2012 - 11:57 नवीन
खुप मस्त ! विमुक्ता, फारच संयम पाहिजे या कले साठी. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सुंदर!

सुधीर
Sat, 09/22/2012 - 15:50 नवीन
सुंदर झालीए मूर्ती.
  • Log in or register to post comments

सुंदर! - ( मूर्तीपूजक) सोकाजी

सोत्रि
Sat, 09/22/2012 - 17:12 नवीन
सुंदर! - ( मूर्तीपूजक) सोकाजी
  • Log in or register to post comments

सुंदर मूर्ती!

दादा कोंडके
Sat, 09/22/2012 - 17:35 नवीन
पण दुसर्‍या फोटोत दिसणारी मूर्ती शेवटच्या मूर्तीपेक्षा छान दिसतेय!
  • Log in or register to post comments

येस्स! मलापण दुसर्‍या फोटोतली

स्पंदना
Sun, 09/23/2012 - 16:28 नवीन
येस्स! मलापण दुसर्‍या फोटोतली मुर्ती आवडली. विमुक्त तुमच कौतुक कराव तेव्हढ थोडच.एव्हढ्या छान्छोकीच्या जमान्यात कोण स्वतः तयार करुन बघेल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा