Skip to main content

माय मराठीचे श्लोक...!!

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 27/02/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

"अभय" एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             - गंगाधर मुटे "अभय"
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
....................................................................

श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने


---------------------------------
विशेष
Taxonomy upgrade extras

वाचने 4574
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी! तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!! तुझे शब्दलालित्य सूरास मोही

अभय" एक निश्चय मनासी करावा ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा सदा शब्द वाणीत ये सर्वकाली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अगदी अगदी!!! मनापासून पटलं. अगदी आवडलं.

आवडले श्लोक. -दिलीप बिरुटे

श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने