आमचा मित्र सरकारी इस्पितळामध्ये वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent ) म्हणून काम करत होता. हि एक वरच्या दर्जाची पोस्ट असते व क्लास १ प्रकारामध्ये मोडते. ह्या अधिकाऱ्याच्या जबाबदारीमध्ये इस्पितळाचे सर्व प्रशासकीय कामकाज करणे व सर्व डॉक्टर, नर्स, व सर्व इतर कर्मचारी येतात जे सेवा देण्यासाठी मदत करतात त्यांचे व्यवस्थापन करणे इ. मोडते.
ह्याच इस्पितळामध्ये एक चतुर्थ वर्ग कर्मचारी दारू पिउन येणे, रुग्णांकडून पैसे मागणे, उशिरा कामावर येणे, मध्येच सुट्टी मारणे इ. प्रकार चालू होते. जेव्हा हे प्रकार वारंवार ताकीद देउन पण थांबेनात म्हणून मित्राने त्याला मेमो (कारणे दाखवा नोटीस) बजावायचे ठरवले व कार्यालयीन अधीक्षकाला तसे सूचित केले. हि बातमी त्या चतुर्थ वर्ग कर्मचार्यापर्यंत गेली. त्याने पण ताबडतोब एक अर्ज लिहून कार्यालयीन अधीक्षकाला दिला.
जेव्हा मेमोवर सही करायला आमचा मित्रा समोर कार्यालयीन अधीक्षक जेव्हा आला त्याच बरोबर त्याने त्या कर्मचार्याने लिहिलेला अर्ज आमच्या मित्राला दाखवला जे वाचून मित्र सर्दच झाला. अर्जामध्ये लिहिले होते.
प्रती ,
मा. सिव्हील सर्जन (हे वैद्यकीय अधीक्षकाचे वरिष्ठ असतात) ,
जि. अमुक
विषय : मागासवर्गीय असल्याकारणाने होणाऱ्या अन्याया बाबत
महोदय,
मी अमुक तमुक, चतुर्थ वर्ग कर्मचारी आहे. तसेच मी तमुक इस्पितळामध्ये काम करीत असून अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे . असे असूनदेखील वैद्यकीय अधीक्षक हे उच्चवर्णीय व मी मागासवर्गीय असल्याने जाणूनबुजून मला त्रास देत आहेत. मला मेमो देण्याची धमकी देतात व त्रास देतात. तसेच माझ्याशी बोलणे टाळतात, माझ्या हाताचे पाणी पिणे टाळतात. तरी सर्व प्रकारची चौकशी व्हावी व मला न्याय मिळावा हि विनंती.
आ.
अमुक तमुक
हे वाचल्यावर मित्राने स्वत:च्या हाताने त्या कर्मचार्याला देण्यासाठी लिहिलेला मेमो फाडून टाकला. :) अशी आहे दलित अत्याचार विरोधी कायद्याची ताकद आणि असा आहे उपयोग ;)
वाचने
8277
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय बोलू.. अनुभव चांगल्या
जातीविषयक उलटसुलट वार - प्रतिवार
In reply to काय बोलू.. अनुभव चांगल्या by गवि
नाय नाय.. तुमचा कोणताही शब्द
In reply to जातीविषयक उलटसुलट वार - प्रतिवार by हर्षद खुस्पे
सुन्न.
डॉक्टर, अॅट्रॉसिटी कायद्याचा
भोगा आता पूर्वजांच्या कर्माची
+१
लेखाला नेमकं काय म्हणावं या
माझ्या बहिणीच्या ऑफिसातील हा
डॉक, अजुन लिहा !! आणी
मुद्दा सोडून दिलेला प्रतिसाद
In reply to डॉक, अजुन लिहा !! आणी by सुहास..
इथे कायद्याच्या गैर
In reply to मुद्दा सोडून दिलेला प्रतिसाद by कपिलमुनी
हा घे प्रतिसाद
In reply to डॉक, अजुन लिहा !! आणी by सुहास..
मेला हा खुस्पे . ब्रिगेडी
हॅ हॅ हॅ
हिंदु तत्वज्ञान कर्म विपाक
बूच !
In reply to हिंदु तत्वज्ञान कर्म विपाक by JAGOMOHANPYARE
+१
In reply to बूच ! by परिकथेतील राजकुमार
जामोप्या यांचा प्रतिसाद
In reply to बूच ! by परिकथेतील राजकुमार
उपरोधच आहे. पण कुणी
In reply to जामोप्या यांचा प्रतिसाद by गवि
काय उपयोग बूच
In reply to बूच ! by परिकथेतील राजकुमार
कर्म विपाकाचा सिद्धांत'
In reply to काय उपयोग बूच by इस्पिक राजा
परा
In reply to बूच ! by परिकथेतील राजकुमार
डॉक, हा ही भाग आवडला.'मनुष्य
हा पण भाग आवडला.
चावट महिलेचे
In reply to हा पण भाग आवडला. by पैसा
अजिबात नाही
In reply to चावट महिलेचे by परिकथेतील राजकुमार
नाव, पत्ता वैग्रे काय मिळेल
In reply to चावट महिलेचे by परिकथेतील राजकुमार
तुझ्यासारखा सालस मुलगा बिघडेल
In reply to नाव, पत्ता वैग्रे काय मिळेल by गवि
परा अश्या सगळ्यांची नावे
In reply to नाव, पत्ता वैग्रे काय मिळेल by गवि
इरा
In reply to परा अश्या सगळ्यांची नावे by इस्पिक राजा
हम्म!
http://in.video.yahoo.com/blo
धन्यवाद!
In reply to http://in.video.yahoo.com/blo by JAGOMOHANPYARE
वाचतोय.
अवघड आहे