एका डॉक्टरचा अनुभव

हर्षद खुस्पे's picture
हर्षद खुस्पे in जनातलं, मनातलं
1 May 2012 - 10:29 am

कोल्हापूर जिल्ह्यामधील एक खेडेगाव . आम्ही सरकारी डॉक्टर त्या खेडेगावामध्ये नोकरीला (सरकारी इस्पितळामध्ये ) होतो...सकाळचे काहीतरी १०-११ वाजले असतील.....दवाखाना तसा सुस्तच होता. नुकताच राउंड टाकून आलो होतो आणि सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत याची तपासणी आणि सिस्टर ना इतर सूचना करून माझ्या रुग्ण तपासणी खोली मध्ये येउन बसलो होतो आणि इस्पितळामध्ये असलेल्या इतर ऑफिस च्या लोकांशी काही बोलत होतो तो पर्यंत एक गलका ऐकू आला. गलका दवाखान्याच्या दिशेनेच येत होता म्हणून उत्सुकतेने मी पाहू लागलो तर एक साधारण ३५-४० वयाचा माणूस एका ७-8 वर्षे वयाच्या मुलाला दोन्ही हातामध्ये धरून पळत येत होता.
तो माणूस येताच त्याने सागितले कि पोराने काही तरी खाल्ले आहे आणि पोरगा बेशुद्ध पडला आहे . मी बारकाईने बघोतले तर त्या मुलाच्या तोंडाला काहीतरी पांढरे लागले होते. मी मुलाच्या डोळ्यामध्ये battery चा प्रकाश टाकला असता त्याची बुब्बुळ आकसली होती. त्यावरून माझ्या काहीतरी लक्षात आले आणि जवळ जमलेल्या लोकांना खोली बाहेर काढले व मुलाजवळ गेलो आणि हळू आवाजात म्हटले ' मला माहित आहे कि तू बेशुद्ध नाहीस, इथले सगळे खोली बाहेर आहेत आणि तू डोळे उघड, मी कोणालाही काही सांगणार नाही,' मग १-२ मि. त्यामुलाने डोळे उघडले, हळूच कानोसा घेतला आणि कोणीहि नाही ह्याची खात्री पटताच तो लगेच उठून बसला. मी त्याला विश्वासात घेउन विचारले कि बाबा तू असं का केलेस? तर त्याने दिलेले उत्तर मोठे धक्कादायक होते....तो म्हणाला ' आम्ही मुले - मुले दररोज तोंडाजवळ whitner ( जे type केलेले अक्षर खोडायला वापरतात ते पांढरे द्रव्य :) ) नेतो आणि त्याचा वास घेत आसतो... मग मी विचारले कि ह्याला पैसे कुठून आणता तर त्याने उत्तर दिले कि आम्ही मुल - मुलं घरी खाऊला जे पैसे देतात ते साठवतो आणि हे विकत घेतो. १ बाटली संपे पर्यंत पैसे साठतात मग दुसरी घेतो. आज जेव्हा वास घेत होतो तेव्हा अचानक वडील समोर आले मग आता हातामधील बाटली कुठे फेकणार म्हणून मी ते तोंडाला लावलं आणि बेशुद्ध पडायचं ढोंग केला.......मग मी मुलाला ह्या सर्व गोष्टीचे वाईट परिणाम सांगितले आणि म्हटला पुन्हा असं काही करून तू तुझा आयुष्य वाया घालवू नको.

मग मुलाला घेउन मी बाहेर आलो आणि सांगितला कि injection दिले आणि बरा झाला आसे सांगून त्याच्या वडिलांना औषध घ्यायला थोड्यावेळाने या आसे सांगितले...व ते वडील आल्यावर सांगितले कि त्याला मारू नका ...पण असं असं झाले होते...त्याला सांभाळा., वडील न मारण्याचा वचन देउन गेले. नंतर गावामध्ये कळला कि वडील पण दारुडे होते. :)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

1 May 2012 - 10:38 am | संजय क्षीरसागर

लिहीत राहा!

हर्षद खुस्पे's picture

1 May 2012 - 11:16 am | हर्षद खुस्पे

पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे ही विनंती

प्रदीप's picture

1 May 2012 - 12:38 pm | प्रदीप

लिहीले आहेत, असेच अजूनही लिहीत रहा.

मुक्त विहारि's picture

1 May 2012 - 11:37 am | मुक्त विहारि

अजुन लिहा तुमचे अनुभव.

पैसा's picture

1 May 2012 - 11:38 am | पैसा

असेच तुमचे अनुभव लिहीत रहा. पुढील लेखनाला शुभेच्छा!

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

असेच तुमचे अनुभव लिहीत रहा. पुढील लेखनाला शुभेच्छा!

देव करो आणि असे अनुभव वारंवार न येवोत.

सहज's picture

1 May 2012 - 12:19 pm | सहज

पराशी असहमत.

ज्याची त्याची जाण हे सत्यवचन मान्य करुनही तेझ सिनेमा बघण्यापेक्षा व्हाईटनरची बाटली हुंगणे हे तुलनेत सुरक्षीत आयुष्य आहे / योग्य निवड आहे / अनुभवाने मोठे होणे आहे वगैरे वगैरे ;-)

डॉक्टरसाहेब असेच किस्से ऐकवत जा!

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार

चला, आता इकडे व्हाईटनर शोधणे आले.

आणि व्हाईटनर मुळेच तर सगळे प्रश्न निर्माण झालेतना!

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

आणि व्हाईटनर मुळेच तर सगळे प्रश्न निर्माण झालेतना!

ह्यासाठीच अफू सारख्या शेतीला उत्तेजन देणे गरजेचे आहे. 'विड' हा प्रकार मुळातच अत्यंत महाग म्हणून गणला जातो, त्यात आता अफू आणि गांजा देखील निर्यात व्हायला लागल्याने अशा मुलांनी करायचे काय ? त्यात पुन्हा दारुचे भाव देखील वाढत चालले आहेत. अशावेळी अशा गरजवंतांपर्यंत स्वस्त दरात व चांगल्या प्रकारची मादक द्रव्ये पोचवणे हे बालकल्याण खात्याचे काम नाही काय ?

संजय क्षीरसागर's picture

1 May 2012 - 1:21 pm | संजय क्षीरसागर

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, डॅडी नुसत्या ब्रशचं काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, डॅडी नुसत्या ब्रशचं काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे

प्रतिसाद अंमळ अश्लील आहे असे मत नोंदवतो. ;)

संजय क्षीरसागर's picture

2 May 2012 - 1:57 pm | संजय क्षीरसागर

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, (याचा अर्थ सध्याची मुलं बेगुमान आहेत) डॅडी नुसत्या ब्रशचं (असहाय्यता या अर्थानं) काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे

या आधीचा प्रतिसाद पाहिला तरी असाच अर्थ व्यक्त होईल

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2012 - 12:45 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉक्टर साहेब, लिहित रहा हो. तुमच्या पेशात खूप विविध अनुभव येतात. मांडा इथे!

साती's picture

1 May 2012 - 2:40 pm | साती

असेच म्हणते.
तुमच्या पेशात विविध अनुभव येतात ते मांडा इथे.
ता.क. संजोप रावांनी दिलेल्या लिंकवरून लोकप्रभातील कोंकणचो डॉक्टर वाचतेय. मस्त आहे.
आता तुम्ही मस्त कोल्हापूरी डॉक्टर सिरीज टाका बघू.

बाकी बिका, हे डॉक्टर लोक आपले अनुभ्व लिहायला इतका आळशीपणा का करतात हो? ;)

प्यारे१'s picture

1 May 2012 - 6:42 pm | प्यारे१

>>>बाकी साती, हे डॉक्टर लोक आपले अनुभ्व लिहायला इतका आळशीपणा का करतात हो?

ह्याला स्वगत म्हणतात स्वगत. आता बिका हा सातीचा अथवा साती हा बिकाचा 'नुसताच आयडी' असला तर प्र'श्ण' मिटला :)

बाकी डाक्टरसाहेब, सरकारी अडचणीत न येता बक्कळ लिहा.... लेखन आवडण्यात आले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2012 - 12:34 am | बिपिन कार्यकर्ते

त्याचं काय आहे ना साते, हे डॉक्टर लोक मूळातच आळशी असतात. काही म्हणजे काही करायला नको असतं यांना... साधं लॉगिन नाही करत दिवसचे दिवस... नियमित लिहिणार काय? कप्पाळ? ;)

अवांतरः इथे फक्त डॉ. वर मतप्रदर्शन आहे, प्रा. वाल्या डॉं.नी कृपया लक्ष देऊ नये! :ड ;)

त्याचं काय आहे ना साते, हे डॉक्टर लोक मूळातच आळशी असतात. काही म्हणजे काही करायला नको असतं यांना... साधं लॉगिन नाही करत दिवसचे दिवस... नियमित लिहिणार काय? कप्पाळ? >>>

=)) =)) =)) =)) =))

अवांतरः इथे फक्त डॉ. वर मतप्रदर्शन आहे, प्रा. वाल्या डॉं.नी कृपया लक्ष देऊ नये! >>>

दंतवैद्याबद्दल आपले हेच मत आहे का ;)

हा अनुभव वाचताना भानामतीच्या लेखातली डोळ्यातून खडे येण्याच्या प्रसंगाची आठवण आली.

आहो आळशीपणा नाही हो. लिहायची भीती वाटत होती. :) आपल्या प्रतिक्रिया काय आसतील ह्याची...पण आता हरकत नाही. ह्यापुढे सुरुवात असेल हे नक्की.

टुकुल's picture

1 May 2012 - 11:57 pm | टुकुल

छोटासा मस्त अनुभव. अजुन लिहा.

--टुकुल

दादा कोंडके's picture

2 May 2012 - 12:27 am | दादा कोंडके

समस्त डॉक्टर आणि प्राध्यापक मंडळींनी लिहायला चालू केलं पाहिजे असं मत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द आपण शांत चित्ताने वाचून घेतलेत त्याबद्दल आभार मानतो. जैहिंद!

पहिल्या लिखाणाच्या मानानं बरंच शुद्ध लिहिलं आहे, प्रथम त्याबद्दल धन्यवाद. खरंच तुमच्या क्षेत्रातले अजुन अनुभव ऐकायला आवडतील.

अनुभव उत्तम लिहिला आहेत.. पण प्रसंगातल्याच एका तपशिलाबद्दल वाचताना शंका उत्पन्न झाली.. ती तुम्हाला विचारुन तसा उपयोग नसला तरी इथे नोंदवतो.

आज जेव्हा वास घेत होतो तेव्हा अचानक वडील समोर आले मग आता हातामधील बाटली कुठे फेकणार म्हणून मी ते तोंडाला लावलं आणि बेशुद्ध पडायचं ढोंग केला.......

याने काय साधले ? अगदी इम्पल्सिव्ह निर्णय म्हटलं तरी, त्या द्रव्याचा वास घेताना वडिलांनी पाहिलं तर मार, रट्टे, बोलणी इत्यादि घडेल या भीतीला समजू गेले असता, तेच द्रव्य पिताना वडिलांनी पाहिलं तर हा मार / रट्टे / बोलणी कशी टळली असती असं त्याला वाटलं? द्रव्याचा वास घेणं हे तुलनेत समजायला अवघड आणि लपवायला सोपं. वडिलांसमोर ते पिण्यापेक्षा..

की पोरगा सिरियस झाला या भीतीने तूर्तास तो विषय बाजूला पडला असता अशी अटकळ बांधली.. तसं तर मग तोंडाला लावून पिण्याचा आरोप न घेता नुसतंही बेशुद्ध पडल्यासारखं करता आलं असतं.

उगाच आपली शंका.. लेखाच्या उत्तमपणाशी त्याचा काही संबंध नाही.

प्यारे१'s picture

2 May 2012 - 2:58 pm | प्यारे१

>>>याने काय साधले ?

मुलाचा 'अनुभव' कमी पडला असेल गवि!

डॉक्टर साहेब, त्या मुलाला मिपा सदस्य करुन घ्या हो! अनेक 'सिद्धपुरुष' आहेत इथं.
ज्ञान प्राप्त करके किर्पा आएगी उस लडकेपे|

आहो तिसरी मधला पोरगा...अक्कल नको तिथे जास्त.....

छेटेखानी अनुभवाचे बोल आवडले.
और भी आंदो. :)

मितभाषी's picture

2 May 2012 - 4:27 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

लिहित रहा! सवयीने अजून रंजकता वाढवता येईलच!
पहिला प्रयत्न म्हणून छान आहे

अवांतरः

सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत याची तपासणी आणि सिस्टर ना इतर सूचना करून

काय बरं असतील 'इतर' सुचना? ;)

हर्षद खुस्पे's picture

3 May 2012 - 12:42 am | हर्षद खुस्पे

आहो सरकारी हास्पिटल्यामध्यल्या सिस्टर खरोखर सिस्टर म्हणायच्याच लायकीच्या आसतात :)

शिल्पा ब's picture

3 May 2012 - 12:44 am | शिल्पा ब

तुम्हाला कीती बहीणी आहेत म्हणायच्या?