वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता. ती मघईची पाने टिपायचा हा प्रयत्न.
मघई ची २ पानं वेगळी लावतात.
तुम्ही एक मागितलेलं असतं.
लक्षात घ्या. पूना पान, कलकत्ता, बनारस अन मघई. पूना म्हणजे आपली चालू नागवेलीची पानं. पूजेला आपण आणतो ना? विड्याची पानं? ती. बनारसी असंच बदामी आकाराचं पण चांगलं हाताच्या तळव्याइतकं. पिवळसर. (यातली छोटी पिवळी पानं मघई म्हणून खपवतात.) कलकत्ता पान असं हिरवं कंच अन बदामीच असतं.
पूना पान रेग्युलर 'साधं पान'. म्हणजे काथ, चुना, सुपारी, हवी तर थोडी तमाखू. पंढरपुरी, वा गायछाप. कधी स्टँडर्ड पान म्हणून तमाखू ऐवजी किवाम. बस. मांडवपरतणीच्या मिरवणूकीत ढोलताशावर नाचणारी पब्लिक.
बनारस नेहेमी किंवा बहुधा 'मसाला'. काय वाट्टेल ते घालायचं. गुलकंद. पाकातला कोहळा(चेरी), वेगवेगळ्या सुपार्या, बडि किंवा जिरेशोप, गुंजपत्ती, थोडं रंगेल व्हायचं तर किवाम लावायचा, अन 'पलंगतोड पान' म्हणून उक्कू शी भांगेची गोळी चोळायची त्यातच. हे म्हणजे मुजरा ऐकणारे नवाबजादे.
कलकत्ता पान तिखट चवीला. त्याचा मसाला, किंवा सादा, किंवा श्ट्यांडर्ड हे खाण्याचं काम त्यातल्या त्यात शिकाऊ मर्दांनी करायचं. थोडा मुजरा, थोडी गझल. फार वर गेले तर ठुमरीऐकणारे.
कलकत्ता मसाला पुरुषांनी अन बनारस मसाला स्त्रियांनी खायचं असा तांबूलसेवनाचा अलिखित नियम.
ही सगळी पानं डबल लागणार. म्हणजे पानवाला २ पानं एकत्र घेतो अन मग त्यावर सगळे मसाले रचतो. लवंग लावून सील करतो. अन ९९.९% लोक ती लवंग फेकून देतात. का कुणास ठाऊक.
मघई ची पानं मात्र इव्ली इवली असतात. अन वेग-वेगळी लागतात. हे पान म्हणजे डायरेक्ट ख्याल गायकी. मधे काही नाही. मघई मसाला खाणे म्हणजे करंटेपणा. अन त्यात गायछाप टाकणे म्हणजे blasphemy.
मघई, किमान १२०-३००, नवरत्न किवाम, थोडी पक्की सुपारी. १-२ तुकडे बाऽस होतात.
वाटलं तर गुंजेचा पाला, थोडी विलायची. फाऽर झालं तर थोडी खुश्बु किंवा ठंडाई.
एक दाढेखाली ठेवावं.
दुसरं बांधून घ्यावं. तीनेक तासांनी दुसर्या पानाची आठवण येते. मग ते हळूच तोंडात ठेवावं.
आहाहा!
याला म्हणतात मघई पान!
पट्टी लाव रे येक १२० राजरतन किवाम्..अबे टाक ना १२० अजुन थोडसाक्..तो म्हनत जाय "भौ राजा ओरिजिनल हाय ना"....सुपारी भुज्जि मिडियम टाकजो बे आन लवंग नको लाउ फकस्त इलायचि टाक फोडुन.
हा संवाद नविन जागि पान खात असल्यासच होत असे. नेहमि च्या जागि हे एव्हढे सांगावे लागत नसे.
जि नेहमिचि पान खाण्याचि जागा होति त्याला पान टपरी म्हणवत नव्हत "म्होट्ट्या २ दुकानाच मिळुन एक पान पॅलेस केल होत."
पुण्यात पान नाहि खात १२० नकली.. किवाम नकली... वरिजिनल मिळत असेल पण ते एखाद्या दर्दि लाच विचाराव लागेल =))
पुण्यात कर्वेनगर-कोथरूड भागात "नाद" नामे पानाचं दुकान आहे. त्याच्याकडे १२०/३००, किवाम वगैरे माल अस्सल मिळेल. पण समोर उभं राहून बनवून घ्या नाहीतर चटण्या-कोशिंबिरी कायपण ढकलेल पानात.
प्रतिक्रिया
20 Aug 2012 - 12:32 pm | सुहास महाजन
Very micro observation Dear, good
20 Aug 2012 - 12:46 pm | बॅटमॅन
मस्त फोटो. पहिला फोटो पाहिल्यावर पानाचे जणू सिक्स-पॅक्स असावेत असं वाटतंय ;)
20 Aug 2012 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
अख्ख्या वेलिचा फोटू नैय्ये का हो? तो टाका ना...म्हणजे याच्या रंगरुपा बद्दल जरा बोलता येइल ... ! :-)
20 Aug 2012 - 6:04 pm | मदनबाण
आज पर्यंत अनेक पानवाल्यांना विचारले...पण त्यांच्याकडे मघईचे पान काही दिसले नाही,बनारसी किंवा कलकत्ता बास्स.
पण आज ते पान कसं असत ते कळलं !
23 Aug 2012 - 11:51 pm | आनंदी गोपाळ
मघई ची २ पानं वेगळी लावतात.
तुम्ही एक मागितलेलं असतं.
लक्षात घ्या. पूना पान, कलकत्ता, बनारस अन मघई. पूना म्हणजे आपली चालू नागवेलीची पानं. पूजेला आपण आणतो ना? विड्याची पानं? ती. बनारसी असंच बदामी आकाराचं पण चांगलं हाताच्या तळव्याइतकं. पिवळसर. (यातली छोटी पिवळी पानं मघई म्हणून खपवतात.) कलकत्ता पान असं हिरवं कंच अन बदामीच असतं.
पूना पान रेग्युलर 'साधं पान'. म्हणजे काथ, चुना, सुपारी, हवी तर थोडी तमाखू. पंढरपुरी, वा गायछाप. कधी स्टँडर्ड पान म्हणून तमाखू ऐवजी किवाम. बस. मांडवपरतणीच्या मिरवणूकीत ढोलताशावर नाचणारी पब्लिक.
बनारस नेहेमी किंवा बहुधा 'मसाला'. काय वाट्टेल ते घालायचं. गुलकंद. पाकातला कोहळा(चेरी), वेगवेगळ्या सुपार्या, बडि किंवा जिरेशोप, गुंजपत्ती, थोडं रंगेल व्हायचं तर किवाम लावायचा, अन 'पलंगतोड पान' म्हणून उक्कू शी भांगेची गोळी चोळायची त्यातच. हे म्हणजे मुजरा ऐकणारे नवाबजादे.
कलकत्ता पान तिखट चवीला. त्याचा मसाला, किंवा सादा, किंवा श्ट्यांडर्ड हे खाण्याचं काम त्यातल्या त्यात शिकाऊ मर्दांनी करायचं. थोडा मुजरा, थोडी गझल. फार वर गेले तर ठुमरीऐकणारे.
कलकत्ता मसाला पुरुषांनी अन बनारस मसाला स्त्रियांनी खायचं असा तांबूलसेवनाचा अलिखित नियम.
ही सगळी पानं डबल लागणार. म्हणजे पानवाला २ पानं एकत्र घेतो अन मग त्यावर सगळे मसाले रचतो. लवंग लावून सील करतो. अन ९९.९% लोक ती लवंग फेकून देतात. का कुणास ठाऊक.
मघई ची पानं मात्र इव्ली इवली असतात. अन वेग-वेगळी लागतात. हे पान म्हणजे डायरेक्ट ख्याल गायकी. मधे काही नाही. मघई मसाला खाणे म्हणजे करंटेपणा. अन त्यात गायछाप टाकणे म्हणजे blasphemy.
मघई, किमान १२०-३००, नवरत्न किवाम, थोडी पक्की सुपारी. १-२ तुकडे बाऽस होतात.
वाटलं तर गुंजेचा पाला, थोडी विलायची. फाऽर झालं तर थोडी खुश्बु किंवा ठंडाई.
एक दाढेखाली ठेवावं.
दुसरं बांधून घ्यावं. तीनेक तासांनी दुसर्या पानाची आठवण येते. मग ते हळूच तोंडात ठेवावं.
आहाहा!
याला म्हणतात मघई पान!
27 Aug 2012 - 10:54 am | शैलेन्द्र
वा, रंगलय पान..
27 Aug 2012 - 5:00 pm | बॅटमॅन
अथाऽतो तांबूलजिज्ञासा!!!
24 Aug 2012 - 7:36 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच! आणि आनंदी गोपाळांनी काय रसिकतेने वर्णन केलंय विड्याचं! मस्त! मला पान खायला आवडत नाही पण हे विड्याचं वर्णन फार आवडलं.
26 Aug 2012 - 8:13 pm | तर्री
छान फोटो . आनंदी गोपाळ आपले पान वर्णन आवडले !
पान का फॅन !
27 Aug 2012 - 10:11 am | कपिलमुनी
एक फोटू हवा होता !!
धाग्यामधले फोटो छानच
27 Aug 2012 - 4:28 pm | प्राजक्ता पवार
मस्तं फोटो !
14 Jan 2016 - 7:57 pm | होबासराव
पट्टी लाव रे येक १२० राजरतन किवाम्..अबे टाक ना १२० अजुन थोडसाक्..तो म्हनत जाय "भौ राजा ओरिजिनल हाय ना"....सुपारी भुज्जि मिडियम टाकजो बे आन लवंग नको लाउ फकस्त इलायचि टाक फोडुन.
हा संवाद नविन जागि पान खात असल्यासच होत असे. नेहमि च्या जागि हे एव्हढे सांगावे लागत नसे.
जि नेहमिचि पान खाण्याचि जागा होति त्याला पान टपरी म्हणवत नव्हत "म्होट्ट्या २ दुकानाच मिळुन एक पान पॅलेस केल होत."
पुण्यात पान नाहि खात १२० नकली.. किवाम नकली... वरिजिनल मिळत असेल पण ते एखाद्या दर्दि लाच विचाराव लागेल =))
14 Jan 2016 - 9:09 pm | बाबा योगिराज
पुण्यात पान नाहि खात १२० नकली.. किवाम नकली... वरिजिनल मिळत असेल पण ते एखाद्या दर्दि लाच विचाराव लागेल
मान्य आहे. पुण्यात अजून तरी पान खान्याची मजा नाही आली.
नगरला मात्र संदीप होटेल च्या बहेरील पान-पट्टी वाल्याणे अनपेक्षित पने खुश केल होत.
बाकी पान हां आमच्या पण जिव्हाळयाचा विषय.
पान प्रेमी बाबा योगीराज.
14 Jan 2016 - 11:06 pm | आदूबाळ
आमच्यापण!