(काळाची गरज)

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
14 Aug 2008 - 11:40 am

प्रात:स्मरणीत विडंबन भास्कर केशवसुमारांना स्मरुन ही आजची टुकारी सादर आहे.
आजच्या टुकारीची प्रेरणा हष॑द आनंदी साहेबांची काळाची गरज

एक प्रतिसाद पाहिजे, कौतुकात चिंब भिजणारा;
टिकाकारालाही त्याच्यासोबत, थिजायला लावणारा.

एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.

एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.

एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा;
रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.

एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा;
वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणारा.

एक विडंबक पाहिजे, भावना जाणणारा;
कविता जशी आहे तशीच, व्यवस्थित फाडणारा .

(शेवटी )

एक खरड्या पाहीजे, खरडीला खरड देणारा ;
काम करण्याची अतिव इच्छा, तन्मयतेने मारणारा.

विडंबन

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

14 Aug 2008 - 12:03 pm | अनिल हटेला

एक विडंबक पाहिजे, भावना जाणणारा;
कविता जशी आहे तशीच, व्यवस्थित फाडणारा .

मिळालाये आम्हाला सही विडम्बक ....

कविता वाचायच्या आधी आम्ही विडंबन वादतो आज काल !!!

चालू देत जोरात !!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

केशवसुमार's picture

14 Aug 2008 - 12:15 pm | केशवसुमार

टुकारशेठ,
ह्याला विडंबन म्हणावे का? .. पण सध्या मिपावर जे काही चालू आहे त्याचा गोषवारा सांगणारे हे उत्तम काव्य आहे आहे ..टुकारी चांगली चालू आहे ..चालू द्या..
सर्वच द्विपद्या उत्तम.. अभिनंदन

एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.

एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.

एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा;
रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.

हे तर एकदम झकास..
(निवृत्त)केशवसुमार

बेसनलाडू's picture

14 Aug 2008 - 12:37 pm | बेसनलाडू

गुरुजींशी सहमत!
विषयात आता तोचतोचपणा येत नाही ना इतके पहावे.
(समीक्षक)बेसनलाडू

केशवटुकार's picture

14 Aug 2008 - 2:53 pm | केशवटुकार

बेला !

केशवटुकार's picture

14 Aug 2008 - 2:52 pm | केशवटुकार

>>ह्याला विडंबन म्हणावे का? ..

गुरुवर्य ! आपला शिष्य म्हणवुन असे विडंबन सादर करुन आम्ही आपल्या किर्तीस काळीमा फासल्याच्या वंदता काही समाजकंटकांकडुन कानी आल्या. आपणही याला विडंबन म्हणन्यास वर विरोध दर्शवला आहेच. आम्ही जात्याच टुकार असल्याने आम्ही या आधी विडंबनांचा अभ्यास वैगेरे काही केलेला नाही. आता याला विडंबन का म्हणु नये याबाबत इथे मार्गदर्शन केल्यास मला तसेच इतर अनेक शिकाउ उमेदवारांना मोठाच फायदा होइल !

तसेच खर्‍या सर्किटरावांनी खाली जो प्रश्न विचारुन आम्हाला जसे कोंडीत पकडले आहे अशा वेळेस एका उत्तम केसुधर्माच्या पाइका कडुन काय वर्तन/ कसा प्रतिसाद अपेक्षित असतो ? (सद्य परिस्थितीत टुकार नियमांप्रमाणे आम्ही दुसर्‍याची मान दोरात अडकवनार अन पळ काढणार)

आपलाच

केशवटुकार

विसोबा खेचर's picture

19 Aug 2008 - 2:24 pm | विसोबा खेचर

ह्याला विडंबन म्हणावे का? .. पण सध्या मिपावर जे काही चालू आहे त्याचा गोषवारा सांगणारे हे उत्तम काव्य आहे आहे ..टुकारी चांगली चालू आहे ..चालू द्या..
सर्वच द्विपद्या उत्तम.. अभिनंदन

हेच म्हणतो! चालू द्या.. :)

आपला,
(गळेपडू खरडीकार) तात्या.

सर्किट डांबिस's picture

14 Aug 2008 - 12:17 pm | सर्किट डांबिस (not verified)

विडंबन आवडले टुकारशेठ.

पण

रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.

इथे रुच्चीच्या ऐवजी मनात खरा कुठला शब्द आला होता, प्रामाणिकपणे सांगा ! नाही पुढे प्रसवणे सुचले आहे, म्हणून म्हणतो ! :-)

- सर्किट

बेसनलाडू's picture

14 Aug 2008 - 12:36 pm | बेसनलाडू

:$ ()बेसनलाडू

केशवटुकार's picture

14 Aug 2008 - 2:55 pm | केशवटुकार

>>रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.

यासारखाच मुळ वाक्प्रचार आम्ही आमचे परममित्र श्रीयुत धमाल मुलगा यांजकडुन शिकलो असल्याने तेच यावर स्पष्टीकरण देउ शकतील ;)

धमाल मुलगा's picture

14 Aug 2008 - 3:12 pm | धमाल मुलगा

केशवटुकारांनी असं चारचौघात एकदम आमच्याकडे बोट दाखवल्याने आम्ही अचंबित झालो आहोत..गोंधळलेलो आहोत.

तर, आमचं वाक्य "आमची प्रतिभा 'प्राची ला गच्ची' जोडण्याइतपतही नाही" असं आहे. (संदर्भः हवाय कशाला? सगळ्या जगाला ठाऊक आहे की हे 'रावसाहेब' मधलं आहे.)

तर मंडळी, हे 'प्रा' चं 'रु' आणि 'ची' चं 'च्ची' असं बहुधा वृत्तात/ मात्रेत बसण्यासाठी बदललं गेलं असावं असा आमचा कयास आहे.
आता ह्या संदर्भातलं आमचं ज्ञान अत्यंत तोकडं (की तोडकं) असल्याने त्याबद्दल मात्र आम्ही काही खुलासा करु शकणार नाही. क्षमस्व!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2008 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो टुकार .... ही कविता टुकार? ऐकावं ते नवलंच!!
मस्त जमलंय, विशेषतः हे भारीचः

एक खरड्या पाहीजे, खरडीला खरड देणारा ;
काम करण्याची अतिव इच्छा, तन्मयतेने मारणारा.

मला माझंच वर्णन आहे का असं वाटलं! :-)

मनिष's picture

14 Aug 2008 - 3:18 pm | मनिष

एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.

एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.

एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा;
वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणारा.

हे खासकरून आवडले!! ;)

शितल's picture

14 Aug 2008 - 5:45 pm | शितल

टुकारशेठ,
खतरा विडंबन केले आहे.
सर्वच विडंबन मस्त. :)

मदनबाण's picture

14 Aug 2008 - 6:50 pm | मदनबाण

मस्त विडंबन..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

चतुरंग's picture

14 Aug 2008 - 7:26 pm | चतुरंग

जमेश बरं का विडंबन!

एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.

एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा;
रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.

विषयातले वैविध्य विडंबन खुलवते.

(स्वगत - त्याला 'टुकारशेठ' असं म्हणलंयस खरं पण दिवसेंदिवस तो शिरजोर होतोय बरं का रंग्या, थोडेच दिवसात तुझं दिवाळं काढणार! ~X( :''( )

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

14 Aug 2008 - 10:25 pm | मुक्तसुनीत

टुकार राव ! लई भारी ! च्यामारी सगळ्यांची टोपी उडवली आहे !!

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Aug 2008 - 12:14 am | ब्रिटिश टिंग्या

एकेका कडव्यात एकेकाला घेतलाय! :)
सही!

आवडले रे!

- (तुझा एकेकाळचा मित्र) टिंग्या

मनस्वी's picture

19 Aug 2008 - 1:53 pm | मनस्वी

मस्त लिहिलंय!
एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.

एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

यशोधरा's picture

19 Aug 2008 - 2:16 pm | यशोधरा

मस्त!

सखाराम_गटणे™'s picture

19 Aug 2008 - 2:23 pm | सखाराम_गटणे™

एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.

जबरा.

हा केटु आहे तरी कोण??, भेटले पाहीजे ऐक्दा.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.