डॉक्टरचा अनुभव २

हर्षद खुस्पे's picture
हर्षद खुस्पे in जनातलं, मनातलं
8 May 2012 - 10:14 am

आमचा मित्र सरकारी इस्पितळामध्ये वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent ) म्हणून काम करत होता. हि एक वरच्या दर्जाची पोस्ट असते व क्लास १ प्रकारामध्ये मोडते. ह्या अधिकाऱ्याच्या जबाबदारीमध्ये इस्पितळाचे सर्व प्रशासकीय कामकाज करणे व सर्व डॉक्टर, नर्स, व सर्व इतर कर्मचारी येतात जे सेवा देण्यासाठी मदत करतात त्यांचे व्यवस्थापन करणे इ. मोडते.

ह्याच इस्पितळामध्ये एक चतुर्थ वर्ग कर्मचारी दारू पिउन येणे, रुग्णांकडून पैसे मागणे, उशिरा कामावर येणे, मध्येच सुट्टी मारणे इ. प्रकार चालू होते. जेव्हा हे प्रकार वारंवार ताकीद देउन पण थांबेनात म्हणून मित्राने त्याला मेमो (कारणे दाखवा नोटीस) बजावायचे ठरवले व कार्यालयीन अधीक्षकाला तसे सूचित केले. हि बातमी त्या चतुर्थ वर्ग कर्मचार्यापर्यंत गेली. त्याने पण ताबडतोब एक अर्ज लिहून कार्यालयीन अधीक्षकाला दिला.

जेव्हा मेमोवर सही करायला आमचा मित्रा समोर कार्यालयीन अधीक्षक जेव्हा आला त्याच बरोबर त्याने त्या कर्मचार्याने लिहिलेला अर्ज आमच्या मित्राला दाखवला जे वाचून मित्र सर्दच झाला. अर्जामध्ये लिहिले होते.

प्रती ,
मा. सिव्हील सर्जन (हे वैद्यकीय अधीक्षकाचे वरिष्ठ असतात) ,

जि. अमुक

विषय : मागासवर्गीय असल्याकारणाने होणाऱ्या अन्याया बाबत

महोदय,
मी अमुक तमुक, चतुर्थ वर्ग कर्मचारी आहे. तसेच मी तमुक इस्पितळामध्ये काम करीत असून अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे . असे असूनदेखील वैद्यकीय अधीक्षक हे उच्चवर्णीय व मी मागासवर्गीय असल्याने जाणूनबुजून मला त्रास देत आहेत. मला मेमो देण्याची धमकी देतात व त्रास देतात. तसेच माझ्याशी बोलणे टाळतात, माझ्या हाताचे पाणी पिणे टाळतात. तरी सर्व प्रकारची चौकशी व्हावी व मला न्याय मिळावा हि विनंती.

आ.
अमुक तमुक

हे वाचल्यावर मित्राने स्वत:च्या हाताने त्या कर्मचार्याला देण्यासाठी लिहिलेला मेमो फाडून टाकला. :) अशी आहे दलित अत्याचार विरोधी कायद्याची ताकद आणि असा आहे उपयोग ;)

समाजअनुभव

प्रतिक्रिया

काय बोलू..

अनुभव चांगल्या रितीने लिहीला आहेत पण जातीविषयक उलटसुलट वार - प्रतिवार यांसाठी खाद्यही दिलं आहेत.

अनुभवाविषयी बोलायचं तर हो.. असे अनुभव पाहिले आहेत. अगदी क्लास वन अधिकारी, झोनचे प्रमुख म्हणावे अशा लेव्हलच्या मनुष्यालाही एका चतुर्थ श्रेणी शिपायाने अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप करुन (शब्द वापरला असा आरोप) धारेवर धरलेलं आणि वाट लावलेली पाहिली आहे. तो अधिकारी परप्रांतातून आलेला होता, त्याला वास्तविक इथले शब्दही माहीत नव्हते.. जातिवाचक शब्द नेमके वापरणे तर दूरची गोष्ट.

त्याने केवळ शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होता.

हर्षद खुस्पे's picture

8 May 2012 - 10:39 am | हर्षद खुस्पे

सर्वसाधारणपणे मागासवर्गीय हाच शब्द वापरतात. चुकीचा असल्यास मा. संपादकांनी योग्य शब्द बदलावा हि विनंती

नाय नाय.. तुमचा कोणताही शब्द चुकला नाही किंवा उद्देशही दुरित नाही.. अगदी संतुलित रित्या आणि सत्य अनुभवच लिहिला आहेत. म्हणून तर मीही मला दिसलेला एक अनुभव सांगितला. अजूनही आहेत.. उलट बाजूचेही आहेत.. पण ते सर्व आता जुने संदर्भ आहेत.

फक्त नकळत हा विषय तिकडे घसरु शकतो इतकंच म्हटलं.. तसं होऊ नये ही इच्छा पण जे काही व्हायचं ते होणारच.

अशा गोष्टी होत असल्या तरी त्याविषयी कडवटपणा न धरल्याने आणि त्या व्यक्तीशी व्यक्तिगत समेट केल्याने बराच गुंता टळतो असं वाटतं.. अर्थात केस टू केस..

माझ्या शेतात काही विशिष्ट प्रवर्गातले पाचसहा लोक अनेक वर्षे अनधिकृत शेती करत होते. त्यांच्यावर पूर्वी कायदेशीर कारवाई झाली असूनही ते परत आले. आता माझी बाजू पूर्ण कायदेशीर असूनही त्यांना हाताला धरुन बाहेर काढू शकत नाही कारण त्या वर्गातल्या व्यक्तीला जमिनीपासून तोडणे (भूमीहीन करणे) हा अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली येणारा गुन्हा आहे. मग ताबा कायदेशीर कागदोपत्री असो/नसो. त्यामुळे मी माझ्या जमिनीवर पाय टाकणे रिस्की बनले. जेथे आहे जसे आहे तत्वावर गावातच मातीच्या भावाने विकून मोकळे व्हावे लागले. मग गावगाडा काय ते बघून घेईल..

इरसाल's picture

8 May 2012 - 10:30 am | इरसाल

तरी ही गविंच्या दुसर्‍या ओळीशी सहमत.

डॉक्टर, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा वापर जास्त करुन नाहक त्रास देण्यासाठीच केला जातो. माझा एक मित्र एका नालायकाच्या अ‍ॅट्रॉसिटी वापरुन केलेल्या तक्रारीमुळेच न्यायालयाच्या वार्‍या करतोय.. :(

- पिंगू

भोगा आता पूर्वजांच्या कर्माची फळ ;)

निनाद's picture

8 May 2012 - 11:08 am | निनाद

मी पण दलित अत्याचार विरोधी कायद्याचा दुरुपयोगाने आमच्या एका नातेवाईकाला प्रचंड न्यायालयीन त्रास सुमारे १७ वर्षे सहन करताना पाहिले आहे. पुढे पुरावा नाही म्हणून तो खटला काढून टाकला इतकेच झाले. (पण त्यासाठी अनेक भेटीगाठी घ्याव्या लागल्या आणि सर्व कथा सत्रा हजारवेळा सांगावी लागली. वेळ पैसे खर्च होत राहिले, केस टाकणारा माणूस कधीही कोणत्याही तारखेला उपस्थित राहिला नाही ते वेगळेच.) या शिवाय ही कथा पद्धतशीररित्या एका गोटात पसरवत राहिली गेली. त्यामुळे ते लोक अनेकदा टोचून बोलत. ते ऐकत राहणे हा अत्याचार होता ते निराळेच. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात फक्त वेळेवर येण्याची शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता इतकाच गुन्हा होता.

अशाने कोण सरकारी क्षेत्रात काम करेल?

लेखाला नेमकं काय म्हणावं या पेचात पडलोय.

>>>अशी आहे दलित अत्याचार विरोधी कायद्याची ताकद आणि असा आहे उपयोग

कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्याच्या 'अशा' वापरामुळे .... :(

माझ्या बहिणीच्या ऑफिसातील हा अनुभव -

माझी बहिण एका अतिक्शय नावाजलेल्या financial institution मध्ये नोकरीला होती. तिथे XYZ व्यक्ती Manager म्हणून कामाला होती. कामाच्या बाबतीत शून्य. त्याला STAFF हा शब्द बोलता येत नसे. तो सटाफ बोलायचा. निव्वळ सरकारी पाहुणा असल्यामुळे आणि पेर्सोणेल department ला असल्यामुळे चमचेगिरी करून manager पदापर्यंत पोहोचला होता.

पुढचे promotion होते Asst. General Manager जे काही केल्या ह्याला मिळाले नव्हते. झाले ह्याने लगेच मागासवर्गीयच्या कोणत्यातरी कमिशूनला पत्र लिहिले कि मी मागासवर्गीय असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझा छळ होत आहे.

झाले त्या financial institute च्या chairman ला कापरे भरले आणि लगेच हि व्यक्ती प्रमोट झाली. म्हणजे कितीतरी लायक माणसाना डावलून ह्यांची वर्णी लागली.

सुहास..'s picture

8 May 2012 - 11:39 am | सुहास..

डॉक,

अजुन लिहा !! आणी भोतमांगे विषयी पण लिहा !!

http://vakindia.org/pdf/khairlanji.pdf

शिवाय जरा "लॉ" चा अभ्यास करून मग लिहा.

( आमचे परम-मित्र आदी जोशी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ;) )

इथे कायद्याच्या गैर वापराबद्दल बोलणे चाललेले आहे. कोणता एक समाज चुकिचा आहे असे नाही ..पण समाजातली काही लोकं कायद्याचा गैरवापर कसा करतात त्या बद्दल चाललेले चर्चा आहे ...
खैरलांजी येथे ज्याच्यांवर अन्याय झाला आहे ..ते दलित होते मान्य ..
पण अन्यायाची तीव्रता जातींवर कमी जास्त होत नसते ...
अशा लिस्ट खुप मोठ्या आहेत ...१९४८ च्या गांधी हत्येनंतरच्या जळीताची लिंक डकवली असती तर प्रतिसाद संतुलीत झाला असता ..

सुहास..'s picture

8 May 2012 - 3:28 pm | सुहास..

इथे कायद्याच्या गैर वापराबद्दल बोलणे चाललेले आहे. >>>

कप्पाळ माझ !! कायदा काय आहे अ‍ॅट्रॉसिटी चा ? मार्गदर्शन करा.

खैरलांजी येथे ज्याच्यांवर अन्याय झाला आहे ..ते दलित होते मान्य .. >>>

हे लाईट - लाईट वाटते आहे , यातच सर्व आले ..

माझा प्रश्न : तो मागासवर्गीयाच्या एवजी जर ई. असता तर काय झाले असते ?

आदिजोशी's picture

8 May 2012 - 4:41 pm | आदिजोशी

भारत माता की जय

इस्पिक राजा's picture

8 May 2012 - 11:55 am | इस्पिक राजा

मेला हा खुस्पे . ब्रिगेडी येतायत जत्थ्याने आता.

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार

अहो असे किस्से आंतरजालावरती देखील बघायला मिळतात की कायम.

बामणी संस्थळे असल्याने आमचे प्रतिसाद उडतात, धागे उडतात म्हणून गळे काढणारे कमी आहेत का ? बर्‍याचदा तर काही विशिष्ठ अधिकारी व्यक्तींकडून अशा चाळ्यांना प्रोत्साहन दिल्याचे कानावरती आले आहे. आणि मग अशा विषयावरती लिहिले गेले की ते धागे उडवून स्वतःचीच बेअब्रु करून घेताना तर चक्क पाहिले आहे.

हिंदु तत्वज्ञान कर्म विपाक शिकविते.. म्हणजे आज जे काही घडते ते पूर्वज्ञ्मीचे फळ असते म्हणे! आता पूर्वीच्या जन्मात इतर जातीतल्याना पाणी, शिक्षण न देणे, मंत्र ऐकल्यास कानात शिशाचा रस घालणे, असले वेडे चाळे केले असल्यास या जन्मात त्याचे फळ भोगावेच लागेल ना? :) अकारण अ‍ॅट्रोसिटी मागे लागणे, नोकरीत प्रमोशन न मिळणे, एखाद्या मार्काने कॉलेजची अ‍ॅडमिशन हुकणे.. हे सर्व गतजन्मीच्या कर्मविपाकाचे फळ असते... आपल्याला त्रासदायक ठरलेल्या व्यक्ती केवळ निमित्तमात्र असतात. त्यामुळे कुणालाही दोष देऊ नये.. हिंदु धर्मातील कर्मविपाक आठवून स्वतःचेच सांत्वन करावे व गप्प बसावे. पाप नाशासाठी नामस्मरण करावे, यज्ञ करून इतर लोकाना अन्नदान, वस्त्रदान करावे. पूर्वीच्या जन्मातील पापांचा कर्मविपाक फिटावा या हेतूने परमेश्वराने हा कायदा जन्माला घातला आहे, हे स्मरुन परमेश्वरी लीलेचे कौतुक करावे आणि त्याच्या नित्य स्मरणात दंग रहावे. या जन्मी इतर जाती, धर्म यांची निंदा करुन पुन्हा आपला कर्मविपाक वाढवून ठेऊ नये.. न्हाई तर आणि पुढच्या जन्मी आणि काही तरी भोगावे लागेल. कानात शिसे घालणारे अजुनही आहेत... http://www.maayboli.com/node/34832

-----------------------------------------------------------------
कर्मविपाक आणि आलेपाक होलसेल रेटवर मिळेल.

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

बूच !

स्पा's picture

8 May 2012 - 1:18 pm | स्पा

धन्स रे.. हे असले मूर्ख चाळे थांबव्ल्याबद्दल

जामोप्या यांचा प्रतिसाद उपरोधात्मक असावा अशी शंका येत आहे.

किंवा तशी आशा आहे.

असं आहे की हे सर्व एक चक्र आहे असं एकदा मान्य केलं की ते फिरणार आणि पुन्हा पहिली बाजू वर येणार हे गृहीत धरल्यासारखं होतं.

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 1:33 pm | JAGOMOHANPYARE

उपरोधच आहे. पण कुणी गांभिर्याने घेतला तरी त्यात तात्विकदृष्ट्या चुकीचे काही नाही. :)

------------------------------------------------
मोहनबुवा सनातनी

कर्मविपाक आणि आलेपाक होलसेल रेटवर मिळेल.

इस्पिक राजा's picture

8 May 2012 - 1:34 pm | इस्पिक राजा

काय उपयोग बूच मारल्याने?

त्यांचा कर्मविपाकाचा सिद्धांत बरोबरच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सध्याचे ब्रिगेडी नरकात गेल्यावर पुढच्या पिढीतले जे ब्रिगेडी येतील त्यांच्यावर ब्राह्मणांची पुढची पिढी कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करु शकेल. वाईट गोष्ट एवढीच घडेल की कदाचित तुमची पुढची पिढी संस्थळांवर असले (असले म्हणजे मी किंवा तुम्ही देत आहात तसले नाही हा . ते " तसले " ) वांझोटे प्रतिसाद देत फिरेल. एकुण तुमची पुढची पिढी ** निघणार आहे हे खरे.

कर्म विपाकाचा सिद्धांत' माझा'नाही. तो हिंदु धर्माचा भाग आहे. मी फक्त या घटनेच्या अनुषंगाने सध्य कालातील स्थल काल व्यक्ती त्या सिद्धांतात बसवल्या इतकेच.
--------------------------------------------------
मोहनबुवा सनातनी
कर्मविपाक आणि आलेपाक होलसेल रेटवर मिळेल.

निशदे's picture

9 May 2012 - 1:34 am | निशदे

एका शब्दाचा किती जबरदस्त वापर!!!!!!! इथे हसून लोळायची वेळ आली.........

डॉक, हा ही भाग आवडला.
'मनुष्य स्वभावाला औषध नाही' याचा इथेही उनुभव यायला सुरवात झाली असेलच आताशा. ;)

काही मंडळी आपापले फटाके घेउन कुणी तरी जळती अगरबत्ती आणायची वाटच पहात असतात.
तस्मात (नकळत का होई ना) वात लावली आहेच तर आता आतषबाजी पहात बसा. :)

पैसा's picture

8 May 2012 - 1:52 pm | पैसा

एकेक नमुने छान शोधून आणताय. असंचं सेक्शुअल हॅरॅसमेंटचं कलम लावून एका चावट महिलेने बँकेच्या चीफ मॅनेजरला जेरीला आणल्याचं उदाहरण मी पाहिलं आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

नाव, पत्ता वैग्रे काय मिळेल काय ?

पैसा's picture

8 May 2012 - 2:05 pm | पैसा

तुझ्यासारखा सालस मुलगा बिघडेल असं काही मी करणार नाही! :D

नाव, पत्ता वैग्रे काय मिळेल काय ?

आँ?

काय बेत काय नेमका?

कलम लावून घ्याल उगाचच हो..

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार

तुझ्यासारखा सालस मुलगा बिघडेल असं काही मी करणार नाही!

शिव्या द्यायचे काम नाही !

@गवि

आँ?

काय बेत काय नेमका?

कलम लावून घ्याल उगाचच हो..

अहो कलमांना वैग्रे पापभिरु माणसाने घाबरावे. आमच्या सारख्या नंग्या फकिरांना कसली तमा ? ;)

इस्पिक राजा's picture

8 May 2012 - 3:52 pm | इस्पिक राजा

परा अश्या सगळ्यांची नावे टिपुन ठेवतो आहे. उद्या त्याच्या क्याफेची चॅन सुरु होइल तेव्हा अश्या बायांना कामावर ठेवायला नको म्हणुन. हो म्हणजे काही केलेले नसताना त्या म्यानेजरल अडकवला. आपला परा परा.....

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार

क्याफे बंद करुन जमाना झाला की हो.

आज उद्या मसाज सेंटर उघडले तर मदतनीसांची कमतरता नको म्हणून नोंदी करुन ठेवतो आहे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 May 2012 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म!

आनंदी गोपाळ's picture

9 May 2012 - 1:14 am | आनंदी गोपाळ

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2012 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, अनुभव वाचतोय. अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

महाठक's picture

5 Feb 2017 - 12:53 am | महाठक

अतिशय अवघड आहे